सम्राट अशोक व सांची येथील स्तूप

चित्रा ताईंनी सम्राट अशोकाबद्दल सुरू केलेल्या धाग्याने माझ्या संग्रहात असलेल्या 4 फोटोंची आठवण झाली. (फोटो मी काढलेले नाहीत. उतरवून घेतलेले आहेत. आज परत यूआरएल शोधण्याचा प्रयत्न केला पण यश आले नाही. मूळ छायाचित्रकाराला फोटोंचे पूर्ण क्रेडिट देऊन विषयाकडे वळतो.)
हे फोटो सांची स्तूपाच्या बाजूला असलेल्या प्रवेशद्वारावरील तोरणांचे आहेत. या तोरणांवरील शिल्पकला सुमारे 2200 वर्षांपूर्वीची असून जगप्रसिद्ध आहे.

पहिले शिल्प सम्राट अशोकाने बुद्ध गयेतील बोधी वृक्षाला दिलेल्या भेटीच्या वेळचे आहे. सम्राट अशोक कोणत्याही शिल्पात कधी चित्रण केलेला आढळत नाही. सांची स्तूपावरील या दोन शिल्पात फक्त अशोकाचे चित्रण आहे. त्यामुळे या शिल्पाला अनन्य साधारण महत्व आहे.

दुसरे शिल्प सम्राट अशोकाने केलेल्या रामग्राम येथील बुद्धाच्या अस्थी हलवण्याच्या प्रयत्नासंबंधीचे आहे. या ठिकाणी नागा राजाच्या विरोधाने अशोकाला यश मिळाले नाही असा प्रसंग चित्रित केला आहे.

तिसरे शिल्प म्हणजे बुद्धाच्या महानिर्वाणानंतर त्यांच्या अस्थी मालस देशाच्या राजाने कुशीनगर येथे आणल्याचा प्रसंगाचे चित्रण आहे.

चौथ्या शिल्पात बुद्धांच्या अस्थी आपल्या ताब्यात द्याव्यात म्हणून अनेक राजांनी सेना आणून कुशीनगरला वेढा घातला असल्याचा प्रसंग आहे. पुढे या राजांना अस्थी देण्यात आल्या व लढाई झालीच नाही.

सांची येथील जुना स्तूप स्वत: सम्राट अशोकाने बांधला होता व अशोकाची पत्नी तेथे वास्तव्य करत होती. अशोकाचा पुत्र महेंद्र त्याची पत्नी देवी व त्याची मुलगी हे अशोकाच्या पत्नीला भेटण्यासाठी सांची येथे आले होते. सध्याचा स्तूप शुंग काळातील इ.स.पूर्व 2 रे शतक या वेळी अशोकाने बांधलेल्या स्तूपाच्या बाहेर बांधलेला आहे. ब्रिटिश संशोधकांनी या स्तूपात काही अवशेष सापडतात का म्हणून खोदाई केली होती परंतु त्यांना काही सापडले नव्हते.

लेखनविषय: दुवे:

Comments

फोटो दिसत नाहीत

फोटो दिसत नाहीत. कृपया खालील दुव्यावर जाऊन ते बघावेत

चन्द्रशेखर

[ फोटोंचे दुवे चुकले होते. दुव्याचा शेवट इमेज फायलीच्या एक्सटेन्शनाने होतो आहे (उदा. .jpg, .png, .gif) हे सुनिश्चित करावे आणि मग फोटो टाकावा. -- संपादन मंडळ ]

ही तोरणे

ही तोरणे इतक्या जवळून पाहिली नव्हती.

बाकी नंतर लिहीते.

तोरणांविषयी थोडेसे

सांचीचा स्तूप वास्तुकलेपेक्षा तोरणांच्या अलंकरणासाठी प्रसिद्ध आहे. आधी इथे लाकडी कठडे होते. ते जाऊन मग दगडकाम आले आणि तोरणे आली. प्रत्येक तोरण दोन चौरस स्तंभाचे बनलेले आहे. ह्या स्तंभांच्या वर तीन बाकदार नक्षीदार चौकट पट्ट्या आहेत. ह्या चौकट पट्ट्यांना ढेरपोट्या वामनमूर्ती किंवा प्राणी आधार देताना दिसतात. ह्या तोरणांचे डिझाइन बांबूच्या उचलद्वारांसारखे आहे.

सांचीचे एक तोरण ( ट्रेकअर्थ डॉट कॉम वरून साभार)

ह्यानिमित्ताने स्तूपांविषयी आणि बौद्ध वास्तुकलेबाबत चर्चा झाल्यास उत्तम.

पटता तो टेक. नहीं तो रामटेक.

उत्तम चित्रे आणि माहिती

चित्रे उत्तम आहेत. त्यामानाने माहिती त्रोटक असली तरी चर्चेतून पुढे येईल असे समजते. अधिक माहितीच्या अपेक्षेत.

 
^ वर