माझी संगणक सल्लागारीत्ता
संगणक (computer) शब्द कानी पडताच गणक (calculator) यंत्राची आठवण होणे शक्यता नाकारता येत नाही. कदाचित संगणक गणक यंत्राची सर्व कामे करीत असावा म्हणून संगणकाला संगणक असे नाव पडले असावे. परंतु जसे जसे सर्वाना संगणकाचा पुरेपूर वापर लोकांना कळला तेव्हा ते नाव योग्य नाही असेही वाटले पण आता जेव्हा संगणक (computer) हा आकाराने गणक यात्रा सारखा झाला तेव्हा हे नाव अतिशय विचार (दूर दृष्टी असलेल्याने ) करून ठेवले असावे असे वाटते.
सध्याच्या युगात सामान्य माणसाच्या मते संगणक म्हणजे मनोरंजनच साधन आहे ज्याचा वापर हळूहळू सर्व वर्ग आता स्वतःच्या मिळकती साठी करू लागले आहे.
संगणक (computer) आणि माहिती तंत्रज्ञान (Information Technology ) या क्षेत्रात मागील २० वर्षात बरीच उलाढाल झाली. ती किती उपयोगाची होती व किती त्रासदायक होती हा प्रश्न न सुटणारा आहे.
संगणकाचा एक प्रकार शक्तीशाली संगणक (super computer) जो अंतराळात सोडलेल्या यानाची माहिती ठेवण्यासाठी केला पण यासाठी देशाला बाकी जगासमोर हात पसरावे लागु नायेत यासाठी भारतात काही वर्षातच बनवला. तरीही उत्पादनासाठी चीन सारख्या देशवार अवलंबून राहणे देशाने पत्करले. विजयाचा झेंडा झळकाव तसा शक्तीशाली संगणकानंतर (super computer) आपण बरीचशी जबाबदारी न उचलता संगणकातील software खेत्रात क्रांती करायची ठरवली जसे नवरदेवाने लग्नाचा सुट घातला पण दोन दिवसापासुन अंघोळ करायाल मिळालीच नाही.
नवीन संगणकयाची कार्यक्षमता मोजण्याच व दोन संगणकांची तुलना कोणत्या आधाराव करावी?
असा प्रश्न पडताच मेमोरी हा शब्द आठवतो एक म्हणजे तत्काळ (RAM -रम ) जी संगणक बंद करताच निकामी होते. दुसरी कायम harddisk
महत्वाचा मुद्दा कार्यक्षमता (processing power) चा एका क्षणात किती डाटावर प्रक्रिया होऊ शकते होऊ शकतो ते.
या सर्वांचा सोपा उदाहरण घ्यायचा झालं तर दळण करणार्याचे घ्या (जो गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी यांचे रुपांतर पिठात करून देतो तो )
गिरणीतील यंत्र क्षणात किती गव्हाचे पिठात रुपांतर करते ते (processing power)
यंत्रात किती गहू सामावू शकतात (RAM ) व गिरणीत एकूण किती किलो धान्य व पीठ सामावू शकत ते (Harddisk).
आता प्रश्न येतो संगणक प्रणाली (operating system) -खिडक्या
जी भारत देशातील जणू सर्वाना एकच माहित आहे. आणि त्या प्रणाली ला आपण नारळ आणि श्रीफळ देऊन त्यांना आपण पुजतच आहोत आणि संगणकातील सारे जग इथे येऊन संपून जाते असा विश्वास आपण मनाशी धरला कि घरात येण्याचा व बाहेर जाण्याचा मार्ग हा खिडकीतूनच असतो व घराला दरवाजे असू शकतात हे मानण सोडूनआच दिलं आहे. ह्याच त्या खिडक्यांतून वेगवेगळे चोर देशात शिरू पाहत आहे ह्याचा कुणी विचार करीत नाही.
देशात जेव्हा नवीन संगणकाची प्रथा सुरु झाली त्यावेळी संगणकाचे मूल्य हे कमीत कमी रु ९००००/- च्या वर असून त्या विषयी ज्या गोष्टी चर्चेत होत्या त्या १) संगणक हाताळण्यासाठी घरात वातानुकुलीत यंत्रणा असावी लागते किंवा पंखा असावा.
२) राहणाऱ्या क्षेत्रातील विजेचे उतार चढाव हा उपद्रवी नसावा.
३) भारतात हवेत ओलावा (पाणी) असल्याचे आढळते.
४) त्यासाठी वेगळी मांडणी करावी.
५) चुम्बाकात्वाचा प्रभाव पडून display unit बाधित होऊ नये म्हणून sound system व Display unit यांमध्ये अंतरावर असावे ६) प्रिंटर असल्यास नियमित प्रिंटींगचे काम करावे (शाईचा योग्य वापर नियमित होत राहावा नाहीतर शाई सुकून प्रिंटर खराब होण्याची शक्यता )
७) cd व floppy द्रीवे मध्ये एक disk असू द्यावी लेन्स झाकून राहावी म्हणून व धुळीपासून संरक्षण व्हावे. ८) लहान मुलांना हात लावू देऊ नये.
Comments
छान
छान तुलना. लेख अजुन रंजक व माहितीपुर्ण येउ द्यात.
प्रकाश घाटपांडे
छान
सुटसुटीत आणि उपयोगी लेख.
मनूष्य आणि संगणक
तसे पाहू गेल्यास मनुष्यप्राणि हाच एक उत्तम संगणक आहे. संगणकाच्या दोन महत्त्वाच्या उपयुक्तता - स्मृति आणि तिच्यात धरून ठेवलेल्या तपशीलांचा उपयोग करून नवीन तपशील निर्माण करणे ही दोनहि कामे मनुष्यहि आयुष्यातल्या प्रत्येक क्षणात करतच असतो. त्याचबरोबर तो इतरहि अनेक गोष्टी करू शकतो, जसे प्रजनन, शारीरिक इजा झाल्यास स्वतःचे स्वतःला बरे करणे इत्यादि.
मनुष्याच्या ह्या अनेक क्षमतांपैकी स्मृति आणि तपशिलांचा उपयोग ह्या दोघांवरच लक्ष केन्द्रित करून त्या कित्येक पटीने वाढविणे हा मनुष्यजातीला होणार संगणकाचा उपयोग, ज्या वाढीचे स्वतःचे लाभ आहेत.
ह्याचेचे समांतर उदाहरण म्हणजे विमान. पक्षीहि उडतात आणि कोठूनहि उड्डाण करणे, कोठेहि उतरणे, उडण्यातली सफाई अशा अनेक गोष्टी ते लीलया करतात. पण त्यांच्या उड्डाणक्षमतेवर नैसर्गिक मर्यादा आहेत. त्या अशा की ते अतिदूरचे उड्डाण एका दमात करू शकत नाहीत आणि फार जड वजन उचलू शकत नाहीत. आधुनिक विमाने ह्या दोनहि गोष्टी करू शकतात, पण असे करतांना पक्ष्यांच्या उड्डाणकौशल्यांपकी अन्य कौशल्यांचा ते त्याग करतात आणि दूरवरची उड्डाणक्षमता आणि वजन उचलणे ह्यावरच केन्द्रित राहतात. हा एक trade-off आहे. तसाच trade-off मनुष्य आणि संगणक ह्यांमध्ये आहे असे मला दिसते.
ट्रेड ऑफ पेक्षा...
तुमचा विचार कळला पण मी याला ट्रेड ऑफ म्हणणार नाही. मनुष्य यंत्र बनवताना त्या यंत्राकडून काय् अपेक्षा आहे तसे ते बनवतो. यंत्र बनविण्याचे तंत्रज्ञान, वेळ, खर्च इ. बाबीं लक्षात घेऊन त्यानुसार त्याचा फायदा कितपत होईल याचा विचार करून यंत्रे बनवली जातात. (आधुनिक विमाने पक्ष्यांसारखी उडूही शकतात, उदा. फायटर विमानांपासून मायक्रो-एअर-व्हेईकल्स)
तंत्रज्ञान जसे विकसीत होईल तसे अनेक कार्यक्षमता (कपॅबिलीटीस्) असणारी यंत्र बनवली जातीलच, तेव्हाही प्रत्येक क्षमता बनविणे फायद्याचे आहे का हे तपासले जाईलच.
-Nile
तोच मुद्दा
त्यालाच ट्रेड-ऑफ म्हटले जाते?
लेखातली गिरणीची तुलना आवडली. संगणक बंद करताच रॅम निकामी होते असं म्हणायचं आहे का रिकामी होते असं?