परत एकदा म्हणावे का - "सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?"

बाबा रामदेव यांचे भारत स्वाभिमान आंदोलन ज्या संदर्भात चालू केले गेले तो भ्रष्टाचार आणि परदेशात गेलेला काळा पैसा परत आणणे या संदर्भात इतर उचपक्रमावर र्चा चालू आहेत आणि तेथे त्या बद्दल अधिक लिहीता येईल. त्यांचे हेतू आणि त्यांच्या विरोधकांच्या आरोपाप्रमाणे असलेले अंतस्थ हेतू याबद्दल पण बरेच उलट सुलट बोलता येईल.

सरकारच्या म्हणण्याप्रमाणे बाबा रामदेव यांनी उपोषण करणार नाही असा काहीसा दिलेला शब्द पाळला नाही, म्हणून काही निर्णय घेणे देखील समर्थनीय ठरू शकले असते. पण मात्र जे आंदोलन पूर्णपणे शांततेने चालले होते, जे आंदोलक आणि त्यांचा नेता (बाबा रामदेव) हे कुठल्याही हिंसेची भाषा करत नव्हते त्यांना अपरात्री उठवून हद्दपार करून, एनडीटीव्हीवर पाहीले त्याप्रमाणे रामदेवबाबांवर नाही पण आंदोलकांवर लाठीहल्ला करत हे आंदोलन उध्वस्त करून सरकारने आपण घाबरलो आहोत हे मान्य केले आहे का? अनेक बायकांनी तक्रारी केल्या आहेत एका वृद्धाला स्टेजवरून ढकलून दिलेले दाखवले आहे.

बरोबर का चूक, कसे केले तो मुद्दा सोडला तरी ज्या सरकारने अण्णा हजार्‍यांचे आंदोलन संयमाने "मॅनेज" केले त्यांचा इतका तोल कसा काय ढळा? सरकारला खरेच याचे परीणाम कळत नाहीत का? कधीकाळी निरंजकूश सत्ता असलेल्या ब्रिटीशांनी केले, नंतर जयप्रकाशजींच्या विरोधात इंदीरा गांधींनी केले आणि आता हे सरकार तेच करत आहे असे वाटते. हा एका अर्थी टिपिंग पॉईंट ठरू शकतो आणि आधीच नाडल्या गेलेल्या भारतीयांकडून भारताचे इजिप्त होऊ शकते. फरक इतकाच की आपल्याकडे लोकशाही आहे, तिलाच धक्का लागू शकण्याची भिती आहे. हा प्रश्न रामदेव बाबांचा नाही की सरकार टिकेल का नाही, हा नाही, तर देशाच्या व्यवस्थेचा आहे. दोष आंदोलकांचा नसून सरकारचा आहे आणि त्यात कायद्यापेक्षा राजकीय चूक अधिक आहे...

लेखनविषय: दुवे:

Comments

हो

कृती राजकीय दृष्ट्या आत्मघातकी नक्कीच आहे.

त्यातून मोठे आंदोलन उभे राहिले आणि सरकारला पायउतार व्हायला लागून "प्रामाणिक शहाण्या माणसांची उदार हुकूमशाही" प्रथापित झाली तर ते 'देशहिताचेच' आहे; नाही का?

काही गोष्टी बाबांनी अविचाराने केल्या असे वाटते. उदा. रामलीला मैदान १५ दिवस "योग शिबिरासाठी" बुक केले होते. सरकार तडजोडीच्या भूमिकेत असताना "आंदोलनासाठी" मैदान बुक करता आले नसते का? याने पोलीसांना कृती करण्यास कायदेशीर आधार मिळाला.

रामदेव बाबांनी उपोषण थांबवण्याचे लेखी पत्र दिले असल्याचे काल सिबल यांनी दाखवले होते. त्यानंतर उपोषण न थांबवण्याचे कारण काय असावे? "इफ वी कॅन बी अकोमोडेटिव्ह वी कॅन ऑल्सो बी फर्म" असेही काल त्यांनी म्हटले होते.

नितिन थत्ते

पितळ

काही गोष्टी बाबांनी अविचाराने केल्या असे वाटते. उदा. रामलीला मैदान १५ दिवस "योग शिबिरासाठी" बुक केले होते. सरकार तडजोडीच्या भूमिकेत असताना "आंदोलनासाठी" मैदान बुक करता आले नसते का? याने पोलीसांना कृती करण्यास कायदेशीर आधार मिळाला.

पितळः हे तर पहील्यापासूनच होते. तरीपण उपोषण चालू होते. मग त्यावर त्यावेळीसच बंदी न घालता मध्यरात्री सगळे झोपलेले असताना करायचे कारण काय?

रामदेव बाबांनी उपोषण थांबवण्याचे लेखी पत्र दिले असल्याचे काल सिबल यांनी दाखवले होते. त्यानंतर उपोषण न थांबवण्याचे कारण काय असावे? "इफ वी कॅन बी अकोमोडेटिव्ह वी कॅन ऑल्सो बी फर्म" असेही काल त्यांनी म्हटले होते.
मध्यरात्री बाबा रामदेवांना पत्र दिले/नवीन ड्राफ्ट दिला. तो वाचून नंतर त्यावरचा बाबांचा निर्णय घेण्यासाठी त्यांना सकाळपर्यंत वेळ देणे हे अगदी तिथे दहशतवादी-नक्षलवादी असते तरी सरकारने केले असते, मग येथे तासाभरात सगळे उध्वस्त करण्याची घाई का? याला अकोमोडेटिव्ह म्हणत नाहीत याला "Power corrupts; absolute power corrupts absolutely" असे म्हणतात. आज सरकारने "absolute power" च वापरलेली आहे जी पूर्णपणे निषेधार्ह आहे.

त्यातून मोठे आंदोलन उभे राहिले आणि सरकारला पायउतार व्हायला लागून "प्रामाणिक शहाण्या माणसांची उदार हुकूमशाही" प्रथापित झाली तर ते 'देशहिताचेच' आहे; नाही का?

जी आहे ती लोकशाही असे म्हणायचे आहे का? जे काही मी रामदेवबाबांचे ह्या दडपशाहीआधीचे बोलणे ऐकले त्यात त्यांनी कुठेही सरकार हटावण्याच्या गोष्टी केल्या नव्हत्या. मग या सरकारला आपला पायउतार होईल अशी भिती का वाटावी? त्यांनी तर त्यांच्या समर्थकांना सतत सांगितले होते की मला जरी अटक झाली तरी हिंसात्मक वळण घेयचे नाही, शांततेनेच चळवळ करायची. तरी देखील सरकारला मध्यरात्री पोलीसांना पाठवून घटनेने दिलेले नागरी अधिकार बासनात गुंडाळून अहींसेने आंदोलन करणार्‍या आणि त्यावेळेस झोपलेल्या अबालवृद्धांवर अश्रूधूर आणि लाठीहल्ला करताना काही वाटले नाही...

नशिब आपल्या राष्ट्रपित्याचे, त्यांनी ब्रिटीशाविरोधातच चळवल केली...

सरकारचे दात सरकारच्याच घशात जाणार

तो वाचून नंतर त्यावरचा बाबांचा निर्णय घेण्यासाठी त्यांना सकाळपर्यंत वेळ देणे हे अगदी तिथे दहशतवादी-नक्षलवादी असते तरी सरकारने केले असते, मग येथे तासाभरात सगळे उध्वस्त करण्याची घाई का?
छे. दहशतवादी असते तर त्यांनी सरकारला मुदत दिली असती आणि त्यांच्या सगळ्या मागण्या लगेचच मान्य करुन् सरकार मोकळे झाले असते. बाबांनी 'पोलिटिकल आसन' शिकवू नये असे सरकार म्हणत होते आणि दादागिरी करु पाहात् होते. पण प्रत्यक्ष परिस्थिती बघितल्यावर रामदेव बाबा सरकारला 'खाली डोकं वर पाय' करुन शीर्षासन करायला शिकवणार असे वाटते आहे. सरकारच्या कालच्या बिनडोक राजकीय चालीचा बाबा चांगलाच फायदा उठवत आहेत असे त्यांच्या वक्तव्यांवरुन् वाटते.
'इफ वुई कॅन बी करप्ट, वी कॅन आल्सो बी सिली ऍन्ड् क्रुएल्' असा संदेश सरकारने कालच्या कॄतीतून दिला आहे.

तुलना

>>नशिब आपल्या राष्ट्रपित्याचे, त्यांनी ब्रिटीशाविरोधातच चळवल केली...

तुलना अगदीच अनाठायी आहे. राष्ट्रपिता कधी पोलीसांची अटक टाळण्यासाठी पळून गेल्याचे आणि महिलांच्या गराड्यात लपल्याचे (गोडशांच्या पुस्तकांतही) वाचले नाही.

नितिन थत्ते

तुलना

मी तुलना ही गांधीजींची आणि बाबांची केली नव्हती, तर स्वतंत्र भारतातील घटनासिद्ध सरकार आणि परतंत्र भारतातील ब्रिटीश सरकार यांची केली होती. केवळ बाबा आणि त्यांच्याबरोबर असलेले त्यांचे नि:शस्त्र समर्थकच नाही तर असेच ७५ साली आणिबाणीच्या काळात जयप्रकाश नारायण आणि त्यांच्या समर्थकांबरोबर घडले होते...

बाकी मुद्याबद्दल बोलणे अवांतराच्या भयाने टाळत आहे. :-)

सरकारी अविचार्

पत्र रात्री साडेअकरा वाजता देण्यात् आले आणि मध्यरात्रीच्या सुमारास् कारवाई करण्यात् आली.
'दुसर्‍या महायुद्धात् पर्ल् हार्बरवर् हल्ला करण्यासाठी विमाने आधी उडाली आणि मग् जपानने युद्धा घोषित् केले' ही ऍनालॉगस् घटना यानिमित्ताने आठवली. उपोषण् न थांबवण्याचे कारण् काय् हा वेगळा मुद्दा आहे. सरकारने केलेली कारवाई म्हणजे दडपशाही होती का यासंदर्भातील् हा धागा आहे असे वाटते आहे. सरकारच्या अविचारापुढे त्यापुढे आंदोलकांचा अविचार् काहीच् नाही असेही वाटते.

बरोबर

उपोषण् न थांबवण्याचे कारण् काय् हा वेगळा मुद्दा आहे. सरकारने केलेली कारवाई म्हणजे दडपशाही होती का यासंदर्भातील् हा धागा आहे असे वाटते आहे.

बरोबर.

सरकारच्या अविचारापुढे त्यापुढे आंदोलकांचा अविचार् काहीच् नाही असेही वाटते.

आधी स्वतःचे मंत्री आंदोलकाच्या स्वागतासाठी गेल्याप्रमाणे विमानतळावर पाठवायचे मग दिवसाकाठीही भेटायचे आणि मग अपरात्री केवळ त्यालाच पकडून नेयचे नाही तर तेथील पुर्ण शांत आणि निष्क्रीय असलेल्या सामान्या स्त्री-पुरूषांवर अश्रूधूर सोडून, लाठीमार करून घालवायचे. ह्याची तुलना आंदोलकांनी शब्द मोडून उपोषण चालू ठेवले याच्याशी करता येईल असे वाटत नाही.

चुकिचेच

आरएसएस, कारसेवक, साध्वी ऋतम्बरा, भाजपा इ.इ. फॅनेटिक्स हजारोच्या संख्येने उपस्थित आहेत म्हंटल्यवर सरकारने सुरक्षेचा बंदोबस्त् चोख ठेवायला हवा होता, पण काही प्रक्षोभक घडायच्या आधीच् बळाचा वापर करणे मात्र चुकिचे आहे. बाबा कितीही ढोंगी असला तरी त्याचा शांततेने आंदोलन चालवण्याचा हक्क मान्य केलाच पाहिजे.

मुद्याची गोष्ट

पण काही प्रक्षोभक घडायच्या आधीच् बळाचा वापर करणे मात्र चुकिचे आहे. .. त्याचा शांततेने आंदोलन चालवण्याचा हक्क मान्य केलाच पाहिजे.

चर्चाप्रस्तावाशी निगडीत असलेल्या ह्या दोन मुद्यांच्या गोष्टींशी सहमत.

लेख

ह्यासंदर्भात वाचण्याजोगा लेखः

माओवाद्यांचा संदर्भ सोड्ल्यास बहुतेक् मुद्यांशी सहमत्.

गोंधळच गोंधळ

इतक्या प्रकारच्या बातम्यांचे मोहोळ उठले आहे की नक्की काय झाले हे समजायला थोडा अवधी जाऊ देणे योग्य आहे असे वाटते.

यातील ऐकलेली एक सर्वात घातक शक्यता अशी (संदर्भ: कालचा सीएन्एन् आयबीएन् वरील चर्चा) की रविवारी पहाटे अतिउजव्या गटाचा हा रामदेवबाबाचा तंबु पेटवून देण्याचा मानस होता व त्यायोगे पुन्हा देशभर दंगल / गोंधळ माजवून ध्रुवीकरण करायचे असा 'प्लान' होता. याला कोणताही पुरावा त्या सदर व्यक्तीकडे नव्हता. (मात्र जेव्हा पोलिस आले होते तेव्हा मंडपाला बारीकशी आग लागल्याचीहि बातमी आहे, जी लगेच विझवण्यात आली. शिवाय पोलिसांबरोबर अनेक अग्निशामकांचे जवान, गाड्या पाठवण्यात आहे होते असेही वृत्त आहे)

यात सत्य किती, वावड्या किती हे सरकार, गृहखाते जाणे. मात्र जर असा काहि धोका सरकारला कळला होता तरी सरकारने, गृहखात्याने याची कल्पना बाबाला दिली होती का? वगैरे अनेक प्रश्न उठतातच.

प्रथमदर्शनी आंदोलन चिरडायची पद्धत, वेळ चुकीची वाटतेच त्याबरोबर/त्यापेक्षा पारदर्शकतेचा भयावह अभाव जाणवतो ज्यामुळे लोकांमधील संभ्रमाची व त्यायोगे व्य्वस्थेवरील अविश्वास वाढत जातोय हे घातक आहे असे वाटते.

सरकारपक्षाने अजूनही त्यांची अधिकृत भुमिका मांडलेली नाही. गृहमंत्रालयाकडून प्रतिक्रीया येईपर्यंत माझे मत (जरी कोणी विचारत नसले तरी ;) )राखून ठेवत आहे

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

दंगल

दंगल वास्तवीक सरकारनेच केली आहे. या संदर्भात तेहलकामधील ही बातमी आणि छायाचित्रे बोलकी आहेत.

प्रसिद्धीचा हावरा बाबा!

काँग्रेसचे आर्थिक भ्रश्टाचाराविशयी काय मते आहेत? हे अजूनतरी त्यांनी स्पश्ट केलेल नाही. परंतु आत्तापर्यंतच्या घटनांवरून त्यांचे काही चूकत आहे, असे वाटत नाही. परंतु सत्ता मिळाल्यानंतर ते टिकवण्यासाठी वाट्टेल ते करणे त्यांना क्रमप्राप्त आहे.

बाबा रामदेव हा प्रसिद्धीला हावरा आहे. देशात एखाद्या विशयाबाबत घटना घडत असतात, त्यावर दुचिवावर चर्विचरण चालत असते, त्या विशयावर उगीचच आपले मत मांडणे हे बाबा रामदेवच्या सवयीत उतरले होते. भाजपाच्या ला. अडवाणींनी महागाईवर उत्तर म्हणून देशातला काळा पैसा जो देशाबाहेर गेला आहे. तो परत देशकार्यासाठी भारतात आणला जावा, अशी मागणी केली होती. बाबा रामदेवने त्यानंतर तो मुद्दा हायजॅक केला. भगवी वस्त्रे नेसली म्हणजे हिंदु धर्म कळला असे नाही. बाबाचा अपमान झाला हे बरेच झाले.

पैसा व प्रणय हे दोन विशय एकमेकांशी निगडित आहेत, हे ह्या बाबाला माहित नाही, आणि अनाडी भाजपला ही माहित नाही. ठराविक परीस्थित, आपले काम होण्यासाठी किंवा करून घेण्यासाठी पैसा वा प्रणयाची लाच दिली जाते, मागितली जाते, जर एक बाजू उजेडात आणायची म्हटली तर दुसरी बाजू देखिल उजेडात येईल. आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणायचे ठरवले, तर प्रणयाबाबतही भारतीय समाजमनाला मनाने मोठे, प्रगल्भ व्हावे लागेल. तेंव्हा तिथे (प्रणयाबाबत) सोवळेपण मान्य व्हायचे नाही.

सध्याचे युग शुद्रयुग असल्यामुळे जे घडतंय ते त्याच दिशेने जातेय कि काय? असे वाटू लागलेय. फक्त कोणाशी, कधी संबंध ठेवायचा? किंवा नाही ठेवायचा, हा सर्वस्वी अधिकार स्त्रीलाच मिळायला हवा. तिच्यावर इतर कोणीही प्रणय संबंध ठेवण्यासाठी दबाब आणता कामा नये.

अनाडी भाजपाने ह्या मधल्या काळात आपला पक्श देशाच्या पातळीवर मोठा कसा होईल?, हे पहायला हवे. त्यांनी अशाप्रकारचे कितीही चाळे केले तरीही त्यांची, त्यांच्या विचारांची सत्ता तोवर या देशात यायची नाही.

एक नंबर.

रावलेंचा प्रतिसाद वाचण्यासाठीच आलो होतो. येणे सार्थक झाले ! ;)

विषयाबाबत ऋषिकेश यांच्याशी सहमत.

म्हणून

काँग्रेसचे आर्थिक भ्रश्टाचाराविशयी काय मते आहेत? हे अजूनतरी त्यांनी स्पश्ट केलेल नाही. परंतु आत्तापर्यंतच्या घटनांवरून त्यांचे काही चूकत आहे, असे वाटत नाही. परंतु सत्ता मिळाल्यानंतर ते टिकवण्यासाठी वाट्टेल ते करणे त्यांना क्रमप्राप्त आहे.... बाबा रामदेव हा प्रसिद्धीला हावरा आहे....

म्हणून सरकारने मध्यरात्री नि:शस्त्र समुदायाला उठवून त्यांच्यावर लाठीमार करणे, अश्रूधूर सोडणे हे समर्थनीय आहे.

म्हणूनच कधीकाळी इक्बाल महोदयांनी म्हणले असावे:

इक़बाल कोई महरम , अपना नहीं जहाँमें ।
मालूम क्या किसीको , दर्दे – निहाँ हमारा ॥८॥
सारे जहाँसे अच्छा हिन्दोस्ताँ हमारा ।...

प्रसिद्धीचा हावरा बाबा!

आपण जर लॉजिक चा वापर केला तर शिवाजी महाराज देखील दरोडेखोर होते असा अर्थ काढता येईल. त्यामुळे रामदेव बाबांना हावरा वगैरे म्हटले हा लॉजिक चा एक भाग आहे. किंवा हा लेख् ठरवून दीड शहाणपण दाखविण्यासाठी किंवा एखाद्या काँग्रेस च्या एजंट चा वाटते.

जे जे होईल ते ते पहावे

रामदेव नावाची सर्कस किंवा नौटंकी आवडत जरी नसली तरी त्यांचे आंदोलन ज्याप्रकारे चिरडण्यात आले तेही पटले नाही. एक तर रामदेवबाबांना परवानगीच द्यायची नव्हती. ३ दिवस नाटक करून आमची नाटकमंडळी पुन्हा हरिद्वारला रवाना होईल असे आश्वासन सरकारला मिळाले असल्यामुळे परवानगी दिली असावी. पण दीड-दोन लाखांची रामदेवभक्तांची व्यवस्था रामदेवबाबा योगबलाने करणार होते काय? असो. तथ्ये उलगडल्यावर अधिक सविस्तर आणि नेमके भाष्य करता येईल. असो. काँग्रेसही नको आणि भाजपही नको. पण तिसरा पर्याय आहे कुठे? जे जे होईल ते ते पहावे!

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

सहमत

एक तर रामदेवबाबांना परवानगीच द्यायची नव्हती.

सहमत. जर आधीच परवानगी नाकारली असती तर कुणालाच काही बोलायचा प्रश्न नव्हता. "राजा भिकारी.." हे ऐकावे लागले असते पण ते आत्ताच्या "राजा घाबरल्यापेक्षा" अधिक (राजासाठीच) श्रेयस्कर झाले असते. मी तर अजून पुढे जाउन, सैतानाची वकीली करत म्हणतो की त्यांच्या काही मागण्या अगदी सामान्यातील सामान्यांना पण न परवडणार्‍या होत्या त्यामुळे त्यांना त्या तशाच चालू ठेवून दिल्या असत्या तर आंदोलनातील हवा जाऊ शकली असती. पण ज्या पद्धतीने हे मध्यरात्री आंदोलन चिरडले गेले आणि केवळ रामदेवबाबांनाच नाही तर इतर सामान्यांवर देखील मारहाण केली, ते पाहीले तर सरकार एकंदरीतच त्यांच्या अंतर्गत भ्रष्टाचारामुळे अधिक घाबरले असावे असे म्हणायला शंका आहे.

बाकी काही म्हणा, या निमित्ताने तरी काँग्रेसकडे वैचारीकदृष्ट्या दोन धृवांवर असलेल्या आणि मधेच कुंपणावर बसलेल्या सर्वच राजकीय नेत्यांमंध्ये तसेच समाजकारण्यांमधे ऐक्य आणण्याचे श्रेय जाईल. :-) पण दुसरीकडे स्वतःच्या पक्षात मात्र दुफळी माजवण्याचा मसाला भरला...

राजकिय हेतू

सरकार आणी रामदेवबाबा दोघांचाहि
आंदोलन करणे आणी ते दडपणे हे पूर्णपणे राजकिय हेतूनेच प्रेरीत असल्याचे दिसतेय,
सरकारने अपरात्री केलेली कृती निषेधार्हच आहे.

सुषमाबाईंचे राजघाटावरील नृत्य

रामदेवाच्या समर्थनार्थ सुषमा स्वराज ह्यांनी राजघाटावर नृत्य केले.

पुढचा विनोद

त्याबद्दल काँग्रेसने त्यांचा राजीनामा मागितला आहे. कदाचीत नाचणे फक्त गांधीघराण्याच्या तालावरच असले पाहीजे असे म्हणायचे असावे... आता कदाचीत राजघाटवर गेलात तर नवीन पाटी दिसेल, "यहॉ नाच करना मना है" :-)

राजीनामा

एखाद्याच्या समाधीवर नृत्य करणे वगैरे गोष्टींना खरंतर संघानेच आक्षेप घ्यायला हवा होता. पण समाधी त्यांच्या लाडक्या बापूजींची असल्याने सुषमांना आणि पर्यायने संघाला एक वेगळीच नशा चढलेली असावी.

दुवा

एखाद्याच्या समाधीवर नृत्य करणे वगैरे गोष्टींना खरंतर संघानेच आक्षेप घ्यायला हवा होता. पण समाधी त्यांच्या लाडक्या बापूजींची असल्याने सुषमांना आणि पर्यायने संघाला एक वेगळीच नशा चढलेली असावी.

तुम्हीच दिलेला दुवा वाचला असता तर असला प्रश्न पडला नसता. अर्थात एकदा का टिका करण्याची नशा चढली की असे होऊ शजते... पण तुमच्या बाबतीत कदाचीत वाचायला वेळ मिळाला नसेल म्हणून संदर्भित उतारा खाली देत आहे. भाषांतर करून हवे असेल तर अवश्य सांगा...आणि हो बाय द वे, आर एस एस म्हणजेच संघ बरं का! नाहीतर परत प्रश्न पडायचा की संघाने कुठे म्हणले आहे म्हणून. :-)

A livid RSS reminded Sushma that her 'dance performance' at BJP's Rajghat dharna was not proper and in bad taste. "Rajghat is a sacred place. One is not supposed to dance to a film song there. Dancing is in temples too, but to bhajans," RSS sources were quoted in the media.

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

बरं

मग काँग्रेसने राजीनामा मागितला तोच तेवढा विनोद कसा? की संघाचेही मत 'नाचणे फक्त गांधीघराण्याच्या तालावरच असले पाहीजे' असेच आहे?

काय माहीत!

बरं

धन्यवाद.

मग काँग्रेसने राजीनामा मागितला तोच तेवढा विनोद कसा?
तुम्हाला नाही म्हणायचे का नका म्हणू! उठसुठ जेंव्हा कोणिही कुठल्याही राजकीय पक्षाची अथवा सामाजीक व्यक्ती राजिनामा मागू लागते तेंव्हा तो एक विनोदच असतो. आता विनोद या शब्दाच म्हणलं तर दोन अर्थ होतात. एक म्हणजे चुट्का जो ऐकल्यावर =)) अशी अवस्था होते आणि दुसरा उपरोधीक ज्यात लक्ष इतरत्र वेधण्यासाठी एखाद्या सिस्टीमची कुचेष्टा केली जाते. मी दुसर्‍या अर्थाने म्हणले होते, हे समजले नसेलच म्हणून स्पष्ट करत आहे.

की संघाचेही मत 'नाचणे फक्त गांधीघराण्याच्या तालावरच असले पाहीजे' असेच आहे?

काय माहीत! ते संघाला जाउन विचारा! पण जर बातमी वाचलीत तर तसे त्यांचे मत नसावे असे मला वाटते.

बाकी जाता जाता एक खुलासा: चर्चेचे शिर्षक हे "सरकारचे डोके ठिकाणावर आहे का" असे म्हणावे का या संदर्भात आहे, व्यक्तीगत नाही.

'सुषमा बदनाम हुई, रामदेव तेरे लिये'

यूट्यूबवर एकाने 'सुषमा बदनाम हुई, रामदेव तेरे लिये' असा प्रतिसाद दिला आहे :) काय गरज होती राजघाटावर नाचायची. दिला ना काँग्रेसला फुलटॉस. असो. काँग्रेस मूळ मुद्दा बाजूला ठेवण्यात यशस्वी होताना दिसते आहे. आणि मुख्य विरोधी पक्ष भाजपाची ताकद वाढताना दिसत नाही आहे. स्वामी अग्निवेश ह्यांनी काल एका कार्यक्रमात भाजपाचा सत्याग्रह हा सत्याग्रह नसून सत्ताग्रह असल्याचे म्हटले होते. ते काही चुकीचे नव्हते असे आज वाटते आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

बॅंका स्थापाव्यात

स्वीस बॅंकेतील पैसा भारतात आणण्यापेक्षा भारतातच अशा तत्वांवर चालणा-या बॅंका स्थापाव्यात. जेणेकरुन हा पैसा भारतातच राहिल व जनतेच्या कामासाठीही वापरता येईल.

 
^ वर