बाजारगप्पा.. २
राम राम मंडळी,
बाजारगप्पांच्या दुसर्या भागात आपलं सर्वांचं स्वागत! आज आपण बाजारात जो सट्टा खेळला जातो, किंवा ज्याला इन्ट्राडे ट्रेडिंग असं म्हणतात त्याविषयी बोलणार आहोत. सट्टा करणार्या मंडळींना बाजारात 'सटोडिया' असं म्हटलं जातं. आमचा सोकॉल्ड धर्म(!)राज हा जगातला पहिला सटोडीया होता असं म्हणतात. घरदार, बायको सगळं हारला बिचारा! ;)
पहिली गोष्ट अशी लक्षात घेतली पाहिजे की शेअरबाजारात तसं म्हटलं तर प्रत्येक व्यक्तिच सट्टा करत असते. ज्या गोष्टीची काहीही निश्चिती नसते, वा ती कुणी देऊ शकत नाही अश्या गोष्टीत पैसा लावणे हा खरे तर सट्टाच! परंतु फरक हा की एखादा गुंतवणूकदार हा एखाद्या कंपनीच्या समभागात अभ्यास करून पैसे लावतो. त्या समभागाची किंमत वाढली तर उत्तमच, परंतु जर नाही वाढली नाही तरी संबंधित गुंतवणुकदार ते समभाग कमी भावाला विकून तोटा सहन करत नाही. (बाजाराच्या भाषेत फायदा कमावणे अथवा तोटा सहन करणे याला अनुक्रमे प्रॉफिटबुकिंग अथवा लॉसबुकिंग असे म्हणतात) तर भाव वाढायची वाट पाहतो, किंवा खालच्या भावाला अजून काही समभाग खरेदी करून किंमतीमध्ये सरासरीही साधू शकतो.
मात्र सट्ट्याचे तसे नाही. सटोडिया मंडळींना कंपनीची आर्थिक स्थिती, किंवा त्यासंबंधी इतर कोणत्याही गोष्टींशी काहीही देणेघेणे नसते. सटोडिया हा वार्याप्रमाणे टोपी फिरवणारा असतो. एखाद् दिवशी एखाद्या कंपनीचा समभाग खूप वर जायची अथवा खूप खाली जायची शक्यता असे त्याला वाटेल, अश्याच समभागमध्ये तो सौदे करतो. सटोडियाला मार्जिन (मराठी शब्द?) म्हणून काही एक रक्कम दलालाकडे जमा ठेवावी लागते. त्या रक्कमेच्या चार ते सहा पटींच्या उलाढालीच्या मर्यादेत संबंधित दलाल सटोडियाला सौदे करू देतो.
समजा मी माझ्या दलालाकडे १००००० रुपये मार्जिन म्हणून जमा ठेवले तर साधारणपणे ४ ते ६ लाखांच्या उलाढाली इतके सौदे मला करता येतात.
आता आपण तेजीमंदी म्हणजे काय आणि त्यामध्ये सट्टा कसा चालतो हे पाहू. मंडळी, त्या आधी एक गोष्ट मी स्पष्ट करू इच्छितो की जरी 'सट्टा' हा शब्द लैकिकार्थाने वाईट असला तरी आज बाजारात अक्षरशः लाखो लोक सट्टा किंवा इन्ट्राडे ट्रेडिंग करत असतात. सट्ट्याचे काही नियम आहेत, तेही आपण पाहणार आहोत. हे नियम पाळून जर सट्टा केला तर त्यात काहीच वाईट नाही असे माझे वैयक्तिक मत आहे. कायद्याच्या चौकटीत राहून पैसे कमावणं कधीच वाईट नसतं. हां, आता सट्ट्यमध्ये पैसे गमावण्याचीही शक्यता असते. ते गमवायचे किंवा नाही आणि गमावले तर किती गमवायचे हा अर्थातच ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
उदाहरणादाखल आपण आपल्या दलालाकडे १०००० रुपये एवढी अनामत रक्कम ठेवली आहे अणि त्याने आपल्याला त्याच्या सहा पट, म्हणजे ६ लाखांपर्यंत उलढाल करण्याची परवानगी दिली आहे असे धरून चालू. आज आपण रिलायन्स कंपनीत सट्टा खेळणार आहोत. आमच्या मार्केटच्या भाषेत बरीच जुनीजाणती लोकं रिलायन्सचा उल्लेख 'धिरुभाई' असाच करतात. रिलायन्सचा समभाग वाढू लागला की, "अरे धिरुभाई बढा!" असं म्हणतात आणि पडू लागला की, "अरे आज साला धिरुभाईको ठोक रहे है!" असं म्हणतात! ;)
असो! बाजार सुरू असतानाचे सटोडियांच्या तोंडचे असे संवाद किंवा मार्केटच्या बोली भाषेतले शब्द मी सांगू लागलो तर ती एक वेगळी लेखमाला होईल! ;)
तेजी -
आधी शेअर खरेदी करून नंतर विकणे याला 'तेजी' म्हणतात. तेजीचा सट्टा करणार्यांना 'तेजडिया' असं म्हणतात.
बाजार उघडला आहे आणि समजा रिलायन्सचा भाव १६०० चालू आहे. जर मला वाटलं किंवा काही खबर* आली की आज रिलायन्स बराच वाढणार आहे तर मी १६०० रुपयांच्या भावाने सहा लाखाच्या उलाढालीपर्यंत म्हणजे साधारणपणे ३७५ धिरुभाई विकत घेईन. दिवसभरात रिलायन्सचा भाव जर १६२५ झाला तर मला प्रति समभाग २५ रुपये म्हणजे एकूण ९३७५ रुपये इतका फायदा होईल आणि ती रक्कम माझ्या मार्जिनच्या रक्कमेत जमा होईल. पण समजा रिलायन्सचा भाव पडू लागला (अरे यार इसकोईच तो सट्टा बोलते है मामू! ;) आणि १५५० झाला तर मला प्रति समभाग ५० रुपये म्हणजे एकूण १८७५० रुपये तोटा सहन करावा लागेल आणि तेवढी रक्कम माझ्या लाखाच्या मार्जिनमधून कापून घेतली जाईल! एक गोष्ट मात्र निश्चित की रिलायन्सचा भाव भले खाली जावो वा वर जावो, दुपारी ३.३० च्या आत मला ते ३७५ समभाग विकलेच पाहिजेत! कारण त्याचे संपूर्ण खरेदीमूल्य, म्हणजे रुपये ६ लाख इतकी रक्कम माझ्याकडे नाही! घेतलेले समभाग बाजार बंद व्ह्यायच्या आत (दुपारी ३.३०) विकणे आणि सौदा पुरा करणे याला positions square off करणे असे म्हणतात. आमच्या मार्केटच्या भाषेत याला 'सौदा सल्टा करणे' असे म्हणतात. 'ए तात्याभाय, साला ३.२७ हुआ है, बजार बंद होनेको आया है. तेरा सब सौदा सल्टा कर दे. साला कितना कमाया आज? के घरकाईच पैसा लगा दिया काम पे?! ;) असं आमचा महेन्द्रभाई ओरडतो. असो, महेन्द्रभाई हा मारवाडी ब्रोकर हा एक वेगळा व्यक्तिचित्राचा विषय आहे! ;) आपल्या मिसळपाव डॉट कॉमवर महेन्द्रभाईचं छानसं व्यक्तिचित्र रंगवेन केव्हातरी! ;)
*खबर - मंडळी, खबर हा आमच्या मार्केटमधला एक कळीचा शब्द आहे. मार्केटमध्ये दिवसभर कुठल्याना कुठल्या तरी खबरी येतच असतात. त्यातल्या काही चालतात, काही चालत नाहीत. खबरींच्या मागे किती धावायचं हा ज्याचात्याचा प्रश्न आहे. मंडळी, एकंदरीतच मार्केटमध्ये वावरताना इथल्या प्रत्येक गोष्टीचा संबंध हा डायरेक्ट पैशांशी आणि जोखमीशी आहे एवढी गोष्ट प्रत्येकाने पक्की ध्यानात ठेवली पाहिजे. एखादी खबर चालली नाही आणि नुकसान झाले की आमचा महेन्द्रभाई, "क्या साला खबर लाया? हट! वो खबर का तो 'कबर' हो गया!" असे ओरडतो! ;)
असो! मंडळी आख्खा दिवस जाईल, पण बाजारगप्पा संपायच्या नाहीत. आता पुढच्या भागात आपण मंदी, स्टॉपलॉस, ट्रेलिंग स्टॉपलॉस, सट्ट्यातले धोके इत्यादी गोष्टी पाहू. आपल्या शंका कुशंकांचे, प्रश्नांचे स्वागत! माझ्या परीने मी त्यांची उत्तरे देण्यचा प्रयत्न करेन.
आपला,
तात्या अभ्यंकर,
दलाल स्ट्रीट, मुंबई - २३.
--
धन कमाविले कोट्यानुकोटी, संगे न ये रे लंगोटी! ;)
Comments
सट्टा नाही...
तात्या,
लेखमाला चांगली रंगली आहे. चालू दे! आपला व्यवसायबंधू या नात्याने खात्रीपूर्वक मतभेद नोंदवितो. शेअरबाजार म्हणजे सट्टेबाजीच असे नाही.
विस्तार टाळतो आहे. जगातील प्रत्येक गोष्टच सट्टा आहे असे म्हटले तरच शेअरबाजार हा केवळ सटोडिआंचा दरबार आहे असे म्हणता येईल. अन्यथा नाही.
(अंगठाबहाद्दर) एकलव्य
विस्तार चालेल ना
अहो विस्तार चालेल.
प्रतिसाद विस्ताराने येऊ देत. काही हरकत नाही.
असंही तात्यांनी कुठे म्हण्टलय, की त्याची व्याख्या म्हणजेच बाजार?
तेंव्हा तुम्ही पण द्या तुमचा व्ह्यु. वाचायला आवडेल.
आपला
निव्वळ वाचक
गुंडोपंत
~ एकलव्य यांनी लिहावे ह्याचे मी समर्थन करतो ;)~
लिहीन...
... अंगठा भरून आला की लिहीन.
(गुंडोपंतांच्या आग्रहाने भारावलेला) एकलव्य
सही!
... अंगठा भरून आला की लिहीन.
अगदी सही!
~ एकलव्य यांनी अंगठ्याला लवकर औषधपाणी करावे ह्याचे मी समर्थन करतो!~
एकलव्यराव,
एकलव्यराव,
शेअरबाजार म्हणजे सट्टेबाजीच असे नाही.
असं मीही म्हटलेलं नाही. उलटपक्षी, मी सट्टा आणि गुंतवणूक यातील फरक सांगायचाच प्रयत्न केला आहे.
जगातील प्रत्येक गोष्टच सट्टा आहे असे म्हटले तरच शेअरबाजार हा केवळ सटोडिआंचा दरबार आहे असे म्हणता येईल.
कबूल आहे.
बोले तो, प्रतिसाद देनेके लिये भोत धन्यवाद मामू!
तात्या.
--
धन कमाविले कोट्यानुकोटी, संगे न ये रे लंगोटी! ;)
बोले तो...
तात्याभायने भोत डायरेक्ट बोला है .... गुंतवणुकदार अच्छा आदमी है सटोडिआ नहि है!
हमने ना कब बोला भाय!!
पण या लेखात इन्टाडे ट्रेडर्सना सरळसोट सटोडिआ म्हणता आहात.
सटोडिया मंडळींना कंपनीची आर्थिक स्थिती, किंवा त्यासंबंधी इतर कोणत्याही गोष्टींशी काहीही देणेघेणे नसते. सटोडिया हा वार्याप्रमाणे टोपी फिरवणारा असतो. एखाद् दिवशी एखाद्या कंपनीचा समभाग खूप वर जायची अथवा खूप खाली जायची शक्यता असे त्याला वाटेल, अश्याच समभागमध्ये तो सौदे करतो. सटोडियाला मार्जिन (मराठी शब्द?) म्हणून काही एक रक्कम दलालाकडे जमा ठेवावी लागते. त्या रक्कमेच्या चार ते सहा पटींच्या उलाढालीच्या मर्यादेत संबंधित दलाल सटोडियाला सौदे करू देतो.
हे खरे नाही.
खुलासा = एकलव्याचा इन्ट्राडे पोर्टफोलिओ ५% पेक्षा जास्त कधीही असणार नाही, पण १००% इन्ट्राडे ट्रेडिंग करणारे थोर लोक पाहिले आहेत.
मग खरे काय?
एकलव्यशेठ,
पण या लेखात इन्टाडे ट्रेडर्सना सरळसोट सटोडिआ म्हणता आहात.
सटोडिया मंडळींना कंपनीची आर्थिक स्थिती, किंवा त्यासंबंधी इतर कोणत्याही गोष्टींशी काहीही देणेघेणे नसते. सटोडिया हा वार्याप्रमाणे टोपी फिरवणारा असतो. एखाद् दिवशी एखाद्या कंपनीचा समभाग खूप वर जायची अथवा खूप खाली जायची शक्यता असे त्याला वाटेल, अश्याच समभागमध्ये तो सौदे करतो. सटोडियाला मार्जिन (मराठी शब्द?) म्हणून काही एक रक्कम दलालाकडे जमा ठेवावी लागते. त्या रक्कमेच्या चार ते सहा पटींच्या उलाढालीच्या मर्यादेत संबंधित दलाल सटोडियाला सौदे करू देतो.
हे खरे नाही.
मग खरे काय ते सांगावे. आपण अमेरिकन बाजाराबद्दल काही म्हणत असाल तर त्याची मला माहिती नाही. परंतु भारतीय बाजाराच्या बाबतीत एखादा आठवी नापास गुज्जू बनिया टाटा स्टील या कंपनीची काहीही माहिती नसताना ६५० च्या भावाने टिस्कोचे १००० समभाग विकत घेतो आणि दिवसभरात टिस्को ४ रुपये वधारल्यास ४००० रुपये कमावून, किंवा ४ रुपयाने घटल्यास ४००० रुपये गमावून सौदा सल्टा करतो, याला सट्टा नाही तर काय म्हणावे?
एकलव्याचा इन्ट्राडे पोर्टफोलिओ ५% पेक्षा जास्त कधीही असणार नाही,
चांगली गोष्ट आहे. जास्त असूही नये असा माझा अनुभव सांगतो!
पण १००% इन्ट्राडे ट्रेडिंग करणारे थोर लोक पाहिले आहेत.
हो, असे अनेक आहेत. माझ्या लेखात मी 'आज बाजारात अक्षरशः लाखो लोक सट्टा किंवा इन्ट्राडे ट्रेडिंग करत असतात' असे म्हटलेलेच आहे. पण प्रश्न हा आहे की असं इन्ट्राडेट्रेडिंग करून त्यापैकी किती लोक रोजच्या रोज पैसे कमावतात? काही मोजके कमावणारेही आहेत, नाही असं नाही. पण त्याकरता सट्ट्याचे, स्टॉपलॉसचे, मार्केट ट्रेन्डचे नियम कडकपणे पाळले पहिजेत. निदान मी तरी अश्या थोर लोकात कमावणार्यां पेक्षा गमावणारेच खूप पहिले आहेत. म्हणून तर डब्बावाले लोक प्रचंड पैसा कमावतात. आपल्याला डब्बा ट्रेडिंगविषयी माहिती आहे किंवा नाही हे मला माहीत नाही! मी स्वत: एकेकाळी डब्बेवाला होतो. पण एकेदिवशी अचानक मन उडालं आणि मी डब्बा बंद केला!
खुलासा - तात्या मार्जिन ठेवून करता येणारं इन्ट्राडेट्रेडिंग कधीही करत नाही. अपवाद - दिवाळीतल्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी केल्या जाणार्या मुहुर्ताच्या सौद्यांच्या वेळी तात्या १००० रुपयांचा कडक स्टॉपलॉस ठेवून सट्टा करतात! ;)
तात्या.
धन कमाविले कोट्यानुकोटी, संगे न ये रे लंगोटी! ;)
बाजार!
तात्याडिआ,
मग खरे काय ते सांगावे.
खरे काय ते सांगितले आहे असे वाटते. सोपे आहे - इन्ट्राडे ट्रेडिंग म्हणजे निव्वळ सट्टा नाही. त्याचेही एक शास्त्र आहे. (फलज्योतिष्यही एक शास्त्र आहे या चालीवर नाही! आ बैल मुझे मार!!)
आपण अमेरिकन बाजाराबद्दल काही म्हणत असाल तर त्याची मला माहिती नाही.
माझा अनुभव अर्थात अमेरिकन आणि थोडाफार युरोपिअन बाजाराबद्दल आहे. भारतीय बाजारात वेगळी गणिते चालतात याची कल्पना आहे. वर्षभरापूर्वी भारतीय बाजारात काही मॉडेल्स यशस्वी करण्याचा फसलेला प्रयोग अजूनही मनात ताजा आहे. आज या क्षणाला तरी भारतीय बाजाराला मी घाबरून राहतो. परंतु ही माझी मर्यादा झाली. भारतीय रोखेबाजारही झपाट्याने नियंत्रित आणि नियमबध्द होतो आहे असे समजते. (ऐकीव आणि वाचनीय माहिती)
परंतु भारतीय बाजाराच्या बाबतीत एखादा आठवी नापास गुज्जू बनिया टाटा स्टील या कंपनीची काहीही माहिती नसताना ६५० च्या भावाने टिस्कोचे १००० समभाग विकत घेतो आणि दिवसभरात टिस्को ४ रुपये वधारल्यास ४००० रुपये कमावून, किंवा ४ रुपयाने घटल्यास ४००० रुपये गमावून सौदा सल्टा करतो, याला सट्टा नाही तर काय म्हणावे?
याला सट्टा ऐसेच नाव!
वा!
तात्या मस्तच लिहिलय!
आमचा सोकॉल्ड धर्म(!)राज हा जगातला पहिला सटोडीया होता असं म्हणतात. घरदार, बायको सगळं हारला बिचारा! ;)
आवडलं
' सोकॉल्ड' म्हणणं पण आवडलं !
पुढील भागासोबत
मिसळपावाची खरंच वाट पाह्तोय
आपला
तेजोडिया
~ आता कशाचं करावं बरं मी समर्थन!~
फ्युचर
फ्युचर आणि ऑपशन्स, आय पी ओ, इत्यादी काय प्रकार आहेत?
मराठीत लिहा. वापरा.
चाणक्यराव,
चाणक्यराव,
फ्युचर आणि ऑपशन्स, आय पी ओ, इत्यादी काय प्रकार आहेत?
फ्युचर आणि ऑपशन्स -
अरे बापरे! एकदम एफएनओ वर उडी? ;) असो!
फ्युचर आणि ऑपशन्स या प्रकाराला मार्केटच्या भाषेत 'एफएनओ' असे म्हणतात. याबाबतही आम्ही लिहिणारच आहोत. पण अद्याप त्याला थोडा वेळ असून त्याकरता बाजारगप्पांची दोनचार प्रकरणे थांबावे लागेल असे वाटते. भात शिजण्याकरता कुकरच्या अजून काही शिट्ट्या होऊ द्याव्यात असे वाटते! ;)
आय पी ओ -
आय पी ओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफर. एखादी कंपनी आपले भांडवल उभारण्याकरता जेव्हा आम पब्लिककरता आपले समभाग विकावयास काढते तेव्हा त्याला 'आय पी ओ' असे म्हणतात. आय पी ओ हा प्रकार 'प्रायमरी मार्केट 'या प्रकारात मोडतो. आपल्या बाजारगप्पा या मुख्यत्वेकरून 'सेकंडरी मार्केट'च्या आहेत.
मात्र एक गोष्ट खरी, की बाजारात येणार्या नव्या नव्या आय पी ओं ची माहिती करून घेऊन त्यात निवेष केल्यास अतिशय उत्तम परतावा मिळण्याची शक्यता असते. निरनिराळ्या वर्तमानपत्रांमधून आय पी ओंच्या जाहिराती येतच असतात. त्यातील कुठला आय पी ओ चांगला आहे याची तज्ञ मंडळींकडून माहिती करून घेतल्यास व त्यानुसार संबंधित आय पी ओ मध्ये गुंतवणूक केल्यास फायदा होऊ शकतो.
अर्थात, आय पी ओ करता अर्ज केल्यावर संबंधित समभाग आपल्याला मिळतीलच याची खात्री देता येत नाही. कारण अनेक लोक त्याकरता अर्ज करत असतात आणि समभागांची संख्या मर्यादीत असते. त्यामुळे आय पी ओ मधल्या समभागांचे वाटप हे प्रोरेटा बेसिसवर होते. त्यात आपला नंबर लागला तर उत्तमच! अन्यथा पैसे परत मिळतात.
आपला,
(एफएनओ कंस्लटंट) तात्या.
--
धन कमाविले कोट्यानुकोटी, संगे न ये रे लंगोटी! ;)
मैफिल
म्हणजे आम्हाला गप्पांची मैफिल होई पर्यंत थांबावे लागणार तर. असो, जेवढी माहिती दिली त्यावर आत्त्ता तरी समाधान मानून घेतो.
मराठीत लिहा. वापरा.
गप्पा मारत मारत..;)
म्हणजे आम्हाला गप्पांची मैफिल होई पर्यंत थांबावे लागणार तर.
चाणक्यराव,
अहो थांबा की काही काळ. इतनी जल्दीभी क्या है! मस्त मजेत गप्पा मारत मारत शेअरबाजाराची वाटचाल करुया! ;)
मजकूर संपादित. प्रतिसादाच्या माध्यमातून होणारे लेखन सार्वजनिक स्वरूपाचे राहील याची काळजी प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे. परस्परांना किंवा इतर सदस्यांना उद्देशून टीकाटिप्पणी प्रतिसादाच्या माध्यमातून करू नये.
धन कमाविले कोट्यानुकोटी, संगे न ये रे लंगोटी! ;)
खरडवही
खरडवही दिलिया नव्हं? त्यात असलं परतिसाद खरडा!!
उपक्रमरावाचे मनोगत, "ह्या तात्याला कसा आवरावा ?"
चांगला
माहितीपूर्ण लेख!
काही शंका :
१. ट्रेडिंग करण्यासाठी काय रिक्वायर्मेंट्स् आहेत?
२. साठी लागणारे भांडवल रोजच्या रोज दलाला कडे द्यावे लागते का? असेल तर कॅश लागते की चेक चालतो ?
------------------------------------------------
कृपया खिडकीतून पत्रं टाकू नयेत.आमटीत पडतात.चव बिघडते.
सर्व व्यवहार चेकनेच होतात..
ट्रेडिंग करण्यासाठी काय रिक्वायर्मेंट्स् आहेत?
एखाद्या डिपॉझीटरी पार्टीसिपेन्टकडे डिमॅट व ट्रेडींग अकाऊंट असणे आवश्य आहे. उदा आयसीआयसीआय बँक, मोतिलाल ओस्वाल सिक्युरिटीज, शेरखान इत्यादी.
साठी लागणारे भांडवल रोजच्या रोज दलाला कडे द्यावे लागते का? असेल तर कॅश लागते की चेक चालतो
नाही. म्हणजे रोजच्या रोज द्यायची वेळ येऊ नये! पण तुम्ही जर का ते एका दिवसातच संपवलेत तर मात्र रोजच्या रोज चेक द्यावा लागेल! ;)
सर्व व्यवहार चेकनेच होतात.
आपला,
(बोका) तात्या.
धन कमाविले कोट्यानुकोटी, संगे न ये रे लंगोटी! ;)
सेंन्सेक्स.
राज हा जगातला पहिला सटोडीया होता असं म्हणतात. घरदार, बायको सगळं हारला बिचारा! ;)
(विस्ताराने माहिती हवी आहे )
बाजार गप्पांचा दूसरा भाग आवडला,ते सेंन्सेक्स वधारला असे म्हणतात. शेअरबाजाराच्या लेखात याबद्दल माहिती मिळेल काय ?
मिसळ पाव की क्या खबर है;)
विस्ताराने माहिती!
राज हा जगातला पहिला सटोडीया होता असं म्हणतात. घरदार, बायको सगळं हारला बिचारा! ;)
(विस्ताराने माहिती हवी आहे )
बिरुटेसाहेब, याबाबत विस्ताराने माहिती कृपया आपण महाभारताचा जरा जास्तच (!) अभ्यास असलेल्या मंडळींकडून घ्यावी. जुगारात स्वतःच्या बायकोला एक वस्तू मानून पणास लावणार्या गुन्हेगार पांडवांबद्दल आणि अश्या गुन्हेगार पांडवांच्या रथाचे सारथ्य करून गीताबिता सांगणार्या कृष्णाबद्दल मला फारशी माहिती नाही! ;)
अहो, ६०२ रुपयांना टिस्कोचे समभाग घेऊन ते ६१२ रुपयाला विकून उंबरी थोड्याफार लीला करणारा मी एक अतिसामन्य मनुष्य आहे! ;) आम्हाला तुमची ती गीता अन् महाभारत काय उपयोगाची? आम्ही केलेली दुनियादारी हीच आमची आत्तापर्यंतची गीता राहिली आहे आणि यापुढेही राहील! ;)
बाजार गप्पांचा दूसरा भाग आवडला,ते सेंन्सेक्स वधारला असे म्हणतात. शेअरबाजाराच्या लेखात याबद्दल माहिती मिळेल काय ?
बिरुटेशेठ, सेन्सेक्स म्हणजे निर्देशांक. त्यात वाढ झाली की तो 'वधारला' असं म्हणतात आणि घट झाली की 'घटला' असं किंवा मार्केटच्या भाषेत 'ठोकला' असं म्हणतात.
तात्या.
--
धन कमाविले कोट्यानुकोटी, संगे न ये रे लंगोटी! ;)
हेक्झावेअर टेक
हेक्झावेअर टेक (Hexaware Technologies) हा आय टी समभाग आजच्या दिवशी १५६ ते १५७ या किंमतीस आकर्षक आहे.
एका महिन्याचे उद्दिष्ट : रू. १७५
चार महिन्याचे उद्दिष्ट : रू. २००
जयेश्
जयेशराव,
एका महिन्याचे उद्दिष्ट : रू. १७५
चार महिन्याचे उद्दिष्ट : रू. २००
जयेशराव, ही उद्दिष्टे आपण कशी काढलीत तेवढे कृपया सांगावे.
तात्या.
--
धन कमाविले कोट्यानुकोटी, संगे न ये रे लंगोटी! ;)
अजून एक
डे ट्रेडिंग करताना नेमके कोणत्या कंपनीचे समभाग घ्यायचे ते कसं कळतं? म्हणजे कोणता शेअर आज वाढू शकेल हे कसं कळणार? त्यासाठी मार्केट स्टडी व्यतिरिक्त काही अजून गोष्टी आहेत का?
त्याबद्दल दलाल काही सल्ला देतात का?
------------------------------------------------
कृपया खिडकीतून पत्रं टाकू नयेत.आमटीत पडतात.चव बिघडते.
बाय इन्फी, स्टॉपलॉस अमूक, टार्गेट अमूक वगैरे...
डे ट्रेडिंग करताना नेमके कोणत्या कंपनीचे समभाग घ्यायचे ते कसं कळतं? म्हणजे कोणता शेअर आज वाढू शकेल हे कसं कळणार? त्यासाठी मार्केट स्टडी व्यतिरिक्त काही अजून गोष्टी आहेत का?
वरील सर्व प्रश्नांची उत्तरे येत्या काही भागात देण्याचा प्रयत्न करू.
त्याबद्दल दलाल काही सल्ला देतात का?
काही दलाल देतात. उदाहरणार्थ एन्जल ब्रोकिंग किंवा मोतिलाल ओस्वाल यांसारखी दलालगृहे बाजार सुरू असताना मध्येच 'फ्लॅश न्युज' पद्धतीचा संदेश पाठवतात. हा संदेश आपल्या संगणकावर दिसतो. समजा बाजार सुरू आहे, आणि इन्फीचा भाव १९२० रुपये आहे तर साधारणपणे खालील पद्धतीचा संदेश येतो-
Buy Infosys, Stop Loss 1909, target 1940.
याचा अर्थ-
इन्फीच्या समभागात तेजी आहे व तो वर जाण्याची शक्यता आहे. आत्ता खरेदी केल्यास तो १९४० पर्यंत जाऊ शकेल. पण जर तो पडू लागला तर सटोडियांनी खाली १९०९ पर्यंत वाट पाहून लॉस बुक करावा असा होतो.
१९०९ किंवा १९४० या पातळ्या तांत्रिक विश्लेषणावर आधारीत असतात. तांत्रिक विश्लेषणाबद्दल आम्ही येत्या काही भागात यथावकाश वक्तव्य करूच! तांत्रिक विश्लेषण वगैरे गोष्टी आम्ही कोळून प्यायलो आहोत, परंतु मार्केट हे कुणाच्या बापाचे नाही आणि ते आपल्याच पद्धतीने चालत असते हाच अनुभव निदान आम्ही तरी गेली अनेक वर्षे घेत आहोत! ;)
आता ही इन्फीची खबर(!) चालली तर चालते. यावर अंमल करून प्रति समभाग ११ रुपायांचा धोका पत्करून प्रति समभाग २० रुपायांचा फायदा कमवायचा किंवा नाही हे ज्याने त्याने ठरवायचे! ;)
आपला,
(तटस्थ!) तात्या.
----------------------------------------------------------------
रोज दुपारी मनिमाऊ खिडकीतनं उडी मारून आमच्या स्वयंपाकघरात येऊन चोरून दूध पिते! ;)
धन्यवाद!
मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद!
-------------------------------------------------------------
कृपया खिडकीतून पत्रं टाकू नयेत.आमटीत पडतात.चव बिघडते.
बोटाला धरून शेयरबाजारात...
पण त्याकरता सट्ट्याचे, स्टॉपलॉसचे, मार्केट ट्रेन्डचे नियम कडकपणे पाळले पहिजेत.
हा स्टॉपलॉस काय प्रकार आहे? सट्ट्याचेही नियम असतात?
म्हणून तर डब्बावाले लोक प्रचंड पैसा कमावतात. मी स्वत: एकेकाळी डब्बेवाला होतो.
हा डब्बेवाला कोण? आम्हाला ते प्रिन्स् चार्लस् च्या लग्नाला जाणारे टिफिन् कॅरियर्स् माहित आहेत. (उपप्रश्न : तुम्ही किती कमावला? ;))
तात्या, बोटाला धरून शेयरबाजारात फिरवताय.छान वाटतंय. अजून आत जाऊयात.
मासळीबाजारातल्या साधना बहिणीसारखंच थोडं महेन्द्र भावाबद्दलही वाचायला आवडेल.
आम्हाला अमेरिकन शेअरबाजाराची ओळख पण करुन घ्यायला आवडेल.
युयुत्सुराव,
भारतीय बाजाराविषयी बरीच माहिती मिळते आहे. अमेरिकन शेअरबाजाराची तोंडओळख असल्याने दोन्ही ठिकाणची मनात तुलना करताना मजा येतेय.
आम्हाला अमेरिकन शेअरबाजाराची ओळख पण करुन घ्यायला आवडेल.
एखादा लेख त्यावर आला तर वाचनानंद होईल!
तेथे समजा तात्यांसारखे ट्रेडिंग करायचे असेल तर काय करतात?
आपला
(वाचनांकीत)
गुंडोपंत
प्रतिसाद - १/ख
डे ट्रेडिंग
आता आणखी काय लिहायचे? डे ट्रेडिंगविषयी ह्याविषयीची बक्कळ उलट सुलट माहिती आंतरजालावर आहेच. ती सुजाण आणि उत्सुक वाचकांनी बहुदा पाहिलेली असावी. मी ते येथे देत नाही... जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे फक्त माझी याकडे बघण्याची भूमिका मांडत जाईन. (प्रतिसाद विस्कळित रूपात येत राहिल्यास क्षमस्व!)
अगदी ग्रीनस्पॅनसारख्या दिग्गजांपासून भल्याभल्यांनी डे ट्रेडिंगला गँबलिंग असेच म्हटले आहे. ट्रेडर्सचा हव्यास पाहता अशी प्रतिक्रिया येणे अगदी स्वाभाविकच आहे. तरीही डे ट्रेडिंग आणि इतर आर्थिक साधनांमधील गुंतवणुक यांत मूलभूत साम्य आहे. कायद्याने या प्रकारावर बंदी न घालण्यामागचे हेच कारण असावे असे म्हणायला हरकत नसावी.
जमाना बदल गया है! कसोटी क्रिकेट हेच काय ते खरे क्रिकेट आणि बाकी सारा निव्वळ नशीबाचा खेळ असे म्हणून नाके मुरडणारे रथीमहारथी शेवटी एक दिवसीय सामन्यांमध्ये रंगून गेले... तसा काहीसा प्रकार येथेही होतो आहे आणि होत राहणार आहे.
डे ट्रेडिंगमध्ये बाजार उघडल्यावर दिवसभरात कधीही पैसा गुंतविला जातो, आणि मात्र बाजार बंद होण्यापूर्वी घेतलेले रोखे (किंवा इतर आर्थिक साधने) विकून टाकणे अपेक्षित आहे.
या आणि अशा कारणांमुळे डे ट्रेडिंगमधील सहभाग वाढतो आहे... आणि वाढतच राहणार आहे. मिनिटामिनिटाला ट्रेडिंग करता येते आणि तरीही दलाली पलिकडे जाउन फायदा उठविता येतो.
जग कसे बदलत आहे ते केवळ समजावून सांगण्यासाठी म्हणून एक उदाहरण -
धीरूभाईमध्ये पैसे गुंतवायचे आहेत. अधिकाधिक नुकसानीची तयारी ५%, फायद्याची अपेक्षा १%.
तात्यांचा गुज्जुभाई किंवा येथे शेजारी बसलेला अल्ट्रा कॉन्झर्वेटिव्ह डॉ. (पीचडी) अण्णा या दोघांनाही वाटते धीरूभाई २% ने वर चढण्याची शक्यता ४% नी पडण्यापेक्षा जास्त आहे.... पैसा समोर पडला आहे, फक्त उचलायचाच काय तो बाकी आहे!! आणि हो... त्यांना मूर्खात काढण्याचा मोह थोडावेळ टाळू या.
बाकी पुढचा डे उजाडेल तेव्हा पा(लि)हू...
एकलव्य
October. This is one of the peculiarly dangerous months to speculate in stocks in. The others are July, January, September, April, November, May, March, June, December, August, and February. - Mark Twain
खुलासा - (१) गुंतवणुकीच्या संकल्पना स्वैरपणे मांडलेल्या आहेत. हा शास्त्रशुद्ध प्रबंध नाही. (२) माझी गुंतवणुकीची विचारसरणी आणि येथे मांडलेले विचार या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. (३) कोणी कशी गुंतवणूक करावी ह्याचे मार्गदर्शन करणे हा या लेखाचा उद्देश आणि पात्रता नाही.
प्रतिसाद - २/ख
आर्थिक बाजार अधिकाधिक पारदर्शक होतो आहे. "रुपया" मिळविणे अवघड होत चालले आहे. पण म्हणून हार न मानता "चवल्या पावल्या" शिताफीने उचलण्याची यंत्रणा जोरदार कामास लागलेली दिसते आहे.
जाता जाता -
गणिती प्राध्यापकासमोर १०० ची नोट पडली आहे तरीही तो ती उचलत नाही. का?
त्याच्या मनात तर्कशुद्ध विचार चालू आहे. जर खरोखरच १०० ची नोट समोर पडलेली असेल तर कोणीतरी ती आत्तापर्यंत उचलायली हवी. तसे झालेले दिसत नाही... म्हणजे ही नोट खरी नसावी. म्हणजे मी ती उचलायचा प्रयत्न करणे हा मूर्खपणा आहे.
.... हसू नका! प्राध्यापक महाशयांचे विचार १६ आणे खरे आहेत. ... ...
पहा तो समोरचा आठवी पास पोर्या ती १०० ची नोट उचलून खिशात टाकतो आहे.
Cheers,
एकलव्य
खुलासा - (१) कोणी कशी गुंतवणूक करावी ह्याचे मार्गदर्शन करणे हा या लेखाचा उद्देश आणि पात्रता नाही. (२) मला जे धोकादायक वा फायदेशीर वाटते तसे ते असते किंवा दुसर्याला वाटेलच असे बिलकुल नाही. कालांतराने प्रत्येक गुंतवणुकदाराचा एक पिंड तयार होतो.
तात्याद्वैपायन व्यास! ;)
एकलव्या,
वेदांतील माहिती संकलित करून त्यात आपले योगदान देणार्या व्यक्तीला जर 'व्यास' म्हणत असतील तर आमच्या बाजारगप्पा या लेखमालेला तुझ्याही योगदानाची भर घालून तू इथे जी माहिती संकलित करतो आहेस त्याबद्दल आम्ही तुला कौतुकाने आणि आदरपूर्वक उपक्रमाचा 'तात्याद्वैपायन व्यास' ही पदवी देऊन सन्मानित करत आहोत! ;)
असो! व्यासपुराण पुरे झालं! आता जरा कामधंद्याचं बोलू!
तुझे १/ख आणि २/ख दे दोन्ही प्रतिसाद आवडले. बाजारगप्पांच्या या लेखमालेत तुझाही असाच हातभार लागावा हीच इच्छा...
आपला,
धिरुभाईद्वैपायन तात्या!
--
धन कमाविले कोट्यानुकोटी, संगे न ये रे लंगोटी! ;)
पेपर ट्रेडिंग
पेपर ट्रेडिंग म्हणजे काय?
------------------------------------------------
कृपया खिडकीतून पत्रं टाकू नयेत.आमटीत पडतात.चव बिघडते.
तेजीच्या सटोडियांनो,
आज हिन्डाल्कोच्या समभागांमध्ये मला तेजी वाटते आहे. याक्षणी हा समभाग १४६.५ च्या भावात मिळतो आहे. आपण १४४.९५ चा स्टॉपलॉस ठेवून हा समभाग घेऊ शकता.
सदर सौद्यामधून झालेल्या फायदा किंवा तोट्याकरता उपक्रम व्यवस्थापन किंवा तात्या अभ्यंकर जबाबदार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी..
तात्या.
--
धन कमाविले कोट्यानुकोटी, संगे न ये रे लंगोटी! ;)
डिस्क्लेमर/मार्जिन कॉल..
आम्ही स्वतः १४७ च्या भावाने हे समभाग खरेदी केले आहेत. परंतु भाव न वाढल्यास १४४.९५ या भावाला हे समभाग विकून टाकून आम्ही नुससान बुक करणार नाही. आम्ही हे समभाग घेऊन चुपचाप घरी जाऊ आणि जेव्हा भाव वाढेल तेव्हाच विकू! ;)
त्यामुळे आम्ही मार्जिनचा वापर करून जास्त समभाग खरेदी करण्याचा पर्याय निवडलेला नाही! त्या पर्यायात लॉस बुक करणे सक्तीचे असते हेच आम्हाला यातून सांगायचे आहे. आमच्याकडे जेवढे पैसे आहेत त्यात बसतील एवढेच समभाग आम्ही खरेदी केले आहेत.
तात्या.
--
धन कमाविले कोट्यानुकोटी, संगे न ये रे लंगोटी! ;)
हिंडाल्कोत आज अफाट तेजी! ;)
राम राम मंडळी,
हिंडाल्कोचा भाव या क्षणी १५१ रुपये इतका सुरू आहे! अरे भाई किसीने कमाया की नही? ;)
आज बाजार उघडल्यापासूनच निफ्टीमध्ये असलेल्या कंपन्यांमध्ये आम्हाला हिडाल्कोत तेजी दिसली. हा समभाग शुक्रवारच्या तुलनेत आज १ टक्का वर उघडला परंतु त्याचा Volume जवळजवळ २० लाख समभागांच्या आसपास होता तेव्हाच आमचे डोळे चमकले!
मंडळी, बाजारात 'व्हॉल्युम' या प्रकाराला अतिशय महत्व आहे हेच यातून आम्हाला सांगायचे आहे. हिंडालोकोची शुक्रवारची बंद किंमत १४१ रुपये इतकी होती. आज हा समभाग १४२.५ च्या भावाला उघडला तो जवळजवळ २० लाखाच्या आसपासच्या व्हॉल्युमने!
याचा अर्थ असा होतो की कुणीतरी बडा मासा (विदेशी संस्था म्हणा, किंवा एखादा देशी फंड म्हणा!) यात आज खेळतो आहे आणि हा समभाग चालवतो आहे. कारण आपण जर हिशेब केला तर साधारण २० लाख गुणीले १४२.५ = २८.५ करोड(!) इतका व्यवहार बाजाराच्या सुरवातीलाच या समभागामध्ये झाला आहे. हे पाहून माझ्यातल्या सटोडियाचे डोळे चमकले (अर्थात, मी मार्जिन कॉल घेऊन सट्टा केला नाही हा भाग वेग़ळा! ;) आणि या साडे अठठावीस करोडच्या समुद्रात मीही उतरायचे ठरवले!
काही विचार -
मंडळी, आपल्याला थोडी विस्तृत माहिती मिळावी या दृष्टीने मी हे सर्व लिहितो आहे एवढंच आपण ध्यानात घ्या.
आता बघा हां मंडळी, कशी गंमत असते ती-
१) आज मी हिंडाल्कोचे १४७ च्या भावाने १५० समभाग खरेदी केले व १५१ च्या भावाला विकले.
२) १४७ प्रमाणे १५० समभाग, म्हणजे माझ्याकडे साधारणपणे २२००० रुपये होते. माझा दलाल मला ८ पट मार्जिन देतो. याचा अर्थ २२०००*८= १७६००० इतक्या रकमेत वास्तविक मला खेळता आले असते!
३) १४७ च्या भावाप्रमाणे १७६००० रुपायात मला जवळजवळ १२०० समभागाचा इन्ट्राडे सौदा करता आला असता आणि प्रतिसमभाग ४ (१५१-१४७) याप्रमाणे ४८०० रुपायांचा फायदाही कमावता आला असता!
४) पण पण.. जर हिंडल्को वाढला नसता आणि घटू लागला असता तर मला १४७-१४४.९५ = रुपये २.०५ = १२००*२.०५ = २४६० रुपायांचा तोटाही सहन करायला लागला असता! आणि माझी त्याकरता मानसिक तयारी नव्हती. त्यामुळे मी ८ पट मार्जिनचा पर्याय उपयोगात आणला नाही! (व कधी आणतही नाही!)
५) १५० समभाग घेऊनदेखील जर हिंडल्को वाढला नसता तरी त्यामुळे माझी रात्रीची झोप उडाली नसती. मी १४४.९५ किंवा अन्य कुठल्याही खालच्या पातळीवर हे समभाग तोट्यात न विकता पूर्ण पैसे देऊन हे समभाग माझ्या ताब्यात घेतले असते!
असो!
या प्रतिसादाच्या सुरवातीला हिंडाल्को १५१ होता. हा प्रतिसाद लिहीत असताना त्याने १५६.४ ची उच्चतम पातळी गाठली आणि सध्या तो ८४००००० लाखांच्या व्हॉल्युमसहीत १५३ च्या भावाल ट्रेड करत आहे!! म्हणजे या क्षणी हिंडाल्कोत साधारण १२८.५ कोटी रुपायांची उलाढाल सुरू आहे. यात कोण कुठला तात्या अभ्यंकर आणि त्याचे ते २२००० रुपये!! ;)
मंडळी, आता बोला! इसको बोलते है शेअरमार्केट! ;)
असो..
आपला,
(धिरुभाईद्वैपायन) तात्या,
दलाल स्ट्रीट, मुंबई - २३.
--
धन कमाविले कोट्यानुकोटी, संगे न ये रे लंगोटी! ;)
हिंडाल्को ठोकला! ;)/तांत्रिक आलेख.
मंडळी,
१५६.४ पर्यंत गेलेला हिंडाल्को ठोकला! सध्या त्याचा भाव १५१.३५ सुरू आहे. आपल्या माहितीकरता आम्ही आजच्या दिवसातला आत्तापर्यंतचा तांत्रिक आलेख (टेक्निकल चार्ट) इथे देत आहोत. यावरून आपल्याला साधारणपणे बाजार सुरू असताना एखाद्या समभागाची हालचाल कळू शकते. कळू शकते म्हणण्यापेक्षा डोळ्याला दिसू शकते असं आपण म्हणू! स्टॉपलॉस किंवा टार्गेट या पातळ्या ठरवण्याकरता या आलेखाचा फायदा होऊ शकतो. या सगळ्या गोष्टी 'तांत्रिक विश्लेषण' या सदरात मोडतात, त्याकरता आम्ही बाजारगप्पांचा स्वतंत्र भाग यथावकाश लिहिणारच आहोत.
याला आपण वाटल्यास हिंडाल्कोचा ECG असं म्हणूया! ;)
आपला,
(धिरुभाईद्वैपायन) डॉ. तात्या अभ्यंकर.
दलाल स्ट्रीट, मुंबई - २३.
धन कमाविले कोट्यानुकोटी, संगे न ये रे लंगोटी! ;)
सटोडिआ
तात्यांच्या उदाहरणाने माझा मुद्दा अधोरेखित करण्याचा प्रयत्न करतो.
"हिंडाल्को"मध्ये तात्यांनी केलेली गुंतवणूक आणि डे ट्रेडरने केलेली गुंतवणूक यामागील प्रेरणा "त्यादिवशी दिसलेला व्हॉल्यूम आणि वरच्या दिशेने होणारी वाटचाल" सारख्याच आहेत.
मार्जिन हा एकमेव फरक... तो स्वतंत्र विषय आहे.
तात्यांनी तोट्यात विकायला नको म्हणून रोखे विकले नाहीत... डे ट्रेडरने ते तोटा स्वीकारून विकले असते. पण (केवळ कालचे तात्यांनी दिलेले हिंडाल्कोचे उदाहरण पाहायचे झाले तर) त्याने नक्कीच त्याआधीच फायदा कॅश करून सौदा मिटविला असता. (कोण चूक कोण बरोबर माहीत नाही... माझ्या मते केवळ वेगळ्या प्रवृत्ती आहेत. जुगार किंवा संयम दोन्हीकडे सारख्याच प्रमाणात आहे.)
(व्यासाची त्रिज्या झालेला द्रोणशिष्य) एकलव्य
खरं आहे..
(कोण चूक कोण बरोबर माहीत नाही... माझ्या मते केवळ वेगळ्या प्रवृत्ती आहेत. जुगार किंवा संयम दोन्हीकडे सारख्याच प्रमाणात आहे.)
खरं आहे तुझं एकलव्या. अरे बाजारात जो तो आपापल्या अंदाजाने, आडाख्याने व्यवहार करत असतो.
तात्या.
माहिती आणि जोखीम
या संकेतस्थळावर कोणत्याही माध्यमातून होणार्या लिखाणातील मते, सल्ले, माहिती इ. गोष्टींची जबाबदारी संबंधित लेखकांची आहे आणि या गोष्टींशी उपक्रम व्यवस्थापनाचा संबंध नाही. या गोष्टींच्या सत्यासत्यतेची पडताळणी उपक्रम व्यवस्थापन करत नाही. त्यामुळे इथे उपलब्ध माहितीचा वापर करून कोणताही निर्णय घेण्याशी संबंधित असलेली जोखीम ही संपूर्णपणे निर्णयकर्त्याची राहील. अधिक माहितीसाठी डिस्क्लेमर पाहावे.
आवश्यक असेल तेथे लेखकांनी कृपया अश्या घोषणेचा उपयोग करावा.
सूचना
उपक्रमपंत -
हा डिसक्लेमर प्रतिसाद देण्यामागे आपला हेतू चांगलाच आहे. पण जागा चुकली आहे असे वाटते.
स्नेहपूर्वक...
पैसा हा निकष वरवरचा झाला
"नायजेरियामधे जावे का?' या चर्चेलाही डिसक्लेमर नको का?? कसे ठरविणार???
युयुत्सु - बाकी मुद्यांवर सूर जुळणारा आहे.
मुलांनो,
अरे मुलांनो, भांडू नका रे! ;)
धन कमाविले कोट्यानुकोटी, संगे न ये रे लंगोटी! ;)
बाजार गडगडला..
राम राम मंडळी,
काल बाजार खूप जोरात गडगडला आणि निफ्टी ४१९८ या भावाला बंद झाला.
काल बाजार बंद झाल्यानंतरच्या निफ्टीच्या तांत्रिक पातळ्या खालील प्रमाणे आहेत -
निफ्टी - ४१९८ (कालचा बंद)
नजीकचा अटकाव - ४३२४
नजीकचा आधार - ४१९१, ४१४१.
बाजाराचे हे गडगडणे असेच सुरू राहिल्यास आणि निफ्टी ४१४१ पातळीच्या खाली दोन तीन दिवसांपेक्षा अधिक काळ बंद राहिल्यास बाजारात अजून मोठी घसरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पहिल्या आकृतीतला MACD खालच्या दिशेने मान करून आहे. तो जेव्हा खालच्या भागात जातो तेव्हा बाजार किती कोसळतो हे आपल्याला ह्याच आकृतीमधल्या ४२३९ - ३५५४ या घसरणीकडे पाहून लक्षात येईल! ;)
दुसर्या आकृतीमधला स्टोचॅसटिक ऑसिलेटर देखील ५० च्या खाली आहे. त्याने तिकडून जोराचा यु टर्न घेतल्यास बाजार सावरला जाईल. पण तो जर आणखी खाली गेला आणि २० च्याही खाली जाऊन घुटमळला तर येत्या काही दिवसात मोठी घसरण निश्चित!
अर्थात, अशी कितीही तांत्रिक विश्लेषणं केली तरी शेवटी 'मार्केट इज ऑलवेज सुप्रीम!' अशीच आमची श्रद्धा आहे! ;)
असो.. बाजार म्हटला की तेजीमंदी चालायचीच! ;)
आपला,
तात्या अभ्यंकर,
दलाल स्ट्रीट, मुंबई - २३.
धन कमाविले कोट्यानुकोटी, संगे न ये रे लंगोटी! ;)
हिंडाल्कोचे ...
... कांबळेचे काय झाले?
तात्याउंदीर पिंजर्यात सापडला! ;)
अरे हम तो १४७ मे लेकर १५१.२५ मेही निकल गये! ;)
चार रुपये भेटले बॉस! ;)
नंतर हिंडल्को १५६ पर्यंत गेला होता पण तिथून त्याला पुन्हा १५० च्या खाली ठोकला! ;)
मी १४७ ला केलेला सौदा १५० ला हातात आल्यानंतर ट्रेलिंग स्टॉपलॉस पद्धतीने काम करत होतो. तो जेव्हा १५१.७५ गेला तेव्हा मी १५१.२५ चा ट्रेलिंग स्टॉपलॉस लावला होता. १५१.७५ नंतर तो पुन्हा एकदा १५१.२५ पर्यंत आल्यानंतर आमच्या संगणकाने ट्रेलिंग स्टॉपलॉसचा चाप ओढला आणि तात्याउंदीर पिंजर्यात बंद झाला! ;))
तात्या.
निफ्टीचा झुला! ;)
निफ्टी - ४१९८ (कालचा बंद)
नजीकचा अटकाव - ४३२४
नजीकचा आधार - ४१९१, ४१४१
आज अंदाजाप्रमाणे बाजार खालीच उघडला. ४१९१ आणि ४१४१ हे दोन्ही आधार तोडून तो ४१३१ पर्यंत खाली गेला. परंतु लगेचंच तो पुन्हा तेजीत आला आणि ४२२० पर्यंत गेला. सध्या तो पुन्हा ४१९८ ला भाव भाव ट्रेड करत आहे. ४१३१ ते ४२२० ही ८९ अंकांची व्होलॅटिलिटी (मराठी शब्द?) बाजाराकरता बरी नाही असे आम्हाला वाटते. कमी व्हॉल्युम असल्यामुळे बाजार सध्या दिशाहीन व्होलाटाईल अवस्थेत भटकत आहे. नक्की कुठे जाऊ हे त्याला कळत नाहीये! ;)
असो!
(आज फक्त पॅव्हेलियनमध्ये बसून राहून बाजाराची मॅच पाहायची असे ठरवलेला!) तात्या.
नेहेमीप्रमाणेच ....
एक शंका आहे -
बाजार हा नेहेमी वाढून उघडला, पडून उघडला असे का दिसते? बाजार उघडण्याआधीच कोण ट्रेडिंग करतं?
http://nse-india.com वर असलेला हा निफ्टिचा ग्राफ पहा. नेहेमी ९:५५ ला सुरु होतो. आणि १० पर्यंत जास्तीत जास्त हालचाल होऊन गेलेली असते. आमचा आयसीआयसीआय काही आम्हाला १० च्या आधी ट्रेडिंग करून नाही देत. मग कोण करतं?
बाकी आपली लेखमाला छान माहिती पुरवते आहे. पुढचा भाग केव्हा?
लवकरच..
बाकी आपली लेखमाला छान माहिती पुरवते आहे. पुढचा भाग केव्हा?
धन्यवाद आवडाबाई. पुढचा भाग लवकरच टाकतो!
आपला,
(अर्धवटराव) तात्या.
ऑईल
महागाई मध्ये कॅलटेक्स, शेल वगैरे ऑईल कंपन्यांचे समभाग खाली गेले की वर? साधरण पणे इंधन दरवाढ झाली की ते वर जातात का?
आपण कोणत्या शेअरस् मध्ये लक्ष घालता?
युयुत्सु,
आपण कोणत्या शेअरस् मध्ये लक्ष घालता?
आम्हाला पण आवडेल,
आपण जर शेअर बाजारात (शक्य तोवर) हात भाजून न घेता 'कसे काम करावे' याच्या काही पद्धती दिल्यास.
आपण अभ्यास कसा करता?
ट्रेडिंग कसे करता?
इंडेक्स फंड मध्ये गुंतवणूक कशी करता?
इंडेक्स फंड मध्ये गुंतवणूक साधारणपणे कधी करावी?
का?
काही भले बुरे अनुभव?
(सगळे इथे सांगण्या सारखे नसेल तर व्यनि वापरला तरी चालेल. ;) )
डायव्हर्सिफिकेशन कसे करता? काय निकष ठेवता?
नवीन सुरवात करणार्याला काही काही टिप्स?
काही संकेतस्थळे?
आपला
गुंडोपंत