अविनाश भोसले आणि मराठी माणूस ?

अविनाश भोसले हे नाव सध्या भरपूर चर्चेत आहे.पेश्याने बांधकाम व्यावसायिक असलेले हे अविनाश भोसले यांचा पुण्यात असलेला भव्य दिव्य राजवाडा,आलिशान गाड्या,आणी त्यांच्याकडे असलेल्या मालमत्तेची चौकशी करण्यात येत आहे.या सगळ्यात मराठी माणूस आणि एवढी मालमत्ता यामुळे हे प्रकरण प्रत्येक वर्तमानपत्रात वाचायला मिळेल.या सगळ्यावर एका मराठी माणसालाच खुपणारी मराठी माणसाची संपत्ती यामुळे हि चर्चा वेगळ्याच दिशेने जात आहे.
युतीच्या सत्ताकाळात मुंडेंनी तेव्हा कुष्णा खोऱ्यातलं कंत्राट जाहीर करताना एका दिवसात ४०० कोटीचं कंत्राट जाहीर केलं होत आणि त्या कंत्राटात मोठी मलई मलई मिळवलेला अविनाश भोसले लख्खपणे चमकला होता.१९९६ पासून अवध्या दहा वर्षात अविनाश भोसले यांनी सुमारे साडे बावीस हजार कोटीची उलाढाल केली. सध्या त्यांच्या कंपनीचा वार्षिक टनओव्हर ७००कोटींच्या घरात आहे.

अविनाश भोसलें बाबतीत लोकप्रभा मधला लेख वाचण्यासाठी इथे पहा.
http://www.loksatta.com/lokprabha/20070615/cover.htm

श्रीमंती आणि द्वेष हा राजू परुळेकर यांचा लेख वाचण्यासाठी इथे पहा.
http://www.loksatta.com/lokprabha/20070615/good.htm

मी तुम्हाला हि तोच प्रश्न विचारू इच्छितो अविनाश भोसलेंची श्रीमंती आपल्याला खुपतेय की त्यांच्या श्रीमंतीचा मार्ग ?

Comments

मला काही खुपतच नाहिये...

मला काही खुपतच नाहिये...

 
^ वर