नशेचे पदार्थ खुले करुन चांगला समाज घडवा.

एक नवा विचार मांडतो आहे. कदाचित आधी कोणी मांडला ही असेल, पण मला माहीति नाही.

विचार वेड्गळ आहे असे पट्कन conclusion काढु नका. थोडा वेळ पचायला द्या.

नशेचे म्हणजे अफु, गान्जा, brown sugar असे पदार्थ कायदेशीर विक्री साठी खुले केले पाहेजेत. त्याचे असे फायदे होतील

१. हे पदार्थ filter म्हणुन काम करतील. ज्यांना काम करायचे आहे, जे सयंमी आहेत, ज्यांना जबाबदारी ची जाणिव आहे, ते ह्या मार्गाला जाणारच नाहीत. जे जातील त्यांना ह्या गोष्टी available असतील ते वापरतील आणि आपोआप च नष्ट होतिल. काही लोकांना थोड्या वेळानी अक्कल येइल, ते सुधारतील.

२. ह्या पदार्थांवर बंदी असल्या मुळे, त्यात गुन्हेगारी आहे. rather बाकीची बरिच गुन्हेगारी ह्या धंद्यामुळेच आहे. त्यामुळे आपोआप च गुन्हेगारी कमी होइल.

लेखनविषय: दुवे:

Comments

तुमचे मत कळले. धन्यवाद.

विचार तसा जुनाच आहे, अमेरिका व पश्चिम युरोप देशात अनेक वर्षां पासून या वर चर्चा सुरु आहे.
असो. आपले मागचे संभाषण रंगीत TV म्हणजे प्रगती नव्हे, टोलेगंज इमारती म्हणजे प्रगती नव्हे, इत्यादी वाटचाल करून "प्रगती कशी साध्य करायची ते तुम्ही सांगत नाही" या तक्रारी वर येवून संपले होते. तुमच्या आजच्या या प्रश्नाच्या निमित्ताने प्रगती म्हणजे काय व ती कशी साध्य करायची, या दोन्ही बाबत तुमचे मत कळले. धन्यवाद.

रोचक

रोचक विषय.

गुन्हेगारी टाळण्याइतपत किंमत कमी हवी, पण खरेदी कमीतकमी व्हावी इतपत किंमत जास्त हवी.

नशेच्या पदार्थांपैकी तंबाखूबाबत काही देशांत हा तोल शोधण्याचा प्रयत्न चालू आहे.

एवढंच कशाला?

आपण लहान मुलांना जे रोगांपासून वाचवण्यासाठी लसीकरण वगैरे करतो ते बंद करू.

म्हणजे मुळात धडधाकट असलेलीच मुले रोगांतून वाचून मोठी होतील. म्हणजे राहिलेल्यांचा समाज हा उत्तम आरोग्यवान वगैरे असेल.

एक्ट्रापोलेशन

सहमत आहे.

अजून एक करता येईल. गर्भनिरोधक गोळ्या राहूदेत पण काँडोम वगैरेंवर बंदी घालावी. म्हणजे येत्या १०-१२ वर्षात जगातली सगळी बाहेरख्याली लोकं एड्स व इतर एस्टीडीने वगैरे मरून जातील व लोकांना 'ब्रह्मचर्य म्हणजेच जीवन' हे सत्य उमगेल. :)

याचा आधी विचार केला पाहिजे

आपण म्हणालात तसे "ते वापरतील आणि आपोआप च नष्ट होतिल" असे झाले तर ठीक. पण दुर्दैवाने तसे नाही होत.. हि मंडळी नशा करून गाडी चालवणार. अपघात करणार.. घरा-दारात गोंधळ घालणार.. अब्रू-बेअब्रू .. इतर गुन्हे सुद्धा करणार.. हे सर्व मान्य असेल तर तुमचा कायदा PASS करूयात..

सहमत

नशा करणारे लोक समाजावर असंख्य पद्धतीने परिणाम करतात. त्यांना असे वेगळे किंवा मुक्त करता येत नाही. अर्थात संयम असेल तर काय सगळीकडेच आनंदी आनंद आहे. मग समाजाला कायदे कानून ची गरजच पडत नाही.

उपहास

उपहास ............................चालुद्या चालुद्या ..................रमेश भिडे हे माझे जवळचे मित्र आहेत .........त्यान्चा लेख इथे पुनर्मुद्रित केला आहे ,पूर्व-परवानगी ने ....................असो!

 
^ वर