माझे इंटरनेटवरील एक मित्र निकोलस बामर ह्यांचे काही पूर्वज १८५०च्या पूर्वीपासून हिंदुस्तानात मुख्यत्वेकरून सैनिकी सेवेत होते. त्यांचे बरेच जुने कागदपत्र निकोलसपर्यंत वारश्याने येऊन पोहोचले आहेत. आपल्या पूर्वजांचे हिंदुस्तानातील दिवस आणि ते जेथे जेथे राहिले किंवा जेथे जेथे त्यांनी प्रवास केला ता त्या जागा आणि गॊष्टींमध्ये निकोलस ह्यांना खूप रस आहे आणि त्या अनुषंगाने, मुख्यत्वे इंटरनेटचा उपयोग करून, अधिक माहिती गोळा करणे ही त्यांचा एक आवडता छंद आहे. त्यासाठी ते एकदोन वेळा हिंदुस्तानात येऊनहि गेले आहेत. त्यांचा ब्लॉग http://sepoysgriffins.blogspot.com पाहिला की तुम्हास त्यांच्या कामाची कल्पना येईल. मराठी, हिंदी आणि अन्य भाषांतील शब्दांचे अर्थ, गावांच्या नावांची जुनी विचित्र इंग्रजी उच्चारातली स्पेलिंग्ज उलगडून आज ती जागा कोठली आहे, इकडचे रीतिरिवाज, अशा गोष्टी स्पष्ट करून सांगणे असे अनेक प्रकारचे साहाय्य मी त्यांना वेळोवेळी केलेले आहे.
त्यांचे खापरपणजोबा चार्ल्स जेम्स बार्टन हे कंपनीच्या सैन्यात अधिकारी होते आणि त्यांचे वास्तव्य प्रामुख्याने मुंबई, अहमदनगर अशा भागात झाले. १८५७-५८ च्या सुमारास त्यांनी सातारा, पुणे आणि वाई असा प्रवास केला होता. त्या काळात अतिदुर्मिळ अशी एक चीज, म्हणजे कॅमेरा, त्यांच्याजवळ होता किंवा कोणाचातरी कॅमेरा त्यांना उपलब्ध होता. ही कला युरोपातहि त्या काळात नुकतीच कोठे उदय पावत होती. त्या कॅमेर्याने घेतली गेलेली काही चित्रे निकोलसपर्यंत पोहोचली आहेत. त्यांपैकी काही त्यांनी digitalize करून मला २-३ वर्षांपूर्वी पाठविली होती. ती मी खाली जोडत आहे. आपणा सर्वांना ती मनोरंजक वाटतील असा विश्वास आहे. (बाकी काही चित्रे त्यांच्या उपरिनिर्दिष्ट संस्थळावर पाहता येतील.)
ह्यांपैकी काही चित्रे ज्या जागांची आहेत त्या आजहि ओळखता येतात पण काही येत नाहीत. आपणापैकी कोणास त्या जागा ओळखता आल्या तर अवश्य प्रतिसादाने कळवाव्या. काही चित्रे ज्यावर mount करण्यात आली आहेत त्या पुठ्ठयावरच जुन्या काळातच कोणीतरी - बहुशः बार्टन ह्यांनीच - काही जागांची नावे आणि वर्षांच्या नोंदी केल्या आहेत. बहुतांशी त्या अस्पष्ट आहेत पण काही ठिकाणी त्या वाचण्याइतपत स्पष्टहि आहेत.
(ह्यापैकी पुण्याच्या पर्वतीखालच्या तळयाचे चित्र आणि अन्य एकदोन चित्रे मी दोन वर्षांपूर्वी ’सकाळ’ कडे पाठविली होती आणि त्यांनी बामर, बार्टन ह्यांच्या नामोल्लेखासह त्यांचा उपयोग करून जुन्या पुण्याच्या चित्रांची एक खास पुरवणी काढली होती.)
|
बार्टन १ |
|
बार्टन २ |
पहिले आणि दुसरे चित्र चार्ल्स जेम्स बार्टन ह्यांचेच आहे. पहिल्यामध्ये मुळा-मुठा बंडमध्ये बोटिंग करणारा एक गट आहे त्यामध्ये मध्यभागी बसलेले बार्टन. दुसरे चित्र झुलत्या खुर्चीवर बसलेले बार्टन.
|
पर्वतीखालचे तळे १ |
तिसरे आणि चौथे चित्र पर्वतीखालच्या तळयाचे आहे. गणपतीचे जुने देऊळ आणि बेट तिसर्या चित्रात स्पष्ट दिसत आहे.
|
पर्वतीखालचे तळे २ |
इ
इ
इ
इ
इ
इ
इ
इ
इ
इ
इ
इ
इ
पाचवे चित्र सातारचा कचेरीच्या राजवाडयाचे आहे. तो त्या काळात नुकताच बांधण्यात आला होता होता. तो छत्रपतींनी कचेरीच्या कामासाठी बांधला होता आणि तेव्हापासून आजपर्यंत त्याच कामासाठी तो वापरात आहे. वाडयापुढची जागा मोकळी-मोकळी दिसत आहे. सर्वात शेवटच्या तीन चित्रात तोच परिसर आज कसा दिसतो ते कळेल आणि दीडशे वर्षात काय चांगले-वाईट बदल घडले ह्याचे उदाहरण दिसेल. सहावे चित्र जलमंदिर नावाच्या वाडयाचे आहे. तेथे आत भवानीचे देऊळ आहे. (अवांतर: ह्याच देवळात ५०-६० वर्षांपूर्वी एक तलवार शिवाजीची ’भवानी तलवार’ म्हणून दाखविण्यात येत असे, तसेच प्रतापगडावर शिवाजीने वापरलेली वाघनखे म्हणून एक बोटात घालायचे शस्त्रहि दाखवीत असत. बंदुकीच्या गोळयांचे जळके डाग पडलेले आणि कापसाच्या पातळ वेष्टनाने झाकलेले एक चिलखतहि तेथे होते. ह्या तीनहि चीजा मी स्वत: पाहिलेल्या आहेत. आज त्या कोठे आहेत ह्याची कल्पना नाही. भवानीच्या देवळात असलेल्या सोन्याच्या मूर्तीची १९५०-५१ च्या सुमारास चोरी झाली आणि अखेरपर्यंत तिचा पत्ता लागला नाही. पोलिसांनी बळेबळेच आपटे आणि भावे नावाच्या दोन व्यक्तींना संशयावरून पकडले आणि त्यांचे खूप हाल केले. नंतर ते दोघेहि कोर्टात निर्दोषी ठरले.) जलमंदिर आजहि तसेच दिसते. रस्त्याच्या कडेचा शोभेचा कठडाहि आजतागायत तसाच आहे. केवळ जलमंदिराबाहेरची शेतबाग बदलून आज तेथे आर्यांग्ल वैद्यक महाविद्यालय नावाची संस्था गेले ७०-८० वर्षे चालू आहे.
|
राजवाडा |
|
जलमंदिर |
इ
इ
इ
इ
इ
इ
इ
इ
इ
इ
इ
इ
इ
इ
इ
इ
इ
इ
इ
पुढची ७ चित्रे वाईच्या घाटावरील देवळांची आणि एका दर्ग्याची आहेत. काही चित्रांखाली Waee असे गावाचे नाव स्पष्ट दिसत आहे. प्रत्यक्ष देवळे किंवा दर्गा कोणी ओळखू शकले तर अवश्य प्रतिसादातून कळवावे. पुष्कळांना ही चित्रे ओळखता येतील असे वाटते.
|
वाई १ |
|
वाई २ |
|
वाई ३ |
|
वाई ४ |
|
वाई ५ |
|
वाई ६ |
|
वाई ७ |
त्यानंतरचे चित्र कोठले आहे हे मला नीट समजत नाही पण खाली Aringaum near Nugger असे लिहिले आहे असे वाटते. त्यावरून हे अहमदनगरजवळच्या अरणगावातील एका देवळाचे चित्र असावे. (अरणगाव आजकाल सर्वांना मेहेरबाबांच्या तेथे राहण्यामुळे माहीत आहे.)
|
अरणगावातील देऊळ? |
शेवटची तीन चित्रे सातारच्या राजवाडयाबाहेरील परिसराची आहेत. दोन काळांमधील फरक लक्षणीय आहे.
|
राजवाडा आज १ |
|
राजवाडा आज २ |
|
राजवाडा आज ३ |
Comments
वाह!
रोचक फोटो आहेत. बार्टन हे बहुधा महाराष्ट्रात राहिल्याने त्यांचा १८५७च्या बंडाशी जवळून परिचय आला नसावा. (की असावा? त्याबाबत काही टिप्पणी मिळाली का?)
सातारचा राजवाडा तेव्हाही सडकेच्या जवळ असल्यासारखा वाटत आहे. आता पडदे जाऊन आलेल्या जाळ्या आणि इतर गर्दी अपेक्षित वाटली.
हे फोटो येथे लावल्याबद्दल धन्यवाद.
माहिती आवडली.
पण् सदर गृहस्थांशी आपला परिचय कसा झाला असेल ह्याची उत्सुकता आहे.(वैयक्तिक प्रश्न वाटल्यास माफी असावी. प्रश्नाकडे दुर्लक्ष केलेत तरी चालेल.)
फोटो हे खरोखरच अतिदुर्म्मिळ असे तेव्हाचे साधन् होते. माझ्याकडच्या एका पुस्तकात असाच एक कैदेतल्या तात्या टोपेंचा फोटो पाहिला होता.
--मनोबा
जलमंदिर चित्र
वरच्या जलमंदिराच्या चित्राकडे पाहून एक नवी गोष्ट माझ्या ध्यानात आली. ती अशी.
चित्रातील रस्ता तलावाच्या कडेने जाणारा रस्ता दक्षिणपूर्वेकडून उत्तरपश्चिमेकडे पूर्वपश्चिम रेषेला साधारणपणे १० अंशाचा कोन करून जातो. (वरील चित्र पहा.) छायाचित्र काढणारा पूर्वेस उभा राहून पश्चिमेकडे पाहात आहे. २१ जूनच्या सुमारास सातारा (१७.४१ उत्तर अक्षांश) येथे सूर्य खर्या पूर्वेच्या थोडा उत्तरेला उगवतो आणि मध्याह्नीच्या वेळेस ढोबळ मानाने झेनिथपासून साधारण ६ अंश उत्तरेकडे असतो. जलमंदिराच्या चित्रातील कठडयाच्या छायेवरून असे वाटते की ते चित्र २१ जूनच्या थोडे पुढेमागे सकाळी १०च्या सुमारास काढले असावे.
खगोलशास्त्राच्या जाणकारांनी ह्याबाबत अधिक सांगावे.
चित्रामध्ये दक्षिण कडेवरची इमारत 'जुना राजवाडा' म्हणून ओळखली जाते. तिला लागून उत्तरेला असलेली मोठी इमारत म्हणजे धाग्यातील चित्रातला कचेरीचा राजवाडा. ह्याचे तोंड पूर्वेकडे आहे आणि त्याचेच चित्र आपण वर धाग्यात पाहात आहोत. धाग्यातील ३ अलीकडच्या काळाचे फोटो हे वाडयाच्या पुढच्या मोकळया भागातील आहेत, ज्याचा उपयोग रविवारचा बाजार, तसेच जाहीर सभांसाठी केला जातो. अजून थोडे उत्तरेला सरकले जो रस्ता दिसतो त्याच्या पूर्व भागातून काढलेला फोटो धाग्यात आहे. रस्ता जेथे संपतो ती जागा म्हणजे जलमंदिर. चित्रातील शेताच्या जागी आलेले आर्यांग्ल वैद्यक महाविद्यालयहि दिसत आहे. मोती तलाव हिरव्या शेवाळामुळे उठून दिसत आहे. त्याच्याच कठडयाची छाया धाग्यातील चित्रात दिसत आहे.
मन ह्यांच्या कुतूहलाचे उत्तर. निकोलस आणि मी गेली ७-८ वर्षे ई-मेलद्वारा एकमेकांस परिचित आहोत. India-L आणि India-British-Raj ह्या दोन Internet Lists चे आम्ही सदस्य आहोत आणि ब्रिटिशकालीन हिंदुस्तानबाबतच्या एकमेकांस ठाऊक असलेल्या माहितीचे आदानाप्रदान करणे हा ह्यांचा हेतु आहे. ब्रिटन, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड, भारत असे सदस्य सर्वदूर पसरलेले आहेत. अभारतीय सदस्यांचे सर्वसाधारण समान सूत्र म्हणजे त्यांच्या पूर्वजांपैकी कोणी ना कोणी हिंदुस्तानात दीर्घकाळ नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने राहिलेले असतात.
केवढा बदल झालाय आता!
अरविंदराव,
नव्या राजवाड्यापुढचे मैदान माझ्या लहानपणी पूर्ण मोकळे होते. त्यालाच गांधी मैदान म्हणत. तेथे आम्ही मोठ्या नेत्यांच्या राजकीय सभा ऐकायला जात असू. भाऊसाहेब सोमण व्यासपीठावरुन हे नेते बोलत असत. आता जुना राजवाडा (प्रतापसिंह हायस्कूल) आणि नवा राजवाडा (इथले न्यायालय हलले आहे, पण काही सरकारी कचेर्या अजून असाव्यात) यांना फेरीवाल्यांचा वेढा पडला आहे. गांधी मैदानाला सध्या लोक 'राजवाडा चौपाटी' म्हणून ओळखतात आणि तिथेही भेळ-पावभाजी-आइस्क्रिमच्या हातगाड्यांनी जागा व्यापली आहे. जलमंदिरासमोरचा रस्ता केवढा मोकळा होता त्या काळी!
पुण्यातील पर्वतीखालचे तळे म्हणजे सध्याची सारसबाग. पेशवेकाळातही त्याला 'तळ्यातील गणपती' म्हणायचे. आता मंदिर आहे, पण तळे नाही.
वाईचे एक काशीविश्वेश्वराचे मंदिर वगळता बाकी मंदिरे ओळखू आली नाहीत. दर्ग्याचा फोटो म्हणजे विश्वकोषाच्या शेजारचा दर्गा असावा बहुधा. ढोल्या गणपतीच्या मंदिराचा सध्याचा कळस आणि पाच कमानींचा सभामंडप यात दिसत नाही म्हणजे मग तो नंतर बांधला गेला की काय? की या मंदिराचा फोटोच या संग्रहात नाही?
सातार्याचे काही दुर्मीळ फोटो मी पूर्वी पाहिले होते. ज्यात इतिहासकार ग्रँट डफ राहात असलेले घर, संगम माहुली येथील कॄष्णा-वेण्णा संगमाचा प्रचंड फुगवटा (धोम धरण बांधण्यापूर्वीचा जुना फोटो. दिलेरखानाच्या गोटात जाताना संभाजी राजे नावेतून कृष्णा पार करुन गेले होते आणि भर पावसाळ्यात मस्तानीच्या ओढीने बाजीरावाने नावाड्याला पुरात नाव घालायला लावली होती. माहुली येथे कृष्णेचे पात्र किती अफाट होते, हे त्या फोटोवरुन जाणवले. )
असो. हे अत्यंत जुने फोटो बघून मजा आली.
धन्यवाद असंच आणखी काही पोतडीतून काढून दाखवा मालक :)
सातारा जिल्हा गॅझेटीअर
योगप्रभु,
तुम्हास उत्सुकता असेल तर १८८५ मध्ये छापलेले वरील पुस्तक गूगल बुक्समध्ये http://tinyurl.com/439gx4b येथे वाचन/उतरवून घेण्यासाठी विनामूल्य उपलब्ध आहे. तेव्हाच्या सातारा शहराचे विस्तृत वर्णन पृ.५५१-५८० (पीडीएफ पृ.५७८-६०७) आणि अन्य सर्व मोठया गावांची वर्णने तसेच अनेक प्रकारच्या मनोरंजक तपशीलाने पुस्तक भरलेले आहे.
सहावे चित्र
अशा दुर्मिळ चित्रांसाठी धन्यवाद.. याच परिसरात वाढलो असल्याने ही जुनी चित्रे पाहताना छान वाटले.. खरेतर सातारा तसा फार काही बदलला नाही असेच म्हणावे लागते..
असो.. बहुतेक सहावे चित्र माहुलीचे वाटते आहे.. मुख्यतः दोन्ही झाडे आणि दीपमाळ ओळखीचे वाटतात..
कृपया कुणीतरी मदत करावी..
मला प्रतिसादांतील मजकूर दिसत नाहीय. केवळ शीर्षक दिसतेय.
माझ्याकडून कुठले बटण स्क्रॉल करताना दाबले गेलेय की काय?
उपक्रम प्रशासनाने मदत करावी अथवा तंत्र जाणकारांनी मार्गदर्शन करावे, ही विनंती.
एखादा ट्याग उघडा राहिलेला असावा, मजकूर पांढर्या रंगात येत आहे
ट्याग बंद करायचा प्रयत्न ट्याग बंद झाला? टेस्टींग आता बघा प्रतिसाद देऊन. बहुदा सक्सेसफुल झाले आहे
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
दुर्मिळ छायाचित्रे, धन्यवाद
दुर्मिळ छायाचित्रे येथे उपलब्ध करून दिल्याबाबत धन्यवाद.
सावल्यांच्या कोनाचे विश्लेषण गमतीदार आहे.
हा दर्गा रविवार् पेठ् वाई येथील् आहे
रविवार पेठ , तलाठीचे ऑफीस् आहे तिथे चावडीच्या पुढे जाल ना तर तर जंगम Doctor यांचा दवाखाना आहे त्याच्या अगदी समोर हा दर्गा आहे.
मला वाटते तेच आहे कारण आमचा आजोळचा वाडा पण तिथेच आहे.
असो,
आमच्या वाईचे सर्वच् फोटो अप्रतिम् !
~ वाहीदा
वाईचे अन्य फोटो
वाहीदाबाईंना वाईचे उरलेले फोटो ओळखता येतील काय?
होय्
तो वाईला कृष्णानदीचा घाट आहे ना अहो त्याच घाटावर आमच्या इथल्या ढोल्या गणपतीचे मंदिर हि आहे मला वाट्ते छायाचित्रातील एकच् मंदिर ते आहे. बाकी काही मंदिरे ब्राम्हणशाही घाटावरील् असावीत आहेत् . खरे तर तिथे चार मंदिरे आहेत चक्रेश्वर, चिमणेश्वर, कौंतेश्वर,अन काळेश्वर जे ब्राम्हणशाही घाटावर आहे. अन राम्दोह घाटावर रामेश्वर, रामकुंड अन एक देवीचे (चिल्वली असेच् काहीसे नाव आहे ) मंदिर आहे.
तशी आमच्या वाईत् मंदिरे खुप् आहेत्. पण काशी विश्वेश्वर मंदिर तर गणपती आळीत आहे.
वाईचे आधीचे नाव विराटनगरी / दक्षिण काशी असेही होते.
(बाकी कृपया मला वाहिदाताई किंवा फक्त् वाहीदा असे संबोधावे )
~ वाहीदा