उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
गुगल आणि वीजबचत
पंकज
May 25, 2007 - 7:58 am
एका अनुदिनीवर " काळ्या रंगातील गुगल वर्षाला ३००० मेगावॉट वीज वाचवू शकेल अशी कल्पना मांडली गेली. गुगल वर दरदिवशी २००,०००,००० गोष्टींचा शोध घेतला जातो, म्हणजे ५,५०,००० तास दरदिवशी गुगल वापरले जाते. काळा रंग तुलनेने १५ वॅट कमी वीज खर्च करतो. "
गुगलने त्याला अनुसरून http://www.blackle.com/ ची निर्मिती केली.
दुवे:
Comments
मग कुणी?
कोण आहे जनक?
धन्यवाद
:-)
अभिजित
(कौरवांच्या बाजूने लढलेला एकमेव पांडव मला आवडतो.)
कसे काय?
नव्हे!
सर्व घरे पांढर्या रंगाने रंगवली तर ठीक राहील.
काळ्या रंगाने तापमान अजून वाढेल आणी ध्रुवांवरिल बर्फ लवकर वितळेल. शिवाय बर्फ वितळल्यावर, (पांढर्या रंगा मुळे) पृथ्वीची सूर्यप्रकाश परावर्तीत करण्याची क्षमता कमी होईल. ही क्षमता भरुन काढण्यासाठी ही घरे पांढर्या रंगानेच रंगवावीत असा विचार मागे न्यु सायंटिस्ट या मासिकांत वाचल्याचा स्मरतो (मासिकाचा महिना व वर्ष लक्षात नाही).
-निनाद
जरा
युयुत्सु,
आपल्या प्रतिसादाचा रोख कळला नाही.
माझ्या प्रतिसादात मी कोठेही माहिती मागितली नाहिये.
क्षमा करा हे ही कळले नाही? कोणती शंका?
आपल्या कुटूंबियाविषयी मी कधी विचारले?
(तुम्हाला तुमच्या मुलीच्या हुषारी बद्दलच काही लिहायचे होते तर ते माझ्या प्रतिसादावर का खपवताय?
उपक्रमाच्या धोरणात बसेल असा स्वतंत्र लेख लिहा, चर्चा सुरु करा.)
बरं वेळ मिळेल तसे करु या. (या सल्ल्याबद्दल धन्यवाद! )
ठीक आहे, तुमची आठ वर्षांची मुलगी हुषार आहे. शिवाय तीला गुगल आणी याहू कसे वापरायचे हे ही कळते हे कळले.
ही माहिती आपणासारख्या माणसा कडून का येते आहे कळले नाही. एकीकडे आपण लेख लिहायचे की जाला वर उगाचच माहिती देऊ नका. आणी मग 'बघा कसे आमचे सगळे हुषार' (आणी काय मुर्ख अहात हो?)या नादात आपण आपले उघडे करुन दाखवायचे?
असो,
न विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे दिल्या बद्दल धन्यवाद.
-निनाद
(स्वगत- जगातल्या काही PhD गाईड्स ची मला दया येते आहे आणी जर स्वतः च PhD गाईड असेल तर त्या विद्यार्थ्यांची, बिचारे PhD च्या थेसिस पायी काय काय ऐकत असतील देव जाणे!)
हे कसं काय?
पृथ्वी अजूनही थंड होत असल्याने, पृथ्वितच ही सगळी ऊर्जा शोषून घ्यायची. त्यासाठी सर्व पृथ्वी ऊर्जाशोषणासाठी तयार करणे आवश्य आहे. पृथ्वीवर सर्वात जास्त मानवनिर्मीत पृष्ठभाग कोणता? घरांच्या भिंती. त्यांना ऊर्जाशोषणाचे केंद्र बनवले तर ?
अहो पृथ्वी थंड होते आहे म्हणजे ती उर्जा उत्सर्जित करते आहे असेच ना?
एखादी वस्तूने उर्जा ग्रहण केली तर काही वेळा ग्रहण केलेली उर्जा त्या वस्तुचे तापमान वाढवण्यास कारणीभूत होते. आणि एखाद्या वस्तूने उर्जा उत्सर्जित केली की त्या वस्तूचं तपमान कमी होतं असं मी वाचलं होतं.
असं असताना "पृथ्वी अजूनही थंड होत असल्याने, पृथ्वितच ही सगळी ऊर्जा शोषून घ्यायची", हे कसं काय?
"पृथ्वीवर सर्वात जास्त मानवनिर्मीत पृष्ठभाग कोणता? घरांच्या भिंती. त्यांना ऊर्जाशोषणाचे केंद्र बनवले तर?",
अहो आपला हेतू 'पृथ्वीचं तापमान नियंत्रित ठेवणे' हा आहे. त्यासाठी जी उर्जा आपल्याला सुर्यापासून मिळते त्याचा काही भाग पृथ्वी उबदार ठेवण्यासाठी वापरणे आणि उरलेला भाग परावर्तित करणे हेच नैसर्गिक रीत्या होत असते. आता या परावर्तित होणार्या उर्जेला अवकाशात जाण्यापसून अडथळा केला तर पृथ्वी गरम होणारच.
तुम्ही घराच्या भिंतींमध्ये उष्णता शोषून घेण्याबद्द्ल बोलता आहात. अहो यामुळे तर घरं आणखीन गरम होतील! घरांचा रंग सफेद असावा हेच पटण्यासारखं आहे.
वैश्विक तापवृद्धी साठी वातावरणातील उष्णता शोषक वायूंचं प्रमाण कमी करणं हाच योग्य उपाय वाटतो.
जंगलांचं प्रमाण वाढवून हे साध्य करता येईल असं वाटत.
अहो उपाय तर अगदी साधा आहे. पण साधे उपाय न वापरण्याचे आपण मनुष्य प्राण्याने मनावर घेतल्यासारखे वाटते.
घरं थंड ठेवायचं आहे तर त्यासाठी एक छानसं झाड लाव घराबाजूला. त्याची सावली पडू दे घरावर! इमारतींची वसाहत असेल तर दोन इमारतींच्यामध्ये, वसाहतींच्या प्रवेशद्वारावर, रस्त्यांवर झाडे लावा. आपोआपच गारवा निर्माण होईल.
तुमचं ते वैश्विक तापवॄद्धी का काय म्हणतात ती घाला चुलीत! तुमचं घर तापवॄद्धी, वसाहत तापवॄद्धी कमी केलीत तरी फार होईल.
(मस्तक तापवॄद्धी झालेला) रम्या
परत तिच शंका!
सगळ्या ग्रहांसारखे पृथ्वीचेही अंतरंग थंड होते आहे.
पृथ्वीचे वातावरण आजवर नेहमीच तापत आलेले आहे (पृथ्वीच्या अंतर्गत असलेली ऊर्जेचा वातावरणात उत्सर्ग होत असल्याने), त्यामुळे ही तापवृद्धी एक नैसर्गिक क्रिया आहे.
अगदी मान्य!
परंतु ह्या तापवृद्धीचा दर माणूस अधिकाअधिक कर्बवायू वातावरणात जमा करून वाढवतो आहे.
अगदी सहमत.
पण शंका तुमच्या "पृथ्वी अजूनही थंड होत असल्याने, पृथ्वितच ही सगळी ऊर्जा शोषून घ्यायची" या विधानामुळे आहे. थंड होणार्या पॄथ्वीत उर्जा शोषून घेण्यासाठी तुम्ही घराच्या भिंतींना काळा रंग लावण्यासंबंधी लिहिले आहे. माझा मुद्दा हा कि, या उपायामुळे आपण कदाचित पॄथ्वीचा अंतर्भाग थंड होण्यामुळे वातावरणात उत्सर्जित होणारी उर्जा कमी करु शकतो. पण याच बरोबर हाच काळा रंग सुर्यापासून मिळणारी उष्ण्ताही शोषून् घेऊ शकत नाही का?
शिवाय उष्णता गरम भागाकडुन थंड भागाकडे वाहते असं वाचलं आहे. म्हणजे पॄथ्वीपासून मिळणारी उर्जा परत पॄथ्वितच परत कशी पाठवली जाऊ शकते?
तुम्ही सुचविलेल्या उपायामुळे एक विचित्र परिस्थिती तयार होइल असे वाटते. म्हणजे पॄथ्वीला थंडही होऊ द्यायचे नाही उलट सुर्यापासून पॄथ्वीला मिळणारी उर्जा सुद्धा भिंतींना काळा रंग वापरून पॄथ्वीच्याच अंतरंगात पाठवायची?
बघा बुवा, हे आमचं अडाण्याचं मत. आमची विचार करण्यात काही चूक होत असेल तर दुरुस्त करण्यात मदत केलीत तर बरे होईल.
(अडाणी) रम्या.
काळी घरे नकोत
घर काळे करण्यापूर्वी खालील प्रश्न मनात आले.
१. मूळ कॉन्क्रिटचा रंग करडा असताना अशा वेगळ्या काळ्या रंगाची गरज काय?
२. घरांच्या भिंतींचे आकारमान असे कितीसे आहे? रस्ते काळे असणे पुरेसे नाही का ;) (की केवळ छतेच रंगवावीत?)१. सध्या रंगीत नसलेली घरे काळी करण्यास किती उर्जा लागेल?
३. काळा रंग कसा/कशापासून बनवतात? त्यासाठी पांढर्याच्या तुलनेत प्रती वर्गमी. किती उर्जा लागते?
४. अशी काळी घरे अधिक तापल्याने ती थंड करण्यासाठी जी वातानुकुलन यंत्रणा वापरावी लागेल, त्याला किती उर्जा लागेल. (अधिकाधिक उर्जा परावर्तित होऊन शीतकरणाचा खर्च शून्य/कमीत कमी व्हावा यासाठी घरे पांढर्या रंगाने रंगवली जातात.)
५. या उर्जेच्या जमाखर्चाचा ओझोन थरावर काय परिणाम होईल?
शीतकपाटे व वातानुकुलक संगणक पडद्याच्या कैकपटीने उर्जा वापरतात. शिवाय दोन्ही हरितगृहाच्या बद्दल आधीच बदनाम आहेत.
सारी घरे पांढर्याची काळी करणे हटमल मध्ये २५५ चे ० किंवा उलट करण्याइतके सुलभ नाही.
दिलगीरी.
हि माहिती एका मेल मधून मिळाली, अधिक चौकशी न करता तशीच प्रसिद्ध केली.
प्रतिसादाबद्दल आभारी.
कळले नाही.
काळा रंग उर्जा कशी शोषून घेतो हे कळले नाही. काळा रंग असे करतो असे मानणार्यांनी मदत करावी.
दुव्याबद्दल
धन्यवाद. पण या दुव्यावर दिलेली 'काळी वस्तू' ही भौतिक संकल्पना आहे. त्याचा 'काळ्या रंगाशी' संबंध जोडलेला दिसला नाही.
त्याला या दुव्यावर असलेल्या खालील चित्रात दाखवलेल्या ठराविक तरंगलांबीचे प्रकाशकिरण परावर्तित करण्याच्या रासायनिक पदार्थांच्या गुणधर्माचा भौतिक (अणु/रेणू/विद्युत/चुंबकीय/बंध) स्तरावरचा संबंध जाणून घ्यायचा आहे.
एखाद्या पदार्थाचा रंग त्याच्या मूळ गुणधर्मावर कसा प्रभाव टाकतो?
रखरखत्या उन्हात 'पांढरा पत्रा' अधिक उर्जा शोषून घेईल (म्हणजेच तापेल का?) की कापडी छत्री?
वा! काय चर्चा!
वा! काय पण चर्चा आहे,
वाचायला मजा वाटली!
अचानक काळ्या पाढर्या माहिती चा सुकाळ झाल्या सारखे वाटते आहे. :)
असोत.
एकुण काय तर की आपण सगळे विचार करणार - आज माझी तुंबडी स्वार्थीपणे कशीही भरायची उद्याचे पाहू उद्या! मग आता भोगावीच लागणार आपल्याला उष्णतेची फळं... (म्हणजे जंगलात जाउन रहावे असं म्हणत नाहिये, हे सगळे परत फिरवण्यासारखे नाही)
असो, या निमित्ताने एक मुद्दा असा मांडायचा आहे की, या स्थितीत माणसा पेक्षा इतर प्राणी हुषार ठरत आहेत.
त्यांनी भौतिक प्रगती नसेल साधली (पण जैविक साधली आहे) पण स्वतः ला नष्ट ही होऊ दिले नाहिये,
जे माणसाने प्रगतीच्या नावाखाली दोनशे (?) वर्षांत केले.
(पण म्हणूनच जुन्या संस्कृती महत्वाच्या होत्या. त्या अनेक प्रकारे प्रगत झाल्या तरी, ग्रहाचा तोलच ढाळण्याचे काम केले नव्हते.)
ही सगळी चूक त्या जेम्स वॅट नामक माणसाची आहे... असे या गुंडोपंताचे (वैयक्तिक)मत आहे.
आता काळ्या पांढर्याच्या चर्चा करायला तरी वेळ खरंच उरला आहे का?
ग्रहाचा तोल ढासळला आहे.... जे घडेल ते पाहणेच फक्त उरले आहे.
आपला
(अधिभौतिक)
गुंडोपंत
पहा ही चर्चा.
गुगल,वीजबचत आणि महाभारत.काय सुंदरचर्चा,अहाहा.पूर्व जन्मीचे काही पूण्य म्हणून अभ्यासपूर्ण चर्चा वाचावयास मिळाली,नव्हे मिळते आहे.अभ्यासकांनो आता थांबू नका ?चालू द्या ! फार सही चालू आहे. सर्वच चर्चा मी काळजी पूर्वक वाचतो आहे.उपक्रम साहेब,लक्ष घाला या प्रकरणात,नाहीतर,आता रामायण यात येईल,अन् त्याच्यात भारनियमन.तशी त्या दिशेने चर्चा जाणे अजून बाकी आहे !
हेच..
उपक्रम साहेब,लक्ष घाला या प्रकरणात,नाहीतर,आता रामायण यात येईल,अन् त्याच्यात भारनियमन.तशी त्या दिशेने चर्चा जाणे अजून बाकी आहे !
हेच म्हणतो...! -;)
आपला,
(वाल्मिकी) तात्या.
ऊर बडवणे!
मूळ चर्चेशी संबंधित किंवा विषयांतरीत प्रतिसादातून कोणतीही अतिरिक्त माहिती दिलेली नसल्याने मजकूर संपादित केला आहे. अश्या प्रतिसादांसाठी कृपया खरडवहीचा वापर करावा.
-- उपसंपादक.
तापवृद्धी
लेखातील माहिती फारच त्रोटक आहे. गुगलून बघितल्यावर अजून माहिती मिळाली. तापवृद्धीवरही बरीच माहिती मिळाली.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre