हिंदीविरोधी वादाचे व्यंगचित्र

बाबासाहेब आंबेडकरांचे व्यंगचित्र पाठ्यपुस्तकांत टाकल्याने झालेला गोंधळ शमत नाही तोवर तमिळ-हिंदी वादाच्या व्यंगचित्राने नवा गोंधळ सुरु केला आहे. याबद्दलची बातमी द हिंदूच्या वेबसाइटवर वाचली. ती अशी -
http://www.thehindu.com/todays-paper/tp-national/article3507264.ece या दुव्यावर चित्र पाहता येईल.

If the text had given a fair account of the anti-Hindi agitation and the Dravidian movement, a student could view the cartoon critically. On the other hand, the text gives one point of view and the cartoon gives another. By portraying that students from Tamil Nadu do not know English, the cartoon humiliated the entire student community in the State,” Mr. Ravikumar said, adding that inclusion of experts from Tamil Nadu in the book preparation committee would have avoided such embarrassment.

हे व्यंगचित्र आर.के.लक्ष्मण यांचे असून ते १९६५ साली झालेल्या हिंदीविरोधी चळवळी दरम्यान काढले गेले होते. या चित्रातून चुकीची बाजू समोर येत आहे असे नेत्यांना वाटत आहे. आता हा वाद चांगलाच पेटला असल्याचे खालील बातमीवरून दिसेल.

http://www.thehindu.com/news/states/tamil-nadu/article3522989.ece?homepa...

यावरून काही प्रश्न पडतात -

१. पाठ्यपुस्तकांत व्यंगचित्रे घातल्याने विद्यार्थ्यांना विषयाचे आकलन उत्तम होईल काय?
२. व्यंगचित्रांतून दाखवलेले प्रसंग हे शब्दशः किंवा चित्राप्रमाणे घेऊ नये याचे भान विद्यार्थ्यांना नसेल काय का त्यामुळे त्यांचे मत पूर्वग्रहदूषित होऊ शकेल?
३. विनोद, उपहास किंवा उपरोधातून काहीही आकलन होण्यासारखे नाही, फक्त भावना दुखावल्या जातील असे वाटते का?

व्यंगचित्रांच्या या वादांवर उपक्रमींना काय वाटते?

व्यंगचित्रांच्या या वादांवर उपक्रमींना काय वाटते?व्यंगचित्रांच्या या वादांवर उपक्रमींना काय वाटते?व्यंगचित्रांच्या या वादांवर उपक्रमींना काय वाटते?व्यंगचित्रांच्या या वादांवर उपक्रमींना काय वाटते?व्यंगचित्रांच्या या वादांवर उपक्रमींना काय वाटते?व्यंगचित्रांच्या या वादांवर उपक्रमींना काय वाटते?व्यंगचित्रांच्या या वादांवर उपक्रमींना काय वाटते?व्यंगचित्रांच्या या वादांवर उपक्रमींना काय वाटते?व्यंगचित्रांच्या या वादांवर उपक्रमींना काय वाटते?व्यंगचित्रांच्या या वादांवर उपक्रमींना काय वाटते?व्यंगचित्रांच्या या वादांवर उपक्रमींना काय वाटते?व्यंगचित्रांच्या या वादांवर उपक्रमींना काय वाटते?व्यंगचित्रांच्या या वादांवर उपक्रमींना काय वाटते?व्यंगचित्रांच्या या वादांवर उपक्रमींना काय वाटते?व्यंगचित्रांच्या या वादांवर उपक्रमींना काय वाटते? व्यंगचित्रांच्या या वादांवर उपक्रमींना काय वाटते?व्यंगचित्रांच्या या वादांवर उपक्रमींना काय वाटते?व्यंगचित्रांच्या या वादांवर उपक्रमींना काय वाटते?व्यंगचित्रांच्या या वादांवर उपक्रमींना काय वाटते?

Comments

उत्तरे आणि प्रश्न

१. पाठ्यपुस्तकांत व्यंगचित्रे घातल्याने विद्यार्थ्यांना विषयाचे आकलन उत्तम होईल काय?

या विषयी नेमके मत नाही कारण आकलन होणे हे त्या चित्राच्या प्रभावीपणावर अवलंबून आहे.तरीही, पॉलिटिकल सायन्स या विषयाच्या पाठ्यपुस्तकात व्यंगचित्र का असावे असा प्रश्न पडतो.

२. व्यंगचित्रांतून दाखवलेले प्रसंग हे शब्दशः किंवा चित्राप्रमाणे घेऊ नये याचे भान विद्यार्थ्यांना नसेल काय का त्यामुळे त्यांचे मत पूर्वग्रहदूषित होऊ शकेल?

माझ्यामते व्यंगचित्रात दाखवलेले जसेच्या तसे घेऊ नये हे भान अनेकांना असावे पण गॅरंटी देता येत नाही. चित्राकडे पाहून मला तरी भडकलेल्या मनोवृत्तीचे दर्शन झाले. अशी मनोवृत्ती की जी आश्वासने स्वीकारण्यापेक्षा दगड फेकण्यास उत्सुक आहे. त्याकाळी नेमके काय झाले होते आणि हे चित्र कोणत्या संदर्भात आले हे माहित नसल्याने अधिक टिप्पणी करता येत नाही.

३. विनोद, उपहास किंवा उपरोधातून काहीही आकलन होण्यासारखे नाही, फक्त भावना दुखावल्या जातील असे वाटते का?

भावनिक दृष्टीकोनातून एखाद्या प्रश्नाकडे बघणार्‍याला विनोद, उपहास आणि उपरोध यातील काहीही समजून घ्यायचे नसते असे वाटते. अशावेळी माणसांना उगी-उगी किंवा पार्श्वभागावर फटके एवढीच भाषा कळत असावी असा आपला माझा अंदाज.

---------------

पाठ्यपुस्तकांत व्यंगचित्रांचा वापर करायला कधी शिकलो आपण? आम्हाला तरी असे काही नव्हते असे आठवते. ही पद्धत परदेशातून आयात वगैरे केली आहे का?

इतिहास

मला ठाऊक असलेला इतिहास खालीलप्रमाणे (रामचंद्र गुहा यांच्या इंडिया आफ्टर गांधी पुस्तकात वाचल्याच्या आठवणीतून)

घटना समितीमध्ये राष्ट्रभाषेचा प्रश्न चर्चिला गेला तेव्हा दक्षिणेतल्या सदस्यांनी हिंदी राष्ट्रभाषा करण्याच्या प्रस्तावास विरोध केला. "संख्या हा निकष असेल तर कावळा हा भारताचा राष्ट्रीय पक्षी असायला हवा" अशा प्रकारची आर्ग्युमेंटस् झाली होती. मुख्य विरोध हा दक्षिणी भाषांपेक्षा हिंदी खूप वेगळी असल्यामुळे झाला. शेवटी हिंदी हीच राष्ट्रभाषा कदाचित बहुमताच्या/संख्याबळाच्या जोरावर करण्याचे ठरले. तडजोड म्हणून दक्षिणी लोकांना हिंदीचा परिचय होण्यास अवसर मिळावा म्हणून अंमलबजावणीवर १५ वर्षांचा मोरेटोरियम ठरवण्यात आला. ही मुदत १९६५ मध्ये संपली. तेव्हा लालबहादुर शास्त्री पंतप्रधान होते. ते काहीसे कट्टर हिंदीवादी होते. सरकारी कामकाजात हिंदीचा वापर करण्याचे आदेश निघाले*. तेव्हा दक्षिणेत (विशेषतः तामिळनाडूत) हिंदीविरोधात आंदोलन पेटले.

आता व्यंगचित्राविषयी. व्यंगचित्र लक्ष्मण यांनी (म्हणजे एका दाक्षिणात्यानेच काढले आहे). व्यंगचित्रात असे दाखवले आहे की आंदोलक मुद्दा समजून न घेताच (कारण लिहिलेला मुद्दा इंग्रजीत** आहे आणि त्याला इंग्रजी तर वाचताच येत नाही) विरोध करीत आहेत. हे चित्र त्या आंदोलनाविषयी विपरित मत निर्माण करेल याच्याशी सहमत आहे.

अर्थात हिंदी आमच्या साठी परकी म्हणून विरोध करणारे त्याहून परक्या इंग्रजीला जवळ करताहेत ही विसंगती मान्य आहे.

नितिन थत्ते

*आदेश शास्त्रींनी काडले का ते ठाऊक नाही.
**फलकावरील मजकूर इंग्रजीत असणे अपेक्षित होते की लक्ष्मण यांनी इंग्रजी वर्तमानपत्रासाठी व्यंगचित्र काढले म्हणून "चित्रातील" फलक इंग्रजी आहे हे कळायला मार्ग नाही.

चुकीचा आरोप

“ ... By portraying that students from Tamil Nadu do not know English, the cartoon humiliated the entire student community in the State,” Mr. Ravikumar said.

हा आरोप चूक आहे.
व्यंगचित्रातील फलक इंग्रजी भाषेत न रेखता तमिळ भाषेत रेखला असता तरीही लक्ष्मण यांना असेच एक व्यंगचित्र रेखता आले असते, "यांना इंग्रजीसुद्धा येत नाही" ऐवजी त्यांनी तेथे "यांना तमिळसुद्धा येत नाही" असे लिहिले असते तरी विनोद टिकला असता. 'त्यांना कोणतीतरी भाषा येत नाही' ही मुख्य विनोदवस्तू नसून 'त्यांच्या फायद्याच्या तरतुदी त्यांना तोट्याच्या वाटतात' ही आहे.
"पाठ्यपुस्तकाच्या मते १९६५ सालीच्या तरतुदी तमिळभाषकांच्या सोयीच्या होत्या आणि ते चुकीचे मत आहे" असा आरोप रविकुमार यांनी केला आहे आणि तो किमान विचारार्ह तरी आहे आणि "तरतुदी गैरसोयीच्या होत्या काय?" या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी उपलब्ध ऐतिहासिक तपशील तपासावा लागेल.

“But the cartoon seeks to give a picture that both Rajaji and Bhaktavatsalam gave assurances that Hindi would not be imposed and English will continue,” he said.

एन् सी ई आर् टी पाठ्यपुस्तक-लेखकांची भूमिका

एन् सी ई आर् टी पाठ्यपुस्तक-लेखकांची भूमिका एका पाठ्यपुस्तकात अशी दिलेली आहे :
(इंग्रजी दुवा, यातील "लेटर टु द रीडर्स्")

(हिंदी दुवा)

गुज़रे समय की एक जीवंत छवि आपके मनमें कौंधे - इसके लिए हमने इस किताब में अनेक फोटोग्राफ्स, कार्टून, मानचित्र तथा अन्य तस्वीरें शामिल की हैं । राजनीति विज्ञान की पिछली किताबों की तरह इस बार भी आपकी भेंट 'उन्नी-मुन्नी' से होगी । इस बार भी वे आपके सामने अपने भोले मगर चोखे और चुभते सवालों-टिप्पणियों के साथ नमूदार होंगे । बहरहाल, अब तक आप जान गये होंगे कि 'उन्नी-मुन्नी' जो कुछ कह रहे हैं वह इस पाठ्यपुस्तक की आधिकारिक राय नहीं है । आप ही नहीं, संभव है, इस पाठ्यपुस्तक के लेखक भी 'उन्नी-मुन्नी' की बातों से असहमत हों । लेकिन, इन दोनों की तरह आप को भी हर चीज़ पर सवाल उठाना चाहिए ।

(सैल भाषांतर)
भूतकाळाची जिवंत छवी तुमच्या मनात बिंबावी, म्हणून आम्ही या पुस्तकात अनेक छायाचित्रे, व्यंगचित्रे, नकाशे आणि अन्य चित्रे सामील केलेली आहेत. राजकारणशास्त्रात्राच्या पाठल्या पुस्तकांप्रमाणे या वेळीदेखील तुमची 'उन्नी-मुन्नीं'शी* भेट होईल. या वेळी देखील ते तुमच्या पुढे आपले भोळे, पण चोख-तिखट प्रश्न आणि टिप्पण्या घेईन हजर होतील. तरी आता पर्यंत तुम्ही ओळखलेच असेल, की 'उन्नी-मुन्नी' जे काही म्हणत आहेत, ती या पाठ्यपुस्तकाची अधिकृत भूमिका नव्हे. तुम्हीच नव्हे, या पाठ्यपुस्तकाचे लेखकही 'उन्नी-मुन्नीं'च्या म्हणण्याशी असहमत असू शकतील. परंतु या दोघांसारखे तुम्हीसुद्धा प्रत्येक गोष्टीबाबत प्रश्न उठवले पाहिजे.

*उन्नी-मुन्नी ही परत-परत येणार्‍या व्यंगचित्रातली पात्रे आहेत.

- - -
असो. मला तरी पुस्तक आवडले.

उदाहरणार्थ पाठ ३च्या शेवटी असलेल्या प्रश्नसंचात हे प्रश्न सापडले :

७. समाजवादी दलों और कम्युनिस्ट पार्टी के बीच के तीन अंतर बताएँ । इसी तरह जनसंघ और स्वतंत्र पार्टी के बीच के तीन अंतरों का उल्लेख करें ।

(सैल भाषांतर : समाजवादी दल आणि कम्युनिस्ट पार्ट्यांच्या मधील तीन भेद सांगा. त्याच प्रमाणे जनसंघ आणि स्वतंत्र पार्टी यांच्यातले तीन भेद सांगा.) येथे "३ भेद" असे नमूद करणे थोडेसे पाठातरप्रिय असले, तरी बारावीत असले काही विचार करायला मी शिकायला हवे होते, असे राहून राहून वाटते.

८. भारत और मैक्सिको दोनों ही देशों में एक खास समय तक एक ही पार्टी का प्रभुत्व रहा । बताएँ कि मैक्सिको में स्थापित एक पार्टी का प्रभुत्व कैसे भारत के एक पार्टी के प्रभुत्व से अलग था?

वा!

- - -
व्यंगचित्रे उपयोगी आहेत काय? उदाहरणार्थ पृष्ठ ४० वरील व्यंगचित्र बघूया : "रस्सीखेच" यात सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यातला असमतोल दिसतो. एका बुलंद झाडावर नेहरू आणि कॅबिनेट मंत्री आरामात बसलेले आहेत. झाडाला बांधलेला दोर विरोधी पक्षनेते रेटून ओढत आहेत, घामाने थबथबलेले आहेत, चेहर्‍यावर निराशा आहे.
मागल्या एका पृष्ठावर तक्ता आहे, की पहिल्या तीन निवडणुकांत काँग्रेसला अनुक्रमे ३६४/४८९, ३७१/४९४ आणि ३६१/४९४ जागा मिळाल्या होत्या. एक-पक्षी कारभार असून लोकशाही पर्याय काही प्रमाणात टिकून होता ही बाब आशादायक की निराशाजन्य... वगैरे जी काही भावना त्या काळात सुविद्य लोकांच्या मनात येत असतील, त्या भावना समजण्याकरिता हे व्यंगचित्र मला तरी उपयोगी वाटले. शिवाय एका पृष्ठावर मराठी चित्रपट "सिंहासन"चा उल्लेख आहे.

फणीश्वरनाथ रेणूंच्या कादंबरीतला एक उतारा आहे... राजकारणी स्पर्धा ही स्वार्थी असली तरी जनतेचे काय? याबाबत दोन विरुद्ध धारणा इतक्या घट्ट शब्दात सांगितलेल्या आहेत की कमाल आहे!
१. दोन रेड्यांची झुंज आहे आणि मध्ये गवताच्या डोक्यावर आफत. काँग्रेस आणि सोशलिस्ट... जात्याच्या दोन चक्रांमध्ये गरीब लोक भरडले जातील.
२. गरीब भरडले जाणार नाहीत, गरिबांचे भले होईल. एकच पार्टी राहून काम होत नाही. दोन दलांमधला मुकाबला अधिक हिडीस (?हिडि़स? अटीतटीचा?) होतो, तर फायदा पब्लिकचा होतो.

- - -
एकूण मला तर पुस्तक आणि त्यातली माहिती देण्याची मनोरंजक पद्धत आवडली.

+१

एकूण मला तर पुस्तक आणि त्यातली माहिती देण्याची मनोरंजक पद्धत आवडली.

+१
इतकेच नाही तर मागे मिसळपाव/मीमराठीवर लिहिलेली (व अर्ध्यात सुटलेली) 'ऐतीहासीक घटना' या मालिकेत मी या पुस्तकांचे बरेच सहाय्य घेतले होते

ऋषिकेश
------------------
<<स्वाक्षरी निद्रीस्त आहे>>

मेंढरे हवी आहेत

१. पाठ्यपुस्तकांत व्यंगचित्रे घातल्याने विद्यार्थ्यांना विषयाचे आकलन उत्तम होईल काय?
आकलन सुधरण्यास मदत होऊ शकेल. शेवटी हे शिक्षकांवर अवलंबून आहे. म्हणजे शिक्षक सक्षम आहेत का, ते नीट शिकवतात का वगैरे वगैरे. मुलांना स्वतंत्रपणे विचार करायला शिकवणारी पुस्तके हवीतच.

२. व्यंगचित्रांतून दाखवलेले प्रसंग हे शब्दशः किंवा चित्राप्रमाणे घेऊ नये याचे भान विद्यार्थ्यांना नसेल काय का त्यामुळे त्यांचे मत पूर्वग्रहदूषित होऊ शकेल?
हे पूर्णपणे टाळता येणे शक्य नाही. मात्र एक 'हेल्दी डिबेट' व्हायला हवा. त्यातून विद्यार्थ्यांची वाढ होईल. ते 'मोठे' होतील.

३. विनोद, उपहास किंवा उपरोधातून काहीही आकलन होण्यासारखे नाही, फक्त भावना दुखावल्या जातील असे वाटते का?
कुठल्या न कुठल्या, कोणाच्या न कोणाच्या भावना दुखावल्या जातीलच. ठरवले तर काहीही अशक्य नाही. त्यामुळे ह्याला किती भीक घालायची ? पण सगळे काही शेवटी राजकीय गरजेनुसार ठरत असते. राजकारण्यांना वोट देणारी मेंढरे हवी असतात. त्यामुळे ही व्यंग्यचित्रे त्यांना नको आहेत.

अवांतर:
सुहास पळशीकरांच्या चेंबरमध्ये बाबासाहेबांच्या काही अनुयायांनी केलेला प्रसिद्धीपिपासू स्टन्टबाज राडा अतिशय लांच्छनास्पद आहे. हिंदुत्ववाद्यांपेक्षा हे काय वेगळे आहेत असे काहींना वाटल्यास नवल नाही. मात्र पळशीकरांभोवती कडे करून त्यांना वाचवणारेही आंबेडकरवादी होते हे इथे नमूद करायला हवे. प्रकाश आंबेडकर, हरी नरके ह्यांच्यासारख्या आंबेडकरांच्या विचारांना मानणाऱ्यांनी अतिशय योग्य भूमिका घेत ह्या सगळ्या गोष्टींचा निषेध केला आहे हेही इथे लक्षात घ्यायला हवे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

 
^ वर