सत्यमेव जयते आणि प्रश्न डॉक्टरांचे
सत्यमेव जयतेचा भाग प्रदर्शित झाल्यावर फेसबुकवर एक लांबलचक पत्र नजरेस पडले.
प्रिय आमीर खान,
"सर्वच डॉक्टर हावरट नसतात"
"कोणताही व्यवसाय संपूर्णतः स्वच्छ नसतो."
"डॉक्टरी पेशा (निवडणे) ही पसंती आहे, सक्ती नव्हे"
माननीय महोदय,
मी तुमच्या अभिनयाचा चाहता आहे. मी सत्यमेव जयतेचाही चाहता आहे परंतु २७ मे, २०१२ चा भाग पाहून मला धक्का बसला. हा भाग टाकण्यापूर्वी तुम्ही थोडा विचार आणि गृहपाठ करणे आवश्यक होते. तुमच्या चित्रपट उद्योगात तुम्ही आणि अमिताभ बच्चन या दोनच व्यक्ती आहेत ज्यांच्याकडे सुसंस्कृत समाज गांभीर्याने पाहतो. त्यामुळे तुम्ही असे एकांगी आणि दूषित कथानक पुढे करता तेव्हा दु:खाने असे म्हणावेसे वाटाते की व्यावसायिक चॅनेलवर अशा प्रकारचे कार्यक्रम करणे अयोग्य आहे. (मला वाटते तुम्ही या कार्यक्रमासाठी मोठी रक्कम घेतली असावी, दानधर्म आणि परोपकार फक्त डॉक्टरांनी करायचे असतात, ऍक्टरांनी नाहीत!!! बरोबर!)
या पुढे मांडलेले मुद्दे थोडक्यात आणि माझ्या शब्दांत देत आहे. - धूमकेतू.
१. खाजगी कॉलेजात मेडिकलची कॅपिटेशन फी ४०-५० लाख असते असे तुम्ही कार्यक्रमात सांगितले. अशीच कथा तुम्ही इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, लॉ, एमबीए कॉलेजबद्दल का सांगितली नाही? फक्त डॉक्टर्सना लक्ष्य का केले?
2. कार्यक्रमात सांगितले गेले २००१ नंतर ३१ सरकारी मेडिकल कॉलेजे आणि १०६ खाजगी कॉलेजे उघडण्यात आली. आज भारताट १८१ खाजगी आणि १५२ सरकारी कॉलेजे आहेत. आकडा तुम्ही सांगितला तेवढा वाईट नाही. तेव्हा तुमच्या कार्यक्रमाला पोषक असे मुद्दे मांडू नका.
खाजगी कॉलेजांपैकी ९५% कॉलेजे राजकारण्यांची आहेत आणि एमसीआयशी त्यांची हातमिळवणी आहे. भ्रष्टाचारासाठी राजकारण्यांन दोषी धरा, डॉक्टरांना नाही.
3. कार्यक्रमातील एक पाहुणे (डॉ. गुल्हाटी) म्हणाले की औषधे लिहून देण्यासठी फार्मा कंपन्या ३०% कमिशन डॉक्टरांना देतात. या विधानाला काहीही अर्थ नसून त्या संबंधी कोणतेही पुरावे सादर करण्यात आले नाहीत.
4. कार्यक्रमादरम्यान तुम्ही इंग्लंड आणि भारतातील डॉक्टरी परवाने रद्द झाल्या विषयी आकडे सांगितले पण भारतात किती डॉक्टरांना गुंडांकडून मार खावा लागतो, स्टायपेन्डच्या नावाखाली त्यांना किती क्षुल्लक पगार मिळतो, राहण्या-खाण्याच्या गैरसोयी वगैरेंविषयी काहीच बोलणे नव्हते.
5. कार्यक्रमादरम्यान तुम्ही म्हणालात की हा व्यवसाय फक्त परोपकारासाठी निवडावा, पैसे कमावण्यासाठी नाही. असे का? डॉक्टरांना चांगले सुखासीन आयुष्य कंठित करण्याची परवानगी नाही? इथे साम्राज्यवाद दिसतो. आधी डॉक्टर होण्यासाठी काय काय करावे लागते ते जाणून घ्या आणि मग हे गीता-ज्ञान इतरांना द्या.
साडेपाच वर्ष एम.बी.बी.एस. आणि पुढे पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी १५ ते २० हजार रु. प्रति महिना मिळतात. (इतर क्षेत्रातील मुले याच्या दुप्पट पगार आधीच मिळवतात) पुढे शिकले नाही तर २०-२२००० पगार मिळतो.
पोस्ट ग्रॅज्युएशननंतर सक्तीने खेडेगावात १ वर्ष नोकरी करावी लागते किंवा २५ लाख रुपयांचा बाँड द्यावा लागतो.
6. फक्त डॉक्टरांना खेडेगावात आणि सरकारी हॉस्पिटलांत नोकरी करण्याची सक्ती का? फक्त डॉक्टरांना सरकारला पैसे का द्यावे लागतात? इंजिनिअर्स, वकील, सीए, एमबीए यांना अशी सक्ती का नाही?
आता सरकार डॉक्टरांना परदेशी स्थायिक होण्यास प्रतिबंध करण्याविषयी विचाराधीन आहे. का? असाच प्रतिबंध आयआयटी/ आयआयएम विद्यार्थ्यांना का नाही? समाज आणि सरकारने डॉक्टरांसाठी काय केले आहे की डॉक्टरांनी फक्त परोपकार करत राहावे?
7. तुम्ही कार्यक्रमादरम्यान सांगितले की डॉक्टर महागडी औषधे लिहून देतात. औषधांच्या किंमतींवर नियंत्रण आणणे ही सरकारची जबाबदारी आहे. त्यासाठी डॉक्टरांना दोषी धरू नये.
महोदय, दुसर्यांकडे बोटे दाखवणे सोपे असते. सर्व काही आलबेल आहे असे सांगण्याचा आमचा प्रयत्न नाही पण सर्व काही कोठेच आलबेल नाही. भ्रूणहत्या आणि हुंड्यावर कार्यक्रम करणे वेगळे आणि अशा गुंतागुंतीच्या विषयावर फारसे संशोधन न करता कार्यक्रम करणे वेगळे.
या कार्यक्रमातून तुम्ही डॉक्टरांची प्रतिमा डागाळली आहे. १० वाईट डॉक्टरांमागे १००० चांगले डॉक्टरही असतात. तुम्ही याबाबत माफी मागणे गरजेचे आहे.
आम्ही असे ऐकतो की आमीर खान एका भागासाठी ३ करोड रुपये घेतात. आम्ही डॉक्टर समाजसेवा कमी करत असू पण जी समाजसेवा करतो त्याचा मोबदला मागत नाही.
---
हे पत्र एका मेडिकल विद्यार्थ्याचे आहे आणि फेसबुकवर सर्वत्र झळकत आहे. सत्यमेव जयतेच्या कार्यक्रमाशी तुम्ही सहमत आहात की वरील पत्राशी? देशातील आरोग्यसेवा चिंताजनक आहे असे तुम्हाला वाटते का?
Comments
चर्चेस सुरुवात तरी करावी
धूमकेतू यांना काय वाटते तेही आम्हाला कळावे.
नितिन थत्ते
हतबुद्ध झालो
थकलो हो ती चर्चा टंकून. दोन दिवस वाचतो आहे चेपुवर. या चर्चेला अनेक डॉक्टरांचा पाठिंबा दिसतो. आमची मने दुखावली असा सूर दिसतो. चांगल्या डॉक्टरांवर आमीरने अन्याव केला अशी रडारड दिसते. एकाने तर देशात इतर महत्त्वाचे प्रश्न असताना डॉक्टरांवर कुर्हाड का चालवली असे विचारले आहे.
वरच्या चर्चेतले सर्व मुद्दे खोटे नसले तरी एकूण चर्चा आणि प्रतिसाद वाचून मी हतबुद्ध झालो.
एमबीए
खाजगी कॉलेजात मेडिकलची कॅपिटेशन फी ४०-५० लाख असते असे तुम्ही कार्यक्रमात सांगितले. अशीच कथा तुम्ही इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, लॉ, एमबीए कॉलेजबद्दल का सांगितली नाही? फक्त डॉक्टर्सना लक्ष्य का केले?
मेडीकलच्या पोस्ट ग्रॅज्युएशनची पोस्ट कॅपीटेशन फी- रीड लाच देऊन घ्यायची असेल तर इतकी रक्कम मोजावी लागते ही वस्तुस्थिती आहे. अशा एका वाटाघाटींच्या बैठकीला मी उपस्थित होतो. इतर अभ्यासक्रमांबद्दल कल्पना नाही, पण भारतात एमबीए या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी कोठेही इतकी रक्कम मोजावी लागत नाही.
सन्जोप राव
हम तुझे वली समझते, जो ना वादाखार होता
आणि..
आणि इंजीनीरींग साठी एवढी रक्कम (डोनेशन म्हनून) दिलेली आइक्ण्यात नाही.
(अगदीच १२ नापास असेल आणि व्ही.आय.टी पुणे मधे ENTC सीट हवी असेल तर् माहित नाही.. तरीसुद्धा १०-२० लाख योग्य वाटतात)
---------------------
-धनंजय कुलकर्णी
सरकार?
सरकारने सगळ्या औषधांचा एकच भाव ठरवावा असे अपेक्षित आहे काय? म्हणजे महागडी औषधे हा प्रकारच अस्तित्वात राहणार नाही.
कळले नाही
हे कळले नाही. जे चांगले डॉक्टर्स आहेत त्यांची प्रतिमा येथे कशी डागाळता आली? फारतर पूर्वी शंका न घेणारा रुग्ण आता डॉक्टरांवर शंका घेईल पण असे सतत करत राहणे आजारी माणसाला शक्य आहे का? माझ्यामते या कार्यक्रमानंतर चांगले डॉक्टर्स विन-विन सिच्युएशनमध्ये आहेत.
समजा हा कार्यक्रम बघितल्यावर उद्या माझ्या पाठीत उसण भरली (;-) हे कार्यक्रमाचे फलित नव्हे) तर काय मी सत्यमेव जयतेमुळे डॉक्टरांकडे गेल्यावाचून राहणार आहे का? तसे अर्थातच होणार नाही. समजा डॉक्टरांनी मला तत्काळ हॉस्पिटलमध्ये भरती होण्यास सांगितले आणि या कार्यक्रमाने माझा अवेअरनेस वाढला आहे तर मी फारतर सेकंड ओपिनिअन घेणे पसंत करेन. चार प्रश्न खोलात जाऊन विचारेन. महागड्या औषधांपेक्षा जनेरिक औषधे देता येतील का ही चौकशी करेन. (ते हा कार्यक्रम न बघताही करत होतेच. इन्शुरन्स का सवाल है|) यातून डॉक्टरचा अपमान होतो असे वाटत नाही. माझ्या पीसीपीचा तरी कधीही झालेला नाही.
जर दोन्ही डॉक्टर सज्जन असतील आणि गुणी असतील तर त्यांचे निदान जवळपास सारखेच निघेल. अशाने माझा डॉक्टरांवरील विश्वासच दुणावेल आणि दोन्ही डॉक्टरांची फी द्यावी लागल्याने डॉक्टरांचाही फायदा आहेच.
तेव्हा नेमका प्रॉब्लेम काय आहे? ;-)
१+
उत्तम मुद्दा !
-धनंजय कुलकर्णी
+१
योग्य मुद्दा!
सेकंड ओपिनियन
सेकंड ओपिनियन फक्त रुग्णच त्यांच्या 'प्रायमरी फिजिशियन'चे मत 'कन्फर्म्' करण्यासाठी घेतात असे नाही.
माझ्या समोर असलेल्या रुग्णाला तपासतानाच् माझ्या मनात एका वेळी खरोखर शेकडो धाग्यांवर विचार करून निदानावर पोहोचण्याचा अती क्लिष्ट 'अल्गोरिदम्' सुरु असतो. काही वेळा मी माझे पूर्ण ज्ञान व अनुभव वापरून योजिलेल्या उपचारांनी 'गुण' येत नाही. अशावेळी मी सेकंड ओपिनियन मागवतो.
याचे कारण 'गेटिंग् इन् अ रट्' असे असते. माझा दुसरा ''सज्जन व गुणी" सहव्यवसायी माझी चाकोरी सोडून विचार करीत कदाचित् दुसर्या निदानापर्यंत पोहोचेल असा तो प्रयत्न असतो. यात माझी चूक/अनवधान इ. लक्षात यावेत तसेच, "First, do no harm" हे वैद्यकाचे मूलभूत तत्व पाळले जावे हा हेतू असतो.,
(हेच कधी कधी रुग्णाने स्वतःहून डॉक्टर बदलल्यावर होऊ शकते, व मग पहिला डॉक्टर, 'सज्जन व गुणी' असला तरी चोर म्हणून 'लेबल' केला जाऊ शकतो.)
शंका नाही
हो डॉक्टर्सही सेकन्ड ओपिनिअन घेत असावेत. घेतात असे मी पाहिलेलेही आहे.
हो हे असेही होऊ शकते. :-)
कार्यक्रमाची रक्कम
हा मुद्दा पुर्वीही बर्याचदा चर्चांमधे वाचला होता. आमिर एका एपिसोडसाठी साडेतीन कोटी घेतो, मग कसली ही समाजसेवा? वगैरे
ह्यावर मध्यंतरी आउट्लुक मधे आमिरची मुलाखत वाचली होती. त्यात त्याने म्हंटले आहे की एका एपिसोडची फी इतकी घेतला तरी त्यात सर्व खर्च धरला आहे. (कार्यक्रमासाठी करण्यात येणाता रीसर्च वगैरे.) तसेच सहसा दरवर्षी तो उत्पादनांच्या जाहिराती करुन १००-१५० कोटी मिळवतो त्या उत्पन्नावर त्याने ह्या कार्यक्र्मात व्यग्र असल्याने पाणी सोडले आहे. त्यामुळे काही प्रमाणात आर्थिक झळ सोसुन तो हा कार्यक्रम (समाजसेवा) करत आहे. असा खुलासा दिला आहे. खरे खोटे आमिर जाणे.
बाकी प्रस्तावावर सवड मिळेल तसे लिहिनच, तुर्तास इतकेच.
एकही नाही
एकही मुद्दा पूर्णपणे पटला नाही.
ज्याने हे मुदे उचलले आहेत ती व्यक्ती इथे नसल्याने प्रत्येक मुद्द्याचे मुद्देसुद खंडन करण्यात फार हशील दिसत नाही
ऋषिकेश
------------------
<<स्वाक्षरी निद्रीस्त आहे>>
१+
१+
---------------------
-धनंजय कुलकर्णी
अच्छा
>>ज्याने हे मुदे उचलले आहेत ती व्यक्ती इथे नसल्याने प्रत्येक मुद्द्याचे मुद्देसुद खंडन करण्यात फार हशील दिसत नाही
अच्छा म्हणजे तुम्ही एन.डी. तिवारींवर चर्चा सुरू करता तेव्हा कोर्ट, तिवारी आणि त्यांचा पुत्र असण्याचा दावा करणारा मुलगा चर्चेत भाग घ्यायला हजर असतात वाटते. काय चेष्टा करताय राव!
तुम्हाला आणखी माहिती हवी असेल तर ही बातमी वाचा. या बातमीवरूनच चेपुवर पत्र तयार केले असावे असा मला संशय आहे.
जोक
हे मुद्दे म्हणजे जोक आहे. वर ऋषिकेशने लिहिल्या प्रमाणे हि चर्चा येथे करण्यात काहीच हशील नाही. असेल तर मला डॉ. सुदाम मुंडेंचा एखादा प्रतिसाद वाचायला आवडेल :).
माझ्या एम.डी. डॉक्टर मित्र मैत्रिणींनी गेल्या ३-४ वर्षात ३ गाड्या बदलल्या आहेत. त्यांचे स्वतःचे हॉस्पिटल बांधतानाचा खटाटोप सुद्धा मी पाहिला आहे. त्यामुळे समाजसेवा वगैरे सगळे डॉक्टर करत नाहीत हे मी जवळून पाहतो आहे. याच सोबत खरोखर समाजसेवा करणारे डॉक्टर सुद्धा पाहिले आहेत.
वर प्रियालीने लिहिलेले मुद्दे मला पटले आहेत. एका कार्यक्रमाने सगळे चांगले डॉक्टर वाईट होत नाहीत. तसेच जर या कार्यक्रमामुळे जनरिक मेडीसिन बद्दल लोकांना माहिती मिळत असेल आणि त्यांचा फायदा होत असेल तर प्रॉब्लेम काय आहे?
आमिरखानचा सत्यमेव जयते.
सगळे डाक्टर पैसे काढणारे नसतात हे मान्य,पण पुश्कळजण असतात स्पेशालिटीच्या नावाखाली भरमसाठ पैसे घेणारेही असतात.ज्या कम्पनीची मेडिसिन महाग ती कम्पनी स्टन्डर्ड म्हणुन त्याच कम्पनीची मेडिसिन लिहायची.पण त्यासाठी ते कमिशन घेतात असेमात्र नाही.कम्पन्या भेटवस्तूमात्र देत असतात.
डॉक्टरांनी इंजेक्शन देण्याचे का थांबवले?
मला वाटते की हा प्रश्न कदाचित या चर्चेत गैरलागू असेल. तरीही येथे वैद्यक क्षेत्रातील जाणकार आहेत, काही संशोधकही आहेत, ते या प्रश्नाचे संयुक्तिक उत्तर देतील अशी अपेक्षा आहे म्हणून विचारतो :
भारतात डॉक्टरांनी इंजेक्शन्स देण्याचे थांबवून गोळा देण्यामागचे कारण काय? ( हा बदल १९९० पासून प्रकर्षाने जाणवू लागला.)
बर्याच गोळ्यांचे पचनक्रियेवर विपरीत परिणाम दिसतात. तसेच गुण येण्यास काही कालावधीही जातो. इंजेक्शन दिल्यास हे टाळता येते. मग इंजेक्शन बंद करण्यामागे कोणते कारण/संशोधन आहे?
इंजेक्शन्.
नाना.
इतका बाळबोध प्रश्न तुमच्याकडून तरी अपेक्षित नव्हता, कारण तूमचे वाचन व ज्ञान चौफेर आहे.. असो. मला बाळबोध वाटले म्हणजे नॉन-मेडिकोजना तसेच असावे असे नाही.. शंकानिरसनाचा प्रयत्न करतो.
इंजेक्शन या 'वस्तू'बद्दल तुमच्या मनात जे काही आहे ते काहिसे प्लासिबो सारखे टोचल्याने गुण लवकर येतो अशी जी संकल्पना अजूनही खेड्यापाड्यांतल्या रुग्णांत आढळते, तसलेच आहे. (असा बोध मला तुमची पोस्ट वाचून झाला, तो चुकीचा असल्यास माफ करा.)
'ड्रग डिलिव्हरी' हा यात विषय आहे.
काही औषधे, पोटात दिली असता, 'टार्गेट'पर्यंत पोहोचूच शकत नाहीत. उदा. इन्शुलिन. याचे इंजेक्शनच् द्यावे लागते. गोळी दिली तर इन्शुलीनचा रेणू 'पोटात' 'पचून' जातो. पक्षी पाचक रसांची प्रक्रिया होऊन केवळ एक् प्रथिनाचा रेणू म्हणून् त्याचे तुकडे करून अमायनो आम्लाच्या रूपाने ते आतड्यांतून शोषले व रक्तात् संमिलीत केले जातात. : औषध म्हणून इन्शूलिनची 'गोळी' निकामी ठरते. (डायबेटीसच्या 'गोळी'त इन्श्युलिन नसते.)
काही औषधे जरी पोटातून देता येण्यासारखी असलीत्, तरी काही वेळा तात्काळ इफेक्ट् येण्यासाठी सरळ रक्तात टोचली जातात. थोडा उशीर लावून चालणारे असेल तर 'सुई' स्नायूत देतात नाहीतर शिरेतून सरळ रक्तात. शेवटचा इलाज म्हणून मरणार्या रुग्णाच्या सरळ हृदयातही इंजेक्शन दिले जाते.
दम्याचा 'स्प्रे' ते औषध सरळ 'टार्गेट'पर्यंत : फुफ्फुसांत : पोहोचवतो. ही वेगळी डिलिव्हरी सिस्टीम आहे.
जिभेखाली ठेवण्याची सॉर्बिट्रेटची 'हार्ट आट्याक/अन्जायना ची' गोळी, तिथून जिभेखालची तंबाखू जसे निकोटिन डायरेक्ट रक्तात सोडते, तशी औषध रक्तात सोडते..
इ.
दुसरी बाजू म्हणजे,
इन्जेक्शन हे धोकादायक आहे.
'नुसत्या' इंजेक्शनाने. कोणतेही 'औषध' त्या सुईद्वारे शरीरात न सोडताही, पेशंट तात्काळ दगावू शकतो, हे आपणांस ठाऊक आहे काय?
शास्त्रातील संशोधनांनी इतर ड्रगडिलिव्हरी सिस्टीम्स चांगल्या उन्नत झाल्याने तसेच सोप्या मार्गाने शरीरातील आजाराचा प्रतिकार करू शकतील अशी औषधेही विकसित झाल्याने सर्रास 'ओपीडी बेसीस' वरील इंजेक्शनांचे प्रमाण कमी झाले आहे.
तरीही, सुई मारणे, अन् 'सलई' भरणे ही दोन जीपीच्या कमाईची साधने होऊन राहिलेली खेड्यापाड्यांतून अजूनही दिसतातच.
धन्यवाद, डॉ. आडकित्ता
उत्तराबद्दल धन्यवाद.
प्रश्न बाळबोध आहे हे खरेच. माझे वाचन चौफेर वगैरे काही नाही. प्लॅसिबो इफेक्ट, सलाईन वॉटरचे इंजेक्शन याबद्दल मी बोलत नाही. ते सगळे ठाऊक आहे. पण बर्याच वेळेला पोटातून घ्यायच्या औषधांचे (विशेषतः प्रतिजैविके) पचन संस्थेवर अत्यंत अनिष्ट परिणाम होतात. शिवाय या गोळ्या सतत ४ ते ५ दिवस घ्याव्या लागतात. ज्यावेळी जीवाणूंची लागण होते अशावेळी इंजेक्शन देऊन तो आजार लगेच आटोक्यात आणता येतो.(असे मला वाटत होते.) ड्रग डिलिव्हरी सिस्टिम्सबद्दल थोडेफार माहित आहेच.
-असे तुम्ही म्हणता. तसे तर कोणतेही अलोपॅथिक औषध रिऍक्शन आल्यास प्राणघातक ठरू शकतेच! तरीही इंजेक्शन दिल्याने हे तात्काळ कसे होते ते जाणून घेण्यास आवडेल.
शिवाय जे इंजेक्शन १५ ते २० रुपयांना मिळू शकते त्याऐवजी ७ ते ८ रुपयांच्या १० गोळ्या का खाव्या लागतात? (जेनेरिक नव्हे, ब्रँडेड.)हा आर्थिक दृष्टीकोन आहेच.
'इंजेक्शन वाईट, गोळ्या चांगल्या' हे सर्रास कधीपासून ठरवले गेले? त्यावर कोणत्या हेल्थ असोशिएशनच्या (जसे डब्ल्यूएचओ / आयएमए) सायंटिफिक स्टेटमेंट / गाईडलाईन्स प्रसिद्ध झाल्या आहेत काय? त्या कुठे पहायला मिळतील?
इंजेक्शनः२
इंजेक्शनच्या धोक्यांपैकी काही लिहायचे राहून गेले होते, व तुमच्या नवीन प्रतिसादाच्या अनुषंगाने-
१. नुसते टोचले जाण्याच्या वेदनेने, किंवा त्या भीतीनेही, वासो-वेगल शॉक प्रकारची प्रतिक्रिया शरीरात उद्भवू शकते. यात कुण्या औषधाच्या रिअॅक्शनचा संबंध नाही. (अॅलोपथीला(च) रिअॅक्शन येते हा आणिक एक चुकीचा समज.)
२. (अ) इंजेक्शन हे जरी नव्या, फेकून देता येणार्या (डिस्पोजेबल) निर्जंतूक सुई/पिचकारीने दिले, तरीही ज्या त्वचेतून ती सुई जाणार आहे, ती नुसत्या स्पिरिटच्या बोळ्याने पुरेशी स्वच्छ/निर्जंतुक न झाल्यास, (आपल्याकडे आजारी पडला की आधी आंघोळ बंद करतात) 'इंजेक्शन अॅब्सेस' उद्भवू शकतात.
२. (ब) इंजेक्शनद्वारे संक्रमित होणारे आजार जसे हिपॅटायटीस, एड्स्, जास्त धोकादायक आहेत. तीच सुई परत वापरली नाही, तरी डिस्पोजल करताना किंवा अपघाताने इतरांना टोचली जाऊनही हे आजार पसरू शकतात.
३. १५-२० रुपयांत इंजेक्शन रूपात मिळणार्या कोणत्या औषधाची १ गोळी तुम्हाला ७-८ रुपयांना मिळाली? हा प्रकार सत्य वाटत नाही.
४. तुम्हाला म्हणायचे आहेत ते पचन संस्थेवरील 'परिणाम' : जुलाब : हे बहुतेकदा 'नॉर्मल जी. आय्. फ्लोरा' अर्थात, आतड्यांतील 'चांगले' जीवाणू मेल्याने होतात. जेवणात दही/ताक वाढविल्याने, तसेच जीवनसत्वांची जोड दिल्याने ते परिणाम आटोक्यात रहातात. इतर त्रासांसाठी योग्य ती काळजी तुमचे डॉक्टर घेतीलच.
सारांश.
इंजेक्शन 'वाईट' असे कुठेही लिहिलेले नाही. किंबहुना इंजेक्शन 'वाईट' असा प्रवाद कुठून आला हेही मला समजत नाहीये. पण साध्या सर्दी पडशाची मुंगी मारायला इंजेक्शनची तोफ आणणे गरजेचे नाही. जे काम सोप्या गोळीने होते त्यासाठी टोचायची 'इन्व्हेजिव्ह' प्रोसिजर करणे योग्य नाही. नॉन-इन्व्हेजिव् -म्हणजेच शरीरास नवे छिद्र न पाडता केलेले- उपचार जास्त चांगले असतात.
काही औषधे इंजेक्शननेच द्यावी लागतात. इतरांसाठी गोळ्या, स्प्रे, जिभेखाली ठेवलेल्या गोळ्या, त्वचेतून शोषले जाणारे 'पॅच' इ. वापरणे रुग्णहितासाठी जास्त चांगले.
***
'इंजेक्शन' चांगले असल्याच्या समजूतीबद्दलचा एक किस्सा सांगावासा वाटतो.
भोर येथे इंटर्नशिप करीत असतानाची गम्मत आहे. रूरल हॉस्पिटल गावा बाहेर व आमचे क्वार्टर गावातील पशुवैद्यकीय दवाखान्यात होते.
पेशंट्सच्या 'हातपाय मरत्यात' (अशक्तपणा, अंगदुखी : शारीरिक कष्टाची कामे करून) अन् 'फिस्कं व्हत्यात' (अस्वच्छतेमुळे बहुदा डोक्यात होणारे केसतोडे, -जास्तकरून मुलांच्या) या २ मुख्य तक्रारी असत्.
विषेशतः हातपाय मर्त्यात म्हटलं की एक बीप्लेक्सचे इंजेक्शन इंटर्न डॉक्टरने लिहावे व ते नर्सने टोचून द्यावे असा शिरस्ता होता. हा खरे तर मूर्खपणा होता. इंजेक्शन ऐवजी आम्ही गोळ्या लिहून देऊ लागलो, ज्या दवाखान्यात फुकटच मिळत असत. पण, रोजची ओपीडी करून (बाह्यरुग्ण तपासणी) परत येताना रस्त्याच्या दुतर्फा गोळ्या फेकून दिलेल्या सापडत.
केसपेपर वाचून पाहिले असता गेल्या ६ महिन्यांत बीप्लेक्सची १००-१०० इंजेक्शने घेतलेले बहाद्दर सापडले होते. विचार करा, १८० दिवसांत १००+ इंजेक्शने. आधीचे इंटर्न्स का लिहून देत होते हे कळायला मार्ग नव्हता. बी काँप्लेक्स चे व्हिटॅमिन टोचून जर अशी ताकत यायला लागली, अन् वेदना थांबल्यात तर झालेच की!
पेशंटांना समजावून सांगून पाहिले, व इंजेक्शन लिहिणे/टोचणे बंद केले होते.
८-१० दिवसांत एक लोकल 'पुढारी' आले. तुम्ही डॉक्टर गरीब जनतेला 'जीवनावश्यक' इंजेक्शने व उपचार मिळू देत नाही आहात. गरीबांना इंजेक्शन 'खासगीत' टोचून घ्यावी लागत आहेत, यात तुमचे लागेबांधे आहेत. याची तक्रार 'वर' करतो. तुम्हाला गावात रहायचे आहे इ. धमकी देऊ लागले. जुन्या इंटर्नसने इंजेक्शन का लिहिले याचा उलगडा झाला.
मग, 'वरून' इंजेक्शनचा पुरेसा पुरवठा होत नाही म्हणून् इंजेक्शने बंद केलीत, पुढल्या अठवड्यापासून नवे जास्त स्ट्राँग इंजेक्शन मागविले आहे असे सांगून त्यांना बोळविले.
त्यानंतर एक दिवसाआड इंजेक्शनला अॅडिक्टेड हातपाय मर्त्यात वाल्यांना, इंजेक्शन 'नॉर्मल सलाईन' कुल्ल्यावर टोचणे सुरू केले. हे नॉर्मल सलाईन शिरेतून दिल्यास तसे म्हटले, तर 'शक्तीचे इंजेक्शन' असते. पण या हातपाय मरत्यात वाल्यांसाठी बीप्लेक्स इतकेच निरुपयोगी व निरुपद्रवी होते. फरक इतकाच असतो, कुल्ल्यावर टोचले, की ते मस्तपैकी दुखते. या हार्डकोअर पेशंटांना गुण तर तितकाच येऊ लागला, पण हळू हळू इंजेक्शन फारच दुखते म्हटल्यावर तो आग्रह कमी झाला!
:) किस्सा आवडला
माझा रोख मुख्यत्वे अँटिबायोटिक्सवर आहे हे लक्षात आलेले असेलच. बर्याच वेळेला डॉक्टरनी लिहून दिलेला १० गोळ्यांचा कोर्स पेशंटकडून पूर्ण केला जात नाही. थोडे बरे वाटले की पेशंट गोळ्या घेणे बंद करतात. (किंवा काय करायच्या इतक्या गोळ्या, पाचच द्या! असे फार्मासिस्टला सांगतात.) त्यामुळे अर्धवट उपचार होऊन ड्रग रेझिस्टंट बॅक्टेरिया म्युटेशन होते असा माझा आपला एक समज आहे.
बाकी, तुम्ही दिलेले इंजेक्शनचे तोटे मान्य आहेतच. निदान काही बॅक्टेरियल इन्फेक्शनसाठी तरी त्यांनी ते वापरायला हरकत नसावी. पण आता डॉक्टर्स इंजेक्शनचा पर्याय विचारात घेतच नाहीत की काय? अशी शंका येते.
तुलना
स्नायूत टोचलेले औषध पोटात गिळलेल्या औषधापेक्षा कमीच वेगाने मिळेल. सहज गूगलून मिळालेले एक संशोधनः D. J. Greenblatt
सर्व औषधे स्नायूंमध्ये देताही येत नाहीत.
शिवाय, त्याचा वेग नियमित करता येणार नाही. ओवरडोस झाला तर पोट धुता येईल. शिरेत सलाईनसोबत द्यावे लागल्यास एक-दोन तास पडून रहावे लागेल, शहरी रुग्णांना तितका वेळ नसेल.
--
डॉक्टरांनी शक्यतो प्रिस्क्रिप्शन लिहावे, स्वतः कंपाउंडिंग टाळावे असे निर्देश आता आहेत. इंजेक्शनचा वापर कमी होण्यात हेही कारण असू शकेल.
चिठ्ठ्या लिहिणे पोषाखी वाटल्यामुळेही इंजेक्शन देण्याचा उत्साह कमी झालेला असावा.
एका इंजेक्शनने उपचार होईल अशा अँटिबायोटिकच्या गोळ्या मात्र १० गिळाव्या लागतील असे मला वाटत नाही. इंजेक्शनचेही डोसही वारंवारच लागतील. नेमके उदाहरण आहे काय?
हे ही वाचा:
मायबोलीवरील चर्चा
माबोवरील चाणक्य अन येथील हे चाणक्य एकच काय?
डॉक्टरसाहेब तुमचे मत कुठे?
डॉक्टरसाहेब, दुव्यासाठी धन्यवाद. दुवे देण्यापेक्षा तुमचे मत द्या. चर्चा डॉक्टरांवर आहे. एक डॉक्टर असल्याने तुमचे मत बहुमूल्य आहे.
महोदय,
तुम्ही टंकीलेल्या भाषांतरीत विरोप/उतार्याचे मूळ इंग्रजी तिथे आहे. त्यावरील चर्चेतून् काय निष्पन्न झाले तेही आहे.
एकदा नजरेखालून घातलेत तर बरे.
दुसरे,
डॉक्टर या प्राण्याबद्दल तुमचे म्हणणे काय हे नीट लिहिलेत, (म्हणजे स्वतंत्रपणे. इतरांची मेल म्हणून नाही.) तर त्यावर माझी मते सांगणे सोपे होईल.
३६५ प्रतिसाद
३६५ प्रतिसाद आहेत तिथे. वाचताना धापा टाकल्या. डॉक्टरकडे जायची वेळ आली आणि हाती काहीच लागले नाही. हलकेच घ्या.
मी डॉक्टर या "प्राण्याबद्दल" काय लिहावे अशी तुमची अपेक्षा आहे? मी होतकरू डॉक्टरांचे मत सांगितले. ते मला काही प्रमाणात गंमतीशीर वाटले आणि काही प्रमाणात गंभीर वाटले. वाईट गोष्टी प्रत्येक व्यवसायात आहेत असे सांगून डॉक्टर जबाबदारी नाकारू शकत नाहीत असे माझे मत आहे. आमच्यावरच शस्त्र का उगारले; इतरांकडेही बघा असे म्हटल्याने हेल्थ केअरचे प्रश्न संपत नाहीत असे माझे मत आहे. कोणी तुमच्याकडे बोट दाखवले तर त्याचा मुकाबला यापेक्षा चांगल्या पत्राद्वारे होऊ शकतो असे माझे मत आहे पण मी डॉक्टर नसल्याने ते पत्र आणि त्यातील मुद्दे मांडू शकत नाही म्हणून डॉक्टरांचे मत बहुमूल्य आहे असे सांगितले.
डॉक्टर या नात्याने आपण चर्चेत सामील झालात. लोकांना उत्तरे दिलीत याबद्दल आभारी आहे.
मी डॉक्टर या "प्राण्याबद्दल" काय लिहावे अशी तुमची अपेक्षा आहे?
तुमचे स्वतःचे मत लिहावे असे वाटते. गमतीशीर काय वाटले? का? गंभीर काय आहे त्यात? हे सांगितलेत तर बोलता येईल.
याच्याशी मी १०,०००% सहमत आहे. किंबहुना आजकाल 'आधी त्यांना सांगा मग आमच्या चुका दाखवा' असला कांगावेखोरपणा जो जगात सुरू आहे, जो विषेशतः सगळ्या राजकीय पक्षांनी केलेला दिसून येतो, त्याला माझा संपूर्ण विरोध आहे.
हेल्थ केअरमधे प्रश्न काय आहेत, अन् त्यांचे नक्की कारण काय आहे, याच्या मुळाशी जाण्यात हा एपिसोड सर्वस्वी अपयशी ठरलेला आहे असे माझे मत आहे. फॉलो-अप मधे आलेल्या ३ डॉक्टरांना ज्याप्रमाणे मधेच थांबवून मुद्दे मांडू दिले जात नव्हते, व तरीही शेवटी जे काही बोलणे झाले ते सर्वांनी पाहिले असेलच.
असो. या मालिकेचा उद्देश सर्वात आधी 'मनोरंजन' आहे असे तिथे लिहून येते सुरूवातीला. नंतरचा दुसरा खाप पंचायत / ऑनर किलिंग प्रकारचा भाग आजच झालाय, त्यावर मतप्रदर्शने सुरू रहातील. जसे स्त्रीभ्रूणहत्या एपिसोड् पाहून इथे काडीचाही फरक पडलेला नाही, तसेच याने ही पडेल असे वाटत नाही.
गंभीर काय वाटले ते
गंमतीशीर काय वाटले ते जाऊ द्या, गंभीर काय वाटले ते सांगतो.
माझ्या माहितीले अनेक डॉक्टर सुखासीन आयुष्य जगतात. डॉक्टरांनी पैसे कमावण्याबद्दल माझी हरकत नाही पण "पैसे कमावण्यासाठीच हा व्यवसाय निवडावा" ही धारणा असेल तर मला ती गंभीर वाटते. जे व्यवसाय इतरांच्या जिवांशी निगडित आहेत. उदा - डॉक्टर, पोलिस, सैनिक इ. त्यांनी पैसे कमावण्यासाठी हे व्यवसाय निवडणे मला गंभीर वाटते पण साम्राज्यवाद नसावा असेही मला वाटते. जबरदस्ती नसावी पण लुटालूट नसावी असेही एक सामान्य पेशन्ट/ ग्राहक म्हणून वाटते.
आपली जबाबदारी नाकारून इतरांकडे बघा ही प्रवृत्ती मला गंभीर वाटली.
सुखासीन
सुखासीन म्हणजे कसे?
दिवसरात्र वेळीअवेळी उठून काम करणे म्हणजे सुखासीन असते का?
२-४ परदेशवार्या, घरी / ऑफिसात एसी, बर्याशा शाळेत शिकणारी मुले, म्हणजे सुखासीन होते काय? १२-१५ लाखाचे प्याकेज मिळविणारा इंजिनियर व डॉक्टर यांच्या सुखासीनतेत काही फरक असतो काय? तो पैसे मिळवायला सुरुवात वयाच्या कितव्या वर्षी करतो? त्यातही वेटींग पिरियड व डॉक्यावर कर्ज किती असते? एम्बीबीएसच्या प्रत्येक वर्षी किमान एक आत्महत्या अन् १०-१२ मुलांना सायकिऍट्रीक ट्रीटमेंटची गरज का लागते? इ. प्रश्न त्या सुखासीनतेत आहेत.
टोलेजंग(!) इस्पितळे खासगी मालकीची किती वेळा असतात? असलीच तर त्या डॉक्टरच्या डोक्यावर कर्ज किती रुपयांचे असते? इ. मुद्दे स्वतः डॉक्टर झाल्याशिवाय, वा जवळच्या नात्यात कुणी डॉक्टर बनण्याचा प्रयत्न केल्याशिवाय समजतही नाहीत.
अन् उदा. पुण्यातल्या १० डॉक्टरांचे इन्कम महिना २५ लाख असले, तरी पुण्यात १०,००० + डॉक्टर्स आहेत, त्यांच्या सुखासीनतेचे काय?
आता राहिला प्रश्न 'पोलिस' 'सैनिक'
(सैनिक म्हटले कि लगेच इमोशनल होतो माणूस. त्या ई-मोशन्स, थोडावेळ बाजूला ठेवू यात.
१. पोलिस कसे व किती पैसे "कमवतात" हे शिकण्यासाठी तुमच्या राशीला पोलीस येऊ नये अशी (असलाच, तर त्या) परमेश्वराकडे प्रार्थना करतो.
२. (आर्मी मेडिकल कोअरमधे डॉक्टर असतात हे तुम्हाला ठाऊक असेलच. एमबीबीएस कॅप्टनच्या रॅंकला अन् पोस्टग्रॅज्युएट कर्नलच्या पदाला असतो. यापैकी कोणत्या रँकचे किती लोक 'फिल्डवर' असतात, त्यांच्या 'जिवाला धोका' किती असतो, हे विचार करून मग पुढे : ) एकंदरीतच आर्मीच्या ऑफिसर केडर, त्यांचे पगार व एकंदर सुखासीनता किती असते, तसेच सर्विस कमिशन पूर्ण झाल्यानंतर आर्मीवाल्यांच्या 'कमाईचे' काय असते त्याचा विदा तुमच्याकडे असेलच. (आर्मीच्या कँटीनात दारू 'स्वत' मिळते, इतके तरी ऐकून ठाऊक असावे.)
'सैनिक' म्हणून मिल्ट्रीत जाणार्यांना खासगी सैनिक म्हणून व्यवसाय करायची मुभा अस्ते का? त्यांचे एकूणच बौद्धिक ट्रेनिंग हे डॉक्टरच्या ट्रेनिंगच्या इतकेच असते काय? जगात सर्वत्र मला तरी वाटते बौद्धीक दर्जा/श्रमांनुसार 'रेम्युनरेशन' ठरते. अन नोकरीतील डॉक्टरचा पगार हा सर्वत्र इतरांशी तुल्यबळ, किंबहुना किंचित् कमीच आहे.
३.
आता हा थोडा वेगळा प्रश्न. "जे व्यवसाय इतरांच्या जिवांशी निगडित आहेत."
रस्ता बांधणारा इंजिनियर. फ्याक्ट्रीत औषध बनिविणारा फार्मसिस्ट. टॉक्सिक कलर्स वापरून खेळणी बनविणारा व्यावसायिक. शेतकर्यांना (असली/नकली) खते, बियाणे, औषधे विकणारा विक्रेता, ग्यारेजात तुमची गाडी दुरुस्त करणारा मेक्यानिनक, इ.इ. कोणतीही बाब घ्या, ती इतरांच्या जीवाशी निगडीत नसते काय??
***
आता वरील पेशांत चोर लोकांचे प्रमाण किती? अन् डॉक्टरांत किती?
डॉक्टरांत चोर आहेत. त्यांना शिव्या/शिक्षा दिल्याच पाहिजेत. पण ज्या सगळ्या डॉक्टरकीचा पायाच विश्वासावर असतो, जो विश्वास कमवायला अर्धा जन्म खर्चावा लागतो, त्यावर असल्या अर्धवट माहिती देणार्या कार्यक्रामांतून शिंतोडे उडविणे चुकीचे आहे.
इतर व्यवसायांत इमानदारीने बक्कळ पैसे मिळतात, तसेच ते डॉक्टरलाही मिळतात. त्याचे पैसे/कमाई बेईमानीचे हे तुम्ही कशावरून म्हणताहात?
सबब,
सरसकटपणे डॉक्टर पेशाला धोपटणे चुकीचे आहे इतकेच म्हणतो.
जाते थे जापान, पहुंच गये चीन
दिवसरात्र वेळीअवेळी उठून काम करणे म्हणजे सुखासीन असते का?
२-४ परदेशवार्या, घरी / ऑफिसात एसी, बर्याशा शाळेत शिकणारी मुले, म्हणजे सुखासीन होते काय? १२-१५ लाखाचे प्याकेज मिळविणारा इंजिनियर व डॉक्टर यांच्या सुखासीनतेत काही फरक असतो काय?
हो यालाच मी सुखासीन म्हणतो. परदेशवार्या, घरी काम करायला नोकरचाकर, नवनवीन गाड्या, एकापेक्षा जास्त घर-फ्लॅट, फक्त डॉक्टर कष्ट करतात आणि बाकीचे मजा मारतात हा तुमचा समज गैरसमज आहे. अनेक डॉक्टर कॉस्मेटिक कंपन्यांपासून फार्मा कंपन्यात नोकर्या करतात. त्यांना इंजिनिअर्सपेक्षा जास्त मोबदला मिळतो वर घरगुती प्रॅक्टिस करून पैसे मिळवतात. अनेक इंजिनिअर्स कामानिमित्त प्रवास करतात, घराचे दर्शन होत नाही. परदेशाच्या वेळा सांभाळून कामं करतात. रात्री अपरात्री जागतात. तेही सुखासीन आयुष्यच जगतात.
मी स्वतः सेल्स विभागात आहे. मला पहाटे उठून विमान पकडून कुठेतरी परगावी दोन-चार दिवस वार्या कराव्या लागतात. परदेशवारी झाली तर जेटलॅग, वेदरचेन्जला तोंड द्यावे लागते, अतिप्रवासामुळे आजारीही पडतो म्हणून या गोष्टींचा कांगावा मी करत नाही.
एम्बीबीएसच्या प्रत्येक वर्षी किमान एक आत्महत्या अन् १०-१२ मुलांना सायकिऍट्रीक ट्रीटमेंटची गरज का लागते? इ. प्रश्न त्या सुखासीनतेत आहे
फक्त एमबीबीएसचीच मुलं आत्महत्या करतात यावर विश्वास नाही.
टोलेजंग(!) इस्पितळे खासगी मालकीची किती वेळा असतात? असलीच तर त्या डॉक्टरच्या डोक्यावर कर्ज किती रुपयांचे असते? इ. मुद्दे स्वतः डॉक्टर झाल्याशिवाय, वा जवळच्या नात्यात कुणी डॉक्टर बनण्याचा प्रयत्न केल्याशिवाय समजतही नाहीत.
अन् उदा. पुण्यातल्या १० डॉक्टरांचे इन्कम महिना २५ लाख असले, तरी पुण्यात १०,००० + डॉक्टर्स आहेत, त्यांच्या सुखासीनतेचे काय?
स्वतःचा व्यवसाय सुरु करतो तो प्रत्येकजण याच चक्रातून जातो. अशिक्षित माणसाने कर्ज काढून वडापावची गाडी टाकली तरी त्याच्या डोक्यावर कर्ज हे येणारच.
इ. मुद्दे स्वतः डॉक्टर झाल्याशिवाय, वा जवळच्या नात्यात कुणी डॉक्टर बनण्याचा प्रयत्न केल्याशिवाय समजतही नाहीत.
डॉक्टर आपण एकमेकांना ओळखत नाही त्यामुळे माझ्या नात्यात आणि घरात किती डॉक्टर्स आहेत याची कल्पना तुम्हाला नाही म्हणून यावर काही बोलत नाही.
पोलिस कसे व किती पैसे "कमवतात" हे शिकण्यासाठी तुमच्या राशीला पोलीस येऊ नये अशी (असलाच, तर त्या) परमेश्वराकडे प्रार्थना करतो.
हे तुमचे वाक्य "डॉक्टर कसे व किती पैसे "कमवतात" हे शिकण्यासाठी तुमच्या राशीला डॉक्टर येऊ नये अशी (असलाच, तर त्या) परमेश्वराकडे प्रार्थना करतो."
या वाक्यासारखेच बाष्कळ आहे म्हणून दुर्लक्ष करतो.
रस्ता बांधणारा इंजिनियर. फ्याक्ट्रीत औषध बनिविणारा फार्मसिस्ट. टॉक्सिक कलर्स वापरून खेळणी बनविणारा व्यावसायिक. शेतकर्यांना (असली/नकली) खते, बियाणे, औषधे विकणारा विक्रेता, ग्यारेजात तुमची गाडी दुरुस्त करणारा मेक्यानिनक, इ.इ. कोणतीही बाब घ्या, ती इतरांच्या जीवाशी निगडीत नसते काय?
वरच्या अनेक लोकांकडे मी देव किंवा रक्षणकर्ता म्हणून बघत नाही. त्यांचा माझ्याशी प्रत्यक्ष संबंधही येत नाही. त्यांचा माझ्या जिवाशी प्रत्यक्ष संबंध नाही. अप्रत्यक्ष आहे यावर सहमती नोंदवतो. मी ज्यांची उदाहरणे दिली त्यातले सैनिक शहरात भेटत नाहीत पण डॉक्टर आणि पोलिस यांच्याशी माझा प्रत्यक्ष संबंध येत असल्याने नागरिक म्हणून माझी त्यांच्याकडून जास्त अपेक्षा आहे.
आता वरील पेशांत चोर लोकांचे प्रमाण किती? अन् डॉक्टरांत किती?
डॉक्टरांत चोर आहेत. त्यांना शिव्या/शिक्षा दिल्याच पाहिजेत. पण ज्या सगळ्या डॉक्टरकीचा पायाच विश्वासावर असतो, जो विश्वास कमवायला अर्धा जन्म खर्चावा लागतो, त्यावर असल्या अर्धवट माहिती देणार्या कार्यक्रामांतून शिंतोडे उडविणे चुकीचे आहे.
इतर व्यवसायांत इमानदारीने बक्कळ पैसे मिळतात, तसेच ते डॉक्टरलाही मिळतात. त्याचे पैसे/कमाई बेईमानीचे हे तुम्ही कशावरून म्हणताहात?
असे कोणी म्हणले? आमीरने देशातले सर्व डॉक्टर चोर आहेत असे म्हणले का? तो तसा म्हणाला म्हणून सर्व पेशन्ट त्याच्या नादी लागले असे दिसले नाही. मला वाटत होते की मेडिकलचा स्टुडन्ट कांगावा करतो आहे पण तुमचा वरचा प्रतिसादही इतर व्यवसाय पाहा कसे भ्रष्टाचारी म्हणून आमच्याकडे बोट दाखवू नका असे म्हणणारा दिसतो.
तेव्हा माझ्याकडून रजा घेतो.
तुमची मते.
तुमची स्वतःची आहेत. ती तुम्ही तुमच्या अनुभवांतून बनविली आहेत व तुमच्या दृष्टीकोणातून योग्यच आहेत.
तुमचे शेवटचे वाक्य, पहिला भाग (माझ्या दृष्टीनेही) बरोबर् आहे.
दुसरा पार्ट, "तो कांगावा करतो आहे" याला काही ही आधार नाही (कुणाच्याच दृष्टीने, असे मला वाटते.). तरीही ते तुमचे मत तुमच्या दृष्टीने योग्य आहे.
असो.
वरच्या अनेक लोकांकडे मी देव किंवा रक्षणकर्ता म्हणून बघत नाही.
हे कळीचे वाक्य आहे साहेबा!
डॉक्टर हा माणूस आहे. देव नाही. असूही शकत नाही.
हे या जगातील डॉक्टर नसलेले लोक का मान्य करीत नाहीत???
२.
यातील सुखासीन हा शब्द मूळ विररोपात नाही. मूळ वाक्य पूर्णपणे असे आहे:
उगा आपल्या सोयीचे शब्द वापरून विपर्यस्त भाषांतर करणार्याचा निषेध! अन् वरून त्या विपर्यस्त शब्दांवरून चुकीचा निष्कर्ष काढत डॉक्टर्स 'सुखासीन' जीवन जगतात, हा बाष्कळ समज तुम्ही प्रचलीत करू इच्छित असाल तर् तुमचाही निषेध.
उगा आपल्या सोयीचे शब्द वापरून विपर्यस्त भाषांतर करणार्याचा निषेध! उगा आपल्या सोयीचे शब्द वापरून विपर्यस्त भाषांतर करणार्याचा निषेध! उगा आपल्या सोयीचे शब्द वापरून विपर्यस्त भाषांतर करणार्याचा निषेध! उगा आपल्या सोयीचे शब्द वापरून विपर्यस्त भाषांतर करणार्याचा निषेध! उगा आपल्या सोयीचे शब्द वापरून विपर्यस्त भाषांतर करणार्याचा निषेध! उगा आपल्या सोयीचे शब्द वापरून विपर्यस्त भाषांतर करणार्याचा निषेध! उगा आपल्या सोयीचे शब्द वापरून विपर्यस्त भाषांतर करणार्याचा निषेध! उगा आपल्या सोयीचे शब्द वापरून विपर्यस्त भाषांतर करणार्याचा निषेध! उगा आपल्या सोयीचे शब्द वापरून विपर्यस्त भाषांतर करणार्याचा निषेध! उगा आपल्या सोयीचे शब्द वापरून विपर्यस्त भाषांतर करणार्याचा निषेध! उगा आपल्या सोयीचे शब्द वापरून विपर्यस्त भाषांतर करणार्याचा निषेध! उगा आपल्या सोयीचे शब्द वापरून विपर्यस्त भाषांतर करणार्याचा निषेध!उगा आपल्या सोयीचे शब्द वापरून विपर्यस्त भाषांतर करणार्याचा निषेध!उगा आपल्या सोयीचे शब्द वापरून विपर्यस्त भाषांतर करणार्याचा निषेध!उगा आपल्या सोयीचे शब्द वापरून विपर्यस्त भाषांतर करणार्याचा निषेध!उगा आपल्या सोयीचे शब्द वापरून विपर्यस्त भाषांतर करणार्याचा निषेध!उगा आपल्या सोयीचे शब्द वापरून विपर्यस्त भाषांतर करणार्याचा निषेध!उगा आपल्या सोयीचे शब्द वापरून विपर्यस्त भाषांतर करणार्याचा निषेध!उगा आपल्या सोयीचे शब्द वापरून विपर्यस्त भाषांतर करणार्याचा निषेध!उगा आपल्या सोयीचे शब्द वापरून विपर्यस्त भाषांतर करणार्याचा निषेध!उगा आपल्या सोयीचे शब्द वापरून विपर्यस्त भाषांतर करणार्याचा निषेध!उगा आपल्या सोयीचे शब्द वापरून विपर्यस्त भाषांतर करणार्याचा निषेध!उगा आपल्या सोयीचे शब्द वापरून विपर्यस्त भाषांतर करणार्याचा निषेध!उगा आपल्या सोयीचे शब्द वापरून विपर्यस्त भाषांतर करणार्याचा निषेध!उगा आपल्या सोयीचे शब्द वापरून विपर्यस्त भाषांतर करणार्याचा निषेध!उगा आपल्या सोयीचे शब्द वापरून विपर्यस्त भाषांतर करणार्याचा निषेध!उगा आपल्या सोयीचे शब्द वापरून विपर्यस्त भाषांतर करणार्याचा निषेध!उगा आपल्या सोयीचे शब्द वापरून विपर्यस्त भाषांतर करणार्याचा निषेध!उगा आपल्या सोयीचे शब्द वापरून विपर्यस्त भाषांतर करणार्याचा निषेध! उगा आपल्या सोयीचे शब्द वापरून विपर्यस्त भाषांतर करणार्याचा निषेध! उगा आपल्या सोयीचे शब्द वापरून विपर्यस्त भाषांतर करणार्याचा निषेध! उगा आपल्या सोयीचे शब्द वापरून विपर्यस्त भाषांतर करणार्याचा निषेध! उगा आपल्या सोयीचे शब्द वापरून विपर्यस्त भाषांतर करणार्याचा निषेध! उगा आपल्या सोयीचे शब्द वापरून विपर्यस्त भाषांतर करणार्याचा निषेध! उगा आपल्या सोयीचे शब्द वापरून विपर्यस्त भाषांतर करणार्याचा निषेध!
बिनशर्त माफी
भाषांतर करण्याचीच आणि इतकं मोठं लिहिण्याची सवय नसल्याने डोक्यातले काही शब्द उतरले. सुखासीन हा शब्द भाषांतरात गेल्याबद्दल बिनशर्त माफी मागतो. मूळ पत्राचे भाषांतर करताना शब्दशः करायचे होते. करता करता इतका कंटाळलो की मग पुढे पाट्या टाकून संपवायला लागलो. सुरुवात सोडून इतर काही मुद्द्यातही असे शब्द गेलेले असू शकतात त्याबद्दल बिनशर्त माफी मागतो. माझ्या मनचे शब्द तेथे जाणे उचित नाही.
मला मूळ पत्राची लिन्क देणे बरे वाटले नाही म्हणून लिहित बसलो. कोणाला शक्य असल्यास ती द्यावी.
तुमच्या दुसर्या प्रतिसादाचे उत्तर स्वतंत्र देईन.
उपक्रमावर मला माझाच लेख संपादित करता येत नाही. संपादन मंडळाला विनंती की त्यांनी मुद्दा क्र. ५ मधील सुखासीन हा शब्द काढावा.
भावना आणि विश्वास !
ह्या चर्चेतील मुद्द्यांबद्द्ल सांगयाच झालं तर एकाही मुद्द्यात पाणि नाही.
ह्या आइवजी मी माझा अनूभव सांगतो :
मला लहान मुलगी आहे. तीच्या पहिल्या ६ महिन्यांच्या लसींचा खर्च २०-२५ हजार रुपये अला असून त्याच डॉ. कडे अजून मी ६ महिने गेलो तर कमीत कमी अजून ३० हजार रूपये लागतील.
आता आमची ही लाडकी लेक, तीला जर आवश्यक गोष्टींसाठी पैसे लागत असतील तर मी/माझी फॅमीली नाही कशी म्हणणार ?
इथे माझ्या भावनांचा आणि डॉ. वरील विश्वासाचा प्रश्न येतो. ह्याच वीक भावनांचा डॉ लोक फायदा घेतात असे वाटत आहे.
हा एपीसोड पाहून डॉ लोकांवर अन्धविश्वास ठेऊ नये येवढेच खरे.
---------------------
-धनंजय कुलकर्णी
माताबालसंगोपन.
शासनाने गर्भवती स्त्रियांच्या तपासणी, लसीकरण, पूरक आहार इ. सोबतच नवजात् शिशूंचेही लसीकरण, आजार निदान व नियंत्रण, इतकेच नव्हे तर या देशाची भावी पिढी कुपोषित नसावी म्हणून 'मिड् डे मील' सुरू केलेले आहे.
अक्षरशः कोट्यावधी रुपये, जे माझ्या ट्याक्स मधून सरकार् गोळा करते, ते या वरील बाबींसाठी खर्च होत असतात.
"धक्का"दायक बाब ही, की शासनाच्या या सेवेचा लाभ सोडून, तुम्ही कुणा कुडमुड्या डॉक्टरास इतके पैसे देता आहात.
ससून मध्ये नांव नोंदविले असतेत तर ५ रुपये प्रति महिन्यात् बाळंतपण झाले असते. नंतरचे लसीकरणही त्याच ५ रुपये प्रतिमाह खर्चात? वरून मुलगी झाली म्हणून तर सौं.चा सत्कार व साडीचोळीही मिळाली असती. श्या! तुम्हास व्यवहारज्ञान नाही हेच खरे.
अन् ससूनच्या दर्जाबद्दल बोलाल, तर भारतातील् सर्वोत्तम बालरोग विभाग तिथे आहे.
डोके चक्रावून टाकतील अश्या 'जेनेटिक' आजारांच्या निदान व गर्भावस्थेतच जेनेटिक मॉडिफिकेशन करण्याचे प्रयत्न करू शकेल अशीही उन्नत सोय तिथे आहे. बाहेर् पैसे देऊनही अशी सोय मिळत नाही.
पण हो!
व्हॅक्यूमक्लीनरचा 'निर्जंतुक' पाईप स्त्रीच्या योनीत घालून वरून ते व्हॅक्यूम क्लिनर पावसात भिजलेल्या गाडीच्या ब्याटरीवर् चालवून ते मूल बाहेर ओढून काढून, अन् मग इंटरनेटवरून आल् इस् वेल् म्हटल्यावर त्या बाळाला श्वास घेऊ देणारा अल्टीमेट आयायटी ट्रेण्ड श्रीश्रीबाळाजी सारखा विण्जीणेर् कम् डाक्टर् ज्यास्त असा तो साक्षात खान!
तो काय म्हणतोय??
"हा एपीसोड पाहून डॉ लोकांवर अन्धविश्वास ठेऊ नये येवढेच खरे."
नशीब माझं, सौंची डिलेवरी आमीरकडे नाही केलीत् तुम्ही..
जाऊ द्या.
बाळाच्या शाळेसाठी डोनेशन जमवायच्या पाठी लागा.;)
याच विषयावर
याच विषयावर एक बातमी आताच येथे वाचली.
जाऊ द्या हो.
मनोरंजन म्हणून सादर केलेल्या टीव्ही मालिकेत कुणी काय बरळतो त्याने अपमान व्हावा इतके डॉक्टर्स हलके नाहीत.
पण एक 'फॉर्मल' मागणी करून निषेध नोंदविला हे योग्यच केलेले आहे, असे माझे मत आहे.
:-)
असे कसे? चांगले आणि वाईट जसे सर्व क्षेत्रात असतात तसेच भारदस्त, खोल, गंभीर* आणि हलक्या व्यक्तीही सर्वच क्षेत्रात असतील ना. हलके डॉक्टर्स नसणे हे डॉक्टरांचे वैशिष्ट्य वाटत नाही. असो.
नक्कीच पण त्या पुढे जाऊन खरोखरीची लिगल ऍक्षन वगैरे घेण्याची त्यांनी तयारी दर्शवली आहे असे बातमी म्हणते ते मला अनावश्यक वाटले पण हे माझे वैयक्तिक मत झाले.
* वरल्या हलक्याच्या विरुद्ध चपखल शब्द न मिळाल्याने जे आठवले ते दिले.
हं.
अहो,
सरासरी ७० किलोच्या खालचा डॉक्टर पाहिला आहात् का कधी??
(हलके घ्या!)
अन् जे हलके, वा हलकट असतील, (अन् आहेतही.) त्यांच्या वतीने आयएमए कधीच काम करीत नाही, नव्हती, व करणारही नाही.
(आय.एम.ए. ऍक्टिविस्ट्) आडकित्ता.
हे खरं असेल...
:-) नाही म्हटलं तर इथेच उपक्रमावर मार पडेल.
ते खरं असेल. मी विश्वासही ठेवते पण ते डॉ. केतन देसाई आयएमएचेही प्रेसिडेन्ट होते असे वाचले आणि आमीरखानचे चित्रपट बॉयकॉट करण्याचे आवाहन करणे वगैरे फारच विनोदी वाटतंय.
चुकीची माहिती. अन् अवांतर् उत्तरः
केतन देसाई हे मेडिकल काऊन्सिल ऑफ् इंडियाचे प्रेसिडेंट होते.
आय एम् ए चे नाही.
या माणसाच्या घरात जितके सोने सापडले, तितके लोखंड मी माझ्या वडिलोपार्जित घराचे नूतनीकरण केले, त्यासाठी पाडलेल्या स्लॅबमधूनही निघाले नव्हते.
मेडीकल काउन्सिल, नर्सिंग काऊन्सिल, बार् काउन्सिल या प्रोफेशनल बॉडीज् आहेत्, ज्या त्या त्या व्यवसायिकांची 'एथिक्स्' 'रेग्युलेट्' करतात.
मेडिकल काऊन्सिल वर् गेली कित्येक वर्षे 'नियुक्त' लोकांचे राज्य होते. हे शासन नियुक्त केतन देसाई 'खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना' मान्यता देणाच्या प्रकरणांतून गब्बर झाले होते. आता खासगी मेडिकल कॉलेजे कुणाची, अगदी प्रवराची किंवा भारतीची 'डीम्ड्' युनिवर्सिटी सकट, हे तुम्ही गूगलून पहा, किंवा इतिहाससंशोधन करा. एम्.सी.आय्. रेकग्निशन शिवाय मेडिकल कॉलेज चालत नाही. तर, हे मेहता चोरी करताना सापडले, अन् नंतर् काउन्सिल सुधारल्या.
उदा. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलवर बसलेला प्रशासक गेला अन् निवडणूका झाल्या.
निवडुन आल्याबरोबर् एम्.एम्.सी.ने राबविलेला पहिला निर्णय काय आहे ठाऊक आहे?
प्रत्येक एमबीबीएस् डॉक्टरने रजिस्ट्रेशन रिन्यू करणे भाग आहे. दर ५ वर्षांनी. अन् त्या प्रत्येक वर्षी ६ क्रेडिट पॉईंट्स गोळा करणे आवश्यक. १ पॉईंट् = १ दिवसभर चालणारा कंटीन्यूड् मेडिकल एज्युकेशन प्रोग्राम, ज्यात उत्तम दर्जाचे अध्यापक प्र्याक्टीस करणार्या डॉक्टरांना नवे वैद्यकीय ज्ञान शिकवतील. असे कमीतकमी ६ पॉईंटस् गोळा करणे गरजेचे. ही रिन्युअल प्रक्रिया ३१ मार्चला संपली. लेटफी भरून जुलै अखेर पर्यंत सुरू आहे, पण् अजूनही अनेक डॉक्टर्स शैक्षणिक क्रेडिट्स गोळा करीत रजिस्ट्रेशन जपण्याचा प्रयत्न करीत आहेत. *(एक्सेप्शनल् कार्य करणार्या डॉ. आमटे, किंवा डॉ. बंग् यांच्या सारख्यांना असल्या अपडेटस् पासून् सूट आहे)
हा होता स्वतःची क्वालिटी सुधारण्याचा प्रयत्न. कुणीही बाहेरून दबाव न टाकता, 'निवडून' आलेल्या एम्. एम्. सी ने घेतलेला अतिशय लोक-'अ'-प्रिय निर्णय...
मुद्दा:
१ केतन देसाई किंवा १ मुंडे 'उत्पन्न' होतो, तेव्हांच, 'जाणून' घ्या, की १००० 'डॉक्टर' 'सेवा' करीत असतात. अन् त्यांना सामाजिक जाण, अन् जबाबदारीही असते. कुण्या सेलेब्रिटीने त्यांना 'नियत' शिकवली की लोक ज्या त्वेषाने अंगावर येतात, ते पाहून वाईट वाटते.
चुकीची माहिती? नाही बा!
रेडिफवरील डॉक्टर! हील दायसेल्फ या लेखात, विकीवरील या लेखात, जालावर शोध घेता लिन्क्ड इनवरील त्यांच्या प्रोफाइलमध्ये स्पष्ट लिहिलेले आढळले की २००१ ते २००२ मध्ये केतन देसाई आयएमएचे नॅशनल प्रेसिडेन्ट होते.
चांगल्या डॉक्टरांना असे कार्यक्रम बघून वाईट वाटणे शक्य आहे. अभियंत्यांचा दर्जा खालावला आहे हे वाचून मला दर्जा खालावल्याचे वाईट वाटते; लोक बोलतात त्याचे वाईट वाटत नाही कारण काही प्रमाणात का होईना दुर्दैवाने ते सत्य आहे आणि ते कोणा आमीरने सांगायची गरज नाही. असो. १ केतन देसाई आणि १ मुंडे उत्पन्न होतो हे बरोबर पण बाकीचे १०० सेवा देताना त्यातले १० तरी ( हा आकडा उदाहरणापुरता आहे. प्रत्यक्षात तो कमी-जास्त असू शकतो.) कट-प्रॅक्टीस, महागडी औषधे रिफर करणे, कमिशन घेणे असे प्रकार करत असतात ना. त्यासाठी सेलिब्रिटीने नियत शिकवायची गरज नाही, हं कदाचित कार्यक्रम बघून लोकांची आठवण जागी झाली असेल किंवा भीड चेपली असेल इतकेच.
बाकी, मला तरी हा कार्यक्रम पाहून कोणी लोक त्वेषाने डॉक्टरांच्या अंगावर गेलेले दिसले नाहीत. या चर्चेतही नाहीत. जिथे तिथे डॉक्टरांचेच लेख आणि निषेधपत्रे, बहिष्काराची भाषा वगैरे दिसत आहेत.
जाता जाता, रेडिफवरील लेख मला आवडला.
हं. विकीवर आहे म्हण्जे खरेच् असेल.
तुमचे खरे. (बा़की त्याच काळात मी सेक्रेटरी होतो आयएमए चा. केतन देसाई हे नांव ऐकिवातही नव्हते.)
हे विकीवरील वाक्य. नॅशनल प्रेसिडेंट होते की नाही ठाऊक नाही. तुम्ही म्हणताहात तर असतीलही. प्रत्येक तालुक्याच्या गावीही आयएमच्या ब्रांचचा प्रेसिडेंट असतो/असते.
असो.
हे, अवांतर आहे पण अन् नाही पण.
एक सांगा? उसगांवात (युनाईटेड स्टेट्स् ऑफ् अमेरिका) वार्षिक 'मेडीकल इन्शूरन्स'चा हप्ता, (तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना 'रिझनेबली सेफ' वाटेल इतक्या धनराशीच्या साठीचा) किती असतो? डॉलरमधे व तेच रुपयांत किती होईल? गूगलून पाहिले आहे, पण 'फर्स्ट हँड इन्फरमेशन' हवी म्हणुन विचारतो आहे.
:-)
खुद्द केतन देसाईंच्या लिन्क्ड इनच्या प्रोफाइलची लिंक असतानासुद्धा (त्यातच ते किती वर्षे आणि कधी नॅशनल प्रेसिडेन्ट होते ते दिले आहे.) विकीची लिंक मुद्दाम दिली होती. तुम्ही ती नक्की उचलाल असा गेस होता. :-) फारच ह. घ्या. केतन देसाई आयएमएचे नॅशनल प्रेसिडेन्ट असण्याची बतावणी करत असतील तर आयएमएने त्यांच्यावर आक्षेप घ्यायला हवा असे मला वाटते. पण असो.
घसघशीत आहे पण उच्चमध्यमवर्गीय/ मध्यमवर्गीयांना परवडण्यासारखा आहे. पुढचे डिटेल्स जाहीर देत नाही. रुपयात कन्वर्ट केल्यास, भारतातील उच्चशिक्षितांना परवडेल असाच आहे.
युक्तिवाद
लोकांना अक्कल शिकविण्यासाठी रिचर्ड डॉकिन्स, बिल माहर, इ. लोकसुद्धा सशुल्क दुनियादारी करतात. मात्र, त्यात अण्णा हजारे टाईप 'जग बदलू(या)' भाबडे/ढोंगी आवाहन नसते. स.ज.च्या शीर्षकगीतात 'तू', 'तूने', इ. शब्द वारंवार आहेत, ते नेमके कोणाला उद्देशून आहेत?
इतकी अधिक फी बाकीच्या अभ्यासक्रमांना नाही असे माझे निरीक्षण आहे. शिवाय, इतर व्यवसायांमध्ये गैरव्यवहार नाहीत असे प्रतिपादन त्याने केलेले नाही.
एका टोकाला 'वैद्यो नारायणो हरि' (या श्लोकाचा एक अर्थ लावला तर डॉक्टरला देव म्ह्टले आहे) आणि दुसर्या टोकाला 'नमस्तुभ्यम् यमराजसहोदर:' अशी दोन्ही मते समाजात प्रचलित आहेत.
तरीही, सरकारी नियंत्रण कमी असल्यामुळे स्वार्थ बोकाळला हा निष्कर्ष योग्य वाटतो.
राजकारण्यांना'सुद्धा' ठीक आहे, राजकारण्यांना'च' का? डॉक्टरांना'सुद्धा' का नको?
सहकुटुंब परदेशसहल, कार, इ. प्रकार खात्रीच्या ऐकिवात आहेत.
'फक्त' पैशांसाठी नको, खूऊऊउप खाऊ नका, इ. म्हणाला असे जाणवले. नारायण हृदयालयचे उदाहरण देताना त्याच्या संचालकांकडून त्याने ग्वाही दिली की ते सुस्थितीत आहेत.
'काय काय' प्रकारचे मला काहीच करावे लागले नाही, सीईटीतून विनायास प्रवेश मिळाला. नाशिकला प्रवेशप्रक्रिया होती, डोक्याला काहीच काळजी नव्हती. आदल्या दिवशी वडिलांसोबत नाशिकच्या थेटरात मेट्रिक्स बघितला (आणि तो मला समजला). केईएम मिळणार नव्हते हे आधीच दिसत होते, नकोही होते. "उनाडक्या करायच्या असतील तर माझ्याप्रमाणे जेजे घे" हा वडिलांचा सल्ला आवडला. इंजिनिअर औषधे देऊ शकत नाही, काँप्युटर शिकणे डॉक्टरला शक्य असते आणि रिसेशनमध्येही टपरी टाकून आरामात जगता येते हे धोरण होते. फी रोजच्या प्रवासखर्चापेक्षा थोडीच अधिक होती.
उलट, कोटा फॅक्ट्रीतही खूप मुले आयआयटीसाठी घासतात, आयएएससाठीही काहीतरी असेलच.
'डॉक्टर व्हा' असा आग्रह सरकार करीत नाही, चपला घालण्याचे स्वातंत्र्य आहेच.
हा मोठाच अन्याय असला (आणि तो दूर होणे आवश्यक असले) तरी याचे मूळ असे असावे की 'समाजाचे ऋण' इ. कल्पना सरकारला मान्य होत्या तेव्हा डॉक्टरी हाच व्यवसाय सरकारी शिक्षणावर आधारित प्रतिष्ठित व्यवसाय होता. आयआयटीची फी तेव्हा जरा अधिकच होती (आता ती कमी आहे परंतु आता समाजाचे ऋण कल्पना बाद आहे).
असे अनेक अन्याय असतात. पूर्वी रेल्वे खासगी होती म्हणून आताही रेल्वे कर्मचार्यांना सहकुटंब विनाशुल्क प्रवासाची अनुमती असते. पोस्टखाते कायमच सरकारी असल्यामुळेच की काय, वैयक्तिक पत्रे नॉटपेड पाठविण्याचा हक्क पोस्टमनला नसतो.
(पाच वर्षे परदेशात न जाण्याचा बाँड आम्हालाही होता.)
+१
होय. चांगली सरकारी देखरेख आणि जागरूकता हे उपाय आहेत असे मला वाटते.
--
मुळात, 'सर्वांना समान उपचार' ही संकल्पना समाजवादी नाही तर साम्यवादी आहे. किमान पातळी ठरवून तेथपर्यंत आणून सोडण्यात येईल, पुढील सेवा ऐपतीप्रमाणे मिळवाव्या हे धोरण मला विवेकी वाटते.
जनरिक औषधाचा मुद्दा योग्य आहे. मात्र, 'सर्वांसाठी सक्तीचा विमा' ही आता येऊ घातलेली संकल्पना केवळ काही लॉब्यांच्या हिताची आहे, कोणतेही जेवण फुकट नसते.
--
कट प्रॅक्टिस आकाशातून पडत नाही. डॉक्टरांना जितके पैसे हवे असतील त्यानुसार ते मार्ग शोधतील. कट वर बंदी घालणे सफल झाले तर ते थेट फीच वाढवतील आणि ते शक्य झाले नाही तर प्रवेशासाठीचा ओघ आपोआपच कमी होईल.
वाचले.
यात युक्ती कोणती अन् वाद कोणता हे जरा इस्कटून सांगाल तर ते मला पामराला थोडे समजेल असे वाटते. काहीसे 'डबल ढोलकी' ऐकल्यागत झाले, म्हणून विचारतो आहे.
म्हणजे नक्की कुणाच्या बाजूने काय बोलताहात?
बाकी 'विनायास सीईटीतून ऍडमिशन मिळणारच होती' हे आवडले. हुश्श्शार दिसता. माझेही तसेच होते, पण आमच्या काळी सीईटी नसे.. ती 'विनायास' ऍडमिशन किती सहज होती याचा खुलासेवार खुलासा केलात तर बरे होईल. सीईटीत 'सहज' काही 'करता' येत असेल असे वाटत नाही म्हणुन विचारले.
***
देशातील आरोग्यसेवा चिंताजनक आहे असे तुम्हाला वाटते का?
होय. चांगली सरकारी देखरेख आणि जागरूकता हे उपाय आहेत असे मला वाटते.
हे आपण विनोद म्हणून लिहिले आहात काय? कोणत्याही सेवेतली सरकारी देखरेख नक्की काय करते याची कल्पना आपल्याला असावी असे वाटते. उदा. एक बातमी आजच वाचली, 'कॉर्पोरेट् संस्थांनी त्यांच्या नफ्यातील् ३% पैसा सार्वजनिक् हितासाठी दान करावा' अशी सक्ती करणारा कायदा करण्याच्या शिफारशीबद्दल आहे.
:)
हम साईंस के तरफ से हैं|
आदल्या वर्षी नुस्ते प्रवेशअर्ज विकून महाराष्ट्र आयुर्विज्ञान विद्यापीठाने ५० कोटी ते १०० कोटी रुपये खाल्ले (इमारत बांधण्यासाठी आम्हाला अर्ज विकून शंभर कोटी मिळविले ते वेगळे) आणि प्रवेश बारावीच्या गुणांवरूनच दिले. अशा विद्यापीठाच्या सीईटीत पहिल्या वर्षी प्रश्न मात्र चांगले (बहुदा आऊटसोर्सिंग करून मिळविले असावेत) होते, नंतरच्या वर्षांना घोकंपट्टीवाले प्रश्न येऊ लागले असे दिसले होते. आयआयटी धनबाद/गुवाहाटी मिळेल इतपत माझा अभ्यास झालेला असल्यामुळे या सीईटीचे प्रश्न मला सोपे वाटले. मुलांची तयारी करून घेणारे क्लासही फार कुशल नव्हते. योग्य उत्तराला १ गुण आणि चुकीच्या उत्तराला -०.२५ गुण असा नियम असल्यामुळे मी सारेच प्रश्न उत्तरिले होते. अनेक मुलांनी न जमणारे प्रश्न अनुत्तरित ठेवले होते, संभाव्यताशास्त्राच्या मूलभूत संकल्पना न समजलेली काही मुले माझी सहाध्यायी होती म्हणजे बघा!
प्रतिसाद आवडला आणि पटला.
एम् सी आय च्या चेअरमनला "कोड ऑफ मेडीकल इथिक्स" वाचून दाखवून त्यांचं उल्लंघन करणार्या डॉक्टरांवर कारवाई (*एकाही डॉक्टरवर कायमस्वरोपी बंदी आणली नाही) का केली नाही? असा साधा प्रश्न विचारल्यावर त्याची भंबेरी उडत असेल तर बाकीची चर्चा आणि डॉक्टरांच्या बाजूने होणारा युक्तिवाद व्यर्थ आहे.
*मागच्या पण्णास वर्षात किती डॉक्टरांवर कायम स्वरूपी बंदी आणली? या माहितीच्या अधिकाराखाली मागवलेल्या प्रश्नाला एम्सीआय कडून मागच्या चार वर्षात एकही नाही असं उत्तर आलं म्हणे, त्यामुळे त्याअधिही नाही असं म्हणायला जागा आहे.
एम् सी आय ची साईट
प्रकाटाआ..