मोहन जोशी खरेच इतके मूर्ख आहेत का?

अशा प्रकारचे अनुभव सांगणार्‍यांना भोंदू संबोधणे योग्य आहे का?

श्रध्दावंतांची टर उडवू नये त्यांना कानकोंडे बनवु नये ह्यावर बरेच काही उपक्रमावर लिहिले गेले आहे आहे. पण जेव्हा अशा प्रकारचे लेखन वाचनात येते तेव्हा, लिहिणारा भोंदू आहे किंवा मूर्ख आहे असे संबोधणे ओवर द लाइन नसावे असे मला वाटते. उपक्रमींचे ह्यावर मत काय?

लेखनविषय: दुवे:

Comments

ही हू अनिरुद्धबापू!

श्रध्दावंतांची टर उडवू नये त्यांना कानकोंडे बनवु नये ह्यावर बरेच काही उपक्रमावर लिहिले गेले आहे आहे. पण जेव्हा अशा प्रकारचे लेखन वाचनात येते तेव्हा, लिहिणारा भोंदू आहे किंवा मूर्ख आहे असे संबोधणे ओवर द लाइन नसावे असे मला वाटते. उपक्रमींचे ह्यावर मत काय?

माझं मत - हा लेख लाल बॅकग्राउंडवर आला असता तर मजा़ आली असती.

एक शक्यता

जुनी बातमी दिसते.
ट्रवोल्टा आणि क्रूज तरी इतके मूर्ख असतील काय? की, आमीर खान दुनियादारीचा सशुल्क अभिनय करतो (असा संशय व्यक्त करण्यात येतो) त्याच प्रकारे हे लोक श्रद्धाळूपणा करीत असावेत?
उपक्रमींनी सामना वाचावा की साधना?
हल्ली पूर्वीप्रमाणे गंमत व्हायची फारशी आशा नाही.

अर्थात, never assume malice where stupidity would suffice असेही शक्य आहेच!

खरे आहे

हल्ली पूर्वीप्रमाणे गंमत व्हायची फारशी आशा नाही.

आशा-निराशा ;)

गंमत व्हायची फारशी आशा नाही.

अंदाज चुकला म्हणावे का निराशा झाली? ;)

ऋषिकेश
------------------
<<स्वाक्षरी निद्रीस्त आहे>>

:)

निराशा झाली.
भरवशाच्या बहुतेक म्हशी समाधिस्थ, निवृत्त, निष्कासित, निद्रिस्त, व्यस्त किंवा नरकस्थ दिसतात.

मज्जा नाय

किंवा मोहन जोशींचा गोठा फारसे उत्कंठावर्धक मैदान नसावे.

हाउ सिली!

दारु पिऊन रस्त्यात धिंगाणा घालणार्‍या मोहन जोशींना बापू विवेकबुद्धी देवोत किंवा आदेशावरूनच त्यांनी धिंगाणा घातला असेल! ;-)

वाय् झेड

वाय् झेड पणा आहे सगळा झालं ;)

दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||

मोहन जोशींचे मुद्दे

मोहन जोशींचे महत्त्वाचे मुद्दे सगळ्यांच्याच नजरेतून सुटलेले दिसताहेत...
१. माझे मुंबईत घर आहे
२. मला जवळपास सगळे मंत्र-पठण (?) येतात/ येते, जे काय असेल ते..
३. माझी मुलगी फ्रान्समध्ये असते.
४. ती पॅरीसला जाताना बॅग घेऊन गेली होती
५. माझ्याकडे फोन आहे.
इतके सगळे मुद्दे इतक्या कमी शब्दांत सांगणार्‍या मोहन जोशींना मूर्ख कसे म्हणावे?
सन्जोप राव
हम तुझे वली समझते, जो ना वादाखार होता

दोन दिवस?

देवपूजा, श्रद्धा, बापू वगैरे ठीक आहे हो... पण या कथेत कुठेतरी, काहीतरी हरवले आहे. आठ तासांचे दोन दिवस कसे झाले? तेही विश्वासू माणसाबरोबर?
म्हणजे कार बंद पडली असेल, अपघात झाला असेल किंवा ट्रॅफिक जॅम झाला असेल वगैरे...असे काहीतरी.

योग्य मुद्दा

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.विसुनाना यांनी निदर्शनाला आणलेला मुद्दा योग्य आहे.श्री.जोशी यांनी लिहिले आहे ते सगळे खोटे वाटते.परदेशी एकटी गेलेली कन्या.ती तिथे सुखरूप पोहोचल्याचे वेळीं समजले नाही तर तिचे माता-पिता तिच्या मुक्कामाच्या ठिकाणी फोन करणारच.दोन दिवस नुसती वाट पाहात थांबतील हे शक्य वाटत नाही.

हिशोब

मुंबई ते पॅरिस थेट विमानप्रवास स्वस्त नाही असे आढळले, स्वस्त विमानाचा प्रवासकाल १५ तास आहे. पुढे आठ तास प्रवास म्हणजे एक दिवस तसाही अपेक्षितच होता. कैरो किंवा पॅरिसमधूनच तिने संपर्क करण्याची त्यांची अपेक्षा असावी, ती पहिल्या दिवशी पूर्ण झाली नाही, इतकेच. दुसरा दिवस पूर्ण हरवणे मात्र अनाकलनीय आहे.

चर्चा प्रस्ताव हिन दर्जाचा आहे.

मला तरी हा चर्चा प्रस्ताव म्हणजे निव्वळ फालतूगिरी वाटतेय. श्री. मोहन जोशींनी स्वतःहून त्यांचा लेख उपक्रमवर दिला नव्हता किंवा तो लेख इतरांनी कोणीतरी टाकावा म्हणून सांगितले होते. मग त्यांचा उल्लेख करून त्यांच्या नावाने टवाळी करण्याचे कारण काय? त्या लेखाची चर्चा करून कोणती बरं माहिती प्रस्तावक मिळवू इच्छितो?

सामना जास्त खपत नाही म्हणून त्यात भडक व बटबटीत माल सदरांच्या माध्यमातून विकावा लागतो. सामनात लेख हवाय असे सांगून कोणी सामनातील व्यक्ती एखाद्या 'प्रसिद्ध' मराठी व्यक्तीकडे गेला तर त्याला नाईलाज का होईना पण काहितरी चार शब्द सांगावेच लागतील, उगाच नंतर त्रास नको म्हणून. वरील संपादित विचार मला तरी 'औपचारीकता म्हणून जमेल तसे अगदी गोडगोड पाकात लोळवून' त्या विशिश्ट सदरासाठी सांगितलेले वाटतात.
जे सांगितलेय ते खोटेच दिसतेय. तसेच श्री. जोशींना यांनी त्यांचे विचार कोणत्याही बंधनात न राहता लिहायचे ठरवले तर ते त्यांचे खरे विचार ते वेगळेच असतील असे म्हणता येवू शकते.

मी स्वतः देखील वास्तव जीवनात कधी कधी सहजच बोलता-बोलता असंबंद्ध बोलून जातो. परवाच्या दिवशी सकाळी मी बोरीवलीला ट्रेन पकडताना माझे हातातील घड्याळ तुटून पडले. त्याच दिवशी संध्याकाळी कामावरून परत येताना दादरला ट्रेन चढताना पडलो, पायाच्या हाडाला बराच मार लागला. दुसर्‍या दिवशी मात्र असं कां घडलं असं विचार करता करता मी ऑफिसमध्ये आमच्या सांहेबांशी बोलून गेलो की काल सुर्यग्रहण होतं म्हणून तरं नाही ना झाले हे सगळे? माझ्या त्या बोलण्यावर मला बरीच वर्शे ओळखणारे आमचे साहेब देखील खुदकन हसले. त्यांचं ते हसणं पाहताच मी पुन्हा भानावर, माझ्या मुळस्थितीत आलो.

!

स्वतः देखील वास्तव जीवनात कधी कधी सहजच बोलता-बोलता असंबंद्ध बोलून जातो.

खरंच, यावर विश्वास बसत नाही !! ;)

काहीसा असहमत

मी स्वतः देखील वास्तव जीवनात कधी कधी सहजच बोलता-बोलता असंबंद्ध बोलून जातो. - सतीश रावले

हे वाक्य,

मी स्वतः देखील वास्तव जीवनात कधी कधी सहजच बोलता-बोलता सुसंबंद्ध बोलून जातो. असे रावले म्हणाले असते तर मीही म्हणालो असतो

खरंच, यावर विश्वास बसत नाही !! ;)

उत्स्फूर्त चर्चाप्रस्ताव

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
"हा चर्चाप्रस्ताव हीन दर्जाचा आहे" असे श्री.सतीश रावळे यांचे मत आहे.मला वाटते श्री.कोब्या यांनी ते देव्हारा सदर वाचले तेव्हा उद्विग्न होऊन त्यांच्या मुखातून जे सहजोद्गार बाहेर पडले तेच शीर्षक देऊन त्यांनी तिरमिरीत हा प्रस्ताव टंकित केला असावा.फार विचारपूर्वक तोलून-मापून शब्द वापरले नाहीत.मात्र चर्चाप्रस्तावात मनःपूर्वक उत्स्फूर्तता प्रतीत होते.

श्रद्धा आणि मूर्खपणा

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.कोब्या यांचा प्रश्न आहे:

"मोहन जोशी खरेच इतके मूर्ख आहेत का?"

[श्री.मोहन जोशी आणि अन्य सर्व श्रद्धावंत यांची क्षमा मागून]
या प्रश्नाला माझे उत्तर आहे:"हो.काही बाबतीत."
*एखाद्या व्यक्तीचे आचरण(वागणे,बोलणे,लिहिणे यांतील किमान एक)ज्या बाबतीत तर्कविसंगत असते त्या बाबतीत
ती व्यक्ती मूर्ख आहे असे म्हणणे योग्य ठरते.
*तर्कबुद्धी आणि श्रद्धा या गोष्टी परस्पर विरोधी आहेत.ज्या गोष्टीवर माणसाची श्रद्धा असते त्या गोष्टीवर तो तर्कसंगत
विचार करू शकत नाही.म्हणजे तिथे तो मूर्ख ठरू शकतो.
*श्री.मोहन जोशी यांची अनिरुद्ध बापूंवर श्रद्धा आहे."आपल्या कन्येच्या बॅगेत बापूंचा फोटो असल्यामुळे अपरिचित ठिकाणी
तिला विश्वासू माणूस भेटला आणि तिला कोणतीच अडचण आली नाही." असे असंबद्ध विधान श्री.जोशी यांनी लिहिले.
म्हणून त्याबाबतीत ते मूर्ख ठरतात.
* जिथे श्रद्धा असते तिथे मूर्खत्व प्रत्ययास येते.त्यात उजवे--डावे (ग्रेडेशन) करणे शक्य आहे.जसे
...फलज्योतिषावर श्रद्धा--->मूर्ख
...वास्तुदिशाभूलशास्त्रावर श्रद्धा....>महामूर्ख.
.. नाडीग्रंथावर श्रद्धा.....> मूर्खाणां शिरोमणि:

हीन दर्जाच्या प्रस्तावावरील हीन प्रतिसाद

अरे वा! हा मुर्ख आहे, तो मुर्ख आहे अशी प्रमाणपत्रे श्री. यानावाला अगदी सहज व न मागता त्रयस्त व्यक्तींना वाटत आहेत. त्यांच्याकडे जर इतके अधिकार असतील तर या अशा त्यांनी प्रमाणपत्र दिलेल्या मुर्खांशी कसे वागावे? त्यांना सजा, दंड कसा द्यावा? हे ही त्यांनी सांगावे.

मुर्खांशी अमुक एका प्रकारे वागावे याबाबत मी या हीन दर्जाच्या चर्चा प्रस्तावावर मी हीनपणे देत आहे तो श्री. यानावालांना ते आवडल्यास ते या प्रतिसादास प्रतिसादातून उत्तर देतीलच.

'मुर्खांच्या डोक्यावर टोकेरी दगडाने जोरजोरात प्रहार बराच वेळ करीत राहवे. रक्तांच्या चिळकांड्या उडू लागल्या की त्या मोठमोठ्याने चित्कार करीत 'मी शहाणा! मीच शहाणा!' असे मोठ्याने किंचाळावे. त्या मुर्खाची खोपडी फुटली की मग त्यातून मेंदू आपल्या हाताने, रक्ताचा कारंज्याने बरबटलेल्या हातांनी काढत, हात आकाशात उंचावत सभोवार नजर फिरवत पुन्हा मोठ-मोठ्याने ओरडावे म्हणावे 'या जगात मीच आहे शहाणा!, हा सदसदविवेकाचा विजय आहे!' त्यानंतर तो मेंदू जमिनीवर जोरात आपटून त्यावर पाय देवून थयथयाट करीत रहावे.'

चर्चा प्रस्तावाकला देखील असेच बटबटीत प्रतिसाद मिळावेत असे वाटत असावे. मी त्यांची इच्छा पूर्ण केली असल्यास त्यांनी दाद नक्की द्यावी.

---------------------------------
मुळव्याध झालेल्यांनी शंख फुकायचा नसतो.

काय हे?

चर्चा प्रस्तावाकला देखील असेच बटबटीत प्रतिसाद मिळावेत असे वाटत असावे.

काय हे असं (जाहिर) लिहितात? ;)

ऋषिकेश
------------------
<<स्वाक्षरी निद्रीस्त आहे>>

हाहाहाहा

हाहाहा काय प्रतिसाद आहे. मूर्खाणां शिरोमणि:

गांभीर्यपूर्वक विचार

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.रावले सतीश यांनी असे रागावू नये.कृपया हे लक्षात घ्यावे की विवेकवाद्यांनी श्रद्धाळू धार्मिकांना शारीरिक पीडा दिली असे एकही उदाहरण इतिहासात नाही.मात्र धार्मिकांनी विवेकवाद्यांना पाखंडी,नास्तिक,ईश्वरनिंदक म्हणून त्यांचे अनन्वित छळ केल्याची,जिभा कापल्याची,सुळी दिल्याची,सहस्रावधी उदाहरणे आहेत.

नक्की मूर्ख कोण?

नक्की मूर्ख कोण?
मूळ लेखक, प्रकाशक, वाचक की (असे धागे चर्चेसाठी काढून) टिकेद्वारे का होईना अश्या विचाराचा अप्रत्यक्ष प्रसार करणारे?? ;)

ऋषिकेश
------------------
<<स्वाक्षरी निद्रीस्त आहे>>

स्पष्टता

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
**********************************
"नक्की मूर्ख कोण?" असा प्रश्न श्री. ऋषिकेश यांना पडला आहे.खरे तर असा प्रश्न पडण्याचे कारण नाही.
"श्रद्धा आणि मूर्खपणा"या प्रतिसादात या प्रश्नाचे उत्तर स्पष्टपणे दिले आहे.इथे " मूर्खपणा"या शब्दाचा संबंध मतिमंदत्व/मनोरुग्णता यांच्याशी नाही.श्रद्धा ठेवल्याने तर्कशुद्ध विश्लेषक विचारशक्ती ठप्प होते.त्यामुळे श्रद्धाळूचे वर्तन तर्कविसंगत होते.त्यासाठी मूर्खपणा हा शब्द योजला आहे.श्री.कोब्या यांना हाच अर्थ अभिप्रेत असावा. अन्यथा श्री.मोहन जोशी यांना मूर्ख हे विशेषण लावण्याचे काहीच कारण नव्हते.

सहमत आहे

मला अभिप्रेत असलेला अर्थ यनावालांनी नेमक्या शब्दात मांडला आहे.

श्री. ऋषिकेश यांना पडला आहे.खरे तर असा प्रश्न पडण्याचे कारण नाही.

अगदी. इतर स्थळांची वकिली करायला इथे येणार्‍या ट्रोलांकडे फारसे लक्ष देऊ नये. हे धोरण मी अवलंबतो.

अधिक स्पष्ट करतो

"नक्की मूर्ख कोण?" असा प्रश्न श्री. ऋषिकेश यांना पडला आहे.खरे तर असा प्रश्न पडण्याचे कारण नाही

कारण अधिक स्पष्ट करतो.
मूर्ख या शब्दाचा तुम्ही दिलेला अर्थ घेतला आणि जर मोहन जोशींची ही तर्कविसंगत सश्रद्ध मते आहेत ती त्यांनी मांडली म्हणून त्यांना मूर्ख म्हणायचे असेल तर ती वृत्तपत्रात प्रकाशित करून समाजात अशी अंधश्रद्धा / तर्कदुष्ट लेखन पसरवणार्‍यांना मूर्ख का म्हणू नये?
मग कोणी म्हणेल वृत्तपत्रांत काय वाचकांना जे हवे असते -वाचायचे असते- ते छापतात. जर असे असेल तर असे लेखन वाचणारे मुर्ख का नाहीत?
बरं असे (तथाकथित मूर्ख) विचार एखाद्या (तथाकथित मूर्ख वृत्तपत्राने) छापलेच तर (ज्यावर चार शब्दही लिहायची वास्तवात गरज नाही इतक्या तर्कदुष्ट विचाराना) अन्यत्र (ब्लॉग म्हणा, असले धागे म्हणा, किंवा इतरही कोणते माध्यमाने) अश्या प्रकारे प्रकाशित करणार्‍यांना / प्रसारित करणार्‍यांना काय म्हणावे?

तेव्हा अश्या विचारांमुळेच मला हा प्रश्न पडला आहे.
अपेक्षा आहे की माझा विचार मी पोचवू शकलो असेन. नसल्यास श्री यनावाला यांच्या आक्षेपांना/प्रश्नांना यापुढे खरडीतून उत्तरे देईन.

ऋषिकेश
------------------
<<स्वाक्षरी निद्रीस्त आहे>>

फरक

देव्हारा हे सदर आवडणारे सारेच मूर्ख म्हणावेत.
कोब्या आणि इतर उपक्रमींनी देव्हाराचे वाचन करणे, त्यावर धागे काढणे, इ. हे So Bad, It's Good प्रकारात मोडते.
स्त्री भ्रूणहत्येविरुद्ध लेखन करणे हाही स्त्रीभ्रूणहत्येचा प्रचारच होतो काय? हे तर न्यूस्पीक झाले!

प्रकाटाआ

प्रकाटाआ

प्रकाटाआ

हे बरे केलेत...झाली तेवढी शोभा पुरे!

हे म्हणजे कसे की

देव्हारा हे सदर आवडणारे सारेच मूर्ख म्हणावेत.
कोब्या आणि इतर उपक्रमींनी देव्हाराचे वाचन करणे, त्यावर धागे काढणे, इ. हे So Bad, It's Good प्रकारात मोडते.
स्त्री भ्रूणहत्येविरुद्ध लेखन करणे हाही स्त्रीभ्रूणहत्येचा प्रचारच होतो काय? हे तर न्यूस्पीक झाले!

बरोबर. हे न्यूस्पीक अतिशय अनपेक्षित. म्हणजे कसे की अंधश्रद्धांना, बुवाबाबाबापूंना झोडपणाऱ्यांना विवेकवाद्यांना/नास्तिकांना/विज्ञानवाद्यांना आनंद मिळतो आहे ना म्हणून हिरमुसून उगाच काहीतरी हेत्वाभासी युक्तिवाद केल्यासारखा वाटला.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

शिर्षक नक्कीच...

मोहन जोशी असोत किन्वा नसोत, या लेखाचे शिर्षक नक्कीच "मूर्ख" कॅटेगोरीतील आहे.

मोहन जोशी सारख्या दिग्गजांना असे शब्द वापरने बरे नव्हे. कृपया संपादकांनी याची नोंद घेऊन कारवाई करावी.

---------------------
-धनंजय कुलकर्णी

मोहन जोशींसारखे दिग्गज

मोहन जोशींसारखे दिग्गज म्हणजे जे रस्त्यावर दारु पिऊन गोंधळ घालतात आणि मग गावकर्‍यांकडून चोप खातात तेच ना. केवळ ते तथाकथित "दिग्गज" आहेत म्हणून त्यांना काही बोल लावू नयेत अपेक्षा टू मच वाटते.

असो.

जोशींचा धिंगाणा

बुवाबाजीची एन्डॉर्समेन्ट

ह्या अशा प्रवृत्तींना काय म्हणायचे कळत नाही. मूर्ख म्हणावे की लबाड म्हणावे की स्वार्थी ? बरेच जण स्वार्थासाठी एखाद्या बाबाच्या क्लबमध्ये जातात. रोटरी क्लबबिब असतात ना तसेच हे सत्संग. काही जण तिथे आपला स्वार्थ साधण्यासाठी जातात. म्हणजे नेटवर्किंग वगैरे होते. धंद्याला वगैरे मदत होते. काही खरेच गांजलेले असतात. असो. ही सिलेब्रिटी किंवा प्रसिद्ध मंडळी बुवाबाजीची एन्डॉर्समेन्ट करतात त्यामुळे समाजात अंधश्रद्धा फोफावतो. सचिन तेंडुलकर आपल्या क्रिकेट ब्यागेत सत्यसाईबाबा नावाच्या पिकपॉकेटाचा फोटो ठेवतो हे बघून अनेक जणांनी त्याचे अनुकरण केले असल्यास नवल नाही. राजकारणी मंडळींचेही आपले बुवाबाबा ठरलेले असतातच. कुणी 'गण गणात बोते' वाले तर 'कुणी भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' वाले. नवी माध्यमे आल्यापासून आपला समाज अंधश्रद्धेच्या चिखलात अधिकच खोलवर रुतत चालला आहे. फेसबुकवर, इथे तिथे, जिकडे तिकडे ह्या बापू-बाबा समर्थकांनी नुसता उच्छाद मांडला आहे. घाणीवर गुलाबपाणी शिंपण्याचे काम चालू आहे.

असो. उपक्रम असो वा इतर कुठलीही जागा, माझ्यामते संधी मिळेल तिथे अशा प्रवृत्तींना नंगे करायला हवे. आता हा अप्रोच अनेकांना पटत नाही. कशाला पंगे घ्यायचे. अशाने लोक नाराज होतात. आपण कसे गनिमी काव्याने लढावे वगैरे वगैरे काही जणांना वाटते. पण त्याबद्दल पुन्हा कधी.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

खरे आहे.

असो. उपक्रम असो वा इतर कुठलीही जागा, माझ्यामते संधी मिळेल तिथे अशा प्रवृत्तींना नंगे करायला हवे. आता हा अप्रोच अनेकांना पटत नाही. कशाला पंगे घ्यायचे. अशाने लोक नाराज होतात. आपण कसे गनिमी काव्याने लढावे वगैरे वगैरे काही जणांना वाटते. पण त्याबद्दल पुन्हा कधी.
खरे आहे. पटले. एकूणात पोलिटिकली करेक्ट राहायचे. ठाम असे काही मत ठेवायचे नाही. तुमच्यावर बेलभंडारा, तुमच्यावर खारीकखोबरे असे उधळत गोग्गोड, गुलाबजांबी संबंध ठेवायचे. मायबोलट अहो रुपम अहो ध्वनी..
सन्जोप राव
हम तुझे वली समझते, जो ना वादाखार होता

जे दिसतं तेच सत्य असतं कां?

आपले हित सांभाळण्यासाठी वा भविश्यात आपल्याला एखाद्यापासून त्रास होवू नसे असे मानून 'खोटं बोलणं' हे चूकीचं कसं असू शकेल?

मी वर म्हटल्याप्रमाणेचे म्हणतो की-
सामना जास्त खपत नाही म्हणून त्यात भडक व बटबटीत माल सदरांच्या माध्यमातून विकावा लागतो. सामनात लेख हवाय असे सांगून कोणी सामनातील व्यक्ती एखाद्या 'प्रसिद्ध' मराठी व्यक्तीकडे गेला तर त्याला नाईलाज का होईना पण काहितरी चार शब्द सांगावेच लागतील, उगाच नंतर त्रास नको म्हणून. वर जे श्री. मोहन जोशींचे विचार म्हणून असे भासवले आहे ते केवळ प्रत्येकाची गरज म्हणून ते अस्तित्त्वात आलेले लिखाण आहे. वर्तमानपत्रात काहितरी छापयचे आहे, धर्माशी संबंधित सदर हवे आहे, ते सदर लोकांनी वाचायला हवे तर प्रसिद्ध माणसाची मुलाखत घेतली जायला हवी, मुलाखत हवी तर त्या व्यक्तीशी संपर्क करताना आपण कोठून आलो आहोत हे सांगावेच लागते. माहितीदार-बातमीदाराला प्रसिद्ध व्यक्ती ज्या एकाच क्रायटेरीया डोळ्यासमोर ठेवून निवडलेल्या व्यक्तीला काहितरी प्रश्न विचारायचे आहेत. समोर आलेल्या प्रश्नांना शहाणपणाने पण वरील बाबी ध्यानात ठेवून उत्तरं दिली तर प्रस्तुत सदरात दिली आहेत तशीच उत्तरे दिली जातील. श्री. मोहन जोशी हे अभिनेते आहेत त्यांना हे अशा प्रसंगात अभिनय करण्याची गरज नाही. त्यांनी वरील त्यांच्या उत्तरावरून तयार करण्यात आलेल्या लेखात कोठेही म्हटलेले नाही कि माझी श्री. अनिरूद्ध बापूंवर श्रद्धा आहे. माझी खात्री आहे की श्री. मोहन जोशी हे बेरकेपणाने भरलेले हजरजबाबीपणातून त्यांच्याकडे आलेल्या सामनाच्या व्यक्तीकडील अशी एखादी वस्तू पाहिली असेल ज्यावर श्री. अनिरूद्ध बापूंचा फोटो असेल. तो फोटो त्यांनी वेळ मारून नेत असलेल्या उत्तरांची सांगता कशी करायची? हा विचार घोळवत असताना शेवटची दीड वाक्ये उच्चारली असावीत. ह्या दिड वाक्यातील अर्ध्या वाक्यावरून ते बुवाबाजीचे एन्डोर्समेंट करतात असे मानणे चूकीचे वाटते.

तो येक मूर्ख

इथे जे चालले आहे ते वाचून समर्थवचनांची आठवण झाली. ज्याला जे आपले वाटेल त्याने ते घ्यावे.

समर्थावरी अहंता । अंतरीं मानी समता । सामर्थ्येंविण करी सत्ता । तो येक मूर्ख ॥ ११॥

आपली आपण करी स्तुती । स्वदेशीं भोगी विपत्ति । सांगे वडिलांची कीर्ती । तो येक मूर्ख ॥१२॥

अकारण हास्य करी । विवेक सांगतां न धरी । जो बहुतांचा वैरी । तो येक मूर्ख ॥ १३॥

आपुलीं धरूनियां दुरी । पराव्यासीं करी मीत्री । परन्यून बोले रात्रीं । तो येक मूर्ख ॥ १४॥

मान अथवा अपमान । स्वयें करी परिच्छिन्न । सप्त वेसनीं जयाचें मन । तो येक मूर्ख ॥ १६॥

आपणाहून जो श्रेष्ठ । तयासीं अत्यंत निकट । सिकवेणेचा मानी वीट । तो येक मूर्ख ॥ १९॥

अतिताचा अंत पाहे । कुग्रामामधें राहे । सर्वकाळ चिंता वाहे । तो येक मूर्ख ॥ ६२॥

दोघे बोलत असती जेथें । तिसरा जाऊन बैसे तेथें । डोई खाजवी दोहीं हातें । तो येक मूर्ख ॥६८॥

आपलें काज होये तंवरी । बहुसाल नम्रता धरी । पुढीलांचें कार्य न करी । तो येक मूर्ख ॥

'तीन बोटं आपल्यादिशेने' राहतात हे रामदासांना कळले नव्हते.

रामदास स्वामींना कुणीतरी हे देखील सांगायला हवे होते....

'सावधान' शब्द पडता कानी| ढुंगणास पाय लावोनी|
पलायन करी बोहल्यावरूनी| तो येक मूर्ख ||

कदाचित

तीन बोटे आपल्याकडे आहेत हे कळण्याइतपत रामदासस्वामी नक्कीच ज्ञानी होते. कदाचित, रामदासस्वामींनी सर्व बोटेही स्वतःच्या दिशेने वळवली असतील. मूर्खांची लक्षणे सांगताना "मी त्यातला नव्हेच" असा प्रतिवाद त्यांनी केल्याचे आठवत नाही. असो.

ही बोटे उगाच नाहीत

श्री. रावले हे उगाच बोटे करीत नाहीत असे वाटते. त्यांना अशी टीका करून रामदासांच्या विचारांचा 'आपल्या उपक्रमावर' प्रचार-प्रसार करीत आहेत. त्यांची प्रसिद्धी करीत आहेत.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

अनर्थ

"बोटे करणे" म्हणजे "उंगली करना" या अर्थाने?

अवांतरः बोट लावेन तेथे गुदगुल्या

बोटचेपेपणा सोडून अवांतराचा दोष घेते पण या प्रतिसादाची प्रकर्षाने आठवण झाली.

तो एक

मस्त

चूक काय?

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.रावले सतीश लिहितात,

अरे वा! हा मुर्ख आहे, तो मुर्ख आहे अशी प्रमाणपत्रे श्री. यानावाला अगदी सहज व न मागता त्रयस्त व्यक्तींना वाटत आहेत.

...
कोणत्या त्रयस्थ व्यक्तीला प्रमाणपत्र दिले? त्या व्यक्तीचे नाव काय? कोणाही व्यक्तीला मी प्रमाणपत्र दिलेले नाही.पुढील गोष्टी/तत्त्वे खरी आहेत असे मानणारे
अनेकजण आहेत.ते स्वातंत्र्य त्यांना आहेच.पण अशा श्रद्धाळूंना मूर्ख ठरविण्यात काय चूक आहे त्यावर गांभीर्याने विचार करावा.
*इथून १४० कोटी कि.मि दूर असलेला शनिग्रह तीस वर्षांच्या भ्रमण कालावधीत पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीला साडेसात वर्षे पीडा देतो.
शिंगणापूर येथील एका उभ्या दगडाला तेल माखल्यास ती पीडा टळते.
*घरातील जलस्थान(पाण्याचे पिंप ठेवण्याची जागा) दक्षिणेकडे असल्यास गृहलक्ष्मीचा अकाली मृत्यू संभवतो.
* सैपाकाचा ओटा वायव्य-नैऋत्य असल्यास वास्तुपुरुष संतुष्ट होतो आणि अन्नपदार्थ स्वादिष्ट आणि आरोग्यपूर्ण बनतात.
* पतीला मद्यपानाचे व्यसन असेल तर पत्नीने त्याच्या दारूच्या बाटल्या ईशान्य दिशेला ठेवाव्या. म्हणजे त्याला मद्यपानाची इच्छा होणार नाही.
*जगातील यच्चयावत् सर्व माणसांचे भविष्य त्रिकालज्ञ ऋषींनी नाडिग्रंथात लिहून ठेवले आहे. तसेच प्रत्येकाच्या आई-वडिलांची नावेही त्यात लिहिली आहेत.

पेट साफ तो दिमाग साफ, दिमाग साफ तो दृश्टी साफ!

श्री. यानावाला यांच्याकडून त्यांच्या श्रद्धा आणि मूर्खपणा ह्या प्रतिसादातून खालील वाक्ये लिहीली गेली.


१> *एखाद्या व्यक्तीचे आचरण(वागणे,बोलणे,लिहिणे यांतील किमान एक)ज्या बाबतीत तर्कविसंगत असते त्या बाबतीत
ती व्यक्ती मूर्ख आहे असे म्हणणे योग्य ठरते.

२> *तर्कबुद्धी आणि श्रद्धा या गोष्टी परस्पर विरोधी आहेत.ज्या गोष्टीवर माणसाची श्रद्धा असते त्या गोष्टीवर तो तर्कसंगत
विचार करू शकत नाही.म्हणजे तिथे तो मूर्ख ठरू शकतो.

३>*श्री.मोहन जोशी यांची अनिरुद्ध बापूंवर श्रद्धा आहे."आपल्या कन्येच्या बॅगेत बापूंचा फोटो असल्यामुळे अपरिचित ठिकाणी
तिला विश्वासू माणूस भेटला आणि तिला कोणतीच अडचण आली नाही." असे असंबद्ध विधान श्री.जोशी यांनी लिहिले.
म्हणून त्याबाबतीत ते मूर्ख ठरतात.

४>* जिथे श्रद्धा असते तिथे मूर्खत्व प्रत्ययास येते.त्यात उजवे--डावे (ग्रेडेशन) करणे शक्य आहे.जसे
...फलज्योतिषावर श्रद्धा--->मूर्ख
...वास्तुदिशाभूलशास्त्रावर श्रद्धा....>महामूर्ख.
.. नाडीग्रंथावर श्रद्धा.....> मूर्खाणां शिरोमणि:

वरील क्रमांक १ प्रमाणे श्री. यनावाला यांच्या विधानानुसार जो लिहीणे/वागणे इत्यादी बाबत तर्कविसंगत असतो तो मूर्ख असतो असे म्हटले गेले आहे. ओके. हाताच्या कंकणाला आरसा कशाला?

श्री. यानावालां स्वतःच स्वतःला ते विवेकवादी आहेत असे म्हणून घेतात परंतु त्यांनी श्री. मोहन जोशी यांचा लेख व्यवस्थित वाचला होता का ते आता पाहू.

"आपल्या कन्येच्या बॅगेत बापूंचा फोटो असल्यामुळे अपरिचित ठिकाणी तिला विश्वासू माणूस भेटला आणि तिला कोणतीच अडचण आली नाही." हे श्री. यानावाला यांजकडून लिहीले गेलेले विधान प्रत्यक्शात श्री. जोशी यांच्या लेखात कोठे आहे कां? श्री.मोहन जोशी यांनी माझी अनिरुद्ध बापूंवर श्रद्धा आहे असे कोठे लिहीले आहे?

प्रत्यक्शात जे लिहीले आहे त्याचा क्रम कसा आहे. वाक्यक्रमाची अदलाबदल करणं म्हणजे 'तर्कसंगतपणा' होतो कां? व्यवस्थित वाचन न करता ते ते एकामागोमाग प्रतिसाद देत विचारत आहेत, 'चूक काय'?

ह्या दोन प्रश्नांचे उत्तर मिळाले की उरलेल्या क्रमांक २ व ४ या मुद्द्यांकडे जायची गरज उरायची नाही. कारण यानावाला यांची ज्या गोश्टींवर श्रद्धा आहे त्यातूनच - 'जिथे श्रद्धा असते तिथे मूर्खत्व प्रत्ययास येते' ह्या वाक्यातील त्यांना अभिप्रेत असलेला अर्थ समजून घेता येईल.

 
^ वर