"अर्वाचीन व्यासपीठ" आयोजित सुप्रसिद्ध चित्रकार "श्री प्रभाकर कोलते" यांच्या " समाज, कला आणि कलाकार !" या विषयावरील व्याख्यान
नमस्कार,
"अर्वाचीन व्यासपीठ" आयोजित सुप्रसिद्ध चित्रकार "श्री प्रभाकर कोलते" यांच्या " समाज, कला आणि कलाकार !" या विषयावरील व्याख्यान व चर्चा सत्रात आपणास हार्दिक निमंत्रण आहे. सदर चर्चा-सत्र शनिवार दिनांक २५ फेब्रुवारी २०१२ रोजी संध्याकाळी ६.०० वाजता साठ्ये महाविद्यालय ( पार्ले महाविद्यालय ) सभागृह, विले-पार्ले (पूर्व), मुंबई, येथे आयोजित करण्यात येत आहे. सदर व्याख्याना नंतर ज्या श्रोत्यांना काही प्रश्न विचारायचे असतील किंवा आपली मते व्यक्त करायची असतील तर ते सदर "अर्वाचीन व्यासपीठ" वरून करू शकतात. व्याख्यानाचे चित्रण केलेली चित्र फीत इच्छुकाना उपलब्ध करून देण्यात येईल. व्याख्यान सर्वांसाठी खुले आहे.
या पूर्वी झालेली व्याख्याने -
(१) "भारतात विचारप्रणालीची घसरण झाली आहे काय?"- श्री श्रीधर तिळवे ( लेखक व दिग्दर्शक)
(२) " मी, ओशो आणि संगीत ! " - श्री यशवंत देव ( संगीतकार)
(३) " लोक ! सामान्य, बुद्धिमान , असामान्य !"- श्री श्याम मनोहर (लेखक)
(४) " सामाजिक सुधारणा कशा झाल्या , होतात, आणि व्हाव्यात !"- श्री अरुण टिकेकर (लेखक व पत्रकार)
(५) " देशीवाद"- श्री भालचंद्र नेमाडे ( लेखक)
आपले नम्र संयोजक
महेश पवार- मोबाइल क्रमांक ९८७०४१०३६५-
अजित दीक्षित - ९८६७३३२५४९-
ई मेल - maheshpmi6 @yahoo .com .
Comments
ग्रेट
कोलते सरांचे एक व्याख्यान मध्यंतरी वसईत झाले, ते निव्वळ ग्रेट होते. या व्याख्यानाला येणेही जुळवावे, असे वाटतेय्.