महाराष्ट्र कर्जमुक्त हवा
महाराष्ट्र कर्जमुक्त होण्यासाठी पर्यावरणमंत्री गणेश नाईक यांचे विधान वाचले.यावरून दोन वर्षात महाराष्ट्र कर्जमुक्त होण्यासाठी त्यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांबद्दल माहिती मिळवावीशी वाटली.त्यांचे विधान वाचण्यासाठी इथे पहा.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2104863.cms
१.मुंबईत कफ परेडच्या समुद्रात पाच कि.मी. अंतरावर कुत्रिम बेटे विकसीत करावे.तेथील भूखंडाची विक्री करून महाराष्ट्राची कर्जाच्या विळख्यातून मुक्तता करावी आणि उरलेल्या पेश्यातून विकास योजनांना बख्खळ निधी उपलब्ध करून द्यावा.
२.दोन वर्षा पूर्वी म्हणजे साधारण २६जुल्लेच्या २००४ च्या पावसानंतर हि त्यांनी असेच विधान केले होते रेसकोर्सह मुंबईतील सरकारी मालकीच्या मोकळ्या जागांची विक्री केल्यास महाराष्ट्र चुटकीसरशी कर्जमुक्त होईल.
३. वीजप्रकल्प,रस्तेबांधणीप्रमाणे धरणंही खाजकीकरणांतून उभारली पाहिजेत. लोकांना किंचित जादा पैसे मोजावे लागतील पण अनेक प्रकल्प वेगाने मार्गी लागतील.
या तिन्ही विधानाने महाराष्ट्र कर्जमुक्त होण्यासाठी त्यांनी दोन वर्षात केलेल्या कामाचा आढावा घ्यावासा वाटला.
१.नवी मुंबईत गणेश नाईक यांचच साम्राज्य.पूर्वी मुंबईबाहेर कोकणाच्या दिशेने जाताना नवी मुंबईच्या आसपास मोठं मोठे हिरवेगार डोंगर दिसत.आता डोंगर तर दिसेनाशेच झाले आहेत.दगडांच्या खाणीसाठी सार सपाट झालं.
२.त्यांच्या मतदारसंघात मीरा-भाईदर हा भाग हि येतो तिथे चक्क खाडिमध्येच बांधकाम उभी केली आहेत. तिथे दरवेळी पावसात पाणी जमनीतून बाहेर येते.खाडीत उभ्या राहिलेल्या बिल्डिंगची अवस्था आज पडतील की उद्या पडतील अशी आहे.
३.ते ज्या बँकेचे अध्यक्ष होते तिथे कोट्यवधीच्या रुपयांचा गैरव्यवहार झाल्याच उघडकीस आलं.
यांच्या विधानावरून आणि यांच्या कामावरून आपल्याला काय वाटत ?
Comments
हे नाईक
हे नाईक म्हणे आपले पर्यावरण (विनाश)मंत्री आहेत. नवी मुंबईचे सगळे डोंगर बोडके केले आहेतच. त्यांच्या आधीच्या विधानां वरून ते राजकारण्यां मधील् सर्वात बिनडोक व्यक्ती आहेत् हे उमजते.
??????????
काहीच कळले नाही तरीही आपण काय बनावे अमेरिका का अमेरिकाच्या तालावर नाचणारा पाकिस्तान
कर्जधारक आणी कर्जदाता यात हाच कदाचीत फरक असेल.
कर्ज मुक्त
मुंबईत कफ परेडच्या समुद्रात पाच कि.मी. अंतरावर कुत्रिम बेटे विकसीत करावे.तेथील भूखंडाची विक्री करून महाराष्ट्राची कर्जाच्या विळख्यातून मुक्तता करावी आणि उरलेल्या पेश्यातून विकास योजनांना बख्खळ निधी उपलब्ध करून द्यावा
कर्जमुक्तता? कुणाची? महाराष्ट्राची की गणेश नाईकांची?
गणेश नाईकांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यात बरेच कर्ज काढलेले दिसते. आणी ते फेडण्यासाठी आता कोणत्या तरी प्रकल्पाची गरज भासली असावी.
अशा मुर्ख राजकारण्यांना आपणच निवडून दिलं.
इथं कुंपणच शेत खातंय दाद मागायची कुणाकडं?
(वैयक्तिक स्वार्थासाठी निसर्गाचा बळी देण्याच्या वॄत्तीवर भयानक संतापलेला) रम्या
कोण कस..
कोण कस आहे ते सोडा आता. पण आपल्याला खरच काय करता येइल महाराष्ट्र कर्जमुक्त करायला?
मराठीत लिहा. वापरा.
काहिच नाही
आपण काय करु शकतो काहिच नाही. निदान आपल्यामध्ये बोलून एकमेकांची नितिमत्ता टिकवू शकतो एवढच करु शकतो.
कर्जमुक्तता कश्यासाठी ?
नमस्कार,
महाराष्ट्रावर कर्ज आहे तसंच भारतावरही कर्ज आहे. महाराष्ट्राचं माहिती नाही मात्र भारताची आर्थीक स्थिती सध्या अशी आहे की एका फटक्यासरशी भारत आपल्यावरचं परकिय कर्ज परत करू शकतो. मात्र आर्थीक रणनीती असं सांगते की कर्जे अशी कधीच पुर्णपणे फेडायची नसतात.
तेच कर्ज परत करायचं जेथे अधिक उचल करायची असेल. किंवा अधीक कर्जाची आवश्यकता किंवा शक्यता असेल. अन्यथा आपल्या जवळ जमलेली गंगाजळी अधिकाधिक विकासकामांत गुंतवून त्यातुन अधिक उत्पन्न काढले पाहिजे.
कर्ज हा शब्दच मराठी मनाला बोचतो त्यामुळे आपण कर्जमुक्त होणे म्हणजे गंगेत आंघोळ केल्यासारखे वाटते. अन्य कित्येक लोक असे आहेत की ते जवळ पैसा असूनही बंकेच्या आधारे नविन उद्योग उभारणी करतात. त्यांचे अनेक उद्योग असतात आणि जवळ पैसा असो अथवा नसो कर्जाच्या आधारे ते प्रगती करतात.
महाराष्ट्रावर कर्ज आहे मात्र महाराष्ट्र हे सर्वाधीक वेगाने प्रगती करणारे राज्य आहे. आर्थीक आघाडीवर नियोजनपुर्वक वाटचाल केली तर आपण सहज अधिक वेगाने प्रगती करू. केंद्रीय नियोजन आयोगाने या वर्षी महाराष्ट्राला मागणी पेक्षा जास्त निधी उपलब्ध करून दिलेला आहे. या आणि अन्य अनेक मार्गाने येणार्या पैश्याचा विनियोग विकास कामांसाठी केला पाहिजे.
नीलकांत