वायरलेस किंवा वाय्-फाय् तंत्रद्न्यानाचे राऊटर्स् देणे आहे

मी आणि माझे सहकारी अमेरिकेतील एका विद्यापीठात इंतेरनेत, वाय फाय टेक्नालजी, सेक्यूरिटी ई विषयांवर संशोधन करत आहोत. आम्हाला भारतातील इंतेरनेत आणि होम नेटवर्क सेक्यूरिटी चा अभ्यास करण्यासाठी काही वाय फाय राऊटर्स अनिश्चित कालावधी साठी भारतातील घरांमध्ये वापरावयास देणे आहे.

ज्या लोकांना ते वापरावयास देणे आहे, त्यांच्याकडून खालील बाबींची पूर्तता होणे आवश्यक आहे.
१. घरात इंतेरनेत चे कनेक्षन असणे आवश्यक आहे.
२. घरात शक्यतो एकापेक्षा अधिक संगणक असावेत (जसे की डेस्कटॉप, लॅपटॉप ई). त्यातील निदान एका संगणका वर तरी वाय फाय नेटवर्क वापरण्याची क्षमता असावी.
३. ज्या घरामध्ये ते वापरावयास दिलेले आहेत त्यांनी ते तेथेच वापरायचे असून पूर्व परवानगी शिवाय दुसरी कडे हलवू नयेत.

काही खुलासे:
१. हे राऊटर्स नेटगियर या कंपनी चे आहेत. मॉडेल क्र. WNDR3700v2. हे एक अत्याधुनिक मॉडेल असून याची किंमत सुमारे $१५०/- किंवा रू ७५००/- इतकी आहे.
२. डेप्लाय्मेंट करताना कॉनफिगरेशन करायला मदत दिली जाईल.
३. तुमचा इंतेरनेत डेटा कुठल्याही प्रकारे स्टोअर केला जाणार नाही. तुमची पर्सनल माहिती आम्ही इनस्पेक्ट करणार नाही.
४. तुमचा मेटा डेटा जसे की कुठल्या वेब साइट्स विज़िट केल्या गेल्या ई. माहीती अनॉनिमस्ली स्टोर केला जाईल. म्हणजेच सतीश नावाच्या व्यक्तीने जर उपक्रम.ओर्ग ही साइट विज़िट केली तर आम्हाला फक्त "कुणीतरी" उपक्रम.ओर्ग ही साइट विज़िट केल्याच कळेल. पण कुणी ते कळणार नाही.
५. या बॉक्सेस वरून आम्ही नेटवर्क पर्फॉर्मेन्स मोजाण्याकरता काही मेजर्मेंट स्क्रिप्ट्स एका ठरवाईक कालावधी नंतर एक्सेक्यूट करू. परंतू त्या कमीत कमी नेटवर्क बॅंडविड्त वापरतील आणि तुमच्या नेटवर्क वापरमध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा येणार नाही.

तुम्हाला काय फायदे मिळतील:
१. अत्याधुनिक वाय फाय राऊटर्स वापरता येतील.
२. तुमचा इंतेरनेत वापर आणि तुम्हाला मिळणारा इंतेरनेत पर्फॉर्मेन्स इतरांच्या तुलनेत कसा आहे हे बघता येईल.
३. काही सेक्यूरिटी सॉफ्टवेर चे प्रोटटाइप इनस्टॉल करण्यात येईल की जेणेकरून वर्म्स, बॉट्स यांपासून सर्क्षण करण्यात येईल.

तुम्ही जर या अभ्यासमध्ये सहभागी होण्यास उत्सुक असाल किंवा तुम्हाला जर काही शंका असतील तर कृपया या धाग्यावर प्रतिसाद द्यावा.

लेखनविषय: दुवे:

Comments

राउटर्स

माझ्या मते बहुतेक इंटरनेट वापरणार्‍यांच्याकडे वायरलेस जोडणी आता असतेच. बीएसएनल वायरलेस मोडेम सुद्धा देते. त्यामुळे राउटरची गरज भासत नाही. बरेच लोक रिलाय न्सचे किंवा टाटाचे नेटकनेक्ट वापरतात. त्यामुळे किती लोक हे राउटर बसवायला तयार होतील याबद्दल मी साशंकच आहे. शिवाय योगेश जरी आपण माहितीचा गैरवापर करणार नाही असे म्हणत असले तरी हा एक अमेरिकन संशोधन प्रकल्प असल्याने त्यावर कितपत विश्वास ठेवायचा हे त्या व्यक्तीला ठरवावे लागेल. मला वैयक्तिक जर निर्णय घ्यायचा असला (माझ्याकडे राऊटर आहे.) तर मी दुकानातून विकत घेतलेला राऊटर वापरीन. श्री. योगेश यांना त्यांच्या संशोधन प्रकल्पात शुभेच्छा.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

+१

सहमत आहे. शिवाय, इबेवर साधारण हजार रुपये किमतीचेही वायफाय राउटर असतात.
--
मात्र, यूटेलेकॉम/हॅथवे यांच्या सर्वात स्वस्त प्लॅनमध्ये राउटर मोफत मिळत नाही. बीएसएनएलही स्वस्त प्लॅनमध्ये राउटर मोफत देत नसे (नवा नियम माहिती नाही).
वायरलेस मोडेम कधी ऐकिवात नव्हते, बीएसएनलचे यंत्र मोडेम+वायरलेस राउटर असे असते असे वाटते.

वायरलेस् राऊटर

बीएसएनएलचे यंत्र मोडेम+ वायरलेस राऊटर असेच असते.
चन्द्रशेखर

प्रतिसादासाठी धन्यवाद.

> माझ्या मते बहुतेक इंटरनेट वापरणार्‍यांच्याकडे वायरलेस जोडणी आता असतेच. बीएसएनल वायरलेस मोडेम सुद्धा देते. त्यामुळे राउटरची गरज भासत नाही. बरेच लोक रिलाय न्सचे किंवा टाटाचे नेटकनेक्ट वापरतात. त्यामुळे किती लोक हे राउटर बसवायला तयार होतील याबद्दल मी साशंकच आहे.

हा मुद्दा मान्य. परन्तू आमचे संशोधन याच विषयावर आहे की शक्तीशाली राऊटर्स डिप्लाय केले गेले तर आम्ही कुठली नवीन सॉफ्टवेर वापरून होम नेटवर्क्स ज्यास्त सेक्यूर करू शकतो. तसेच इंतेरनेत चा पर्फॉर्मेन्स जगाच्या विविध भागात कसा आहे आणि तो तसा का असावा याची कारणे शोधणे.
१. लोकांना हे चेक करता येईल की त्यांचा सर्विस प्रवाइडर त्यांची फसवणूक तर करत नाहीए ना. जसे की काही इंतेरनेत स्पीड आणि बॅंडविड्त प्रॉमिस करणे पण ती कधीच प्रोविड ना करणे.
२. वर्म्स पासून सुरक्षा. वॉर्म्स संगणकात प्रवेश करण्याधीच त्यांना थांबवणे.

> शिवाय योगेश जरी आपण माहितीचा गैरवापर करणार नाही असे म्हणत असले तरी हा एक अमेरिकन संशोधन प्रकल्प असल्याने त्यावर कितपत विश्वास ठेवायचा हे त्या व्यक्तीला ठरवावे लागेल.

मी आपणाला असे नम्र पणे दाखवू इच्छितो के इंतेरनेत हाच एक अमेरिकन संशोधन प्रकल्प होता आणि आहे. आपणा वापरात असलेली कितीतरी टेक्नालजी अमेरिकेत इनवेंट झालेली आहे. इतकेच काय पण माझ्या अंदाजानुसार उपक्रम चा हा सर्वर देखील या घडीला अमेरिकेतच आहे. या मध्ये कुठलाही ग्रेट गेम नाही.

अमेरिकन तंत्रज्ञान

माझा अमेरिकन तंत्रज्ञानाला विरोध आहे अशी तुमची गैरसमजूत झालेली दिसते. मी अमेरिकेत वास्तव्य केलेले आहे व मला त्या देशाविषयी प्रेम व जिव्हाळा वाटतो. अमेरिकेतच शिकलेली एक म्हण सांगतो. " देअर आर नो फ्री लंचेस" त्यामुळे साशंक आहे इतकेच
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

अनुदान

" देअर आर नो फ्री लंचेस" त्यामुळे साशंक आहे इतकेच

सहमत.

यासंदर्भात जर एखाद्या सरकारी अथवा खाजगी संस्थेकडून अनुदान मिळाले असले आणि त्यात अशा पद्धतीने (मटेरीअल्स + मेथड्स) काम केले जाईल असे म्हणले असले तर ते यासंदर्भात येथे स्पष्ट केले तर अधिक योग्य ठरेल. (त्यासाठी सर्व डिटेल्स देण्याची गरज नाही, पण माहिती देणे योग्य वाटते).

खरोखर

" देअर आर नो फ्री लंचेस"..

आम्हाला वेगवेगळ्या ठिकणांवरून इंतेरनेत चा पर्फॉर्मेन्स कसा आहे ते बघायच आहे. तीच याची किंमत आहे असा समजा.

> यासंदर्भात जर एखाद्या सरकारी अथवा खाजगी संस्थेकडून अनुदान मिळाले असले आणि त्यात अशा पद्धतीने (मटेरीअल्स + मेथड्स) काम केले जाईल असे म्हणले असले तर ते यासंदर्भात येथे स्पष्ट केले तर अधिक योग्य ठरेल. (त्यासाठी सर्व डिटेल्स देण्याची गरज नाही, पण माहिती देणे योग्य वाटते).

या प्रकल्पाला एन एस एफ या संस्तेकडून अनुदान मिळाले आहे. कशा पद्धतीने काम करायच ते संशोधक स्वत: ठरवू शकतात.
तुम्हाला अजून काही माहिती हवी आहे का?

जास्तच संशयास्पद

आम्हाला वेगवेगळ्या ठिकणांवरून इंतेरनेत चा पर्फॉर्मेन्स कसा आहे ते बघायच आहे

निरनिराळ्या ठिकाणी इंटरनेटची कार्यकुशलता कशी आहे हे बघण्यासाठी राउटर्स देऊन काय साध्य होणार आहे ते कळले नाही. याचा अर्थ असा होतो की तुम्ही दिलेले राउटर्स त्या ग्राहकाला नकळत काही डेटा तुमच्या कंपनीला देणार. हे तर जास्तच संशयास्पद होते आहे. इतर उपक्रमी तुम्हाला काय प्रतिसाद देतील ते माहित नाही परंतु मी अशा प्रकल्पात नक्कीच भाग घेतला नसता.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

नकळत

का म्हणून?
त्यांना सांगूनच मेटा डेटा गोळा केला जाईल.
आणि मी वेळोवेळी सांगितल्या प्रमाणे युजर्स् ना कोड् उपलब्ध करून दिला जाईल आणि पाहीजे असेल तर ते हा कोड् स्वत: कंपाईल करून फर्मवएअर् अपडेट करू शकतील.
यात संशयास्पद काय आहे?

> परंतु मी अशा प्रकल्पात नक्कीच भाग घेतला नसता.
हेच तुम्ही वरच्या प्रतिसादात् सांगून झाले आहे. आपल्या मताचा पुर्ण आदर आहे.

संशयास्पद काय आहे?

युजर्स् ना कोड् उपलब्ध करून दिला जाईल आणि पाहीजे असेल तर ते हा कोड् स्वत: कंपाईल करून फर्मवएअर् अपडेट करू शकतील.
या वाक्यातील ओ किंवा ठो मला समजलेले नाही. माझ्यासारखे अनेक उपक्रमी असतीलच. हे वाक्य म्हणेज काय हे मला समजू शकत नसल्याने माझ्या दृष्टीने हे सगळे संशयास्पदच आहे.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

अर्थ

म्हणजे असे की नेमकी कोणती माहिती राऊटर कोठे पाठवेल ते त्या राऊटरमधील फर्मवेअर ठरविते. प्रस्तुत राऊटरमधील फर्मवेअर हे छोटेसे लिनक्स असून त्यात योगेश असे काही बदल करतील की जेणेकरून योगेश यांना अपेक्षित माहितीची एक प्रत तो राऊटर योगेश यांनाही पाठवेल. कोड अभ्यासून नेमके बदल तपासता येतील आणि नेमकी कोणकोणती माहिती योगेश यांच्याकडे जाणार आहे त्याची खात्री वापरकर्त्यास करता येईल. वापरकर्त्याने स्वतःच त्या कोडपासून फर्मवेअर निर्माण करून राऊटरमध्ये इन्स्टॉल केल्यास योगेश यांना अप्रामाणिकपणाचा काहीच वाव राहणार नाही असे सांगण्याचा योगेश यांचा उद्देश असावा.
योगेश यांनी कितीही, "तुमचा मेटा डेटा जसे की कुठल्या वेब साइट्स विज़िट केल्या गेल्या ई. माहीती अनॉनिमस्ली स्टोर केला जाईल. म्हणजेच सतीश नावाच्या व्यक्तीने जर उपक्रम.ओर्ग ही साइट विज़िट केली तर आम्हाला फक्त "कुणीतरी" उपक्रम.ओर्ग ही साइट विज़िट केल्याच कळेल. पण कुणी ते कळणार नाही." असे लिहिले असले तरी या 'कुणीतरी'चा आयपी पत्ता त्यांना समजेलच. त्या 'कुणीतरी'चे नाव राऊटर पाठवीत नाही याची खात्री कोड तपासून करून घेणे कदाचित शक्य होईलही. परंतु, योगेश यांनी, समजा, दर आठवड्याला एका व्यक्तीला राऊटर पाठविला असेल तर त्या आठवड्यात एका नव्या आयपीवरून मेटाडेटा त्यांच्याकडे जमू लागेल आणि त्या आयपीची सांगड त्या व्यक्तीशी घालणे त्यांना शक्य होईल. अशी माहिती जमविणे त्यांना 'स्वनिग्रहाने' टाळावे लागेल आणि प्रतिष्ठित विद्यापीठाचे पाठबळ असल्यास तितका विश्वास ठेवता येईल.

बरोबर आहे

> असे लिहिले असले तरी या 'कुणीतरी'चा आयपी पत्ता त्यांना समजेलच. त्या 'कुणीतरी'चे नाव राऊटर पाठवीत नाही याची खात्री कोड तपासून करून घेणे कदाचित शक्य होईलही. परंतु, योगेश यांनी, समजा, दर आठवड्याला एका व्यक्तीला राऊटर पाठविला असेल तर त्या आठवड्यात एका नव्या आयपीवरून मेटाडेटा त्यांच्याकडे जमू लागेल आणि त्या आयपीची सांगड त्या व्यक्तीशी घालणे त्यांना शक्य होईल. अशी माहिती जमविणे त्यांना 'स्वनिग्रहाने' टाळावे लागेल आणि प्रतिष्ठित विद्यापीठाचे पाठबळ असल्यास तितका विश्वास ठेवता येईल.

तुमचे म्हणणे बरोबर् आहे. मी खाली दिलेल्या प्रतिसादात् या प्रकल्पाची अधिक् माहीती असणारी यु आर् एल् दीलेली आहे. त्यात् विद्यापीठाचे नावही आहे.

राऊटर

संशोधनात भाग घेण्यासाठी हा राऊटर फुकट मिळणार आहे का? फुकट मिळत असल्यास मी संशोधनात भाग घ्यायला तयार आहे.

होय

फुकट आहेत. पण, मी चिंतातुर जंतू यांना पाठवलेल्या उत्तरातील् भागः

१. राऊटर्स् साठी कुठलेही पैसे द्यायला लागणार नाहीत. पण राऊटर्स् विद्यापिठाच्या मालकीचेच राह्तील. पण माझ्या माहीतीनुसार ते परत मागवण्याचे फार् कमी चान्सेस् आहेत.
राऊटर्स तुमच्या पर्यंत पोहोचवले जातील. नो शिपिंग चार्जस.
२. कुठले Encryption वापरायचे ते तुम्ही ठरवू शकता.
३. माझ्या माहीती प्रमाणे अमेरिकेतील डेप्लाय्मेंट झाल्यावर वापरकर्त्यांना रूट आक्सेस देण्यात आला होता. तसाच भारतात पण बहूदा देण्यात यावा. तरी देखील मी हा मुद्दा क्लियर करून घेईन. आमचा जो काही कोड डिप्लाय होणार आहे तो तुम्ही पाहू शकता. इतकाच काय तर आमच्या वर विश्वास नसेल तर स्वत: कंपाइल करून इनस्टॉल पण करू शकता.
४. या संशोधन प्रकल्पाचा नेट गियर शी काही एक संबंध नाही. आम्ही त्यांचा राऊटर निवडला कारण आम्हाला अपेक्षित प्रोसेसिंग पोवार आणि मेमोरी त्यात आहे. हा प्रकल्प एन एस एफ या संस्थेनी प्रायोजित केलेला आहे. हा प्रकल्प प्लॅनेट लॅब या दुसर्या संशोधन प्रकल्पसारखा असणार आहे.

फुकट ??

संशोधनात भाग घेण्यासाठी हा राऊटर फुकट मिळणार आहे का? फुकट मिळत असल्यास मी संशोधनात भाग घ्यायला तयार आहे.
+१ मी सुद्धा!!

-
ध्रुव

इमेल

योगेश, माझ्या घरी हे करता येणार नाही (कंप्यूटर वापरला जातच नाही, वायरलेस् राउटर तर् धूळ खात पडला आहे, असो) पण एकदोन मित्रांना विचारता त्यांनी अधिक माहिती विचारली आहे. तुमचा इमेल व्यनी केल्यास तो संबंधितांना पाठवून तुम्ही संवाद साधू शकता. तुमच्या संशोधनात काही मदत झाली तर आनंदच वाटेल. प्रकल्पाला शुभेच्छा.

-Nile

संशय/शंका

माफ करा परंतु तुमचे लेखन येथील सदस्य 'गिरीश' यांच्या लेखनासारखे वाटते म्हणून संशय घेतो आहे.
होम नेटवर्क सिक्युरिटीचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही सद्य वायफाय राऊटरांचे कॉन्फिग तपासलेत तर काही माहिती मिळू शकेल. तुम्हीच कॉन्फिगरेशनमध्ये मदत केलीत तर लोक कायकाय काळजी घेतात ते तुम्हाला कसे कळेल?
मुळात, तुम्ही स्वतःचा राऊटर देण्याऐवजी एखाद्या लोकप्रिय राऊटरामध्ये इन्स्टॉल होऊ शकेल असे केवळ कोडच का देऊ करीत नाही? त्यामुळे तुमचा राऊटरचा खर्चही वाचेल आणि अधिक लोकांपर्यंत पोहोचताही येईल. राऊटर देण्याऐवजी तुम्ही लोकांना पैसे/नेट जोडणी देऊ केलीत तरीही चालेल असे वाटते.
माहितीचा तुम्ही नेमका काय वापर करणार आहात? कोणत्या अभ्युपगमाच्या तपासणीसाठी माहिती हवी आहे? कोणत्या निकषांवर काय निष्कर्ष काढण्याचा तुमचा उद्देश आहे?
शिवाय, माहिती जमविणे हा मूळ उद्देश आहे की तुम्ही इन्स्टॉल केलेले सॉफ्टवेअर किती उपयोगी आहे ते तपासणे हा उद्देश आहे? माहिती जमविणे हा उद्देश समाजशास्त्र/व्यवस्थापनशास्त्र इ. विषयांना खूपच आवश्यक ठरू शकते, संगणकतज्ञाला त्याची काय आवश्यकता?

+१

मुळात, तुम्ही स्वतःचा राऊटर देण्याऐवजी एखाद्या लोकप्रिय राऊटरामध्ये इन्स्टॉल होऊ शकेल असे केवळ कोडच का देऊ करीत नाही? त्यामुळे तुमचा राऊटरचा खर्चही वाचेल आणि अधिक लोकांपर्यंत पोहोचताही येईल. राऊटर देण्याऐवजी तुम्ही लोकांना पैसे/नेट जोडणी देऊ केलीत तरीही चालेल असे वाटते.

हेच म्हणतो.

स्पष्टीकरण

> माफ करा परंतु तुमचे लेखन येथील सदस्य 'गिरीश' यांच्या लेखनासारखे वाटते म्हणून संशय घेतो आहे.

मला गिरीश कोण हे माहीत नाही. ते कोण हे कळल्यास बरे होईल.
सभासद गिरीश यांच्यावर संशय घेण्यासारखे त्यांनी काय केले ते कळले तर अजून बर होईल.
संशय घेत आहात म्हणजे नक्की काय करत आहात?

> होम नेटवर्क सिक्युरिटीचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही सद्य वायफाय राऊटरांचे कॉन्फिग तपासलेत तर काही माहिती मिळू शकेल. तुम्हीच कॉन्फिगरेशनमध्ये मदत केलीत तर लोक कायकाय काळजी घेतात ते तुम्हाला कसे कळेल?

सेक्यूरिटी चा अभ्यास करणे यात रूटर्स चे कॉनफिग तपासणे अभिप्रेत नाही. कुठल्या प्रकारचे ऍटॅक ट्रॅफिक जगाच्या कुठल्या भागात ज्यास्त येते ते तपासणे आहे.

> मुळात, तुम्ही स्वतःचा राऊटर देण्याऐवजी एखाद्या लोकप्रिय राऊटरामध्ये इन्स्टॉल होऊ शकेल असे केवळ कोडच का देऊ करीत नाही? त्यामुळे तुमचा राऊटरचा खर्चही वाचेल आणि अधिक लोकांपर्यंत पोहोचताही येईल. राऊटर देण्याऐवजी तुम्ही लोकांना पैसे/नेट जोडणी देऊ केलीत तरीही चालेल असे वाटते.

याचे कारण मी आपला प्रतिसाद यायच्या आधी वर स्पष्ट केलेले आहे.

> माहितीचा तुम्ही नेमका काय वापर करणार आहात? कोणत्या अभ्युपगमाच्या तपासणीसाठी माहिती हवी आहे? कोणत्या निकषांवर काय निष्कर्ष काढण्याचा तुमचा उद्देश आहे?

काही भाग वर स्पष्ट केलेला आहे. इंतेरनेत हे एक एकसंध टेक्नालजी नसून वेगवेगळी छोट्या छोट्या आड्मिनिस्ट्रेटर्स नी जोडलेल्या नेटवर्क्स जाळे आहे. इंतेरनेत चा पर्फॉर्मेन्स त्या त्या भागातील आड्मिनिस्ट्रेटर्स च्या पॉलिसीस प्रमाणे बदलत राहतो. ह्या गोष्टींचा अभ्यास करणे हा याचा उद्देश आहे. तसेच जगात वेगवेगळ्या वेळी विविध प्रकारच्या वर्म्स / बोटनेतस मुळे विवध प्रकारचे ऍटॅक ट्रॅफिक जेनरेट होत असते. त्याचाही अभ्यास करणे यात अंतर्भूत आहे.

> शिवाय, माहिती जमविणे हा मूळ उद्देश आहे की तुम्ही इन्स्टॉल केलेले सॉफ्टवेअर किती उपयोगी आहे ते तपासणे हा उद्देश आहे?

दोन्ही.

> माहिती जमविणे हा उद्देश समाजशास्त्र/व्यवस्थापनशास्त्र इ. विषयांना खूपच आवश्यक ठरू शकते, संगणकतज्ञाला त्याची काय आवश्यकता?

हा प्रश्न मला कळला नाही. कृपया विशद करून सांगाल काय?
आपल्या मते संगणक तज्ञ नक्की काय करतात?

खालील

चर्चा वाचून मला सदस्य गिरिश कोण आणि त्या संबंधी उपक्रमींचे मत हे दोन्ही कळाले.

http://mr.upakram.org/node/3253

मी वाचून मला कळलेल्या माहीती नुसार ते अधिक संदर्भ देत नाहीत किंवा अजून माहीती देत नाहीत त्या मुळे लोकांचा त्यांच्याबद्दल गैरसमज झालेला दिसत आहे.

तुम्हाला जी काही अधिक माहिती हवी आहे ती आपण सांगितल्यास मी आपणास नेटवर्किंग आणि सेक्युरिटि या विषयातील संदर्भ / रिसर्च् पेपर्स् पाठविन जे वाचून आपल्याला स्वतःचे मत बनवता येईल.
मी वर सांगितल्या प्रमाणे जो कुठला कोड् रन होणार आहे तो ज्यांनी राऊटर्स् डिप्लॉय केलेले आहेत त्यांना बघता येईल. तसेच स्वतःच कंपाईल करून इन्स्टॉल ही करता येईल. याव्यतिरिक्त ट्रान्सपरन्सीसाठी अजून काय अपेक्षा आहेत ते कळाले तर बरे होईल.

धन्यवाद

तुमच्या विद्यापीठात तुमच्या विभागाचे संस्थळपान असेल, (तेथे या प्रकल्पाची माहिती प्रसिद्ध असेल,) त्याचा दुवा कृपया प्रसिद्ध करावा. तुम्ही राऊटर वगैरे देऊ करीत आहात त्याअर्थी तुम्हाला तुमचे नाव इ. लपविण्यात काहीच रस नसावा असे वाटते.
एकूण किती कालावधीचा करार असेल, करारात व्यक्तींना बांधण्याची काय योजना आहे* (राऊटरचे फर्मवेअर पूर्ववत करून एखाद्याने तो इबेवर विकला तर घरी वसुली एजंट येणार काय? ;) (माझा तसा उद्देश नाही) ), दिवसातून किती वेळ राऊटर सुरू ठेवावा लागेल, करार संपल्यावर राऊटर नक्की वापरकर्त्याच्या मालकीचा होईल काय? ज्यांनी राऊटर डीप्लॉय केलेले आहेत त्यांना कोडमधील काही भाग अमान्य असल्यास कराराचे काय होईल?
माझ्या इंटरनेट जोडणीत, माझ्या घरी येणार्‍या कोऍक्शिअल केबलला एक मोडेम-कम-(वायफाय-)राऊटर जोडलेला आहे. त्या राऊटरला पुढे तुमचा राऊटर जोडून ठेवला तर चालेल काय? (तसे असल्यास मी कधी माझा राऊटर थेट वापरेन तर कधी तुमच्या राऊटरमार्फत इंटरनेट वापरेन.)
वरील शंकांना समाधानकारक उत्तरे मिळाल्यास मी राऊटर स्वीकारण्यास तयार आहे.
--
* तुम्ही भारतातील एखाद्या महाविद्यालयाशी बोलणी केल्यास तुम्हाला उपयुक्त ठरू शकेल. त्या महाविद्यालयातील एखाद्या विद्यार्थ्याला फर्मवेअर इन्स्टॉल करून देणे इ. काम इंटर्नशिपसाठी दिल्यास त्या विद्यार्थ्याची 'प्रोजेक्ट'ची सोय होईल आणि राऊटरचा विक्री वगैरे गैरवापर होऊ न देणे ही त्याची आणि महाविद्यालयाची जवाबदारी बनविता येईल. महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी तुमचे राऊटर स्वीकारण्यास उत्सुक असतील असा माझा अंदाज आहे. विशेषतः, त्या राऊटरला यूएसबी हार्डडिस्क जोडल्यास त्या राऊटरशी जोडलेल्या सर्वच संगणकांना ती नेटवर्क ड्राईव म्हणून लॅनवर मिळते या तरतुदीचा वसतीगृहातील विद्यार्थांना खूपच उपयोग होऊ शकेल. शिवाय, या मुलांमध्ये पायरेटेड ओएस, पीटूपी, इ. चा वापर खूप असल्यामुळे तुम्हाला अपेक्षित 'माहिती' मुबलक प्रमाणात उपलब्ध होऊ शकेल.

प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद

प्रकल्पाची बेसिक माहिती: http://www.bufferbloat.net/projects/bismark
(पण यात अजून बर्याच डिटेल्स् नाही आहेत. त्या हळू हळू ऍड् केल्या जातील)
> एकूण किती कालावधीचा करार असेल
कालावधी अजून नक्की नाही.

> राऊटरचे फर्मवेअर पूर्ववत करून एखाद्याने तो इबेवर विकला तर घरी वसुली एजंट येणार काय?
नाही. म्हणूनच विश्वासू व्यक्तिंनांच हे द्यायचा प्रयत्न आहे. उपक्रमावरील एकंदर चर्चा बघता तो प्रश्न ईथे येऊ नये असे मला वाटते म्हणून मी ईथे ही चर्चा टाकली.

> दिवसातून किती वेळ राऊटर सुरू ठेवावा लागेल
राऊटर युज्वली २४ तास चालू असतात. तुम्हाला असे म्हणायचे आहे का कि किती वेळ इन्तेर्नेट् वापरणे बंधनकारक आहे? तर् त्याचे ऊत्तर की असे बंधन नाही.

> करार संपल्यावर राऊटर नक्की वापरकर्त्याच्या मालकीचा होईल काय?
बहूदा नाही. पण ज्या गतीने नवीन हार्डवेअर् येत राहते (आणि परत् आणण्याचा खर्च् पाहता) त्या प्रमाणे ते राऊटर काही दिवसांनी परत मागवण्यात काहीही स्वारस्य् ऊरणार् नाही.

> ज्यांनी राऊटर डीप्लॉय केलेले आहेत त्यांना कोडमधील काही भाग अमान्य असल्यास कराराचे काय होईल?
हा चांगला मुद्दा आहे. आत्तातरी माझ्याकडे याचे ऊत्तर् नाही. मी माझ्या सहकार्याशी याबद्दल् बोलीन. ढोबळमानाने जर तुम्हाला काही भाग अमान्य असेल तर तुमचा राऊटर दुसर्या कोणाला तरी देण्यात यावा.

> त्या राऊटरला पुढे तुमचा राऊटर जोडून ठेवला तर चालेल काय? (तसे असल्यास मी कधी माझा राऊटर थेट वापरेन तर कधी तुमच्या राऊटरमार्फत इंटरनेट वापरेन.)
हे असे जोडणे कदाचित् तुम्हाला त्रास्दायक ठरू शकेल. जोपर्यन्त आमचा राऊटर इन्तेर्नेत् ला कनेक्टेड् असेल् तो पर्यन्त् तुम्ही दुसरी कडून् इन्तेर्नेत् अधून् मधून् वापरले तरी चालू शकेल्.

> तुम्ही भारतातील एखाद्या महाविद्यालयाशी बोलणी केल्यास तुम्हाला उपयुक्त ठरू शकेल.
आम्ही आय् आय् टी शी बोलणी करत् आहोत.

> त्या महाविद्यालयातील एखाद्या विद्यार्थ्याला फर्मवेअर इन्स्टॉल करून देणे इ. काम इंटर्नशिपसाठी दिल्यास त्या विद्यार्थ्याची 'प्रोजेक्ट'ची सोय होईल आणि राऊटरचा विक्री वगैरे गैरवापर होऊ न देणे ही त्याची आणि महाविद्यालयाची जवाबदारी बनविता येईल. महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी तुमचे राऊटर स्वीकारण्यास उत्सुक असतील असा माझा अंदाज आहे. विशेषतः, त्या राऊटरला यूएसबी हार्डडिस्क जोडल्यास त्या राऊटरशी जोडलेल्या सर्वच संगणकांना ती नेटवर्क ड्राईव म्हणून लॅनवर मिळते या तरतुदीचा वसतीगृहातील विद्यार्थांना खूपच उपयोग होऊ शकेल. शिवाय, या मुलांमध्ये पायरेटेड ओएस, पीटूपी, इ. चा वापर खूप असल्यामुळे तुम्हाला अपेक्षित 'माहिती' मुबलक प्रमाणात उपलब्ध होऊ शकेल.
अत्यंत चांगली कल्पना. मी यावर विचार करेन.

अशा प्रकरचे अभ्यास् यु के, यु एस् ए सारख्या देशांमध्ये केले गेले आहेत (http://www.samknows.com/broadband/index.php)

वायरलेस किंवा वाय्-फाय् तंत्रद्न्यानाचे राऊटर्स् देणे आहे

मी महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील नेरळ ( माथेरान ) या ठिकाणी राहते.
युनिवर्सल मॉडेममध्ये मोबाईल सिम टाकुन ईंटरनेट युज करते आहे.
ईथे ब्रॉडबॅन्ड अ‍ॅवेलेबल नाही.
माझ्याकडे डेस्कटॉप व लॅपटॉप वाय फाय कनेक्टीविटी असणारे आहे.
संशोधनात भाग घेण्यासाठी हा राऊटर फुकट मिळणार असल्यास मी संशोधनात भाग घ्यायला तयार आहे.

 
^ वर