उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
भाषासंचालनालयाची प्रकाशने महाजालावर उपलब्ध झाली आहेत
सुशान्त
October 5, 2011 - 8:37 am
महाराष्ट्र-शासनाच्या भाषासंचालनालयाने तयार केले विविध प्रकारचे पारिभाषिक-शब्द-संग्रह (शब्दकोश, शब्दावल्या इ.) खाली दिलेल्या दुव्यावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध झाले आहेत. त्याचप्रमाणे भाषासंचालयाने प्रकाशित केलेली इतर प्रकाशने (उदा. शुद्ध-लेखन-नियमावली) हीसुद्धा खालील दुव्यावर पाहता येतील, वाचता येतील तसेच उतरवूनही घेता येतील
http://www.gms.maharashtra.gov.in/bhasha/
दुवे:
Comments
उत्तम आणि उपयुक्त
उत्तम आणि उपयुक्त दुवा आहे. मनोगतावरील पारिभाषिक शब्दांचा शोध हा शोधही मला आवडतो.
आभार !
प्रियाली ह्यांनी मनोगतावरील अतिशय उपयुक्त दुव्याची माहिती दिली त्याबद्दल त्यांचे आभार! शब्द शोधण्याच्या दृष्टीने हा दुवा खरोखरंच उपयुक्त वाटला.
एक त्रुटी
मला मनोगताचा हा दुवा चित्तरंजन यांनी दिला होता तेव्हा आभार त्यांचे आणि अर्थातच मनोगतकार वेलणकरांचे. :-)
मात्र तेथे एक त्रुटी आहे, ती अशी की ४ आणि त्याहून कमी अक्षरांचे शब्द मनोगतावर शोधता येत नाहीत. त्यासाही भाषासंचनालयाचे शब्दकोशच वापरावे लागतील.
धन्यवाद!
सुशांत, आपण दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहे.
तसेच प्रियाली यांनी माहितीदिल्यावर दोनही शब्दशोधांमध्ये तुलना केल्यानंतर मनोगतावरील 'पारिभाशिक शब्दशोध' वापरण्यास जास्त सोईचा आहे हे ही कळले. त्यासोबत, त्यात प्रशासनात वापरात येणार्या शब्दांव्यतिरीक्त इतर शब्दकोश देखील समाविश्ट आहेत. मनोगत चालकांचे त्याबद्दल आभार!
वा
भाषा संचालनालयाचे संकेतस्थळ उघडले नाही. पण पुन्हा बघायला पाहिजे.
प्रियाली यांनी दिलेला मनोगताचा दुवा अतिशय उप्युक्त आहे.
दुवा उघडत नाही
http://www.gms.maharashtra.gov.in/bhasha/ हा दुवा उघडता आला नाही.
इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ
धन्यवाद
भाषासंचलनालयाने आपले संकेत स्थळ सुरु केल्याबद्दल धन्यवाद. मला हे संकेतस्थळ उघडताना त्रास झाला नाही आणि पुस्तकेही बघता आली.
पुस्तके अजून स्कॅन्ड स्वरुपात आहेत. पण स्कॅनिंग चांगले झाले आहे. एकत्रित उतरवून घ्यायची सोय दिसत नाही. भाषा संचलनालयाने हे केल्यास बरीच सोय होईल. संकेतस्थळ देखणे असले तरी त्यातील डाव्या रकान्यातील माहिती रुक्ष आहे.
मनोगतवरील परिभाषा कोश पाहिला. कित्येक शब्दांना योग्य मराठी शब्द मिळत गेल्याचे आढळले. हा एकत्रित परिभाषा कोश हा मराठी लेखकांसाठी अतिशय फायद्याचा होणार आहे असे दिसते.
एकीकडे मनोगत सारख्या संकेतस्थळाने घेतलेली महत्वाची पाउले दिसतात. (शुद्धलेखन मदत, परिभाषाकोश, मोल्सवर्थचा शब्दकोश, शंतनु यांचे शुद्धलेखनाची उपकरणे). या उलट आयआयटीच्या शाब्दबंधची स्थिती म्हणावी तशी चांगली नाही. भाषासंचलनालय व शासनाच्या अन्य विभाग अशी पाऊले उचलताना दिसत नाही. या विभागांची संगणकीय/जालीय मराठी बद्दल उदासीनता दिसते.
भाषासंचलनालयाने हे महत्वाचे पाऊल टाकले याबद्दल त्यांचे आभार. सुशांत यांचे ही माहिती उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार.
प्रमोद