आठवण - आत्माराम सदाशिव जयकर

१९व्या शतकामध्ये प्रथम डेक्कन कॉलेज, नंतर १८४५ मध्ये ग्रॅंट मेडिकल कॉलेज, १८५५ मध्ये गवर्नमेंट लॉ कॉलेज, १८५६ मध्ये एल्फिन्स्टन कॉलेज, १८५७ मध्ये मुंबई विद्यापीठ अशा संस्थांच्या माध्यमातून आधुनिक शिक्षणाचा पाया महाराष्ट्रात घातला गेला. नवशिक्षितांच्या पहिल्या-पहिल्या पिढयांतील अनेक कर्तबगार व्यक्ति ज्ञात आहेत पण अशाहि काही व्यक्ति आहेत की त्यांची कर्तबगारी आणि कार्य आज जवळजवळ विस्मरणात गेलेले आहेत. ले.क. आत्माराम सदाशिव जयकर हे अशांपैकी एक. इंटरनेटच्या मदतीने त्यांची थोडीफार आणि अगदी त्रोटक अशी ओळख उरली आहे आणि हा लेख तिचाच आढावा आहे.इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ इइइइइइइइइइइइइइइइ इइइइइइइइइइइइ इइइइ इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ इइइइइइइइइइइइइइइइ इइइइइइइइइइइइ इइइइइइइइइइइइ इइइइइइइइइइइइइइइइइइइ इइइइइ
’मस्कती जयकर’ ह्या नावाने ओळखल्या जाणार्‍या जयकरांचा जन्म १८४४ मध्ये आणि मृत्यु १९११ मध्ये झाला अशी नोंद सापडते. १८६३-६४ च्या पुढेमागे त्यांनी ग्रॅंट मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि १८६६ मध्ये त्यांना Licentiate of Medicine (LM) ही पदवी मिळली. तेव्हा नव्याने सुरू झालेल्या मंगळदास नथुभाई प्रवास शिष्यवृत्तीच्या आधारे ते त्याच वर्षी पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी इंग्लंडास गेले. तेथे त्यांनी Member of Royal College of Surgeons (MRCS) ही पदवी मिळवली आणि खुल्य़ा स्पर्धेच्या मार्गे Indian Medical Service (IMS) ह्या covenanted म्हणजे सनदी सेवेत प्रवेश केला. (असे घडणे फार दुर्मिळ होते. ह्या आणि अशा वरच्या दर्जाच्या सेवांमध्ये ’नेटिवांना’ प्रवेश जवळजवळ नव्ह्ताच. त्यातील सर्व अधिकारी गोरे असत आणि हिंदुस्तानी डॉक्टरांना Subordinate Medical Service वर समाधान मानावे लागत असे.) इंग्लंडहून परत आल्यावर त्यांनी मुंबई सरकारच्या वैद्यकीय सेवेत प्रवेश केला. १८७० साली अहमदाबाद येथे त्यांनी हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला असे दिसते. त्याच वर्षी त्यांची मस्कत येथील पोलिटिकल एजंटच्या ऑफिसात वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणूक झाली आणि त्या सालापासून १९०० साली त्यांनी सरकारी नोकरी सोडली तोपर्यंत ३० वर्षे त्यांचे वास्तव्य मस्कत येथे झाले. (ह्यावरूनच त्यांना ’मस्कती जयकर’ असे उपपद प्राप्त झाले.) ह्या ३० वर्षात ते लेफ्टनंट पासून अखेरीस लेफ्टनंट कर्नल पर्यंत चढले. गोर्‍या एजंटाच्या अनुपस्थितीत दोन-तीनदा पोलिटिकल एजंटच्या जागेचेहि काम त्यांनी केले. हिंदुस्तानी डॉक्टरकडून - तो इंग्लंडहून वैद्यकीय शिक्षण घेऊन आलेला असला तरीहि - उपचार करून घ्यायला इंग्रज, विशेषतः स्त्रिया, तयार नसत ह्यामुळेहि मस्कतमध्येच राहणे त्यांनी पसंत केले असेल काय असा संशय येतो.इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ इइइइइइइइइइइइइइइइ इइइइइइइइइइइइ इइइइ इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ इइइइइइइइइइइइइइइइ इइइइइइइइइइइइ इइइइइइइइइइइइ इइइइइइइइइइइइइइइइइइइ इइइइइ

सरडा
सरडा
बोकड
बोकड
सर्प
सर्प

आज जयकरांची जी ओळख उरली आहे ती वैद्यकीय सेवेच्या बाहेर Natural History तसेच अन्य क्षेत्रातील त्यांच्या संशोधनामुळे. ओमानमध्ये Tahr डोंगरी बोकड (Hemitragus Jayakari), Fakhakh सरडा (Agama Jayakari), and the Small Boa सर्प (Eryx Jayakari) असे तीन प्राणिविशेष त्यांनी वेगळे ओळखले आणि त्यांच्या नावाने ते ते प्राणि आज ओळखले जातात. ओमानच्या समुद्रातील २२ माशांच्या जाती त्यांनी नव्याने ओळखल्या आणि ब्रिटिश म्यूझियमच्या संग्रहामध्ये ठेवण्यासाठी पाठविल्या. त्यांपैकी ७ जातींना त्यांचे नाव देण्यात आले आहे.इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ इइइइइइइइइइइइइइइइ इइइइइइइइइइइइ इइइइ इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ इइइइइइइइइइइइइइइइ इइइइइइइइइइइइ इइइइइइइइइइइइ इइइइइइइइइइइइइइइइइइइ इइइइइ
मस्कतमध्ये ३० वर्षे राहिल्यामुळे त्यांचा अरबी भाषेचा चांगला व्यासंग होता. Hayat al Hayawan ह्या अल-दामिरीच्या अरबी भाषेतील प्राणिकोषाचे त्यांनी इंग्रजी भाषेत भाषान्तर केले. Omani Proverbs हे ओमानमधील अरबी भाषेतील म्हणींचा त्यांनी केलेला संग्रह हे ह्या विषयातले आजचे सर्वात उत्तम पुस्तक मानले जाते.इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ इइइइइइइइइइइइइइइइ इइइइइइइइइइइइ इइइइ इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ इइइइइइइइइइइइइइइइ इइइइइइइइइइइइ इइइइइइइइइइइइ इइइइइइइइइइइइइइइइइइइ इइइइइ
हिंदुस्थानातले त्यांचे लक्षणीय कार्य म्हणजे Bombay Natural History Society ह्या संस्थेच्या संस्थापक-सदस्यांपैकी ते एक होते.इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ इइइइइइइइइइइइइइइइ इइइइइइइइइइइइ इइइइ इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ इइइइइइइइइइइइइइइइ इइइइइइइइइइइइ इइइइइइइइइइइइ इइइइइइइइइइइइइइइइइइइ इइइइइ
असे म्हणता येते की त्यांचे उमेदीतील सर्व कार्य हिंदुस्थानाबाहेर झाल्याने आणि ते अरबी भाषा आणि Natural History सारख्या अपरिचित विषयांतले असल्यामुळे त्यांची म्हणावी तितकी ओळख हिंदुस्थानात उरली नाही. वर नोंदवल्यापलीकडे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी काहीच माहिती वा त्यांचे एखादे चित्र वा छायचित्र मिळू शकले नाही. त्यांची थोडी दखल अलीकडेच घेण्यात आली आहे. पर्यावरणाच्या क्षेत्रात महत्त्वाचे कार्य करणार्‍या भारतीय संशोधकाला दरवर्षी ओमान-स्थित भारतीय समाजातर्फे ’जयकर पुरस्कार’ दिला जातो.इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ इइइइइइइइइइइइइइइइ इइइइइइइइइइइइ इइइइ इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ इइइइइइइइइइइइइइइइ इइइइइइइइइइइइ इइइइइइइइइइइइ इइइइइइइइइइइइइइइइइइइ इइइइइ
(ही माहिती खालील संस्थळांमधून मिळविली आहे.
www.jstor.org/stable/301842
http://www.jstor.org/discover/10.2307/1782976?uid=3739448&uid=2129&uid=2...
http://www.prideofindia.net/sc2.html
British Embassy in Oman Website http://ukinoman.fco.gov.uk/en/about-us/our-embassy/embassy-history
http://www.kau.edu.sa/Files/320/Researches/57305_27536.pdf
http://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC3121022/

तसेच books.google.com येथील खालील पुस्तके उपयोगी पडली आहेत.
Western medicine and public health in colonial Bombay, 1845-1895 by Mridula Ramanna, pp. 17,21,24.
The Medical times and gazette: Volume 1 (1870), p. 164.
Illustrated London News 1869, Vol 55 p. 199.
Anthropological Society of Bombay Journal 1886.
Natural Science March-December 1892.
The Speeches and Addresses of Sir H.B.E. Frere, G.C.S.I., K.C.B., - p. 115.)

Comments

आठवण आवडली

माहितीचा हा तुकडा सर्वस्वी नवा होता. आवडला. येथे दिल्याबद्दल धन्यवाद.

वेगळीच आणि नवीन माहिती

वेगळीच आणि नवीन माहिती आहे.

धन्यवाद.

मौलिक

उत्तम आणि वेगळी माहिती. जयकरांनी ह्यांनी वेगवेगळ्या विषयांत फारच मौलिक काम केलेले दिसते.

जाता जाता:
स्मोल बोआसाठी सॅन्ड बोआ हेही नाव दिसले.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

महाराष्ट्र टाइम्समध्ये काही वर्षांपूर्वी आलेली बातमी

"एकोणिसाव्या शतकात मस्कत येथे ३० वर्षे वास्तव्य केलेले ओमानचे प्रसिद्ध प्राणिशास्त्रज्ञ लेफ्टनन्ट कर्नल डॉ. आत्माराम सदाशिव ग्रँन्डिन जयकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या नावे ओमान सरकारने सुरू केलेल्या पर्यावरण पुरस्कारासाठी यंदाच्या वर्षी भारताच्या माजी पर्यावरण मंत्री व पर्यावरणवादी नेत्या मेनका गांधी यांची निवड करण्यात आली. अलीकडेच त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

"सन १८४४ साली मुंबईत जन्मलेल्या डॉ. आत्माराम जयकर या महाराष्ट्रीय व्यक्तीने भारताचा झेंडा मस्कतेत रोवला. एकोणिसाव्या शतकात त्यांनी केलेल्या आखाती देशातील अनामिक प्राण्यांचा शोध इंग्लंडच्या नॅचरल हिस्ट्री सोसायटी म्युझिअमच्या सायंटिफिक रिसर्च फाइल्समध्ये डॉक्युमेन्ट झाला आहे. त्या प्राण्यांना, शोधून काढणार्‍या डॉ. जयकर यांचे नावही दिले गेले आहे. डॉ. जयकर यांच्या नावे पुरस्कार अस्तित्वात येण्यास इतिहासतज्ज्ञ प्रताप वेलकर यांनी संकलित केलेला ओमान, अलाह्‌ज सँक्चुअरी, रिसर्च पेपर्स १८७३-१९०० बाय डॉ. ए. एस. जी जयकर हा ग्रंथ कारणीभूत ठरला. मस्कतचे जे. डब्ल्यू. रिची, पत्रकार डॉ. अरुण टिकेकर, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे डायरेक्टर जे. सी. डॅनिअल, वैद्यकइतिहासतज्ज्ञ डॉ. शुभदा पंड्या यांनी याकामी पाठपुरावा केला.

प्रदूषण, जंगलतोड, ऍनिमल राइट्‌स, प्राण्यांचे संरक्षण, आदी विषयांवर मेनका गांधी यांनी केलेला ध्येयवादाचा पुरस्कार व त्यासाठी केलेली धडपड यांचा सन्मान म्हणून त्यांची यावर्षी या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे ओमान सरकारने म्हटले आहे. ओमान हा पर्यावरणरक्षणात जगात आघाडीवर असून युनोचा जागतिक पुरस्कारही ओमानलाच मिळत आला असल्याने या पुरस्काराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. "
---वाचक्नवी

ग्रँन्डिन?

वाचक्नवी ह्यांच्या प्रतिसादात डॉ. जयकरांचे नाव ' डॉ. आत्माराम सदाशिव ग्रँन्डिन जयकर' असे दाखविले आहे. मी पाहिलेल्या अनेक जागी ह्या शब्दाचा उपयोग दिसतो. जेथे त्यांचे नाव इंग्रजीत आलेले आहे तेथे बरेचदा ते 'A.S.G.Jayakar' असे छापलेले आहे. ह्या ग्रॅन्डिनने मीहि बुचकळयात पडलो आहे. काय अर्थ असावा ह्या शब्दाचा आणि डॉक्टरांच्या नावात तो कसा शिरला असावा ह्याबाबत मला काहीच मिळले नाही. कोणा उपकारकर्त्याच्या आदरातून त्यांनी आपल्या नावात त्याच्या नावाचा समावेश केला असावा काय?

(ता.क. अजून एक तपशील मला आजच मिळाला. त्यांची सर्जन-मेजर ह्या पदावर बढती ३० सप्टेंबर १८७९ ह्या दिवसापासून झाली. पहा http://www.london-gazette.co.uk/issues/24794/pages/7536/page.pdf. अन्य एका ठिकाणी मिळालेल्या धाग्यावरून
Indian Army Quarterly List for 1 January 1912 असा शोध घेतला तेव्हा त्यांची ले.क. अशी बढती ३० एप्रिल १८८७ ह्या दिवशी आणि निवृत्ति २३ एप्रिल १९०० ह्या दिवशी झाली असे कळले. तेव्हा त्यांचे वय ५५ असल्यास त्यांची जन्मतारीख २३ एप्रिल १८४४ असावी असे दिसते.)

तेवीस नाही, चोवीस एप्रिल

निवृत्ती २३ एप्रिल १९०० ह्या दिवशी झाली असेल तर जन्मतारीख २४ एप्रिल १८४५ असली पाहिजे. साल सोडून दिले तरी तारीख नक्की २४ एप्रिल.

ग्रॅन्डिन हे आडनाव आहे हे उघड आहे. कदाचित ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केल्यावर हे नाव त्याचवेळी दिले गेले असेल.....वाचक्नवी

धन्यवाद

अरेच्चा, आपले पूर्वज असेही होते तर! खूप म्हणजे खूपच ह. घ्या. :-)

बाकी ओळख अतिशय आवडली. धन्यवाद.

जयकरांच्या स्कॉलरशिप बद्दल हा एक गंमतीदार दुवा मिळाला.

ग्रेटच

या थोर व्यक्तीची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.
त्यांच्या नावावर असलेल्या प्राणीजातींची यादी पाहून थक्क झालो.

 
^ वर