पेट्रोलची दरवाढ रोखता येणे शक्य आहे का?

पेट्रोलच्या दरवाढीने सर्वांचा भडका उडालेला आहे. पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर साडेसात रुपयांची वाढ झाल्याची बातमी किंचित जुनी झाली. जागतिक बाजारपेठेतील घडामोडी पाहता भाववाढ होणार होती पण ती फार मोठी भासल्याचे कळते.

मटामध्ये म्हटल्याप्रमाणे -

बुधवारी मध्यरात्रीपासून लागू झालेल्या या दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोलचे दर ८ रु. ५४ पैशांनी वाढून ७८.५७ रु.वर पोहोचले आहेत.

जनहिताचे चांगले निर्णय घेण्याचा संदेश यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मंगळवारीच दिला होता. पण दुस-याच दिवशी, बुधवारी पेट्रोलच्या जम्बोवाढीची भर पडली. केंद्र सरकारने जून, २०१०पासून पेट्रोलचे दर नियंत्रणमुक्त केले होते. त्यानंतर पेट्रोलची झालेली ही सर्वात मोठी दरवाढ आहे. यापूर्वी ४ नोव्हेंबरला पेट्रोलची दरवाढ झाली होती. मात्र त्यानंतर आलेल्या पाच राज्यांच्या निवडणुका, अधिवेशन यामुळे लांबणीवर पडलेली दरवाढ अखेर बुधवारी जाहीर करण्यात आली.

यावरून काही प्रश्न पडले -

  1. दरवाढीसाठी वर्षातून एकदा इ. असे निश्चित वेळापत्रक हवे का?
  2. रुपयाचे अवमूल्यन आणि इतर जागतिक कारणे या दरवाढीस कारणीभूत आहेत की सरकारची बदलती धोरणे?
  3. पेट्रोलसोबत कुकिंग गॅस आणि डिझेलचे दर लवकरच वाढतील असे वाटते का?
  4. या दरवाढीची झळ मध्यमवर्गाला नाकाला फेस आणेल अशी आहे का?
  5. फिस्कल डेफेसिट कमी करण्यासाठी दुसरे काही उपाय आहेत का?

Comments

उत्तरे

>> दरवाढीसाठी वर्षातून एकदा इ. असे निश्चित वेळापत्रक हवे का?

वर्षातून एकदा म्हणजे दरवाढ आणखी मोठी असू शकेल.

>> रुपयाचे अवमूल्यन आणि इतर जागतिक कारणे या दरवाढीस कारणीभूत आहेत की सरकारची बदलती धोरणे?

रुपयाचे अवमूल्यन हे एक कारण आहे. जागतिक बाजारातील क्रूड तेलाचे भाव हे मुख्य कारण आहे.

>> पेट्रोलसोबत कुकिंग गॅस आणि डिझेलचे दर लवकरच वाढतील असे वाटते का?

कल्पना नाही.

>> या दरवाढीची झळ मध्यमवर्गाला नाकाला फेस आणेल अशी आहे का?

नाही. नाकाला फेस वगैरे तर अतिशयोक्तीच.

>> फिस्कल डेफेसिट कमी करण्यासाठी दुसरे काही उपाय आहेत का?

कल्पना नाही. (मुळात गॅस आणि रॉकेलवरील सबसिडी एकूण जीडीपीच्या किती टक्के आहे?)

एक तुलनात्मक तक्ता.

जितक्या प्रमाणात क्रूड तेलाची (रुपयातील) किंमत वाढते तितक्या प्रमाणात पेट्रोलची किंमत वाढत नाही असे दिसते.

नितिन थत्ते

पण लक्षात कोण घेतो!

श्री. थत्ते ह्यांना तक्त्यासाठी धन्यवाद. त्यांनी वर दिलेला तक्ता बघता यूपीए सत्तेवर आल्यावर आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाची दर रालोआच्या वेळच्या तुलनेत दुपटीहून थोडे जास्त (13.31 विरुद्ध 36.31 डॉलर प्रती बॅरल) झाले होते. ते बघता यूपीएने किमान दुप्पट दरवाढ करायला हवी होती. म्हणजे आज जेवढा पट्रोलदर आहे जवळपास तेवढाच तेव्हा असायला हवा होता. असो. ज्यांना हवे ते लाभत असते ते जास्त जोरजोरात बोंबलत असतात!

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

माझ्यामते

दरवाढीसाठी वर्षातून एकदा इ. असे निश्चित वेळापत्रक हवे का?
नको.

रुपयाचे अवमूल्यन आणि इतर जागतिक कारणे या दरवाढीस कारणीभूत आहेत की सरकारची बदलती धोरणे?
ह्याबाबतीत अनेक मते आहेत. ती वाचून एवढे माझ्यासारख्याला एवढेच वाटले की जागतिक कारणे, रुपयाचे अवमूल्यन आणि सरकारचे मिसमॅनेजमेंट ह्या सगळ्या गोष्टी कारणीभूत असाव्यात. भारत जगापासून इन्सुलेटेड नाही हे खरे.

पेट्रोलसोबत कुकिंग गॅस आणि डिझेलचे दर लवकरच वाढतील असे वाटते का?
श्रीमंतांच्या चार चाकींसाठी डिझेलचे दर वाढवायला हवे. कुठलेही दर वाढवताना गरीबी रेषेखाली जगणाऱ्यांचा विचार करायला हवा.

या दरवाढीची झळ मध्यमवर्गाला नाकाला फेस आणेल अशी आहे का?
थत्त्यांशी सहमत आहे. फेसबुकीय/संस्थळीय आक्रोश अजून जाऊन बघितलेला नाही. ती मजा वेगळीच. पण ही दरवाढ न केल्यास सरतेशेवटी महागाई आणखी मोठ्या प्रमाणात वाढेल असेही एक मत आहे. खरे खोटे थत्त्यांना माहीत.

फिस्कल डेफेसिट कमी करण्यासाठी दुसरे काही उपाय आहेत का?
सरकारचा खर्च कमी करायला हवा, सगळ्या सबसिड्या कमी करायला ह्व्यात असे तज्ज्ञ म्हणतात. त्यात तेलावरील सबसिडीही आली. अर्थात खरे खोटे थत्त्यांना माहीत.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

माझी मते

1.दरवाढीसाठी वर्षातून एकदा इ. असे निश्चित वेळापत्रक हवे का?

वर्षातून एकदा इतक्या कमीवेळाचे नाही मात्र एक ठोस फ्रिक्वेन्सी असावी. जसे आठवड्यातून दर शनिवारी, किंवा दररोज रात्री १.०० वाजता किंवा महिन्यातल्या चौथ्या शुक्रवारी इत्यादी. त्यामुळे नियोजन करणे सोपे जाईल.

2.रुपयाचे अवमूल्यन आणि इतर जागतिक कारणे या दरवाढीस कारणीभूत आहेत की सरकारची बदलती धोरणे?

हे सर्व. त्याच बरोबर पर्यायी इंधनाचा अभाव आणि अपारंपरिक उर्जास्त्रोतांच्या वापराचा आणि त्यावर आधारित आर&डी चा अभाव

3.पेट्रोलसोबत कुकिंग गॅस आणि डिझेलचे दर लवकरच वाढतील असे वाटते का?

राष्ट्रपती निवडाणूकांपर्यंत वाढणार नाहीत असे म्हणता यावे.

4.या दरवाढीची झळ मध्यमवर्गाला नाकाला फेस आणेल अशी आहे का?

शहरी मध्यमवर्गाला झळ बसेल. फेस येईल इतकी निश्चित नाही

5.फिस्कल डेफेसिट कमी करण्यासाठी दुसरे काही उपाय आहेत का?

दुसरे उपाय स्वतःहून सांगण्याइतका अभ्यास नाही.

समांतरः पेट्रोलची दरवाढ ही तुमच्या गाडिची वहनक्षमता किती (किती व्यक्ती) याच्या व्यस्त प्रमाणात असावी असे वाटते. स्कूटरर्स, रिक्षा साठी सर्वाधिक दरवाढ त्यानंतर कार वगैरे आणि सर्वात कमी दरवाढ बसेससाठी

ऋषिकेश
------------------
<<स्वाक्षरी निद्रीस्त आहे>>

पडलेल्या प्रश्नांची उत्तरे

>>दरवाढीसाठी वर्षातून एकदा इ. असे निश्चित वेळापत्रक हवे का?
नको, ते यदृच्छीक असावे, अनिश्चिततेमूळे काळाबाजार कमी होईल.

>>रुपयाचे अवमूल्यन आणि इतर जागतिक कारणे या दरवाढीस कारणीभूत आहेत की सरकारची बदलती धोरणे?
भारत आणि चीन फार तेल पितात म्हणून आंतरराष्ट्रीय दबावातून दर वाढले असावेत (संदर्भ - "माझी कॉन्स्पिरसी थेअरी")

>>पेट्रोलसोबत कुकिंग गॅस आणि डिझेलचे दर लवकरच वाढतील असे वाटते का?
रुपया वधारला नाही तर जास्त वाढतील अन्यथा कमी वाढतील.

>>या दरवाढीची झळ मध्यमवर्गाला नाकाला फेस आणेल अशी आहे का?
पेट्रोल दरवाढीमुळे, मध्यमवर्गीय पित असलेल्या बिअरचा फेस कमी होऊन नाकापर्यंत येणार नाही.

>>फिस्कल डेफेसिट कमी करण्यासाठी दुसरे काही उपाय आहेत का?
सरकारने निदान २% काळा पैसा(स्विस वगैर वाला) मार्केट मधे ओतावा.

काही प्रश्नांना उत्तरे नसतात!!!

1. दरवाढीसाठी वर्षातून एकदा इ. असे निश्चित वेळापत्रक हवे का?
वर्षातून एकदा शक्य वाटत नाही पण महिन्याच्या एका निश्चित तारखेला वर्षातून किमान चारवेळा तरी असे करणे शक्य आहे.
पण जे सरकार अनेक वरिष्ठांच्या जन्म तारखेची, प्रलंबित खटल्यांच्या तारखांची, घोटाळ्यातील नेमक्या रकमांची, किमान स्वताच्या अस्तित्वाची शाश्वती देऊ शकत नाही ते सरकार जनतेला इंधन दरवाढीच्या एका निश्चित तारखेचे काय वेळापत्रक देणार?

2. रुपयाचे अवमूल्यन आणि इतर जागतिक कारणे या दरवाढीस कारणीभूत आहेत की सरकारची बदलती धोरणे?
रुपयाचे अवमूल्यन मुळात एवढे जलद का होते आहे, त्याचे परिणाम कोणते ह्याबद्दल कोण सांख्यिकीय तज्ञ किंवा अर्थ तज्ञ संशोधन करीत आहेत?
कदाचित ह्या देशात तज्ञांची मते कधी विचारात घेतली जात नाहीत किंवा घेतली जात नसतील यास्तव कोणी तज्ञ उपायांबाबत ब्र काढत नसतील.
कदाचित बहुतेक तज्ञ आपल्या स्वताच्या portfolio ला वाचवण्याचा जास्त विचार करीत असतील?
(मंदीच्या काळात किती सांख्यिकी / अर्थ तज्ञांनी स्वताचा portfolio वाचविला, किमान टिकविला ह्याबद्दल माहिती मिळाली तर ज्ञानात भर पडेल)

असे कोणते जागतिक कारण उरले आहे, लहान किंवा मोठे, ज्याचा भारतावर परिणाम होत नाही, जगात कुठेही काहीही झाले कि कदाचित आपल्या इथेच जास्त प्रतिकिया उमटत असतील. आपल्या देशातील बातम्यांबद्दल विचारशून्य होणे आणि इतर देशातील बातम्यांबद्दल अतिविचारी होणे ह्याची सध्या फ्याशन आहे.

ज्या देशाला आपल्या संविधानातील किमान मूलभूत धोरणांची किमान अंबलबजावणी करण्यास साठ वर्षे गेली आणि त्यातील बहुतेक वर्षे ह्याच पक्षाचे सरकार होते ते काय आता धोरण बदलणार. (पक्षाबद्दल/सरकारबद्दल कोणताही वैयक्तिक आकस नाही)

3. पेट्रोलसोबत कुकिंग गॅस आणि डिझेलचे दर लवकरच वाढतील असे वाटते का?
डिझेलचे दर तर वाढतीलच, कुकिंग गॅसचे देखील काही दिवसात वाढतील.
काही पर्याय आहे का आपल्याला मिळेल त्या किंमतीला विकत घेतल्या शिवाय?
आपल्याकडे थोडीच लाल दिव्याची गाडी आहे जनतेच्या पैशातून डिझेल आणि कुकिंग गॅसची चैन करायला तीही विनामूल्य.

4. या दरवाढीची झळ मध्यमवर्गाला नाकाला फेस आणेल अशी आहे का?
आपल्याला सर्वांना असे का वाटते कि ह्याचा त्रास मध्यमवर्गाला होणार नाही. इथे सारे सदस्य अति श्रीमंत किंवा उच्च वर्गातील आहेत कि काय? (मंडईतील वस्तूंचे दर कुठे गेले आहेत ह्याची आपणास अजिबात कल्पना नसेल असे वाटत नाही तरी?)
साऱ्या मध्यमवर्गीयांनी सरसकट बीअर पिण्यास ती एवढी स्वस्त आहे कि काय (मला माहित नाही) कि दर वाढीने काही फरक पडणार नाही.

5. फिस्कल डेफेसिट कमी करण्यासाठी दुसरे काही उपाय आहेत का?
उपाय ढीगभर असतील आणि आहेत पण त्यांना कोण अंमलात आणणार. राष्ट्रीय काय किंवा महाराष्ट्रीय काय कोणताही पक्ष ह्यावर तटस्थ दृष्टीने विचार करणे शक्य नाही.

(विनंती - जे सुचले ते विचार करून पण स्पष्टपणे लिहिले, कोणास दुखावण्याचा हेतू नाही. धन्यवाद)

उत्तरायण

दरवाढीसाठी वर्षातून एकदा इ. असे निश्चित वेळापत्रक हवे का?
नसावे. सरप्राईजमधे मजा असते.

रुपयाचे अवमूल्यन आणि इतर जागतिक कारणे या दरवाढीस कारणीभूत आहेत की सरकारची बदलती धोरणे?
'जागतिक बाजारात तेलाच्या किंमती' असे एक कारण आम्हाला वारंवार सांगण्यात येते.
'सोनिया/मनमोहन सरकारचा मनमानी / भ्रष्टाचारी / नियोजनशून्य कारभार' असे एक दुसरे कारणही वारंवार कानी पडते.

पेट्रोलसोबत कुकिंग गॅस आणि डिझेलचे दर लवकरच वाढतील असे वाटते का?
असे वाटत नाही. पण समथिंग इज कुकिंग असे कानी आले आहे.

या दरवाढीची झळ मध्यमवर्गाला नाकाला फेस आणेल अशी आहे का?
जनरली तोंडाला फेस येतो, नाकाला फेस येण्याची फारशी उदाहरणे ऐकली नाहीत. त्यामुळे येणार नाही असे वाटते.

फिस्कल डेफेसिट कमी करण्यासाठी दुसरे काही उपाय आहेत का?
'फिस्कल डेफिसिट' शब्द अद्याप गुगल केला नाही, त्यामुळे कल्पना नाही.

अरे वा !!!

>>'सोनिया/मनमोहन सरकारचा मनमानी / भ्रष्टाचारी / नियोजनशून्य कारभार'

यांच्या कारभारामुळे न्यूयॉर्क किंवा इतरत्रच्या कमोडिटी एक्सचेंजमध्ये तेलाचे भाव वाढतात म्हणजे शॉल्लेट पावरबाज लोक दिसतात हे.

नितिन थत्ते

व्हय

लै पावरबाज लोकंच हैत. अहो ते फक्त आमआदमीचा विचार करतात. आता हा आमआदमी कोण हे शोधतोय सध्या. बाय द वे, असं ऐकला आहे की पेट्रोलवर लावले जाणारे टॅक्स सुद्धा खुप जास्त आहेत. न्यूयॉर्क किंवा इतरत्र कसे असते हो? तिथे केंद्र सरकार पासून गल्लीतला नगरसेवक सुद्धा टॅक्स लावतो का हो पेट्रोलवर?

केंद्र ते गल्लीतला नगरसेवक

या दुव्यावरून असे दिसते की अमेरिकेतसुद्धा केंद्रसरकार आणि राज्यसरकारे वेगवेगळे कर लावतात. कराच्या प्रमाणाबाबत वाद असू शकेल. (गल्लीतला नगरसेवक भारतातही टॅक्स लावत नाही. भारतात जकात ही फक्त महाराष्ट्रातील काही शहरांतच लावली जाते. उर्वरित भारतात जकात लावली जात नाही. जकात न लावणार्‍या शहरात आणि जकात लावणार्‍या शहरांत पेट्रोलच्या किंमतीत विशेष फरक असत नाही. जकात आकारणार्‍या मुंबई-ठाण्यात पेट्रोलचे दर जकात न आकारणार्‍या बंगलोरपेक्षा कमी आहेत).

या दुव्यात अमेरिकेत पेट्रोलच्या किमतीत अंतर्भूत असलेल्या छुप्या सबसिडीचा उल्लेख आहे. म्हणजे या लेखात दिलेल्या कृती केल्याने अमेरिकेला (वाटेल तितके छापलेल्या) अमेरिकन डॉलरमध्ये तेल मिळवता येते. पण या कृतींची किंमत पेट्रोलच्या दरात रिफ्लेक्ट होत नसते.

नितिन थत्ते

कर

कराच्या प्रमाणाबाबत वाद असू शकेल.

कसला वाद बरे? असे वाद घालण्यासारखे कर आहेत तरी काय?


कर

तुमच्या आधीच्या प्रतिसादात अमेरिकेत केंद्रसरकारपासून गल्लीतला नगरसेवक पेट्रोलवर टॅक्स लावतो का? अशा प्रकारचा प्रश्न होता. त्यावर अमेरिकेत केंद्रसरकार आणि राज्यसरकारे आपापले वेगवेगळे टॅक्स लावतात याची माहिती दिली होती.

त्यांनी लावलेल्या वेगवेगळ्या कराचे प्रमाण आणि भारतात लावलेले कराचे प्रमाण यावर वाद होऊ शकेल असे म्हटले आहे.

नितिन थत्ते

कर

त्यांनी लावलेल्या वेगवेगळ्या कराचे प्रमाण आणि भारतात लावलेले कराचे प्रमाण यावर वाद होऊ शकेल असे म्हटले आहे.

असा वादाचा मुद्दा काय आहे तेच तर जाणून घ्यायचे आहे? तेवढेच आमचे सामान्य ज्ञान वाढेल,

एक करावे

मी काल ३.७२ डॉ/गॅ ने पेट्रोल (गॅस) भरले म्हणजे लिटरची किंमत झाली ९८ सेन्ट. अर्थात, तीही आम्हाला जास्त वाटते हा भाग वेगळा.

जितक्या प्रमाणात क्रूड तेलाची (रुपयातील) किंमत वाढते तितक्या प्रमाणात पेट्रोलची किंमत वाढत नाही असे दिसते.

या थत्त्यांच्या तक्त्यावरून काढलेल्या अंदाजाशी सहमत.

असो. किंमती वाढल्या की एक सोपा उपाय करावा -

  • गॅस स्टेशनवर जाऊन क्रेडिट कार्ड वापरावे.
  • डू यू वाँट रिसिट? या प्रश्नाचे उत्तर "नो" द्यावे.
  • पेट्रोल/गॅस भरायला सुरुवात करावी आणि डोळे गच्च मिटून घ्यावे.
  • खट्ट असा नोझलचा आवाज आला/ टाकी फुल्ल झाली की इथे तिथे न बघता धूम ठोकावी.

त्रास कमी होतो असा माझा अनुभव आहे. ;-) ह. घ्या.

:)

आमच्याकडे क्रेडिट कार्ड रिसिटवर सही करावीच लागते. नुसतीच धूम कशी ठोकणार? धरून ठोकेल ना तो लिक्विड ग्यॅस ऊर्फ प्येट्रोल भरणारा.
तो त्रास जास्तीचा होईल.

अरेच्चा!

आमच्याकडे क्रेडिट कार्ड रिसिटवर सही करावीच लागते. नुसतीच धूम कशी ठोकणार? धरून ठोकेल ना तो लिक्विड ग्यॅस ऊर्फ प्येट्रोल भरणारा.

हे लक्षात नाही आले. आमच्याकडे नै ना करावी लागत! अशी शिष्टम लवकरच तेथेही येवो हीच प्रार्थना!! ;-)

;) :)

हे कुठेतरी वाचल्या सारखे वाटत होते...शेवटी बरेच शोधल्यावर तुमच्या वहीतली जुनी खरड सापडली ;)

वैद्य
गुरू, 02/21/2008 - 20:04

:).. क्रेडिट कार्ड स्वाइप करायचे 'नो रिसीट' म्हणून गाडित येउन डोळे घट्ट मिटून बसायचे.. टाकी फुल झाल्याचा कट्ट आवाज झाला की तो पाईप जागच्या जागी ठेऊन त्या नरकातून बाहेर पडायचे.. :))

चिकाटीला दाद

बरोबर तिच खरड पण किंचित फरकाने.

खरडीला माझे उत्तर

प्रियाली

गुरू, 02/21/2008 - 06:16

मी गाडीत गॅस भरताना डोळे मिटून घेते. भाव पहातच नाही. सध्या एवढेच हाती आहे, भाव पाहूनही नैराश्याचा झटका येईल का काय अशी परिस्थिती आहे .

कारण गॅस भरताना गाडीत येऊन बसू नये अशी सक्त ताकिद गॅस स्टेशनवर असते. (डोळे मिटून उभे राहू नये असे स्पष्ट लिहिलेले नसते.)

बाकी इतकी जुनी खरड शोधणे म्हणजे तुमच्या चिकाटीला दाद द्यायला हवी.

आभारी आहे :)

कारण गॅस भरताना गाडीत येऊन बसू नये अशी सक्त ताकिद गॅस स्टेशनवर असते.

अरेच्चा मला कधीच हे दिसले नाही. गेली कित्येक वर्षे मी गाडीत जाउन बसतो आहे, विशेषतः मरणाच्या थंडीत. आता मुद्दामहुन पाट्या वाचेन.

बाकी इतकी जुनी खरड शोधणे म्हणजे तुमच्या चिकाटीला दाद द्यायला हवी.

थ्यांकू.. हा वाद मागच्यावेळेस तेलाची दरवाढ झाली तेव्हा (२००८ च्या सुमारास) कधीतरी झाला हे आठवत होते, त्यावरुन शोधुन काढले.

अशीच आपली देवाणघेवाण

अरेच्चा मला कधीच हे दिसले नाही. गेली कित्येक वर्षे मी गाडीत जाउन बसतो आहे, विशेषतः मरणाच्या थंडीत. आता मुद्दामहुन पाट्या वाचेन.

मी सहसा सॅम्सक्लबला गॅस भरते. तेवढाच १०-१५ सें. कमी पडतो. तेथे पंपाबाजूच्या खांबावर सेल फोन वापरू नये आणि गॅस भरताना शेजारीच उभे राहावे अशी ताकीद असते. भयंकर कडाक्याची थंडी आणि बोचरे वारे वाहत असतील तेव्हा वार्‍याकडे पाठ करून, पंप आणि या खांबाच्या मध्ये चोरून उभे राहावे अशी ऐडिया मला मागे कुडकुडताना पाहून तिथेच एका गॅस भरणार्‍या तिर्‍हाईताने दिली होती. ;-)

हे जाहीर लिहिते कारण इतकेच की सर्वांनाच माहितीची देवाणघेवाण होईल. सेलफोन, धूम्रपान वगैरेला जशी गॅसस्टेशनवर बंदी असते तसेच नोझलवर देखरेख करणे ही गॅस भरणार्‍या व्यक्तीची जबाबदारी असते असे ऐकून आहे.

देवाण घेवाण

मी ही सॅम्स क्लबात भरतो पण पाटीकडे लक्ष गेले नसावे.
देवाण घेवाण चाललीच आहेत तरः सॅम्स क्लबला नेहमीच गॅस स्वस्त असतो असे नाही, आयफोनवर 'गॅसबडी' ऍपवर एकदा नजर टाकुन आधी खात्री करुन घ्यावी, कधी कधी आपल्या जवळचा पंपही त्याच भावात किंवा स्वस्तात विकत असतो.

ऍप उतरवले

सॅम्स क्लबला नेहमीच गॅस स्वस्त असतो असे नाही, आयफोनवर 'गॅसबडी' ऍपवर एकदा नजर टाकुन आधी खात्री करुन घ्यावी, कधी कधी आपल्या जवळचा पंपही त्याच भावात किंवा स्वस्तात विकत असतो.

खरे आहे. असे अभावाने का होईना पण झाल्याचे पाहिले आहे. असो. ऍप उतरवले. उपयुक्त वाटले. माहितीसाठी धन्यवाद.

सॅम्स ३.५३ आणि इतरत्र कमीतकमी ३.५८, पाच सेन्ट वाचले. तेवढेच दुष्काळात पाण्याचे पाच तुषार. ;-)

अवांतरः कुतूहल

'फोन वापरू नका' आचरटपणा तिकडेही असतो?
अन्वय संदिग्धतेच्या प्रेमींसाठी अजून एक सुमार विषय:
'खांबावर सेल वापरू नये' अशी ताकीद की 'सेल वापरू नये' अशी खांबावर ताकीद, याविषयी चर्चा करा.

हो

'फोन वापरू नका' आचरटपणा तिकडेही असतो?

हो असतो ना आणि वर चित्रात दाखवलेला फोन फ्लिप फोन आणि बटणे दाबायचा असतो. बाकी, फोन वापरल्याने विशेषतः स्मार्टफोन अपघात झाल्याची उदाहरणे आहेत काय? कॅमेराचा फ्लॅश वापरल्याने अपघात झाल्याचे उदाहरण मध्यंतरी वाचले होते.


अन्वय संदिग्धतेच्या प्रेमींसाठी अजून एक सुमार विषय:
'खांबावर सेल वापरू नये' अशी ताकीद की 'सेल वापरू नये' अशी खांबावर ताकीद, याविषयी चर्चा करा.

कुठे? इथे आपल्या उपक्रमावर?

बायदवे, सॅम्सने ५-१० सेन्ट कमी किंमत लावावी आणि ट्यूबलाइटचा भक्क प्रकाश ठेवावा की उंची दिवे आणि सुशोभन करून मॉलच्या भावात किंमती लावाव्या अशी चर्चाही टाकता येईल.

सुमार?

अन्वय संदिग्धतेच्या प्रेमींसाठी अजून एक सुमार विषय:

सुमार नै कै..ह्याला वाक्य-पद-क्रम-प्रमाद म्हणून त्याचा दर्जेदार आस्वाद घ्यायचा असतो.

चूक

वाक्य-पद-क्रम-दर्जेदार-प्रमाद म्हणून त्याचा आस्वाद!

माझी उत्तरे

प्रस्तावात विचारलेले प्रश्न म्हणजे 'महागाई वाढली की घराचा खर्च कसा आटोक्यात आणायचा?' असा प्रकारचा आहे.
आपले उत्पन्न वाढवत नेणे हाच उपाय लांब पल्ल्यासाठी योग्य वाटतो.

तसेच 'कच्च्या तेलाचे भाव का वाढतात?' ह्या प्रश्नाचं उत्तर मिळाल्यानंतर येथे विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे देणे सोपे वाटते.

इलेक्ट्रॉनिक वस्तू ह्या गरजेच्या नाहीत तरी त्यांचे भाव जास्त असतात. श्रीमंत देशांना व तेलसाठा असणार्‍या अरब लोकांना धान्य-भाजीपाला-मांस-मच्छी-कपडालत्ता ह्या गोश्टी जास्तीत जास्त दरांत विकणं हा उपाय योग्य वाटतो. कारण तेल काय फक्त भारतच वापरतो असे नाही. तेलसाठा नसलेले इतर देश अन्नधान्य-भाजीपाला-मांस-मच्छी-कपडालत्ता निर्यात करतातच की.

चांगली चर्चा

अमेरिकेच्या दबावाला न जुमानता भारत इराणकडुन तेल घेत होता, पण मध्यंतरी दबाव फारंच वाढल्याने इराणकडुन तेल घेणे कमी/बंद केले आहे असे वाचले होते. अचानक झालेल्या वाढीचे ते ही एक कारण असू शकते.

शेल गॅसची मुबलकता आणि अमेरिकेत (रॉम्नी निवडुन आल्यास) होऊ घातलेला कीस्टोन पाइपलाईनचा प्रकल्प ह्यामुळे अमेरिकेची तेलाची मागणी कमी होऊन तेलाचे भाव भविष्यात उतरण्याची शक्यता आहे.

 
^ वर