स्त्रीवादाचा पुरस्कार आणि आजचे "आपण"

स्वतः कमावायला लागल्यापाहून काही दिवसांतच ज्या गोष्टीचं महत्त्व समजलं ती म्हणजे स्त्रीवाद. पुरूषी मानसिकतेतून कधी माझ्यावर अन्याय झाला तर कधी माझ्या आईवर तर कधी माझ्या मैत्रिणीवर. छोट्या मोठ्या कृतीमधूनही, अन्याय करणार्‍यालाही अन्याय करतो आहोत याची आणि जिच्यावर अन्याय होतो आहे तिलाही अन्यायाची जाणीव नसणं हे चांगलं का वाईट असाही प्रश्न अनेकदा पडतो. अशा अनेक घटना आसपास पहाताना स्त्रीवादी कार्यकर्ती, लायबेरीयाची राष्ट्राध्यक्षा एलन जॉनसन सरलीफ हिला शांतता-नोबेल पुरस्कार मिळाला ही माझ्यासारख्या सामान्य स्त्रीसाठी एक अतिशय आनंदाची गोष्ट. सरलीफ यांच्याजोडीला स्त्रियांच्या हक्कांसाठी लढणार्‍या लायबेरीयाच्याच लेय्मा ग्बोवी आणि येमेनमधले लोकशाहीवादी कार्यकर्त्या तवक्कुल कारमन यांना पुरस्कार मिळाला. समानतेसाठी झगडा मांडणार्‍या तिघींचा नोबेल पारितोषिकाने सन्मान व्हावा या बातमीनेच समानतेच्या तत्त्वावर विश्वास ठेवणार्‍या सर्व स्त्री-पुरूषांना आनंद व्हावा. दिवसाची सुरूवात व्हावी तर अशी!

आजूबाजूला पहावं तर काय दिसतं? लग्न झाल्यानंतर अनेक स्त्रिया राजीखुशीने आपलं नाव बदलतात. नाव असो वा आडनाव, गेली अनेक वर्ष आपली जी ओळख आहे तीच बदलायची, एवढं की फेसबुकावर फ्रेंड रिक्वेस्ट आल्यावर फोटो पाहिल्याशिवाय आपली बालमैत्रीण ओळखता येऊ नये ही अतिशय दु:खद गोष्ट वाटते. "मुली, चालून दाखव" "गाणं म्हण" वगैरे गोष्टी थिल्लर वाटतातच पण आजही भारतात अनेक समाजांत ही पद्धत सुरू आहे. आपल्याच वयाच्या मुलींना अशा गोष्टींना सामोरं जावं लागतं हे समजल्यावर त्यातलं क्रौर्य जास्तच चांगलं समजलं. स्त्रियांवर होणार्‍या अन्यायांची यादी बनवायची तर त्याला अंत नाही; पण मला हा मुद्दा आज फार महत्त्वाचा वाटत नाही.

स्वातंत्र्याबरोबरच येते ती जबाबदारी. आपण आपलं स्वतंत्र अस्तित्त्व मिळवायचं तर त्याबरोबर येणार्‍या जबाबदारीची जाणीव आजच्या स्त्रियांमधे कितपत आहे? पुरूषाच्या शरीरात स्त्रीच्या शरीरापेक्षा जास्त स्नायू असल्यामुळे शारीरिक क्षमतेमधे स्त्रियांपेक्षा पुरूष वरचढ ठरतो यात वाद नाही. भरलेला सिलेंडर सामान्य स्त्री आपल्या घरात ट्रॉली वापरून फिरवू शकते, पण कदाचित चार पायर्‍या चढून लिफ्टमधे ठेवणं तिला शक्य नाही. असे काही क्षुल्लक अपवाद वगळता आज वरपांगी मुक्त दिसणार्‍या स्त्रियाही आपली जबाबदारी ओळखून आहेत का? घरातली कामं करण्यात पुरूषाने हातभार लावावा हे जेवढं खरं आहे तेवढंच घरातल्या सुतारकाम, माळीकामात स्त्रीनेही मदत करावी ही जबाबदारीची जाणीव आहे. घर चालवण्याची जबाबदारी पूर्वीच्या परंपरेत पुरूषावर होती, पण जर पुरूषी मानसिकतेचा विरोध करायचा असेल तर घर चालवण्याची जबाबदारी स्त्री आणि पुरूष दोघांची आहे याचीही जाणीव स्त्रीला हवी. लग्नानंतर नाव बदलायचं नसेल तर आपण स्त्री असण्याचे फायदे मिळत असतानाही ठोकरण्याची कर्तबगारी स्त्रीमधे असावी. "माझ्यावर अन्याय झाला आहे" असा फक्त ओ-रडा करण्यापेक्षा तो अन्याय कमी, नष्ट कसा होईल याचा प्रयत्न करणं हे अतिशय सकारात्मक पाऊल उचलल्याशिवाय बदल होणे शक्य नाही. नावडती गोष्ट घडल्यास रडणं हा मानवी स्वभावच आहे, पण आपल्या रडण्यामुळे नको त्या ठिकाणी आपल्याला सहानुभूती मिळते ती गमावण्याची स्त्रीची तयारी असावी.

पारंपारिक मनस्थितीच्या सर्व स्त्री-पुरूषांना स्वतंत्र अस्तित्त्व असणारी स्त्री अनेक पैलूंमुळे स्त्री वाटतच नाही. १९४० च्या दशकात सिमोन दी बोव्वार हिने Le deuxième sexe (द सेकंड सेक्स) लिहीताना जी तक्रार केली ती आज आपल्या समाजातही दिसतेच; स्वतंत्र विचारांची, बुद्धीची व्यक्ती स्त्री असूच शकत नाही इथपर्यंत आरोप होतात. नवीन विचारांचा, मूल्यांचा अभ्यास करून, तर्काच्या कसोटीवर प्रत्येक गोष्ट घासून पहाणार्‍या पुरूषाला समाजात जेवढा त्रास होतो त्यापेक्षा किंचित जास्त त्रास स्त्रियांना होतो. एक स्त्री शिकली की सर्व कुटुंब शिकतं असं म्हणतात; या जबाबदारीतून आजही स्त्रीची मुक्तता नाहीच. पण 'जया अंगी मोठेपण तया यातना कठीण' आणि या यातना सहन करूनही आपल्या समानतेच्या मूल्यांवर विश्वास ठेवण्याची शक्ती प्रत्येक स्त्री-पुरूषांत असावी.

लेखनविषय: दुवे:

Comments

अच्छा

बरीचशी व्यापक (जनरलाइज़्ड) विधाने आहेत. एखाद्या स्त्रीला किंवा पुरुषाला नोबेल पारितोषिक मिळणे माझ्यासाठी तरी महत्त्वाचे नाही.

योग्य व्यक्तीला ते मिळणे महत्त्वाचे आहे. स्त्री पुरुष अशी विभागणी करणे मला तरी ह्या युगात पटत नाही.

एखाद्या स्त्रीनेच इतर स्त्रियांसाठी अतिशय वाईट अशी विशेषणे वापरली, विधाने केली तर आपण काय करणार? ज्या स्त्रियांबाबत बोलत आहात त्या स्त्रियांचे आपण खरेच प्रतिनिधित्व करतो आहोत काय हे बघायला हवे. असो.

पुरूषाच्या शरीरात स्त्रीच्या शरीरापेक्षा जास्त स्नायू असल्यामुळे शारीरिक क्षमतेमधे स्त्रियांपेक्षा पुरूष वरचढ ठरतो यात वाद नाही.

अच्छा. पुरुषाच्या पेक्षा स्त्रीचे हृदय अधिक बळकट असते असेही ऐकले आहे. माझ्यामते एखाद्या स्त्रीने हे सगळे इतक्या सहजासहजी मान्य करणेही पटत नाही. असो. तूर्तास एवढेच.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

सहमती आणि थोडी गडबड

योग्य व्यक्तीला ते मिळणे महत्त्वाचे आहे. स्त्री पुरुष अशी विभागणी करणे मला तरी ह्या युगात पटत नाही.

सहमत आहे.
स्त्रीवादी कार्यकर्त्यांना हा पुरस्कार मिळाल्याचा मला विशेष आनंद आहे; कारण अनेक ठिकाणी हेतूपुरस्सर अथवा अज्ञानापोटी स्त्रियांवर अन्याय होतो आणि अनेकदा मलाही त्याचा सामना करावा लागतो. जगाची ~ ५०% लोकसंख्या स्त्रियांची असूनही असा अन्याय होतो याचं दु:ख आहे.

एखाद्या स्त्रीनेच इतर स्त्रियांसाठी अतिशय वाईट अशी विशेषणे वापरली, विधाने केली तर आपण काय करणार? ज्या स्त्रियांबाबत बोलत आहात त्या स्त्रियांचे आपण खरेच प्रतिनिधित्व करतो आहोत काय हे बघायला हवे. असो.

इथे समजूतीचा थोडा घोटाळा वाटतो किंवा (आनंदाच्या भरात) मी पुरेसं स्पष्ट लिहीलेलं नाही.
एखाद्या स्त्रीला बालसंगोपनाची आवड नसेल, भाषाविषयांपेक्षा गणित, तर्कशास्त्र वगैरे 'पुरूषी' विषयांमधे रस असेल, आपली मतं ठामपणे मांडण्याची सवय असेल तर ती स्त्रीच नाही, किंवा पूर्ण स्त्री नाही, ती पुरूषी आहे असे आरोप होतात. दुसर्‍या बाजूने काही पुरूषांवरही स्त्रैणपणाचा शिक्का बसतो.
अतिशय वाईट अशी विशेषणे वापरणार्‍या लोकांच्या मानसिक आरोग्याबद्दलच प्रश्न उभे रहातात; पण सर्वसाधारण शेरेबाजीचा विचार करता, ज्याला गावगप्पा म्हणता येईल, त्यातही सदर असे उल्लेख होतात.

अच्छा. पुरुषाच्या पेक्षा स्त्रीचे हृदय अधिक बळकट असते असेही ऐकले आहे. माझ्यामते एखाद्या स्त्रीने हे सगळे इतक्या सहजासहजी मान्य करणेही पटत नाही. असो. तूर्तास एवढेच.

इथेही समजूतीचा थोडा घोटाळा वाटतो किंवा (आनंदाच्या भरात) मी पुरेसं स्पष्ट लिहीलेलं नाही.
शरीरातल्या एखाद्या विशिष्ट अवयवाबद्दल मी बोलत नसून संपूर्ण शरीराचा विचार करून मी लिहीत होते. पूर्ण शारिरीक वाढ झाल्यानंतरही, सामान्यत: एकाच वयाच्या, उंचीच्या, चणीच्या स्त्री आणि पुरूषाची तुलना करता स्त्रियांचे वजन कमी असते आणि पुरूषांचे जास्त असते. याचं कारण स्त्रियांच्या शरीरात नैसर्गिकरित्या मेदसंचय जास्त होतो आणि पुरूषांच्या शरीरात स्नायू जास्त असतात.

व्यवहारात यंत्रांच्या सहाय्याने शरीरातली ही 'कमतरता' इंधन आणि यंत्र वापरण्याचे कौशल्य या दोहोंचा वापर करून भरून काढता येते. हे मान्य करणं मला सहज शक्य आहे. कारण:
१. आकडेवारी (संदर्भ शोधते आहे. हा एक संदर्भ जिथे स्त्री आणि पुरूषांची सरासरी वस्तूमानं दिलेली आहेत.) आणि निरीक्षणांमधून* मला हेच दिसतं
२. मानवी शक्ती ही शरीरात फार जास्त नसून खांद्यावरच्या मेंदूमधे आहे. त्यामुळे शारिरीक बळ कमी आहे, हे मान्य करण्यात माझ्या मते काहीच कमीपणा नाही. (माणसाचं शारिरीक बळ हत्तींपेक्षा कमी आहे, अशा प्रकारचं हे विधान आहे.)

* २३ किलो वजनाची बॅग बॅग दोन मजले चढवताना माझी त्रेधातिरपिट उडते; घरातले पुरूष आरामात हे काम करतात. रोजच्या व्यवहारात हृदयाच्या स्नायूंपेक्षा हाता-पायाच्या स्नायूंच्या शक्तींमधला फरक लगेच दिसून येतो.

घाईत

पहिला प्रतिसाद घाईत दिला होता. काही गोष्टी समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद. आलोच.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

नोबेल स्ट्रीम ऑफ कॉन्शसनेस

नोबेल पारितोषिकांच्या निमित्ताने मांडलेले प्रासंगिक प्रवाहविचारलेखन आवडले.

या बाबतीत थोडे योजनाबद्ध लिखाणसुद्धा येऊ द्या.

असेच म्हणते

नोबेल पारितोषिकांच्या निमित्ताने मांडलेले प्रासंगिक प्रवाहविचारलेखन आवडले.
या बाबतीत थोडे योजनाबद्ध लिखाणसुद्धा येऊ द्या.

+१.

उत्स्फूर्त

उत्स्फूर्त वैचारिक निबंध आवडला.

--मनोबा

स्त्रीवाद म्हणजे 'डोळे मिटून दुध पिणे.'

ज्या व्यक्तींना मग त्या पुरुश असो की स्त्री असो, त्यांना त्यांच्या चांगल्या कार्याबद्दल पुरस्कार मिळाला आहे त्याबद्दल त्यांना खूप-खूप शुभेच्छा!

लेखातील मते आवडली नाहीत, पटली नाहीत.

मी स्वतः 'स्त्री-पुरूश' समानतेच्या विरुद्ध आहे. मी माझ्या बायकोला पहायला गेलो होतो तेंव्हा तीला तीचं नांव, तिच्या शाळेचे-कॉलेजचे नांव विचारण्याचे सोपस्कार आटपल्यानंतर लगेचच विचारले होते कि तुम्हाला स्वैपाकाची आवड आहे कां?
साखरपुडा झाल्यावर फिरायला गेल्यावर स्पश्ट शब्दात सांगितले कि मला तू अहो-जोहो करायचे, अरे-तुरे केलेलं मला चालायचं नाही.

स्त्रीने घरचा स्वैपाक करायला हवा, तोही आपणहून व आवडीने. हे माझे घरातील स्त्रीयांबद्दल मत आहे.

घराबाहेरील स्त्रीयांबाबत 'त्या खूप स्वार्थी, मतलबी, डोळे मिटून दुध पिणार्‍या असतात' असेच मत आहे. आणी म्हणून त्यांच्याशी मी केवळ अगदी गरज असेल तेंव्हाच 'टेक्निकली करेक्ट' असे बोलणे करतो. नकारात्मक प्रतिसाद द्यायचा असतो तेंव्हा न बोलता देहबोलीच्या माध्यमातून विचार-भाव पोहचवतो.

स्त्रीया ह्या समानतेसाठी पात्र नसतातच. उदा.-
मुंबईत बसमध्ये सात-आठ आसनां मधील रांगा स्त्रीयांसाठी राखीव ठेवलेल्या असल्या तरीही हक्काने इतर आसनांवर त्या बसतात, वयस्कर मंडळींच्या राखीव आसनांवरही त्या हक्काने बसतात, कुणी म्हातारी व्यक्ती, तान्ह बाळ असलेली स्त्री जरी बसमध्ये बाजूला उभी असली तरी देखील स्त्रीया डोळेझाकपणा करतात.

ऊच्च विचार!

हे "हुच्च विचार" असेही वाचता येईल.

राखीव जागा म्हणजे काय?

मुंबईत बसमध्ये सात-आठ आसनां मधील रांगा स्त्रीयांसाठी राखीव ठेवलेल्या असल्या तरीही हक्काने इतर आसनांवर त्या बसतात...

मला वाटते की राखीव जागा म्हणजे काय ह्याबद्दलची ही गल्लत दिसते.

(राखीव जागा निर्माण होण्यापूर्वी) सर्व जागांवर सर्व प्रवासांचा समान अधिकार असतो. ज्या व्यक्तीला जी जाग पसंत असेल तिच्यावर ती व्यक्ति, ती जागा आधीच भरलेली नसेल तर, बसू शकते ही मूळ स्थिति.

ह्यांमध्ये मूळ स्थितीमध्ये असे दिसते की स्त्रियांना ह्या first come, first served तत्त्वाची downside त्रासदायक ठरू शकते. एकतर त्या शारीरिकदृष्ट्या कमी सक्षम असतात ही सर्वसाधारणपणे मान्य केली जाणारी बाब. दुसरे म्हणजे गर्दीच्या वेळी समाजकंटकांकडून गर्दीमध्ये उभ्या स्त्रीला सतावले जाण्याची शक्यता. (ही वस्तुस्थिति कोणी नाकारू शकेल असे वाटत नाही.)

ह्यामधून आणि एकंदरीतच समाजकंटकांना लाभ घेता येईल अशी स्थिति टाळण्याच्या हेतूने, स्त्रियांसाठी काही जागा राखीव हा नियम निर्माण झाला. ह्या नियमाचा अर्थ असा लावता येत नाही की स्त्रियांनी राखीव जागा शिल्लक असल्या तर तेथेच बसले पाहिजे. त्यांचा कोठेहि बसण्याचा मूळ हक्क सुरक्षित आहे त्यामुळे त्या स्वेच्छेने कोठेहि बसू शकतात. त्यांची इच्छा असली तर त्या अधिकाराने राखीव जागा, एखाद्या पुरुषाने ती घेतलेली असेल तर, मोकळी करून मिळण्याची मागणीहि करू शकतात.

थोडक्यात बोलायचे तर राखीव जागा ही स्त्रियांसाठी केलेली अधिक (extra) सवलत आहे, त्यांच्या प्रवासी म्हणून असलेल्या मूलभूत हक्काचा संकोच नाही. एक नवे apartheid निर्माण करणे असा हेतु ह्या राखीव जागा निर्माण करण्यामागे नाही.

नोकर्‍यामधील राखीव जागांचा हाच अर्थ आहे. राखीव जागेस पात्र उमेदवार सर्वसाधारण स्पर्धेमध्ये गुणवत्तेवर पुरेसा वर आला तर त्याची नेमणूक ही सर्वसाधारण कोटयामधेच गणली जाते. सर्वसाधारण स्पर्धेमध्ये वर न आलेल्या 'राखीव' उमेदवारांची नेमणूक 'राखीव' कोटामध्ये होते. मला वाटते की हा वाद सर्वोच्च न्यायालयाने ह्याच पद्धतीने सोडविला आहे.

पहा: If a member from reserved category gets selected in general category, his selection will not be counted against the quota limit provided to his class and reserved category candidates are entitled to compete for the general category post. http://en.wikipedia.org/wiki/Reservation_in_India

(रावले ह्यांचे उर्वरित लिखाण हे त्यांचे वैयक्तिक मत असून अशा विचारांचे खंडन हे अरण्यरुदनासारखे असते हे मी अनुभवाने शिकलो आहे. ते लिखाण मी अनुल्लेखाने सोडून देत आहे.)

समांतर

नोकर्‍यामधील राखीव जागांचा हाच अर्थ आहे. राखीव जागेस पात्र उमेदवार सर्वसाधारण स्पर्धेमध्ये गुणवत्तेवर पुरेसा वर आला तर त्याची नेमणूक ही सर्वसाधारण कोटयामधेच गणली जाते. सर्वसाधारण स्पर्धेमध्ये वर न आलेल्या 'राखीव' उमेदवारांची नेमणूक 'राखीव' कोटामध्ये होते. मला वाटते की हा वाद सर्वोच्च न्यायालयाने ह्याच पद्धतीने सोडविला आहे.

वास्तवात खरच अस आहे का? काही माहिती जात आरक्षण या चर्चेत मिळेल. परंतु तो समांतर विषय आहे. असो
प्रकाश घाटपांडे

सर्वोच्च न्यायालयाचा राखीव जागांबाबतचा एक निर्णय.

थोडे विषयांतर होत आहे पण वरील मर्यादित मुद्दा येथेच संपू शकेल म्हणून लिहितो.
http://www.youthforequality.com/supreme-court-cases/36.pdf येथे
Ashok Kumar Gupta And Another Vs State Of U.P. And Others
Vidya Sagar Gupta And Others Vs State Of U.P. And Others इइइइइ
इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ
इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ

ह्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातील परिच्छेद ४४ पहा. १०%च्या निर्बंधामूळे त्यातील अतिआवश्यक इतकाच भाग येथे दर्शवीत आहे. बा़कीचा तेथे पहावा.
इइइइइ
इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ इइइइइइइइ इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ
इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ

"On the other hand, the reserved category candidates can compete for the non-reserved posts. In the event of their appointment to the said posts, their number cannot be added and taken into consideration for working out the percentage of reservation."
इइइइइ
इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ
इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ
इइइइइइइइइइइइइइइइइइइइइ इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ
इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ
इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ
इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ
इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ
इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ
इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ
इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ
इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ
इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ

+/-

>>मुंबईत बसमध्ये सात-आठ आसनां मधील रांगा स्त्रीयांसाठी राखीव ठेवलेल्या असल्या तरीही हक्काने इतर आसनांवर त्या बसतात...

या बाबत सहमत आहे. म्हणजे स्त्रिया असे करतात याबाबत सहमत आहे आणि प्रत्यक्षानुभव आहे. आमच्या घराजवळ बसचा पहिला स्टॉप होता त्या स्टॉपवर बस उभी असताना अनेक स्त्रिया 'लवकर येऊन' प्रत्येक ओळीतल्या खिडकीतल्या सीटवर बसत असत. नंतर येणार्‍या प्रवाशांना मागच्या सीटवर (खिडकीजवळ किंवा मिळेल तिथे) बसणे किंवा पुढच्या सीटवर आधी बसलेल्या स्त्रीच्या शेजारी बसणे हे पर्याय उपलब्ध असत. त्यापैकी पुढच्या सीटवर बसलेल्या स्त्रीच्या शेजारी बसणे हा पर्याय वापरताना प्रचंड कुचंबणा होत असे कारण तेथे बसत असताना आधी खिडकीजवळ बसलेली स्त्री 'मेला लोचटपणे माझ्या शेजारी बसायला आला आहे' किंवा 'हा माझा विनयभंग करणार बहुधा' असा लुक देत असे. असा लुक देताना त्या स्त्रीचा आपले स्त्रीत्व वापरण्याचा स्पष्ट हेतु असे. आणि अशा लुकद्वारा राखीव नसलेल्या सीट देखील स्त्रियांसाठी राखीव करून घेण्याची युक्ती साधत असत. :-)

स्त्रियांसाठी काही आसने राखीव ठेवण्यामागच्या सामाजिक भूमिकेशी सहमत आहे.

नितिन थत्ते

गैरफायदा

प्रत्येक व्यवस्थेचा गैरफायदा घेणार्‍या व्यक्ती प्रत्येक क्षेत्रात उपलब्ध असतात. पुरुषी व्यवस्थेचा गैरफायदा घेणारे पुरुष जसे असतात तसेच स्त्रीत्वाचा उपयोग अनावश्यक रित्या करणार्‍या स्त्रियाही असतात. लवकर येऊन जागा अडवण्याच्या बाबीवर मी टिप्पणी करू शकत नाही. त्याच्याशी स्त्रीपुरुष असण्याचा संबंध नाही

आधी खिडकीजवळ बसलेली स्त्री 'मेला लोचटपणे माझ्या शेजारी बसायला आला आहे' किंवा 'हा माझा विनयभंग करणार बहुधा' असा लुक देत असे. असा लुक देताना त्या स्त्रीचा आपले स्त्रीत्व वापरण्याचा स्पष्ट हेतु असे. आणि अशा लुकद्वारा राखीव नसलेल्या सीट देखील स्त्रियांसाठी राखीव करून घेण्याची युक्ती साधत असत.

असे होत असल्यास त्या बायांना सरळ सुनवावे. स्त्रीत्वाचा अशाप्रकारे वापर गैर आहे याच्याशी सहमत.

अवांतरः (या अवांतरावर चर्चा करायची झाल्यास कृपया ख.व. मधून करावी कारण अवांतर उगीच टीपी आहे. त्यामुळे उगीच चर्चा भरकटायला नको. )


आमच्या घराजवळ बसचा पहिला स्टॉप होता त्या स्टॉपवर बस उभी असताना अनेक स्त्रिया 'लवकर येऊन' प्रत्येक ओळीतल्या खिडकीतल्या सीटवर बसत असत.


असा गैरफायदा फक्त स्त्रियाच नाही तर अनेक पुरुषही रेल्वेच्या बाबतीत घेताना पाहिले आहे पण बसच्या बाबतीत असा फायदा फक्त स्त्रियांनीच का घेतला असावा बरे? ;-) यावरून नेमके काय सिद्ध होते? स्त्रिया अधिक चटपटीत आहेत? उपरोक्त स्त्रियांच्या घरी कामे करणार्‍या इतर व्यक्ती असल्याने त्यांच्याकडे लवकर येऊन जागा अडवण्यासाठी मोकळा वेळ आहे की आजकालच्या पुरुषांना घरकामाच्या रगाड्यात घरातून निघताना उशीर होतो? थत्तेचिच्चांच्या परिसरात स्त्रीपुरूष समानतेचे गणित बिघडलेले आहे? ;-)

प्रतिसाद

स्त्रीयांना स्त्री म्हणून कनिष्ठ दर्जाची वर्तणूक देऊ नये याविषयी दुमत असायचे कारणच नाही. पण स्त्री, मुली या नावावर विनाकारण अतिरिक्त सवलती दिल्या जातात त्याला मात्र माझा अगदी कडाडून विरोध आहे. आज महाराष्ट्रातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये ३०% जागा मुलींसाठी राखीव असतात. त्या कशाकरता? म्हणजे जातीवर आधारीत ५०% जागा गेल्याच आणि उरलेल्या ५०% मध्येही हे आणखी ३०% आरक्षण! म्हणजे जातीवर आधारीत आरक्षणाचा फायदा होत नसलेल्या मुलांना इंजिनिअरींगला जाणे किमान तीनपट कठिण झाले! पुढे आय.आय.एम मध्येही मुलींना कॅटनंतर पुढच्या फेरीसाठी अतिरिक्त ग्रेस मार्क देणार असेही वाचले. म्हणजे जर कॅट परीक्षेत कमी पर्सेंटाईल आले तरी केवळ मुलगी म्हणून ती पुढे जाणार हे अजिबात समर्थनीय नाही. नंतर समर प्लेसमेन्टमध्ये सगळ्या चांगल्या दिसणाऱ्या मुली सर्वात चांगल्या कंपन्यांमध्ये पटापट निवडल्या जातात आणि तिसऱ्या-चौथ्या दिवशी निवडल्या जाणाऱ्या मुली दिसायला चांगल्या नसतात हा योगायोग नक्कीच नाही.

बसमधील अनुभव तर विचारूच नका.स्त्रीयांसाठी राखीव आसने मोकळी असतानाही मुद्दामून दुसऱ्या आसनांवर बसायचे हे तर नेहमीचेच.माझा एक अनुभव सांगतो. एकदा अशीच एक २०-२२ वर्षाची कन्यका कानाला इअरफोन लावून पहिल्यांदा स्त्रीयांसाठीच्या राखीव जागेवर बसली होती.पण दुसऱ्या जागा रिकाम्या आहेत असे दिसताच ती उठून तिथे जाऊन बसली.पण ती जागा निघाली ज्येष्ठ नागरिकांसाठीची राखीव.तिथे एक म्हातारे गृहस्थ आल्यानंतर शाहजोगपणे ती मागे बघत होती म्हणजे विनारक्षित जागेतल्या कोणी पुरूषाने उठावे!

हा सगळा प्रकार अजिबात समर्थनीय नाही आणि हे म्हणजे स्त्री असल्याचा गैरफायदा उठविणे आहे असे माझे स्पष्ट मत आहे.त्यामुळे मी तर दोन गोष्टी ठरविल्या आहेत-- एक म्हणजे मी भविष्यात जेव्हा कॉलेजांमध्ये मुलाखती घ्यायला जाईन तेव्हा मुलींना नक्कीच निवडणार नाही. आणि आतापासून अंमलात आणायची गोष्ट म्हणजे मी बसमधील माझ्या जागेवरून उठताना माझी जागा कोणाही मुलीला/स्त्रीला देत नाही.आणि हे अयोग्य वाटत असेल तर माझ्या सारख्यांना असे वाटायचे कारण म्हणजे असा स्त्रीत्वाचा गैरफायदा घेतला गेलेला अनेक ठिकाणी बघायला मिळणे!

---विल्यम जेफरसन क्लिंटन

:-)

कायद्यांचे पालन न करता किंवा दिलेल्या सोयींपेक्षा जास्त सोयींची अपेक्षा सर्वच करतात. त्यात स्त्रिया किंवा पुरूष असा भेदभाव नाही. परंतु प्रस्तुत उदाहरणात जर बसमध्ये स्त्रिया असे करताना दिसत असतील तर ते अयोग्य आहे आणि त्यांची चूक त्यांना दाखवून द्यायला हवी याच्याशी सहमत.

हा सगळा प्रकार अजिबात समर्थनीय नाही आणि हे म्हणजे स्त्री असल्याचा गैरफायदा उठविणे आहे असे माझे स्पष्ट मत आहे.

असे प्रकार होत असल्यास समर्थनीय नाहीत (या चर्चेतही कोणी समर्थन करते आहे असे वाटले नाही) आणि हे गैरफायदा उठवण्याचे प्रकार आहेत याच्याशीही सहमत.

समर प्लेसमेन्टमध्ये सगळ्या चांगल्या दिसणाऱ्या मुली सर्वात चांगल्या कंपन्यांमध्ये पटापट निवडल्या जातात आणि तिसऱ्या-चौथ्या दिवशी निवडल्या जाणाऱ्या मुली दिसायला चांगल्या नसतात हा योगायोग नक्कीच नाही.

यात चांगल्या दिसणार्‍या मुलींचा दोष कळला नाही. असो.

एक म्हणजे मी भविष्यात जेव्हा कॉलेजांमध्ये मुलाखती घ्यायला जाईन तेव्हा मुलींना नक्कीच निवडणार नाही. आणि आतापासून अंमलात आणायची गोष्ट म्हणजे मी बसमधील माझ्या जागेवरून उठताना माझी जागा कोणाही मुलीला/स्त्रीला देत नाही.आणि हे अयोग्य वाटत असेल तर माझ्या सारख्यांना असे वाटायचे कारण म्हणजे असा स्त्रीत्वाचा गैरफायदा घेतला गेलेला अनेक ठिकाणी बघायला मिळणे!

हा मात्र माझ्यामते शुद्ध पोरकटपणा आहे. बसमधून प्रवास करणार्‍या प्रत्येक स्त्रीला लैंगिक छळाला सामोरे जावे लागते. माझ्या माहितीत तरी अशी कोणतीही स्त्री नाही की जिला मुद्दाम धक्का मारणे, हातांनी अंगाला विविध जागी स्पर्श करणे वगैरे प्रकारांतून जावे लागलेले नाही. त्या सर्व स्त्रिया येऊन आम्हाला बसमध्ये पुरूष दिसला तर त्याला योग्य ठिकाणी लाथच घालणार असे म्हणू लागल्या तरी मी त्याला शुद्ध पोरकटपणाच म्हणेन.

बाकी काय करायचे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.

काही प्रश्न

... आणि तिसऱ्या-चौथ्या दिवशी निवडल्या जाणाऱ्या मुली दिसायला चांगल्या नसतात हा योगायोग नक्कीच नाही.

मुलाखती घेणारे बहुतांशाने पुरूष असतात का स्त्रिया? का पुरुष-स्त्रियांचं प्रमाण साधारण समसमान असतं?
सुंदर मुलींना त्या फक्त सुंदर आहेत म्हणूनच नोकर्‍या आधी मिळतात हे समर्थनीय नाही, पण याचा दोष त्या मुलींना देता येईल का? माझ्या मते नाही.
कोणत्याही आस्थापनेत रिसेप्शनिस्ट या जागेवर काम करणारी व्यक्ती दिसायला बुद्रुक, आकाराने बेढब, वागण्यात बेअदबशीर असेल तर तिथे गेल्यावर वाटेल? आपली सहकर्मचारी व्यक्ती, स्त्री असेल वा पुरूष, पण दिसायला निदान माफक सुंदर असावी, अगदी बुद्रुक असू नये, अशी अपेक्षा बहुतांश लोक (स्वतःच्या रूपाचा विचार न करता) करतातच. लग्नाच्या बाजारातही काय वेगळं होतं? शाळा-कॉलेजात, नोकरीच्या ठिकाणी दिसायला चांगल्या नसणार्‍या मुलींच्या मागे किती मुलगे/पुरूष असतात?
मध्यंतरी एक बातमी वाचली होती. सौंदर्याबद्दलच असा दावा नाही, पण निष्कर्ष मजेशीर वाटले.

बसमधे बसताना खिडकीचा जागा उपलब्ध असेल तर आबालवृद्ध (आजारी लोकं आणि एसी नसलेल्या वाहनात पावसाचे दिवस सोडून) बहुतांश लोकांना खिडकीची जागा हवी असते. तर स्त्रियांनीही आधी चढल्यास खिडकी पकडली यात तक्रार का? अर्थात स्त्रियांच्या शेजारी बसलेल्या पुरूषाला लोचट समजणं गैरच.
अनेकदा मी बसलेली असताना उठून माझी जागा वृद्धांना देऊ केली आहे. सर्व वयस्कर बायकांनी प्रेमाने या कृतीचा आदर केल्याचं आठवतं; पण अनेकदा वयस्कर पुरूषांनी आढेवेढे घेतल्याचंही आठवतं. (तीच गोष्ट प्रवासात जड बॅगा उचलण्याची.) कुणी चार पुरूषांचा, मी मदतीचा हात दिला म्हणून पुरूषी इगो दुखावला असेल याचा अर्थ सगळे पुरूष MCP आहेत असा ग्रह करून घेणं मला योग्य वाटत नाही.

या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे "समाजकंटकांकडून गर्दीमध्ये उभ्या स्त्रीला सतावले जाण्याची शक्यता" बरीच जास्त असते. असा त्रास न झालेली एकही स्त्री माझ्या परिचयाची नाही. त्याचा सामना करण्यासाठी आरक्षण हा एकमेव उपाय समजला जाऊ नये असं वाटतं.

:)

यात दोन भाग आहेत-- पहिला म्हणजे स्त्री म्हणून अतिरिक्त सवलती विनाकारण देणे (३०% जागा, ग्रेस मार्क वगैरे) आणि दुसरा म्हणजे (त्यामानाने बराच क्षुल्लक) बसमधले अनुभव. दुसरे म्हणजे मुलाखती घेणारे बहुसंख्य पुरूष असले तरी ते ही याच (अतिरिक्त सवलती देणे) प्रकाराच्या प्रभावाखाली असतात आणि मी जो प्रकार बघितला आहे त्यात ९०% मुलाखत घेणारे पुरूष तसेच करतात. तेव्हा अशांना पोरकट म्हटले जात नसेल तर मी उरलेल्या १०% असेन तर मला का पोरकट म्हटले जाणार हे समजत नाही. आणि मी मुलाखत घ्यायला जाईन् त्यावेळी एखादी मुलगी समोर आली तर मला एक प्रश्न पडणारच-- की कशावरून् ही मुलगी "त्या" ३०% मधली नसेल? कशावरून् या मुलीला ग्रेस मार्काचा फायदा होऊन ती पुढच्या फेरीसाठी निवडली गेली नसेल? यावरून ती ज्यासाठी मुलाखत घेतली जात आहे त्या साठी पात्र असेलच का हा प्रश्न उभा राहिला तर त्यात आक्षेप घेण्यासारखे काय? आणि मी ज्या मुलाखतींविषयी बोलत आहे त्यात रिसेप्शनीस्टच्या जागेचा काहीही संबंध नाही हे वेगळे सांगायला नको.

---विल्यम जेफरसन क्लिंटन

आक्षेप

मुळात प्रकृतीने 'पुरुष' म्हणून पुरुषांना एक सवलत/ अॅडव्हान्टेज दिला आहे, गर्दीत पुरुष आहे म्हणून त्याचा फायदा घेणाऱ्या स्त्रिया मी बघितल्या नाहीत (नसतील असे मी म्हणत नाही), त्यामुळे स्त्री-पुरुष समानता आणण्यासाठी काही सवलती दिल्या गेल्या पाहिजेत असे माझे मत आहे .

अब्यूज हा मनुष्य स्वभावाचा गुण आहे , त्यात स्त्री-पुरुष भेद नाही, पण पुण्या-मुंबईत बसला गर्दीच इतकी असते कि राखीव जागेपर्यंत तरी स्त्रीला पोचता आले तरी खूप आहे आणि गर्दी नसेल तर स्त्रीने कुठे बसावे हा सर्वस्वी तिचा निर्णय आहे, स्त्री राखीव जागा सोडून दुसरीकडे बसल्यामुळे पुरुषाची कुचंबणा होत असल्यास तशी विनंती करावी किंवा सहन करावी.

विद्यार्थी जगतात शैक्षणिक क्षेत्रातील आरक्षण हा तर जातीय तेढीपेक्षा अधिक गरम विषय आहे , चटके बसणारा बोलणारच पण तुम्ही तुमच्या अनुभवातून तुमचे मतच नाही तर स्त्रियांविषयी धोरण ठरवत आहात, त्याचप्रमाणे गेल्या अनेक वर्षाच्या अनुभवावरून सरकारने आरक्षणा-संदर्भात धोरण ठरविले असल्यास गैर कसे?

आणि तुम्हाला मुलाखत घेताना उमेदवाराची पात्रता कळणार नाही काय? मुलाखत मग केवळ औपचारिकता म्हणून घेणार काय? निदान संधी तरी सर्वाना समान मिळायला हवी, तुमच्या ह्या धोरणाचा निषेध आहे.

तसे पाहता - स्त्रियांसाठी राखीव डब्यात/बस मध्ये काही 'सौम्य ' वृत्तीच्या स्त्रियांसाठी आरक्षण हवे का मुद्दा चर्चिला जायला हरकत नाही ;-)

प्रतिसाद

आणि तुम्हाला मुलाखत घेताना उमेदवाराची पात्रता कळणार नाही काय? मुलाखत मग केवळ औपचारिकता म्हणून घेणार काय?

तुम्ही हे बोलत आहात म्हणजे तुम्हाला शिक्षणसंस्थांमध्ये क्यांपस इंटरव्ह्यू कसे चालतात याची पूर्ण कल्पना दिसत नाही. मुलाखतीला कोणाला बोलवायचे याची यादी नक्की करतानाच प्रेफरन्स लीस्ट पण असते. समजा ५ जणांना निवडायचे असेल तर अशा प्रेफरन्स लीस्टमध्ये ८ किंवा १० जण असतात. आणि या यादीत निवडायचे निकष म्हणजे आय.आय.टी (जे.ई.ई) परीक्षेतील क्रमांक, कोणत्या महाविद्यालयातून पदवी घेतली इत्यादी इत्यादी गोष्टी असतात आणि "जेंडर रेशो" जपण्यासाठी मुलींना झुकते माप दिले जाते. हे सगळे तुम्ही आय.आय.एम च्या कोणाही विद्यार्थ्याला (किंवा अधिक खात्री करायची असेल तर प्लेसमेन्ट कमिटीच्या सदस्यांना विचारून बघा-- अर्थात ते अशी माहिती बाहेर देतीलच याची खात्री नाही पण मी जी आतली परिस्थिती बघितली आहे त्यावरून सांगतो) विचारा. आणि असे प्रेफरन्स लीस्टमधले विद्यार्थी मुलाखतीला गेले की अक्षरशः दोन मिनिटात त्यांची निवड केली जाते.

दुसरे म्हणजे आय.आय.टी (जे.ई.ई) मध्ये पहिल्या १०० च्या आत क्रमांक असला तर आय.आय.टी मध्ये कितीही दिवे लावले तरी एकदा आय.आय.एम् मध्ये पोहोचल्यावर अशा विद्यार्थ्याला/विद्यार्थिनीला सगळ्या चांगल्या कंपन्यांमधून निवड होतेच.

तेव्हा माझा प्रश्नः ९०% मुलाखती घेणारे मुलींना झुकते माप देत असतील तर माझ्यासारख्या काहींनी वेगळे केले तर त्यात इतके आक्षेपार्ह काय?

---विल्यम जेफरसन क्लिंटन

सहमत तरीही.

आय.आय.एम संस्थांमध्ये असे जेन्डर रेशोचे प्रकार चालतात (प्रामुख्याने आय.आय.एम(के) मध्ये) हे ठाऊक आहे/एकून आहे, सौंदर्याचे नैसर्गिक अॅडव्हान्टेज सौंदर्यवान/वती ला मिळणार हे देखील मान्य, पण निवड पत्र उमेदवाराचीच होण्याची शक्यता अधिक असेल हे तुम्ही देखील मान्य कराल. मुद्दा मग माझ्यामते संधीचा आहे, काही साधारण दिसणाऱ्या पण तेवढीच किंवा अधिक पात्रता असणाऱ्या मुलांना/मुलीना कदाचित संधी मिळणार नाही, त्यामुळे पिडीताना अशा व्यवस्थेचा तिटकारा असणे शक्य आहे.

हे मान्य करून पण, जेंव्हा तुम्ही मुलाखत घ्यायला जाल तेंव्हा 'योग्य' उमेदवाराला निवडणे जास्त योग्य नाही ठरणार काय? मुली 'त्या ३०% मधल्या' असतील असे समजून कदाचित तुम्ही चांगल्या पात्र उमेदवाराला मुकत असाल, निदान संधी देऊन योग्य निकष लाऊन निवड होणे हि प्रक्रिया जास्त योग्य वाटते.

बाकी सुंदर मुलींच्या मुलाखती घेणे सगळ्यांनाच आवडेल, पण फक्त त्याच निकषावर निवड करणे आवडेल कि नाही हे माहित नाही.

ठोकताळे

हो बरोबर आहे. पण योग्य उमेदवार कोण हे ठरवायला पुरेसा वेळ नसल्यामुळे मुलाखती घेणारे काही ठोकताळे वापरतात. उदाहरणार्थ आय.आय.टी (जे.ई.ई) मधला क्रमांक किंवा चांगल्या महाविद्यालयातून मिळालेली पदवी या ठोकताळ्यांवरून उमेदवार चांगला/ली असेल असे गृहित धरून निवड केली जाते.आता या ठोकताळ्यांमध्ये मुलगी असणे याचा पण समावेश इतर लोक करत असतील (ज्याला काहीही आधार नाही) तर मी मुलगी नसणे याचा समावेश केला तर काय बिघडले? तेव्हा पुरेसा वेळ नसेल तर नक्कीच तो ठोकताळा माझ्या दृष्टीने असेल. आणि हो एक् गोष्ट सांगतो जर का मुलींसाठीचे ३०% आरक्षण,जास्तीचे ग्रेस मार्क, मुलाखतींमध्ये झुकते माप या सगळ्या गोष्टी बंद झाल्या तर मात्र मुलाखत घेताना उमेदवार मुलगा आहे की मुलगी हा प्रश्न माझ्यासाठी अजिबात महत्वाचा नसेल.

---विल्यम जेफरसन क्लिंटन

अरे बापरे

>>पण योग्य उमेदवार कोण हे ठरवायला पुरेसा वेळ नसल्यामुळे मुलाखती घेणारे काही ठोकताळे वापरतात

अरे बापरे. जे ठोकताळे वापरतात ते मुलाखती न घेता सुद्धा वापरले जाऊ शकतात. मग मुलाखत घेण्याचा उद्देश फक्त व्यक्ती दिसायला कशी आहे एवढेच पाहणे हा असतो का?

नितिन थत्ते

मुलाखती का घेतात?

तरीही मुलाखती का घेतात? (निदान आय.आय.एम मध्ये तरी. इतर ठिकाणचे माहित नाही)--

अनेक चांगल्या कंपन्या मुलाखतीसाठी येत असल्यामुळे सगळ्या कंपन्यांना चांगले उमेदवार आपल्याकडे हवे असतात. केवळ फायनान्समधले सांगायचे झाले १०-१२ तरी पहिल्या श्रेणीतल्या कंपन्या असतात. (इतर कंपन्या वेगळ्या) प्रेफरन्स लीस्टमधले बरेचसे उमेदवार अनेक कंपन्यांच्या प्रेफरन्स लीस्टमध्ये असतात.तेव्हा उमेदवार आला/ली की ताबडतोब निवड करायची नाहीतर तो/ती दुसरीकडे जाईल ही भिती. म्हणून लवकरात लवकर निवड करायची हा कल. आणि एकदा एखाद्याची निवड करायचीच आहे हे ठरविलेच आहे मग जास्त वेळ फुकट घालवायचा नाही कारण मधल्या वेळेत प्रेफरन्स लीस्टमधले इतर उमेदवार दुसरीकडे जातील म्हणून अक्षरशः दोन मिनिटात थातूरमातूर प्रश्न विचारून निवड करायची!!

आणि मुलाखतीला तरी का बोलवायचे? कारण संस्थेच्या नियमांप्रमाणे कागदोपत्री तरी मुलाखत घेऊन सर्व प्रक्रिया पूर्ण करावी लागते. या सगळुया प्रकारात जराही अतिशयोक्ती नाही.

तेव्हा वेळ कमी म्हणून आधीच ठरविलेल्या ठोकताळ्यांवर विसंबून् उमेदवारांची निवड करायची असा कल असतो.पण अशा ठोकताळ्यांमध्ये मुलगी असणे या अर्थाअर्थी काहीही संबंध आणि आधार नसलेल्या ठोकताळ्याचा समावेश होतो आणि ते पण "जेंडर रेशो" जपायचा या गोंडस नावाखाली!! या प्रकाराला मात्र माझा अगदी कडाडून म्हणजे कडाडून विरोध आहे.

आय.आय.एम बंगलोरमधील विद्यार्थीजीवनावर Joker in the pack हे पुस्तक मिळाल्यास जरूर वाचा.त्यात या प्रकाराचा आडवळणाने का होईना उल्लेख केलेला आहे.

अशा सगळ्या सवलती मुलींना/स्त्रियांना का द्याव्यात? बसमध्ये होते तशी धक्काबुक्की तर शिक्षणसंस्थांमध्ये होत नाही ना?स्त्रियांना त्यांचे मत मांडायचे आणि त्याप्रमाणे वागायचे स्वातंत्र्य हवे, केवळ स्त्री म्हणून जन्माला आल्यामुळे दुय्यम वागणूक् दिली जाता कामा नये याविषयी अजिबात म्हणजे अजिबात् दुमत नाही.पण अशा जास्तीच्या सवलती विनाकारण का द्याव्यात?

---विल्यम जेफरसन क्लिंटन

भयंकर गडबड

मधल्या वेळेत प्रेफरन्स लीस्टमधले इतर उमेदवार दुसरीकडे जातील म्हणून अक्षरशः दोन मिनिटात थातूरमातूर प्रश्न विचारून निवड करायची!!

निवडप्रक्रियेत दोष आहे का त्या व्यक्ती स्त्रिया असण्यामधे? सुंदर स्त्रियांना याचा फायदा मिळतो आहे म्हणून त्याच दोषी? तिच्यावर बलात्कार झाला हा तिचाच दोष असं म्हणण्यात आणि या विधानात मला फार फरक दिसत नाही.

'जेंडर रेशो' सांभाळायचा म्हणून या मुलींना नोकर्‍या मिळत असल्या तरी तो त्यांचा दोष कसा? मुलगी आहे फक्त म्हणून आणि म्हणूनच नोकरी मिळणे यात त्या मुलींचा दोष नाही तसंच मुलगी आहे म्हणून नोकरी न मिळण्यातही नाही. फक्त "मुलगी आहे म्हणून मी नोकरी नाकारेन" या विचारांमुळेच 'जेंडर रेशो' सांभाळला पाहिजे अशी पॉलिसी बनवावी लागते.

त्याहूनही मोठा घोटाळा

फक्त "मुलगी आहे म्हणून मी नोकरी नाकारेन" या विचारांमुळेच 'जेंडर रेशो' सांभाळला पाहिजे अशी पॉलिसी बनवावी लागते.

सॉरी. जेंडर रेशो जपायच्या गोंडस नावाखाली मुलींना झुकते माप दिले जाते म्हणून "मुलगी आहे म्हणून मी नोकरी नाकारेन" असे विचार बनले आहेत. मुलींना कॅट किंवा तत्सम परीक्षा किंवा शिक्षणापासून वंचित ठेवणे पूर्णपणे चुकीचे आहे.पण एकदा शिकायची संधी दिली की मग मात्र गुणवत्तेवरच पुढची वाटचाल व्हायला हवी आणि अशा गुणवत्तेवर पुढे आलेले उमेदवार कोण आहेत-- कोणत्या जातीचे/लिंगाचे/रंगाचे किंवा तत्सम कसेही याचा अजिबात विचार व्हायला नको. पण मुली म्हणून इंजिनिअरींगला ३०% जागा, कॅटनंतर ग्रेस मार्क, मग चांगल्या नोकरीसाठी जेंडर रेशोच्या नावाखाली झुकते माप-- अरे काय चालू काय आहे?

एकदा शिकायची समान संधी मिळाल्यानंतर जे काही होईल ते गुणवत्तेवरच होऊ दे. आणि त्या गुणवत्तेवर १००% जागा मुलींनीच भरल्या तरी काही हरकत नाही.पण मुली म्हणून अशा जास्तीच्या सवलती का द्याव्यात हाच तर माझा मूळ प्रश्न आहे.

निवडप्रक्रियेत दोष आहे का त्या व्यक्ती स्त्रिया असण्यामधे?

अरे वा निवडप्रक्रियेत दोष आहे हे मान्य केलेले बघून आनंद वाटला. सुंदर स्त्रियांना त्याचा फायदा मिळतो म्हणून त्याच दोषी असे नक्कीच नाही. पण वर कुठेतरी म्हटल्याप्रमाणे केवळ मुलगी (आणि त्यातून सुंदर) म्हणून ९०% कंपन्यांमध्ये मुलगी असणे हे qualification समजले जात असेल तर माझ्यासारख्या काहींनी ते disqualification समजले तर काय बिघडले? परत एकदा सांगतो की या ३०% राखीव जागा, कॅटमध्ये ग्रेस मार्क आणि नंतर जेंडर रेशोच्या नावावर दिले जाणारे झुकते माप हे प्रकार बंद झाले तर मला माझ्यापुढे येणारा उमेदवार कोण आहे हा मुद्दा अजिबात महत्वाचा राहणार नाही.

ओये ओये

३०% जागा मुलींसाठी राखीव असल्याचे कधी ऐकले नव्हते. आजही इंजिनिअरिंग कॉलेजात वर्गात ३०% मुली नसतात असे वाटते. इंजिनिअरिंगच्या मुलांना टेहळणीसाठी दुसर्‍या कॉलेजांत का जावे लागते बरे?

नितिन थत्ते

२००० सालापासून

मुलींसाठी अभियांत्रिकी महाविद्यालयात ३०% राखीव जागा असतात. मध्यंतरी मी आमच्या महाविद्यालयात गेलो होतो तेव्हा प्राध्यापकांनी मला एका वर्गात नेले होते. तेव्हा अगदी यांत्रिकी अभियांत्रिकी (मेक्यानिकल) च्या वर्गातही मुलींची संख्या लक्षणीय होती. गेल्या वर्षीपर्यंत पदविका करून पदवीच्या द्वितीय वर्षाला प्रवेश घेताना अशा राखीव जागा नव्हत्या. पण कोणा मुलीने त्याविरूध्द न्यायालयात धाव घेतली आणि द्वितीय वर्षासाठी पदविकेनंतर प्रवेश घेतानाही राखीव जागा असाव्यात असा निर्णय न्यायालयाने दिला ( दुवा )

लेख आवडला, अधिक फुलवता आला असता.

लग्न झाल्यानंतर अनेक स्त्रिया राजीखुशीने आपलं नाव बदलतात. नाव असो वा आडनाव, गेली अनेक वर्ष आपली जी ओळख आहे तीच बदलायची, एवढं की फेसबुकावर फ्रेंड रिक्वेस्ट आल्यावर फोटो पाहिल्याशिवाय आपली बालमैत्रीण ओळखता येऊ नये ही अतिशय दु:खद गोष्ट वाटते.

माझ्यामते आपले नाव निवडण्याचा हक्क प्रत्येक व्यक्तीस असावा. मग ते लग्नानंतर बदललेले असो, नसो किंवा कसेही. मात्र फेसबुकावरील फ्रेंडरिक्वेस्टबाबत सहमत आहे. :-) माणसे ओळखताना त्रास होतो खरा. तरीही, माझ्या वर्गमित्रांनी मला ज्या सहजतेने शोधून काढले त्यावरून इतकेही कठीण नसावे. ;-)

घरातली कामं करण्यात पुरूषाने हातभार लावावा हे जेवढं खरं आहे तेवढंच घरातल्या सुतारकाम, माळीकामात स्त्रीनेही मदत करावी ही जबाबदारीची जाणीव आहे. घर चालवण्याची जबाबदारी पूर्वीच्या परंपरेत पुरूषावर होती, पण जर पुरूषी मानसिकतेचा विरोध करायचा असेल तर घर चालवण्याची जबाबदारी स्त्री आणि पुरूष दोघांची आहे याचीही जाणीव स्त्रीला हवी.

सुतारकाम आणि माळीकाम दूर, साधी गाडी चालवताना नवरा-बायको बाहेर पडले तर नवरा चटकन ड्रायव्हिंग व्हीलचा ताबा घेतो असे चित्र दिसते आणि हे चित्र बोलके आहे. :-)

पुरूषाच्या शरीरात स्त्रीच्या शरीरापेक्षा जास्त स्नायू असल्यामुळे शारीरिक क्षमतेमधे स्त्रियांपेक्षा पुरूष वरचढ ठरतो यात वाद नाही.

मला वाटतं वरचढ कोण हे तुलनात्मक आहे. माझ्यामते अनेक पुरुषांच्या आणि इतर स्त्रियांच्या मानाने मी अधिक सक्षम आहे. (माझ्या घराण्याकडून आलेल्या तब्येतीला लाख सलाम!)

माझ्यावर अन्याय झाला आहे" असा फक्त ओ-रडा करण्यापेक्षा तो अन्याय कमी, नष्ट कसा होईल याचा प्रयत्न करणं हे अतिशय सकारात्मक पाऊल उचलल्याशिवाय बदल होणे शक्य नाही. नावडती गोष्ट घडल्यास रडणं हा मानवी स्वभावच आहे, पण आपल्या रडण्यामुळे नको त्या ठिकाणी आपल्याला सहानुभूती मिळते ती गमावण्याची स्त्रीची तयारी असावी.

१००% सहमत. याचबरोबर जर अन्याय झाला असेल तर त्याविरुद्ध तक्रार करणे आणि झगडत राहणे हे मला योग्य वाटते. रडल्याने सहानुभूती लगेच मिळते परंतु रोज रडणारा सक्षम नसतो. स्त्री ही अबला आहे आणि आपण "ही-म्यान" असा विचार करणारे महाभाग "पुरुष" म्हणून मदतीला धावून येत असतात. यापेक्षा माणसाने माणसावर अन्याय होतो म्हणून धावून येणे महत्त्वाचे वाटते.

असो. लेख थोडा त्रोटक वाटला. वर मन म्हणाला तसे उत्स्फुर्तता आल्याने लेख त्रोटक झाला असावा.

पु.ले. शु आणि नोबेल विजेत्यांचे मनापासून अभिनंदन!

तवक्कुल कारमन्

लेखात उल्लेख केलेल्या तीन विजेत्यांच्या [मी मुद्दाम "स्त्री" चे योजन टाळले आहे, कारण हे तीन विजेते केवळ स्त्री आहेत म्हणून निवडले गेले असे म्हटले तर त्यांच्या त्या त्या क्षेत्रातील कार्याचा अवमान केल्यासारखे आहे असे मला वाटते] बाबत धागालेखिका अदिती यांच्या भावनेशी सहमती दर्शविताना हेही सांगणे महत्वाचे आहे की, लायबेरियामधील पहिल्या दोघींच्या कार्यापेक्षा [मला वाटते] येमेनमधील तवक्कुल कारमन् यांचे कार्य केवळ 'महिला उद्धारा'साठी नसून तेथील सध्याच्या हुकूमशहा अली अब्दुल्ला सालेहच्या जुलमी राजवटीविरूद्धचा एकत्रित लढ्याचे नेतृत्व स्वीकारण्याशी जास्त निगडीत आहे. हुकूमशहा सालेहच्या कारकिर्दीचे विश्लेषण या प्रतिसादात करणे धाग्यातील मुद्द्यापासून दूर जाण्यासारखे असल्याने तो विषय टाळून इतकेच म्हणतो की, स्त्री मुक्ती संदर्भातील आपल्या भारतीय कल्पना आणि नोबेल् विजेती कारमन यांचे जनजागृतीचे कार्य यांचा एकमेकाशी कसलाही संबंध नाही. कारमेन् यांचे कार्य राष्ट्रजागृतीचे आहे आणि त्या अत्यंत खंबीरपणे तसेच नीडरपणे पार पाडीत आहेत हे त्यांच्याभोवती जमा झालेल्या कार्यकर्त्यांची फौज पाहता दिसून येते. पारंपारिक मुस्लिम पोषाखाला फाटा देऊन आता केवळ केस झाकले जातील असा पेहराव करून चेहरा अन्य पुरूष सहकार्‍यांसारखाच खुला करून सभा गाजविणार्‍या या तरूणीच्या {होय, तरूणीच म्हटले पाहिजे, केवळ ३२ वर्षाच्या आहेत कारमन्} लोकप्रियतेला येमेनमध्ये आलेला बहर पाहता कोणत्याही क्षणी राष्ट्रपती अब्दुल्ला सालेह पदत्याग करतील अशी स्थिती अगोदरच निर्माण झाली आहे, आणि आता 'नोबेल प्राईझ' मुळे सार्‍या जगाचे लक्ष येमेनमधील घडामोडीकडे लागल्याने पदत्यागाची ती घटनाही येत्या काही दिवसात घडली तर आश्चर्य वाटायला नको.

सांगायचा मुद्दा हा की, किमान कारमन यांचा लढा हा 'स्त्री मुक्ती' पुरताच मर्यादित असा घेऊ नये. खुद्द नोबेल कमिटीनेही आपल्या सायटेशनमध्ये तसा उल्लेख केला नसेल.

[काहीसे अवांतर : लेखिका अदिती यानी लेखात "लायबेरीयाची राष्ट्राध्यक्षा एलन जॉनसन सरलीफ हिला शांतता-नोबेल पुरस्कार मिळाला" असा, कदाचित नकळत, जो एकेरी उल्लेख केला आहे तो खटकतो. राष्ट्रपतीपदावरील, त्यातही वयाची सत्तरी ओलांडलेल्या, व्यक्तीचा उल्लेख 'हिला' असा असू नये असे वाटते. उद्या 'राष्ट्राध्यक्षा प्रतिभा पाटील हिला परिसंवादाचे अध्यक्षस्थान दिले" अशी वर्तमानपत्रात बातमी आली तर ते आपल्याला खटकणारच.]

विस्ताराने लिहावे

"माझ्यावर अन्याय झाला आहे" असा फक्त ओ-रडा करण्यापेक्षा तो अन्याय कमी, नष्ट कसा होईल याचा प्रयत्न करणं हे अतिशय सकारात्मक पाऊल उचलल्याशिवाय बदल होणे शक्य नाही.

हे खरेच. पण 'माझ्यावर अन्याय झाला आहे' असा ओरडाही न करणे ही मानसिकता प्रथम बदलली गेली की पुढच्या गोष्टी घडतील. मात्र ओरडा न करता एखाद्या व्यवस्थेत मिंधेपणाने वावरणे हा कमी त्रासाचा मार्ग वापरणेच अनेकजन पत्करतात.

सर्वसाधारण सहमती

पाटीलसाहेब म्हणतात तसे कारमान यांचा लढा स्त्रीस्वातंत्र्यापुरता मर्यादित नाही हे खरे, पण म्हणून त्यांचा उल्लेख “स्त्री” असा केल्याने त्यांच्या कार्याचे किंवा त्यांच्या व्यक्तित्वाचे अवमूल्यन होते असे वाटत नाही; उलट त्या स्त्री आहेत हे सांगीतल्याने त्यांचे कार्य अधिकच उठून दिसते. “मी तुझा पती परमेश्वर आहे, आणि तू माझ्या पाया पडले पाहिजेस” असे एखाद्या वराने आपल्या वाग्दत्त वधूला सांगीतले तर ती उलटे दोन बोल सुनावण्याऐवजी मुकाट मान डोलावण्याची शक्यता अधिक असते हे (अजूनही) दुर्दैवी वास्तव आहे. असल्या जगात एखाद्या स्त्रीने असे एखादे काम केले, की जे पुरुषप्रधान संस्कृतीत पुरुषांनाही अवघड जावे, तर ती स्त्री ही “स्त्री” आहे ही बाब अधोरेखीत करण्याच्या योग्यतेची आहेच आहे. उच्चशिक्षित आणि उच्चपदस्थ वर्तुळात असलेल्या माझ्या एका बिहारी मैत्रिणीला तिचे बिहारी सहकारी “शकल लडकीकी, अकल लडकेकी” असे म्हणत असलेले मी ऐकलेले आहे. एका पत्रकार मित्राला उत्तर प्रदेशात एका बाईने तिला दहा मुले असताना तीनच मुले आहेत असे सांगीतले होते, कारण बाकीच्या सात मुली होत्या. महाराष्ट्रात जरा तरी बरी परिस्थिती आहे. पण स्त्री समान नाही हे वास्तवच आहे. असे असताना “व्यक्तीचे कार्य महत्वाचे, ती स्त्री की पुरुष हे महत्वाचे नाही” असे म्हणणे वास्तवाला धरुन नाही. स्त्री म्हणून कार्य करणे हे निश्चित कठीण आहे.

बाकी स्वातंत्र्यासोबत येणाऱ्या जबाबदारीविषयी स्त्रियांची काय भूमीका असावी याविषयी लेखिकेच्या मतांशी किंचित असहमती आहे. लेखिकेच्या स्त्रियांकडून फारच अपेक्षा आहेत. शेवटी स्त्रीदेखील माणूसच आहे. असाही लाभ घ्यायचा, आणि तसाही लाभ घ्यायचा, हा मानवी स्वभाव आहे. स्त्री-पुरुष असा भेदभाव न करता बरोबरीचे स्थान दिले जात असताना स्त्रीदाक्षिण्याची अपेक्षा स्त्रीने ठेऊ नये हे ठीक. पण अशा स्त्रिया कमीच असणार. कारण एवढा आत्मसन्मान असणारी माणसेच – पुरुष आणि स्त्री, दोन्ही – कमी असतात त्याला काय करणार? (आरक्षणासारख्या विषयांत हे सर्रास दिसणारे चित्र आहे.)

कमी शारीरिक बळामुळे स्त्री पुरुषाच्या मागे पडते असे जर लेखिकेला सुचवायचे असेल, तर ते मान्य नाही. (तसे सुचवायचे नसेल तर प्रश्न नाही). शारीरिक बळाचा काय संबंध? हत्तीचे शारीरिक बळ हे मनुष्य़ापेक्षा अधिक असते म्हणून जग हत्ती चालवतात का? संस्कृती पुरुषप्रधान असण्याचे कारण हे पुरुषाचे शारिरीक बलाधिक्य असेल असे मला तरी वाटत नाही. (उलट याचे कारण स्त्रीच आहे असे कधीतरी वाटून जाते. एक स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला पाण्यात पाहणे हे चित्र दोन पुरुषांच्यातल्या संघर्षाच्या तुलनेत अधिक तीव्र असते असे बऱ्याच वेळा दिसते. यामुळेच “तुला नाही , मला नाही घाल पुरुषाला” (समस्त श्वान जमातीची क्षमा मागून!) असे तर नसावे असे कधीतरी वाटून जाते!)

एकूणच हा विषय सामान्यीकरण करता येण्यासारखा असला तरीही केस बाय केस विचार करण्यासारखा आहे हेही खरे. पण सर्वसाधारणपणे लेखात मांडलेल्या मतांशी मी सहमत आहे. पुरुषांना सोडा, अनेक स्त्रियांनाही यातले विचार पटणार नाहीत हा भाग वेगळा.

स्त्री ही स्त्रीची शत्रू

एक स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला पाण्यात पाहणे हे चित्र दोन पुरुषांच्यातल्या संघर्षाच्या तुलनेत अधिक तीव्र असते असे बऱ्याच वेळा दिसते. यामुळेच “तुला नाही , मला नाही घाल पुरुषाला” (समस्त श्वान जमातीची क्षमा मागून!) असे तर नसावे असे कधीतरी वाटून जाते!)

हे निरीक्षण चुकीचे नसावे पण त्यामागे जे कारण आहे ते जाणून घ्यायला हवे. अनेक वर्षे स्त्रीचे कार्यक्षेत्र आणि अधिकार हे अतिशय मर्यादित राहिले आहेत. घर (त्यातही प्रामुख्याने स्वयंपाकघर) आणि काहीकाळासाठी मुले. मुले हे सरसकट म्हणता येत नाही कारण अनेक संस्कृतींमध्ये मुले ७-८ वर्षांची होईपर्यंत आईच्या मायेखाली असत आणि मग त्यांना तेथून ओढून बाहेर काढले जाई. आताही अनेक घरांत मुले किंचित मोठी झाल्यावर घरातील कर्ते त्यांच्याबद्दल निर्णय घेऊ लागतात.

जर बाईचे कार्यक्षेत्र मर्यादित असेल आणि त्या मर्यादित क्षेत्रावरही अधिकार गाजवणारी दुसरी व्यक्ती असेल (सासू-सून, सवती, जावा, नणंदा आणि अगदी बहिणीही) तर विरोध होणे हे आलेच कारण तेवढीच एक जागा आहे जिथे अधिकार चालतो आणि तेही हातातून ओढून घेणारे कोणी आले अशी मानसिकता बनते. (थोड्याफार प्रमाणात मुलांवर असणारा अधिकार सून आल्याने गेला म्हणूनही (आणि उलट) विरोध दिसतो.)

जिथे बायकांचे क्षेत्र मर्यादित नाही. डोक्याला ताप देण्यासाठी त्यांच्याकडे अनेक कामे आणि विचार आहेत तेथे स्त्रीही स्त्रीची शत्रू आहे वगैरे वाक्प्रचार हमखास खोटे ठरताना पाहिले आहेत.

+१

कारणमीमांसेशी सहमत आहे.

दुसरे कारण ज्याची* सत्ता आहे त्याला खूष करण्याची आणि त्याच्या हिताचा खूप कळवळा असल्याची बतावणी करणे हे असते.

*ज्याची सत्ता म्हणजे एकूण कुटुंबाच्या प्रमुखाला खूष करण्याची सासू आणि सुनांमधली स्पर्धा आणि मर्यादित क्षेत्रात सासूला खूष करण्यासाठी दोन सुनांमधील स्पर्धा.
.
.
.
.
.

नितिन थत्ते

हं

विचार करायला लावणारी कारणमीमांसा आहे. याच न्यायाने मर्यादित क्षेत्रात काम करणारी पुरुषमंडळीदेखील हेव्यादाव्याचे आणि खेकडा स्टाइल राजकारण खेळताना दिसू शकतातच.(आम्ही आमच्या मित्रमंडळात त्याला सासू सून सिंड्रोम म्हणतो). तरीही याहीपलीकडे काही कारण असावे का हा विचार मनात येतोच. सोशलायझेशन म्हणा किंवा एकूणच आपण स्त्री किंवा पुरुष आहोत याची जाणीव मनात ठेऊनच प्रत्येक गोष्टीकडे बघण्याची वृत्ती असेल तर काही प्रॉब्लेम येऊ शकतात असे वाटते.

जिथे बायकांचे क्षेत्र मर्यादित नाही. डोक्याला ताप देण्यासाठी त्यांच्याकडे अनेक कामे आणि विचार आहेत तेथे स्त्रीही स्त्रीची शत्रू आहे वगैरे वाक्प्रचार हमखास खोटे ठरताना पाहिले आहेत.

हे ठीक आहे, पटण्यासारखे आहे, पण हमखास हा शब्द इथे असण्याची गरज नाही. शेवटी जेवढी माणसे तेवढ्या प्रकृती.

असो. मुद्दा समजला. पटलेला आहे.

स्वक्षेत्रावर अधिकार

याहीपलीकडे काही कारण असावे का हा विचार मनात येतोच.

"स्वक्षेत्रावर अधिकार" हे मुख्य कारण आहे आणि असे बिहेविअर बर्‍याचशा प्राण्यांमध्ये घडते. कुत्रे आपले क्षेत्र निश्चित करतात. इतर अनेक प्राणीही तसे करतात. त्या क्षेत्रात इतरांचे आक्रमण त्यांना डिफेन्सिव बनवते. माणूस या सर्वांपासून वेगळा आहे असे वाटत नाही. ज्या क्षेत्रावर आपला हक्क आहे आणि तो हक्क जाण्याची भीती वाटते तिथे स्वरक्षणासाठी प्राणी असो की माणूस प्रयत्न करतो.

सोशलायझेशन म्हणा किंवा एकूणच आपण स्त्री किंवा पुरुष आहोत याची जाणीव मनात ठेऊनच प्रत्येक गोष्टीकडे बघण्याची वृत्ती असेल तर काही प्रॉब्लेम येऊ शकतात असे वाटते.

आपण स्त्री आहोत आणि पुरुषापेक्षा वेगळे आहोत (किंवा उलट) हे वाटण्यात मला गैर वाटत नाही पण आपण स्त्री आहोत आणि पुरुषापेक्षा कमी आहोत ही जाणीव सामाजिक आणि सांस्कृतिक असावी. अर्थातच, ती स्वक्षेत्रावरील अधिकार या आदिम जाणीवेनंतर फार उशीरा निर्माण झालेली आहे.

माझ्या वरच्या प्रतिसादात एक मुद्दा राहिला होता, खरे म्हणजे मागे कोणीतरी कुठेतरी असा लेख लिहिला होता. आता आठवत नाही पण विषय साधारण असा होता की "स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त धार्मिक असतात." मी त्यावेळी कशी प्रतिक्रिया दिली ते आठवत नाही पण आज-आता मला असे वाटते की या वाक्यात तथ्य आहे. नितिन थत्ते म्हणतात तसे - आपण धार्मिक आहोत हे दाखवून स्त्री आपले कुटुंब, कर्ता यांना सुखावत असते आणि ते करताना ती दुसर्‍या स्त्रीवर अन्याय ही करते. (उदा. विधवांना धार्मिक कार्यात सहभागी न करणे, सुनेला जबरदस्ती व्रतवैकल्ये करायला लावणे इ. इ.)

वर मराठी गंडले आहे त्याबद्दल क्षमस्व!

माझं वैयक्तिक मत - स्त्री ही स्त्रीची शत्रू आहे वगैरे सारखी वाक्ये स्त्रियांना कमीपणा आणण्यासाठी वापरली जात असावी. या वाक्यांनी स्त्रियांमध्ये पुरूषांपेक्षा काहीतरी कमतरता आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. अशा वाक्यांत आणि "विधवा अपशकुनी असतात" या वाक्यांत मला फारसा फरक दिसत नाही. ज्याप्रमाणे विधवेचे अपशकुनी असणे हे हळूहळू त्याज्य होते आहे तसे "स्त्री ही स्त्रीची शत्रू आहे" हे वाक्य त्याज्य होण्याची गरज आहे. याचा अर्थ वरील निरीक्षण चुकीचे आहे असे नाही. ते चुकीचे ठरवण्यासाठी स्त्रियांनी आपले कार्यक्षेत्र रुंदावण्याची गरज आहे आणि त्यासाठी त्यांच्या सुहृदांनी त्यांना सर्वतोपरी मदत करण्याची गरज आहे.


अवांतरः

हे ठीक आहे, पटण्यासारखे आहे, पण हमखास हा शब्द इथे असण्याची गरज नाही. शेवटी जेवढी माणसे तेवढ्या प्रकृती.

हमखास म्हणजे १००% नाहीच. :-)

छोटिशी चूक

पुरूषाच्या शरीरात स्त्रीच्या शरीरापेक्षा जास्त स्नायू असल्यामुळे शारीरिक क्षमतेमधे स्त्रियांपेक्षा पुरूष वरचढ ठरतो यात वाद नाही.

आदिती स्त्रीपेक्षा पुरूषांच्या शरीरात स्नायू संख्येने जास्त नसतात तर तेवढ्याच संख्येच्या स्नायूंचे वस्तुमान जास्त असते (मसलमास).

तसेच पुरूषांच्या तुलनेत स्त्रियांना हार्मोनल चेंजेसचा सामना वारंवार करावा लागत असल्यामुळे शारिरीक आणि मानसिक शक्ती कमी होण्याचा संभव जास्त असतो. (होतोच असे नाही)
पण नैसर्गिक फरक त्यांच्या जागी ठेवून सामाजिक दृष्ट्या समानता पाळता येऊ शकते हे लक्षात यायला भारतात तरी अजून एक पिढी जावी लागेल.

ता.क. काल एक पेशंट छातीत उजव्या बाजूला दुखते म्हणून आली होती. तिचे आणि तिच्या घरच्यांचे ठाम मत होते की पुरूषांचे हृदय डाव्या आणि स्त्रियांचे उजव्या बाजूला असते. :)
तसेही एका विशिष्ट समाजात स्त्रियांना पुरूषांपेक्षा एक् बरगडी कमी असते असं समजतात. आमच्याबरोबर त्या समाजातील ज्यांनी चिरफाड केलीय ऍनॉटॉमी शिकताना ते डॉक्टरही आपल्या समाजातील धर्मगुरूंना हे पटवू शकणार नाहीत.

+१

बरोबर आहे- स्नायूंचे वस्तुमान जास्त असते, संख्या नव्हे.

एकंदरच यंत्रयुगात हा 'शक्ती' चा मुद्दाही बराचसा निकालात निघाला आहे. आजच्या मानवाला दैनंदिन कामासाठी जितके बळ लागते, तितके स्त्रीच्या शरीरात नक्कीच असते. खरं तर महिलांसाठी कारचा दरवाजा उघडून धरणे, त्यांच्यासाठी खुर्ची ओढणे इत्यादि दिखाऊ शिष्टाचारही स्त्रीला कमी लेखतात असे मला वाटते. आजच्या स्त्रीने यासारख्या प्रथाही नाकारल्या पाहिजेत.

(अवांतर- सिमॉनचे 'द सेकंड सेक्स' नुकतेच वाचले. पुस्तकाच्या लिखाणाचा काळ बराच आधीचा असला तरी त्यातले असंख्य मुद्दे आपल्या देशात आजच्या काळातही जसेच्या तसे लागू होतांना दिसतात !)

उत्तरं देण्याचा प्रयत्न

सतीश रावले: जगातले सर्व लोकच तुमच्यासारखा (किंवा मी आणि इतर प्रतिसादक) विचार करणारे असते तरी या नोबेल पुरस्कार आणि लेखाचं प्रयोजन नसतं. पण वस्तुस्थिती तशी नाही. त्यामुळे स्वतःसारखा विचार करणारे कोण आहेत हे शोधण्यासाठी, त्यांच्यापर्यंत आपले विचार पोहोचवण्यासाठी आणि विरोधी मतातल्या लोकांचं जमलंच तर थोडंबहुत मतपरिवर्तन करण्यासाठी लेख लिहावा लागतो. पण तुमचा प्रतिसाद आवडला.

अरविंद कोल्हटकरः स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद. "समाजकंटकांकडून गर्दीमध्ये उभ्या स्त्रीला सतावले जाण्याची शक्यता" बरीच जास्त असते. असा त्रास न झालेली एकही स्त्री माझ्या परिचयाची नाही. त्याचा सामना करण्यासाठी आरक्षण हा एकमेव उपाय समजला जाऊ नये असं वाटतं.

अशोक पाटील: तवक्कुल कारमन यांचे कार्य लोकशाही आणण्यासंदर्भात आहे. पण स्त्रीवाद आणि लोकशाही या दोन गोष्टी मला फार वेगळ्या काढता येत नाहीत. सर्व क्षेत्रांमधे समान संधी, समानता इत्यांदींचा विचार करता संपूर्ण लोकशाहीत स्त्रीवादी कार्यकर्त्यांना काम रहाणार नाही अशी अपेक्षा गैर नसावी.
अनेक शतकं अन्यायग्रस्त असणार्‍या जगाच्या या अर्ध्या लोकसंख्येपैकी एखादीच्या कार्याचं कौतुक झालं की मला थोडा अधिक आनंद होतो हे खरं आहे. पण 'अमुक गोष्ट करणारी पहिली स्त्री' असा माझा उल्लेख झाला तर मला आवडेल का? बहुदा नाही. एक व्यक्ती म्हणून मला वागवा अशी अपेक्षा करताना स्त्री असूनही एखादी गोष्ट मिळवली असं कौतुक अस्थानी वाटतं.
एकेरी उल्लेख करण्याबद्दलः जवळीक वाटण्यातून एकेरी उल्लेख येतो तशा प्रकारचा तो उल्लेख आहे. "आज शिवाजी राजा झाला" अशाच प्रकारचा. प्रतिभा पाटील यांच्या अशा काही कार्याबद्दल माहिती नसल्यामुळे त्यांच्याबद्दल कोणत्याही प्रकारची जवळीक वाटत नाही.

प्रियाली: नाव बदलण्याच्या बाबतीत माझ्या बाबतीतही हा प्रश्न आला होता; लग्नाआधी प्रसिद्ध केलेलं संशोधन एका नावाने आणि लग्नानंतर दुसर्‍या नावाने असं केलं तर पुढे नोकरी मिळवताना मला प्रत्येक ठिकाणी ही दोन्ही नावं माझीच आहेत असं मुद्दाम सांगावं लागतं. भारतात लग्नानंतर स्त्रीचं नाव (first name) बदलण्याची पद्धत होती, अजूनही काही ठिकाणी दिसते. आपखुशीने काही कारणास्तव नाव (उदा: एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीबद्दल तीव्र नावड असताना आपलं नाव तेच असणे इ.) किंवा आडनाव (काही आडनावं फार विचित्र असतात आणि विशेषतः शाळेत मुलांना त्याचा त्रास होऊ शकतो, उदा: जंगली, खुळे इ.) बदलणे हे मला समजतं. पण सरसकट फक्त स्त्रियांनीच आपलं आडनाव बदलणं मला पटत नाही.
लग्नानंतर नवरा-बायकोने डबलबॅरल आडनाव लावणंही पाहिलं आहे; या दोघांचे संशोधन पेपर्स शोधण्यात अडचणी आल्याबद्दल अनेकांनी त्यांच्याकडे तक्रार केली होती.
पाश्चात्य जगात बर्‍याच प्रमाणात आणि आता भारतातही काही प्रमाणात घटस्फोट आणि पुनर्विवाह होतात. किती आडनावांचं स्पष्टीकरण फक्त स्त्रीने देत बसायचं?

आळशांचा राजा: एकूणच हा विषय सामान्यीकरण करता येण्यासारखा असला तरीही केस बाय केस विचार करण्यासारखा आहे हेही खरे. याबाबतीत अगदी सहमतच. प्रियालीला नाव बदलण्यात चुकीचं वाटत नसेल आणि याबाबतीत "माझंच खरं" म्हणण्यातही अर्थ नाहीच. आणखी एक् उदाहरण वाहन चालवण्याचा बायकोला अतोनात कंटाळा असेल (उदा: मी) आणि नवर्‍याला त्यात मजा येत असेल तर (उदा: माझा नवरा) तर अशी उदाहरणं देता येतातच. पण साधारणतः प्रियालीचे निरीक्षण, नवराच गाडी चालवतो, मैत्रीमधेही मुलगी गाडी चालवते आहे आणि मुलगा स्कूटरवर मागे किंवा कारमधे शेजारी बसला आहे असं दृष्य भारताततरी कमी प्रमाणातच दिसतं.

क्रेमरः अन्यायाविरोधात मत मांडणे, आवाज उठवणं वेगळं आणि ओरडा वेगळा. स्त्रियांच्या बाबतीत ही गोष्ट विशेषत्वाने नोंदवावी असं वाटतं कारण स्त्रिया त्यांच्या भावना, विशेषत: दु:खद भावना अधिक इंटेंसिटीने व्यक्त करतात असं दिसतं. आणि अनेक पुरूष स्त्री दाक्षिण्य दाखवण्याच्या नादात स्त्रियांना त्याचा अस्थानी फायदा होतो.

साती: सुधारणेबद्दल धन्यवाद. स्नायूपेशींची संख्या जास्त असते असं असतं का?
ता.क. हा हा हा ...

बाकी बर्‍याच अंशी एक वगळता सर्व प्रतिसादकांशी सहमती आहेच.

लेख त्रोटक आहे हा आक्षेप मान्य आहे. प्रतिसादातून ही कमतरता काही अंशी भरून काढण्याचा प्रयत्न करत आहे.

'स्त्री' च्या पलिकडे

@ आ.रा. ~ "कारमान यांचा लढा स्त्रीस्वातंत्र्यापुरता मर्यादित नाही हे खरे, पण म्हणून त्यांचा उल्लेख “स्त्री” असा केल्याने त्यांच्या कार्याचे किंवा त्यांच्या व्यक्तित्वाचे अवमूल्यन होते असे वाटत नाही; उलट त्या स्त्री आहेत हे सांगीतल्याने त्यांचे कार्य अधिकच उठून दिसते."

~ लेट् मी डिफर् वुईथ् यू ऑन् धिस् पॉईन्ट्, सर.
असे का व्हावे की अमुक एक व्यक्ती 'स्त्री' आहे म्हणून (च) तिचे कार्य उठून दिसावे ? मेधा पाटकर असो वा ईला भट, ह्या आणि त्यांच्यासारख्याच अन्य जे कार्य करीत आहेत त्याला जी झळाळी आली आहे ती त्यांच्या 'स्त्री' असण्यामुळे आली असावी असे मानू नये, तर त्या ज्या क्षेत्रात वा क्षेत्रासाठी कार्य करीत आहे त्याचे महत्व जगाने जाणून त्याची दखल घेतली आहे म्हणून.

उद्या मी जर असे इथे प्रतिपादन केले की, 'मादाम मेरी क्युरी' ना दोनदा नोबेल् प्राईझ मिळाले ते छानच झाले पण त्या स्त्री असल्याने त्यांचे यश अजून उठून दिसते, तर मग ती त्यांच्या संशोधन कार्याची वंचना होईल. नोबेल कमिटीने रेडियमचे महत्व जाणले ते मेरी क्युरी स्त्री असल्यामुळे असे वाटत नाही.

१००% सहमती

मुद्दाम स्त्री असा उल्लेख होणे, करणे मलाही आवडत नाही. ज्या स्त्रियांना लिंगभेदाचा सामना करावा लागला आहे त्यांच्या बाबतीत असा उल्लेख होणं योग्य वाटतं. गरीबीतून वर आलेल्या माणसाच्या कष्टाचं विशेष कौतुक वाटतं तसंच काहीसं.

ज्ञानेशः खरं तर महिलांसाठी कारचा दरवाजा उघडून धरणे, त्यांच्यासाठी खुर्ची ओढणे इत्यादि दिखाऊ शिष्टाचारही स्त्रीला कमी लेखतात असे मला वाटते. आजच्या स्त्रीने यासारख्या प्रथाही नाकारल्या पाहिजेत. याच्याशी सहमत आहे. किंबहुना हाच माझा मुख्य मुद्दा आहे.
पाश्च्यात्य देशांत अनेक ठिकाणी रिट्रॅक्ट (मराठी शब्द?) होणारे दरवाजे पुढची व्यक्ती मागच्या व्यक्तीसाठी धरून ठेवते; स्त्री-पुरूष कोणी का असेना.
माझ्या अनेक मित्र-सहकार्‍यांच्या वागण्या-बोलण्यात याबाबतीत सुसंगती आढळते. अनेक संभाषणांमधे "तू काय मुलगी/लेडी नाहीस" असा उल्लेख येतो तो मला व्यक्ती म्हणून समानतेने वागवतात त्यामुळे येतो.

शारीरिक शक्तीसंदर्भातः यंत्रांमुळे हा मुद्दा बर्‍याच अंशी गौण आहे हे मला मान्य आहे. वरती या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे, माझ्या मते, मानवी शक्ती ही शरीरात फार जास्त नसून खांद्यावरच्या मेंदूमधे आहे.

संघर्षाबाबतीत प्रियालीचं स्पष्टीकरण आवडलं.

थोडी असहमती

पाटील यांच्या विचारांशी सर्वसाधारण सहमती असली तरी कारमन यांचा उल्लेख "स्त्री" म्हणून होणे मला खटकले नाही. परंतु तेच जर मेधा पाटकर, मादाम क्यूरीबाबत झाले तर खटकेल. कायद्याने आपल्या देशात स्त्रीला दुय्यम दर्जा दिलेला नाही. आरक्षणाचा मुद्दा येथे वेगळा वाटतो पण ज्या देशांत स्त्रियांना मतदानाचे हक्क नाहीत, नोकरी करण्याचे स्वातंत्र्य नाही, बरेचदा ज्यांची जन्मनोंदणी होत नाही तेथे निदान प्रचारासाठी "स्त्री असून तिने यश संपादित केले" हा मुद्दा ठळक व्हावा असे वाटते.

सौदीमध्ये नुकतीच गाडी चालवणार्‍या बाईला झालेली फटक्यांची शिक्षा अनेकांच्या प्रयत्नांमुळे रद्द झाली. या देशांत स्त्रीला दुय्यम दर्जाही आहे असे वाटत नाही.

असेच

हेच म्हणायचे आहे. एखाद्या व्यक्तीची "स्त्री" अशी ओळख मनात ठेऊन समाज/ कायदा त्या व्यक्तीला त्याप्रमाणे (दुय्यम) वागणूक देत असेल तर त्या व्यक्तीची एखादी कर्तबगारी ही "स्त्री असूनही हे साध्य केले" असे म्हणण्याने त्या व्यक्तीचा किंवा कर्तबगारीचा अपमान/ वंचना होत नाही. उलट कौतुक आहे, अन्य स्त्रियांनीही असे पुढे यावे असे यात इम्प्लाइड आहे.

(इथे माझेही मराठी थोडे गंडले आहे!)

असे का व्हावे की अमुक एक व्यक्ती 'स्त्री' आहे म्हणून (च) तिचे कार्य उठून दिसावे ? मेधा पाटकर असो वा ईला भट, ह्या आणि त्यांच्यासारख्याच अन्य जे कार्य करीत आहेत त्याला जी झळाळी आली आहे ती त्यांच्या 'स्त्री' असण्यामुळे आली असावी असे मानू नये, तर त्या ज्या क्षेत्रात वा क्षेत्रासाठी कार्य करीत आहे त्याचे महत्व जगाने जाणून त्याची दखल घेतली आहे म्हणून.

उद्या मी जर असे इथे प्रतिपादन केले की, 'मादाम मेरी क्युरी' ना दोनदा नोबेल् प्राईझ मिळाले ते छानच झाले पण त्या स्त्री असल्याने त्यांचे यश अजून उठून दिसते, तर मग ती त्यांच्या संशोधन कार्याची वंचना होईल. नोबेल कमिटीने रेडियमचे महत्व जाणले ते मेरी क्युरी स्त्री असल्यामुळे असे वाटत नाही.

समजुतीचा घोटाळा झालेला दिसतो. "स्त्री असल्यामुळे यश मिळाले/ कार्याची दखल घेतली" असे म्हणायचे नसून "स्त्री असूनही साध्य केले (स्वकर्तृत्वानेच)" असे म्हणत आहे.

स्त्री असा वेगळा उल्लेख होऊ नये, किमान अशा क्षेत्रांत तरी की जिथे स्त्री की पुरुष ही बाब गौण आहे, ही अपेक्षा रास्त आहे; पण ती एक "अपेक्षा"च आहे, वास्तव नव्हे. काही समाजांमध्ये हे विशफुल् थिंकिंग प्रत्यक्षात येत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. मेधा पाटकर, किरण बेदी यांचे कर्तृत्व हे स्त्री-पुरुष भेदाच्या पलीकडे आहे हे खरेच आहे. अगदी तसेच कर्तृत्व जर बस्तरमधल्या एका दुर्गम भागातील आदिवासी आश्रम शाळेत शिकलेल्या मुलीने दाखवले, तर तिचा उल्लेख "आदिवासी", आणि तेही "स्त्री" असूनही हे साध्य केले असा अवश्य व्हावा, कारण तिचा त्यात गौरवच आहे. रेकग्निशन आहे. आदिवासी असल्यामुळे आणि स्त्री असल्यामुळे तिची वंचना होत असते हे वास्तव आहे. त्यावर मात करुन तिने हे साध्य केले आहे असे म्हणण्यात तिचा अवमान होत नसून कौतुक होते. ज्यादिवशी आदिवासी आणि स्त्री असल्यामुळे होणार्‍या वंचनांचा अंत होईल त्या दिवसापासून असा वेगळा उल्लेख करायची गरज पडणार नाही.

स्त्री उल्लेख

"स्त्री असा वेगळा उल्लेख होऊ नये, किमान अशा क्षेत्रांत तरी की जिथे स्त्री की पुरुष ही बाब गौण आहे, ही अपेक्षा रास्त आहे"

~ हे ठीक आणि त्यामुळे तुमच्या इथल्या विचाराशी सहमत आहे. "बचेन्द्री पाल हिने माऊंट एव्हरेस्टवर तिरंगा फडकाविला आणि तसे करणारी ती पहिली स्त्री ठरली. एक स्त्री असूनही गिर्यारोहणात तिने मिळविलेले यश देदीप्यमान आहे" ही बातमी वाचताना काहीच खटकणार नाही. कारण उघड आहे की, माऊंटनिअरिंग हे क्षेत्र साहसी आणि त्यामुळेच धोकादायक ['रफ, रोबस्ट्' म्हणू या] असल्याने ते नैसर्गिक नियमानुसार 'पुरुषी' मानले जात होते [मुद्दाम भूतकाळ वापरत आहे]. आणि मग अशावेळी एका स्त्री ने ते साहस यशस्वी करून दाखविल्यावर त्या संदर्भातील विदा समोर येताना बचेन्द्रीचे स्त्रीत्व बातमीत ठळकपणे समोर आले तर ते स्वीकृत मानावे कारण तिने स्त्री जगतासमोर एक आदर्श ठेवला आहे. कल्पना चावलाबद्दलही तसेच म्हणेन.

तुम्ही 'आदिवासी' स्त्री च्या प्रोबेबल यशाचा जो उल्लेख केला आहे त्यालाही अनुमती आहेच आहे. श्री.अनिकेत आमटे [बाबांचे नातू] 'लोक बिरादरी आश्रम शाळा' चालवितात. हेमलकसा आणि गडचिरोली भागातील आज जवळपास ३००+ आदिवासी मुलेमुली तिथे नेटाने* शिक्षण घेत आहेत. उद्या इथलीच एखादी मुलगी विद्येच्या प्रांगणात लखलखून उठेल आणि ती कदाचित 'निरुपमा राव' वा 'किरण बेदी' झाली तर तिच्याविषयी लिहिताना/बोलताना 'आदिवासी स्त्री असूनही ह्या मुलींने मिळविलेल्या यशाने सर्वजण भारावून गेले' अशी बातमी वाचनात आली तर तुम्हा मलाच नव्हे तर मूळधागाकर्त्या अदिती यानाही ते अजिबात खटकणार नाही. कारण त्या मुलीचे उदाहरण त्याच समाजातील रांगेत उभे असलेल्या अनेक इच्छुक मुलींसाठी आदर्शवत राहील.

[* "नेटाने" म्हणण्याचे कारणही स्पष्ट आहे. त्या भागात कोणत्यातरी निमित्ताने इथल्या कुणीही सदस्याने किमान एकदा - शक्यतो फेब्रुवारी/मार्चमध्ये - भेट दिल्यास कोणत्या परिस्थितीत त्या आदिवासींना शिक्षण देण्याचे तसेच त्या मुलांचे ज्ञानग्रहण करण्याचे कार्य चालू आहे हे उमजेल.]

अभिनंदन

स्त्री व पुरुष हे एकाच माणूस या प्राण्याचे दोन जेंडर आहेत. तेव्हा (इतर कोणत्याही प्राण्याप्रमाणे) पुनरुत्पादन आदी नैसर्गिक गोष्टी वगळता इतर कोणत्याही प्रसंगात 'माणूस' बर्‍यापैकी सारखाच असतो. (असावा)
मी ही माणसाला लिंगनिरपेक्षतेने माणसासारखे वागवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतो. प्रत्येक वेळी जमतेच असे नाही, लहानपणापासून विविध माध्यमांतून झालेल्या कंडीशनिंग मुळे अजुनही क्वचित स्त्री-पुरुष भेद विचार कृती करतेवेळी येतोच

बाकी त्रीदेवींचे पुरस्काराबद्दल अभिनंदन!

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

किंचित दुरुस्ती

स्त्री व पुरुष हे एकाच माणूस या प्राण्याचे दोन जेंडर आहेत. तेव्हा (इतर कोणत्याही प्राण्याप्रमाणे) पुनरुत्पादन आदी नैसर्गिक गोष्टी वगळता इतर कोणत्याही प्रसंगात 'माणूस' बर्‍यापैकी सारखाच असतो. (असावा)
हे अगदी शब्दशः खरे नाही. स्त्री आणि पुरुष - हे इतरही प्राण्यांत आहे, त्यामुळे नर आणि मादी म्हणूया वाटल्यास - यांच्यात काही मूलभूत फरक आहेत. हे फक्त शारीर पातळीवरच नाहीत. विचारांची पद्धत, प्राथमिकता ठरवण्याची पद्धत, एखाद्या प्रसंगाला प्रतिसाद देण्याची पद्धत यातही हा फरक असतो. हे सगळेच 'नैसर्गिक' असते असे नाही. 'बायकी' या तुच्छतादर्शक (आणि संतापजनक) शब्दाने ज्याला हिणवले जाते ते लिखाण, ते विचार पुरुषांना तापदायक वाटतात (आणि याच्या उलटेही असावे) याला 'नैसर्गिक फरक' हेच कारण असावे असे नाही.
त्यामुळे स्त्री-पुरुष समानतेची भूमिका समजावून घेताना मानसिक, बौद्धिक पातळीवर स्त्री आणि पुरुष समान आहेत असे मान्य करुनही त्यांच्यातील नैसर्गिक आणि अनैसर्गिक फरकांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. आणि जसे पुरुषांनी वागायचे तसेच स्त्रियांनी वागायचे (आणि त्याच्या उलटे) असे ठरवले तर मग त्या खुळचटपणाला अंतच राहाणार नाही. अगदी उथळ उदाहरण द्यायचे तर याला उत्तर म्हणून हे असे म्हटल्यासारखे आहे. (त्यातही दुसर्‍या चित्रातला पुरुषी खवचटपणा ध्यानात घेण्यासारखा आहे) स्त्रीपण ही एक वेगळी शक्ती आहे आणि तिची वेगळी बलस्थाने आहेत. तसेच पुरुषाचेही आहे. हे एकदा समजून घेतले की स्त्रीमुक्ती किंवा पुरुषमुक्ती असा आक्रस्ताळेपणा करण्याची गरज उरणार नाही. एखाद्या स्त्रीने 'इरेस पडलो तर बच्चमजी' या आविर्भावात धोतर नेसले, फेटा बांधला आणि उकीडवे बसून एक चरचरीत बिडी शिलगावली किंवा एखाद्या पुरुषाने 'कसेही करुन मला एकदा तरी गर्भार व्हायचेच आहे' असा लाडीक हट्ट धरला तर स्त्री आणि पुरुष हे एका पंक्तीत येतील असे मानणे हा मूर्खपणा आहे.

सन्जोप राव
दर्द मिन्नत-कशे-दवा न हुवा
मैं न अच्छा हुवा, बुरा न हुवा

अंशतः सहमत

विचारांची पद्धत, प्राथमिकता ठरवण्याची पद्धत, एखाद्या प्रसंगाला प्रतिसाद देण्याची पद्धत यातही हा फरक असतो. हे सगळेच 'नैसर्गिक' असते असे नाही.

बरीचशी सहमत आहे.
स्त्रीवादाचे बायबल समजले जाणारे 'द सेकंड सेक्स' लिहीणार्‍या सिमोन दी बोव्वारचं पुस्तक लिहीतेसमयी मत होतं, "स्त्री जन्माला येत नाही ती घडवली जाते." पुढे काही दशकांनी तिने यात भर घातली, "पुरूषही जन्माला येत नाही घडवला जातो." या संदर्भात nature का nurture हे शोधण्यासाठी अनेक प्रयोगही केले गेले आहेत.
आजच्या काळात लैंगिक आवडीवरून दोन नव्हे तर अनेक प्रकारे लिंगभेद केला जातो, स्त्री आणि पुरूष असे दोन मोठे गट आहेत, जे भिन्नलिंगी संबंध ठेवतात. समलिंगी संबंध ठेवणारे स्त्री आणि पुरूष असे आणखी दोन भेद केले जातात. इ. इ.

पण एवढा फरक वगळता बौद्धीक, मानसिक पातळीवर स्त्री-पुरूषामधे भेद का करावा? 'खुळचटपणाला अंत नसतो' हे अनेकांच्या बाबतीत अनेकदा दिसून येतंही. पण त्या सर्व खुळचटणाला 'बायकी' वा 'मेन विल ऑल्वेज बी मेन' अशी सर्वसमावेशक लेबलं लावावीत का? (माझ्या मते नाही.) अरविंद कोल्हटकर आणि अशोक पाटील या दोन ज्येष्ठांनी अलिकडे, उपक्रमावरच, वेगळ्या संदर्भात अशा प्रकारच्या सर्वसमावेशक लेबलांचा विरोध केला आहे. त्यांनी दिलेली उदाहरणं ही जात किंवा धर्माधारित आहेत; ज्या संदर्भात मोठ्या प्रमाणावर तुच्छतावाद (शॉव्हनिझम) दिसतो.

स्त्रियांचे धूम्रपान वा मद्यपान म्हणाल तर त्यासाठी इरेस पडण्याची गरजच नाही. जगात प्रचंड प्रमाणात स्त्रिया आपापली आवड म्हणून धूम्रपान आणि मद्यपान करतात. पुरूषांनी धोतर नेसणं तसं कालबाह्यच होत आहे पण स्त्रियांनी ट्राऊझर्स, शॉर्ट्स, टीशर्ट वापरणं एवढं सामान्य झालं आहे की साडी नेसण्यासाठी निमित्त शोधावं लागतं. पगडी आणि डोक्यावरचा पदर जाऊन तिथे टोप्या आल्या यात जसं नावीन्य वाटत नाही तसं आजच्या पिढीच्या कॉलेजकन्यांचे (पुत्रांचेही) समलिंगी मित्रमैत्रिणी असणंही नवीन नाही. रंगीबेरंगी आणि अंगासरशी बसणारे कपडे ही सुद्धा फक्त स्त्रियांची मक्तेदारी राहिलेली नाही. फॅब-इंडीयासारख्या (उच्चभ्रू) दुकानांत एकाच ताग्यातले स्त्रिया आणि पुरूषांचेही कुडते, शॉर्ट-टॉप्स बनवलेले दिसतात. चेहरा, त्वचा आणि फिगरची काळजी आजकाल पुरूषही घेतात. धोतर-टोपीप्रमाणेच दाढी-मिशाही कालबाह्य होत/झाल्या आहेत. नैसर्गिकरित्या त्या घालवता येत नाहीत तर निरनिराळे शेव्हींग क्रीम्स, रेझर्स यांच्या जाहिराती आणि एकंदरच उत्पादनांचा उद्देश काय असतो? आजच्या पुरूषांना स्त्रियांसारखाच तुकतुकीत चेहेरा हवा आहे; यासाठी ही उत्पादनं बनवली जातात. पुरूषही स्त्रियांशी स्पर्धा करण्यात मागे नाहीतच.
आणि हे सर्व ज्यांना दिसत आणि/किंवा समजत नाही त्या सर्वांची गाडी चुकलेली असावी.

पुरूषाने गर्भधारणा करून घेण्याचा "लाडीक" हट्ट करण्याची तुलना मी फक्त नैसर्गिकतः उजव्या माणसाला निष्कारण डावरा बनवणे, समलैंगिकाला भिन्नलिंगी संबंध ठेवण्यास उद्युक्त करणे अशा बिनबुडाच्या बावळट हट्टांशी करू शकते.

असहमत

यांच्यात काही मूलभूत फरक आहेत. हे फक्त शारीर पातळीवरच नाहीत. विचारांची पद्धत, प्राथमिकता ठरवण्याची पद्धत, एखाद्या प्रसंगाला प्रतिसाद देण्याची पद्धत यातही हा फरक असतो.

असहमत आहे. वर दिलेल्या गोष्टीत मुलतः 'नैसर्गिक' फरक असेल का? की अश्या प्रकारचे वागणे हे नकळत झालेले कंडीशनिंग असते?
म्हणजे समजा एखाद्या स्त्रीला (किंवा पुरुषाला) इतर स्त्रिया (किंवा पुरुष) कसे वागतात याचे दर्शन लहानपणापासून घडवलेच नाही तर ती व्यक्ती तशीच वागेल का? स्त्रीला जन्मल्यापासून केवळ पुरुषांच्या सहवासात ठेवले तरीहि तिची विचारांची पद्धत, प्राथमिकता ठरवण्याची पद्धत, एखाद्या प्रसंगाला प्रतिसाद देण्याची पद्धत तीच राहिल का? माझ्या मते नाही

असो. फार उशीरा प्रतिसाद देतोय. तो वाचला जाईल का हेही माहीत नाहि तेव्हा आता इथेच थांबतो..

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

 
^ वर