मराठा डिच, भास्कर राम इत्यादि.

कालपरवाच उत्तर मराठेशाही संदर्भातील धाग्यामध्ये असलेला कलकत्त्यामधील ’मराठा डिच’ चा उल्लेख आणि काही दिवसांपूर्वी योगप्रभूंनी केलेली सूचना ह्यांच्या अनुषंगाने भास्कर राम कोल्हटकर (भास्कर पंडित), नागपूरकर भोसल्यांच्या ओरिसा-बंगालमधील मोहिमा आणि संबंधित बाबींबद्दल पुढील मजकूर लिहीत आहे. ही माहिती प्रामुख्याने १९३६ मध्ये छापलेल्या कै. बाळकृष्ण श्रीधर कोल्हटकरसंपादित कोल्हटकर-कुल-वृत्त ह्या पुस्तकावरून घेण्यात आली आहे. जालावर उपलब्ध असलेली अन्य माहितीहि आवश्यक तितकी येथे आणली आहे. मीहि सध्या यथाशक्ति-यथामति हाच कुलवृत्तांत जालाधारित असा अद्ययावत करण्याचा उपक्रम चालवत असून माझ्या http://kolhatkar.org ह्या संकेतस्थानावर हे पुस्तक सुटया पानांच्या मार्गाने उपलब्ध आहे. त्यासाठी http://kolhatkar.org/book.htm येथे जाऊन पृष्ठे १४६-१६१ पाहावीत. (पूर्ण पुस्तक http://www.archive.org/details/KolhatkarKulaVrittanta_238 येथे मिळेल.)

भास्करराम (बंगाली संस्कृतीत भास्कर पंडित) आणि कोन्हेरराम कोल्हटकर ही नावे १७४०च्या दशकात नागपूरकर भोसल्यांनी चौथाई आणि सरदेशमुखी गोळा करण्यासाठी ओरिसा-बंगाल प्रदेशात ज्या मोहिमा काढल्या त्या संदर्भात वाचायला मिळतात. वडील रामाजीपंत म्हणून हे अनुक्रमे भास्कर राम आणि कोन्हेर राम हे त्यांचे दोन मुलगे. असे हे दोघे कोल्हटकर बंधु रघूजी भोसले ह्यांच्या सेवेत होते. रामाजीपंत हे मूळचे कोकणातले आणि रघूजीचे वडील बिंबाजी हेहि तेथीलच. रामाजीपंत कोकणाशिवाय वाईजवळ पांडववाडी येथेहि राहात असत. त्यामुळे ह्या शाखेला कोल्हटकर कुलवृत्तात ’पांडववाडी शाखा’ असे नाव पडले आहे. इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ
शाहू छत्रपतींच्या काळात रामाजीपंत हे एक कर्तबगार व्यक्ति आणि रामभक्त सत्पुरुष म्हणून ओळखले जात. हबशांशी संघर्ष आला असता रामाजीपंतांनी परसोजी आणि अन्य भोसल्यांना मदत केली. त्या कुटुंबातील रघूजीला नंतर जेव्हा सेनासाहेब सुभा हे पद आणि नागपूर हे स्थान मिळाले तेव्हा रामाजीपंतांचे दोन मुलगे भास्कर राम आणि कोन्हेर राम ह्यांचाहि रघूजीबरोबर उदय आणि नागपूरच्या कामांमध्ये भरभराट झाली. १७४२ पासून बंगालमधील रघूजीच्या सैन्याचे प्रमुखपद भास्कर रामकडे होते आणि त्या कामात त्याने १७४२ ते १७४४ ह्या वर्षात त्याने बंगालच्या तीन मोहिमा केल्या. बंगालच्या अंतर्गत भांडणामध्ये एका पक्षाने निमंत्रण दिल्यावरून नागपूरकर भोसले बंगालमध्ये शिरले होते. नानासाहेब पेशव्यालाहि बादशाहाकडून बंगालच्या चौथाई-सरदेशमुखीची सनद मिळालेली असल्याने पेशवे आणि रघूजी ह्यामच्यामध्ये थोडे वितुष्ट निर्माण झाले होते. १७४४ साली नागपूरकरांच्या विरोधातील अलिवर्दीखानाने भास्कर रामास वाटाघाटीसाठी बोलावले आणि तंबूचे दोर कापून भास्कर राम आणि बरोबरचे २१ सरदार अशा लोकांना तलवारींनी कत्तल करून दग्याने मारून टाकले. ह्या सर्व बाबींचे अधिक तपशील वर दिलेल्या संदर्भात पाहावयास मिळतील. (थोडे अवांतर: शेजवलकरांच्या एका लिखाणात, बहुतेककरून रियासतीच्या नानासाहेब पेशवा भागाच्या परीक्षणात, असे वाचल्याचे आठवते की वरकरणी मामुली वाटणारी ही दोन मराठा पक्षांमधली चुरस त्या काळात इंग्रजांच्या पथ्यावर पडली आणि प्रथम बंगालमध्ये आणि नंतर हिंदुस्तानात सत्ता काबीज करणे त्यांना जमू शकले. अशा अर्थाने ही चुरस जागतिक राजकारणावर मोठा प्रभाव टाकणारी ठरली.

ह्याखेरीज At http://bardhaman.nic.in/histandback.html येथे पुढील मजकूर वाचायला मिळतो.

"Maratha army from Nagpur under Bhaskar Pandit had entered into Bengal in 1740. At that time, Alivardi Khan was the Nawab(Governor) of Bengal-Bihar-Orissa. He set out for Orrissa to subdue Shuja-ud-din, deputy governor of Orrissa and on his return journey from Cuttack, he retreated to Barddhaman in April 1742 where the Marathas surrounded him. They cut off his supplies and driven by hunger, he had to attempt a retreat to Murshidabad via Katwa. At Nigum Sarai, fourteen miles from Katwa, a desperate rear-guard action was fought and he managed to reach Katwa. From June 1742 Katwa become the head quarter of the Maratha Army. The west of the Bhagirathi under this district thus temporarily passed into the hands of the Marathas. The Marathas committed unspeakable atrocities on the helpless population of this district. An eye-witness, Vaneshwar Vidhyalankar, the court pandit of the Maharaja of Barddhaman wrote: इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ
"Shahu Rajah's troops are niggard of pity, slayers of pregnant women and infants, of Brahmins and the poor, fierce in spirit, expert in robbing the property of every one and committing every kind of sinful act. ...". इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ
मराठा सैन्याच्या ह्या चढायांची आठवण अनेक प्रकारे बंगालमध्ये जिवंत राहिली आहे. इंग्रजहि तेव्हा कलकत्त्यामध्ये आपले बस्तान बसवत होते. त्यांच्या फोर्ट विल्यमला पश्चिमेच्या बाजूने हुगळी नदीचे संरक्षण होते पण पूर्व बाजूस तसे काहीच नैसर्गिक संरक्षण नव्हते म्हणून मराठा सैन्याच्या विरोधात तेथे एक खंदक खणण्यात आला आणि त्याला Maratha Ditch असे नाव पडले. नंतरच्या काळात हा खंदक बुजवून तेथे Lower Circular Road नावाचा रस्ता बांधण्य़ात आला, हाच आजचा आचार्य जगदीश चंद्र बसू ह्यांच्या नावाचा AJC Bose Road. पहा http://en.wikipedia.org/wiki/Maratha_Ditch आणि http://en.wikipedia.org/wiki/AJC_Bose_Road_%26_APC_Road इइइइइइइ इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ
मराठा सैन्याची सर्वसामान्य जनतेला जी धास्ती पडली होती त्यावरून बंगाली भाषेत बागुलबुवा अशा अर्थाचा ’बारगी’ असा शब्द रूढ झाला. बंगाली माता न झोपणार्‍या मुलांस बारगीची भीति दाखवीत. पुढील बंगाली कविताहि पहा:

chhele ghumalo, pada judalo bargi elo deshe
bulbulite dhan kheyechhe, khajna debo kise?
When the children fall asleep, silence sets in, the Bargis come to our lands, Bulbulis (birds) have eaten the grains, how shall I pay the rent. (http://en.wikipedia.org/wiki/Bargi)

उरिया आणि बंगाली साहित्यातहि ह्या घटनांचे प्रतिबिंब दिसते. फकिर मोहन सेनापती ह्यांची ’लछमा’ नावाची कादंबरी ह्या घटनांचा उल्लेख करते. (http://tinyurl.com/2pmw54). ’बोंगे बारगी’ (उच्चार ठीक आहे?) अशा नावाचे एक नाटक बंगाली रंगभूमीवर १९२२ साली आले होते. त्याची माहिती अशी:

"The second is a Bengali play called 'Vange Bargi' or 'Bargis in Bengal' by Nishikant Basu Ray. It was one of the successful productions of the Bengali Drama troupe called 'Monmohan Theatre'. It came out in 1922 and the well-known Bengali theatre actor Surendranath Ghose aka Dani Babu played the central role of Bhaskar Pandit. The treatment is sympathetic to Bhaskar Pandit, who is depicted as just, upright, deeply religious and noble." पहा पृष्ठ ४४८९, http://tinyurl.com/ywft94 (The Encyclopaedia Of Indian Literature, Volume Five (Sasay To Zorgot) येथून.
)इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ
नंतरच्या काळात भास्कररामचा भाऊ कोन्हेरराम आणि त्याचा मुलगा बाबूराव ह्यांचेहि अनेक उल्लेख नागपूर आणि सातारा राजकारणात मिळतात. भास्कररामाच्या नागपूरातील कुटुंबाचे पुढे काय झाले ह्याबाबत एक संशोधननिबंध मला उपलब्ध झाला तो येथे वाचता येईल: http://kolhatkar.org/Special%20Articles/bhaskar_konher.pdf इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ
कोल्हटकर कुटुंबाच्या ह्या शाखेला पांडववाडी शाखा असे म्हणतात ह्याचा उल्लेख वर आला आहेच. ह्या शाखेचे आज पांडववाडीला काय उरले आहे हे जाणण्यासाठी मी एकदा वाईजवळ त्या गावी गेलो होतो. तेथील उर्वरित गोष्टी आणि कौटुंबिक संबंध ह्यांचे वर्णन करणारा मी लिहिलेला छायाचित्रांसहित एक लेख http://kolhatkar.org/Special%20Articles/pandavwadi_story.pdf येथे आहे. ह्या कुटुंबाच्या संबंधित माहिती बरोबरच २००-२५० वर्षात अशा प्रतिष्ठित घराण्यांचे नंतर काय झाले ह्याचेहि दर्शन हा लेख आणि वरचा संशोधननिबंध वाचून मिळते.
इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ
इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ
इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ
इइइइइइइइ इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ
इइइइइ
इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ
इइइइइइइइइइइइइइ इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ
इइइइइइइइइइइइइइइइइ
इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ
इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ
इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ
इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ
इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ
इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ
इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ

लेखनविषय: दुवे:

Comments

लेख आवडला.

माझी शंका:- नागपूरकर भोसल्यांचा उदय नक्की केव्हा झाला? कारण् १७०७ पर्यंतच्या उल्लेखात तर मुघलांनी काबीज केलेल्या मध्य भारताचाच उल्लेख आहे. तिथल्या गोंडवनी राजाला हरवून मुघलांनी तो विभाग ताब्यात् घेतला असे वाचले आहे.(बहुतेक ,बाबासाहेब् पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती ह्यामध्ये)
हे बंगालचे वितुष्ट मध्ये येण्यापूर्वी त्यांचे संबंध कसे होते? ते शिवाजींच्या भोसले कुळाशीच संबंधित किंवा भावकीत होते का?
(सावंतवाडीचे सावंत हे भावकीतलेच होते, मूळचे भोसले, जे पुधे मुधोळच्या लढाईत शिवाजींकडून ठार झाले. तसे काही आहे का?)
ते पेशव्यांशी त्यांचे भांडण् सुरु असता शाहूची भूमिका काय होती? लढाईस त्याने उत्तेजन् दिले का?

--मनोबा

कोल्हटकर कुलवृत्त

उपरिनिर्दिष्ट कोल्हटकर कुलवृत्तातील वंशावळी कोणास पाहायच्या असल्यास Internet Explorer Browser चा वापर करावा.

लेख आवडला

शेजवलकरांच्या लेखसंग्रहामध्ये "ओढ्या प्रांतातील राजकारण" असा एक प्रदीर्घ लेख आहे. त्यात आपण लिहिलेल्या घटनांचे वर्णन आहे. शाहूने बंगाल प्रांत नागपूरकर भोसल्यांना दिल्यावरही नानासाहेब पेशवा तिथे गेला. तो तिथे गेल्याचे पाहून रघूजी पण बंगालात पोचला. या दोघांच्या वितुष्टामुळे इतरांनी योग्य तो धडा घेतला. वास्तविक पेशव्याला "हिंदू तितका मेळवावा" हे धोरण ठेवून राजपुताना रजपूत - जाटांच्या, बंगाल - ओढ्या हे प्रांत नागपूरकर भोसल्याच्या, कर्नाटक वगैरे दक्षिणेकडचे सुभे ताराबाईकडच्या लोकांच्या ताब्यात राहू दिले असते तर बिघडले नसते. पण त्याने मोगल सोडा, इतर मुसलमान राजांशी जितक्या लढाया केल्या नसतील तितक्या वर दिलेल्या लोकांशी केल्या. यामुळेच पेशव्याविरुद्ध हिंदू राजांमध्ये नाराजी पसरली आणि पानिपतावर भाऊच्या मदतीला कोणी आले नाही. दुसरीकडे नानासाहेबाने अदूरदर्शीपणाने रॉबर्ट क्लाईव्हची मदत घेऊन तुळाची आंग्र्यांचे आरमार मोडले, तसेच क्लाईव्ह सिराजुद्दौल्याला पराभूत करून बंगाल घशात घालत असताना स्वस्थ बसला.

अंताजीची बखर

अंताजीची बखर (ले. नंदा खरे) या कादंबरीत नागपूरकर भोसले यांची बंगाल स्वारी, पेशवे आणि प्लासीच्या लढाईचे वर्णन आहे.
हल्लीच या कादंबरीचे पुढचे पर्व म्हणून 'बखर अंतेकाळाची' कादंबरी प्रसिद्ध झाली आहे. त्याचे परिक्षण चिं.जं. नी येथे केले आहे.

प्रमोद

योगायोग

पूजेच्या सुटीत वाचण्यासाठी मी दोन्ही कादंबर्‍या मागवल्या - कालच आल्या! (फ्लिपकार्ट.कॉम जिंदाबाद) चिंतातुर जंतूंचे उत्तम परीक्षण वाचल्यावर कधी एकदा वाचायला घेईन असे झालेय.

बोर्गी

chhele ghumalo, pada judalo bargi elo deshe
bulbulite dhan kheyechhe, khajna debo kise?

Bargi शब्दाचा "बोर्गी" उच्चार होतो. मला सासरकडच्यांकडून "बोर्गी एलो देशे" नेहमी ऐकावयास मिळते!

कोल्हटकर कुलवृत्तांत जालावर टाकल्याबद्दल घन्यवाद. १८व्या शतकात नोकरी/स्वारी साठी चौफेर झालेल्या स्थलांतरात मला विशेष इंटरेस्ट आहे - नागपूरकर भोसल्यांच्या सेवेत असलेल्या कोल्हटकरांबद्दल पुस्तकात अधिक वाचेन.

बार्गी म्हणजे बारगीर

बार्गी हा शब्द बारगीर या शब्दावरुन आल्याचे वाचले होते.
मराठ्यांच्या घोडदळात दोन प्रकारचे स्वार असत. ज्यांना सरकारातून घोडा आणि हत्यार दिले जात असे त्यांना शिलेदार म्हणत, तर ज्यांच्याकडे स्वतःचा घोडा व हत्यारे असत त्यांना बारगीर म्हणत असत. बारगीरांना जनावराच्या दाण्यापाण्यासाठी व हत्यारांच्या देखभालीसाठी सरकारातून खर्च मिळे. त्यांनी कायमस्वरुपी तैनात राहण्याचीही गरज नसे. युद्धप्रसंग आल्यावर घोडे व शस्त्र घेऊन हजर राहण्याचे बंधन असे. एकप्रकारे बारगीर म्हणजे व्यावसायिक घोडेस्वारांचे दळ होते.

बारगी शब्दाचा बंगालीत बोरगी असण्यामागे बंगाली उच्चार (सरळ शब्दही ओठांचा चंबू करुन गोल उच्चारणे जसे- चालबे -चॉलबे, आमी-ऑमी, कलकत्ता -कोलकाटा इ.) कारण.

अरविंदराव कोल्हटकरांनी विनंतीला मान दिल्याबद्दल त्यांचे आभार.

अवांतर - मराठ्यांच्या उत्तरेतील वारंवार खंडण्यासाठी व चौथाई वसुलीसाठीच्या स्वार्‍यांमुळे राजस्थानमध्ये एक जळजळीत काव्यपंक्ती म्हटली जात असे ज्यात खटमल (ढेकूण), पिसू आणि मराठा हे परस्परांचे भाऊ आहेत कारण रक्त शोषण्यात ते एकमेकांना हार जात नाहीत, असे म्हटले आहे. बंगाली स्त्रिया मुलांना मराठी बारगीची भीती दाखवत यावरुन शोलेमधल्या प्रसिद्ध संवादाची आठवण आली.

बारगीर

"बार्गी हा शब्द बारगीर या शब्दावरुन आल्याचे वाचले होते."

~ बार्गी शब्दाचा अर्थ वा जी काही व्युत्पत्ती असायची ती असो, पण श्री.योगप्रभू म्हणतात तसा तो 'बारगीर' वरून आला असेल असे वाटत नाही. तसेच त्यानी बारगीरची जी व्याख्या केली आहे तीही तशी नसावी. 'बारगीर' हा एक प्रकारे घोड्याच्या सेवेसाठी - उदा.खरारा करणे, तबेला स्वच्छ ठेवणे, दाणापाणी, दुखलेखुपले असेल तर त्याबाबतची योग्य ती तजवीज करणे आदी कामासाठी घोडदळ प्रमुखाने ['पागनीस' असेही म्हणत] नियुक्त केलेला नोकर. ज्याला इंग्लिशमध्ये 'साईस' असे संबोधले जाते.

बारगीरकडे शस्त्र नसते. घोडा असतो, पण तो खात्याचा, त्याचा स्वतःचा नव्हे. लढायांदरम्यान 'बारगीर' घोडदळासमवेत जात हे खरे असले तरी त्यांची गणना 'बाजारबुणग्या'तच होत असे.

बारगीर-बोर्गी

मराठ्यांच्या घोडदळात दोन प्रकारचे स्वार असत. ज्यांना सरकारातून घोडा आणि हत्यार दिले जात असे त्यांना शिलेदार म्हणत, तर ज्यांच्याकडे स्वतःचा घोडा व हत्यारे असत त्यांना बारगीर म्हणत असत. बारगीरांना जनावराच्या दाण्यापाण्यासाठी व हत्यारांच्या देखभालीसाठी सरकारातून खर्च मिळे. त्यांनी कायमस्वरुपी तैनात राहण्याचीही गरज नसे. युद्धप्रसंग आल्यावर घोडे व शस्त्र घेऊन हजर राहण्याचे बंधन असे. एकप्रकारे बारगीर म्हणजे व्यावसायिक घोडेस्वारांचे दळ होते.

तुम्ही कदाचित चुकून उलट व्याख्या दिल्या.

शिलेदार - स्वतःचा घोडा व हत्यारे बाळगणारा
बारगीर - ज्याला घोडा-हत्यारे दिली जात (शिलेदाराकडून, किंवा राजाकडून)

ग्रँट डफ; मोल्स्वर्थ; आणि अलिकडचा लष्करी इतिहासकार.

बारगीर या फारसी शब्दाचा मूळ अर्थ "ओझे उचलणारा" असे काही आहे. दखनी भाषेच्या लष्करी शब्दभांडारात "बार्गी-गिरी" म्हणजे गनिमी काव्याचाच एक प्रकार झाला असे दिसते. बंगालात झालेल्या मराठ्यांच्या स्वार्‍यांनंतर तो शब्द बारगीर - बारगी - बर्गी - बोर्गी (बंगाली उच्चार) झालेला दिसतो. अर्थात भोसल्यांचे सगळे घोडेस्वार बारगीर नसावेत, पण स्वार्‍यांच्या शैलीमुळे नाव तसे पडले असावे.

बंगालीत बोर्गीचा प्रथम लिखित उल्लेख गंगाराम नावाच्या कवीने १७५१ च्या आसपास लिहीलेल्या "महाराष्टपुराण" काव्यात आहे - मराठ्यांच्या स्वार्‍यांनी पश्चिम बंगाल इलाख्यात केलेल्या धुमाकुळाचे तत्कालीन वर्णन आहे. १९०४ चार साली हे हस्तलिखित उपलब्ध होऊन छापले गेले. तेथूनच ते अंगाई गीत बाकी साहित्यात आले आहे. (काव्याचा इंग्रजी अनुवाद आहे.)

शोलेच्या आठवणीबद्दल +१!

क्षमस्व! जरा उलटसुलट झाले...

रोचना आणि पाटीलसाहेब,
शिलेदार व बारगीर यांच्या अर्थात उलटसुलट झाले. चू,भू.दे.घे.

शिलेदार - स्वतःचा घोडा व हत्यारे बाळगणारा
बारगीर - ज्याला घोडा-हत्यारे दिली जात (शिलेदाराकडून, किंवा राजाकडून)

हे बरोबर आहे. 'शिवकालीन महाराष्ट्र' या डॉ. अ. रा. कुलकर्णी यांच्या पुस्तकात 'बारगीर म्हणजे ज्याला घोडा व हत्यारे सरकार पुरवत असे तो राऊत, असा उल्लेख आहे. घोडदळात बारगीर हे सर्वात तळाचे पद होते. सरनोबत (वार्षिक ४००० ते ५००० होन पगार) हे सर्वोच्च पद, त्यानंतर पंचहजारी, हजारी, जुमलेदार, हवालदार व बारगीर असा क्रम होता. बारगीराला वार्षिक पगार ९ होन असे. ज्याअर्थी बारगीराला राऊत (सैनिक) म्हटले आहे आणि वार्षिक पगार दिला आहे त्याअर्थी तो घोड्यांना खरारा करणारे, बाजारबुणगे यांच्या गटातील नसून लढाऊ सैनिक आहे. अधिकार्‍यांना मुजुमदार, कारभारी, जमेनीस असे सहाय्यक दिले जात. २५ राऊतांमागे एक पखालजी व एक नालबंद हे सेवक असत. शिवाय प्रमुख लष्करी अधिकार्‍यांना कारकून, हेर, हरकारे असे नोकर असत. शिलेदार हे पागा सरनोबताच्या हाताखाली काम करत. त्यांची संघटनाही राऊतांच्या संघटनेप्रमाणे असावी, असे कुलकर्णी यांनी नमूद केले आहे.

खरारा आणि दाणापाणी

योगप्रभू ~

डॉ.अ.रा.कुलकर्णी यांच्या माहितीच्या पुष्ठयर्थ 'बारगीर' च्या त्या सम व्याख्या अन्यत्रही आहेत. पण सरनोबत, हवालदार, शिलेदार ह्या जशा 'प्रमोशनल' पोस्ट्स वाटतात त्याप्रमाणे 'बारगीर' नाही. खुद्द तुम्ही दिलेल्या तक्त्यात त्याची जागा त्या रांगेत शेवटची दिसत्ये हे स्पष्टच आहे. युद्धाच्यावेळी भले ते घोड्यावर बसून सैनिकासमवेत जात असतील. पण 'सिव्हिल' मध्ये परतल्यावर 'पीस पीरिअड' काळात त्याना तबेल्यातच काम करावे लागे. मग त्या कामाच्या व्याख्येत घोड्यास खरारा+दाणापाणी या बाबी येणे ओघानेच आले.

'बारगीर' हे पद उत्तर भारतातील विविध सत्तेत होतेच त्यामुळे कुतूहलाने 'हिंदी शब्दकोशा' त्याची काय व्याख्या केली गेली आहे ते पाहिले तर खालील अर्थ सापडला :

शब्द का अर्थ खोजें
"बारगीर :: वि० [फा०] बोझ ढोनेवाला। भारवाहक। पुं० १. घोड़ों के लिए घास चारा काटकर लाने और सईस की सहायता करनेवाला घसियारा।
२. मध्ययुग में वह सिपाही या सैनिक जो किसी राजा या सरदार के घोड़े पर चढ़कर युद्ध आदि करता था।"

~ दुसर्‍या क्रमांकावर त्याचे काम 'सैनिका'चे आहे हे तिथे मान्य आहे; पण अंगावरील तो गणवेष उतरला की पहिलेच काम त्याला करावे लागत असणार.

बार आणि भार

पटण्यासारखे आहे. हे माहीत नव्हते. बारगीर हा पगारी सैनिक, सरकारी घोडा आणि हत्यार वापरणारा, आणि शिलेदार हा त्याहून प्रतिष्ठीत, स्वतःचे घोडे आणि हत्यार असणारा, केवळ मोहीम असेल तेंव्हाच सैन्यात जाणारा, इतर वेळी पाटीलकी करत हिंडणारा अशा आशयाचा उल्लेख तिसरीच्या इतिहासाच्या धड्यात शिवकालीन राज्याच्या वर्णनात वाचलेला आठवत होता. पण बार आणि भार यातले साम्य आजच लक्षात आले.

माहितीत तफावत पडतेय...

पाटीलसाहेब,
आपल्या दोघांकडील माहितीत किंचित तफावत पडतीय. असो. या शब्दच्छलामुळे मूळ विषयापासून आपण भरकटत नको जाऊया.

तुम्ही प्रतिसादात म्हणताय
बारगीरकडे शस्त्र नसते. घोडा असतो, पण तो खात्याचा, त्याचा स्वतःचा नव्हे. लढायांदरम्यान 'बारगीर' घोडदळासमवेत जात हे खरे असले तरी त्यांची गणना 'बाजारबुणग्या'तच होत असे.

माझ्याकडील पुस्तकात उल्लेख आहे त्याप्रमाणे 'बारगीर म्हणजे ज्याला घोडा व हत्यारे सरकार पुरवत असे तो राऊत.' (राऊत म्हणजे सामान्य सैनिक. हे पद पायदळ व घोडदळात एकच होते. घोडेस्वार राऊताला बारगीर म्हणत)
मला वाटते, की आपल्या दोघांचा काळाचा घोटाळा होत असू शकेल. शिवाजी महाराजांच्या वेळी सैन्यात बाजारबुणगे, पेंढारी असे बिनलष्करी लोक नव्हते. ते नंतर पेशवाईच्या काळात आले. शिवकाळात मोहिमेवर बारगीर आणि शिलेदार या दोघांनाही आपल्याकडील घोडे आणि हत्यार यांची देखभाल स्वतः करावी लागत असे. दिवसभरच्या दौडीनंतर तळावर घोडे बांधणे, खोगीर उतरवणे, घोड्याला दाणापाणी करणे, खरारा करणे, चूल पेटवून स्वतःची भाकरी भाजणे ही कामे या राऊतालाच करावी लागत. २५ राऊतांच्या पथकामागे एक पखालजी (पाणी पुरवणारा) व एक नालबंद (नाल ठोकणारा) असे दोनच सेवक पुरवले जात. युद्धातील हाणामारीचे व लुटीचे काम याच राऊतांना करावे लागे. ही लूट घोड्यावर लादून तळावर आणली जात असे. महाराजांच्या उपस्थितीत तिचे वर्गीकरण केले जात असे. पुन्हा त्यातील अत्यंत बेशकिमती ऐवज (जडजवाहीर व सोने) बंदोबस्तात रवाना होई. भरजरी कापडचोपड, तंबू, शमियाने बैलांच्या पाठीवर अथवा गाड्यांत लादले जाई. (ती वाहतूक लमाणांचे तांडे सांभाळत) महाराजांच्या सैन्यात हत्ती व उंट होते, पण परमुलखात जाताना सर्व मदार घोडदळावर असे आणि प्रत्येक माणूस लढाऊ सैनिक असे.

विश्रांतीच्या काळात पागा ठाणबंद झाल्यावर घोड्यांचा खरारा करण्यासाठी स्वतंत्र हरकामे असत. घोड्यांना औषधोपचार करणार्‍या अश्ववैद्याला 'सैस' असे मुसलमानी नाव होते. पुढे इंग्रजीत ते साईस झाल्यावर त्याचा अर्थ बदलला असणे शक्य आहे. शिवाजी महाराजांच्या घोडदळात बारगीर राऊत पागा एक लाख पाच हजार व शिलेदार पागा ४५००० असा दीड लाखाचा तपशील सभासदाने दिला आहे. आता शांततेच्या काळात हे सर्व लाखभर राऊत पागेमध्ये मदतनीस म्हणून काम करत असत, हा विचार मनोरंजक आहे. जे शिवाजीराजे स्वतःचे खासगी शरीर संरक्षक पथक केवळ २००० जणांचे ठेवत असत आणि प्रत्येक किल्ल्यावर हजारभर शिबंदी ठेवत ते पागेसाठी लाखभर राऊतांना कामाला लावतील का? त्यातून घोडी अश्वशाळेत असताना त्यांच्या देखभालीसाठी प्रत्येक घोड्यामागे एक माणूस लागत नाही. एक हरकामा ५० घोड्यांची निगराणी करु शकतो. म्हणजे शांततेच्या काळात हे राऊत बारगीर अन्य सरकारी कामे करत असतील किंवा शेतीवाडीच्या कामासाठी बहुसंख्य मनुष्यबळाला मोकळे केले जात असेल. पावसाळ्यानंतर फौज मुलूखगिरीला बाहेर पडताना राऊत कामावर हजर होत असत.

बारगीराच्या कामाचे/स्थानाचे अवमूल्यन बहुधा नंतरच्या काळात झाले असावे, असे दिसते.

पुढील काळ

श्री.योगप्रभू ~

शंकाच नाही की तुम्ही पुरविलेली माहिती लक्षवेधक आहे आणि सभासदांचा उल्लेख केला असल्यामुळे अधिकृतही....विशेषतः शिवाजीच्या काळातील ती रचना. मात्र इथे कोल्हापूर भागात [जो बराचसा 'मराठळलेला' आहे हे तुम्हीही कबूल कराल] बरेचसे टांगेवाले आणि लग्नातील वाजंत्रीवाले - बॅण्डवाले नव्हेत - सुन्द्रीवादनसम, तसेच यल्लमा, त्र्यंबोली यात्रेत नैवेद्य नेणार्‍या सुहासिनींच्या पुढे देवीचा जागर करत चर्मवाद्ये वाजवणारे - हे पूर्वाश्रमीचे 'बारगीर' म्हणजेच शासकीय दप्तरातील नोंदीप्रमाणे 'मांग' जातीचे (एस्.सी.गटातील) आहेत. अजुनही इथल्या शाळा-कॉलेजमध्ये बारगीर आडनावाची मुले सापडतात. यातील टांगा व्यवसाय करणारे बरेचसे मुसलमानही आहेत, ज्यानी पुढे इथल्या रिक्षा-व्यवसायात चांगलाच जम बसवून स्थानिक राजकारणात {कार्पोरेशन निवडणुकातून} आपल्या जमातीच्या जोरावर बर्‍यापैकी स्थानही मिळविले आहे.

थोरल्या महाराजांच्या काळातील त्यांची शिकवण आणि स्वराज्यप्राप्तीसाठी सर्वच थरातील गटांनी एकत्र येऊन एक दिलाने काम करण्याची नीतांत गरज असल्याने 'मी प्रथम सैनिक आहे, नंतर माझे अन्य काम' या न्यायानुसार अगदी प्रधान अमात्य या प्रथम क्रमांकाच्या पदापासून उतरणीनुसार बारगीरापर्यंत सर्वांना एकच न्याय असेल यात संदेह नाही. मात्र महाराजांच्या पश्चात मराठा राज्याची जी काही पुढे वाताहात झाली [त्याची कारणमीमांसा करण्याचीही आवश्यकता नाही] तीत मग साहजिकच 'क्लास ग्रेडेशन' आपसूक आले असेल असे आपण मानू या. नंतर 'त्या' हिंदी शब्दकोशात दिलेल्या अर्थानुसार कामाचेही वाटप थेट त्या त्या दर्जानुसार झाले असणार. मोल्सवर्थने 'राऊत' ची व्याख्या केली आहे ती त्याचा तसा झालेला विस्तार लक्षात घेऊनच : A horse-soldier, a trooper, a cavalier. A term applied to a man of the Máng class. इथे मोल्सवर्थ फक्त 'मांग' नामाचा उल्लेख करून थांबलेले दिसतात. पण समाजरचनेत त्या गटाशी निगडित असलेली चौकटीबद्ध कामे लक्षात घेता बारगीरांच्या उपस्थितीचे प्रयोजनही बदलत गेले.

पेशवेकाळात मूळ 'बारगीर' जे 'राऊत' नावाने ओळखले जात, त्यांचा युद्धतयारीत जो काही भाग असेल तीत 'तलवार कमी तराटे जादा' असा स्थितीदर्शक बदल होत गेल्याने पुढच्या पिढीतील 'किलिंग इन्स्टिन्क्ट' ही हळूहळू लोप पावत गेले आणि उरली ती फक्त 'मांग' समाज करीत असलेल्या कामाची जंत्री. त्यातूनही एखाद्या मल्हारराव होळकराने वा दत्ताजी शिंद्याने गरज लागली म्हणून या नव्या राऊताला तलवार घेऊन घोड्यावर बस असे फर्मावले तर तो त्याला कसाबसा तयार होई. यावरूनच 'रडतराऊत' हे संबोधन आपल्या भाषेत निर्माण झाले. रोजच्या मराठीच्या वापरातदेखील हे संबोधन 'मारूनमुटकून तयार केलेला योद्धा' यासाठी उपयोगात येऊ लागले.

"पत्र नव्हे मित्र" म.टाईम्सची एक बातमी पाहा : "राजकारणात येणारी आव्हाने नेत्याने पेलायची असतात, संकटाला सामोरे जाऊन इतरांना दिलासा द्यायचा असतो, पण हे नेतेपदाचे गुण डॉ. सिंग यांच्यात दिसत नाहीत. रडतराऊत घोड्यावर बसले, या मराठी म्हणीप्रमाणे डॉ. मनमोहन सिंग यांना काँग्रेसने पंतप्रधानपदावर बसवले आहे."
किंवा
'सकाळ' मधील एका लेखातील एक वाक्य : "प्रोऍक्‍टिव्ह' मंडळी उत्साही असतात, धडाडीची असतात, याउलट "रिऍक्‍टिव्ह' मंडळी म्हणजे कुरकुरी, रडतराऊत!"

~ कालौघात बारगीरगीरीचे जे काही रूपांतर होत गेले तीत तलवारबाजीला अत्यल्प वाव राहिला असे दिसते. या उलट 'शिलेदार' हा शिलेदारच राहिला, त्याच्याबाबत 'शामळू-शिलेदार' असे संबोधन टांकसाळीत तयार झाले नाही.

~ असो. काहीसे अवांतर जरी झाले असले तरी तुमच्या निमित्ताने मलाही दोघातिघां स्थानिकांशी याबाबत संपर्क साधण्याची संधी लाभली. त्याबद्दलही तुम्हाला धन्यवाद.

आवदला

सुंदर माहितीपूर्ण लेख.

नितिन थत्ते

एक म्हण

फुटकळ वाचनात कुठेतरी

ओरिया कपटी
तेलंगी चोर
मार मराठा हरामखोर

अशी म्हण वाचली आहे.
कुठल्या प्रदेशात रूढ असावी ही म्हण?
(मराठ्यांना का शिव्या घातल्या आहेत ते कळण्यासारखे आहे म्हणा.)

- दिगम्भा

म्हणी

मार मराठा यातील मार म्हणजे काय? महार असावे का? महार हे लढवय्ये म्हणून प्रसिद्ध होते. शिवाजी महाराजांच्या वैयक्तिक अंगरक्षक दळामध्ये महार वीरांचा भरणा असल्याचे वाचल्याचे आठवत आहे. अजूनही आर्मीत महार पलटण (रेजिमेंट) असते.

बाकी तेलंगांचे माहीत नाही. पण ओरिया कपटी असे खुद्द ओरियाच म्हणतात हे माहीत आहे! जाजपूर नावाच्या जिल्ह्यातील लोकांविषयी प्रामुख्याने असे सामान्यीकरण केले जाते. ते आज नाही, कटक प्रांताचा पहिला (ब्रिटीश) कलेक्टर (आता नाव आठवत नाहीये) यानेदेखील आपल्या अल्प कारकीर्दीत यांना बरोब्बर ओळखले होते, आणि आपल्या उत्तराधिकार्‍यांना यांच्यापासून सावध राहण्याचा सल्ला दिला होता. ही मंडळी आजही अतिरिक्त प्रमाणात कज्जेबाज असल्याचे निरीक्षण आहे.

हैदोस

माहितीपूर्ण लेख.

बनेश्वर विद्यालंकार यानी शाहू सैन्याने त्या दरम्यान केलेल्या अत्याचाराचे वर्णन मराठ्यांना अन्य इतिहासकार 'लुटारू' म्हणूनच का संबोधित याच्याशी सुसंगतच आहे. पेशवाईचे कुणी कितीही आणि कसेही कौतुक करू दे पण त्याना फक्त सातार्‍यातील 'राजा' नावासाठीच हवा होता असे दिसत्ये [खरे तर पेशव्यांना छ्त्रपती ही एक अडगळच वाटत असेल]. नाना फडणीस तर फक्त पेशव्यांनाच स्वामी मानत यातच सारे आले, त्यामुळे नागपूरकर भोसले काय, कोकणातले सावंत काय किंवा वरच्या पट्ट्यातील शिंदे-गायकवाड-होळकर काय यांचे काय झाले किंवा होईल याची त्याना पर्वा नव्हतीच.

१७४२ च्या मराठ्यांच्या अत्याचाराचे वर्णन आहे वर, पण पुढे तीच परंपरा उत्तरेकडील स्वार्‍यातही कायम राहिली असेच दिसते. १७७० मध्ये होळकरांच्या मदतीने मराठ्यांनी जाटांवर विजय मिळविला. पण जाटांवर कोणती कारवाई करायची यावर शिंदे आणि होळकर यांच्यातच धुसफूस. जाटांनी ८० लाखांची खंडणी दिली पाहिजे यावर होळकर हटून बसले, तर जाट ६५ लाखाच्यावर जाईनात. इकडे सैन्यास पैसा पुरेना म्हणून तगमग वाढल्याने अन्य सरदारांनी या रकमेस मंजुरी द्यावी आणि परतावे असा धोशा धरल्यावर मग मराठ्यांची ही मानसिकता ओळखलेल्या जाट वकिलांनी "युद्ध समाप्तीनंतर मराठ्यांनी जाट मुलुखात जो हैदोस घातला त्याबद्दलची नुकसान भरपाई म्हणून ६५ मधून २० लाख वजा केले पाहिजेत" असा पेच घातला.

म्हणजेच विद्यालंकार यानी नोंदविल्याप्रमाणे उत्तरेतही मराठ्यांनी "हैदोस" किती आणि कोणत्या प्रकारचा घातला असेल हेही अशा वाटाघाटीवरून दिसून येते.

माहितीपूर्ण लेख

माहितीपूर्ण लेख आवडला.

उत्तम् माहिती

उत्तम माहिती आणि चर्चा.

_____________________________________________________________________________________
सुतो वा सूतपुत्रोवा यो वा को वा भवाम्यहम् |
दैवायत्ते कुले जन्म मदायत्तं तु पौरूषम्॥

सूतो वा सूतपुत्रो वा... थोडे अवांतर

सातारकरांच्या प्रतिसादाखालील श्लोक असा असायला हवा:

सूतो वा सूतपुत्रो वा यो व को व भवाम्यहम्|
दैवायत्तं कुले जन्म मदायत्तं तु पौरुषम्||

भट्टनारायणाच्या वेणीसंहार ह्या नाटकातील 'कर्णाश्वत्थाम्नो: कलह:' ह्या प्रवेशातील हा श्लोक सुप्रसिद्ध आहे. द्रोणाचार्यांच्या युद्धात मारले जाण्यानंतर कौरव सैन्याच्या सेनापतिपदी कोण असावे असा कलह कर्ण आणि अश्वत्थामा ह्यांच्यामध्ये होतो. अश्वत्थामा ब्राह्मण आणि कर्ण खालच्या जातीचा सूतपुत्र (सूत = रथहाक्या/राजाचे स्तुतिस्तोत्र गाणारा भाट) ह्यावरून अश्वत्थामा कर्णास हिणवतो तेव्हा कर्णाचे हे उद्गार आहेत. ह्याचा अर्थ - मी सूत असेन वा सूतपुत्र असेन, कोणीहि असेन. माझा जन्म दैवाने प्राप्त झालेला आहे पण माझे शौर्य मी स्वतः मिळविलेले आहे.

बदलला आहे.

अवांतराबद्दल धन्यवाद.

बदलला आहे.

_____________________________________________________________________________________
सूतो वा सूतपुत्रो वा यो व को व भवाम्यहम्|
दैवायत्तं कुले जन्म मदायत्तं तु पौरुषम्||

अवांतराला अवांतर

माझीच typo प्रकारची चूक झाली आहे.

श्लोक असा पाहिजे:

सूतो वा सूतपुत्रो वा यो वा को वा भवाम्यहम्|
दैवायत्तं कुले जन्म मदायत्तं तु पौरुषम्||

बारगीर

बारगीर ह्या शब्दाचा अर्थ तर स्पष्ट आहे. बार म्हणजे ओझे. गीर गिरफ़्तनपासून आलेले आहे. संपादन करणारा, घेणारा, पकडणारा असे ह्या शब्दाचे/प्रत्ययाचे अर्थ आहेत. आलमगीर म्हणजे आलम जिंकणारा, तर दस्तगीर म्हणजे मदत करणारा. मराठ्यांच्या संदर्भात बरगी हा शब्दही अस्तित्त्वात आहे असे कळते. बरगीचा अर्थ तूर्तास स्पष्ट झालेला नाही.

पटता तो टेक. नहीं तो रामटेक.

+१

अर्थ अगदी स्पष्ट, कळण्याजोगा आहे.
- दिगम्भा

मराठे आणि बंगालच्या स्वार्‍या

उत्तम लेख. प्लासीच्या लढाईआधीच्या काळातील बंगालच्या राजकीय इतिहासासाठी নবাবি আমলে মুর্শিদাবাদ अर्थात "नवाबी अंमलाखालील मुर्शिदाबाद" हे सुशील चौधुरी यांचे बंगाली पुस्तक उत्तम आहे. त्यात ते म्हणतात की मराठ्यांनी जी लुटालूट केली, तिचे वर्णन अगदी सर जदुनाथ सरकारांपासून सर्व बंगाली इतिहासकारांनी अतिरंजितपणे केलेले आहे. मराठ्यांनी साधारण १७५०-५१ ला मुर्शिदाबाद लुटले, तेव्हा एकट्या जगत्शेठच्याच महालातून २ कोटी रुपये मिळाले ही गोष्ट खरी आहे, पण त्याचबरोबर ते हेदेखील आग्रहाने नमूद करतात, की साधारणपणे काही विशिष्ट भागांपुरतीच, तसेच वर्षातील एक विशिष्ट वेळीच ही लूट होत असे, आणि बंगालच्या अर्थव्यवस्थेवर ह्या लुटीचा तात्पुरता"च" परिणाम झाला. पावसाळा सुरू व्हायच्या आत मराठे निघून जात आणि पिकांची कापणी झाल्यावर येत, त्यामुळे शेतकर्‍यांना मराठ्यांचा त्रास होत नसे. असो. त्या पुस्तकाबद्दल पुन्हा कधीतरी.

दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||

 
^ वर