शिवपत्नी सईबाई....!!!

छत्रपती शिवरायांच्या पहिल्या पत्नी. धर्मवीर संभाजी राजांच्या मातोश्री. जिजाऊ मातोश्रींची सर्वात प्रिय व संस्कार प्रिय सून. सईबाई या छत्रपती संभाजी राजांच्या आई होत्या, सईबाईंचे वडील माधोजीराव निंबाळकर होते. छत्रपती शिवरायांबरोबर सईबाईंचा विवाह झाला तेंव्हा त्या फक्त ७ वर्ष्याचा होत्या. आणि शिवराय ११ वर्ष्यांचे होते. त्यांच्या चेहऱ्याचा रंग गव्हाळ होता. त्या शिवरायांच्या स्फूर्तीस्थान आणि सामर्थ्यवान अश्या पत्नी होत्या. त्यांच्या मृत्युनंतर शिवरायांना त्यांची भरपूर उणीव भासली. संभू राजांना पाहताना शिवरायान पुढे सईबाईंची आभास मूर्ती उभी राहत असे. मृत्यू समयी शिवरायांच्या तोंडून शेवटचा शब्द "सई" निघाला होता.

संभाजींचा जन्म झाल्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच खराब झाली होती, संभू राजे २ वर्ष्यांचे असतानाच आपल्या मातोश्रीनपासून दुरावले होते. पुढे संभू राजांना त्यांच्या आज्जी व शिरायांच्या मातोश्री " जिजाउंनी " घडवले. शंभूराजांच्या जन्मानंतर सईबाई रणी साहेब अंथरुणाला खिळल्या. देव पाण्यात ठेवणे, देवाला कौल लावणे, देशोदेशीचे वैद्य सारे करून झाले परंतू कशाचाच निभाव लागत नव्हता सईबाइंची प्रकृती खालावतच होती, तिकडे स्वराज्य गिळंकृत करायला आलेल्या खानाने सर्वत्र धुमाकूळ घातला होता. अशा परिस्थितीतच हवा पालट म्हणून दि. ११ जुलै १६५९ रोजी राजे जिजाऊ आणि सईबाई यांसमवेत प्रतापगडी आले. सईबाईंच्या आजाराने महाराज थोडे चिंतेत असत. पण तलवारी संग लगीन लागलेल्या राजांना आपल्या भावविश्वात रमायला तरी वेळ होता कुठे, अखंड रयतेचा विचार करणारे राजे त्यांना उसंत ती कुठली. खानाशी कसे झुंजावे, कोणास काय कामगिरी द्यावी सारी सारी खलबत राजांच्या डोक्यात चालू. त्यातच कुठेतरी सईबाईंचा विचार मनास डंक लावून जाई. सईबाई म्हणजे राजांच्या लहानपणातील सवंगडी. एकत्र खेळणे, बागडणे, भांडणे, रुसवे - फुगवे अशा कैक कैक गोष्टी. हवा बदलीचा सुद्धा काही परिणाम दिसत नव्हता. म्हणून सईबाई आणि आऊसाहेब परत राजगडी आले. राजगडाहून राणीसाहेबांच्या प्रकृतीच्या बातम्या सतत प्रतापडी जात असत. राजगडाहून येणारा प्रत्येक संदेश. राजांच्या मनाला घर पाडत असे.

एक दिवस राजांना आलेल्या खलीत्यात त्यांना राजगडी भेटीस बोलावले. आणि राजे गेले देखील. गडावरील हवा सहन होत नव्हती म्हणून शिवापटण इथे एक वाद राजेंनी बांधला होता. सईबाई इथेच असत. राजे भेटीला आले. आणि भेटून गेले सुद्धा राजे आणि राणीसाहेब यांच्यातील संभाषण ऐकले ते इतिहाने.

प्रतापगडी खानाला तोंड देण्यासाठी सर्व तयारी सुरु झाली. महाराजांच्या आज्ञेनुसार सर्व मुत्सद्दी प्रतापगडी पोहोचले. मावळखोरी महाराजांच्या बाजूने लढणार ही उत्साहवर्धक वार्ताही गडावर पोहोचली. श्री जगदंबा महाराजांच्या पाठीशी उभी आहे असा विश्वास सर्वांच्या मनी दुणावू लागला. नेमक्या याचवेळी सईबाईसाहेबांची प्रकृती पार ढासळली. सर्वतोपरी प्रयत्न करूनही अखेर विधी - लिखित टळले नाही आणि भाद्रपद वद्य आमावस्येच्या फक्त एक दिवस आधी म्हणजे भाद्रपद वद्य चतुर्दशीला (दिनांक ५ सप्टेंबर १६५९ रोजी) सरत्या पावसाला शिवाजीराजांचा भावगड ढासळला ! एक मनाजोगा जमलेला मनसुबा वाहून गेला ! भरल्या मळवटाने सईबाई महाराजांना आणि अवघ्या सव्वा दोन वर्षाच्या लहानग्या शंभूराजांना सोडून नापरतीच्या मोहिमेला निघून गेल्या !!!

लेखनविषय: दुवे:

Comments

उपक्रमावर स्वागत

राज, उपक्रमावर स्वागत आहे. येथे सहसा माहितीपूर्ण लेखन आणि चर्चा होतात. सईबाईंबर यापूर्वी उपक्रमावर लेखन झालेले नाही. तुमचा लेख त्रोटक वाटला. सईबाईंविषयी अधिक माहिती, संदर्भ, इतिहासात झालेले त्यांचे चित्रण याविषयी अधिक वाचायला आवडेल. तसे झाल्यास तो लेख उपक्रमाला साजेसाही ठरेल.

प्रतिक्रिया

नक्कीच प्रियाली...मी हे लेक प्रायोगिक तत्वावर लिहले होते, मी नक्कीच तुमच्या म्हणण्या प्रमाणे पूर्ण लेख इथे पोस्ट करेन, धन्यवाद....!!!

नवा लेखक

उपक्रमला एक नवा व अतिशय उत्स्फूर्त लेखन करणारा लेखक राज जाधव यांच्यामुळे लाभला आहे असे दिसते. आपले स्वागत आहे. एक विनंती: एकावेळी एकच लेख उपक्रमवर टाकल्यास योग्य व्हावे. परत दोन दिवसांनी पुढचा लेख टाकावा. एकदम एवढे लेख टाकल्याने इतर लेखकांना प्राईम स्पेस न मिळता त्यांचे नवीन लेख विनाकारण मागे ढकलल्यासारखे होते.

+१

अगदी असेच म्हणतो. मुख्यपृष्ठावरील प्राइम स्पेस जपून वापरायला हवी.

माफ

माफ करा मला इथल्या स्पेस च्या अडचणी विषयी माहिती न्हवती, मी नक्कीच या पुढे लक्षात घेईल... प्रतिसाद दिल्या बद्दल धन्यवाद....!!!

स्वागत

मृत्यू समयी शिवरायांच्या तोंडून शेवटचा शब्द "सई" निघाला होता.

ह्या विषयी काही अधिक माहिती मिळू शकेल का? जिथे शिवाजी महाराजांच्या मृत्यूची बातमी बाहेर फुटली नाही (काही दृष्टीने हे योग्य देखील होते), तिथे अशा नोंदी मिळणे अवघड वाटते. काही अधिकृत पुरावा आहे का याला? की हे ललित लेखन आहे? जर अधिकृत पुरावा उपलब्ध नसेल तर हा ललित लेख म्हणून आपण चांगला लिहिला आहे.

बाकी गैरसमज नसावा आपण एका प्रतिसादात फक्त प्रायोगिक लेख असा उल्लेख केला आहे म्हणून विचारले आहे.

+१

मृत्यू समयी शिवरायांच्या तोंडून शेवटचा शब्द "सई" निघाला होता.

रणजित देसाईंच्या "श्रीमान योगी"मध्ये असे काही घडते असे पुसटसे आठवते. :-)

उपक्रमवर ललित लेखन चालत नाही किंवा मूळ ऐतिहासिक संदर्भ वापरून येथे लेखन होते, तसेच कथा-कादंबर्‍यांतील विधाने ही पुरावे म्हणून ग्राह्य मानले जात नाहीत हे अद्याप लेखकाच्या लक्षात आले नसावे. त्यांना लवकरच उपक्रमचा परिचय होईल अशी आशा करते.

मुद्दा कळाला

प्रियाली, उपक्रम पूर्ण समजल्याशिवाय मी माझे लेखन इथे लिहणार नाही...धन्यवाद...!!!

 
^ वर