बालसाहित्याविषयी माहिती

नमस्कार.
बालसाहित्याविषयी एक विचारणा -

१) कावळयाला लागली तहान
२) बुडबुड घागरी
३) टोपीवाला आणि माकडे
४) मगर आणि हुशार माकडे
५) उंदराची टोपी
६) चल रे भोपळ्या टुणुक टुणुक
७) सश्याचे घर आणि लांडगा
८) बदक चालले जत्रेला
९) सिंह आणि उंदीरमामा
१०) ससा आणि कासव
११) भित्रा ससा
१२) चिऊ- काऊचे घर

ह्या आणि तत्सम गोष्टी लहानपणी ऐकल्या होत्या. आता विस्मरणात गेल्या.
आताच्या बालगोपाळांना सांगण्यासाठी त्या पुस्तकरुपाने मराठी भाषेत उपलब्ध आहेत का?
असल्यास ले़खकाचे नाव, प्रकाशक, इ. माहिती मिळू शकेल का?

Comments

इंग्रजी गोश्टी कां नाही?

माझी मुलगी आत्ता नऊ महिन्याची आहे. तिला मराठी शाळेत घालायचे कि इंग्रजी शाळेत घालायचे? हाच सध्या विचार करतोय. इंग्रजी शाळेत घालायचे तर ह्या मराठीतील जुन्या गोश्टी तिला कां सांगायच्या? असा विचार मनात येतो. माझे आई-वडिल म्हणतात, 'तुम्हाला (म्हणजे आम्हा भावंडांना) इंग्रजी शाळेत न घालून आम्ही चूक केली होती. तुम्हाला जीवनात मिळायला हवे तितके यश मिळाले नाही.'
त्यांच्या ह्या अशा वाक्यांनी मी माझ्या मुलीला मराठी शाळेत घालण्याचा, मराठी कविता, गोश्टी सांगण्याचा विचार सोडून देत आहे.

-१

मुद्दा भाषेचा नसून कथांचा आहे(असे माझे मत).
सगळ्याच भाषांत ह्यासर्व गोष्टी हल्ली असतात.
अहो, युरोपिअन् लोककथा हिमगौरी आणि सात् बुटके आणि मी खाली प्रतिसादांत दिलेल्या अरेबिअन लोककथा आपल्याकडे आल्याच ना, तसेच आपल्या कथा इंग्लिश नामक भाषेतून सांगता येतील.
तसेही, ह्यांनी उल्लेख केलेल्या कित्येक गोष्टी मराठी हे नक्की सांगू शकतो. "बालभारती" व इतर शैकणिक उपक्रमातून त्या मराठित येण्याला अजून शतकभरही झालेले नाही. त्या इतर भाषांत आहेतच.

--मनोबा

आभारी आहे.

मन, मी आपले आभार मानतो. माझ्या चूकलेल्या प्रतिसादावर आक्शेप घेवून् तुम्ही माझ्या धारणांमधला चूकीचा भाग नकळतपणे दाखवून दिलात.

'आपल्या आईवडिलांची मते नेहमीच, जशीच्या तशी स्विकारायला हवीत' माझी हि धारणा चुकीची होती. आपल्या आईवडिलांना जर आपण इतर कोणत्याही कारणाने अल्पयशी झालो आहोत असे वाटत असेल तर ते त्यांचे मत आहे. त्यांची मते त्यांच्याकडेच रहायला हवीत.

मला स्वतःला मराठी भाशा आवडते, माझ्या लेकीशी मला मराठीतूनच बडबड करायला आवडते. माझ्या पत्नीशी चर्चा करून आम्ही तीला भविश्यात मराठी शाळेतच घालायचे ठरवले आहे. 'जीवनात लौकिक यश मिळणं!' हे काहि अंशी नशीबावर अवलंबून असते असे मला वाटते. मात्र 'आपल्या जीवनात आनंद मिळवणं' हे मात्र आपल्या हातातच असते असे मी माझ्या अनुभवाने म्हणू शकतो.

माझा वरील प्रतिसाद चूकला होता. म्हणून मी पुन्हा नव्या सृश्टीबोधातून (इं.:पर्सेपशनने) नवा प्रतिसाद खाली देत आहे.

धन्यवाद!, पुन्हा एकदा, मनापासून.

पुस्तकाचे नाव

पुस्तकांची नावे साम्गतोय; प्रकाशक वगैरे आठवत नाहित. पुण्यात कधी येणं होत असेल तर अब चौकात खालील पुस्तकं खात्रीशीर मिळतील.
तुम्ही उल्लेख केलेल्या बहुतांश कथा व रामायण महाभारतातील ठळक कथा ह्यांचा संग्रह "छान छान् गोष्टी" ह्यांत करणयत आलेला आहे.
इयत्ता दुसरीपासून पुढे पाचवी-सातवीपर्यंत वाचता येतील अशी मराठी पुस्तकांची नावे देत आहे, अ ब चौकात खात्रीने मिळतील, थोडे हुडकावे लागेल इतकेच.(one time effort)

छान छान गोष्टी(तीन-चार् भाग असावेत, नवनीत प्रकाशन)
पंचतंत्र
इसापनिती
अलिबाबा आणि चाळिस चोर
सिंदबाबदच्या सात सफरी
अल्लादिन आणि जादूचा दिवा
आजोबांच्या १०१ गोष्टी( गोष्टींचा संग्रह)

ह्याशिवाय बालवयास आवडतील अशी सचित्र , उत्तम बांधणीची पुस्तके खुद्द क्रॉसवर्डमध्ये पाहण्यात आलीत, पण ती इंग्लिश होती.
त्या सर्वांचे विषय सुगम रामायण, बाळबोध महाभारत, बौद्ध कथा असे होते.

शिवाय कुमार, किशोर ह्या बालमनासाठी उत्तम अशा मागच्या सर्व दशकातील सर्व उपलब्ध अंक चाळून पहा, खूप काही मिळेल.
फास्टर फेणे, गोट्या,एक होता कार्वर हेसुद्धा झकास.
पेठांमध्ये बर्याच ठिकानी अभ्यासिका,संस्कारवर्ग चालतात. त्यातील काही ज्येष्ट, जाणत्या व्यक्तिंकडे अशा पुस्तकांचा खजिना सापडेल. नुसते पेठांमधून पायी हिंडलात की काम झाले.

ही छोटी पोरं भाग्यवान आहेत, ह्यांना खूप काही उपलब्ध आहे.

--मनोबा

त्यात काय एवढे?

या सर्व गोष्टी तुम्हाला माहितीच असतील, फक्त लहान मुलांना आवडेल अशा भाषेत सांगायचे. त्यासाठी पुस्तक कशाला हवे? एखाद दुसरी गोष्ट नाही सांगीतलीत किंवा तत्सम दुसरी गोष्ट सांगीतलीत तरी चालेलच की. आत्ताची पुस्तके किंवा मासिके उघडलीत तर यापेक्षा बर्‍याच चांगल्या गोष्टी सापडतील. आत्ताच्या मुलांची समज खूपच पुढे आहे.

सहमत

या सर्व गोष्टी तुम्हाला माहितीच असतील, फक्त लहान मुलांना आवडेल अशा भाषेत सांगायचे. त्यासाठी पुस्तक कशाला हवे? एखाद दुसरी गोष्ट नाही सांगीतलीत किंवा तत्सम दुसरी गोष्ट सांगीतलीत तरी चालेलच की. आत्ताची पुस्तके किंवा मासिके उघडलीत तर यापेक्षा बर्‍याच चांगल्या गोष्टी सापडतील. आत्ताच्या मुलांची समज खूपच पुढे आहे.

शूरशिपायाशी सहमत. इथे नमूद करावेसे वाटते की मराठी संकेतस्थळांवरील बरेचसे साहित्य हे बालसाहित्य ह्या प्रकारात मोडणारे आहे. त्यामुळे तेदेखील वाचून दाखवू शकता.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

यूट्यूब

यातील काही गोष्टी यूट्यूब वर ऍनिमेशन सहित सांगितलेल्या उपलब्ध आहेत - चल रे भोपळ्या; सिंह-उंदिर; ससा-कासव, चिऊ-काऊ, इत्यादी. "मराठी बालगीते" खाली शोधली तर सापडतील.

*********
धागे दोरे
*********

उत्तम....

दिलेले दुवे इथून् उघडून पाहता येत नाहित. पन ऍनिमेशनपटातूंन सांगण्याच्या कल्प्नेची याद करून् दिल्याबद्दल् आभार.

हल्लीच काही तबकड्या(सीडी) पाहिल्या होत्या मराठितून लहानांसाठी बडबडगीते, कार्टून्स वगैरे होते.(एक माकडाने काढलय दुकान् वगैरे.)

--मनोबा

हे पुस्तक बघा

कदाचित या पुस्तकात तुम्हाला हव्या त्यातील काही गोष्टी मिळतील.

हे पुस्तक मिळालं तर मलाही हवं आहे.

बाकी, इंग्रजी माध्यमात जाणार्‍यांना मराठी शिकून काय करायचं आहे वगैरे प्रश्न गौण आहेत. भाषेची आवड उपजत असू शकते आणि ती व्यक्तीसापेक्ष असते. तेव्हा आपल्या आवडी मुलांवर लादू नयेत. उलट, जे साहित्य त्यांनी वाचावे असे वाटते ते त्यांच्या समोर ठेवावे आणि त्यांना निवडीची मुभा द्यावी. अगदी अमेरिकेत वाढलेली मुलेही आवड असल्यास मराठी वाचतात असा स्वानुभव आहे.

बाकी, हा प्रश्न मी मागेही विचारला होता. बुकगंगा, रसिक वगैरे साइट्स वरून मराठी पुस्तके मागवणारी अमेरिकेतील मंडळी आहेत का? आणि त्यांचा अनुभव कसा आहे?

साहित्य दिले तरीही छोट्यांनी त्यातून आनंद कसा मिळवायचा?

अभंग देशपांडे, उपक्रमवर आपले स्वागत!

बालसाहित्य म्हणजे केवळ पुस्तकंच असतात कां? आपण केवळ पुस्तकांचीच नांवे दिली आहेत. मला खात्री आहे कि तुम्हाला पुस्तकं कशासाठी हवी आहे ते? कारण मी देखील एक बाप आहे. मला नऊ महिन्यांची मुलगी आहे. तीला अजून बोलता येत नाही. पण मी व तीच्या आईचे बोलणे तीला अस्पश्टसे कळते. ती वेगवेगळे आवाज त्यानुसार काढते. आठ महिन्यापर्यंत होईस्तोवर आम्ही तिच्याशी बोलायचो पण तिच्याशी संवाद साधायला हवा असे वाटले नव्हते. आता वाटू लागले होते.

पण एवढ्याश्या चिमुरडीशी काय बोलायचे? असा प्रश्न पडला तेंव्हा फाऊंटन म्युजिक च्या गाण्यांच्या व्हीसीडी विकत आणल्या. आवडीने दुचिवावर तीला दाखवण्याचा, ऐकवण्याचा प्रयत्न केला. पण छे! केवळ दहा मिनिटांत ती कंटाळली. व त्याच व्हीसीडींचा खोका तोंडात घालून खेळू लागली. माझी बायको त्यावर म्हणाली कि ती अजून लहान आहे. पण मी मात्र बैचैन झालो. मला माझ्या मुलीशी संवाद साधायचा होता. त्यासाठी मी तीला आणून दिली होती, व्हीसीडी. माझं काय चूकलं?, ते मला कळलं. मग लगेच काहि दिवसातच दादर पश्चिम, मुंबई येथील आयडिअल बुक डेपो येथे जावून 'लहान मुलांची बडबडगीते मिळतील कां? अशी विचारणा केली. माझ्या चौकशीवर तेथील विक्रेत्याने लगेचच तशा प्रकारच्या पुस्तकांचा एक मोठा गठ्ठाच पुढ्यात ठेवला. त्यातील बहुतेक पुस्तके अगदी स्वस्त होती. बारा ते पंधरा रुपयांची! बरीच पुस्तके चाळल्यानंतर तीन पुस्तके मी निवडली.

घरी येवून ती पुस्तके मी वाचून पाहिली. एक गोश्ट जाणवली ती हि कि त्यातील बरीच गीते ही दोन पुस्तकात 'शेम टू शेम' होती. नवनीत प्रकाशनाचे पुस्तक, कागद पातळ नसल्यामुळे हाताळायला चांगले वाटले. हि झाली वरवरची ओळख.

मला माझ्या झामकुडीशी संवाद साधायचा होता. म्हणून त्यातील् बडबडगीते पाठ करायला घेतली. पुस्तकांमधील बर्‍याच गीतांना यमक जुळवलेले दिसले नाही, त्यामुळे ती म्हणताना अडखळायला व्हायचे. एकच गाणं लगेच पाठ् झालं ते माझ्या मुलीला जवळ घेवून म्हटलं तेंव्हा तीला ती खुदकन हसली, तीला अजून उभं राहता येत नाही. म्हणून मी दोन हातांनी तिला धरून उभं करीत गाणं म्हटलं तेंव्हा ती खिदळत, खिदळंत जागच्या जागी उड्या मारू लागली.

ते गाणं होतं - अबडक तबडक घोडोबा, घोड्यावर बसले लाडोबा!

गाणं म्हणताना माझी पोर माझ्या डोळ्यांत पाहून खिदळते तेंव्हा मला खूप आनंद होतो. अन् मला हेच हवे होते.

आपल्या सगळ्यांना आपल्या पाल्याशी संवाद साधायचा असतो, आपल्या मुलांना देखील् आपल्यासोबत त्यांचे बालपण इंन्जोय करायचे असते. पण आपण त्यांना पुस्तके, व्हीसीड्या आणून देतो, अन् अपेक्शा करतो कि त्यांचे मनोरंजन त्यांनी स्वतःच करावे.

कुटुंब-आई-बाप कशाला हवे?

हे वाचुन माझ्या एका मित्राचे मत आठवले. तो म्हणतो
"मुलांना गोष्टी, गाणी सांगायला पूर्वी आजी-आजोबा असायचे आता सीडी-डीव्हीडी असतात, मुलांना खेळायचा सख्खी-चुलत भावंडे असायची आता कंप्युटर असतो, मुलांना झोपवायला आई-आजीची कुस अन् अंगाई गीते असत आता बंक बेड्स शेजारच्या टेपरेकॉर्डर्स मधली रेकॉर्डेड तालासूरातील गाणी असतात, मुलांना फिरवायला, नवनव्या गोष्टी शिकवायला बाबा, आजोबा असत आता 'फक्त' शाळा असते-प्रोजेक्ट असते....(यादी बरीच आहे).. (हल्ली मुलांचे पाल्य झाले आहेत :) )पाल्याला सारे काहि दिले सुखात ठेवले आहे असे वाटत असतानाच जेव्हा मात्र तेच मुल (मोठे झाल्यावर / आधीही) आम्हाला कुटुंब-आई-बाप कशाला हवे? (यांत्रिक उपकरणे आहेतच की!) असे विचारते तेव्हा या आई-बापाकडे उत्तर नसते"

हे मित्राचे मत ऐकून मी विचारात पडलो होतो.. पटले तर होते.. पण...

ऋषिकेश
------------------
धम्मक असेल आपली मते आपली ओळख दाखवून थेट मांडावीत, कायद्याला घाबरून भ्याडासारखे आयडीच्या पदराआड लपु नये

आजची युवा पिढी

ऋषिकेश ह्यांनी त्यांच्या मित्राचे जे मत मांडले आहे त्याच्याशी थोडाफार संदर्भ असलेले लेख २५ फेब्रुवारीच्या लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीमध्ये प्रसिद्ध् झाले आहेत.
लेखक/ लेखिका - रोहन् टिल्लू आणि शोभा सुभेदार

'न'वी बाजू

मुले सतत सोशल नेटवर्किंग साइटला चिकटून असतात याचा आईवडिलांना त्रास होणे साहजिक आहे पण आईबाप सोशल नेटवर्किंग साइट्सना चिकटून असतात याचा त्रास मुलांना होत असावा काय?

'पो'बारा

आईबाप सोशल नेटवर्किंग साइट्सना चिकटून असतात याचा त्रास मुलांना होत असावा काय?

आपला ट्विटर की फेसबुक अकाउंट अगदी डिलिवरीरूममधूनही ऑपरेट करणाऱ्या मातांची उदाहरणे आहेतच की. अगदी जन्माआधीपासून हा त्रास आहे. असो. पण एकंदर मुले कुक्कुली आहेत, तान्हेली आहेत, की शेंबडी ह्यावर सारे अवलंबून आहे. 'मदर/फादर हॅज बिन बॉर्न' छाप फेसबुकी आईबापांच्या मुलांना जास्तच त्रास होण्याची शक्यता आहे, असे मला वाटत नाही. असो.

अवांतर:
बाकी तुमच्या प्रतिसादाचे शीर्षक सूचक आहे. आमच्या एक जुन्या आंतरजालीय स्नेह्यांची (म्हणजे मी तरी स्नेहीच समजतो. त्यांचे त्यांना माहीत.) आठवणीने हळवा झालो. त्यांचे प्रतिसाद आम्हाला आवडत असत. पण त्यांचे प्रतिसाद बघून अनेक जण 'पो'बारा करीत असत हेही तितकेच खरे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

 
^ वर