फरार सुदाम मुंडे : रू-४०,००० बक्षीस

स्त्रीभ्रूणहत्ये बाबत प्रमूख आरोपी डॉ. मुंडे सद्ध्या फरार झाले असून त्यांना पकडायला सरकारने ४०,००० रूपये एवढे बक्षीस झाहीर केले आहे.

१. एवढी कमी रक्कम जाहीर करून प्रकरणाचे गांभीर्य सरकारने कमी केले आहे असे आपणास वाटत नाही काय?

२. या सुदाम मुंडेच्या मागे कुणा बड्या हस्तीचा हात असल्याचे आइकण्यात आहे काय? (शरद प. इ..)

३. उस्मानाबाद, लातूर आणि बीड जिल्ह्यातला हा फेमस (गर्भलिंग चाचणीसाठी) डॉ असून त्याचं आजतागायत कुणी काहीच करू शकले नाही ह्याचे कारण म्हणजे त्याला असलेला स्थानीक सपोर्ट असे आपल्याला वाटते काय? ह्या तीन्ही जिल्ह्यातील लोकांची मानसीकता आजून "मूलगा पाहीजेच" असून तेथील लोकांसाठी हा डॉ. मदतनीस ठरला तर नसेल आणि म्हणून त्याला कुणीही काही करू शकले नाही ?

उपक्रमींना काय वाटते ?

लेखनविषय: दुवे:

Comments

बक्षीस का?

स्त्रीभ्रूणहत्ये बाबत प्रमूख आरोपी डॉ. मुंडे सद्ध्या फरार झाले असून त्यांना पकडायला सरकारने ४०,००० रूपये एवढे बक्षीस झाहीर (जाहीर?) केले आहे.

बक्षीस कशासाठी? सदर व्यक्ती दरोडेखोर आहे का की पोलिसांना तुरी देणे, त्यांच्यावर हल्ला करणे, साथीदार बाळगणे वगैरेंमधून तो पोलिसांना नामोहरम करेल? एका व्यक्तीला पकडण्यासाठी पोलिस असमर्थ आहेत का?

१. एवढी कमी रक्कम जाहीर करून प्रकरणाचे गांभीर्य सरकारने कमी केले आहे असे आपणास वाटत नाही काय?

बक्षीस जाहीर करायचीच गरज नव्हती. ते करून सरकारने या प्रकरणाचे गांभीर्य कमी केलेले दिसते.

२. या सुदाम मुंडेच्या मागे कुणा बड्या हस्तीचा हात असल्याचे आइकण्यात आहे काय? (शरद प. इ..)

माहित नाही.

३. उस्मानाबाद, लातूर आणि बीड जिल्ह्यातला हा फेमस (गर्भलिंग चाचणीसाठी) डॉ असून त्याचं आजतागायत कुणी काहीच करू शकले नाही ह्याचे कारण म्हणजे त्याला असलेला स्थानीक सपोर्ट असे आपल्याला वाटते काय? ह्या तीन्ही जिल्ह्यातील लोकांची मानसीकता आजून "मूलगा पाहीजेच" असून तेथील लोकांसाठी हा डॉ. मदतनीस ठरला तर नसेल आणि म्हणून त्याला कुणीही काही करू शकले नाही ?

अशी मानसिकता त्या जिल्ह्यांत आहे हे सांगण्यासाठी संदर्भ हवेत.

संदर्भ नाहीत.

ठोस संदर्भ (विकी, पेपर, जाळ्यावरील लिंक इ.) नाहीत आणि मिळणे कठीण आहे. मी स्वत: त्या जिल्ह्यातला व्यक्ती आहे आणी तेथे तब्बल १८ वर्षं राहिलेलो आहे आणी बर्‍याच गोष्टी जवळून पाहिलेल्या आहेत.

---------------------
-धनंजय कुलकर्णी

विकी कशाला?

भारतात सर्वसामान्य जनतेची मानसिकता ही 'मुलगी नको' अशीच आहे, हे ठरवायला/सांगायला/असा निष्कर्ष काढायला विकी कशाला? हातच्या कांकणाला आरसा कशाला?
ह्या मानसिकतेमुळेच, केवळ डॉक्टरांना पकडून अथवा कायदे अधिकाधिक कठोर करूनही ईप्सित साध्य झालेले नाही,होत नाहीय, होणारही नाही.
आपल्याकडे योनिशुद्धतेच्या अवास्तव आणि खुळचट अपेक्षांमुळे मुलीला वाढवणे,सांभाळणे हे जिकीरीचे होऊन बसते. केव्हा एकदा तिला (पडेल ती किंमत देऊन) दुसर्‍याच्या हवाली करतो आणि एकदाचे आपण मोकळे होतो अशी भावना बहुसंख्यांमधे असताना दुसरे काय होणार?

मुलगी हवी पण...

भारतात अलिकडे मुलींच्या जन्माबद्दल बहूतांशी लोकांचा विरोध मावळतांना दिसतो आहे. आणि स्रीभ्रूण हत्या वगैरे या विषयावर बरीच लोक अतिशय संवेदनशीलतेने मते मांडत आहेत. पण ही मुलगी शेजा-याच्या घरात हवी आपल्या नव्हे याकडेच बहूतेकांचा कल असतो.

माझ्या या मताशी असहमत असलेले लोक
१. ज्यांना अजून मूलबाळ झालेले नाही. (नवविवाहित)
२. जे या भूमिकेतून (मूल जन्माला घालण्याच्या) बाहेर पडलेले आहेत.
३. ज्यांना आधीच एक मुलगा झालेला आहे व अजून मुल हवे आहे.

बाकी ज्यांना आधीच एक मुलगी झालेली आहे त्यापैकी एकाचे हे मत पूरेसे प्रातिनिधीक ठरते.
"आम्ही समाजाला एक मुलगी दिली आहे मग आता आम्ही मुलाची अपेक्षा केलेली काय वाईट? मुला-मुलींचा रेशो संभाळायचा ठेका काय आम्हीच घेतला आहे का?"

गर्भलिंगचाचणी साठी येणा-या महिलेच्या सोबत तिची लाडकी मुलगी हमखास असते...

आता बोला.

१५०

१५० कोटीचा मालक् अन अनेक धंदे असलेल्या या चोराला पकडायला इतके फडतूस बक्षिस? त्याला पकडून तुरुंगात ठेवला, तर सकाळ संध्याकाळ बाहेरून 'घरचे जेवण' आणायला तो तितकी लाच रोज त्या जेलरला देईल.

अन् मुंडेंच्या मागे प.???? मराठवाड्यात?? राजकारण अन् समाजकारणाचे इतके धक्कादायक आकलन?

काय हे?

ता.क.
>>स्त्रीभ्रूणहत्ये बाबत प्रमूख आरोपी डॉ. मुंडे सद्ध्या फरार झाले असून त्यांना पकडायला सरकारने ४०,००० रूपये एवढे बक्षीस झाहीर केले आहे.<<

फरार झाला असून त्याला पकडायला. असे हवे.

प्रती:१५०

>>अन् मुंडेंच्या मागे प.???? मराठवाड्यात?? राजकारण अन् समाजकारणाचे इतके धक्कादायक आकलन?

काय हे ?

इतके दिवस त्याला कुणीच हात लावू शकत नाही तर नक्कीच पैसेवाला नेता असावा. म्हणून एक गेस प्रश्न.

डॉ ह्या पदवीला मान दिला , एवढेच. बाकी सुदाम मुंडेला कुणीच आहो जावो म्हणत नाही.

---------------------
-धनंजय कुलक्रर्णी

ह्मम

अर्थात, सुदामच्या मागे लोक आहेतच(चांगल्या/वाईट अर्थी), फरक एवढाच की 'डर्टी वर्क' सुदाम करतो, बाकी मलई खातात किंवा गप्प बसतात, अल्पायुषी स्मरणशक्तीचे वरदान जनतेला लाभल्याने सुदामाला जिवदान मिळेलसे वाटते, रकमेवरुन सरकारला ह्या प्रकरणात फार गांभिर्य वाटत नाही हे मात्र वाटते.

प्रती: हमम (आजूनकोणमी)

ह्या मलईचे काही करता येयील काय ? सगळीकडे मलई हाच एकमेव प्रमूख प्रॉब्लेम वाटतो.

---------------------
-धनंजय कुलकर्णी

प्रलोभन - प्रबोधन

निखिल जोशी म्हणतात त्याप्रमाणे मुलगी अपत्य असणार्‍यांना (प्रलोभने दाखवा)/लाभ द्या व प्रामुख्याने प्रबोधन करा.

प्रलोभने?

कसली आणि कशी प्रलोभने? फी माफीचे प्रलोभन सरकारने देऊन ३०-४० वर्षे उलटली. काही क्षेत्रांत स्त्रियांना आरक्षणही दिलेले आहे. आणखी कोणती प्रलोभने दिली की प्रबोधन होईल असे वाटते?

पुरेसे

>>फी माफीचे प्रलोभन सरकारने देऊन ३०-४० वर्षे उलटली. काही क्षेत्रांत स्त्रियांना आरक्षणही दिलेले आहे.
परिस्थिती पहाता ते प्रलोभन पुरेसे दिसत नाही.

>>आणखी कोणती प्रलोभने दिली की प्रबोधन होईल असे वाटते?
अर्थात समानता येणे शक्य नाही, पण काही अंशी पात रोखता येईल. एक पर्याय - मुलिच्या पालकांना तहहयात निवृत्तिवेतन(सामाजिक सुरक्षा वेतन) दिले जावे, पण त्यामूळे सधन घरातील भ्रूणहत्येचा प्रश्न सुटणार नाही, त्यासाठी प्रबोधन + कायदा ह्याचा वापर करावा लागेल.

एग्झॅक्टली

परिस्थिती पहाता ते प्रलोभन पुरेसे दिसत नाही.

प्रलोभनांचा प्रभाव होण्यासाठी बराच कालावधी लागतो. त्यामुळे इन्स्टंट उपायांसाठी प्रलोभने कुचकामी आहेत असे वाटते.

मुलिच्या पालकांना तहहयात निवृत्तिवेतन(सामाजिक सुरक्षा वेतन) दिले जावे, पण त्यामूळे सधन घरातील भ्रूणहत्येचा प्रश्न सुटणार नाही, त्यासाठी प्रबोधन + कायदा ह्याचा वापर करावा लागेल.

बरोबर, तसेच सामाजिक समानता आणखी थोडी घसरेल. उदा. फी माफीची गरज मला कधीच नव्हती, तशीही आमच्या शाळेची फी कमीच होती. उलट, ज्या मुलग्यांना गरज होती त्यांना तो फायदा मिळत नव्हता. शिवाय असे काही केल्याचा बोजा सरकारवर पडतो. कायदे, खटले वगैरे यांतही तो पडतोच पण तुलनात्मक दृष्ट्या कमी असावा.

त्यामुळे प्रबोधन आणि कायदा याशिवाय पर्याय दिसत नाही. :-)

उद्देश्

>प्रलोभनांचा प्रभाव होण्यासाठी बराच कालावधी लागतो. त्यामुळे इन्स्टंट उपायांसाठी प्रलोभने कुचकामी आहेत असे वाटते.<
नक्कीच.

>उदा. फी माफीची गरज मला कधीच नव्हती, तशीही आमच्या शाळेची फी कमीच होती. उलट, ज्या मुलग्यांना गरज होती त्यांना तो फायदा मिळत नव्हता.
फी माफी स्त्रि-भ्रूणहत्या करणार्‍यांसाठी खरे प्रलोभन होऊ शकत नाही, तसेही ते प्रलोभन मुलिंच्या शिक्षणासाठी होते, उद्देश वेगळा आहे.

>शिवाय असे काही केल्याचा बोजा सरकारवर पडतो.
मुलगे असणार्‍यांवर कर लादा ;)

>त्यामुळे प्रबोधन आणि कायदा याशिवाय पर्याय दिसत नाही. :-)
कायदामुळे गोष्टी उघड न घडता लपून घडतात असे दिसते, अर्थात प्रमाण काही अंशी कमी होते(फारच कमी परिणामकारकता).

माझे उत्तर


होय.
परंतु, या विषयाला इतके गांभीर्याने घेण्याची आवश्यकताच नाही. अन्यथा, मृत स्त्रीच्या चारही मुलींना सुप्रिया सुळे यांच्या संस्थेने दत्तक (संस्थेने दत्तक हा शब्दप्रयोग, गर्भपाताला हत्या म्हणण्यासारखा सनसनाटी शब्दप्रयोग आहे) घेतले त्याला कौतुकास्पद म्हणावे लागेल. या मुलींना दत्तक घेणे हे प्रिन्सला आर्थिक मदत देण्याइतकेच निंद्य आहे.

Nothing is official here

होय.

निंद्य?

या मुलींना दत्तक घेणे हे प्रिन्सला आर्थिक मदत देण्याइतकेच निंद्य आहे.

निंद्य कसे काय ते समजले नाही.

ब्रेकिंग न्यूज

बातमीमूल्य असलेल्या पीडितांना अधिक महत्व देणे उथळ आहे, अव्यावहारिक आहे (तसे ते परदेशांतसुद्धा घडते). राजकारण्यांसाठी ते प्रसिद्धीलोलुपसुद्धा आहे.

पर्याय ?

असे असेल तर राजकारण्यांचे उद्देश वगैरे निंद्य म्हणता येतील. पण परस्पर काही (खर्‍याखुर्‍या) पीडितांना आधार मिळत असेल, तर ही स्थिती एक 'घटना' म्हणून मी निंदनीय का समजावी?
विशेषतः तेव्हा, जेव्हा माझ्याकडे (खर्‍याखुर्‍या) पीडितांसाठी अन्य पर्याय नसेल.

आपल्यापर्यंत बातमी पोचली म्हणजे ती बातमी प्रसिद्धीसाठीच पेरलेली आहे, असा समज करणे चूक आहे. सर्वव्यापी मिडीआच्या अनाठायी सक्रियतेमुळेसुद्धा आपल्याला हल्ली बरेच काही माहित पडत असते, असे मला वाटते.
दुसरे म्हणजे पीडितांमधे बातमीमूल्य असलेले आणि नसलेले असे वर्गीकरण कितपत योग्य वाटते?

प्रती:पर्याय ? (ज्ञानेश...)

+१

---------------------
-धनंजय कुलकर्णी

:)

शिट हॅपन्स. पीडितांची दु:खे बघणे आपल्याला सहन झाली पाहिजेत. आणखी एखादा स्टारफिश वाळूत राहिला तरी चालेल, त्याऐवजी मदर टेरेसा किंवा सुप्रिया सुळे नकोत.

दुसरे म्हणजे पीडितांमधे बातमीमूल्य असलेले आणि नसलेले असे वर्गीकरण कितपत योग्य वाटते?

हे दु:खद सत्य आहे. प्रिन्स असो किंवा हम्फ्रे देवमासा, त्यांच्यावर जितका खर्च झाला किंवा त्यांच्यासाठी जितके फुटेज प्रसारित झाले तितके ते लायक नव्हते. 'लोकांना बघायला आवडते' इतक्याच कारणासाठी त्यांचे लाड झाले.

का?

१. गांभीर्याने का घेउ नये ?

२. लिंक उपयोगी आहे.

३. ह्यावर उपाय म्हणून काय करता येयील ?

---------------------
-धनंजय कुलकर्णी

भावनिक मुद्दा


पात की पातक?

या कृत्याला गुन्हा मानणे मला पटतच नाही. आर्थिक प्रलोभने दाखवून मुलींची संख्या वाढवावी असे मला वाटते.
मात्र, सध्या तो गुन्हा आहे. सुपारी घेणार्‍या गुंडापेक्षा सुपारी देणार्‍या व्यक्तीचा गुन्हा अधिक मानला जातो/मानावा. तद्वतच, कारवाई झालेल्या डॉक्टरांकडून नावे मिळवून स्त्रीभ्रूणहत्या करणार्‍या सर्व स्त्रियांनाही अटक व्हावी. नंतर, "माझ्यावर सक्ती झाली" अशी माफीची साक्ष मिळवून तिच्या कुटुंबियांवरही कारवाई करण्यात यावी. आहे हिंमत?

या कृत्याला गुन्हा मानणे मला पटतच नाही. आर्थिक प्रलोभने दाखवून मुलींची संख्या वाढवावी असे मला वाटते.
मात्र, सध्या तो गुन्हा आहे. सुपारी घेणार्‍या गुंडापेक्षा सुपारी देणार्‍या व्यक्तीचा गुन्हा अधिक मानला जातो/मानावा. तद्वतच, कारवाई झालेल्या डॉक्टरांकडून नावे मिळवून स्त्रीभ्रूणहत्या करणार्‍या सर्व स्त्रियांनाही अटक व्हावी. नंतर, "माझ्यावर सक्ती झाली" अशी माफीची साक्ष मिळवून तिच्या कुटुंबियांवरही कारवाई करण्यात यावी. आहे हिंमत?

टाळीखाऊ वाक्य म्हणून योग्य आहे.
सुपारी घेणारा डॉक्टर आहे. मीही एक सर्जन आहे, सुरी कात्री चालविणारा. पेशंटने 'मागितलेले' अयोग्य ऑपरेशन नाकारणे हे डॉक्टरच्या हाती असते. त्यासाठी योग्य प्रकारे काउन्सेलिंग करणेही त्याच्या एकंदर ट्रेनिंगकडे पाहिले तर त्याच्या दृष्टिने सोपे असते.
सबब, असल्या प्रकारच्या 'सुपारी' घेण्याबद्दल मी सहमत नाही.

परंतू, तुमच्या 'प्रिन्सिपल ऑफ आर्ग्यूमेंट'शी सहमत आहे. (निखिल जोशी हे डॉक्टर आहेत हे ठाउक आहे.!?At least that is my impression? ) जितका दोषी तो सर्जन, त्यापेक्षा जास्त दोषी ते पेशंट्स आहेत याच्याशी सहमत.

अन् हिम्मत् असलेलेच लोक इये देशी चोर्‍या करण्यात अन् पुढल्या २२ पिढ्यांची 'सोय' लावण्यात गुंतलेत हो.. हिम्मत कुणाला विचारता आहात?

सुदाम मुंडे

सुदाम् मुंडेच्या सोबतच ज्यांनी ज्यांनी त्यांच्याकडे भ्रूणहत्या करवून् घेतली त्याना पण् शिक्षा व्हायला हवी...तेच् जास्त् जबाबदार आहेत असल्या प्रकारांना...

प्रति:सुदाम मुंडे(आवाजकुणाचा)

"भ्रूणहत्या करवून् घेतली त्यांना शिक्षा व्हायला हवी"... हे ते कोण ? आई की सासरे/पती/सासू इ. ?

---------------------
-धनंजय कुलकर्णी

 
^ वर