उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
आकड्यांचा खेळ
कविता महाजन
July 2, 2012 - 7:14 am
काही आकड्यांचा खेळ करायचा आहे एका पुस्तकात. तर फ्रेंड्स, माहिती पुरवा. काही आकडे ठरावीक गोष्टींशी ( वास्तव वा काल्पनिक निगडित असतात.) असे तुम्हांला माहीत असलेले सांगा... उदा. माकडाला शेपूट १, माणसाला डोळे २, पळसाला पाने ३, कारला चाके ४, हाताची बोटे ५, आठवड्याचे वार ७, रावणाला डॉकी १०, वर्षाचे महिने १२, नक्षत्रं २७, कला ६४, कौरव १०० इत्यादी.
दुवे:
Comments
म्हणी
पटकन आठवलेल्या आकड्यांशी संबंधित म्हणी:
पळसाला पाने तीनच
पाचामुखी परमेश्वर
तेरड्याचा रंग तीन दिवस
तीन तिघाडा काम बिघाडा
नव्याचे नऊ दिवस
बाकी, उपक्रमी भर घालतीलच!
------------------
ऋषिकेश
------------------
कारला चाके
कारला चाकं ५ असतात. स्पेअर व्हिल नाही पकडले :)
नव्याचे ९ दिवस...
७०० खिडक्या ९०० दारं...
तूर्तास
अठरा विसे किंवा अठरा विश्वे दारिद्र्य
पाचवीला पूजलेली गरिबी
तुझ्यासारखे छप्पन बघितले
सतराशे साठ प्रकार
सोळावं वरीस धोक्याचं
काही आधुनिक
बावन बावन करणे
11 नंबरची बस पकडणे
एक गंमत आठवली
प्रश्न: पांडव किती?
उत्तर: बाजेच्या पायाइतके तीन.
फिल्मी
सोलहवा सावन (सोळावा श्रावण)
अबतक छप्पन
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
करवा चौथ
करवा "चौथ" विसरलात का? ;-)
पांडव शून्यच
खरं तर शून्यच.
हा हा...
तसं नाय हो गुगळे साहेब, तुम्ही सी-ए-टी रॅट म्हणजे कुत्रा हे ऐकलं नाहीये का? :)
आणखी काही
षडरिपु, षडरस, षट्कर्णी
अकबराच्या दरबारातील नवरत्ने,
अष्टपुत्रे, दशपुत्रे अशी खास मुलगे हवी असणारी आडनावे, अष्टावधानी
कोथरुडचा दशभुजा गणपती
रावण दशग्रंथी ब्राह्मण होता
वगैरे.
तीन तेरा
तीन तेरा वाजणे
ए ३० का जाऊ?
१३ मेरा ७ हो :) :)
माझ्याकडून ही भर
साठी बुद्धी नाठी
शतायुषी भव
अष्टपुत्रा सौभाग्यवती भव
नवरस
शंभर हत्तींचं बळ
एक नूर आदमी दस नूर कपडा
लाखाचे बारा हजार करणे
जय हिंद् हिंद् आनंद भुवन जय भारतवर्ष महान
जय हिंद हिंद आनंद भुवन जय भारतवर्ष महान|
हे एक ईश, दो सूर्य चंद्र, हे तीन लोक साधार
या चार वेद, तुम्ही पंचभूतगण सहा ऋतू साकार
या सप्तसिंधूंनो, आठ दिशांनो, गा 'नव'मानव गान!
जय हिंद हिंद आनंद भुवन जय भारतवर्ष महान
(कवी कोण ते आठवत नाहीत बहुतेक वसंत बापट असावेत.)
***
म्हणीच हव्या अस्तील तर आमच्याकडे दुष्काळात १३वा महिना आहे..