धारुण रवी: शिक्षा पुरेशी आहे?

अमेरिकेतील न्यू जर्सी राज्यात झालेल्या एका घटनेत सहाध्यायीला आत्महत्त्येला प्रवृत्त केल्याबद्दल धारुण/ धरुण रवी या युवकाला अटक करण्यात आली होती. या केसला प्रसारमाध्यमे आणि वर्तमानपत्रांतून खूप प्रसिद्धी मिळाली.

भारतीय वंशाच्या या विद्यार्थाने आपल्या समलैंगिक रुममेटचा वेबकॅमवर विडिओ घेऊन तो इतरांना पाहण्यास प्रवृत्त केले. या धसक्याने त्याच्या रुममेटने आत्महत्या केली. या गोष्टीला प्रसिद्धी मिळाली ती "सायबरबुलिंग" या नावाने. रवीवर लावले गेलेले ठपके इन्वेजन ऑफ प्रायवसी, हेट क्राइम आणि पुराव्यांत फेरफार करणे असे आहेत.

सध्या या केसचा निकाल लागून रवीला सौम्य शिक्षा ठोठवण्यात आली आहे. या शिक्षेत केवळ ३० दिवसांची कोठडी आणि दंड आहे. या आधी त्याला १० वर्षे कारावास आणि भारतात परत धाडण्याची शिक्षा मिळेल असे म्हटले जात होते.

यासंबंधी काही प्रश्न आहेत.

१. रवीला सध्या मिळालेली शिक्षा तुम्हाला पुरेशी वाटते काय?
२. रवी अमेरिकेचा नागरिक आहे काय? अमेरिकेच्या नागरिकांना दुसर्‍या देशात डिपोर्ट करण्याची शिक्षा कशी मिळू शकते?
३. एखाद्या समलैंगिका ऐवजी विषमलिंगी व्यक्तीने आत्महत्त्या केली असती तर या केसला इतकी प्रसिद्धी मिळाली असती काय?
४. इतकी सौम्य शिक्षा देण्यामागे कोणती कारणे असावी?

Comments

धारुण रवि

ह्या केसबाबत फेब्रुवारी महिन्यात न्यूयॉर्कर साप्ताहिकात आलेला हा दीर्घ लेख मी वाचला होता. असे आठवते की धारुण (की धरुण? आणि म्हणजे काय? कोठल्या भाषेतील शब्द आहे हा?) ह्याचे वडील रवि पझानी आणि आई सबिथा (सविता?) तामिळनाडूमधील असून अद्यापि अमेरिकेचे नागरिक नाहीत. धारुणहि नाही. त्याचा अमेरिकेत जन्मलेला धाकटा भाऊ मात्र आहे.

वरील लेखकाचाच ह्या विषयावरील पुढील लेख २१ मे च्या न्यूयॉर्कर मध्ये आहे. त्यावरून असे दिसते की न्यू जर्सीच्या 'बायस लॉ' मधील काही त्रुटींमुळे धारुणला शिक्षा कमी मिळाली, यद्यपि न्यायाधीशांनी धारुणच्या एकंदरीत वागणुकीबाबत नापसंती व्यक्त केली आहे.

वरील दोन लेख वाचून माझे वैयक्तिक मत असे झाले की धारुण हा एक उथळ आणि दुसर्‍यांचा विचार करण्यात फारसा वेळ न दवडणारा मुलगा आहे. भारतीय म्हणून त्याच्याबद्दल त्याच्याकडे आपला कल व्हावा असे मला त्याच्यामध्ये काही दिसले नाही.

शिक्षा झाली हे बरे, फार जास्त झाली नाही हे ठीक

१. रवीला सध्या मिळालेली शिक्षा तुम्हाला पुरेशी वाटते काय?

होय. शिक्षा झाली हे बरे, फार जास्त झाली नाही हे ठीक. याबाबत न्यायाधीशाचा युक्तिवाद मला पटला आहे. (कायद्यात लिहिलेली अधिक मुदतीची शिक्षा खून वगैरे थेट हेतुपुरस्सर हिंसेस लागू असावी, असा न्यायाधीशाचा युक्तिवाद होता.)

२. रवी अमेरिकेचा नागरिक आहे काय? अमेरिकेच्या नागरिकांना दुसर्‍या देशात डिपोर्ट करण्याची शिक्षा कशी मिळू शकते?

भारताचा नागरिक आहे, असे वाटते. अमेरिकेचा नागरिक नाही. देशातून घालवणे ही शिक्षा नाही. परंतु काही विशिष्ट गांभीर्याचे गुन्हे केल्यास व्हिसा देताना दिलेल्या अटींचे उल्लंघन होते, आणि व्हीसा रद्द होतो.

३. एखाद्या समलैंगिका ऐवजी विषमलिंगी व्यक्तीने आत्महत्त्या केली असती तर या केसला इतकी प्रसिद्धी मिळाली असती काय?

बहुधा नाही. पण बहुधा शिक्षा वगैरे अशीच झाली असती. शाळकरी मुलीचे नग्न फोटो पाठवणार्‍या मुला(ं)बाबत मागे बातमी वाचली होती. पण बहुधा ती मुले सज्ञान नव्हती. (दुवा) या बातम्यांनाही काही प्रमाणात प्रसिद्धी मिळाली होती. गुन्हा करणारी मुले सज्ञान असती, आणि केस कोर्टात गेली असती, तर बहुधा अधिक प्रसिद्धी मिळाली असती. (आणखी एक दुवा - यातील काही मुली-मुले सज्ञान होती, पण कोर्ट-सुनावणी होण्यापूर्वी केस "सेटल" झाली. ही केस देखील जर कोर्टात गेली असती तर माध्यमांत अधिक प्रसिद्ध झाली असती.)

४. इतकी सौम्य शिक्षा देण्यामागे कोणती कारणे असावी?

न्यायाधीशाने सांगितलेले कारण वर दिलेले आहे.

- - -
अवांतर १: श्री. कोल्हटकर यांच्या अवांतर मुद्द्याबाबत : தருண் ரவி "दरुण्/तरुण् रवि" हा व्यक्ती तमिळभाषक आहे. "दरुण्/तरुण्" हे बहुधा संस्कृत "तरुण"चे तमिळ-नियमांच्या-अनुसार-व्युत्पन्न रूप असावे. त्याच्या कृतींमुळे दारुण घटना घडली, ही बाब योगायोगाची. दरुण्/तरुण् रविच्या आईचे नाव Sabitha Pazhavi (सबिता पऴवि) असे आहे. हेदेखील संस्कृतातील शब्दांतून व्युत्पन्न आहे (सविता पल्लवी). परंतु ही बाब पुरती अवांतर आहे. तमिळ->इंग्रजी स्पेलिंगांमध्ये th=त dh=द, आणि व्युत्पत्तींमध्ये त->द. अन्य भाषेतून मातृभाषेत व्युत्पन्न-तद्भव शब्द नाव म्हणून वापरू नयेत ही कल्पना योग्य नाही. नाहीतर कोणी मंगेश-म्हाळसा-मल्हार-बळवंत वगैरे नावांबाबत तक्रार करू लागेल!
अवांतर २ : सदस्य खबरदार यांनी गेल्या ६ दिवसांत ४ चर्चाविषय टाकले आहेत. नवीन सक्रिय सदस्याचे स्वागत आहे. परंतु या ४ चर्चांमध्ये त्यांनी अजून विस्तृत प्रतिसाद दिलेले नाहीत. चर्चांमध्ये त्यांनी सहभाग वाढवला तर चर्चा अधिक रंगतील.

आमची भूमिका

नमस्कार,

दररोज वर्तमानपत्रे, प्रसारमाध्यमे, साप्ताहिकांतून विविध बातम्या नजरेस पडतात. कधी नाविन्यपूर्ण, कधी सनसनाटी, कधी चिंतनीय. अश्या बातम्यांवर आपण घरी, कार्यालयांत, मित्रमंडळात चर्चा करतो. तशीच चर्चा उपक्रमावर व्हावी, त्यातून नवी माहिती, नवे दुवे पुढे यावे, शंकानिरसन व्हावे या हेतूने येथे खबरदार चर्चा प्रसिद्ध करतील.

चर्चेत भाग घेणे, मतप्रदर्शन करणे हे खबरदारचे उद्दिष्ट नाही. याचबरोबर नकारात्मक, पूर्वग्रहदुषित चर्चा सुरु करणे हा ही हेतू नाही. बातमी वाचून एखाद्या सामान्य माणसाला जे प्रश्न पडतील तेच प्रश्न चर्चेत विचारले जातील. या व्यतिरिक्त चर्चेत खबरदारचा सहभाग राहणार नाही.

लेखनात चूक आढळल्यास शुद्धीपत्र, सुधारणा यांसाठी प्रतिसाद दिले जातील.

कळावे लोभ असावा,
आपला खबरदार.

आवडली

भुमिका आवडली

ऋषिकेश
------------------
<<स्वाक्षरी निद्रीस्त आहे>>

आडनाव "पऴनि़" हे गावाचे नाव

वर लिहिलेल्या "अवांतर मुद्दा १" मध्ये शुद्धीकरण : आईचे (आणि वडलांचेही) आडनाव "पऴनि़" பழனி असे आहे. हे गावाचे नाव आहे. बहुधा कुटुंबाचे मूळ गाव असावे.

सिटीझन नाही?

या मुलाला शिक्षा मिळाली हे बरे झाले. शिक्षा ठीक आहे, फार सौम्य वाटली नाही. या केस संदर्भात काही प्रश्न आहेत.

ज्या मुलाने आत्महत्या केली त्याची मानसिक स्थिती कशी होती? म्हणजे तो पूर्वीपासून डिप्रेस वगैरे असण्याबद्दल काही कल्पना आहे का? केवळ ट्विट वगैरे केल्याने, विडिओ प्रसारित केल्याने तडकाफडकी स्टेबल मनुष्य आत्महत्त्येचा निर्णय घेईल असे वाटत नाही. धरुणबद्दल सहानुभूती किंवा बाजू घेण्याचा प्रश्न नाही पण एकंदरीत प्रकार हिन्दी चित्रपटातील शक्ती कपूरसारखे व्हिलन हिरोच्या बहिणीवर जबरदस्ती करतात आणि आपल्या महान संस्कृतीरक्षणासाठी ती लगोलग आत्महत्त्या करते तसा वाटतो.

असो.

खालील स्टेटमेंट धरुण रवीच्या वडिलांचे आहे.

Honorable Judge,

My name is Ravi Pazhani, father of Dharun, a long time New Jersey resident, a 1st generation immigrant and more importantly a proud Citizen of the United States. I stand by what this nation stands for and its beliefs, core principles and I will never compromise that position even if it means to sacrifice everything I have. This is my country and Home. Don' t force us to go back.

अधिक माहिती येथे पाहा.

त्यात स्पष्ट म्हटले आहे की ते (सोबत त्यांचे कुटुंबही आले असावे) हे अमेरिकेचे नागरिक आहेत. तेव्हा वर आलेल्या प्रतिसादांतील माहिती पटत नाही. आपल्याच देशाच्या नागरिकांना अमेरिका कसे काय परदेशी पाठवू शकते हे कोडे आहे खरे!

हा कोणत्याही प्रकारे फर्स्ट डिग्री मर्डर नसल्याने अपेक्षेपेक्षा सौम्य शिक्षा होणे क्रमप्राप्त होते. कदाचित, धरुणची पार्श्वभूमी, कोवळे वय या सर्वाचाही निर्णयावर परिणाम होऊ शकतो.

असो. झाला हा प्रकार वाईट होता हे खरे पण धरुण सोबत तडकाफडकी आत्महत्या करणार्‍या मुलाविषयीही पुरेशी सहानुभूती वाटली नाही. कोल्हटकरांच्या मते धरुण हा उथळ आणि दुसर्‍यांचा विचार न करणारा मुलगा आहे. हम्म! पण बरेचसे टिनेजर्स या वयात तसेच नसतात का? त्या आत्महत्त्या करणार्‍या मुलाचे आईवडिल ज्या दु:खातून आज जात असतील त्यातून त्यानेही आईवडिलांचा विचार केला असे म्हणता येत नाही.


आपल्याच देशाच्या नागरिकांना अमेरिका कसे काय परदेशी पाठवू शकते हे कोडे आहे खरे! आपल्याच देशाच्या नागरिकांना अमेरिका कसे काय परदेशी पाठवू शकते हे कोडे आहे खरे! आपल्याच देशाच्या नागरिकांना अमेरिका कसे काय परदेशी पाठवू शकते हे कोडे आहे खरे! आपल्याच देशाच्या नागरिकांना अमेरिका कसे काय परदेशी पाठवू शकते हे कोडे आहे खरे! आपल्याच देशाच्या नागरिकांना अमेरिका कसे काय परदेशी पाठवू शकते हे कोडे आहे खरे! आपल्याच देशाच्या नागरिकांना अमेरिका कसे काय परदेशी पाठवू शकते हे कोडे आहे खरे! आपल्याच देशाच्या नागरिकांना अमेरिका कसे काय परदेशी पाठवू शकते हे कोडे आहे खरे!
आपल्याच देशाच्या नागरिकांना अमेरिका कसे काय परदेशी पाठवू शकते हे कोडे आहे खरे!
आपल्याच देशाच्या नागरिकांना अमेरिका कसे काय परदेशी पाठवू शकते हे कोडे आहे खरे!

शोधता ग्रीनकार्ड असे सापडले

गूगल शोधात रवि ग्रीनकार्डधारक असल्याचे सापडले. (दुवा)

Mr. Ravi, 20, who is a legal resident of the United States but a citizen of India, could face deportation...

"हा माझा/आमचा देश आहे" वगैरे त्याच्या वडलांचे म्हणणे मनाची धारणा सांगत असावे (हे अर्थातच प्रामाणिक असावे). कागदोपत्री तथ्याबाबत ते वाक्य नसावे.

नागरिकाच्या हद्दपारीची शिक्षा यू.एस. कायद्यामध्ये उपलब्ध नाही.

अवांतर : अर्थात नागरिकत्व मिळवण्याच्या अर्जात जाणतेपणाने खोटे बोलले, तर नागरिकत्व रद्द ठरू शकते, आणि त्या न-नागरिकाला देशाबाहेर - मूळ देशात - पाठवले जाऊ शकते. परंतु त्या ठिकाणी नागरिकत्व खोट्या अर्जामुळे रद्द आहे ही मधली पायरी आहे. आणि शिक्षा अमेरिका=मायदेशातून हद्दपारीची नसून अन्य-कुठल्या-मायदेशाकडे पुन्हा सुपूर्द करणे, असे आहे.

शिकवण कोणाला?

न्यूयॉर्कर साप्ताहिकातला लेख वाचला होता, रवीला शिक्षा झाली हे योग्यच पण आत्महत्या केलेला टायलर थोडा जास्तच कमकूवत वाटतो.

महत्वाचा मुद्दा असा की झालेल्या घटनेसाठी फक्त रवीलाच जबाबदार धरणे योग्य आहे काय?

शिक्षा सौम्य आहे

प्रियालीताई म्हणतात -
ज्या मुलाने आत्महत्या केली त्याची मानसिक स्थिती कशी होती? म्हणजे तो पूर्वीपासून डिप्रेस वगैरे असण्याबद्दल काही कल्पना आहे का? केवळ ट्विट वगैरे केल्याने, विडिओ प्रसारित केल्याने तडकाफडकी स्टेबल मनुष्य आत्महत्त्येचा निर्णय घेईल असे वाटत नाही.

श्री अरविंद कोल्हटकरानी दिलेल्या लिंकमधून स्पष्ट माहिती मिळते ती अशी की, ज्या मुलाने आत्महत्या केली तो पूर्वीपासून डिप्रेस वगैरे नव्हता. केवळ ट्विट वगैरे केल्याने, विडिओ प्रसारित केल्यानेच त्याने आत्महत्या केली असेच प्रथमदर्शनी दिसते. पिंडे पिंडे मतीर्भिन्नः . लिंकमधील माहिती थोडी जास्त आहे पण घटनांचा क्रम, वापरलेले पुरावे ह्यांची सुस्पष्ट माहिती दिली आहे.

एक सुसायडल नोट टायलरने लिहिली होती ती पोलिसांनी आत्महत्या केलेल्या मुलाच्या आई वडिलांसमोर उघड केलेली नाही (कदाचित कोर्टासमोर उघड केली असेल).

धारूण/धरुणने दिलेल्या ऑफर (६०० तास कम्युनिटी सर्विस वगैरे) स्वीकारल्या नाहीत त्याचे कारण त्याचा वकील पुढीलप्रमाणे सांगतो -
Steven Altman, Ravi's lawyer, said to reporters, outside the courthouse, on December 9th. “Simple answer, simple principle of law, simple principle of life: he's innocent.”

तर खालील संवाद श्री अरविंद कोल्हटकरानी दिलेल्या लिंकमधून मिळाला जो पुराव्यांमध्ये समाविष्ट केला गेला. हा संवाद चोरून विडीओ काढून प्रसारित करण्याशी संबंधित आहे. (खालील संवादात रवी म्हणजे धारूण/धरुण आहे आणि वेई ही त्याची मैत्रीण आहे की जी ह्या गुन्ह्यात प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष सहभागी होती)

RAVI: Did you tell them we did it on purpose?
WEI: Yeah . . well that we didn't know
what we were gonna see
Where is tyler . .
RAVI: Because I said we were just messing around with the camera. He told me he wanted to have a friend over and I didn't realize they wanted to be all private.
WEI: Omg dharun why didnt u talk to me first i told them everything

३० दिवसाची कोठडी आणि दंड ही शिक्षा सौम्य आहे असे वाटते. अमेरिकेच्या न्यायदेवतेच्या डोळ्यावरही पट्टी असावी असे वाटले.

धारूण/धरुणला पैशाचा गर्व होता असे वारंवार माहितीतून कळते. पैसा आला, मोठ्या, संपन्न देशात राहता आले म्हणजे आपण विचारानेही संपन्न झालो असे नाही (हे एक भारतीय म्हणून केलेले विधान आहे) म्हणजेच even when we disagree with someone's choices or lifestyle, we must always treat that person with respect, dignity and compassion हेच कळणे खरे!

३० दिवसाची कोठडी आणि दंड ही शिक्षा सौम्य आहे असे वाटते. ३० दिवसाची कोठडी आणि दंड ही शिक्षा सौम्य आहे असे वाटते. ३० दिवसाची कोठडी आणि दंड ही शिक्षा सौम्य आहे असे वाटते. ३० दिवसाची कोठडी आणि दंड ही शिक्षा सौम्य आहे असे वाटते. ३० दिवसाची कोठडी आणि दंड ही शिक्षा सौम्य आहे असे वाटते. ३० दिवसाची कोठडी आणि दंड ही शिक्षा सौम्य आहे असे वाटते. ३० दिवसाची कोठडी आणि दंड ही शिक्षा सौम्य आहे असे वाटते. ३० दिवसाची कोठडी आणि दंड ही शिक्षा सौम्य आहे असे वाटते. ३० दिवसाची कोठडी आणि दंड ही शिक्षा सौम्य आहे असे वाटते. ३० दिवसाची कोठडी आणि दंड ही शिक्षा सौम्य आहे असे वाटते. ३० दिवसाची कोठडी आणि दंड ही शिक्षा सौम्य आहे असे वाटते. ३० दिवसाची कोठडी आणि दंड ही शिक्षा सौम्य आहे असे वाटते. ३० दिवसाची कोठडी आणि दंड ही शिक्षा सौम्य आहे असे वाटते. ३० दिवसाची कोठडी आणि दंड ही शिक्षा सौम्य आहे असे वाटते. ३० दिवसाची कोठडी आणि दंड ही शिक्षा सौम्य आहे असे वाटते. ३० दिवसाची कोठडी आणि दंड ही शिक्षा सौम्य आहे असे वाटते. ३० दिवसाची कोठडी आणि दंड ही शिक्षा सौम्य आहे असे वाटते. ३० दिवसाची कोठडी आणि दंड ही शिक्षा सौम्य आहे असे वाटते. ३० दिवसाची कोठडी आणि दंड ही शिक्षा सौम्य आहे असे वाटते. ३० दिवसाची कोठडी आणि दंड ही शिक्षा सौम्य आहे असे वाटते. ३० दिवसाची कोठडी आणि दंड ही शिक्षा सौम्य आहे असे वाटते. ३० दिवसाची कोठडी आणि दंड ही शिक्षा सौम्य आहे असे वाटते. ३० दिवसाची कोठडी आणि दंड ही शिक्षा सौम्य आहे असे वाटते. ३० दिवसाची कोठडी आणि दंड ही शिक्षा सौम्य आहे असे वाटते. ३० दिवसाची कोठडी आणि दंड ही शिक्षा सौम्य आहे असे वाटते. ३० दिवसाची कोठडी आणि दंड ही शिक्षा सौम्य आहे असे वाटते. ३० दिवसाची कोठडी आणि दंड ही शिक्षा सौम्य आहे असे वाटते. ३० दिवसाची कोठडी आणि दंड ही शिक्षा सौम्य आहे असे वाटते. ३० दिवसाची कोठडी आणि दंड ही शिक्षा सौम्य आहे असे वाटते. ३० दिवसाची कोठडी आणि दंड ही शिक्षा सौम्य आहे असे वाटते. ३० दिवसाची कोठडी आणि दंड ही शिक्षा सौम्य आहे असे वाटते. ३० दिवसाची कोठडी आणि दंड ही शिक्षा सौम्य आहे असे वाटते. ३० दिवसाची कोठडी आणि दंड ही शिक्षा सौम्य आहे असे वाटते. ३० दिवसाची कोठडी आणि दंड ही शिक्षा सौम्य आहे असे वाटते. ३० दिवसाची कोठडी आणि दंड ही शिक्षा सौम्य आहे असे वाटते. ३० दिवसाची कोठडी आणि दंड ही शिक्षा सौम्य आहे असे वाटते. ३० दिवसाची कोठडी आणि दंड ही शिक्षा सौम्य आहे असे वाटते. ३० दिवसाची कोठडी आणि दंड ही शिक्षा सौम्य आहे असे वाटते. ३० दिवसाची कोठडी आणि दंड ही शिक्षा सौम्य आहे असे वाटते. ३० दिवसाची कोठडी आणि दंड ही शिक्षा सौम्य आहे असे वाटते. ३० दिवसाची कोठडी आणि दंड ही शिक्षा सौम्य आहे असे वाटते.

जर तो डिप्रेस नव्हता

टायलर क्लेमेन्टी डिप्रेस्ड नव्हता असे न्यूयॉर्कर म्हणते. जर तसे नसेल तर त्याचा निर्णय हा तडकाफडकी मानावा लागतो आणि त्याचा दोषही बुलिंग करणार्‍यांसमवेत त्याच्याही माथी येतो. असे असल्यास त्याच्या मृत्यूस एकट्या धरुणला जबाबदार धरणे योग्य नव्हे.

अशीच एक केस आमच्या शहरातील हायस्कूलमध्ये झाली होती. त्यात या मुलाला मानसिक त्रास तणाव असल्याचे स्पष्ट होते. तसेच, बुलिंग झाले हे मानले आहे पण केलेल्या गंभीर आरोपांमध्येही काही तथ्य नसल्याचे आढळले आहे.

एकंदरीत, धरुण आणि टायलर क्लेमेन्टीच्या केसमध्ये काहीतरी घिसाडघाई आहे असे मला वाटते. अन्यथा, इनवेजन ऑफ प्रायवसी, एविडन्स टॅम्परिंग वगैरे विरुद्ध शिक्षा होणे रास्त आहे.

अवांतरः पैशाचा गर्व असणे हा गुन्हा नाही, तो केसचा कोणत्याही प्रकारे प्वाइंट होऊ शकत नाही.

लाजाळू आणि परंपरागत

टायलर क्लेमेन्टी डिप्रेस्ड नव्हता पण लाजाळू आणि परंपरागत(अमेरिकेतील श्रद्धाळू) मध्यमवर्गीय कुटुंबातून आला होता, त्याचे समलैंगिक आकर्षण त्याच्या आई-वडिलांना मान्य नव्हते असे दिसते, समाजात नाचक्की होण्याच्या भितीने हा निर्णय तडकाफडकीच घेतल्यासारखा वाटतो.

झालेल्या प्रकारासाठी टायलर, पालक, रवी, समाज असे सर्वच थोड्याफार फरकाने जबाबदार आहेत असे वाटते.

हेच

झालेल्या प्रकारासाठी टायलर, पालक, रवी, समाज असे सर्वच थोड्याफार फरकाने जबाबदार आहेत असे वाटते.

लाजाळू आणि अबोल हे व्यक्तिमत्व असणारी ही व्यक्ती परंपरागत मूल्ये बाळगणार्‍या कुटुंबात कधी वैद्यकीय तपासाणीसाठी गेली नाही अशीही शंका घेता येते. समलैंगिकता आई वडिलांना मान्य नसेल या भितीने १८ वर्षांच्या वरील मुलगा जीव देत असेल तर अमेरिकन समाजात राहूनही त्याच्या आईवडिलांची दहशत*(?) किती होती हे कळते. माझ्या प्रतिसादांतून हेच सांगायचे आहे की ही केस काही अद्वितिय नाही. अनेकदा, तरुण मुलांना कायद्यांची आणि परिणामांची माहिती नसते. बुलिंग कितीही नाकारले तरी होतेच. ते रोखणे हे त्या क्षेत्रातील अधिकारी लोकांचे काम आहे. डॉर्ममध्ये वाटेल त्या वेळेस परकी व्यक्ती येण्यावर काही निर्बंध असतात की नाही याची कल्पना नाही. त्यामुळे घडलेल्या गुन्ह्यासाठी येथे कोणी एक व्यक्ती जबाबदार नाही. जबाबदारी या केसमध्ये गुंतलेल्या सर्वांचीच आहे.

तेव्हा, धरुणला जी शिक्षा झाली ती ठीक वाटते.

* हा शब्द चुकीचा असू शकेल.

बाकी बरोबर् पण्

बाकी बरोबर पण खालील विधानाशी न्युयॉर्करच्या लेखाच्या संदर्भात असहमत.

>>समलैंगिकता आई वडिलांना मान्य नसेल या भितीने १८ वर्षांच्या वरील मुलगा जीव देत असेल तर अमेरिकन समाजात राहूनही त्याच्या आईवडिलांची दहशत किती होती हे कळते.
आई वडिलांना मान्य नसणे हा फॅक्टर फारतर ५-१०% असावा, व्हिडिओटेप प्रसारीत होण्यामुळे होणार्‍या नाचक्कीची भिती ८०-९०% असावी असे दिसते.

ह्याकेस संदर्भात रवीची बाजू घेऊन तेथील भारतीयांनी मोर्चा वगैरे काढल्याचे वाचले, जे बायस्ड वाटते.

मोर्च्यांचं जाऊ द्या हो

आई वडिलांना मान्य नसणे हा फॅक्टर फारतर ५-१०% असावा, व्हिडिओटेप प्रसारीत होण्यामुळे होणार्‍या नाचक्कीची भिती ८०-९०% असावी असे दिसते.

सांगता येत नाही. या मुलाची आई त्याला ऍक्सेप्ट करण्यास तयार नव्हती असे ऐकते. कदाचित, घरातील परिस्थितीमुळे तो आधीच निराश असावा.

ह्याकेस संदर्भात रवीची बाजू घेऊन तेथील भारतीयांनी मोर्चा वगैरे काढल्याचे वाचले, जे बायस्ड वाटते

भारतीयांना मोर्चे काढायला काही कारण लागतं का? ;-) ते सोडून देऊ.

असो. आणखी एक माझ्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न पडतो.

डॉर्ममध्ये सहसा मुलगा आणि मुलगी हे एकत्र एका खोलीत राहत नाहीत असे वाटते. का याचे कारण स्पष्ट आहे पण म्हणून समलिंगी आणि भिन्नलिंगी व्यक्तीने एकत्र राहावे का? याचा त्रास शारीरिक किंवा मानसिक त्यांना होणारच नाही, मग ते उठून एकमेकांवर येनकेन प्रकारे वचपा काढणारच नाहीत, असे गृहित धरलेले आहे का?

खाली प्रसाद म्हणतात -

हीन लेखणे हे ही बरोबर नाही, हेट्‌‌‌रेड क्राईम्सची सुरुवात इतरांना हीन लेखण्यातूनच होत असावी.

हम्म! हे शक्य आहे. मुद्दा लक्षात आला.

ओरिएन्टेशन

डॉर्ममध्ये सहसा मुलगा आणि मुलगी हे एकत्र एका खोलीत राहत नाहीत असे वाटते. का याचे कारण स्पष्ट आहे पण म्हणून समलिंगी आणि भिन्नलिंगी व्यक्तीने एकत्र राहावे का? याचा त्रास शारीरिक किंवा मानसिक त्यांना होणारच नाही, मग ते उठून एकमेकांवर येनकेन प्रकारे वचपा काढणारच नाहीत, असे गृहित धरलेले आहे का?

सहमत, डॉर्मचा फॉर्म भरताना ओरिएन्टेशन बद्दल माहिती घेत असावेत, ह्या केसनंतर ह्यासंदर्भात योग्य तो बदल घडू शकेल.

महत्वाचा मुद्दा

डॉर्ममध्ये सहसा मुलगा आणि मुलगी हे एकत्र एका खोलीत राहत नाहीत असे वाटते. का याचे कारण स्पष्ट आहे पण म्हणून समलिंगी आणि भिन्नलिंगी व्यक्तीने एकत्र राहावे का?

हा मुद्दा मला महत्वाचा वाटतो.
ज्या देशांमध्ये समलिंगी आहे म्हणून सांगणे भारताइतके अशक्य नाही किंवा जेथे समलिंगी संबधाना परवानगी आहे तेथील डॉर्ममध्ये समलिंगी आणि भिन्नलिंगी व्यक्तीना रूम पार्टनर निवडण्याची संधी असावी, जेणेकरून एकमेकांना कमी आॅकवर्ड वाटेल.

कोएड डॉर्म

काही ठिकाणी कोएड डॉर्म असतात. (दुवा) त्यांचे कसे काय चालते हे भविष्यात बघण्यालायक आहे.

मात्र समलिंगी/भिन्नलिंगी रूममेट असण्याचे प्रयोग सध्याच मोठ्या प्रमाणात चालू आहेत. त्यामुळे "या व्यवस्थेत बहुतेक प्रसंगी त्रास होतो की नाही?" हा प्रश्न काल्पनिक/हायपोथेटिकल नसून निरीक्षण करता येण्यासारखे आहेत.

(आजकालच्या पिढीत फारसा त्रास होत नसावा. असे माझे त्रोटक निरीक्षण आहे. "गे पॅनिक" हा प्रकार पूर्वी बर्‍याचशा भिन्नलिंगी लोकांना घाबरा करत असे - म्हणजे समलिंगी व्यक्ती नको असलेला प्रणय जबरदस्तीने करेल. किंवा जबरदस्ती नसली तरी कसेनुसे वाटण्यापुरता प्रणय करेल. अशी भीती = "गे पॅनिक". ही भावना पूर्वी कोर्टात "स्वसंरक्षणाकरिता हिंसा" म्हणूनही चालत असे, पण आता नाही. आजकाल ही भीती पुष्कळ कमी दिसते. एकतर्फा नको-असलेला-प्रणय अनुभवण्याचे प्रसंगही तसे कमीच असावेत, म्हणून ही भीती आजकाल शहरी समाजात कमी झाली असेल, असा माझा कयास आहे. रवि-टायलर सारख्या शोकांतिका फारशा घडत नसाव्यात.)

पर्याय द्यावा

जर कोएड डॉर्म प्रचलित होत असेल तर मला वाटतं मुलांना पर्याय द्यावा.

प्रणयापर्यंत न पोहोचताही केवळ समोर कपडे बदलणे वगैरे प्रकारांतूनही अनकम्फर्टेबल वाटणे शक्य आहे. यांत फक्त भिन्नीलिंगींचाच समावेश असेल असे म्हणता येत नाही. ऑकवर्ड किंवा अनकम्फर्टेबल वाटणे दोन्ही बाजूंनी होऊ शकते. आजकालच्या पिढीला त्रास होतो की नाही हे त्यांच्या अपब्रिंगिंगवर अवलंबून आहे. सुधारणा ही हळूहळू होते हे जाणून घेतल्यास अचानक बदलाला सामोरी गेलेली व्यक्ती गोंधळून जाऊ शकते हे लक्षातही घेणे आवश्यक आहे.

अशा परिस्थितीत, मुलांचे ओरिएंटेशन आणि कल लक्षात घेऊन रुमपार्टनर निवडण्याचे पर्याय असावेत असे वाटते.

प्राथमिकता यादीनुसार सर्व शक्य पर्याय असावेत

सर्वेक्षण करून वेगवेगळ्या मुद्द्यांची प्राथमिकता यादी करावी. आणि परवडतील/सोयीस्कर असतील तितके सर्व पर्याय असावेत.

मलाही असेच वाटते

मलाही असेच वाटते की काही गोष्टी स्पष्ट नाही आहेत, जसे सुसायडल नोट टायलरच्या आई वडिलांसमोर का उघड केली नाही?

न्यूयॉर्करनुसार धारूण/धरुण त्याच्या मित्राला (टॅमला) चॅटवर म्हणतो “Dude I hate poor people.” आणि बरेच तत्सम इतर हेट् ‌‌रेड संवाद. पैशाचा गर्व असणे हा गुन्हा नाही पण त्यामुळे इतरांना हीन लेखणे हे ही बरोबर नाही, हेट्‌‌‌रेड क्राईम्सची सुरुवात इतरांना हीन लेखण्यातूनच होत असावी.

चांगला विषय

१. रवीला सध्या मिळालेली शिक्षा तुम्हाला पुरेशी वाटते काय?
होय, आणि नाही. होय अशासाठी की दुसर्‍या मुलाने अविचाराने किंवा कदाचित कोणाचाही आधार वाटत नसल्याने घेतलेल्या निर्णयासाठी या मुलाला ही शिक्षा मिळणे योग्य वाटत नव्हते. आणि नाही अशासाठी, की मला रवीचे वागणे बर्‍यापैकी तिरस्करणीय वाटले. त्याने ट्विटरवरून केलेल्या कृत्याची जाहिरातही केली. तो बुद्धिमान आहे, आणि त्याच्या वकिलांनी आणि त्याने सिस्टमचा वापर केला असा माझा समज आहे. त्याच्या आईचे भाषण पाहून मला तिच्याबद्दल वाईट वाटले, पण शेवटी त्याच्या गळ्यात पडून रडणे पाहून मला त्यांच्याबद्दल फारशी सहानुभूती वाटली नाही किंबहुना संशय वाटला, पण हा माझा केवळ बायस असू शकतो. असो.

३. एखाद्या समलैंगिका ऐवजी विषमलिंगी व्यक्तीने आत्महत्त्या केली असती तर या केसला इतकी प्रसिद्धी मिळाली असती काय?
होय. मिळाली असती.
http://www.boston.com/news/local/massachusetts/articles/2010/03/30/da_ch...

४. इतकी सौम्य शिक्षा देण्यामागे कोणती कारणे असावी?
"इतकी सौम्य" मध्ये तुमचे जजमेंट आले आहे. कारण इतर काही नसून सिस्टमचा वापर आणि चतुर युक्तिवाद असे मला वाटले.

(खबरदार हे एक सदर आहे काय? )

 
^ वर