सुंदर् मणीपुर्

रामराम मंडळी,

खुप दिवसानी मी या जालावर येत आहे. ५ डिसेंबर् ते २८ फेब्रुवारी तसा खुप मोठा काळ आहे. मी पुर्वोत्तर भारताच्या प्रवासात असल्याने इकडे दुर्लक्ष झाले. या वेळी आसाम, अरुणाचल प्रदेश सोबत मणीपुर या नविन राज्यात जाण्याचा योग आला. ते प्रवास वर्णन तुम्हापर्यंत पोचवावे हा उद्देश.

मणीपुरला इनर लाईन परमीट लागत नाही परंतु रस्त्याने जायचे झाल्यास रस्ता नागालैंड मधुन जात्तो. व नागालैंड मध्ये इनर लाईन परमीट लागते. दुसरे असे की नागालैंड मध्ये दहशतीचे वातावरण कायम असल्याने तो एक धोका असतो व बी एस.एफ चे जवान या प्रकाराने खुप कंटाळलेले असल्याने ते प्रवाशांना देखील त्रास देतात. हा पल्ला देखील खुप लांबचा व वेळ खाउ असल्याने विमान प्रवास हाच उत्तम मार्ग आहे. ४० मिनिटात इनर लाइन परमिट शिवाय आपण गोहाटिहुन इंफाल ला पोचतो त्यानुसार मी ११.५० ला निघुन १२.३० ला इंफाल ला पोचलो. रणबीर सिंग हा मैती कार्यकर्ता मारुती ८०० ने मला घ्यावयास आला होता. विमानतळ ते इंफाल शहर हा मार्ग खुपच सुंदर होता भारतात सर्वात जवळ विमानतळ असलेले हे शहर. केवळ् ७ कि.मी. अंतर.
कार्यालयात जाउन मी माझ्या कामाची पुर्वतयारी केली व मग जेवुन कामाला सुरुवात केली. येथील माझ्या कामात मुख्य सुर्याजी पिसाळ म्हणजे येथील लोड शेडिंग २० तास येथे लाईट नसतात. विज सकाळी ६-८ व रात्री १० ते १२. अशा परिस्थीतीत मागील काम पुर्ण करणे, त्याचे प्रिंटस काढणे व पुढील काम कसे करायचे याचे शिक्षण देणे हे सर्व २२ ला रात्री मी पुर्ण केले व हुश्श केले. सेवा भारती तर्फे येथे न्य्रुरो थिरेपी चा प्रकल्प राबविला जातो. रास्त फी आकारुन सेवा भावी वृत्तीने चालणार्‍या या प्रकल्पाला स्थानीक लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो. मणिपुर सेवा समिती या नावाने बाल संस्कार वर्ग चालविले जातात. ख्रिस्तीकरणापासुन लहान बालकांचा बचाव करुन त्यांचेवर चांगले संस्कार करुन त्यांना सुजाण नागरिक बनविणे हा उदात्त हेतु. २३ ला मग मी साईट सिइंग ला जायचे ठरविले इंफाल हुन ४० कि.मी दुर माइरैंग येथे आझाद हिंद सेनेचे वार मेमोरियल या नावाने सुभाषचंद्र बोस यांच्या युध्दकालीन आठवणि जोपासल्या आहेत. त्या वास्तुला भेट देणे हा माझा मुख्य उद्देश होता.
२४/२/२०१२
आज माझा मणिपुर मधील शेवटचा दिवस. उद्या ११/५० च्या सकाळच्या प्लाईट ने गोहाटी ला जाणार. मणिपुर ला मी २० ला गोहाटीहुन आलो. येथे, सेवा भारती मणीपुर व मणिपुर सेवा समिती या संस्था कार्यरत आहेत. माझे येथील मुख्य काम २२ ला आटोपले. कार्यालय प्रमुख श्री जत्राजींना सर्व समजाउन सांगुन व आवश्यक ते रिपोर्ट्स देवुन मी मुक्त झालो. त्यांनी दुसरे दिवशी मणिपुरची सहल करुन येण्याबद्दल सुचविले. ते उद्या सकाळच्या फ्लाईट ने सिलचर ला बैठकी साठी जाणार असल्याने त्यांना सकाळी एअरपोर्टवर सोडुन मग मी पुढे माइरांग, व परिसरातील स्थळे अवश्य पाहुन यावे असा बेत्त ठरला. त्याप्रमाणे मी सकाळी त्यांना सोडुन प्रथम माइरैंग ला गेलो. या स्थळाला सुभाष बाबुंच्या मुळे विशेष महत्व आहे. स्वतंत्र भारताचा पहिला ध्वज त्यांनी इथे फडकविला. दुर्दैवाने ब्रिटिश सैन्यापुढे त्यांना येथुन माघार घ्यावी लागली. पण त्या ऐतिहासीक क्षणाची आठवण म्हणुन येथे त्याचे भव्य स्मारक आहे. त्यात त्यांचे व आझाद हिंद सेनेच्या कर्तुत्वाचे फोटो जतन करुन ठेवले आहेत. त्या परिसरात फिरतांना आपण नकळत त्या काळात वावरत असतो. हा भाग मणिपुर मधील विष्णुपुर जिल्ह्यात येतो. येथे मणिपुर मधील १०-१२ स्वातत्र्य सैनिकांचेही फोटो जतन केले आहेत. या व्यक्ती कर्नल मलीक सोबत त्याकाळी वावरले होते. येथे आझाद हिंद सेनेला ब्रिटिश सैन्यापुढे माघार घ्यावी लागली व नंतर ब्रिटीशांनी युध्द कैदी म्हणुन ताब्यात्त घेतले व नंतर सिंगापुर येथे कैदेत ठेवले. लाल किल्ल्यावर त्यांच्या विरुध्द चाललेल्या खटल्यात मुक्तता झाल्यानंतर हे सिंगापुर जेल मधुन मुक्त झाले व मणिपुरला परतले.

या स्मारका मधिल क्षण मनात्त साठवत मग आम्ही येथुन काही मैलावर असलेल्या किबुल लामजाओ जंगल सफारी वर निघालो. येथे आशियातील सर्वात मोठे तळे असुन येथे एक विशेष प्रकारचे गवत वाढते व त्याची कोवळी पाने आवडिने खाणारे हरिण मोठ्या प्रमाणात येथे वावरतात त्यांना बघणे हे येथील मुख्य आकर्षण. त्यासाठी ठिकठिकाणी उंच मचाने बांधली आहेत. या तळ्यात जरी गवत वाढत असले आणि येथे हरिणांचे वास्त्तव्य असले तरी हे कुरण तरंगणारे आहे. हे ऐकुन आश्चर्य वाटले तरी ही वस्तुस्थीती आहे. तरंगण्याचे कारण देखील मजेदार आहे. हे तळ्यात वाढणारे गवत काही काळानंतर वाळते व त्याचे जागी नविन गवत येते. अशी क्रिया सतत चालु राहील्याने एक प्रकारे विशाल अशी तराफ तयार होते. व ही तराफ पाण्यावर तरंगत राहते. तलावाचे अस्तित्व कळावे म्हणुन हे गवत मोठ्या अजस्त्र यंत्राद्वारे काढल्या जाते व पाणी मोकळे केले जाते. कितीतरी शेकडो मैलापर्यंत हे तळे पसरले असुन आशियातील सर्वात मोठे तळे असा बहुमान यास आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी भराव टाकुन मध्ये मोठा रस्ता करण्यात आला आहे व नजिकच्या पहाडापर्यंत नेण्यात आला आहे. वरुन या तलावाचे व सभोवतालच्या पर्वत रांगांचे दृश्य फारच मनोवेधक दिसते. मणिपुर हे मैती अतिरेक्यांनी ग्रस्त असुन हे पर्यटन स्थळ बनु नये यासाठी अनेक अडथळे निर्माण केल्या गेले पण सरकार देखील त्यास पुरुन उरले व हे पर्यटन स्थळ तयार झाले. तरी देखील हा विष्णुपुर जिल्हा आजही धोक्याचा गणला जातो व लहान मोठ्या घटना येथे कायम घडत असतांना दिसतात. मिलीटरी चे मोठ्या प्रमाणात अस्तित्व येथे जाणवते. आम्ही परत्त येतांना एक लग्नाच्या वर्हाडाचा ताफा फुल मिलीटरी प्रोटेक्शन मध्ये जातांना आम्हाला दिसला. गमतीचा भाग म्हणजे येथे २० तास लोड शेडींग असते. व्हि.आय पी असा एक भाग इंफाल मध्ये आहे जिथे विज दिवस भर व रात्री असते. मी शेवटी माझे काम आटोपण्यासाठी एका व्हि.आय पी भागात्त माझा लैपटाप घेउन काम केले. हा ही एक अनुभव मला नविन होता. सामान्य जनता मात्र या प्रकाराला सरावलेली दिसली.

जंगल सफारी मध्ये एक लहानशी दुर्घटना माझ्या बाबतीत घडली. मचानावरुन उतरतांना मी उतारावरुन सरळ रस्तावर गुडघ्यावर पडलो. जाड पैंट असुनही माझा टोंगळा जबरदस्त दुखावला व चिरल्या गेला. दिवसा मला तारे दिसु लागले. गाडित असलेले एक फडके घट्ट बांधुन मी रक्तस्त्त्राव बंद करण्याचा प्रयत्न केला. व बैंडएड वगैरे तुटपुंज्या साधनानी पुढील पर्यटन कसेतरी पार पाडले. ४५ कि.मी चा इंफाल पर्यंतचा प्रवास मात्र हवालदिल अवस्थेत गेला. इंफाल मध्ये एका छोट्या क्लिनीक मध्ये जखम पाहिल्यावर डाक्टरनी चार टाके लाउन चखम शिवली, टिटैनस चे इंजेक्शन दिले व खुप काही औषधे ५ दिवस पुरतील अशी दिली ही घटना २३ ची २६ ला ड्रेसीग बदलणे व २९ ला टाके काढणे अशा सुचना दिल्या. या सर्व प्रकाराने २३ व २४ हे दोन दिवस पलंगावर पडुन राहणे व औषधे घेणे या शिवाय माझ्या समोर पर्याय नव्हता. या काळात रणबीर व रिकी या तोन मैती तरुणांनी माझी जी देखभाल केली त्याला तोड नव्हती. दोघेही संपुर्ण काळात :"हम बेवकुफ है हमे अक्कल नही आपकी देखभाल भी नही कर सके असे म्हणुन म्हणुन बेजार करु लागले: त्यांच्या त्या निरागस प्रेमाने मी मात्र खुपच भारावुन गेलो. अशा तर्हेने माझ्या मणीपुर प्रवासाचा समारोप झाला. .
२७/२/२०१२
फोटो दुसर्या लेखात टाकत आहे.
.

लेखनविषय: दुवे:

Comments

स्वागत!

खुप दिवसानी मी या जालावर येत आहे.

स्वागत!

वामन देशमुख

केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार
मनुजा अंगी चातुर्य येतसे फार.

 
^ वर