चलत नकाशे

जालावर फिरताना मॅप्सऑफवॉर.कॉम ही वेबसाइट दिसली. इथे जगातल्या काही ठळक घटनांचा जसे की युद्धे, विविध धर्म, लोकशाही इ.च्या हजारो वर्षांचा इतिहास अतिशय रंजक पद्धतीने अवघ्या ९० सेकंदांमधे चलत नकाशारुपी दिला आहे. अश्याप्रकारे कल्पकतेने माहिती मांडायची पद्धत आवडल्याने उपक्रमींसाठी तिथले दोन नकाशे दिले आहेत.

आणखी नकाशे पाहण्यासाठी http://www.mapsofwar.com/index.html इथे भेट देऊ शकता.

१. धार्मिक इतिहास

२. लोकशाहीचा इतिहासः मॅग्ना कार्टापासुन् ते आजच्या लोकशाही पर्यंतचा प्रवास

लेखनविषय: दुवे:

Comments

छान आहे.

मॅप्स ऑफ रीलिजन आवडला. छान पणे मांडले आहे.

अतिशय छान

संकेतस्थळ आवडले. बदलत्या नकाशाद्वारे इतिहास सांगायची पद्धत खरोखरच आकर्षक आहे. उपक्रमावर तिच्या नमुन्याचे सादरीकरण केल्याबद्दल धन्यवाद.--वाचक्नवी

मस्त

हजारो वर्षांचा इतिहासाचा सारांश (मग तो ढोबळ का असेना) असा वेगाने दाखवण्याच्या पद्धतीमुळे एका वेगळा दृष्टिकोन मिळतो.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

+१

+१.

नीट पाहून झाले की मग वाटल्यास सविस्तर प्रतिसाद लिहिन.

व्वा!

किति छान आहे. व्वा!

तितकेसे आवडले नाहीत

नकाशे तितकेसे आवडले नाहीत.

ईजिप्त आणि चीन येथील प्राचीन धर्म जेव्हा केव्हा प्रसारित झाले आणि नामशेष झाले ते यायला हवे होते. (चीनमधील कन्फ्यूशियन/दाव धर्म खरोखर नष्ट झाले आहेत काय?) भारताकडे लक्ष केंद्रित करावे तर वैदिक धर्माचे काय झाले? (हिंदूधर्म हा कृष्णाने स्थापित केल्याचा भास या चलतनकाशावरून होतो आहे.) मुसलमान धर्माच्या स्थापनेआधी अरबस्तानात काही धर्म होते, बहुधा हिंदू/बौद्ध लोकही होते. ते काहीच दाखवलेले नाही.

दुसरा चलतनकाशा त्या मानाने अमेरिकाकेंद्रित आहे. चालायचेच. पण त्यातही... ब्रिटन मध्ये माग्ना चार्टाची घटना दाखवली आहे. ब्रिटनमध्ये निळ्या रंगाची लोकशाही कधी आली? बहुधा १६८८च्या ग्लोरियस क्रांतीनंतर आली असावी. यू.एस. मध्ये लोकशाही आली ती १७७६ नंतर कधीतरी. पण इथे ऍटलांटिक ते पॅसिफिक यू.एस. पूर्ण निळा झाल्यानंतर कधीतरी ब्रिटनमध्ये लोकशाही आलेली आहे.

 
^ वर