मुंबईतले स्फोट आणि इप्रतिक्रिया

मुंबईत नुकतेच स्फोट झाले. मुंबई हादरली वगैरे मथळे ४० फाँटमधे लिहून वृत्तपत्रांनी धमाका केला. च्यानेलवाल्यांच्या उत्साहाला तर बघायलाच नको. पण हे नेहमीचेच. त्यापेक्षा वेगळे म्हणजे जालकृपेने आता प्रत्येकाहाती कळफलक आल्याने जालपटूंच्या प्रतिक्रियांचा भडीमार. भीषण स्फोटोत्तर काव्यांशिवाय फेसबुक, ट्विटर, ब्लॉग्स, मराठी संकेतस्थळे जिकडेतिकडे कर्कश्श आणि आक्रस्ताळ्या प्रतिक्रियांचा, प्रतिसादांचा, स्टेटस मेसेजांचा खच पडला आहे. आदरणीय राजजींना अशातही परप्रातीयांचा लोंढा आठवला.

बरं राजकारण्यांना शिव्या देणारे सेफ आंतरजालीय सुखवस्तू हे विसरतात की शेवटी राजकारण्यांची जमात ही परग्रहावरून आलेली नाही. सोशल एँगर समजू शकतो, कर्कश्शपणा आणि आक्रस्ताळेपणाही समजून घेऊ शकतो पण कधी कधी हे जरा जास्तच होते आहे असे वाटते. ' स्फोटाच्या दिवशी कसाबचा वाढदिवस होता' अशी अफवा काय उडवली जाते आणि त्यावर फालतू विनोद काय केले जातात. 'बाबा रामदेवच्या सैन्यात भरती व्हायचे आहे' काय अन् काय नि काय. अशी किती किती बौद्धिक दिवाळखोरी काय चालू आहे. स्फोटाची चित्रे पाहण्याइतकीच क्लेषदायक ह्या लोकांची मूढता वाटते. बरं ह्यावर कुणी काही बोलावे तर "माझा अमुक नातेवाईक दादर किंवा झवेरी बाजाराजवळ राहतो म्हणून माझा तरी संताप अजून आटोक्यात यायचा आहे" अशी प्रतिक्रिया.

अश्या डोक्यात जाणार्‍या प्रतिक्रिया वाचून काय वाटते? निदान माझा संताप तरी आटोक्यात यायचा आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

मनोरंजन होते

अश्या डोक्यात जाणार्‍या प्रतिक्रिया वाचून काय वाटते.

मी अशा प्रतिक्रियांना डोक्यात जाऊ देत नाही. अशा प्रतिक्रिया वाचून फार मनोरंजन होते. बरं ह्यापैकी काहींना हजारे आठवतात. तर काहींना रामदेव. त्यांना स्वतःचे असे मत नसते. म्हणजे तुम्ही रावले असायला हवे असे मी म्हणत नाही पण... असो. बाकी रामदेवबाबांच्या सैन्यात स्त्रियांच्या कपडे घालून पळण्याची ड्रिल अनिवार्य ठेवणार आहेत अशी बातमी आतल्या गोटांतून मिळाली आहे.
माझा एक मित्र-- त्याला मठ्ठ म्हणवत नाही. कारण पगार उच्च ६ आकडी आहे-- एखादा हायड्रोजन बॉम्ब टाकून द्यायला हवा असे काल म्हणत होता. मी ही प्रतिक्रिया अजिबात डोक्यात जाऊ दिली नाही. कारण तो मित्रांना वेळोवेळी उंची स्कॉच आणून देत असतो. असो. तूर्तास एवढेच.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

हा हा हा

आपला आधीचा उडालेला 'रसग्रहणात्मक' लेख आणि या लेखातले उद्धृत केलेले उदाहरण पाहता आपण जरी फेसबुक ट्विटर वगैरे नावे लिहिली असली तरी आपला रोख एकाच संस्थळावर दिसतो.

तर त्याबाबत इथल्या मऊ मातीवर खणण्याऐवजी आमच्या* सारखे तिकडे जाऊन खणण्याचे धाडस** करावे.

असो. हा प्रस्ताव कै च्या कै पद्धतीने लिहिला असला तरी त्यावर सिरिअस आणि मुद्देसूद चर्चा होऊ ही शकेल कदाचित.

*आमच्यासारखे हा आदरार्थी बहुवचनी शब्द नसून येथील इतरही काही सदस्यांचा त्यात अंतर्भाव आहे.
** हे धाडस आपण कुठल्या दुसर्‍या आयडीने आधीच करत असाल तर तसे (निरोपातून) सांगावे. प्रतिसाद उडवण्याची विनंती संपादकांना करीन.

नितिन थत्ते

सहमत

असो. हा प्रस्ताव कै च्या कै पद्धतीने लिहिला असला तरी त्यावर सिरिअस आणि मुद्देसूद चर्चा होऊ ही शकेल कदाचित.

सहमत आहे.

पण ज्या टुकार कवितेवर रसग्रहण लिहिले होते ती कविता थत्तेंना आवडलेली आहे.

?

का बुवा? कविता म्हणून चांगलीच आहे.
चांगल्या कवितेचे निकष कोणते?

लिहिणार्‍या व्यक्तीला जे सांगायचे आहे ते प्रभावीपणे पोचते आहे की नाही
कवितेची तांत्रिक अंगे कशी आहेत? वृत्त, मात्रा वगैरे

दोन्ही निकषांवर कविता चांगली आहे. [त्यात लिहिलेली मते योग्य आहेत की नाही हा वेगळा विषय आहे आणि मतांशी सहमत नसल्याचेही त्याच ठिकाणी लिहिले होते]

नितिन थत्ते

निकष

लिहिणार्‍या व्यक्तीला जे सांगायचे आहे ते प्रभावीपणे पोचते आहे की नाही
तांत्रिक अंगे कशी आहेत? वृत्त, मात्रा वगैरे

हे कवितेचे निकष हास्यास्पद आहेत. वृत्तात बांधलेली कुणा वेड्याची बडबडही तुम्हाल 'चांगली कविता' वाटते का?

आशय

जे सांगायचे आहे ते प्रभावीपणे पोचते आहे का हा निकष बहुधा वेड्याच्या बडबडीत पुरा होत नाही. अर्थात तुम्हाला वेड्याच्या बडबडीतून काही आशय पोचत असेल तर कल्पना नाही.

नितिन थत्ते

?

थत्तेंनी आमंत्रण दिले की 'तिकडे' चे सदस्यत्व मिळते काय? कोब्या यांचा तिकडचा सध्याचा/जुना नेमका आयडी अज्ञात असला तरी असले आयडी 'तिकडे' टिकत नाहीत असे निरीक्षण उपलब्ध नाही काय?

निरीक्षण

असले आयडी 'तिकडे' टिकत नाहीत असे निरीक्षण उपलब्ध नाही काय?

टुकार कवितेला (आशय पटला नाही तरी) छान छान म्हणण्या इतका पुलिटिकल करेक्टनेस असला की टिकतात आयडी बहुतेक.

पुलिटिकल

कठीण जमिनीवर खणण्याचं मनावर घेतलंत तर बरं.

नितिन थत्ते

कसे?

आयडीवर बंदी येते हे मान्य केलेत तर बरं.

+१

आयडीवर बंदी येते हे मान्य केलेत तर बरं.

असेच.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

+२

आयडीवर बंदी येते हे मान्य केलेत तर बरं.

थत्तेंनी पुन्हा 'गप्प राहायचे ठरवले' आहे की काय?

असेच् म्हणतो

त्याबाबत इथल्या मऊ मातीवर खणण्याऐवजी आमच्या* सारखे तिकडे जाऊन खणण्याचे धाडस** करावे.
हे तर् खूपच् आवडले.

सेफ आंतरजालीय सुखवस्तू

सोशल एँगर समजू शकतो, कर्कश्शपणा आणि आक्रस्ताळेपणाही समजून घेऊ शकतो पण कधी कधी हे जरा जास्तच होते आहे असे वाटते.

हे सर्व समजत असेल तर हे असे होणे क्रमप्राप्त आहे हे समजून घ्या. हे फारतर एक दोन दिवस चालते. लोक तावातावाने बोलतात, भांडतात आणि आपल्या कामाला लागतात. त्या कर्कश्शपणात भाग न घेणारे दुर्लक्ष करतात किंवा लांब बसून मजा घेतात. दोन दिवसांनी सर्व विसरायला होते. जालावर बसून लेख/ चर्चा/ कविता/ प्रतिसाद लिहिणार्‍यांना अशा घटनांची फारशी झळ पोहोचलेलीही नसेल कदाचित म्हणून हे शक्य आहे.

मुंबईतील माझ्या वर्गमित्राची चौकशी केली तेव्हा त्याने "अजून सुपात आहे" एवढेच सांगितले. इतर कोणताही राग बाहेर काढला नाही. कदाचित दूरच्यांना जे जाणवते, ते जवळच्यांना जाणवत नसेल.

थत्तेंचे म्हणणे की यावर मुद्देसूद चर्चा शक्य आहे हे पटते. चर्चेला तसे स्वरूप देणे सदस्यांच्या हाती आहे.

अजून सुपात आहे !

हे सर्व समजत असेल तर हे असे होणे क्रमप्राप्त आहे हे समजून घ्या. हे फारतर एक दोन दिवस चालते. लोक तावातावाने बोलतात, भांडतात आणि आपल्या कामाला लागतात. त्या कर्कश्शपणात भाग न घेणारे दुर्लक्ष करतात किंवा लांब बसून मजा घेतात. दोन दिवसांनी सर्व विसरायला होते. जालावर बसून लेख/ चर्चा/ कविता/ प्रतिसाद लिहिणार्‍यांना अशा घटनांची फारशी झळ पोहोचलेलीही नसेल कदाचित म्हणून हे शक्य आहे.

सहमत.
पण मग आता रोषही प्रकट करायचा नाहि?
अशा घटना घडल्या कि असे होणे हे क्रमप्राप्तच आहे..हे फारतर एक दोन दिवस चालते. लोक तावातावाने बोलतात, भांडतात आणि आपल्या कामाला लागतात हे ही खरेच
पण आता संवेदनाहि बोथट होत चालल्या आहेत काय?

त्यातही एलीटक्लास/ चित्रपटसृष्टि आणि सामान्य माणूस यामधली दरी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे,
झालेल्या घटने नंतर कुणि कॅन्डलमार्च काढलेला नाही (अजून तरी) (काढावा अशी ईच्छाही नाहि)
चित्रपट तारे-तारका जिदंगी ना मिले दोबाराची पुर्ण टिम नाचमस्ती करण्यात दंग होते,
ज्यांनी जिंदगी गमावली त्यांचे आप्त शोक सागरात बुडाले होते.
याचा अर्थ असा नाही की कॅन्डलमार्च काढल्याने अतेरीकी भयभित होऊन पुन्हा असे कृत्य करणारच नाहीत,
किंवा सिनेतारकांनी अशा पार्ट्या करु नयेत,
पण हे टाळता आले नसते का? निदान काही दिवस तरी..
हे त्या बळी पडलेल्यांच्या आप्तांच्या जखमांवर मिठ चोळण्यासारखे नाही काय?
ताजवर हल्ला झाला तेव्हा एलीटक्लास/चित्रपटसृष्टि सगळेच रस्त्यावर उतरले होते..
मग आता काय झाले?
का अशा पार्ट्या करुन ते मुंबईचे स्पिरिट दाखवत आहेत?

अतेरिक्यांना मॅसेज तरि कसा अन् काय द्यायचा?
हि समाजातली फूट वाटत नाहि का?

लेखात अन् प्रतिसादात म्हणल्या प्रमाणे काही प्रतिक्रिया डोक्यात जाणार्‍या असतात
त्यात मग हजारे/रामदेव आठवणारे असो किंवा

मुस्लिम समाजाविषयी बोलणारे भाजपचे मुख्तार अब्बास नक्वी असो,
आरेसेस विषयी बोलणारे काँग्रेसचे दिग्विजय सिंग शेखावत/ राहूलगांधी असो,
किंवा मग मराठि वोटबँकसाठी परप्रातीयांना यात ओढणारे राजठाकरे असो,
या लोकांच्या प्रतिक्रिया डोक्यात जाणार्‍या नि संतापजनक आहेत.

एक हताश उद्विग्नता आली आहे.
कारण मि ही "अजून सुपात आहे" :(

लग्न/ मुंजी/ वाढदिवस

किंवा सिनेतारकांनी अशा पार्ट्या करु नयेत,
पण हे टाळता आले नसते का? निदान काही दिवस तरी..
हे त्या बळी पडलेल्यांच्या आप्तांच्या जखमांवर मिठ चोळण्यासारखे नाही काय?

नक्कीच टाळता आले असते. या काळात एखाद्या सामान्य माणसाचे लग्न असते, घरात मुंज असती, स्वतःचा/ मुलांचा वाढदिवस असता तर त्यांनीही तो टाळला/ साजरा केला नाही असे म्हणायचे आहे का?

होय..!

निदान ज्यांची विवेक बुध्दि आणि संवेदना शाबूत आहेत त्यांनी तरी केलेला नाही,
त्यांच्यातलेच उदा.घेउयात ऐश्वर्याराय बच्चनने तीचा सत्कार समारंभ रद्द केला आहे.
आणि माझे सांगायचे तर माझा जिवलग मित्र आहे त्याचा वाढदिवस १५ जुलै आहे,
आम्हि यावेळी साजरा केला नाही.

सत्कार समारंभ

ऐश्वर्या राय स्वतःचा सत्कार समारंभ आयोजित करत नाही. ती बहुधा आजारी पडली असती तरी तिने मी येत नाही असे कळवले असते.

पण तुमच्या मित्राच्या वाढदिवसाबद्दल मात्र कौतुक वाटले. त्यासाठी तुम्ही हॉल बुक केला होता का? केटररला पैसे दिले होते का? आमंत्रणे छापली होती का? केकची ऑर्डर दिली होती का? ऐनवेळेला बेत कॅन्सल केल्याने सर्व पैसे परत मिळाले की काही वाया गेले? त्याचे नुकसान तुम्ही कसे भरून काढले? शेअर वगैरे केले का?

उप्स

ऐश्वर्या राय स्वतःचा सत्कार समारंभ आयोजित करत नाही. ती बहुधा आजारी पडली असती तरी तिने मी येत नाही असे कळवले असते.

ऐश्वर्या रायने स्वतःच स्वतःचा सत्कार समारंभ आयोजित केला नव्हता..
(तसा इतरहि करत नाहीत बहुधा) तो प्रायोजीत होता./असतो.
तिने तो स्विकारायला नकार दिला.
अन् न्युजवाले त्याची तुलना 'त्या'पार्टिशी करत होते.

पण तुमच्या मित्राच्या वाढदिवसाबद्दल मात्र कौतुक वाटले. त्यासाठी तुम्ही हॉल बुक केला होता का? केटररला पैसे दिले होते का? आमंत्रणे छापली होती का? केकची ऑर्डर दिली होती का? ऐनवेळेला बेत कॅन्सल केल्याने सर्व पैसे परत मिळाले की काही वाया गेले? त्याचे नुकसान तुम्ही कसे भरून काढले? शेअर वगैरे केले का?

त्याचा वाढदिवस घटनेच्या दोन दिवस नंतर असल्याने वरिल प्रकारच्या नुकसानचा प्रश्न आला नाही,

का बरे?

त्याचा वाढदिवस घटनेच्या दोन दिवस नंतर असल्याने वरिल प्रकारच्या नुकसानचा प्रश्न आला नाही,

का बरे? घटनेनंतर दोन दिवसांनी वाढदिवस आल्याने केटरर, फोटोग्राफर, केकशॉप वगैरेंनी असहकार पुकारला होता का? नुकसानाचा प्रश्न का नाही आला ते कळले नाही. माझ्यामते कोणतीही प्लॅन्ड ऍक्टिविटी ज्यात पाहुणे, पार्टी समाविष्ट असते ती आयत्यावेळी रद्द केल्यास नुकसान होतेच.

कारण

आम्हि (मित्र) वाढदिवस एखाद्या उपहारगृहात साजरा करतो त्यामुळे केटररला ऑर्डर देण्याचा प्रश्न नसतो,
फोटोग्राफर = हल्ली हॅन्डिकॅम वापरतो/ केकशॉप = मॉन्जिनिज मधून, तयार, त्यामुळे इथेही आगावू ऑर्डर देण्याचा प्रश्न नसतो,
माझ्यामते कोणतीही प्लॅन्ड ऍक्टिविटी ज्यात पाहुणे, पार्टी समाविष्ट असते ती आयत्यावेळी रद्द केल्यास नुकसान होतेच.सहमत,
मोठा इव्हेन्ट असेल तर तितकेच मोठे नुकसान हे ही मान्य पण जर ऐश्वर्याने टाळले,
तसे टाळता येत असल्यास का टाळू नये?
आता तुम्ही म्हणाल यात मित्राचे काहि नुकसान झाले नाहि म्हणून मित्राने पार्टी रद्द केली,
पण ती (खंबे) घेणार्‍यांचे (आमचे) झाले ना..
पण आम्हि तसे मानत नाहि,
नुकसान मोठे असो की लहान,
पार्टी रद्द करण्या मागची भुमिका महत्वाची नाहि का?

कुठे?

>>आता तुम्ही म्हणाल यात मित्राचे काहि नुकसान झाले नाहि म्हणून मित्राने पार्टी रद्द केली,
पण ती (खंबे) घेणार्‍यांचे (आमचे) झाले ना..

काय सांगता? म्हणजे घेतलेले खंबे टाकून दिलेत की काय? कुठे टाकलेत ते सांगा.

नितिन थत्ते

खंबे

काय सांगता? म्हणजे घेतलेले खंबे टाकून दिलेत की काय? कुठे टाकलेत ते सांगा.

तुम्हि घेता काय? ;)
नाहि तसे कधी बोलण्यात आले नाही तुमच्या, त्यामुळे विचारले.
तुमची इच्छा असल्यास बेत ठरवू ;)

महत्त्वाची नाही

आम्हि (मित्र) वाढदिवस एखाद्या उपहारगृहात साजरा करतो त्यामुळे केटररला ऑर्डर देण्याचा प्रश्न नसतो,
फोटोग्राफर = हल्ली हॅन्डिकॅम वापरतो/ केकशॉप = मॉन्जिनिज मधून, तयार, त्यामुळे इथेही आगावू ऑर्डर देण्याचा प्रश्न नसतो,

म्हणजेच ही पार्टी रद्द केली तर मोठे नुकसान नाही.

पार्टी रद्द करण्या मागची भुमिका महत्वाची नाहि का?

महत्त्वाची नाही. बर्‍याचदा लग्ने, मुंजी आणि इतर समारंभ हे अनेक महिने प्लॅन केले जातात. तसेच त्यांना खाजगी संबोधले जाते. याचकाळात जर वर्ल्डकपचा सामना मुंबईत असता तर सार्वजनिक सुरक्षेपोटी तो रद्द केला गेला असता किंवा हलवला गेला असता. परंतु चित्रपटाच्या पार्टीचे तसे नाही. ती खाजगी पार्टी आहे, तेथे जाणारे लोक आपल्या जबाबदारीवर जात आहेत. ती बरेच दिवस आधीपासून प्लॅन केली असावी, त्यासाठी अनेकांना ऍडवान्समध्ये पैसे देण्यात आले असावे. असे नुकसान सोसून एखाद्याला ती पार्टी रद्द करणे जमेलच असे नाही.

याच दिवसांत ज्यांची लग्ने होती, मुंजी होत्या त्यांनीही त्या रद्द केल्या नसाव्या. फारतर येणार्‍या जाणार्‍या पाहुण्यांनी समारंभाला यायचे की नाही ते "ऐश्वर्याप्रमाणे" ठरवले असावे. शाहरूख ही मोठी असामी असल्याने त्याच्याबद्दल लिहून मिडिया हुर्यो करते आहे एवढेच.

मला वाटते

निदान त्यातली संवेदनशीलता तरी,

म्हणजेच ही पार्टी रद्द केली तर मोठे नुकसान नाही.

ते यात ओघाने आलेच कि,
"आम्हि तसे मानत नाहि,
नुकसान मोठे असो की लहान,
पार्टी रद्द करण्या मागची भुमिका महत्वाची "

महत्त्वाची नाही. बर्‍याचदा लग्ने, मुंजी आणि इतर समारंभ हे अनेक महिने प्लॅन केले जातात. तसेच त्यांना खाजगी संबोधले जाते. याचकाळात जर वर्ल्डकपचा सामना मुंबईत असता तर सार्वजनिक सुरक्षेपोटी तो रद्द केला गेला असता किंवा हलवला गेला असता. परंतु चित्रपटाच्या पार्टीचे तसे नाही. ती खाजगी पार्टी आहे, तेथे जाणारे लोक आपल्या जबाबदारीवर जात आहेत. ती बरेच दिवस आधीपासून प्लॅन केली असावी, त्यासाठी अनेकांना ऍडवान्समध्ये पैसे देण्यात आले असावे. असे नुकसान सोसून एखाद्याला ती पार्टी रद्द करणे जमेलच असे नाही

सहमत,
सरसकट सर्वांनीच समारंभ रद्द करावे असे मत नव्हतेच,
ज्यांची विवेक बुध्दि आणि संवेदना शाबूत आहेत त्यांनी करावे/केले आहे.
मुळ मुद्दा तोच-
अशा घटना घडल्यावर त्या पुन्हा होऊ नये यासाठि काय करायला हवे?
अतेरिक्यांना जरब बसेल भिती वाटेल असे काय करायला हवे?
प्रतिक्रिया देऊन ते साध्य होनार नाहि हे मलाही माहित आहे मग यावर उपाय काय?
का यावर दुर्लक्ष करुन आपण तर वाचलो ना.. असे म्हणून सुदैवाने वाचलो याचा आनंद व्यक्त करत आपले उर्वरित श्वास घेत रहायचे?
हे कधीच थांबणार नाही काय?
उपाय सुचवा.

लॉजिक

>>सरसकट सर्वांनीच समारंभ रद्द करावे असे मत नव्हतेच,
ज्यांची विवेक बुध्दि आणि संवेदना शाबूत आहेत त्यांनी करावे/केले आहे.

म्हणजे आग्रह नाही पण नाही केलंत तर तुम्हाला निर्बुद्ध आणि संवेदनाहीन म्हणायला आम्ही मोकळे.... असंच ना?

एखादा पूर्वनियोजित समारंभ रद्द केल्यावर जर ४०-५० हजार रुपयांचे किंवा अगदी ५-१० हजाराचे नुकसान होणार असेल तरी समारंभ रद्द करणे अयोग्य ठरेल. त्याच्या संवेदनशीलतेला दाद मिळेल पण ते नुकसान भरून येणार नाही. संवेदनशीलतेला टाळ्या वाजवणारे "बघे" ते नुकसान (वर्गणी काढून) भरून देणार नाहीत. आणि त्यासाठी त्याने कर्ज वगैरे काढले असेल तर अजूनच भयंकर.

नितिन थत्ते

समारंभ

ज्यांची विवेक बुध्दि आणि संवेदना शाबूत आहेत त्यांनी करावे/केले आहे.

उलट ज्यांची विवेक बुद्धी शाबूत आहेत ते हळहळून आपल्या कामाला आणि कार्यक्रमांना लागतील असे वाटते. बॉम्बस्फोट झाले म्हणून त्या दिवशीचे किंवा दुसर्‍या दिवशीचे नाटकांचे प्रयोग रद्द झाले का? सिनेमागृहांनी सिनेमे काढून थिएटर बंद ठेवले का? ते ही करमणूकीचे कार्यक्रम रद्द करून शोक प्रकट करू शकले असते.

अतेरिक्यांना जरब बसेल भिती वाटेल असे काय करायला हवे?

अतिरेक्यांना जरब बसेल असे सामान्य माणूस काही करू शकत नाही असे वाटते. सामान्य माणसाने सावध राहणे, सतर्क राहणे आणि शंका आल्यास कायद्याची मदत घेणे इतकेच करणे योग्य आहे.

हि चलता हे वृत्ती.........
आपल्याला काय आपण अजून जिवंत आहोत,आपल्यावर वेळ येईल तेव्हा रडू/निषेधहि करु,
पण आता सिनेमे बघणे महत्वाचे आहे,
समजा घटने नंतर संपुर्ण मुंबईवासियांनी आप-आपले दैनंदिन व्यवहार बंद केले असते,
सरकारला धारेवर धरले असते तर सरकारनेहि या दबावामुळे 'काहितरी' केले असते असे नाहि का वाटत?
किंवा पुढे तरी करेल?
या घटनेला एव्हाना आठवडा उलटून गेला आहे,
तपास चालू आहे अजूनहि निश्चित धागेदोरे काहिच हाती आलेले नाहीत,
फक्त शक्यताच वर्तवल्या जात आहेत.

अतिरेक्यांना जरब बसेल असे सामान्य माणूस काही करू शकत नाही असे वाटते. सामान्य माणसाने सावध राहणे, सतर्क राहणे आणि शंका आल्यास कायद्याची मदत घेणे इतकेच करणे योग्य आहे.

सहमत आहे,

पण सामान्य नागरिक आज कसा जगतोय? त्याच्या रोजच्या चिंता महागाई/कुटूंब/ काम-व्यवसाय यातून जगण्यासाठीची धडपड यातून सामान्य माणसाने सावध राहणे, सतर्क राहणे आणि शंका आल्यास कायद्याची मदत घेणे या गोष्टि तो केव्हा करायचा?
त्याला या गोष्टि करायच्या असतात याचे भान आता राहिलेय कुठे?
या अपेक्षा फक्त सामान्य नागरिकांकडून अपेक्षिल्या जातायत..ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांनी काय करायचे?
छ्.शि.{वि.टी.} स्टेशनवर हल्ला झाला, त्यानंतर सगळ्या स्टेशन्सवर cctv आणि मेटल डिटेक्टर बसवले गेले पोलीस पहारा लावण्यात आला,
आज काय चित्र आहे?
अर्ध्याहून अधिक cctv आणि मेटल डिटेक्टर यंत्रे नादुरुस्त आहेत,
पोलिस-होमगार्ड तिथे पेपर वाचत कोडी सोडवत बसलेले असतात,
प्रवाश्यांची ये-जा चालूच आहे कोण तपासणी करतोय?
मग कुठे काय झालं की तेवढ्यापुरते ऍलर्ट रहायचे मग आहे पुन्हा येरे माझ्या..

दैनंदिन व्यवहार

हि चलता हे वृत्ती.........
आपल्याला काय आपण अजून जिवंत आहोत,आपल्यावर वेळ येईल तेव्हा रडू/निषेधहि करु,
पण आता सिनेमे बघणे महत्वाचे आहे,

याला कोणी चलता है वृत्ती म्हणू शकेल किंवा "कार्पे डिएम"ही. हे प्रत्येकाच्या नजरेवर अवलंबून आहे परंतु अगदी उठून चित्रपट सिनेमाला नाही गेला पण इतर काहीही न करता रोजचे व्यवहार करणारे बरेच असतील. ते चुकीचे करतात असे म्हणता येत नाही.

या अपेक्षा फक्त सामान्य नागरिकांकडून अपेक्षिल्या जातायत..ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांनी काय करायचे?

आपण आता गोल गोल फिरतोय तेव्हा मी थांबते. शाहरूख, ऋतिक वगैरेही सामान्य नागरिक आहेत. त्यांच्याकडूनही आपण पार्टी न करण्याची अपेक्षा करतो आहोतच. तेव्हा त्यांनी वैतागून यावेळेस जबाबदारी पार पाडली नसल्यास एकवेळ त्यांना मी माफ करते. ;-)

चलता है

चला याला कोणीतरी चलता है वृत्ती म्हणू शकेल इतपत तरी मान्य केलात.
रोजचे व्यवहार करुच नये असा आग्रह नाहि,पण ते 'एक दिवस' न करता सरकारवर दबाव आणने हि अपेक्षा,
मुळ चर्चा अशा घटना घडल्या नंतर येणार्‍या/किंवा पुन्हा असेच म्हणेन
लेखात अन् प्रतिसादात म्हणल्या प्रमाणे काही प्रतिक्रिया डोक्यात जाणार्‍या असतात
त्यात मग हजारे/रामदेव आठवणारे असो किंवा
मुस्लिम समाजाविषयी बोलणारे भाजपचे मुख्तार अब्बास नक्वी असो,
आरेसेस विषयी बोलणारे काँग्रेसचे दिग्विजय सिंग शेखावत/ राहूलगांधी असो,
किंवा मग मराठि वोटबँकसाठी परप्रातीयांना यात ओढणारे राजठाकरे असो,
या लोकांच्या प्रतिक्रिया डोक्यात जाणार्‍या नि संतापजनक आहेत

पण म्हणून सामान्य नागरिकांनी रोषही प्रकट करायचा नाहि काय?
यालाच धरुन,
अशा पार्ट्या करुन मुंबईचे स्पिरिट दाखवायचे प्रयत्न आहेत का असे विचारले आहे? आणि यातून अतेरिक्यांना मॅसेज तरि कसा अन् काय द्यायचा?
हा प्रश्न होता आणि त्यामुळे स्पष्ट होणारी हि समाजातली फूट वाटत नाहि का? असे मत आहे,
यांची उत्तरे मिळाली नाहीत.
अतिरेक्यांना जरब बसेल असे सामान्य माणूस काही करू शकत नाही असे वाटते. सामान्य माणसाने सावध राहणे, सतर्क राहणे आणि शंका आल्यास कायद्याची मदत घेणे इतकेच करणे योग्य आहे. हे नित्याचे सरकारी आवाहन तेवढे मिळाले.

आपण आता गोल गोल फिरतोय तेव्हा मी थांबते. शाहरूख, ऋतिक वगैरेही सामान्य नागरिक आहेत. त्यांच्याकडूनही आपण पार्टी न करण्याची अपेक्षा करतो आहोतच. तेव्हा त्यांनी वैतागून यावेळेस जबाबदारी पार पाडली नसल्यास एकवेळ त्यांना मी माफ करते

शाहरूख,ऋतिक हे सेलेब्रिटि आहेत,आपल्या सारखे ते सामान्य जनतेत 'बेधडक' फिरत नसावेत,
(बस/ट्रेन्स/शॉपिंग वगैरे)सबब मला ते असामान्य वाटत होते,त्यांच्याकडूनही आपण पार्टी न करण्याची अपेक्षा करणे अतिशयोक्ति वाटत असली तरी तो नियम नाही, त्यामुळे त्यांनी ते करायलाच हवे असे नाही,
मात्र हेच लोक ताज हल्ल्यातील मृतांना मेणबत्त्या लावायला आघाडिवर होते हे निदर्षणास आणून द्यायचे होते.
असो
तुम्हि त्यांना माफ करा त्याबद्दल काहिच म्हणने नाहि, मात्र यावरुन
हा प्रतिसाद वैतागून दिलेला प्रतिसाद वाटला ;)
त्यामुळे इथेच थांबणे इष्ट.

असहमत

रोजचे व्यवहार करुच नये असा आग्रह नाहि,पण ते 'एक दिवस' न करता सरकारवर दबाव आणने हि अपेक्षा,

खाजगी पार्टी न करण्याने विशेषतः शाहरूखने पार्टी केली नाही याचा सरकारवर दबाव येण्याशी काहीही संबंध नाही. अर्थात, मुख्यमंत्र्यांना आमंत्रण असते आणि जाता आले नसते तर ते वैतागले असते ही शक्यता वाटते.

शाहरूख,ऋतिक हे सेलेब्रिटि आहेत,आपल्या सारखे ते सामान्य जनतेत 'बेधडक' फिरत नसावेत,
(बस/ट्रेन्स/शॉपिंग वगैरे)सबब मला ते असामान्य वाटत होते,त्यांच्याकडूनही आपण पार्टी न करण्याची अपेक्षा करणे अतिशयोक्ति वाटत असली तरी तो नियम नाही, त्यामुळे त्यांनी ते करायलाच हवे असे नाही,
मात्र हेच लोक ताज हल्ल्यातील मृतांना मेणबत्त्या लावायला आघाडिवर होते हे निदर्षणास आणून द्यायचे होते.

बरोबर आहे ना! आपलं जळतं तेव्हाच आपल्याला कळतं. यावेळी त्यांचे काही नाही झालेले तेव्हा ते परदु:ख शीतल म्हणत असावेत. काय चुकले? जसे त्यांनी यावेळी निदर्शने केली नाहीत तशी राधाबाई चाळीतल्या, व्हीटी स्टेशनला गेल्यावेळी जे अडकले होते, किंवा पंचतारांकित हॉटेलातून जे वाचले ते ही कुठे आले सरकारवर दबाव टाकायला?

तुम्हि त्यांना माफ करा त्याबद्दल काहिच म्हणने नाहि, मात्र यावरुन
हा प्रतिसाद वैतागून दिलेला प्रतिसाद वाटला ;)

गोल गोल फिरून काही साध्य होत नाही आणि मिडियाच्या चापलुसीला भुलू नका एवढेच सांगायचे होते. :-)

अवांतरः
बायदवे, ब्राह्मणांनी आत्मपरीक्षण करावेचे भाग इथेही टाका ना. १०० प्रतिसादी चर्चा नक्की. ;-)

मिडियाच्या चापलुसीला भुलू नये-सहमत

खाजगी पार्टी न करण्याने विशेषतः शाहरूखने पार्टी केली नाही याचा सरकारवर दबाव येण्याशी काहीही संबंध नाही. अर्थात, मुख्यमंत्र्यांना आमंत्रण असते आणि जाता आले नसते तर ते वैतागले असते ही शक्यता वाटते.

त्यांच्याकडून आपण पार्टी न करण्याची अपेक्षा करणे अतिशयोक्ति वाटत असली तरी तो नियम नाही, त्यामुळे त्यांनी ते करायलाच हवे असे नाही,
त्यामुळे शाहरूखने पार्टी केली नाही याचा सरकारवर दबाव येण्याशी काहीही संबंध नाही हे ओघाने आलेच कि.
मुख्यमंत्री वैतागले असते ही शक्यता वाटते - सहमत :)

बरोबर आहे ना! आपलं जळतं तेव्हाच आपल्याला कळतं. यावेळी त्यांचे काही नाही झालेले तेव्हा ते परदु:ख शीतल म्हणत असावेत. काय चुकले? जसे त्यांनी यावेळी निदर्शने केली नाहीत तशी राधाबाई चाळीतल्या, व्हीटी स्टेशनला गेल्यावेळी जे अडकले होते, किंवा पंचतारांकित हॉटेलातून जे वाचले ते ही कुठे आले सरकारवर दबाव टाकायला?

इतर सरकारवर दबाव टाकायला आले नाहीत म्हणून आपणहि स्वस्थ बसावे काय?
माझे काहिच जळालेले नाहि,माझा कुणीही नातेवाईक दुर्दैवी घटनेच्या जवळपास रहात नाही.
आजवर झालेल्या बॉम्बस्फोटात माझे आप्त/मित्र या पैकि कुणिहि मृत्युमुखि पडलेले नाहि,तरीहि मला झालेल्या प्रकारा बद्दल फार वाइट वाटतेय,
उद्या माझ्या आप्त/मित्र या पैकि कुणि त्यात बळी जाणार नाहि याची हमी कुणि देउ शकेल काय?
त्यामुळे मि तरी परदु:ख शीतल असे मी तरी म्हणनार नाहि ,
म्हणूनच म्हणले की यावर उपाय काय हे केव्हा थांबणार?

गोल गोल फिरून काही साध्य होत नाही आणि मिडियाच्या चापलुसीला भुलू नका एवढेच सांगायचे होते

या सल्ल्या बद्दल आभारी आहे,
हे थांबवण्यासाठी उपाय सुचवा हेच मी प्रत्येक प्रतिसादात म्हणत आलोय.

अवांतरः
बायदवे, ब्राह्मणांनी आत्मपरीक्षण करावेचे भाग इथेही टाका ना. १०० प्रतिसादी चर्चा नक्की.

टाकले असते हो पण माझ्या समज प्रमाणे इथे आणि तिथे सदस्य सारखेच आहेत,(अपवाद)
आणि मुख्य म्हणजे मला तिथल्या एका सदस्यानेच तो धागा टाकण्याचे जाहिर आवाहन केले होते,
(नंतर ते त्यांच्याच अंगलट आले, हा भाग वेगळा) नाहितर मला तरी त्यात रस नव्हताच, :-)
बाकी १०० प्रतिसाद कशाला आम्हाला त्याची हौस नाही बॉ,
मला चर्चा २-४ प्रतिसादि झाली तरी ती चांगली,निकोप व्हावी हाच उद्देश असतो आणी राहिल,
तुम्हाला तसे १०० प्रतिसाद हवे असल्यास सांगा,मि नक्कि मिळवून देईन अगदि खात्रीने,;)

कैच्याकै

मुंबईत रोज किती लोक क्षयरोगाने मरतात ते माहिती आहे काय?
या संस्थळावर भावुकतेला थारा नाही (अशी आशा आहे).

काशिमिर्‍याला भिंत पडली

काशिमिर्‍याला भिंत पडली आणि १० मजूर मेले ना. मुंबईत कितीजणांनी दुखवटा पाळला असेल बरे? ;-)

दहशतवाद?

दहशतवाद/अतेरिकि कारवाया अन् अपघात यात फरक असावा.
भिंत पडून मृत्यु येणे हि घटना दुर्दैवी असली तरी त्याने लोकांमधे बॉम्बस्फोट झाल्या नंतरची अगतिकता/व्यवस्थेविषयी रोष,भितीचे सावट,या गोष्टि येत नसाव्यात.

येतात!

अगतिकता नक्कीच यावी, क्षयरोगातील कितीतरी टक्के जीवाणू mdr, xdr, इ. झालेले आहेत, उलट, घरात बसणार्‍यांना/अमेरिकेतल्यांना मुंबईतील बाँबस्फोटांनी मुळीच अगतिक वाटू नये.
क्षयरोगाचा मुकाबला करू न शकण्याबद्दल व्यवस्थेविषयी रोष नक्कीच वाटू शकेल, उलट, दहशतवादाचा मुकाबलाच शक्य नसतो असे वाटल्यास त्याबद्दल व्यवस्थेविषयी रोषच वाटणार नाही.
क्षयरोगाने मृत्यू ओढविण्याची शक्यता बाँबस्फोटात मृत्यू येण्याच्या शक्यतेपेक्षा नक्कीच अधिक असल्यामुळे भीतीचे सावटही क्षयरोगाचेच अधिक येईल असे मला वाटते.
असाच युक्तिवाद भिंत पडण्याविषयीही करता येईल.

ठिक

असाच युक्तिवाद भिंत पडण्याविषयीही करता येईल.

भिंत चीन सारखी असेल आणि त्यातही अवाढव्य असेल, जेणे करुन ती पडली तर एखाद्या राज्यातील नागरिक मृत्युमुखी पडणार असतील,तसेच त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी जाताना/वावरताना मनात भितीचे सावट असेल तर त्याबद्दल अगतिकता/व्यवस्थेविषयी रोष,भितीचे सावट,या गोष्टि आल्या तर समजू शकते,
भिंत पडण्याविषयीचा तुमचा युक्तिवाद काय आहे ते वाचायला आवडेल.

दुसरे अशा अतेरिकी घटना घडल्यावर सामान्य नागरीकांनी काय करायला हवे?
त्या बद्दल प्रतिक्रिया द्यायच्या कि नाही?
(डोक्यात जाणार्‍या उथळ नी संतापजनक प्रतिक्रिया वगळून,)
अशा घटना घडल्यावर त्या पुन्हा होऊ नये यासाठि काय करायला हवे?
अतेरिक्यांना जरब बसेल भिती वाटेल असे काय करायला हवे?
प्रतिक्रिया देऊन ते साध्य होनार नाहि हे मलाही माहित आहे मग यावर उपाय काय?
का यावर दुर्लक्ष करुन आपण तर वाचलो ना.. असे म्हणून सुदैवाने वाचलो याचा आनंद व्यक्त करत आपले उर्वरित श्वास घेत रहायचे?
हे कधीच थांबणार नाही काय?

नाही

भिंत पडण्याविषयीचा तुमचा युक्तिवाद काय आहे ते वाचायला आवडेल.

तो युक्तिवाद प्रियाली यांनी दिला आहे, भिंतीविषयीचे उदाहरण त्यांनीच दिले होते. क्षयरोग्यांच्या मृत्यूविषयी तुम्ही आतातरी अगतिकता, इ. साजरे केलेत की नाही?

दुसरे अशा अतेरिकी घटना घडल्यावर सामान्य नागरीकांनी काय करायला हवे?

प्रतिसादांचे रडगाणे नको असे या चर्चाप्रस्तावात सुचविले आहे.
--
तुम्हारा क्या गया, जो तुम रोते हो?

येतात

भिंत पडून मृत्यु येणे हि घटना दुर्दैवी असली तरी त्याने लोकांमधे बॉम्बस्फोट झाल्या नंतरची अगतिकता/व्यवस्थेविषयी रोष,भितीचे सावट,या गोष्टि येत नसाव्यात.

कंस्ट्रक्शन साइटवरची भिंत कोसळली ती निकृष्ट बांधकाम, हलगर्जीपणा वगैरेमुळे. तेथे भ्रष्टाचार, निष्काळजीपणा वगैरेंचा अंतर्भावही असू शकेल त्यामुळे अगतिकता/व्यवस्थेविषयी रोष वगैरे नक्कीच येत असावे. फक्त ते मजूरांच्या कुटुंबियांखेरीज इतरांना येत असावे का हा प्रश्न आहे.

व्याप्ति कमी आहे.

कंस्ट्रक्शन साइटवरची भिंत कोसळली तर निकृष्ट बांधकाम, हलगर्जीपणा वगैरेमुळे. तेथे भ्रष्टाचार, निष्काळजीपणा वगैरेंचा अंतर्भावही असू शकेल=सहमत,
पण त्याची व्याप्ती बॉम्बस्फोटाच्या तुलनेत कमी आहे,
निकृष्ट बांधकामामुळे भिंत कोसळल्यामुळे त्याबद्दल उत्तर देण्यासाठी प्रधानमंत्री/मुख्यमंत्री,हे पत्रकारपरिषदा घेत नसावेत,
भिंत कोसळल्या ठिकाणी एखाद्या चित्रपट दिग्दर्शकाला (रामू) त्या घटनास्थळी जावून पाहणी करुन त्यावर आधारीत चित्रपट काढावा असे वाटत नसावे,
आणि त्यामुळे एखाद्या राज्याचा मुख्यमंत्र्याला पदावरुन पदच्युत व्हावे लागत नसावे
म्हणून म्हणले दहशतवाद/अतेरिकि कारवाया अन् अपघात यात फरक असावा.

अति झाले अन् हसू आले.

राग येऊ द्यायचा नाही.म्हणजे अतिरेकी किंवा प्रतिक्रियाकार दोघांचाही.तसेही जुन्या पठडीप्रमाणे क्रोधात् भवति संमोहः आणि शेवटी बुद्धिनाश आणि सर्वनाश ठरलेलाच.मग कशाला (आपलीच) बुद्धी आपणच नासवून घ्यायची?
जस्मिन् रेवॉल्यूशन्,मेणबत्त्या,भीषण कविता वगैरे एक तात्पुरते फॅड् असते.प्रचलित पद्धतीने हाताळली जाणारी माध्यमे-विशेषत: इलेक्ट्रॉनिक् माध्यमे-हा एक अतिशय,प्रचंड,भीषण काळा विनोद आहे. हसू आले तर हसा बापडे.

अशा वेळी भावुक प्रतिक्रिया येतील, हे अपेक्षित

अशा वेळी भावुक प्रतिक्रिया येतील, हे अपेक्षित आहे.

अशा मोठ्या घटनेनंतरच्या प्रतिक्रियांकडे तारतम्याने बघायला पाहिजे.

तारतम्य

म्हणजे तारतम्य (प्रतिक्रिया) बघणार्‍यांकडे पाहिजे, जाहिरपणे कळफलक बडवणार्‍यांकडे नको. का तर ते भावुक आहेत आणि त्यांचा कोणी नातेवाईक दादर/झवेरी बाजार परीसरात राहतो. असेच का?

अपेक्षित

सर्वचजण 'तशा' प्रतिक्रिया देत नाहीत. विशेषतः, ज्यांना थेट झळ ("आऊचा काऊ अर्ध्या तासामुळे वाचला/जवळच राहतो", याला 'थेट झळ' म्हणणे मला पटत नाही) पोहोचलेली नाही अशांनीही भावुक (आणि सुप्त धार्मिक द्वेषाने प्रेरित?) प्रतिक्रिया देण्याचे प्रयोजन काय?
डिफेक्टिव पीस वाढत आहेत, त्यांच्याकडे किवेने/घृणेने का पाहू नये?

असहमत.

कोणाच्या भावना कशाशी निगडीत असतील हा वैयक्तीक प्रश्न आहे. एखाद्या आवडत्या नट/नटीच्या मृत्यूने भावूक होऊ शकतो, तर एखाद्या आवड्या क्रिडापटूच्या तर अजून् एखादा कोणा कलाकाराच्या वा शास्त्त्रज्ञाच्या. कोणी देशप्रेमाविरोधी कारवाईने भावूक होऊ शकतो तर कोणी आवडत्या संघाच्या पराभवाने. त्यामूळे भावूक प्रतिक्रेयेचे प्रयोजन विचारण्यात हशील नाही. अर्थात त्यात तुम्हाला सूप्त हेतू दिसत असेल तर तो तूम्ही शोधू शकता आणि त्यावर प्रतिक्रीया देऊ शकताच.

-Nile

तरीही

काश्मीरला देशप्रेमविरोधी कारवायांत सतत मृत्यू घडतात. मुंबई आणि काश्मीर येथील मृत्यूंसाठी कोणी साधारण समानच भावुक झाले तर एकवेळ समजून घेता येईल असे वाटते.

रिलेटिव्ह..

१. मुंबईत सतत बॉम्बस्फोट जर झाले तर यावरील प्रतिक्रीयांची संख्या कमी होईल की वाढेल?
१अ) काश्मीर मध्ये(सतत) होणार्‍या मृत्यूंना माध्यमे मूंबईत घडणार्‍या स्फोटांइतके फूटेज सतत का देत नसावे?
२. भावूक प्रतिसाद देणारे, ह्या स्थितीत, मुंबईला जवळचे मानतात की काश्मिरला? जे जास्त जवळचे त्यानूसार् प्रतिक्रीयेतील भावूकता कमी जास्त असावी की नसावी?
३. देशाची वादातीत सीमा आणि देशांतर्गत सूरक्षित मानली गेलेली वसाहत, कोणे दहशतवाद झाल्यास जास्त खळबळ माजेल?

-Nile

आयरोनिक

सहमत.

आयरोनिक - मध्यमवयीन पांढरपेशे लोक जे करू शकतात ते मध्यमवयीन पांढरपेश्या लोकांनाच आवडत नाही. :)

काय वाटावे

'तश्या' प्रतिक्रीया वाचुन काय वाटावे असा तुमचा आग्रह आहे?

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

धागा आवडला

धागा आवडला. किंचित शैक्षणिक छटा आहे. आंतरजालावर आपण वावरतो त्याचेदेखील काही "प्रोटोकॉल्स" असतात(असावेत.) कारण माझ्या २ वाक्यांनी समोरच्या व्यक्तीच्या मनात विचारांचे तरंग(रिपलस) उमटतात. तेव्हा मी शक्य तितका आक्रस्ताळेपणा, कर्कश्यपणा, बोचरेपणा आदि वैगुण्ये टाळणे आवश्यक आहे. मान्य!!!!

किंबहुना - जिथे म्हणून आपण अन्य व्यक्तीसन्नीध (मग विचारांनी अथवा कसे) येतो तिथे दुसर्‍या व्यक्तीचा विचार आपल्यापेक्षा काकणभर अधिक केलाच पाहीजे.

^ वर