प्रकाशन समारंभ :- पानिपत असे घडले

पानिपत स. १७६१ विषयी उपलब्ध मराठी संदर्भ साधनांच्या आधारे मी ' पानिपत असे घडले ' या ग्रंथाचे / पुस्तकाचे लेखन केले आहे. या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ दिनांक १७ मे २०१२ रोजी ठाणे शहरात करण्याचे ठरले आहे. तर ज्यांना या समारंभास येणे शक्य होईल त्यांनी येण्याची कृपा करावी हि विनंती. तसेच, या पुस्तकाला प्रसिद्ध लेखक श्री. संजय सोनवणी यांची प्रस्तावना असून ती खालील संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
http://sanjaysonawani.blogspot.in/2012/04/blog-post_17.html

Comments

प्रकाटाआ

प्रकाटाआ

पुस्तक विषयक

\"पानिपत असे घडले...\"
पानिपतचे युद्ध हा मराठी माणसाच्या अपार कुतुहलाचा विषय आहे. यापुर्वी कै. त्र्यं.शं. शेजवलकरांचे \"पानिपत:१७६१\" हे पुस्तक सोडले तर पानिपतवर संशोधनपुर्वक असे लेखन गेल्या पन्नास वर्षांत झालेलेच नव्हते. संजय क्षीरसागरांनी अथक परिश्रम घेत पानिपत युद्धाच्या पार्श्वभुमीचा व प्रत्यक्ष युद्ध व युद्धोत्तर घटनांचा चहुअंगाने वेध घेत आजवर अनुत्तरीत असलेल्या असंख्य प्रश्नांची उत्तरे उपलब्ध सर्वच पुराव्यांच्या प्रकाशात शोधण्याचा एक यशस्वी प्रयत्न करत पुर्वाचार्यांच्या या विषयाबाबतच्या लेखनावर कळस चढवला आहे.
पानिपतबाबत एवढे सखोल व तटस्थ व तर्कशुद्ध संशोधन प्रथमच एवढ्या पुराव्यांसह य ग्रंथात मांडले गेले असल्याने या ग्रंथाचे मोल अत्यंत आगळे असेच आहे. प्रत्येकाच्या संग्रही असलाच पाहिजे असा हा ग्रंथ ! ---- संजय सोनवणी

पानिपत असे घडले...
ले. संजय क्षीरसागर
प्रकाशक: पुष्प प्रकाशन
प्रुष्ठ्संख्या: ५८८
मुल्य: रु. ५००/- मात्र
सवलत मुल्य: रु. ३५०/- मात्र.

येथे उपलब्ध :- भारत बुक हाउस
१७८८, सदाशिव पेठ, देशमुखवाडी, पुणे – ३०
फोन नंबर :– ०२० – ३२५४८०३२/३३
मोबाईल नंबर :- ९८५०७८४२४६

मूळ लेख वरील लेखात समाविष्ट केला आहे याची कृपया नोंद घ्यावी. - संपादन मंडळ.

झैरात

जुन्या धाग्यातच प्रतिसाद देणे कमी अनुचित ठरले असते.
(पुष्प प्रकाशनाचे मालक स्वतः सोनवणीच आहेत.)

 
^ वर