कॅरन क्लैन आणि बुलिइंग समस्या
कॅरन क्लैन या स्कूल बस मॉनिटरला काही शाळकरी मुलांनी त्रास देऊन हैराण केल्याची घटना अमेरिकेत गाजते आहे. त्याचा विडिओ इथे देण्याचा प्रयत्न करत आहे
या बाईंना जाडी म्हणले आहे, त्यांना फाइलचा फटका देणे, मुलाच्या आत्महत्येला जबाबदार असण्याचा आरोप करणे यामुळे वरल्या विडिओमधील मुलांचे आश्चर्य वाटते. एखाद्या ज्येष्ठाशी किंवा त्यांच्यावर देखरेख करणार्या व्यक्तिशी अश्याप्रकारे वर्तन करताना त्यांच्या मनाला टोचणी लागली नसावी काय?
कॅरन यांचा विडिओ वायरल झाल्यावर या केसने वेगळे वळण घेतल्याचे पुढल्या बातम्यांवरून दिसते. त्यांच्यासाठी देणग्यांचा पाऊस पडतो आहे.
कालच्या बातमीत http://www.guardian.co.uk/world/2012/jun/22/bullied-bus-monitor-fund-500... म्हणल्याप्रमाणे आता या मुलांना धमक्या येत आहेत
Greece Police Captain Steve Chatterton also warned against vigilante justice amid fears of reprisals – one boy has reportedly received more than a thousand death threats after taking part in the intimidation of Klein.
या सर्व बातम्यांमुळे अनेक प्रश्न पडले -
१. मुलांना वळण लावण्याचे प्रयत्न तोकडे पडताहेत काय?
२. बाईंना देणग्या देऊन काय साधले जात असावे?
३. बुलिइंगच्या समस्येवर आळा कसा टाकता येईल?
४. या मुलांना शासन द्यावे की ताकिद देऊन सोडावे?
५. बालमानसशास्त्राचा वापर करून ही समस्या सोडवणे शक्य असावे का?
Comments
चांगला चर्चाप्रस्ताव
वरचा विडिओ ऑफिसातून पाहू शकत नाही पण केसबद्दल वाचले. महाविद्यालयीन दादागिरीबद्दल (बुलिइंगला मराठी शब्द कोणता? दादागिरी बरा वाटतो.) धारुण रवीचीही केस हल्लीच झाली आहे. हा प्रश्न गंभीर होत आहे यात तथ्य वाटते.
या प्रकरणात तोकडे पडलेले आहेत असे दिसते. अर्थातच, बसमधून जाणारी मुले कोणत्या वर्गातील आहेत, त्यांची सामाजिक परिस्थिती वगैरेची मला अद्याप कल्पना नाही.
प्रिन्सला देणग्या देऊन काय साधले? तेच असावे आणि सोबत आपले अपराधीपण कमी करण्याचा प्रयत्नही असू शकतो.
कॅरेन क्लाइन यांना ज्या प्रसंगाला सामोरे जावे लागले त्याबद्दल खेद वाटतो पण त्यांनी सहन का केले? त्या बस मॉनिटर ना! आमच्या येथे सहसा बस मॉनिटर नसतो. बसमध्ये कॅमेरा असतो. एक दोन वेळा बसमध्ये दंगा करणार्या मुलांना ड्रायव्हरने बस थांबवून दम भरल्याचे माझ्या मुलीने सांगितले होते. तेव्हा असे करणे शक्य असावे. या बाई पगारी देखरेख करतात. त्यांनी मुलांना धाक दाखवायला हवा होता. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट अवांतर आहे.
अधिक लक्ष पुरवून.
सौम्य शिक्षा द्यावी. या वयाच्या मुलांना परिणामांची खोली कळत नाही. बर्याचदा पीअर प्रेशरला बळी पडून असे प्रकार होतात. झाल्या प्रकाराची त्यांना शरम वाटावी इतपत शिक्षा ठीक वाटते.
हो, दादागिरी होऊ नये यासाठी अमेरिकन शाळांमध्ये अनेक प्रोग्रॅम राबवले जातात.
अवांतरः
दुसरी गोष्ट अशी की एकंदर अमेरिकन संस्कृती ही आपल्यापेक्षा वेगळी आहे. तिथे वयाचे आणि ज्येष्ठत्वाचे सोयरसूतक पोरांना असते असे नाही. शिक्षकांसमोर क्लास चालू असताना मुले खाऊ शकतात हा प्रकार मला आजही अगम्य वाटतो आणि ऑफिसात मीटींग्जमध्ये आजही हे मला जमत नाही पण तो माझ्या अपब्रिंगिंगचा भाग झाला. उलटपक्षी, इथल्या शाळांमध्ये मुले आणि शिक्षक एकमेकांशी जी काही गंमत मस्ती करत असतात ते पाहून अवाक् व्हायला होते.
एक उदाहरण - माझ्या मुलीला गेल्या वर्षी गणिताला मिसेस फोर्कनर म्हणून ५५-६० वयाच्या एक शिक्षिका होत्या. त्यांना मुलं "हे फोर्की!" असं गंमतीत म्हणत. याबद्दल आश्चर्य व्यक्त केले असता "शी डजन्ट माइंड!" असे उत्तर मिळाले. दुसर्या एका शिक्षकाच्या वर्गात मुलं आणि शिक्षक दोघंही बाकांवर उभे राहून दंगा करत किंवा कॉरिडॉरमध्ये "बूऽऽ" करून एकमेकांना घाबरवत.
अशा वातावरणात एकमेकांच्या खोड्या काढणे, गंमत करणे, मस्करी करणे हे होत असता अचानक मस्करीची कुस्करी होत आहे हे पोरांच्या लक्षात येत नसावे.
अतिअवांतरः
आमच्या स्कूलबस ड्रायव्हरने बसमध्ये पुढे बसणार्या पोरींना सांगितले "समजा एक दिवस बस चालवताना मी हार्टऍटॅक येऊन पडलो तर बस बंद करणे तुम्हाला जमायला हवे. मी तुम्हाला तसे शिकवायला हवे."
या पोरींनी त्याला सांगितले, "तू पडलास तर आम्ही बस कशाला बंद करू? झूम करून गावभर फिरवून आणू तेव्हा तू आम्हाला बस ड्राइव्ह करायला शिकव."
प्रत्यक्षात खरेच काही असे झाले तर ही चांगल्या शिस्तीतली पोरंही असले काही स्टंट करणार नाहीत अशी गॅरंटी मी देत नाही. गावभर नाही फिरवायची पण डॉक्टरच्या ऑफिसपर्यंत नेतीलही.
हा विडियो बघितला की नाही
आमच्या स्कूलबस ड्रायव्हरने बसमध्ये पुढे बसणार्या पोरींना सांगितले "समजा एक दिवस बस चालवताना मी हार्टऍटॅक येऊन पडलो तर बस बंद करणे तुम्हाला जमायला हवे. मी तुम्हाला तसे शिकवायला हवे."
वरून आठवले, हा विडियो बघितला की नाही?
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
अरेच्चा!
कदाचित या प्रकारावरूनच त्याने या पोरींना असे काहीसे सांगितले असावे.
मी हा विडिओ आधी पाहिला नव्हता. घरून बघते पण टायटलवरून कल्पना आली. धन्यवाद!
--------------
पहिल्या विडिओतील सर्व संवाद ऐकले नाहीत पण एकंदरीत "तू एक बोललास तर मी तुझ्या वरचढ बोलतो" अशा पोरकट प्रकारातून प्रकरण चिघळलेलं दिसतं. तरीही, या बाईंनी उठून या मुलांना दम कसा दिला नाही ते कळले नाही.
थोडक्यात
निरागस वाटणारी लहान मुलेही किती हिंस्र आणि क्रूर होऊ शकतात ह्याचे हे तसे म्हटल्यास किरकोळ उदाहरण आहे. क्रूर होण्याची क्षमता ही सगळ्यांतच असावी. पण बहुधा अनुकूल परिस्थिती नसते. युद्धांमध्ये लहान मुलांचा सैनिक म्हणून (चाइल्ड सोल्जर्ज़) वापर होत आला आहे. आणि लहान मुलांचा हिंसाचारातला रूथलेस सहभाग फार आणखी वेगळा विषय आहे. असो.
शिक्षेचे म्हणाल तर 'छडी लागे छमछम' हे गाणे आठवते आहे. अर्थात फक्त आठवते आहे. असो. दुसरे म्हणजे, झुंड सोबत असली की एरव्ही शांत, शूर, दयाळू, होतकरू असलेला/वाटणारा माणूसही अनेकदा नको नको त्या गोष्टींत सहभागी होतो, नको नको त्या गोष्टी करून जातो. ह्या मुलांना ते काय करताहेत हे तरी कळते आहे का?
असो. तूर्तास एवढेच.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
लॉर्ड ऑफ द फ्लाईज
प्रतिसादावरून 'लॉर्ड ऑफ द फ्लाईज' आठवले. शिवाय 'तें.' म्हणत तसे- 'मनुष्य म्हणजे एक हिंस्त्र श्वापद आहे'.
+१
'लॉर्ड ऑफ द फ्लाईज' कालच पाहिला.
एक वर्ष निलंबित
वरील प्रकरणातील चार विद्यार्थ्यांना एका वर्षासाठी निलंबित केले गेल्याची बातमी आत्ताच वाचली.
शिक्षा होणे रास्त होते परंतु ही शिक्षा थोडी कडक वाटली. असो.