उपक्रमवरील प्रस्तावित बदलांविषयी निवेदन

उपक्रमला ड्रुपलच्या सुधारीत आवृत्तीवर नेण्याचे काम सुरू आहे. त्यात होणार्‍या प्रगतीविषयी या धाग्यावर वेळोवेळी माहिती दिली जाईल. या बदलादरम्यान सदस्यांना कमीतकमी गैरसोय होईल याची काळजी घेण्याचा आमचा प्रयत्न आहे.

- उपक्रम व्यवस्थापन

लेखनविषय: दुवे:

Comments

धन्यवाद

उपक्रमला ड्रुपलच्या सुधारीत आवृत्तीवर नेण्याचे काम सुरू आहे. त्यात होणार्‍या प्रगतीविषयी या धाग्यावर वेळोवेळी माहिती दिली जाईल.

उत्तम. प्रकल्प यशस्वी होवो.

सदस्यांचे सध्या असलेले व्यक्तिगत निरोप नव्या आवृत्तीत नेता येणार नाहीत, त्यामुळे सर्व सदस्यांना विनंती आहे की त्यांनी आपले महत्त्वाचे निरोप साठवून ठेवावेत.

खरडवह्यांचे कसे? त्यातील मजकूर मायग्रेट होणार का की त्याही साफ होणार? निरोपांपेक्षा खरडवह्यांतून दुवे वगैरे दिलेले अधिक असतात.

मुदत

सदस्यांचे सध्या असलेले व्यक्तिगत निरोप नव्या आवृत्तीत नेता येणार नाहीत, त्यामुळे सर्व सदस्यांना विनंती आहे की त्यांनी आपले महत्त्वाचे निरोप साठवून ठेवावेत.

निरोप साठवून ठेवण्यासाठीची मुदत कळेल का?

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

कसे?

बॅक अप्प कसा घ्यायचा?
काही उपाय आहेत का?
आपल्या इ मेल ला फॉर्वर्ड करता येतात का? असल्यास कसे?

-निनाद

+१

+१ बॅकअप काही सोपे उपाय कोणाला माहित असल्यास कळवावे.
बाकी, या आवश्यक बदलांचे मनावर घेतल्याबद्दल आभार आणि शुभेच्छा!

------------------
ऋषिकेश
------------------

छान

बदलांसाठी सदिच्छा !!

निरोप नव्या सिस्टिममध्ये नेता येणार नाहीत हा धोरणात्मक निर्णय आहे का? कारण तशी तांत्रिक अडचण नसावी असे शेजारच्या संस्थळांच्या इतिहासावरून वाटते.

असो. धोरणात्मक निर्णय असेल किंवा नसेल तरी तर निदान आठवड्याची मुदत द्यावी अशी विनंती.

नितिन थत्ते

अर्रर्र...

दम खा की जरा.
सध्या अतिव्यस्त आहे. विरोपांचा ब्याकप घेणेही दोनेक दिवसात जमेलच असे नाही.
जरा सबुरीनं घ्या की राव.

--मनोबा

अभिनंदन

उपक्रमाला ड्रुपलच्या सुधारीत आवृत्तीवर नेण्याच्या निर्णयाबद्दल संबंधितांचे अभिनंदन.
हे कार्य सुलभतेने होवो ही सदिच्छा.

व्यक्तिगत निरोप आणि खरडवही

व्यक्तिगत निरोप नव्या आवृत्तीत नेण्यात असणार्‍या तांत्रिक अडचणींवर काही उपाय करता येईल का याची चाचपणी सुरू आहे. जर ते शक्य झाले नाही तर व्यक्तिगत निरोप साठवण्यासाठी पुरेशी पूर्वसूचना दिली जाईल; सदस्यांनी काळजी करू नये.

खरडवह्या नव्या आवृत्तीवर नेण्यात काही अडचण दिसत नाही आहे.

शुभेच्छा

प्रस्तावित बदलासाठी शुभेच्छा.

अवांतर -
कशाला हव्यात जुन्या खरडी आणि निरोप? नव्याने सुरवात करा की डावाची. :)

हम्म!

कशाला हव्यात जुन्या खरडी आणि निरोप?

सहमत आहे. निरोपांची गरज नाही. खरडी तूर्तास हव्या कारण त्यात अनेक दुवे वगैरे दिलेले असतात पण आहे त्या वेळात छाननी करून ते इतरत्र साठवता येतील.


नव्याने सुरवात करा की डावाची. :)

हे इतके सोपे असते असे वाटते का? ;-)

जुने ते सोने

एकदा तुमचा जी-मेल डाटा डिलीट करून बघा बरं. आणि नवीन डाव कसा काय वाटला,त्यानंतर,ते इथे व्य.नी. ने कळवा :)

---------------------
-धनंजय कुलकर्णी

खरडी व व्यनि

कशाला हव्यात जुन्या खरडी आणि निरोप? नव्याने सुरवात करा की डावाची. :)

हे पटत नाही. मी मराठी संस्थळांमध्ये प्रथम आलो ते उपक्रमावर. इथेच पहिलं लेखन केलं. अनेकांनी उत्तेजन दिलं. धनंजय, मुक्तसुनीत, नितिन थत्ते, प्रियाली, अदिती, विसुनाना, विकास... अनेकांशी जालीय ओळखी पहिल्यांदा इथेच झाल्या. त्यामुळे एका अर्थाने उपक्रम हे माझं 'फर्स्ट लव्ह' आहे. त्यामुळे इथल्या वावराबद्दल, प्रवासाबद्दल एक सॉफ्ट स्पॉट आहे. त्या प्रवासाच्या सगळ्या आठवणी व्यनिंमध्ये आणि खरडींमध्ये आहेत. कधी कधी नुसती गंमत म्हणून मी जुने व्यनि आणि खरडी चाळत असतो. मजा येते.

बर्‍याच सदस्यांची व्यनिंविषयी अशीच भूमिका असावी असा अंदाज आहे. तेव्हा व्यनि आणि खरडी पुसल्या जाऊ नयेत असं मनापासून वाटतं. सर्वच सदस्यांना आपापले व्यनि साठवून ठेवायला कष्ट पडतील... हे कष्ट व्यवस्थापनाला काही उपायांनी कमी करता आले तर उत्तम.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

माझे मत

मी मराठी संस्थळांमध्ये प्रथम आलो ते उपक्रमावर. इथेच पहिलं लेखन केलं. अनेकांनी उत्तेजन दिलं. धनंजय, मुक्तसुनीत, नितिन थत्ते, प्रियाली, अदिती, विसुनाना, विकास... अनेकांशी जालीय ओळखी पहिल्यांदा इथेच झाल्या. त्यामुळे एका अर्थाने उपक्रम हे माझं 'फर्स्ट लव्ह' आहे. त्यामुळे इथल्या वावराबद्दल, प्रवासाबद्दल एक सॉफ्ट स्पॉट आहे.

हे वाचून विशेषतः शेवटची दोन वाक्ये वाचून हसले. तात्या अभ्यंकरांची आठवण झाली तेही असे काहीसे म्हणत. पण असो.

कधी कधी नुसती गंमत म्हणून मी जुने व्यनि आणि खरडी चाळत असतो. मजा येते.

माणसाने स्मरणरंजनावर फार वेळ घालवू नये असे माझे वैयक्तिक मत आहे.

बर्‍याच सदस्यांची व्यनिंविषयी अशीच भूमिका असावी असा अंदाज आहे. तेव्हा व्यनि आणि खरडी पुसल्या जाऊ नयेत असं मनापासून वाटतं. सर्वच सदस्यांना आपापले व्यनि साठवून ठेवायला कष्ट पडतील... हे कष्ट व्यवस्थापनाला काही उपायांनी कमी करता आले तर उत्तम.

व्यवस्थापनाला निरोप आणि खरडी साठवता आल्या तर उत्तम याच्याशी सहमत कारण तांत्रिक अडचणी, बग्ज दूर व्हाव्यात. मायग्रेशन सुखरूप व्हावे. सदस्यांना कष्ट पडू नयेत आणि विशेषतः ज्यांचा वावर खरडी आणि व्यनिकरता उरला आहे किंवा ते पूर्वीचे संबंध बिघडले असल्याने एखाद्या गोष्टी पुनश्च इतरांना विचारण्यास त्यांना ऑकवर्ड वगैरे वाटते (उदा. माहिती, दुवे इ.) आणि ज्यांना नवे डाव सुरू करण्याची इच्छा नाही त्यांना जुने सामान हवे असण्याची शक्यता आहे.

बरोबर!

विशेषतः ज्यांचा वावर खरडी आणि व्यनिकरता उरला आहे किंवा ते पूर्वीचे संबंध बिघडले असल्याने एखाद्या गोष्टी पुनश्च इतरांना विचारण्यास त्यांना ऑकवर्ड वगैरे वाटते.

हेहेहे..आता आले लक्षात व्यनिंचे प्रेम.

दुरावलेल्या...

"दुरावलेल्या प्रियकराची/प्रेयसीची जुनी प्रेमपत्रे" असे काहीसे हे आमचे व्य नि प्रेम आहे काय? ;)

--मनोबा

उद्देश

नविन डावाच्या शब्द-योजनेचा उद्देश वेगळा होता, अर्थात हे तुम्ही जाणता.

हॅपीनेस इज अबाऊट गुड हेल्थ ॲन्ड बॅड मेमरी.

व्यक्तिगत निरोप तात्पुरते अनुपलब्ध राहतील

तांत्रिक चाचणी सुरु असल्याने व्यक्तिगत निरोप सदस्यांना तात्पुरते अनुपलब्ध राहतील याची नोंद घ्यावी. निरोप सुरक्षित आहेत आणि लवकरच पुन्हा उपलब्ध होतील.

छान

सुरक्षित राहातील आणि उपलब्ध होतील हे उत्तम.

व्यनींमधून काही सदस्यांशी माझ्या दीर्घ आणि माहितीपूर्ण चर्चा झालेल्या आहेत.

किती दिवस?

व्यनी पुन्हा उपलब्ध होण्यास किती दिवस लागतील याचा अंदाज देता येईल का?

------------------
ऋषिकेश
------------------

उपक्रम नव्या आवृत्तीवर उपलब्ध झाले आहे

सर्व सदस्यांना कळवण्यास आनंद होतो आहे की उपक्रम नव्या आवृत्तीवर उपलब्ध झाले आहे. पूर्वीचा सर्व मजकूर, व्यक्तिगत निरोप, खरड नोंदी इ. नव्या आवृत्तीत उपलब्ध आहे. त्याशिवाय काही नव्या सोयी-सुविधा दिलेल्या आहेत.

संकेतस्थळ बांधणीचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही आणि ते येते काही दिवस सुरू राहील. सदस्यांना कमीतकमी गैरसोय होईल याची काळजी घेण्याचा आमचा प्रयत्न राहील. अडचणी, सूचना यांची कृपया या धाग्यात नोंद करावी.

या दरम्यान उपक्रमवरील लेखन सुरक्षित राहील तसेच सदस्यांना नवे लेखन (लेख, चर्चा, प्रतिसाद इत्यादी) करता येईल.

-उपक्रम व्यवस्थापन

चित्रे आणि जालीय दुवे

आज मला चित्रे आणि जालीय दुवे आपल्या लेखनात टाकता आले नाहीत. प्रयत्न केल्यावर ReferenceError: insertImage not defined' असा संदेश आला. हे सध्याच्या उपक्रमला ड्रुपलच्या सुधारीत आवृत्तीवर नेण्याच्या प्रक्रियेशी संबंधित असावे असा माझा (अडाणी) तर्क आहे.

आता पाहावे

लक्षात आणून दिल्याबद्दल आभारी आहोत. चित्रे आणि जालीय दुवे आता लेखनात टाकता येत आहेत. सगळ्या चित्रांचा आपोआप स्लाइडशो तयार होतो. धाग्यावर टाकलेल्या कुठल्याही चित्रावर टिचकी देऊन स्लाइडशो बघता येईल.

नवे लेख कुठे आहेत?

मी एक नवा लेख नुकताच टाकला तो गायब झालेला आहे. हा काय प्रकार आहे? कृपया, तपासावे.

बदल केला आहे

नवे लेख आपोआप प्रकाशित होतील असा बदल आता केलेला आहे.

बॅक टू टॉप

बॅक टू टॉप टाकले ते चांगले केले. ते जरा मराठीमध्ये टाकाता येईल का?

नवीन आलेले प्रतिसाद

धाग्यावर नवीन प्रतिसाद आले तर ते अनुक्रमणिकेत दिसत नाहीयेत (उदा २५ प्रतिसाद २ नवीन असे दिसत नाही).

"नवे लेखन" या दुव्यावर दिसतात. "लेख" किंवा "चर्चा" या दुव्यावर दिसत नाही.

मस्त

नविन रुप छान आहे. नव्या सुविधा समजुन घेत आहे. पुर्वीचा टंक दिसत नाही. तो पुर्ववत करावा हि विनंती.

+१

या टंकाची गंमत म्हणजे मोठ्या आकाराच्या मॉनिटरवर हा टंक अप्रतिम दिसतो पण माझ्या ऑफिसच्या टॅबलेट लॅपटॉपवर फारसा चांगला दिसत नाही.

मला फाँट एक साइझने मोठेही हवे आहे. तसे शक्य नसेल तर एका पानावर मोठे फाँट सेट केले तर ब्राउजर बंद करेपर्यंत तरी सर्व पाने त्याच (मोठ्या) फाँटसाइझमध्ये दिसावीत. प्रत्येक पानावर साइझ सेट करायचा कंटाळा येतो :-(

फायरफॉक्स

तुम्ही फायरफॉक्स वापरत असाल तर टूल्स > ऑप्शन्स > कंटेण्ट मध्ये जाऊन मिनिमम फॉण्ट साइज सांगता येतो. (इंग्रजी आणि मराठी पानांसाठी वेगवेगळा सांगता येतो).

शिवाय उपक्रम कोणताही फॉण्ट वापरत असेल तरी फाफॉ मध्ये तुम्हाला हवा तो फॉण्ट ठेवता येतो.

(अवांतरः आता शेवटचा ए टंकावा लागत नाही. पण सवय लागली आहे).

हो...

मी उपक्रम योगेश फाँट्मध्ये वापरतो.
वा, डावीकडे खाली मथळ्याकडे चांगले वाटते आहे.

टंक

मला उलट आयपॅड आणि मॅकबुकावर फाँट व्यवस्थित वाटले पण डेस्क्टॉप पीसीच्या मोठ्या पडस्यावर टंक दिसायला आवडला नाही.

सहमत आहे

आज आल्यावर वाटले गल्ली चुकली की काय :) पत्ता पुन्हा पाहिल्यावर कळले की रंगरूप बदलले आहे. हे नवे रूप चांगले आहे खरे.

कोटी

नवीनना नवेपण नावडले नाही. :)

लिंक

खरडवहीत लिंक देण्याची सोय करता येईल का?

रोमन अक्षरे

प्रतिसाद 'पाठवा' ऐवजी 'save' असे इंग्रजीत दिसत आहे.

आभार!

मी अनेकदा केलेल्या मागणीची दखल घेऊन वाचनखुणांची सोय दिलीत त्याबद्दल अनेक आभार!

"माझे लेखन" कसे बघावे? माझे अलिकडील लेखन मध्ये मी प्रतिक्रीया दिलेले लेखही दिसताहेत. केवळ मी लिहिलेले लेख कोठून बघावेत?

पाठवा / प्रकाशित करा

प्रतिसाद पूर्वपरीक्षणा नंतर सेव्ह चे मराठीकरण राहिले आहे.

आभार

ज्यांच्या प्रयत्नांमुळे ही सुधारीत उपक्रम आवृत्ती पहायला मिळत आहे अशा सर्वांचे आभार.
उपक्रमाचे बोधवाक्य केवळ मुख्य पानावर दिसते आहे..
"जरी उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा | हा व्यर्थ भार विद्येचा|"

ते सर्वत्र (सर्व पानांवर) दिसले तर बरे वाटेल.

प्रतिसादांचा व्ह्यू

उपक्रमाने प्रतिसादांचा व्यू दिल्याबद्दल विशेष धन्यवाद. कधी कधी लेखांपेक्षा प्रतिसाद कोणते, कोणाचे आले हे बघणे मजेशीर असते. किंबहुना, आलेल्या प्रतिसादांवरून (त्यांच्या शीर्षक आणि लेखक) लेख वाचायचा की नाही हे ठरवले जाते.

तूर्तास, या व्यूमध्ये नवीन (न वाचलेले) प्रतिसाद दिसत नाहीत ते वेळ मिळाल्यावर करून देता येईल का? घाई नाही.

अक्षररंग

अक्षररंगांसाठीच्या पॅलेटमध्ये करड्या रंगाच्या छटा नाहीत. त्या मिळाल्या तर बरे. [सगळं जग करड्या रंगाचं असतं म्हणून ;-) ]

जमलं नाही.

नविन उपक्रम फारसे आवडले नाही, फेसबूक वगैरे प्रकार तर फारच वाईट, जुळवून घेतो आहे, पण जुने बरे होते असे म्हणावे वाटते आहे निदान.

सवयीचा प्रश्न

नविन उपक्रम फारसे आवडले नाही, फेसबूक वगैरे प्रकार तर फारच वाईट, जुळवून घेतो आहे, पण जुने बरे होते असे म्हणावे वाटते आहे निदान.

आवडेल फक्त सवयीचा प्रश्न आहे. माणसाने आणि संकेतस्थळाने काळाप्रमाणे चालावे. तसे इथे येणारे आणि टिकणारे किती असतात ते तुम्हाला माहित आहेच त्यामुळे फेबु क्रांती घडवेल असे वाटत नाही.

व्यनि

३ नविन व्यनि आले आहेत असे डावीकडचा समास दाखवत आहे, प्रत्यक्षात एकंही नवा व्यनि नाही.

३ व्यनि

हे बहुधा सर्वांनाच होत असावे. निदान मला आणि निनाद यांना तरी असे दिसते.

रात्री काही चाचण्या चाललेल्या होत्या, त्या गंडलेल्या दिसतात. :-)

अ‍ॅ

अ‍ॅ चा प्रश्नही सुटला आहे.

अ‍ॅ चा प्रश्न

अ‍ॅ कसे टंकावे हे कृपया सविस्तर कळवावे ही विनंती.

प्रतिसादांचा व्ह्यू रिफ्रेश होत नाही

काही कारणांस्तव प्रतिसादांचा व्ह्यू रिफ्रेश होत नाहीसे दिसते. काही प्रतिसाद तेथे दिसतात तर काही दिसतच नाहीत. काहीतरी घोळ आहे.

आता पाहावे

आता सर्व प्रतिसाद दिसावेत. अजूनही काही प्रतिसाद दिसत नसतील तर इथे कळवावे.

धन्यवाद

आता व्यवस्थित दिसतो प्रतिसादांचा व्ह्यू.

तांत्रिक बिघड

मी प्रतिसाद दिला की दिसत नाही. काहितरी तांत्रिक बिघड दिसतोय
पण दुसर्‍या दिवशी दिसतो त्यामुळे हे घाईने दुरूस्त केलेच पाहिजे असे नाही पण कानावर गातल

 
^ वर