कॅनडीअन रॉकीज!

कॅनडीअन रॉकीज!
कॅनडीअन रॉकीज!

नुकतेच कॅनडातल्या रॉकीज पर्वत रांगांमधे चढाईचा योग आला. ३०/४० किलोमीटरची पायपीट करून कंबरडं मोडलं पण आजुबाजूचा निसर्गच असा भन्नट होता की सगळं पार विसरुन गेलो! :)

चित्रात मध्यभागी दिसतोय तो "स्कोकी" नावाचा डोंगर (आमचा मुक्काम त्याच्या पायथ्याशी होता). पिवळी झाडं, शरदाची साक्ष देणारी, "लार्च" नावाची झाडं. दिसताना ती 'पाईन' सारखीच दिसतात पण पाईन रंग बदलायच्या भानगडीत पडत नाहीत. त्यामुळे शरद ऋतुत ह्यांच्यातला फरक पटकन दिसून येतो. (आपल्याकडच्या कावळ्या आणि कोकीळेसारखं)

(जाहिरातः ह्या ट्रिपची अधिक छायाचित्रं आमच्या गुगल अधिकवर! )

तांत्रिकः
कॅमेरा : कॅनन ३५०डी
लेन्स : १८-५५ मिमि (१८ मिमी)
एक्स्पोजर : ०.००३ से.
रन्ध्र : फ/८
ISO : २००

लेखनविषय: दुवे:

Comments

भन्नाट !

फोटो फारच सही आला आहे. आजुन् बर्फ नाही का पडायला सुर्वात झाली तिकडे.

---------------------
-धनंजय कुलकर्णी

धन्यवाद

धन्यवाद!
नाही अजुन बर्फ नाही पडले. शेवटचे काही सुखाचे दिवस उरलेत, मग आहेच 'नेमेचि येतो मग बर्फाळा!' :)

-भालचंद्र

आवडला

पाण्याचा निळा रंग नंतर अधिक गडद केला आहे की तो तसाच होता?
बाकी फोटो आवडला

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

फार नाही

फक्त पाण्याचा रंग बदललेला नाही. माझा कॅमेरा फोटो घेताना जरा सौम्य रंगात घेतो त्यामुळे ते जरा गडद करावे लागतात. हा फोटो पण जरा गडद केला आहे पण निवडक रंगांसाठी मुद्दाम गडदपणा आणलेला नाही.

-भालचंद्र

फोटो आवडला.

मला मधले पाणी अजून् जास्त आणि बाजूचे पर्वत कमी असे असते तर जास्त आवडले असते. आकाशात किंचितसा ग्लेअर वाटतो आहे, पोलराईजिंग फिल्टर वापरून् पाहिले आहे काय्?

-Nile

नाही

हममम् ग्लेअर आहे खर पण ह्या फोटोच्यावेळी मी कोणताच फिल्टर वापरुन नाही पाहिला. इतर ठिकाणी वापरला होता.

-भालचंद्र

उत्तम

फोटो आवडला. कॅनडियन रॉकीज पाहून यायचा बेत अजून पक्का झाला :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

म्म्म्

म्म्म्

विचारपूर्ण प्रतिसाद शब्दबद्ध करायचा पुष्कळ प्रयत्न केला आणि प्रयत्न फसला. पाणी असून रखरखीत असे चित्र आहे. अंतर्गत विरोध आणि त्यामुळे येणारा तणाव आवडायला हवा होता. पण मला प्रयत्न करूनही आवडत नाही. सकारात्मक असे काही सांगू शकत नाही. क्षमस्व.

:)

:) .. काहीच हरकत नाही!

-भालचंद्र!

आवडला

फोटो रेखीव आला आहे. फक्त एका बाजुला थोडा कललेला आहे असे वाटते. तेवढा ठीक केल्यास बाकी ऍस्थेटिक्स छानंच!
माझ्या मॉनीटरवर मला ग्लेअर जाणवला नाही.

 
^ वर