उपक्रम दिवाळी विशेषांक २०११ - प्रतिसाद आणि प्रतिक्रिया

'उपक्रम'च्या सर्व सदस्यांना आणि वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!



उपक्रम दिवाळी अंक २०११
http://diwali.upakram.org/

उपक्रम दीपावली विशेषांक २०११: अनुक्रमणिका

उपक्रम दिवाळी विशेषांक २०११ तील साहित्यावर प्रतिसाद/प्रतिक्रिया देण्यासाठी हा धागा वापरावा. एखाद्या विशिष्ट लेखावर चर्चा करायची असल्यास त्यासाठी स्वतंत्र धागा काढण्यास हरकत नाही.

लेखनविषय: दुवे:

Comments

अभिनंदन!

अंक उत्तमोत्तम लेखांनी सजलेला दिसतो. पुढील काही दिवस वाचनाची सोय झाली.

लेखकांचे, उपक्रमाचे आणि दिवाळी अंकाचे अभिनंदन आणि सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा!

+१

असेच् म्हणतो. :)






+१

पूर्ण सहमत!

सुंदर

देखणे मुखपृष्ठ.
तुर्तास एवढेच. बाकी वाचून होईल तसे...

||वाछितो विजयी होईबा||

अभिनंदन आणि शुभेच्छा

अभिनंदन आणि शुभेच्छा

छायाचित्रे अप्रतिम

छायाचित्रे अप्रतिम आहेत. उपक्रमाच्या दिवाळी अंकाचे वैशिष्ठ्या जपले आहे.





अंक चाळला; आवडला

मुखपृष्ठाचे चित्र अभारतीय वाटलं तरी आवडलं. एक भडक रंग वापरूनही उत्तम चित्र दिसू शकतं.
लेखांची शीर्षकं पाहून लेख वाचण्याची उत्सुकता आहे, पण जमेल तेव्हा शांतपणे बसून, समजून घेत वाचण्यासाठी अंक बुकमार्क करून ठेवलेला आहे.

अभिनंदन

अभिनंदन, आणि सर्व उपक्रमीयांना दिवाळीच्या शुभेच्छा!

प्रतिमेबरहुकूम

दिवसभर उत्सुकता होती या अंकाच्या घोषणेची. कारण इथल्या अल्पशा का होईना पण तितक्या वावराने 'उपक्रम' च्या अंकाबद्दल मनात एक प्रतिमा तयार झाली होती, त्या प्रतिमेनुसारच अंकाचे देखणेपण [ज्याची सुरुवात अगदी मुखपृष्ठापासूनच झाली] नजरेत ठसले. लेखकांची नावेच अंकाच्या लालित्याची व वैविध्यतेची ग्वाही देतात आणि त्यानुसार त्यांच्या लेखनाची झलक वाचली आहेच, पण त्यासंदर्भात सविस्तर प्रतिक्रियाही देणे तितकेच महत्वाचे असल्याने ते काम नंतर करीनच. तोपर्यंत अंकाविषयीच्या आनंदाची नोंद इथे व्हावी यासाठी ह्या प्रतिसादाचे प्रयोजन.

दिवाळी अंक २०११ चे संपादक मंडळ, मुखपृष्ठाचे चित्रकार आणि सर्व तंत्रज्ञ मंडळी यांचे हार्दिक अभिनंदन.

अशोक पाटील

सुंदर...

दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा...

अंकातली सध्या फक्त छायाचित्रे पाहिली..एकापेक्षा एक अप्रतिम आहेत..

लेखही तसेच असतील.. :)

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

चांदण्या अवतरल्या राष्ट्रध्वजांवरती!

अंजली यांचा 'चांदण्या अवतरल्या राष्ट्रध्वजांवरती!' हे लेख् आताच वाचला.
रंजक व माहितीपूर्ण असा लेख.
(अनुक्रमांक ३२ पासून पुढे ध्वजाचे वर्णन व चित्र यात काहीतरी गल्लत झाल्यासारखे वाटते.)

||वाछितो विजयी होईबा||

धन्यवाद

लेख वाचून अभिप्राय दिल्या बद्दल धन्यवाद.

सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा!

शुभ दीपावली

सुंदर दिवाळी अंक! मुखपृष्ठ आवडले.
आत्ता अंक नुसता चाळलाय. निवांतपणे वाचेन.
धन्यवाद!

मस्त्!

इतिहास् आणि उत्खनन विषयक् वाचायला घेतलय् ह्या अंकातलं सध्या.
काही दुरुस्त्या/शंका द्यायच्या होत्या. तिथे प्रतिसाद् देता येत नाहिये. दुव्यावर् टिअचकी मारल्यास ह्याच धाग्यावर वाचकाला आणले जात आहे. हेच अपेक्षिसाहे की काही बिघाड आहे?

--मनोबा

बहुधा

बहुधा प्रतिसाद येथे द्यावेत किंवा येथे नवी चर्चा सुरू करावी असे काहीसे असेल.

लेखात म्हणल्याप्रमाणे

लेखाच्या शेवटी वर म्हणल्याप्रमाणे:

उपक्रम दिवाळी विशेषांक २०११ तील साहित्यावर प्रतिसाद/प्रतिक्रिया देण्यासाठी हा धागा वापरावा. एखाद्या विशिष्ट लेखावर चर्चा करायची असल्यास त्यासाठी स्वतंत्र धागा काढण्यास हरकत नाही.

चांदण्यांचा घोटाळा

ध्वजावरती अवतरलेल्या चांदण्यांचा घोटाळा झालेला दिसतोय. देशाचे नाव आणि ध्वज यांची गल्लत झालेली असावी. समाज नावाच्या गुंतागुंतीच्या गोष्टीचा कृपया विचार करून दुरुस्ती करावी अन्यथा लोकांच्या भावना दुखावतील.

सध्या भूतान आणि संकीर्ण हे दोन लेख वाचले. आवडले.

अभिनंदन

अंकाचे मुखपृष्ठ आणि लेख आकर्षक आहेत. प्रतिसाद वाचल्यानंतर. ते येथे देण्याची अथवा नवीन चर्चा विषय चालू करायची कल्पना आवडली...

दिवाळीच्या सर्व उपक्रमींना शुभेच्छा!

लवासा

प्रभाकर यांचा लवासा सिटीवरचा लेख वाचला. लेख माहितीपूर्ण आहे. लेखात बर्‍याच तपशीलात माहिती दिलेली आहे. पुर्वी उपक्रमावर निळू दामलेंसारख्या पत्रकरांनी केलेल्या समर्थनाविषयी चर्चा झालेली आहे. लेखात मूख्यत: पर्यावरणाच्या प्रश्नावर जोर दिलेला आहे. लेखाच्या सुरूवातीला शेतकर्‍यांविषयी काही सरसकट विधाने आहेत, ती पटली नाहीत.

मुद्रीतशोधन सदोष झाले आहे. पहिल्या परिच्छेदातील वाक्ये दुसर्‍या परिच्छेदात रिपिट झालेली आहेत. अनेक शब्द चुकीचे टंकले गेले आहेत.

उपक्रम दिवाळी अन्क

'चांदण्या अवतरल्या राष्ट्रध्वजांवरती' या लेखातील काही राष्ट्रान्चे ध्वज व नावे जुळत नाहीत. उदा. अमेरिका, इस्राएल इ. शक्य असल्यास त्रुटी दूर करावी. धन्यवाद.

दुरुस्ती

ध्वजांच्या लेखात दुरुस्ती केली आहे.

तसेच लवासा वरील लेखात दुरुस्ती केली आहे.

कलोअ,
उपक्रम दिवाळी अंक

दुरुस्ती केल्या बद्दल धन्यवाद

लेखात ध्वाजांनची खूप चित्र असल्यामूळे संपादित करतांना थोड्या चूका झाल्या असतील. वेळीच त्या दुरुस्त केल्या बद्दल संपादिकांचे विशेष आभार.

धन्स..

(तज्ञ व्यक्ती बोर्डावर असल्या की अशी कार्यक्षमता वाढते.)

||वाछितो विजयी होईबा||

आभार! | ब्लॉग/संकेतस्थळावर उपक्रम दिवाळी अंकाची माहिती

नमस्कार,

उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल उपक्रम सदस्यांचे आणि वाचकांचे मनःपूर्वक आभार!!!

दिवाळी अंकाची माहिती आणि छोटे चित्र आपल्या ब्लॉग, संकेतस्थळावर देण्यासाठी कृपया खालील मजकूर चिकटवावा.

<div style="text-align: center;"><a href="http://diwali.upakram.org/" target="_blank"><img src="http://diwali.upakram.org/files/2011/2011_mukhaprushtha_small.jpg" /></a>
<p style="font-size: 0.9em;"><a href="http://diwali.upakram.org/" target="_blank">उपक्रम दिवाळी अंक २०११</a></p></div>

म्हणजे असे दिसेल

पुन्हा एकदा सर्वांचे मनःपूर्वक आभार!

कलोअ,
उपक्रम दिवाळी अंक

छान.

दिवाळी अंकावर चक्कर टाकली. काही तरी उपक्रम चालू आहे, त्याचं कौतुक आहेच. सर्वांचं मनःपूर्वक अभिनंदन.

बळजबरी आवडलं आवडलं असं म्हणन्यात काही मतलब नाही. पण मला मुखपृष्ठ अज्याबात आवडलं नाही. काही तरी खास हटके पाहिजे होतं असं वाटलं...!

धनंजय,नंदन, नानावटी, घारे साहेब, अरुंधती, ऋषिकेश, कोल्हटकर, आणि इतर मंडळी लेखनातून परिचयाची आणि दमदार लेखन करणारी असल्यामुळे लेखन वाचनीय असणार यात काही वाद नाही.

बाकी, लेखन वाचून प्रतिक्रिया डकवीनच.

-दिलीप बिरुटे
(आपलाच )

मुखपृष्ठ

डॉक्टर ~

"मला मुखपृष्ठ अज्याबात आवडलं नाही" ~ हे मत व्यक्ती-विचार स्वातंत्र्याच्या नजरेतून पाहिल्यास इथले सदस्यच नव्हे तर संपादकांनाही मान्य करावे लागेल, पण

"बळजबरी आवडलं आवडलं असं म्हणन्यात काही मतलब नाही" ~ या मतामध्ये त्याच स्वातंत्र्याचा अधिक्षेप आहे. कारण ज्यानी मुखपृष्ठ आवडले (त्यात मीदेखील आहेच) असे लिहिले आहे त्यांच्या त्या कबुली-विधानामध्ये "बळजबरी" कशी प्रतीत होते ?

"काही तरी खास हटके पाहिजे होतं असं वाटलं...!" ~ याबद्दल सहमती व्यक्त होऊ शकेल, पण म्हणून जे आहे ते दोषपूर्ण वा दीपावली कल्पनेशी फटकून आहे असे म्हणणार नाही.

अशोक पाटील

खुलासा

कारण ज्यानी मुखपृष्ठ आवडले (त्यात मीदेखील आहेच) असे लिहिले आहे त्यांच्या त्या कबुली-विधानामध्ये "बळजबरी" कशी प्रतीत होते ?

कधी कधी आपल्याला नावडलेल्या गोष्टींनाही कधी कधी उगाच ''छान छान'' अशी दाद द्यावी लागते. कोणाचे मन दुखावेल त्यापेक्षा छान म्हटलेले बरे, तेव्हा असा उल्लेख आपण बळजबरीने केलेला असतो असे मला म्हणायचे आहे. आपण आणि सर्व ज्या सदस्यांनी मुखपृष्ठ आवडले आहे, असे म्हटले आहे, त्यांच्याबदल हे मत नाही. हे माझं वैयक्तिक मत आहे.

"काही तरी खास हटके पाहिजे होतं असं वाटलं...!" ~ याबद्दल सहमती व्यक्त होऊ शकेल, पण म्हणून जे आहे ते दोषपूर्ण वा दीपावली कल्पनेशी फटकून आहे असे म्हणणार नाही.

हा ज्याचा त्याचा पाहण्याचा दृष्टीकोन आहे. मला सदरील दिवाळी अंकाचं मुखपृष्ठ पाहून् हा दिवाळी निमित्त निघालेला ''कृषिअंक'' आहे असे वाटू शकते. कापसाच्या झाडाची पाने जवळपास अशीच असतात त्यामुळे तसा विचार माझ्या मनात तरळला. असो,

-दिलीप बिरुटे

ओके

ओके. कदाचित आपल्यातील हे दोनतीन प्रतिसाद वाचून संपादक मंडळातील एखाद्या तज्ज्ञाला मुखपृष्ठ कल्पनेमागील विचार इथे प्रकटावे वाटेलही. तसे झाल्यावर धुके निवळेल.

तोपर्यंत नोटेड् ऍन्ड् थॅन्क्स सर !

अशोक पाटील

भूतान

ऋषिकेश यांचा भूतानवरचा लेख आवडला. ह्या देशाला कधीतरी भेट द्यावी असे वाटते.

मुखपृष्ठ आवडले.

यावेळी उपक्रमाचे मुखपृष्ठ सुरेख झाले आहे. त्याच त्याच पणत्या, रांगोळ्यांची चित्रे, बायकांचे क्लोज-अप वगैरे असणारी गुळगुळीत मुखपृष्ठे यापेक्षा हे मुखपृष्ठ अधिक उठावदार, वेगळे वाटले. युरोप अमेरिकेत या काळात पानगळ असते आणि पानगळीत पाने अतिशय मोहक रंग धारण करतात. उपक्रमावर लिहिणारी अनेक मंडळी परदेशस्थ आहेत. त्यांना या मुखपृष्ठाशी जवळीक वाटेल.

काही मजकूर संपादित.

सहमत

यावेळी उपक्रमाचे मुखपृष्ठ सुरेख झाले आहे. त्याच त्याच पणत्या, रांगोळ्यांची चित्रे, बायकांचे क्लोज-अप वगैरे असणारी गुळगुळीत मुखपृष्ठे यापेक्षा हे मुखपृष्ठ अधिक उठावदार, वेगळे वाटले.

सहमत.

काही मजकूर संपादित.

सहमत

यावेळी उपक्रमाचे मुखपृष्ठ सुरेख झाले आहे. त्याच त्याच पणत्या, रांगोळ्यांची चित्रे, बायकांचे क्लोज-अप वगैरे असणारी गुळगुळीत मुखपृष्ठे यापेक्षा हे मुखपृष्ठ अधिक उठावदार, वेगळे वाटले.

सहमत.

काही मजकूर संपादित.

सहमत.

अभिनंदन

दिवाळी अंकाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. लेखांवर नजर टाकली असतानाच विषयांचं वैविध्य , त्यांच्या मजकूराचा दर्जा लक्षांत येतो आहे. जमेल तसे वाचून प्रतिक्रिया देईन असं म्हणतो. पुन्हा एकदा अभिनंदन.

अंकाचे मुखपृष्ठ, त्यातले एकच एक वेगळ्या रंगाचे पान, त्याचे स्वतःचे वेगळे स्वरूप आणि त्याखालची इन्डिव्हिज्युऍलिटी ही कॅप्शन हे सगळं विशेष आवडलं. कलेच्या क्षेत्रात नवनवीन विचारांना, प्रयत्नानांना वाव मिळत आहे याचीच एक प्रकारे ही साक्ष आहे असं वाटलं.

एक प्रश्न : अंकांमधील लेखांची गुणवत्ता, त्यावर घेतलेली मेहनत, त्या लिखाणाची गुणवत्ता हे सारं लक्षांत घेता त्यांमधल्या अनेक लिखाणांवर चर्चा होऊ शकते असं वाटतं. दिवाळी अंकाच्या सेक्शन मधे जरी प्रत्येक लेखाखाली प्रतिक्रिया देण्याची सोय असली तरी , विशेषकरून दिवाळी अंकातल्या उत्तम लिखाणाचा परामर्ष घेतला जात नाही याची थोडी रुखरुख वाटते. माझं हे निरीक्षण बरोबर असेल तर , दिवाळी अंकामधल्या लिखाणांवरच्या प्रतिक्रियाही उपक्रमाच्या या मुख्य पटावर द्याव्यात का ? इथल्या जाणकारांनी जरा मत नोंदवलं तर बरं होईल.

मलाही

मलाही असेच वाटते. दिवाळी अंकांमधील प्रतिक्रिया त्या त्या लेखाखाली देण्याची सोय हवी. असे एकीकडे जेवायला आणि एकीकडे आंचवायला जाणे बरे वाटत नाही.
सन्जोप राव
दर्द मिन्नत-कशे-दवा न हुवा
मैं न अच्छा हुवा, बुरा न हुवा

मस्त लेख!

घारेसाहेब,नेहमीप्रमाणेच अतिशय सहजसोप्या शैलीत दिलेली माहिती आवडली.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

भूतान

भूतानवरचा लेख वाचला. अतिशय आवडला. भूतानमध्ये कायमचे जाऊन राहता आले तर काय बहार येईल!
सन्जोप राव
दर्द मिन्नत-कशे-दवा न हुवा
मैं न अच्छा हुवा, बुरा न हुवा

+१

भूतानवरचा लेख वेगळा आणि मस्त आहे. नुकतेच बातम्यांमधे भूतानच्या राजाचे लग्न झाल्याचे दाखवले होते. तेव्हा ग्रॉस हॅपीनेस प्रॉडाक्ट वगैरेबद्दलही माहिती दिली होती. लेख वाचायला मजा आली.

भूतानला जायचे कसे काय सुचले? किती लोक गेला होतात? माणशी किती खर्च अपेक्षीत आहे? एकट्या दुकट्याने, कुटुंबासोबत सफरीला जावे का? वगैरे माहिती देणारा एका माहितीपूर्ण लेखही लिहावा ही विनंती.

माहीती

सर्वप्रथम, लेख वाचणार्‍यांचे व लेख वाचुन अभिप्राय कळविलेल्यांचे अनेक आभार!
बाकी श्री वैद्य यांनी विचारलेल्या प्रश्नांसाठी वेगळा लेख लिहिता येणे कठीण आहे. मात्र यच लेखात (वृत्तपत्रात असते तशी) एखादी चौकट टाकता आली असते असे (आता) वाटते आहे. असो. माहीती इथेच देतो. संपादकांना योग्य वाटत असल्यास त्यांनी चौकटीच्या स्वरूपात मुळ लेखात डकवल्यास हरकत नाहीच! :)

भूतानला जायचे कसे काय सुचले?

काहि भाग हे सांस्कृतीकदृष्या / सामाजिक-भौगोलिक-ऐतिहासीक फार वेगळे आहेत व अनेक वर्षांपासून त्यांनी ते वेगळेपण कटाक्षाने जपले आहे. त्यातील काहि भागांत जागतीकीकरणाच्या रेट्यामुळे म्हणा, अटळ आर्थिक गरजांमुळे म्हणा ही संस्कृतीची वर्षानुवर्षे धरलेली कास सोडावी लागत आहे. असे काहि प्रदेश बदलत आहेत असे कळल्यावर ते पूर्णपणे बदलायच्या आत तिथे भेट देणे मला महत्ताचे वाटते. त्याच हिशोबाने मी मागे अंदमानला गेलो होतो. जॉली बॉईज वगैरे पर्यटनस्थळे टाळून जारवा रिझर्व्हस बघुन आलो होतो. भुतानला लोकशाही आली आणि तिथे टिव्हीला मान्यता मिळाल्याची बातमी गेल्या ३-४ वर्षांत कधीतरी वाचली होती. एकदा टिव्ही आला की अनेक गोष्टी बदलतात, त्या फार बदलायच्या आत तिथे जाऊन यावे या विचारांनी तिथे जायला प्रेरीत झालो.

किती लोक गेला होतात?माणशी किती खर्च अपेक्षीत आहे? एकट्या दुकट्याने, कुटुंबासोबत सफरीला जावे का?

आम्ही (वेगवेगळ्या वयोगटातील) ७ जण गेलो होतो. सहकुटुंब गेलो होतो (लहान वयातील कोणी नव्हते). रस्त्यावरील प्रवास तसंच फारच (हिलामयीन) घाटाघाटाचा प्रवास व हाय अल्टीट्यूड असल्याने लहान मुलांना नेणे कितपत योग्य आहे हे ज्याचे त्याने ठरवावे. मी लहान मुलांना (८-१० वर्षांखालील) नेणे शक्यतो टाळा असे सुचवेन.
आम्ही मुंबई ते बागडोगरा विमानाने व पुढे अखंड एसयुव्ही केली होती. विमानप्रवास धरून माणशी खर्च ३५-४० हजार् आला होता. (काहिंनी तिकिटे उशीरा काढल्याने भव वाढले होते मात्र ते योग्य व्यवस्थापनाने टाळता येऊ शकेल)
दुसरा कमी खर्चिक पर्याय न्यू जलपैगुडी पर्यंत ट्रेनने जाणे हा आहे मात्र तो आर्थिक ताण नसल्यास टाळावा असे सुचवेन कारण हा दोन अडीच दिवसांचा प्र्वस इतका शीण आणतो की भूतानमधील प्रवास नकोसा वाटु शकतो
तिसरा पर्याय अर्थातच पारोपर्यंत विमानाने जाणे हा आहे. तो बराच खर्चिक आहे. माणशी खर्च ६०-६० हजारा पर्यंत जाईल असा अंदाज करता यावा.

(अर्थात हा खर्च प्रवासी भारतीय नागरीक आहेत असे गृहितक धरून दिलेले आहे. नसल्यास खर्च दुप्पटीहून अधिक धरावा :) )

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

कोडी

अंक चाळणे सुरु आहे ...

कोड्यांची उत्तरे कुठे द्यायची?

यशोधरेवरचा लेख

गौरी दाभोळकरांचा झांतपी व यशोधरेवरचा लेख वाचला. आणखी विस्तृत हवा होता असे वाटले. उत्सुकतेपोटी गूगलबाबावर यशोधरेबद्दल जास्त माहिती वाचायला गेले असता ही इंटरेस्टिंग लिंक गवसली : http://www.buddha-kyra.com/wife.htm
ह्यातील माहिती कितपत अधिकृत आहे / नाही याची कल्पना नाही, परंतु ही लिंक विकीवर मिळाली, व माहिती नक्कीच रोचक आहे. जरूर लाभ घ्यावा.

दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ छान आहे. बाकी अंक चाळणे सुरु आहे. :-)

दिवाळी अंक आवडला

लेख, मांडणी, चित्रे सगळे उपक्रमाच्या दर्जाला साजेसे. अंक फार आवडला.

छायाचित्रे

सर्व छायाचित्रे आवडली. या कलेतले फारसे कळत नसूनही डोळ्यांना आनंद देणारी वाटली.
सन्जोप राव
दर्द मिन्नत-कशे-दवा न हुवा
मैं न अच्छा हुवा, बुरा न हुवा

भूतानचा लेख आवडला.

भूतानवरील ऋषिचा लेख मलाबी आवडला. कसा थोडक्यात आणि नेटनेटका झाला आहे. मस्त हो सेठ...!

छायाचित्रं आवडली. शशांक यांचं 'श्वेतपुष्पाचं' छायाचित्रं सुंदरच आहे. या निमित्तानं का होईना मालकांना पाहता आले म्हणून डोळे भरुन आले. :) (मालक हलकेच घ्या हो)

बाकी, लेखाखाली संदर्भ देण्याच्या पद्धतीवर एकदा कार्यशाळा घेण्याची गरज आहे, असे मला वाटते.

............................................................
हम भी दरिया है हमे अपना हुनर मालूम है.
जिस तरफ भी चल पडेंगे रास्ता हो जायेगा.

-दिलीप बिरुटे

छायाचित्रे

सर्व छायाचित्रे मोठ्या स्क्रीनवर पाहिली - छ्द्मावरण आणि आभाळाचे गिटार विशेष आवडले. नंदन यांनी काढलेल्या चित्राचा परिसर कोणता आहे? नॉर्वेच्या उत्तरेस लोफोटेन द्वीपांच्या फियोर्डस् ची आठवण झाली.

धनंजय यांचा लेख वाचत आहे - प्रतिसाद द्यायला वेळ लागणार; सध्या नोट काढणे चालू आहे! लेख खूप आवडला; इतकी किचकत माहिती इतक्या साध्या भाषेत वाचून थक्क झाले.

नानावटींचा लवासावरचा लेखही माहितीपूर्ण, मन खिन्न करणारा आहे.

प्रत्येक लेखाच्या खाली, किंवा येथे मुख्य स्थळावर स्वतंत्र चर्चा झाली तर चांगले होईल. हा धागा वाढत जाईल तसे नवीन प्रतिसाद आहेत हे पाहून टिचकी मारल्यावर नेमका नवीन कुठला, आणि कोणत्या लेखाबद्दल (किंवा विकाराबद्दल!) आहे हे लगेच कळणार नाही.

वाचनीय

उपक्रमाच्या व्यक्तिमत्वाला शोभणारा अंक!!

मुखपृष्ठ:- जर ते लाल पान वेगळ्या अँगल मधे हलवले असते तर् दिवाळीतील पणतीचा आभास करता आला असता असे वाटले. पण ते छायाचित्र आवडले.

दृष्टीचा डोळा पाहों गेलीये - (म्हणजे काय?) लेख उत्तम. छायाचित्रण व चित्रकलेच्या सुरवातीच्या काळाचा इतिहास वाचनीय. सुरेख लेख.

संकीर्ण - आवडेल असे.
छायाचित्रेही छान.

यंत्रे तयार करणारी यंत्रे, कर्नल मकेंझीचा ऐतिहासिक खजिना, ट्रॉय, वसई, दुर्बीण, स्वार्थातून परमार्थ, अक्षरचिन्हे - विविध विषयांवर माहीतीपूर्ण लेखन हे उपक्रमाचे वैशिष्ट्य दिवाळी अंकात छान प्रकटले.

ढीगभर लक्षणे, की एकसंध व्याधी? - लेख आवडला. परंतु नेमके कोणाचे प्रबोधन अथवा नेमका काय हेतू समोर ठेवून लेख लिहला (टारगेट ऑडीयन्स) याचा खुलासा आल्यावर लेख नीट समजायला मदत होईल.

लवासाचा 'आदर्श' घोटाळा - हा लेख वाचून येन केन प्रकारेण लवासावर केवळ नकारात्मकच लिहायचे आहे असे वाटले. त्यामुळे उलट लवासा प्रकल्पाबद्दल सहानुभूतीच वाटली. :-) जर लँड स्लाईडचा धोका आहे तर् बरेच आहे ना पडतील त्या श्रीमंतांची घरे :-) घेतील ते बघून. गरीब लोक तर नाहीत ना त्या वस्तीत ?? पर्यावरण तसेच अनेक कायदे हे जर कालबाह्य असतील व गेल्या २५ वर्षात नवीन तंत्रज्ञानाने संभाव्य धोके टाळून बांधकाम करता येत असेल तर् अमुक मजली कामाला कायद्याने परवानगी नंतर अमुक मजली बांधकाम केले गेले व नंतर अतिरिक्त परवानगी दिली जाणे हे तितके भयानक गुन्हे होत नाहीत. लवासा सारखी शहरे वसवायची असल्यास काही आराखडे उपलब्ध आहेत काय? असल्यास तंतोतंत अमंलबजावणी करावी. नसल्यास लवासा डेव्हलपरला तो परिसर विकसीत करायचे काही स्वातंत्र्य मिळाले असल्यास आक्षेप कसला? डोंगरमाथ्यावर, उतारावर शंभर मजली सुरक्षीत इमारत उभे करायचे तंत्रज्ञान आज उपलब्ध असेल तर उगाच सद्य (कालबाह्य) नियमांवर बोट ठेवून अमुक मजल्याचीच परवानगी आहे असा आरोप करणे तितकेसे पटत नाही. मागणी, पुरवठा, तंत्रज्ञान ह्याचा विचार करता जर सुरक्षीत बांधकाम करता येत असेल कायदे बदलावेत. अन्यथा नियोजनबद्ध, इफिशियंट संकुले बांधणे अवघड होईल. असो लवासा कंपनी देखील योग्य आक्षेपांवर उपाययोजना करेल अशी अपेक्षा करुया.

ऋषिकेशच्या भूतान लेखाची बरेच दिवसांपासून वाट पहात होतोच. लहान मुलांसाठी, वयस्कर लोकांसाठी कितपत सोयीचे तसेच आवडीचे भाग आहेत हे तितकेसे कळले नाही. भूतान बद्दल कुतूहल अजुनही आहेच त्यामुळे एखादी तरी सहल करणे भाग आहे. भूतान बद्दल स्पेशल एक्झीबिशन / पॅव्हेलियन आधी पाहून त्यातील सांस्कृतीक भाग कळल्यावर फक्त आरामाकरता जायचे की कसे ते ठरवता येईल असे दिसते.

राष्ट्रध्वजावरील चांदण्या लेखाला 'दिवाळी अंकातून' अर्धचंद्र मिळायला हवा होता असे वाटले. तसेच झांतपी व यशोधरापेक्षा जास्त माहीती लेखीकेबद्दलच मिळाली त्यामुळे त्या लेखाचे प्रयोजनही फारसे कळले नाही. हे वगळता अंक वाचनीय झाला आहे.

लवासावर केवळ नकारात्मकच (?)

लेखाच्या शीर्षकात उल्लेख केल्याप्रमाणे माझा रोख पर्यावरणाच्या मुद्द्यापेक्षा लवासाने घातलेल्या घोटाळ्यावर होता. (परंतु ते साध्य झाले नाही असे आता वाटत आहे.) कायदा मोडता येतो, हवे तसे वाकवता येते, सत्ता हातात असल्यास 2-4 वर्षाची कामे 1-2 दिवसात (वा 1-2 आठवड्यात) होऊ शकतात, तज्ञांना विकत घेता येते हे दाखवायचे होते.

लवासा खरोखरच बांधकाम क्षेत्रात नवीन दाखले प्रस्थापित करणार असल्यास ती नक्कीच अभिमानास्पद गोष्ट ठरेल. फक्त त्यासाठी मागील दारातून न येता, कुणाच्याही कुबड्यांची मदत न घेता, पर्यावरणाची हानी न करता व engineering ethicsचा अवलंब करत हे काम करावे ही अपेक्षा.
आजच्या लोकसत्ता दैनिकातील हा परिच्छेद भरपूर काही सांगून जातो:
प्रीतींदर भरारा याचं जगण्याचं तत्त्वज्ञान सोपं आहे. दोन पद्धतीनं जगाचं नियमन होतं, असं तो मानतो. पहिल्या पद्धतीत चांगलं आणि वाईट हे कळणारे असतात. ते वाईटाच्या मार्गाने जात नाहीत. दुसऱ्या गटातले बुद्धिमान असतात आणि फायद्यासाठी ते काहीही करायला तयार असतात. त्यांना रोखणं हे सरकारी यंत्रणेचं काम आहे.

मुळात कायदे कालबाह्य झाले असतील तर लवासाने पुढाकार घेऊन त्रुटी दाखवायला हव्या होत्या. कायद्यातील पळवाटाही हव्यात व कालबाह्य आहेत म्हणून मनमानी करायलाही हवे हे निश्चितच योग्य वाटत नाही.
तंत्रज्ञानाने संभाव्य धोके टाळून बांधकाम करता येत असेल तर् अमुक मजली कामाला कायद्याने परवानगी नंतर अमुक मजली बांधकाम केले गेले व नंतर अतिरिक्त परवानगी दिली जाणे हे तितके भयानक गुन्हे होत नाहीत.
कुठले गुन्हे भयानक ठरतील वा ठरणार नाही हे जरी आता सांगता येत नसले तरी अशा प्रकारच्या नियमामागे निश्चितच काही पूर्वानुभव, काही शास्त्राधार असावा असे मला वाटते. वेळ टळून गेल्यानंतर, व मोठ्या प्रमाणात वित्तहानी-जीवितहानी झाल्यानंतर पश्चात्ताप होत असल्यास त्याचा उपयोग होणार नाही.

'चांदण्या अवतरल्या राष्ट्रध्वजांवरती!' थोडी पुरवणी.

'चांदण्या अवतरल्या राष्ट्रध्वजांवरती!' ह्या लेखावरून पुढील useless knowledge सुचले. ते नोंदवीत आहे.

दक्षिण गोलार्धामधील पुढील देशांच्या ध्वजांवर चार अथवा पाच तार्‍यांचा (पाचवा तारा छोटा) समूह दिसतो. देश असे: न्यूझीलंड, मायक्रोनेशिया, सॉलोमन द्वीपे, पापुआ न्यू गिनी, सामोआ, ऑस्ट्रलिया, ख्रिसमस द्वीपसमूह (?), कोकोस द्वीपसमूह (?). (प्रश्नचिह्नांकित नावे सार्वभौम देश नसून अन्य देशांचे भाग आहेत.)

सदर्न क्रॉस
सदर्न क्रॉस

लेखिकेने न्यूझीलंडसंबंधित माहितीत ह्याला Constellation of the Crux असे म्हटले आहे ते बरोबरच आहे. सदर्न क्रॉस हे ह्याचे अधिक प्रसिद्ध असे नाव आहे. (नकाशा पहा.) ५० अंश दक्षिण अक्षांशांच्या खाली असल्याने भारतातून तो कधीच दिसत नाही आणि त्यामुळे आपणास अपरिचित आहे. पण दक्षिण गोलार्धात तो उत्तरेकडील सप्तर्षि समूहासारखा ठळक दिसतो. त्या गोलार्धात स्थित देश आपल्या ध्वजांवर ह्या कारणासाठी त्याला स्थान देतात. दोन वर्षांपूर्वी मी न्यूझीलण्डला गेलो असता तेथील साउथ आयलंडमधील 'मिल्फर्ड साउंड' ह्या फ्योर्डच्या सहलीला गेलो होतो. क्वीन्सटाउनला परततांना रात्र झाली तेव्हा आमच्या विनंतीवरून मुद्दाम बस थांबवून आमच्या मार्गदर्शकाने आम्हाला तो दाखविला होता आणि तदनंतर न्यूझीलण्ड सोडेपर्यंत रोज रात्री आम्ही त्याचे दर्शन घ्यायचो!

 सदर्न कमांडचे चिह्न
सदर्न कमांडचे चिह्न

पुण्यातील लोकांनाहि कँपच्या बाजूस तो दिसू शकतो कारण तेथील सदर्न कमांडचे चिह्न म्हणजे हा क्रॉस आहे. (चित्र पहा.) त्या कमांडशी संबंधित अधिकार्‍यांच्या शर्टच्या बाहीवर हे चिह्न दिसते

 

जे बात!!

साहेब, १००% युझफुल्ल माहिती आहे की ही!

||वाछितो विजयी होईबा||

भारतातून दिसणे

कदाचित हा तारकासमूह भारतातून दिसत असेल. महाराष्ट्राची लॅटीट्युड १५-२० पर्यंत असल्याने दक्षिण क्षितीजा पर्यंतचे तारे ७०-७५ कोनापर्यंत दिसतील. हा तारका समूह ६० च्या आसपास असल्याने दिसायला हवा. अधिक दक्षिणेकडील राज्यात तर हा समूह जास्त चांगला दिसायला हवा. त्याची वेळ मात्र पाळायला हवी. दक्षिण गोलार्धात मात्र त्याचे दर्शन जास्त वेळ होत असणार हे साहजिक आहे.

प्रमोद

पुण्यातून दर्शन

पुण्यातील आकाशात सदर्न क्रॉस वर्षभर असतो. सध्या तो साधारण सूर्योदयी क्षितिजावर येतो आहे. त्याची आकाशातील जास्तीत जास्त उंची १० अंशांपर्यंत, बरोबर दक्षिण दिशेला असते. साधारण जानेवारीमध्ये तो सूर्योदयाआधी क्षितिजावर येऊन सूर्योदयाआधीच जास्तीत जास्त उंचीवर पोह्चेल. जानेवारीत आकाशही स्वच्छ असल्याने दिसू शकला असता, पण पुण्याच्या दक्षिणेला कात्रजचा घाट असल्याने पुण्यातून दर्शन तर अशक्य आहे. घाट ओलांडून गेल्यावर कदाचित दिसेल.
(चेन्नईतून १५ तर कोलंबोतून २० अंशावर दिसेल)

||वाछितो विजयी होईबा||

 
^ वर