ममता शर्मांचं वक्तव्य

या ममता शर्मा कोण?
या आहेत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा. जयपूरमधल्या एका कार्यक्रमातल्या भाषणात त्यांनी आधुनिकतेचा आव आणत, "स्वतःला 'सेक्सी' म्हणवून घेण्यात स्त्रीला लज्जास्पद वाटण्याचं कारण नाही" असं विधान केलं.
तुम्ही ममता शर्मांशी सहमत आहात की असहमत?
या संदर्भात खालील स्फुटं वाचावीत असं सुचवावंसं वाटतं.
१) २८ फेब्रुवारी २०१२ च्या "लोकसत्ता" तल्या "अन्वयार्थ" सदरातला "देश म्हणजे पेज थ्री नव्हे" हा लेख.
२) २८ फेब्रुवारीच्या टाइम्स ऑफ् इंडिया तले ममता शर्मांच्या वक्तव्यावरील टाइम्स् व्ह्यू आणि काऊंटर व्ह्यू
३) ४ मार्चच्या संडे टाइम्समधे पान २० वर छापलेला ममता शर्मां यांचा इंटरव्ह्यू.
या बाबतीत मी ५ मार्चला टाइम्स् ऑफ इंडियाला खालील आशयाचं पत्र पाठवलं आहे.
"........... ममता शर्मा एक गोष्ट विसरताहेत ती म्हणजे ज्यावेळी अनेक अर्थ असलेल्या एखाद्या शब्दाला एखादा असभ्य/अश्लील अर्थ असतो त्यावेळी बहुतकरून तो त्याच अर्थानी वापरला जातो. "सेक्सी" या शब्दालाही असा अर्थ आहे. जर ममता शर्मा आपल्याला असा कुठला अर्थ असल्याचं माहीत नाही असं म्हणत असतील तर तो एक तर मूर्खपणा आहे किंवा खोटेपणा आहे."
हे पत्र छापून येईल की नाही ते माहीत नाही.
आपल्याला काय वाटतं?

लेखनविषय: दुवे:

Comments

मुन्नी बदनाम हुई

मुन्नी बदनाम हुई या (कु)प्रसिद्ध गाण्याच्या गायिकेचे नाव ममता शर्मा आहे ना? या दोन्ही व्यक्ती एकच आहेत का? की व्यक्ती वेगळ्या आहेत पण एकीच्या तोंडात दुसरीचे शब्द गेले? सहज शंका म्हणून विचारते.

असो. सदर ममता शर्मांनी हे वाक्य कोणत्या संदर्भात म्हटले आहे त्याचा आगापीछा न लागल्याने उगा या बाईंवर तोंडसुख घेण्याची गरज वाटत नाही. कदाचित त्यांचे वक्तव्य प्रसंगानुरूप किंवा विषयानुरूप असावे.

परंतु, या बाईंच्या वक्तव्याआडून कोर्डे आपला प्वाइंट पुढे करत असतील तर तसे न करता त्यांनी पुढे येऊन मुद्दा मांडावा.

लेखाचा उद्देश

मुन्नी बदनाम हुई या (कु)प्रसिद्ध गाण्याच्या गायिकेचे नाव ममता शर्मा आहे ना? या दोन्ही व्यक्ती एकच आहेत का? की व्यक्ती वेगळ्या आहेत पण एकीच्या तोंडात दुसरीचे शब्द गेले? सहज शंका म्हणून विचारते.

दोन्ही ममता एकच की वेगवेगळ्या याबद्दल मला काही कल्पना नाही.

असो. सदर ममता शर्मांनी हे वाक्य कोणत्या संदर्भात म्हटले आहे त्याचा आगापीछा न लागल्याने उगा या बाईंवर तोंडसुख घेण्याची गरज वाटत नाही. कदाचित त्यांचे वक्तव्य प्रसंगानुरूप किंवा विषयानुरूप असावे.

यासाठीच मी 'लोकसत्ता' व 'टाइम्स्' यातले संदर्भ दिले आहेत.

परंतु, या बाईंच्या वक्तव्याआडून कोर्डे आपला प्वाइंट पुढे करत असतील तर तसे न करता त्यांनी पुढे येऊन मुद्दा मांडावा.

ममताबाईंचं वक्तव्य मला खटकलं. त्याबद्दल माझं मत मी टाइम्स् ला लिहिलेल्या पत्रात (ज्याचा आशय मी माझ्या लिखाणात दिलाय) व्यक्त झालेलं आहे. इतर उपक्रमींचं मत काय आहे ते जाणून घेण्याच्या उद्देशानी मी ममताबाईंच्या वक्तव्याबद्दल लिहिलं आहे. मी आणखी कुठला "प्वाइंट" पुढे करत असेन अशी आपल्याला शंका आहे?

संदर्भ

आपण दिलेले संदर्भ दुवे नसल्याने तपासून पाहणे कठीण आहे. तरीही मी लोकसत्तेतील दुवा शोधला. तो आपल्या वरील लेखापेक्षा वेगळा नाही. त्या लेखात हे वाक्य कोणत्या संदर्भात आले त्याबद्दल काहीही न लिहिता फक्त तोंडसुख घेण्याचेच उदाहरण दिसले. तेव्हा आपण संदर्भ येथे लिहून पुरवावे ही विनंती.

ममताबाईंचं वक्तव्य मला खटकलं. त्याबद्दल माझं मत मी टाइम्स् ला लिहिलेल्या पत्रात (ज्याचा आशय मी माझ्या लिखाणात दिलाय) व्यक्त झालेलं आहे. इतर उपक्रमींचं मत काय आहे ते जाणून घेण्याच्या उद्देशानी मी ममताबाईंच्या वक्तव्याबद्दल लिहिलं आहे. मी आणखी कुठला "प्वाइंट" पुढे करत असेन अशी आपल्याला शंका आहे?

जर वाक्य ससंदर्भ असते तर खटकले असते काय? उदा. त्या ग्लॅमर इंडस्ट्रीतील स्त्रियांबद्दल बोलत असल्या तर? एखाद्या ग्रामकल्याण संस्थेच्या वर्धापन दिनी या बाई उठून स्त्रियांनी सेक्सी असावे वगैरे वक्तव्य करणार नाहीत असे वाटते. तेव्हा आपण दुवे द्यावे, अन्यथा ते संदर्भ येथे लिहून कळवावे. आपल्या अर्धवट माहिती देण्याच्या प्रकारामुळे आणि आपल्या या पूर्वी टाकलेल्या अनेक चर्चांमुळे ममताताईंचे नाव पुढे करून आपण आपले "स्त्रीविषयक धोरण" (स्त्रियांनी सेक्सी असू नये, तोकडे कपडे घालू नये, मेक-अप करू नये) पुढे करत आहात असे वाटले.

तेव्हा योग्य दुवे द्यावे किंवा नेमके काय झाले ते स्पष्ट मांडावे.

टाइम्स् च्या संदर्भांचे दुवे

दुवे पाठवण्याचं तंत्र मला अवगत नाही. विचारून विचारून ई-पेपरवरून दुवे मिळवले. पण पाठवताना १० टक्के रोमन अक्षरांची मर्यादा आड आल्यामुळे प्रतिसाद जाऊ शकला नाही. माझं कॉम्प्यूटर वापरण्याचं द्न्यान टायपिंगपुरतच मर्यादित आहे. तथापि संदर्भ अगदी अलीकडचे असल्यामुळे आपल्याला ते ई-पेपरच्या मुंबई एडिशनच्या अर्काइव्हज् वरून पाहता येतील असं वाटतं. टाइम्स् व्ह्यू आणि काउंटर व्ह्यू एडिटोरियल् पानावर आहेत.

कलम ५०९?

कलम ५०९ (??) च्या अंतर्गत ह शब्द छेडछाड म्हणून ग्राह्य धरला जात असावा?

लोकांनी मुलीच नाव ममता ठेवावं का? असा प्रश्न उपस्थित होउ नये म्हणजे झालं.

अवांतर: ममता की सेक्सी?

लोकांनी मुलीच नाव ममता ठेवावं का? असा प्रश्न उपस्थित होउ नये म्हणजे झालं.

ममता हे नाव तसे जुने आहे त्यामुळे आता प्रश्न उपस्थित करून फारसा फरक पडणार नाही. लोकांनी मुलीचे नाव "सेक्सी" ठेवावे का? असा प्रश्न पडू शकतो. 'चीनी कम' या चित्रपटात अमिताभ एका दहा वर्षाखालील मुलीला सेक्सी म्हणत असतो असे आठवते आणि कुछ कुछ होता है मधली नात आजीला "सेक्सी" म्हणत असते.

:)

ममता नाव असलेल्या व्यक्ती वादग्रस्त असल्याने मी तसे म्हंटले.

>>लोकांनी मुलीचे नाव "सेक्सी" ठेवावे का?<<
किंवा श्रीमतीच्या एवजी वापरण्यास हरकत असावी काय?

'दुर्लक्श करणे' हि समझदारी है


तुम्ही ममता शर्मांशी (म्हणजे त्यांच्या मताशी) सहमत आहात की असहमत?

नाही. पुरुशाला सुंदर स्त्रीला पाहताच खावून टाकावेसे जरी वाटले तरी तो तीला खावून टाकू शकत नाही. आवडत्या खाद्य पदार्थाकडे जसे कोणी आवंढा गिळत, जीभ चाटत पाहतो, तसेच पुरुश तरुण परस्त्रीकडे पाहतो. त्याचे ते स्त्रीच्या प्रत्येक शरीरावर नजर फिरवणे स्त्रीला देखील आवडत असले तरीही त्या पलीकडे दोघांनी सार्वजनिक स्थळी आपली मर्यादा पाळायला हवी. दोघे मैथुनासाठी तयार असतील तर चार भिंती, एक छत असलेली जागा शोधून आपला कार्यभाग साधायला हवा. स्त्रीला सेक्सी म्हणणे हे ह्या कामाचे पुरुशाकडून पहिले पाऊल मानले तर स्त्री मला सेक्सी म्हटलेले आवडते असे म्हणत असेल तर त्याचा अर्थ ' ती स्त्री एका पायावर उभी राहून तयार आहे.' असाच निघतो.

जर स्त्री आपली मैथुनविशयाबतच्या सार्वजनिक मर्यादा ओलांडत म्हणत असेल कि मला पुरुशांनी 'सेक्सी' म्हटलेले आवडते, इतर स्त्रीयांनी देखील लाज वाटून घेवू नये. तर पुरुशांनी एक पाऊल अजून पुढे टाकले तर काय बिघडेल?
'उक्ती पेक्शा कृती श्रेश्ठ असते.' या न्यायाने, उद्या पुरुशांनी देखील भररस्त्यात आपल्याला आवडलेल्या स्त्रीकडे आपले लिंग कपड्यांबाहेर काढून, हलवून दाखवले तर स्त्री त्यापुढे मैथुनासाठी पुढची पायरी ओलांडण्यासाठी त्याहून उत्तेजक कृती करून दाखवण्यास तयार असेल का? तेवढे गट्स ती दाखवू शकेल कां?
भारतात तरी हे नक्कीच होवू शकत नाही. उलट त्या लगेच आमचा विनयभंग झाला म्हणून रडीचा डाव खेळतील, जरी तो पुरुश तिला आवडला असला तरी. सार्वजनिक स्थरावर बेशरम होण्यात भारतीय स्त्रीया पुरुशांशी बरोबरी करू शकतात कां?

माझे तरी हेच मत आहे कि घराबाहेरील बायकांच्या तोंडाला लागायचे नसते. त्या शर्माकडे, तिच्या बोलण्याकडे दुर्लक्शच करायला हवे.

हहपोदु

हहपोदु. धन्यवाद रावले साहेब. यू मेड माय डे.

जबरदस्त

रावले यांचा प्रतिसाद जबरदस्त आहे. त्यातल्या कोणत्याही मुद्द्याचे समर्थन वा खंडन करण्यासाठी आतापर्यंत कोणीही पुढे आले नाही, यावरुनच या प्रतिसादाची ताकद ध्यानात येते.
सन्जोप राव
हम तुझे वली समझते, जो ना वादाखार होता

हा हा हा

रावले साहेब.. तुस्सी ग्रेट हो!

घराबाहेरील बायकांच्या तोंडाला लागायचे नसते

हे तर लय आवडले =))

ऋषिकेश
------------------
धम्मक असेल आपली मते आपली ओळख दाखवून थेट मांडावीत, कायद्याला घाबरून भ्याडासारखे आयडीच्या पदराआड लपु नये

पण...

एकंदर सदस्य ह्यांच्याशी सहमत. पण ...

स्त्रीला सेक्सी म्हणणे हे ह्या कामाचे पुरुशाकडून पहिले पाऊल मानले तर स्त्री मला सेक्सी म्हटलेले आवडते असे म्हणत असेल तर त्याचा अर्थ ' ती स्त्री एका पायावर उभी राहून तयार आहे.' असाच निघतो.

असा अर्थ तुम्ही कसा काढला हे जाणून घ्यावेसे वाटते. सेक्सी म्हणणे आवडणे आणि तयार असणे ह्यात फरक आहे. शिवाय म्हणण्याला संदर्भ कुठला आहे, कुणी म्हटले आहे ह्यावरही बरेच अवलंबून असावे. उदा. कतरिना कैफला राजू श्रीवास्तवने1 सेक्सी म्हटले आणि कॅटरिनाला ते आवडल्यास कतरिना एका पायावर उभी राहून तयार आहे असा अर्थ काढणे हास्यास्पद आहे हे बहुधा शेंबड्या पोरांनाही माहीत असावे.

असो. आमच्या महाविद्यालयात सेक्सी हा शब्द आम्ही 'सुंदर', 'मस्त', 'चिकणे' सारख्या शब्दांऐवजी वापरत असू. मुलींशिवाय इतर अनेक गोष्टी सेक्सी असत. उदाहरणार्थ सेक्सी कवर ड्राइव, सेक्सी रोड वगैरे वगैरे.

असो. ममता शर्मांच्या वक्तव्यावर कोरड्यांचे आक्षेप पटत नाहीत. कोर्डे बहुधा अतिमागील पिढीचे असावेत अशी शंका येते आहे. असो. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त रावले, कोर्ड आणि शेंबड्या पोरांसकट सगळ्यांना शुभेच्छा.


1. खरे तर यूनुस परवेजचे नाव घ्यायचे होते आधी. 'बेटी, तुम आज बहुत सेक्सी दिखाई दे रही हो. ज़रा बचके. आगे मत बढ़ो. आगे ख़तरा है' असा डायलॉग कदाचित यूनुस परवेझने कतरिनाला मारला असता.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

+१

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त रावले, कोर्डें आणि इतर सर्वांना शुभेच्छा! ;-)

तुमच्या भावना पोहचल्या!

असो. आमच्या महाविद्यालयात सेक्सी हा शब्द आम्ही 'सुंदर', 'मस्त', 'चिकणे' सारख्या शब्दांऐवजी वापरत असू. मुलींशिवाय इतर अनेक गोष्टी सेक्सी असत. उदाहरणार्थ सेक्सी कवर ड्राइव, सेक्सी रोड वगैरे वगैरे.

मी कुठल्याच स्त्रीला तिच्या तोंडावर वा तीला चिडवण्याच्या हेतूने अजूनतरी 'सेक्सी' असे तोंडावाटे म्हटले नव्हते, म्हणायचो नाही. मित्रांमध्ये जेंव्हा एखाद्या मदमस्त तरुणी वा स्त्री बद्दल तिचा उल्लेख आल्यावर, 'च्यायला ती काय सेक्साड* आहे ना?' असे म्हणत असू/ असतो.
*(गुड चे बेस्ट होते तसे सुपरलेटीव रूप)

तुम्ही जी वर दिलेल्या तुमच्या उदाहरणांमध्ये 'ताई, आज तू किती सेक्सी दिसतेस गं!' असे सुद्द्या उदाहरण द्यायचं होतं. ते तुमच्याकडून राहून गेलंय.

 
^ वर