ईशकण(?) सापडला!

आताच पाहिलेल्या वेबकास्टनुसार 'सर्न' मधील एलेचसी (लार्ज हेड्रॉन कोलायडर) उपकरणाच्या आधारे केलेल्या अनेक प्रयोगांनंतर जगातील भौतिक शास्त्रज्ञांना १९६० सालापासून आजवर हुलकावणी देणारा 'हिग्ज बोसॉन' हा अनुमानित मूळकण (प्रायमरी पार्टीकल) सापडला असावा असा कयास व्यक्त केला गेलेला आहे. तो हिग्ज बोसॉनच असावा याबाबत ऍटलस आणि सीएमएस नामक दोन वेगवेगळ्या संशोधनकर्त्या टीम्सचे एकमत झालेले आहे. पण हा नक्की कोणता हिग्ज बोसॉन आहे? हिग्ज बोसॉन्स ही एक कणमालिका आहे तरी कशी? या प्रश्नांवर संशोधन करण्याचा मानस या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला.

विश्वाबद्दल मानवाला असलेल्या माहितीत आणखी थोडी भर घातल्याबद्दल शास्त्रज्ञांचे आभार.
या महत्त्वाच्या संशोधनाबद्दल सर्नशी संबंधित असलेल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन.

'ईशकण' (गॉड पार्टिकल) हे नाव प्रसिद्धी माध्यमांनी बहाल केल्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात या कणाविषयी उत्सुकता निर्माण झाली असली तरी त्याचा ईश्वराशी कोणताही संबंध नाही. हे नाव केवळ त्याच्या 'हितंच हाय पर दिसत नाय' या (ईश्वरसदृश) गुणधर्मामुळे मिळाले आहे. कदाचित त्याला 'गॉड्डॅम' पार्टिकल ('इश्श्यकण' ? ) असेही नाव चालले असते असे विकीतली माहिती सांगते.

इथे असलेले तज्ञ या कणाबद्दल आणखी माहिती सांगतीलच. पण तोवर सर्वसामान्यांना समजेल अशी ही माहिती -

ही संशोधक परिषद सर्न यथे सुरू असता दिसलेले काही क्षण-

सीएमएस आणि ऍटलास टीमच्या निरीक्षणाचे एकत्रीकरण

घोषणा

एक्सपेरीमेंटल फिजिसिस्टचे (प्रयोगकर्त्या भौतिक शास्त्रज्ञांचे) अभिनंदन करताना स्वतः पीटर हिग्ज

आपल्या जीवनकालातच अनुमानित बोसॉन सापडल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना पीटर हिग्ज

Comments

बोसॉन् पण् हिग्सच का?

जरा थंड घ्या हो ;) ईशकणाशी सिमिलर असा कण सापडला आहे, पण ५ सिग्मा ऐवजी ४.९ सिग्मा चे रिझल्ट्स मिळालेत. शिवाय तो प्रचंड जड् आहे, त्यामुळे नक्की हिग्सच आहे की नै ते नै कळाले. पण कैतरी मोठ्ठा माल गावलाय् हे नक्की :) आजच कळेल बहुतेक सर्वकाही.

दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||

ऍज अ लेमन -

ऍज अ ले'मन, आम्ही थंड लेमन घेतले. :)
पण तो हिग्ज बोसॉन असावा असे तर्काच्या जवळ जाणार्‍या निरीक्षणावरून दिसते. (नसेल तर आणखी काही नवेच सापडले आहे. तेही महत्वाचेच आहे.)

Mr. Heuer called it “most probably a Higgs boson, but we have to find out what kind of Higgs boson it is.”
Asked whether the find is a discovery, Heuer answered, “As a layman, I think we have it. But as a scientist, I have to say, “’What do we have?’

आम्ही तर (बुवा) ले'मनच आहोत. त्यामुळे आम्हाला असेच वाटले की हिग्ज बोसॉन सापडला. तिकडे बसलेल्या लोकांनी फुटबॉल स्टेडियमसारख्या टाळ्या आणि शिट्ट्यांनी सभागृह दणाणून सोडले होते. त्यामुळे ते सगळेच ले'मेन होते की काय अशी शंका वाटू लागली आहे.
बाय -द -वे, तुम्ही ते वेबकास्ट पाहिले असेलच. सिग्मा ४.९ आणि सिग्मा ५ यांच्यात काय फरक आहे ते आम्हाला समजावून सांगता का? त्या ऍटलसच्या प्रवक्त्या बाई डॉ. फॅबिओला जिआनोटी तर म्हणाल्या की ते सिग्मा ५ च आहे. सिग्मा ४.९ हे थोड्या आधीचं विश्लेषण आहे.

तुमचे म्हणणे मान्य.

:)

सिग्मा ४.९ आणि सिग्मा ५ यांत तसा काही फरक नाही. सापडलेला कण हा "फॉल्स् अलार्म" निघू नये म्हणून डाटा ऍनॅलिसिस् मध्ये वापरले जाणारे ते एक स्टॅटिस्टिकल् सिग्निफिकन्स् मेजर् आहे इतकेच. जितका सिग्मा जास्त, तितका काटेकोरपणा जास्त.

बाकी मीदेखील साधा नसलो तरी नींबू लेमन आहे ( संदर्भः थोबाडपुस्तकावरचा एक फोटो, ज्यात सादा आणि नींबू असे २ प्रकारचे लेमन होते ). त्यामुळे तिथल्या लेमनच्यापेक्षा वेगळे मी काय सांगणार? शंका इतकीच होती की हिग्ज् बोसॉन् मुळे सर्व कणांना वस्तुमान जर मिळत असेल, तर तो स्वतः प्रोटॉनपेक्षा जड कसा काय? शिवाय सकाळी तरी नुसतेच बातम्या पाहिल्यामुळे लेमन्स् नक्की काय म्हणाले हे त्यांच्या शब्दांत ऐकले नाही. पण बहुतेक त्यांची खात्री झालीय की हिग्ज् बोसॉनच आहे म्हणून. देखते हैं का होता है :)

दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||

हिग्ज बोसॉन

माझ्या माहितीप्रमाणे बोसॉन या मूलकणाला स्वत:चे असे स्थायी अस्तित्व नसते. निरनिराळ्या बोसॉन मूलकणांचे आदानप्रदान करून (उदा. ग्लुऑन या बोसॉनचे क्वार्क्सच्या तिळ्यांमध्ये होणारे आदानप्रदान.) इतर स्थायी मूलकण एकमेकावर आकर्षण किंवा अपकर्षणाचा (उदा.विद्युतचुंबकीय बल व तीव्र आण्विक बल) बलप्रयोग सतत करत असतात. हिग्ज बोसॉन हा या इतर सर्व बोसॉन पेक्षा सर्वात महत्त्वाचा या साठी मानला जातो की तो एका भारित क्षेत्रामधून (एनर्जी फील्ड) वस्तूमानाची निर्मिती करून त्याचे इतर स्थायी मूलकणांना प्रदान करू शकतो.हिग्ज बोसॉन नष्ट झाला की त्याच्या वस्तूमानापैकी काही वस्तूमानाचे परत बाहेर टाकल्या गेलेल्या फोटॉन स्वरूपातल्या उर्जेत रूपांतर होत असावे. या कारणांसाठी हिग्ज बोसॉन्चे वस्तूमान प्रोटॉनच्या वस्तूमानाच्या 100पट असणे आश्चर्यकारक मानण्याचे काही कारण दिसत नाही.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

धन्यवाद

हे माहिती नव्हते, माहितीकरिता धन्यवाद!!

दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||

हिग्ज बोसॉनची थोडक्यात माहिती

न्यू सायंटिस्टची ही चित्रफीत हिग्ज बोसॉनची थोडक्यात माहिती करून देत आहे.

चित्रफीत

नानवटींनी टाकलेली चित्रफीत बेश्ट आहे. धन्यवाद.

चन्द्रशेखर

+१

बेष्ट!

टू बी ऑर नॉट टू बी

"असावे की नसावे" च्या शंकांतून सापडलेली नवी माहिती अभिनंदनपात्र आहे. अधिक विस्तृत माहिती लवकर पुढे येईलच. सध्या बातमी नवी आहे ती खात्रीशीर आहे की नाही हे जाणून घ्यायला थोडा अवधी हवा.

असो. मोजक्या शब्दांतील उत्तम बातमीसाठी धन्यवाद.

अवांतरः नानावटी सत्येंद्रनाथ बोसांवर लेख कधी लिहिणार?

नव्या युगाची नांदी

काहींनी ह्या येऊ घातलेल्या शोधाची तुलना आइनस्टाइनच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताशी केली आहे. ह्या महाप्रयोगातून आलेला विदा वगैरे तपासायला, अभ्यासायला आणि त्यातून ठोस असा/असे निष्कर्ष काढायला थोडा वेळ जाऊ द्यायला हवा. पण ही नव्या युगाची नांदी ठरू शकते.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

+१

मागेही सर्न् वाल्यांनी प्रकाशाच्या वेगापेक्षा अधिक वेगात जाणारे कण सापडले म्हणूनबराच हंगामा केला होता. पण नंतर वेळ मोजण्यातच त्रुटी असल्याचे कळल्यावर दावा मागे घेण्यात आला. त्या पार्श्वभुमीवर, ठोस निष्कर्ष काढायचा थोडा वेळ जाऊ द्यायला हवा असेच वाटते.

+१

+१
तंतोतंत असेच म्हणतो

------------------
ऋषिकेश
------------------

कणमालिका : स्केल ऑफ युनिवर्स

सब ऍटोमिक पार्टिक्ल्सची दुनिया म्हणजे किती अतिसुक्ष्म आहे हे दाखवणारे स्केल ऑफ युनिवर्स हे एक उत्कृष्ट ऍप्लिकेशन आहे. ते पाहिल्यावर लक्षात येते किती सुक्ष्मस्तरावर हे संशोधन सुरू आहे.
(ऍप्लिकेशन ब्राउजर मधे पुर्ण लोड झाल्यावर खाली असलेला स्क्रोलबार हलवुन गंमत पाहता येते)

अतिशय भारी!!!!!!

असंख्य धन्यवाद या साईटबद्दल!!

दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||

सुटलो एकदाचा

चला आता देव नाही असे सांगत फिरता येईल.

पास

वरील भयंकर बौद्धिक वगैरे चर्चेतील ईशकणाइतकेही न कळाल्याने नाईलाजाने चेहरा पाडून 'पास' असे म्हणतो आहे. पण जे आपल्याला अगम्य असते ते ( उदाहरणार्थ माधव आचवल, धों.वि. देशपांडे, भालचंद्र नेमाडे यांचे समीक्षात्मक लिखाण ) बहुदा खूप दर्जेदार असते अशी खात्री असल्याने एक टाळी वाजवून पास असे म्हणतो आहे. उसके दुष्मन है बहोत, आदमी अच्छा होगा....
सन्जोप राव
हम तुझे वली समझते, जो ना वादाखार होता

आयर्नी

प्रयोगातुन लवकरच इतर चांगले परिणाम पुढे येतील अशी आशा करतो.

:) हिग्स-बोसॉन कणांना गॉड्स् पार्टीकल म्हणण्यासारखे दुर्दैव वैज्ञानिकांसाठी दुसरे नाही.

युनिफिकेशन ऑफ फिजिक्स

हिग्ग्ज् बोसॉनच्या शोधामुळे क्वांटम थिअरी आणि गुरुत्वाकर्षण यांच्यात दुवा साधण्यास मदत होईल का?

नितिन थत्ते

वाटत् नाही

हिग्ज बोसॉन् कण् असल्याचे भाकित 1964 सालीच केले गेले होते. त्यानंतर 50 वर्षे होत आली तरी गुरुत्वाकर्षणाचे बल कशा प्रकारे निर्माण होते? किंवा पुंज सिद्धांताद्वारे या बलाचा कसा खुलासा करावयाचा? हे अजूनही नक्की कळलेले नाही. त्यामुळे प्रायोगिक रित्या हिग्ज बोसॉन कण सापडल्याने फारसा फरक काहीच होणार नाही

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

विषय निघालाच आहे तर,

यावर उपक्रमींचे मत जाणून घ्यायला आवडेल. :)

भौतिकशास्त्र आणि अध्यात्म
The tao of physics

[इमेजचा दुवा देताना त्या दुव्याच्या अखेरीस .jpg, .png, .gif ह्यापैकी एखादे एक्सटेन्शन आहे की नाही हे तपासून बघावे. ते नसल्यास इमेज दिसणार नाही. ऑल साइझेसवर क्लिक केल्यावर जे चित्र दिसले तिथून वरील दुवा मिळवला आहे. शक्य तिथे इमेजवर राइट क्लिक केल्यावर येणाऱ्या डायलॉग बॉक्समधून 'कॉपी 'इमेज यूआरेल' हा पर्याय निवडून तो दुवा वापरावा. -- संपादन मंडळ ]

ज्ञानेश

तुम्हीजी लिंक दिलीत ती काय आहे मला दिसत नाही.

मलाही !

आता फोटो दिसू लागला आहे.
संपादक मंडळाचे आभार !

'गॉड पार्टिकल' या शब्दांमुळे आपल्याकडे आधीच अनेकांना हर्षवायू झाला आहे. "इन्सान ने खोज निकाला भगवान" अशा ब्रेकिंग न्यूज हिंदी च्यानेले देत आहेत. या पार्श्वभूमीवर अशा ग्रंथाबद्दल उपक्रमींना काय वाटते, हे जाणून घ्यावेसे (!) वाटले. या निमित्ताने काही गरमागरम चर्चा झडावी, हा सुप्त हेतू आहेच. ;)

दुसरी लिंक

http://epaper.loksatta.com/46053/indian-express/08-07-2012#page/27/2

इथे त्या पुस्तकाची माहिती आली आहे. (खालचा उजवा कोपरा).

नितिन थत्ते

ईशकणः माझ्या मर्यादा

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
ईशकण
..हिग्ज-बोसोन् पार्टिकलचा शोध लागला.आता त्यावर चर्चा झडतील. भवति-न भवति होईल.विश्वनिर्मितीचा सुधारित सिद्धान्त येईल.पण विश्वनिर्मितीपूर्वी काहीच अस्तित्वात नव्हते.अवकाश(स्पेस)सुद्धा नव्हता.काळही नव्हता.हे माझ्या तर्काला पटतच नाही.ते खरे असायला हवे हे कळते. सिद्धान्ताचा शाब्दिक अर्थ समजतो.पण बुद्धीला आकलन होत नाही.माझ्या बुद्धीची झेप तेवढी जात नाही.जे बुद्धीला पटत नाही ते मानणे अप्राणिकपणाचे ठरेल.म्हणून विश्वनिर्मितीविषयी मी विचारच करत नाही. अवकाश तसेच काळ अनादि-अनंत आहे.त्या अवकाशात विश्व अनादि काळापासून अस्तित्वात असे मानतो झाले.त्यात (म्हणजे विश्वात) परिवर्तने झाली.होत आहेत.
.....आपली सूर्यमाला अडीच-तीन अब्ज वर्षांपूर्वी अस्तित्वात आली.नंतर साधारणपणे १ अब्ज वीस कोटी वर्षांपूर्वी समुद्राच्या पाण्यात एकपेशीय जीव निर्माण झाले.पुढे डार्विनच्या उत्क्रान्तिवादानुसार सजीव सृष्टी अस्तित्वात आली .हे सर्व बर्‍यापैकी समजण्यासारखे आहे.ते मला पुरेसे वाटते.आपल्या सूर्यमालेपासून किमान ४५०००अब्ज किलोमिटर अंतरापर्यंत अवकाशात काहीही नाही.पुढे नक्षत्रे,तारे आहेत.इतक्या दूर अंतरावर असलेल्या उर्वरित विश्वाविषयी मला औत्सुक्य नाही.(बुद्धीच्या आवाक्यात येत नाही तर केवळ शाब्दिक माहितीचा काय उपयोग? असे वाटते.)

?

सरप्राइज

नितिन थत्ते

सहमत

यनावाला साहेब आपल्या विचारांशी सहमत. अगदी मला पण असेच वाटते. पण मग मनाची अजून घालमेल सुरु होते ती अशी

अवकाश तसेच काळ अनादि-अनंत आहे.त्या अवकाशात विश्व अनादि काळापासून अस्तित्वात असे मानतो झाले.त्यात (म्हणजे विश्वात) परिवर्तने झाली.होत आहेत.

पण त्याला सुद्धा कधीतरी सुरवात झाली असणार, किंवा असे असायला काहीतरी निमित्त असणार. काही तरी कारण झाले असेल. नाही चे आहे त रुपांतर होण्याला काही तरी झालेच असणार. हे निमित्त काय आहे. बर हा सगळा खटाटोप खरे सांगावेतर कोणी जर दूरवर बसून म्हणजे आपल्या युनिवर्सच्या कडेला बसून (ऑब्सर्वर) बघत असेल तर त्याला अगदी निरर्थक वाटत असणार. पण डोक्याला ह्या साठी खाज सुटते की अशा निरर्थक खटाटोपीचा खटाटोप झालाच का....

आइन्स्टाइन आणि बोस

आइन्स्टाइन आणि बोस ह्यांच्यामधील संबंधावरचा हा लेख न्यूयॉर्क टाइम्समध्ये कालच आला आहे आणि अतिशय वाचनीय आहे.

बोसांच्या शोधाबरोबरच इतरहि अनेक गोष्टींवर तो प्रकाश टाकतो. ब्रिटिश सत्ताधार्‍यांच्या हाताखाली काम करणे हा किती नाउमेद करणारा अनुभव असला पाहिजे, युरोपीयनांपुढे 'काला आदमी' किती दबून असे असे अशा गोष्टी आपणांसारख्या संपूर्ण स्वातन्त्र्यात वाढलेल्यांना ह्या लेखातून कळतात. त्याहि परिस्थितीत हार्डी-रामानुजनसारखे आइन्स्टाइन आणि बोस ह्यांचेहि friend-philosopher-guide अशा प्रकारचे संबंधहि लक्षात येतात.

ब्रिटिश नोकरशाहीच्या अगुणग्राही वर्तनाचा असाच एक नमुना वाचल्याचे आठवते. सी.व्ही. रामन् ह्यांना नोबेल पारितोषिक मिळाल्यावरहि त्यांना कलकत्त्यात हवे तसे काम त्यांच्या वरिष्ठांनी देऊ केले नाही आणि त्यांना कलकत्ता सोडावा लागला.

 
^ वर