उपक्रमवरील प्रस्तावित बदलांविषयी निवेदन

उपक्रमला ड्रुपलच्या सुधारीत आवृत्तीवर नेण्याचे काम सुरू आहे. त्यात होणार्‍या प्रगतीविषयी या धाग्यावर वेळोवेळी माहिती दिली जाईल. या बदलादरम्यान सदस्यांना कमीतकमी गैरसोय होईल याची काळजी घेण्याचा आमचा प्रयत्न आहे.

- उपक्रम व्यवस्थापन

लेखनविषय: दुवे:

Comments

तांत्रिक बिघाड नाही| नवीन सदस्यांचे प्रतिसाद लगेच प्रकाशित करावे

हे माझ्या लक्षात आले होते. नवीन सदस्यांचे प्रतिसाद आपोआप प्रकाशित होत नाहीत. अपग्रेडच्या वेळेस काही सेटिंग्ज बदलली असावीत असे वाटते. उपक्रम प्रशासन यात तातडीने लक्ष घालेल अशी आशा करू.

घाइ नाही

आभार. काही घाइ नाही. दुसर्‍या दिवशी दिसले तरी चागलच आहे. माझे प्रतिसाद लोकांपर्यंत पोचल्याशी कारण

आता पाहावे

आवश्यक बदल केले आहेत. अजूनही अडचण येत असेल तर इथे कळवावे.

थेंक्यु!

अता दिलेला प्रतिसाद लगेच प्रकाशित झाला.
थेंक्यु!

ड्रुपल बग?

एक ऑबझर्वेशनः
उपस्थित सदस्यांमध्ये एकूण सदस्य संख्या उपस्थित सदस्यांपेक्षा कधीकधी अधिक दिसते.
जसे आत्ता उपस्थित सदस्यांमध्ये फक्त माझे नाव दिसते आहे मात्र संख्या २ दिसते आहे.

हा ड्रुपल बग आहे का काही अंतर्गत प्रॉब्लेम?

उपक्रमाचे धोरण

उपक्रमाचे धोरण आत्ता कुठे दिसत नाहीये? त्याची लिंक कुठे आहे?

धोरणे

उपक्रमची धोरणे येथे आहेत. अनेक वर्षे येथे काढल्याने नोड नं १५९ हे ठाऊक आहे पण तुमचे म्हणणे कळले.

उपक्रमची धोरणे दर्शनी जागी हवीत. डाव्या बाजूस त्यांचा दुवा हवा.

धोरण कन्फर्म करायचे होते........

ज्योतिषविषयक एक धागा आज प्रदर्शित झाल्याने मला उपक्रमाचे धोरण वाचावेसे वाटले. ज्योतिषविषयक एखाद्या संस्थळावर विचारावे तसे प्रश्न दिसले, हे उपक्रमाच्या धोरणात बसते का हे कन्फर्म करायचे होते.

हात्तेच्या...

स्वहस्ते स्वातंत्र्य घालवलत की धिंगाणा करायचं.
नायतर मनसोक्त धिंगाणा करता आला असता,इतरांच्या नावानं शिमगा केला असता आणि पुन्हा "हे इथे चालत नाही" असं टिपिकल उपक्रमी टोन मध्ये आठ्या चढवून प्रशासनानं ऐकवलं असतं तर खुश्शाल "असय होय. माझ्या पाहण्यात धोरण्म आलीच नाहीत" असं साळसूदपणे म्हणून बेनिफिट ऑफ डौट घेता आला असता.
आता बसा ती कटकटी बंधनं पाळत. ;)

काही त्रुटी

गेल्या एक-दोन दिवसांत लक्षात आलेल्या आणखी काही त्रुटी

१. स्वतःच्या खरडवहीतील खरड काढून टाकण्याची सुविधा नाही. तिथे फक्त अ‍ॅड कमेंट हा ऑप्शन दिसतो, जो ड्रुपलमध्ये चालत नाही असे वाटते. (बग असावा)

२. खरडवहीतील स्वागत मजकूर बदलायचा झाल्यास तेथे गमभन अ‍ॅक्टिवेटेड नसावे. इंग्लिश टाइप होत आहे.

व्यवस्थापनाने कृपया लक्ष द्यावे.

स्वतःचे लेखन

नवे लेखन या दुव्यावर गेल्यास मा़झे अलिकडील लेखन असा टॅब दिसतो. पूर्वी या टॅबवर गेल्यास स्वतः केलेले लेखन दिसत असे. आता त्या टॅब वर स्वतः प्रतिसादासह केलेले सर्व लेखन दिसते.

स्वत:चे लेखन कसे पहावे?

ड्रुपलचे नवीन वर्जन

मला वाटतं की ही ड्रुपलच्या नव्या वर्जनमधील त्रुटी आहे. तसा व्ह्यू बाय डिफॉल्ट मिळत नसावा. नवे वर्जन आल्यावर इतर अनेक संकेतस्थळांवर वाटचाल, शोध वगैरे बिघडले आहेत.

पूर्वी उपक्रमवर शोध घेतल्यास उपक्रमवरील लेख समोर येत. आता शोध काहीही शोधत असते किंवा

शोधातून "कसलेच निष्पण्ण होत नाही." ;-)

शोध

डावीकडच्या चौकटीमध्ये मराठी टाईप होते. पण तिथुन पुढे गेल्यावर नाही. पण पुढचा शोध जास्त चांगला आहे. उलगडून पाहिल्यास कळेलच.

फोटो खाली शीर्षक

संकेतस्थळ बांधणीचे काम होण्यापूर्वी insert image क्लिक केल्यावर insert केलेल्या फोटोला शीर्षक देण्याची सोय होती. आता ते शक्य होत नाही असे वाटते. कृपया ती सोय पुन्हा उपलब्ध करून द्यावी.

"माझे लेखन" दुवा

पूर्वी "माझे नवीन लेखन" असा एक दुवा उपलब्ध असे. आता त्या दुव्यावर गेलो, तर फक्त माझे लेखन नव्हे, तर माझ्या प्रतिसादांची वाटचाल असलेले सर्व लेखन दिसते.
माझा एक जुना लेख शोधायचा आहे. त्याकरिता कुठला दुवा वापरता येईल?

हीच अडचण

एखाद्या सभासदाचे किंवा स्वतःचे सर्व लेखन पहायचे असल्यास आता काय सुविधा आहे?

अत्युत्तम उपक्रम!

अत्युत्तम उपक्रम! मनापासुन शुभेच्छा. शुद्ध मराठी वापरण्याच्या सतत प्रयत्न राहावा हि विनंती. ह्या संकेतस्थळाला दैनंदिन भेट देण्याचा माझा नक्कीच प्रयत्न राहील.

दिवाळी अंक

मागील सर्व दिवाळी अंक उपलब्ध नाहीत. जुने अंक या बटना खाली काही येत नाही. काहीतरी तांत्रिक अडचण दिसते आहे. दुरुस्त करावी.

आता पाहावे

दुरुस्ती केली आहे. आता पाहावे.

टायपिंग करताना अडचण...

मराठी टायपिंग करताना एक अडचण येते, समजा टाईप करताना 'बॅकस्पेस' किंवा 'डिलीट' बटन वापर केल्यावर पुन्हा टाईप करताना एका बटनाने पाच ते पंधरा 'अक्षरे' एकाच वेळी काहीबाही उमटले जाते. यामुळे खुपच त्रास होतो. काहीतरी उपाय सुचवा.

पुनश्व प्रश्न

प्रकाश घाटपांडे [09 Jan 2013 रोजी 17:52 वा.]

एखाद्या सभासदाचे किंवा स्वतःचे सर्व लेखन पहायचे असल्यास आता काय सुविधा आहे?
.
.
पुनश्च हाच प्रश्न विचारत आहे. एखाद्या सभासदाच्या प्रतिक्रियेवर प्रतिक्रिया देताना त्या सभासदाने अगोदर त्या प्रकारचे लेखन केले आहे काय हे समजणे अत्यावश्यक ठरते. त्यासाठी ही सुविधा असणे हा संकेतस्थळाची अग्रक्रमाची गरज आहे. कृपया प्राधान्याने लक्ष घालावे.

माझा लेख 'मुलाखत' प्रकाशित का

माझा लेख 'मुलाखत' प्रकाशित का होत नाहि आहे ? मी प्रकाशित केला होता.

माझे

सदस्य नाम मला बदलुन हवे आहे.
सुरुवातीला मराठी लिहीता येत नसल्याने व सध्याची सुविधा उपलब्ध नसल्याने श चा पाय मोडलेलाच राहिला आहे. नवीन प्रकारात तो पाय मोडता येत नाही.

देवनागरी लेखन

इथे फॉ.फॉ.असेल तर देवनागरीत थेट मराठी लिहिता येते.आय.इ. असेल तर देवनागरी लिपीत लिहिता येत नाही. त्यामुळे प्रतिसाद लिहिताना अडचण येत असावी.

 
^ वर