माणूस

रेल्वेच्या तिकीट खिडकीवर एक माणूस रांग मोडून पुढे घुसत जोरात ओरडतो, "मी कोण आहे हे माहित आहे का?"
तो कर्मचारी घोषणा करतो, "या काउंटरवर एका माणसाला तो कोण आहे ते आठवत नाही. कृपया त्याला ओळखणा-यांनी मदत करावी."
हा जोक वाचून मला हसू आले. मग मनात विचार आला हे हसू का बरं येत असेल?
चिडणे, राग येणे, शिसारी येणे, हसणे, रडणे या वेगवेगळ्या भावना आहेत. त्याही पुढे जाउन असे म्हणता येइल की अपल्या मनातील वेगवेगळ्या अवस्था आपण त्या त्या माध्यमाद्वारे(चिडणे, राग येणे, शिसारी येणे, हसणे, रडणे) बाहेर दाखवून देत असतो, व्यक्त करत असतो.

आमच्या आजीकडे एक कुत्रा होता. मी काठीने मारले म्हणून रुसून बसलेला मी त्याला पहिला आहे. असे इतरांचेही अनुभव आहेत का, ते माहिती नाही. ज्याअर्थी तो रुसून बसला त्याअर्थी त्याला ते आवडले नसणार व त्याचा राग आला असेल. व रुसून बसून त्याने त्याचा राग व्यक्त केला. म्हणजे प्राण्यांनाही आपल्या भावना व्यक्त करता येतात.

पण हसणे ओक्साबोक्सी रडणे हे माणसातच आढळते. भाषा हा प्रकारसुध्दा माणसातच आढळतो. निरनिराळे शोध माणूसच लावतो.
पण काही इतर सजीव देखील घरटी, बीळ बांधताना आढळतातच ना. ऑस्ट्रेलियात प्लॅटीपस बंधारे बांधतो. सुगरणीचा खोपा जगजाहिर आहे. धनेश (हॉर्नबिल) उंच झाडातील ढोलीमधे बायकोला ठेऊन फ़क्त तिची चोच बाहेर येईल एवढेच भोक ठेवतो. पण या सर्वांपेक्षा माणूसच वरच्या दर्जाची कामे करतो. आणि जसजशी वर्षे वाढत आहेत तसे त्याचा दर्जाही वाढत आहे. आणि इतर सजीव जेथल्या तेथेच आहेत. काही तर नष्ट झालेत व काही त्याच्या मार्गावर आहेत. काही माणसाच्याच कर्तृत्वामूळे नष्ट झाले आहेत.

माणसालाच हा वरचा दर्जा का मिळाला आहे? त्याच्याइतकी हुशार दुसरि प्रजाती का नाही?

इतका हुशार असूनदेखिल तो आपली घरे बनवण्याच्या नादात इतर सजीवांची घरे उद्ध्वस्त करीत आहे. असे करून तो पर्यावरणीय संतुलन बिघडवत आहे, असे ऐकून आहे. आणि त्यामुळे तोही नष्ट व्हायच्या मार्गावर आहे. तो नष्ट व्हावा एवढीच बुद्धी त्याला मिळालीय का?

लेखनविषय: दुवे:

Comments

शेवटच्या परिच्छेदातला विषाद समजण्याजोगा आहे

शेवटच्या परिच्छेदातला विषाद समजण्याजोगा आहे.

(परंतु त्याकरिता मानवेतर जनावरे आणि मानव यांची अलंकारिक तुलना जरा जास्तच लांबली आहे. म्हणजे अख्खा निबंधच या दीर्घ अलंकाराने व्यापलेला आहे. ललितसाहित्याच्याच्या दीर्घ परंपरेत पशु-उपमेचे दोन्ही प्रकार दिसतात : कधीकधी पशूंचे वागणे मानवास अनुकरणीय म्हणून उपमा दिली जाते, तर कधीकधी त्याज्य म्हणून. अलंकारिक भाषा ही दोन्ही बाजूंना लागू असल्याकारणाने युक्तिवाद म्हणून ती विशेष उपयोगाची नाही. मनुष्यांच्या समाजाने कसे वागावे, याकरिता मनुष्यांच्या समाजातलेच नैतिक युक्तिवाद भावनेच्या पलीकडे कायमस्वरूपी परिणाम करू शकतील. अर्थात, युक्तिवादाच्या सोबत थोड्या प्रमाणात मानवेतर जनावरांशी अलंकारिक तुलना असली तरी चालतेच.)

खंत नाही

माणूस असला काय नसला काय, कोणाला काय फरक पडतो ?

अंदाज

माणसालाच हा वरचा दर्जा का मिळाला आहे? त्याच्याइतकी हुशार दुसरि प्रजाती का नाही?
हा चर्चाविषय आहे असे गृहित धरतो.

माणसालाच हा वरचा दर्जा का मिळाला आहे?

याला अनेक कारणे आहेत. मुख्य म्हणजे माणसाचा प्रगत मेंदु (जो आकारानेहि बराच मोठा आहे). शिवाय काहि शारिरिक बदल/वैषिष्ट्ये माणसाच्या पथ्यावर पडले (जसे वैषिष्ट्यपूर्ण अंगठा, ६ दिशांनी वळवता येणारे मनगट, दोन पायांवर उभे राहता येणे वगैरे वगैरे)

त्याच्याइतकी हुशार दुसरि प्रजाती का नाही?

याचे उत्तर माहित नाहि. त्याच बरोबर इतर प्राण्यांची हुशारी कशी मोजावी हा प्रश्नही पडतो

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

अंदाज.... अपना अपना

मुख्य म्हणजे माणसाचा प्रगत मेंदु (जो आकारानेहि बराच मोठा आहे).

माणसालाच असा मेंदू का ’मिळाला’?

इतर प्राण्यांची हुशारी कशी मोजावी हा प्रश्नही पडतो

तेही खरच. मी माण्साने लावलेले विविध शोध, केलेली बांधकामे, निर्माण केलेल्या विविध वस्तू यावरून हुशारी मोजली.

प्रश्न नीट कळले नाहीत

माणसालाच हा वरचा दर्जा का मिळाला आहे?

वरचा दर्जा 'मिळणे' म्हणजे नक्की काय? 'तशी सर्वच प्राण्यांना काही ना काही उंची असते, मग उंचीच्या बाबतीत जिराफालाच वरचा दर्जा का मिळाला आहे?' असाही प्रश्न विचारता येतो. 'मिळण्या'मध्ये कोणीतरी हा दर्जा वाटत होतं तेव्हा माणसाला तो अधिक प्रमाणात मिळाला असं काहीतरी प्रतीत होतं. आकाराच्या बाबतीत देवमासा वरच्या दर्जाचा असतो. एकेकाळी डायनॉसॉर होते. अर्थात तेही माणसाने काहीही न करता गेलेच. (त्याकाळी माणूस नव्हता)

आणि त्यामुळे तोही नष्ट व्हायच्या मार्गावर आहे. तो नष्ट व्हावा एवढीच बुद्धी त्याला मिळालीय का?

या विधानाला देखील नक्की काय म्हणायचं कळत नाही. गेल्या दोन शतकात मनुष्यजात संख्येने चौपट झालेली आहे. तीन शतकात सहापट झालेली आहे. आयुर्मान दुप्पट झालेलं आहे. असं असताना मनुष्यजात नष्ट होतेय असं म्हणणं चुकीचं आहे. माणसाने पर्यावरणाची जी 'हानी' केलेली आहे त्याच्या हजारोपट हानी वेळोवेळी नैसर्गिक घटनांनी झालेली आहे. पर्यावरण नष्ट झालंय असं म्हणणंदेखील उन्हाच्या झळा लागल्यावर घर पेटलं आहे असं म्हणण्यासारखं आहे.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

प्रश्न आता कळले का?

वरचा दर्जा 'मिळणे' म्हणजे नक्की काय?

मला कोणतीही गोष्ट दिल्याशिवाय ’मिळत" नाही. उदा.-- पैसे, जेवण, माहिती, मार, हुद्दा, ज्ञान, इ इ

मग उंचीच्या बाबतीत जिराफालाच वरचा दर्जा का मिळाला आहे?

असं काही नाही जिराफ़ाची सर्वांत जास्त उंची आहे ५.५ मी तर आफ़्रीकन हत्तीची आहे ४ मी. फ़रक काही इतका ठळक नाहि.
http://www.ugru.uaeu.ac.ae/ugruenglish/english-files/Student/ProcessWrit...
-- आफ़्रिकन हत्ती
http://wiki.answers.com/Q/What_is_the_height_of_an_adult_male_giraffe
--- जिराफ़

'मिळण्या'मध्ये कोणीतरी हा दर्जा वाटत होतं तेव्हा माणसाला तो अधिक प्रमाणात मिळाला असं काहीतरी प्रतीत होतं

तसंही असेल कदाचित.

एकेकाळी डायनॉसॉर होते. अर्थात तेही माणसाने काहीही न करता गेलेच.

'तेही' गेले कारण तेदेखिल माणसाप्रमाणेच संपूर्ण पृथ्वीवर पसरले होते व एकवेळ अशी आली कि जे शाकाहारी डायनॉसोर होते त्याना खायला पुरेसे अन्न(वनस्पती) ’मिळेना’ (डायनॉसोरसची संख्या वनस्पतींपेक्षा वाढल्याने). त्यामुळे ते नष्ट झाले. आणि मांसाहारी डयनासोरसचे ते अन्न होते. आणि खायला अन्न न ’मिळाल्याने’ त्यांचीही पहिल्या डायनासोरप्रमाणेच गत झाली. असाही एक विचारप्रवाह आहे. याप्रमाणेच माणसाचीही गत होईल का, असे मला म्हणायचे आहे.

गेल्या दोन शतकात मनुष्यजात संख्येने चौपट झालेली आहे. तीन शतकात सहापट झालेली आहे. आयुर्मान दुप्पट झालेलं आहे.

याच्याही पुढे संख्येने वाढायला मनुष्य जातीला काही स्कोप आहे का? असल्यास किती?

माणसाने पर्यावरणाची जी 'हानी' केलेली आहे त्याच्या हजारोपट हानी वेळोवेळी नैसर्गिक घटनांनी झालेली आहे

उदाहरणे देता येतील का?

:(

>>मला कोणतीही गोष्ट दिल्याशिवाय ’मिळत" नाही. उदा.-- पैसे, जेवण, माहिती, मार, हुद्दा, ज्ञान, इ इ

अरेरे, स्वावलंबी असलेलं बरं असतं बहुतेक वेळा. सहानुभूती वाटते आपल्याबद्दल.

नितिन थत्ते

+१

मलासुद्धा.

उदाहरण

उदाहरणे देता येतील का?

जरूर.

वरच्या आलेखात य अक्ष किती टक्के फॅमिलीज नष्ट झाल्या, आणि क्ष अक्षावर किती दशलक्ष वर्षापूर्वी ते दिलेलं आहे. फॅमिलीज नष्ट होतात तेव्हा प्रत्यक्ष प्रजाती अधिकही नष्ट होऊ शकतात. उदाहरणार्थ साडेसहा कोटी वर्षांपूर्वी डायनोसॉर नष्ट झाले तेव्हा पृथ्वीवरच्या ७५% प्रजाती नष्ट झाल्या. एकंदरीत आलेखावरून कित्येक प्रजाती नष्ट होणं हे नैसर्गिकच आहे हे दिसून येतं.

तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांना मोघम किंवा गुळमुळीत उत्तरं देण्याऐवजी किंवा प्रतिप्रश्न विचारण्याऐवजी तुमचा मुद्दा नीट मांडलात तर चर्चा अधिक सुकर होईल.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

धन्यवाद

उदा. दिल्याबद्दल धन्यवाद.

१. माणुस हिच प्रजाती या पृथ्वीवर आपली संख्या वाढवून का आहे? याबाबत चर्चा व्हावी.
२. माणूस ज्याप्रमाणे नवनवे तंत्रज्ञान विकसीत करतोय त्याप्रमाणे इतर कोणतीही प्रजाती करताना का दिसत नाही? (मी वापरलेला दर्जा हा शब्द माणसाची तंत्रज्ञानातील प्रगती याअर्थी आहे). यामागे माणसाचा प्रगत मेंदू जरी असला आणि त्यातून त्याचा युनिकनेस दिसत असला तरी या मेंदूच्या जवळपासतरी जाणारा मेंदू इतर कोणत्या सजीवात आढळतो का? माणसाला बुद्धीजीवी सजीव म्हणतात कारण तो आपल्या बुद्धीच्या जोरावर जगत असतो संवाद साधत असतो नवनवे शोध लावत असतो. तो पार पृथ्वीच्या बाहेर अंतराळात प्रवेश करतो. याबरोबरच तो अंतराळात आपल्यासारखा बुद्धीमान सजीव शोधत आहे. पण अजूनही त्याला असा मित्र मिळालेला नाही, अंतराळातही व पृथ्वीवरही(डायनॉसॊरसारखे त्याचे फ़ॉसिल ही मिळालेले नाहीत). . असं का व्हावं? याबाबत माहिती व्हावी/ चर्चा व्हावी ही मज बापडीची (उगाचच)अपेक्षा होती.
मुद्दा १ बाबत असेही म्हणता येईल की वनस्पती ही प्रजातीसुद्धा मोठ्या प्रमाणावर पृथ्वीवर आहे. पण तिने अजूनही बुद्धीच्या जोरावर इतर सजीवांवर/ पर्यावरणावर हल्ला केलेला नाही ( ज्याप्रमाणे माणुस राहण्यासाठी, प्रकल्पांसाठी....थोडक्यात स्वत:च्या तत्कालिन फायद्यासाठी पर्यावरण नष्ट करतो)

पर्यावरण-- http://en.wikipedia.org/wiki/Ecosystem

थोडा पर्स्पेक्टिव्ह

१. माणुस हिच प्रजाती या पृथ्वीवर आपली संख्या वाढवून का आहे? याबाबत चर्चा व्हावी.

हे बरोबर नाही. इतर अनेक प्रजातींची लोकसंख्या गेल्या काही शतकांत दुप्पट तिप्पट झालेली असणं सहज शक्य आहे. हे निसर्गात कित्येक प्रजातींच्या बाबतीत सर्रास चालतं. किंबहुना गेल्या काही दशलक्ष वर्षांत प्रजातींची संख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. दुवा. त्यामानाने माणूस फारच नवा आहे.

एकंरीत पृथ्वीवर इतर कोणी बुद्धीवान का नाही असा तुमचा प्रश्न आहे. या 'का?' मध्ये 'कुठच्यातरी तर्कसंगत व्यवस्थेत हे आश्चर्यकारक आहे' हे गृहितक दडलेलं आहे. उंची, वजन, आकारमान यांचे जसे फायदे असतात तसेच 'बुद्धी'चे किंवा प्रगत मेंदूचे आहेत.

प्रजाती आणि पर्यावरण एकमेकांवर सतत हल्ले करत असतात. पृथ्वीवर एके काळी ऑक्सिजनच नव्हता. सगळ्या प्रजाती ऑक्सिजनशिवाय जगायच्या. काही प्राण्यांमुळे हे प्रमाण वाढायला लागलं (सायंटिफिक अमेरिकन मधल्या एका लेखाचं शेवटचं वाक्य आहे - But one thing is clear—the origins of oxygen in Earth's atmosphere derive from one thing: life.) या ऑक्सिजननिर्मितीमुळे ऑक्सिजनशिवाय जगणाऱ्या सर्व प्रजाती नष्ट झाल्या. पर्यावरणच बदलून गेलं. माणसाने एवढा प्रचंड परिणाम साधायला खूप कष्ट घ्यावे लागतील.

अंतराळात इतर बुद्धी असलेले जीव शोधण्याचा प्रश्न खूपच किचकट आहे. आपण शोधायला सुरूवात करून जेमतेम पन्नास वर्षं झाली असतील. इतक्या प्रचंड विश्वात पन्नास वर्षं म्हणजे काहीच नाही. धीर धरा.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

बुद्धिच्या पलिकडले

हे बरोबर नाही. इतर अनेक प्रजातींची लोकसंख्या गेल्या काही शतकांत दुप्पट तिप्पट झालेली असणं सहज शक्य आहे. हे निसर्गात कित्येक प्रजातींच्या बाबतीत सर्रास चालतं. किंबहुना गेल्या काही दशलक्ष वर्षांत प्रजातींची संख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. दुवा. त्यामानाने माणूस फारच नवा आहे

वाढलेली आहे तशीच कमी सुद्धा झालेली आहे, पण त्यासाठी कोणतीही एक प्रक्रिया(?) कारणीभूत ठरवता येणार नाही हे दिलेल्या दुव्यातुन कळले.

एकंरीत पृथ्वीवर इतर कोणी बुद्धीवान का नाही असा तुमचा प्रश्न आहे. या 'का?' मध्ये 'कुठच्यातरी तर्कसंगत व्यवस्थेत हे आश्चर्यकारक आहे' हे गृहितक दडलेलं आहे.

म्हणजे ही तर्कसंगत व्यवस्था नाही हे मी गृहीत धरते.

- But one thing is clear—the origins of oxygen in Earth's atmosphere derive from one thing: life
काहीच कळ्ळ नाही.

अंतराळात इतर बुद्धी असलेले जीव शोधण्याचा प्रश्न खूपच किचकट आहे. आपण शोधायला सुरूवात करून जेमतेम पन्नास वर्षं झाली असतील. इतक्या प्रचंड विश्वात पन्नास वर्षं म्हणजे काहीच नाही. धीर धरा

धरते.
तसं सगळच( विचारलेले प्रश्न) किचकट आहे.

हास्यास्पद.

त्रागा खरा आहे की उगाच रडारड आहे असे वरील १०-१५ ओळी वाचून् वाटले. मते प्रामाणिक आहे वैयक्तिकरित्या घेतली नाहीत तर बरे.

मला कोणतीही गोष्ट दिल्याशिवाय ’मिळत" नाही. उदा.-- पैसे, जेवण, माहिती, मार, हुद्दा, ज्ञान, इ इ

तुम्हाला श्वास घ्यायला हवा कोणी बाटलीत आणून देतो का हो?

५.५ मी तर आफ़्रीकन हत्तीची आहे ४ मी. फ़रक काही इतका ठळक नाहि.

इतका ठळक नाही? तुमच्या (म्हणजे मानवाच्या) साधारण् उंची एव्हढा आहे की फरक.

'तेही' गेले कारण तेदेखिल माणसाप्रमाणेच संपूर्ण पृथ्वीवर पसरले होते व एकवेळ अशी आली कि जे शाकाहारी डायनॉसोर होते त्याना खायला पुरेसे अन्न(वनस्पती) ’मिळेना’ (डायनॉसोरसची संख्या वनस्पतींपेक्षा वाढल्याने). त्यामुळे ते नष्ट झाले. आणि मांसाहारी डयनासोरसचे ते अन्न होते. आणि खायला अन्न न ’मिळाल्याने’ त्यांचीही पहिल्या डायनासोरप्रमाणेच गत झाली. असाही एक विचारप्रवाह आहे. याप्रमाणेच माणसाचीही गत होईल का, असे मला म्हणायचे आहे.

हहपुवा. वनस्पती मिळेना तर इतर झाडपाल्यांवर जगणारे का संपले नाहीत अन् त्यांच्यावर जगणारे मासांहारी का संपले नाहीत?

-Nile

उगाच त्रागा

तुम्हाला श्वास घ्यायला हवा कोणी बाटलीत आणून देतो का हो?

बाटलीतून आणून द्यायला तो तरी स्वतः हवा तयार करतो का हो?

इतका ठळक नाही? तुमच्या (म्हणजे मानवाच्या) साधारण उंची एव्हढा आहे की फरक

पण साधारण हत्तीपुढे साधारण मानव किस झाडकी पत्ती वाटतो, त्याचं काय?

हहपुवा. वनस्पती मिळेना तर इतर झाडपाल्यांवर जगणारे का संपले नाहीत अन् त्यांच्यावर जगणारे मासांहारी का संपले नाहीत

वनस्पती व इतर झाडपाले यांतील फरक स्पष्ट करा. तसेच ते माझे वैयक्तिक मत नाही आहे, तसा मतप्रवाह आहे एवढेच माझे म्हणणे आहे. व ज्याप्रमाणे डायनासोर गेले त्याप्रमाणेच माणूस जंगलांवर जास्तीत जास्त आक्रमण करून आपली तिरडी सजवत आहे का? असं मला म्हणायचं होतं

त्रागा खरा आहे की उगाच रडारड आहे असे वरील १०-१५ ओळी वाचून् वाटले. मते प्रामाणिक आहे वैयक्तिकरित्या घेतली नाहीत तर बरे

अजिबात नाही.

..

मला कोणतीही गोष्ट दिल्याशिवाय ’मिळत" नाही. उदा.-- पैसे, जेवण, माहिती, मार, हुद्दा, ज्ञान, इ इ

बाटलीतून आणून द्यायला तो तरी स्वतः हवा तयार करतो का हो?

कोण् तो? तुमच्या त्याने पैसे पण तयार केले आहेत का?

पण साधारण हत्तीपुढे साधारण मानव किस झाडकी पत्ती वाटतो, त्याचं काय?

तेचं म्हणतोय. रिलेटीव्हीटी.

वनस्पती व इतर झाडपाले यांतील फरक स्पष्ट करा.

वनस्पती मिळेना तर इतर (झाडपाल्यांवर जगणारे) का संपले नाहीत अन् त्यांच्यावर जगणारे मासांहारी का संपले नाहीत

-Nile

तो

बाटलीतून आणून द्यायला तो तरी स्वतः हवा तयार करतो का हो?

कोण् तो? तुमच्या त्याने पैसे पण तयार केले आहेत का?

बाटलीवाला. पैशांपेक्षा बाहेर हवा फुकटात 'मिळते'. ;)

तेचं म्हणतोय. रिलेटीव्हीटी

ओ हो हो हो.... म्हणजे 'माणसाच्या दृष्टीने जो मोठा विनाश आहे तो या सृष्टीच्या(पर्यावरणाच्या) दृष्टीने काहीच नाही' याअर्थी घेतेय. बरोबर का?

वनस्पती मिळेना तर इतर (झाडपाल्यांवर जगणारे) का संपले नाहीत अन् त्यांच्यावर जगणारे मासांहारी का संपले नाहीत

कारण वन् ऍन्ड ओन्ली माणुस तयार( उत्क्रांत) व्हायचा होता ही सृष्टी नष्ट करायाला. बरोबर स्वतःलाही

पर्यावरण

आपल्या प्रतिक्रियेतून माणसाने पर्यावरणाची हानी केलेली नाही असे आपल्याला म्हणावयाचे आहे काय? आत्ता माणूस नाविन्याच्या नावाखाली जे काही करू पाहतो आहे, त्याच्या पर्यावरणावर होणार्या परीणामाबाबत पुरेशी जागृती आहे व माणसाला त्याची जाणीव आहे असे काही अपवाद वगळता वाटत नाही.

पर्यावरणाची हानी म्हणजे काय?

माणसाने पर्यावरणाची हानी केलेली नाही असे आपल्याला म्हणावयाचे आहे काय?

पर्यावरणाची हानी म्हणजे काय? याच्या उत्तरावर या प्रश्नाचे उत्तर आहे.
माणसाला तोटा पोहोचवणारी परिस्थिती म्हणजे पर्यावरण हानी असे तुम्हाला म्हणायचे असेल तर कदाचित माणसाने थोडी हानी केली असेल. मात्र विचार करताना माणूस नावाच्या (अनेक प्राण्यांपैकी एक) प्राण्याला केंद्रस्थानावरून काढल्यास ग्लोबल वॉर्मिंग होऊन काहि बर्फ वितळल्याने (स्थायु पाण्याचे द्रवात रुपांतर झाल्याने) 'पर्यावरणची हानी' कशी होते ते कळले नाही.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

आपला विषय चांगला आहे

आपला विषय चांगला आहे. बरेच पैलू घातले आहेत आपण त्यात. आवडले.
फार पूर्वी पासून माणसाला ह्या गोष्टी गूढ वाटायच्या व त्या वर मनन त्याने केलेले आहे. माझ्या मते

माणसाची चेतना (कॉन्शियसनेस) बाकीं पेक्षा जास्त आहे. त्या मुळे तो विचार करु शकतो आणि त्याला एक महत्वाची देणगी मिळाली आहे ती म्हणजे पर्याय निवडायची. बुद्धी जास्त आहे (कधी कधी विनाश काले विपरीत बुद्धी पण होते जसे त्याच्या करणीने पर्यावरणाचे संतुलन बिघडू पहात आहे), मन प्रगत आहे, स्मरणशक्ती जास्त आहे.

माणूस कसा असा घडला त्या बद्दल ब-याच शास्त्रीय थिअरीज आहेत नेटवर सर्फ केल्या तर भरपूर कारणे मिळतील. त्याहून हुशार प्रजाती निर्माण (किंवा विकसित होऊ शकतीलही काही काळानंतर, अन त्यातल्या कोणाला तरी हाच प्रश्न पडेल जो आपल्या सगळ्यांना कधी कधी भेडसावतो तो.)

हे जग कधी ना कधी नष्ट (कारण व निमित्त कोणतेही असो मग) होणारच आहे व चक्र चालत राहणार असे घडू शकते. पण माणसाच्या बुद्धीने (कुबुद्धीने) होईल का कालांतराने दुस-याच कारणाने होईल हे सांगणे कठीण.

http://bolghevda.blogspot.com (मराठी ब्लॉग)
http://rashtravrat.blogspot.com
http://rashtrarpan.blogspot.com

 
^ वर