'वॉर् माँगरींग' : युद्धाची खुमखुमी!?

'वॉर् माँगरींग'

आजकाल सहज कुण्या २४/७ सबसे तेज् वगैरे न्यूज चॅनलवर नजर फिरवली तरी चिन्यांनी अमुक केले, त्यांनी तमुक केल्याचा पक्का पुरावा आदी बातम्या पहावयास मिळतात. युद्ध हे सर्वाधिक टीआरपी मिळवून देणारी बातमी होऊ शकते हे जरी मान्य केले तरी या प्रकारे भडकाऊ प्रचार प्रकरण चांगले नाही असे वाटते.
या संदर्भात अक्साई चीन बद्दलचा हा धागा वाचून थोडे वेगळे प्रश्नही मनात उभे राहिले.
सद्यस्थितीत कोणत्याही देशाने इतर सार्वभौम राष्ट्रावर आक्रमण करून तेथील भूभाग गिळंकृत करणे, अन् त्या गोष्टीस उर्वरीत जगाने अनुमोदन देणे हे अशक्यच वाटते.
अशा स्थितीत 'वॉर् माँगरींग' प्रकारच्या बातम्या पसरविणार्‍यांबद्दल् काय वाटते?
अशी युद्धे खरीच होऊ शकतात काय?
समजा युद्ध झालेच तर काय परिणाम होऊ शकतील अन् त्या अनुषंगाने कोणती तयारी सामान्य नागरिक म्हणून आपण करणे आवश्यक वाटते?
चीनचा धोका लष्करी दृष्टीने जितका वाटतो त्यापेक्षा अधिक तो 'इकॉनॉमिक' दृष्ट्या जास्त आहे असे वाटते. अन अवांतर म्हणून नॉस्ट्रॅडॅमसच्या भविष्यात् सांगितलेला पूर्वेकडील देश चीनच असावा काय?
इ.इ. बाबी विषयी येथील अभ्यासूंची मते जाणून घेणे आवडेल.
(हा माझा पहिलाच चर्चाप्रस्ताव आहे. हा धागा थोडा विस्कळीत आहे याची जाणीव आहे. या ठिकाणी योग्य वाटत नसेल, किंवा काही अलिखित संकेतांचे अजाणतेपणे उल्लंघन झाले असेल, तर कृपया सरळ उडवून टाकावा ही प्रशासकांना नम्र विनंती.)

लेखनविषय: दुवे:

Comments

वाचतोय.

वाचतोय.. चालु द्या..
बाकी चर्चा रंगलिय एवढ मात्र खरं....

=))

साहेब
२२४ वाचने झालीत. अन् मनाचा संवाद मनाशी अशी चर्चा सुरू आहे बहुतेक.

अरेच्या!

हा धागा आधी वाचला नव्हता.. मात्र् चीनच्या बाबतीत मिडीयाचा आक्रस्तळेपणा, अतीउजव्यांनी उभे केलेली चीनची प्रतिमा वगैरे गोष्टी चर्चायोग्य आहेत.
येत्या काळात राजकीय वैमनस्य ठेवणे कठीण (पक्षी: महाग :) )होत जाउन आर्थिक शिरजोरी निर्णायक ठरेल असे वाटते.

असो. चर्चाप्रस्ताव जुना आहे.. विस्कळीत आहे हेही खरेच!
तरी
पहिलाच आहे म्हणून अभिनंदन! :)

पुढच्यावेळी तुमच्याकडील विदा देऊन मग चर्चेच्या दिशेला पुरक प्रश्न दिलेत तर रोचक चर्चा होईलसे वाटते.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

आभार

प्रतिक्रिया नोंदविल्याबद्दल. पुढल्या धाग्यात (काढलाच तर) अशी सुधारणा नक्की करीन.

 
^ वर