जेथुन आपले सेक्स लाईफ संपतं, तेथुन ह्यांचं सुरु होतं...
"जेथुन आपले सेक्स लाईफ संपतं, तेथुन ह्यांचं सुरु होतं" हे हताश उद्गार आहेत एका शाळेतील मुख्याध्यापिकेचे. त्या हताशपणे असे म्हणाल्या त्याचे कारण म्हणजे त्यांच्या शाळेतील इयत्ता ८ वी तील मुला-मुलींचे प्रताप. ते प्रताप काय आहेत ह्याबद्दल ही चर्चा नाही; तसेच, 'आमच्या वेळी असे नव्हते' साठीही नाही. असे उद्गार काढण्यामागची असहाय्यता काय आहे व त्यावर काही उपाय सुचवता येतायत का ते जाणण्यासाठी ही चर्चा.
ह्यातील सगळी पात्रे १००% खरी आहेत, उद्गार खरे आहेत, शाळा पुण्यातील ईंग्लीश मिडीयमची आहे. ज्या उपक्रमींना ही नावे उघड करा मगच हे संदर्भ खरे मानु असे म्हणायचे आहे त्यांच्यासाठी ही चर्चा नाही.
एक ८ वीतील विद्यार्थी अत्यंत घाणेरडे वर्तन करतो. त्यात तुम्ही जे इमॅजिन करु शकता ते सगळे आहे. मुलींना अत्यंत खालच्या पातळीवरील चिठ्ठ्या लिहीणे हे तर काहीच नाही. त्याची मजल त्याही पुढे आहे. वर्गशिक्षीकांना त्रास देणे नेहमीचेच. मुंहमें राम बगल में छुरी असा संदर्भ दिला असतांना, ह्याने, "मॅडम, ये गलत है, छोरी होती है" असे बकले. ह्याच्या पॅरेंटस ला बोलावले तर फक्त वडील येतात, मुख्याध्यापींकेच्या पाया पडतात व शाळेतून काढू नका अशी विनवणी करतात. असे कित्येक दिवस चालू आहे.
मुलीपैकी काही अशा प्रकाराला चालना देतात हे ही तितकेच खरे.
दुसरा मुलगा ८ वीतलाच पण हा ह्या भागातील राजकीय कार्यकर्त्याचा मुलगा. बाहेर जाऊन मुलांना गुटका खायला देणे, वगैरे प्रकार सर्रास.
ह्यातील पात्र नं. २ हे कोणत्याही शाळेत सापडेल पण पात्र नं १ फार विचीत्र आहे. शाळेतील ऍडमिनिस्ट्रेशन अशा केसेसवर योग्य ते पाऊल उचलतील अशी अपेक्षा असते पण तसे होतांना दिसत नाही? का? अशा मुलांना शाळांनी कसे वागवले पाहिजे? काय ऍक्शन घेतली पाहिजे? काय फ्रेमवर्क शाळेकडे हवे ज्यामुळे असे प्रकार करायला मुले जरी धजावली तरी त्यांचे पालक होणा-या कार्यवाहीला फार खळखळ न करता स्वीकरतील.
Comments
नक्की काय
तुम्हाला ही माहिती कुठून मिळाली? कोणती शाळा आहे ही? नक्की काय प्रकार घडला आहे ते विस्ताराने लिहा.
काहीतरी प्रॉब्लेम दिसतो
तुम्ही ज्या दोन्ही चर्चा टाकल्या आहेत आतापर्यंत त्या बघता काहीतरी प्रॉब्लेम दिसतो आहे. लक्ष द्या. तब्येतीकडे. बीफ चॉकलेट खाऊ नका.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
बीफ चॉकलेट
--आतापर्यंत त्या बघता काहीतरी प्रॉब्लेम दिसतो आहे. --
तुम्हाला त्यात् काहीतरी प्रोब्लेम दिसत आहे हेच् मुळात कौतुकास पात्र आहे, कारण गेल्या ४-५ वेळा तुम्ही बीफ चॉकलेटपेक्षा जास्त विचार करु शकत नव्हतात.
पोस्टऑर्गस्मिक इलनेस सिंड्रोम
हेहेहेहे. पोस्टऑर्गस्मिक इलनेस सिंड्रोम फारच बोकाळलेला दिसतो. अशांशी त्यांचा पोस्टऑर्गस्मिक इलनेस सिंड्रोम बरा झाला की बोलू.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
:})
ह्यावर एक मनोरंजक लेख येऊ द्या :)
मुलींना जर एवढा त्रास होत असेल तर मुलींच्या घरचे पोराला सोडतील असं वाटत नाही. लेखात अतिशयोक्ती अलंकाराचा वापर करण्यात आला असल्यास प्रतिसाद बाद समजावा
- गद्दाफी
काय बरे?
इमॅजिनेशनला खूप वाव आहे पण तो हे वर्तन शाळेत करतो का? शाळेत करणे कसे शक्य आहे? शाळेबाहेर करत असल्यास त्याचा शाळेशी संबंध नाही परंतु विद्यार्थिनींना खालच्या पातळीवरील चिठ्ठ्या लिहीणे वगैरे प्रकार होत असतील तर त्याला शाळेतून निलंबित करणे अशक्य नाहीच. जर शाळा तसे करत नसेल शिक्षकांवर प्रथम उपाय करणे जरूरी आहे. या विद्यार्थाला समुपदेशकाकडे पाठवायचेही काम शाळा करू शकते किंवा त्याच्या पालकांना सुचवू शकते.
हे सर्व शक्य नसेल तर त्यांना ईश आपट्यांकडे योगबल शिकवायला पाठवा.
परंतु याचा आणि मुख्याध्यापिकेच्या सेक्स लाइफचा काय संबंध?
यात नवीन काय? याचा आणि मुख्याध्यापिकेचे सेक्स लाइफ संपण्याचाही काय संबंध?
अशाप्रकारे वाह्यात बडबड करणार्या मुख्याध्यापिकेस निलंबित करायला हवे. मुले विशिष्ट वयात विशिष्ट गोष्टी करणार हे तिला कळत नाही का? किंवा कदाचित तिला उपचारांची गरज असेल.
बाकी, असे सेक्सविषयक राईचा पर्वत केल्यासारखे विषय उपक्रमाच्या ऐरणीवर आणण्यामागे तुमची भूमिका कळली तर बरे होईल.
उत्तरे
--पण तो हे वर्तन शाळेत करतो का?
होय
शाळेत करणे कसे शक्य आहे?
आहे. हे होते आहे म्हणूनच तर मनाला यातना झाल्या.
--तर त्याला शाळेतून निलंबित करणे अशक्य नाहीच.
नाही, तसे न होता त्या मुलाला पुन्हा-पुन्हा संधी दिली जाते आहे. म्हणूनच तर ही चर्चा टाकली, जेणे करुन असे प्रसंग कसे ह्यांडल केले जातात- इतर शाळांमधे, देशांमधे त्याबद्दल बोलता येइल.
--परंतु याचा आणि मुख्याध्यापिकेच्या सेक्स लाइफचा काय संबंध?
कदाचित तुम्हाला त्या वाक्याचा मतितार्थ सांगावा लागेल- ते वाक्य कोलोक्वीयल मराठीत आहे. एखाद्या पोक्त आणि त्या मुख्याध्यापिकेच्या वयातील व्यक्तिंचा सेक्स बद्द्लच्या ज्या कल्पना असतील / असतात त्या जेथे थांबतात त्याच्यापुढे काही ८ वीतील मुला-मुलींच्या सुरु होतात. हा मुलगा मुतारीत जाऊन मुलांना नाही-नाही ते त्रास देतो.
--किंवा कदाचित तिला उपचारांची गरज असेल.
नाही. तुम्हाला ह्या विषयाची व्याप्ती किती आहे ह्याचा अंदाज आलेला नाही.
व्याप्ती
अंदाज आला आहे. उपक्रमावर चर्चा सुरू करण्याच्या तुमच्या मोडस ऑपरेंडीचाही अंदाज आला आहे.
शाळेत घडणार्या या घटना नव्या नाहीत. गेली अनेक वर्षे त्या घडत आहेत. मुख्याध्यापिकेची भूमिका निभावणारी व्यक्ती अशा घटनांना सरावलेली हवी. शाळेकडे दोन पर्याय आहेत - मुलाला समुपदेशन/ उपचारांसाठी पाठवणे किंवा निलंबित करणे. शाळा काय करते ते माहित नाही पण तुमच्यामते चर्चा पुढे रेटण्यासाठी हे दोन्ही पर्याय कामाचे नाहीत असे दिसते. असो.
काही फरक नाही पडत.
--अंदाज आला आहे. उपक्रमावर चर्चा सुरू करण्याच्या तुमच्या मोडस ऑपरेंडीचाही अंदाज आला आहे.--
काढून टाका चर्चा. काही फरक नाही पडत.
योगबल
--ईश आपट्यांकडे योगबल शिकवायला पाठवा.--
येथे इश आपट्यांचा काय संबंध?
उपाय
फारसा नाही, फक्त योगबलाचा उपाय सुचवला. कदाचित त्यात सर्व विकार दूर करण्याची क्षमता असेल म्हणून. :-) पण बाकी प्रश्नांची उत्तरे कुठे आहेत?
तुमच्या चर्चा म्हणजे अपव्यय आहेत असे वाटण्याची वेळ येऊ देऊ नका. उडायच्या एखादे दिवशी.
नियमाप्रमाणे कारवाई
--तुमच्या चर्चा म्हणजे अपव्यय आहेत असे वाटण्याची वेळ येऊ देऊ नका. उडायच्या एखादे दिवशी..
नियमाप्रमाणे कारवाई झाली तर काहीच वाटणार नाही. नियमांचे अंमल मात्र समान असावेत.
मुख्याध्यापकांचे काम म्हणजे फारच तणावाचे
मुख्याध्यापकांचे काम म्हणजे फारच तणावाचे.
मी सातवी-आठवीत असताना माझ्या एका वर्गबंधूने वर्गातील एका मुलीबद्दल शरीसंबंधाचे वर्णन बाथरूममध्ये लिहून ठेवले होते. त्या वेळचे नीट आठवत नाही (आणि शिवाय मी या गप्पांच्या विषयात खूपच बावळट होतो) पण खरोखरच या मुलीला दिवस गेले होते. मुख्याध्यापिकेने रंगरंगोटी होईस्तोवर बाथरूम बंद केली, कसेतरी करून "लिहिणारा कोण" म्हणून शोधून काढले, आणि गुप्तपणे त्याला चोपून काढले. मुलीलासुद्धा शाळेतून गाजावाजा न करता घालवले, आणि शिक्षक-मुख्याध्यापिका कोणीही एक शब्द आणखी कोणाशी बोलले नाही या बाबतीत.
एक-दोन आठवड्यांत एके दिवशी मुख्याध्यापिकेने येऊन पाच मिनिटांचे बौद्धिक घेतले - "तुमच्या वयात शरिराची खूप उर्मी असते, पण सांभाळून घ्या, शिस्तीत राहा" असे काहीतरी मोघम.
आम्ही पोरे आपापसात मुख्याध्यापिकाबाईंची नक्कल/गंमत/चिडवाचिडवी करत असू. पण आता विचार करता असे वाटते, की हा सगळा प्रकार बाईंना खूपच तणाव देणारा असला पाहिजे.
रीफॉर्म
--की हा सगळा प्रकार बाईंना खूपच तणाव देणारा असला पाहिजे.
अगदी मनातले बोललात, म्हणूनच ही चर्चा टाकली. धन्यवाद.
पण मुख्याध्यापिकेंकडे अशी प्रकरणे हाताबाहेर गेली की येतात. त्याआधी त्यांच्या शिक्षकांना रोज, प्रत्येकवेळी अशा उर्मट आणि अयोग्य वागणूकींना सामोरे जावे लागते. अनेकदा एक-दोन् फटके दिल्याशिवाय पोरे त्याक्षणी शांत राहत नाहीत. विचार करा, एखाद्या माणसाला रोज अशा प्रकारांना सामोरे जायचे असेल तर त्याची मानसिक अवश्था काय होत असेल?
शिक्षक मानसोपचार तद्न नसतात; त्यांच्याकडून शिक्षणा व्यतिरीक्त आणखी काय-काय अपेक्षा ठेवायची? ठेवायची असेल तर त्यांना काय प्रशिक्षण दिले जाते? त्यांनी ह्या कामात किती वेळ द्यावा? - "मुलांना शारीरीक मारहाण करु नये" सारख्या उपदेश वाल्यांनी सांगावे.
मला वाटते की, शाळांच्या व्यवस्थापनाबद्दल एक रीफॉर्म येण्याची वेळ आली आहे.
काय गैर आहे?
हे योग्यच आहे. त्यावर तुमचा आक्षेप आहे काय? असल्यास तसे स्पष्ट करावे.
शाळेकडे पर्याय आहेत
मुलाला समुपदेशकाकडे पाठवणे किंवा निलंबित करणे. या दोन्ही गोष्टी मान्य न करता उगीच चर्चा वाढवत बसणे हाच उद्देश आहे काय?
बायस प्रतिसाद
हे पहा बाई, तुम्हाला ही चर्चा काढून टाकायची असेल तर काढा. उगीच योग्य हेतूने केलेल्या चर्चेला बायस प्रतिसाद देत नका बसू.
तुमचा हेतू
तुम्हाला योग्य प्रश्न विचारले आहेत. त्याची उत्तरे न देता बायस प्रतिसाद वगैरे म्हणणे म्हणजे तुमचा हेतू स्वच्छ नाही हेच दिसते. तुम्ही जेव्हा चर्चा सुरू करता तेव्हा तुमचा हेतू कळावा अशी अपेक्षा रास्त आहे. तुम्हाला सुचवलेले पर्याय तुम्हाला मान्य नाहीत. दुसरा मुद्दा नाही तेव्हा नेमके काय हवे आहे?
मुलांना शारिरीक मारहाण न करण्याबद्दल तुमचे आक्षेप आहेत असे समजावे काय? तो मुद्दा मूळ चर्चेत नव्हता, तुम्ही तो आणलात. आता त्यावर प्रश्न उपस्थित केले तर बिघडले कुठे?
हेतू स्वच्छ आहे की नाही?
श्री धम्मकलाडू ह्यांचे खोडसाळ प्रतिसाद तसेच ठेवुन माझे त्यांना दिलेली उत्तरे काढली जात आहेत हे पाहून मी असेच म्हणेन की, माझा हेतू स्वच्छ आहे की नाही हे गृहीत धरण्याचा अधिकार जसा इतर सदस्यांचा आहे, तसाच माझाही आहे की, फक्त माझे प्रतिसाद उडवले जाणे हे स्वचछधेतूने केलेले दिसत नाही. तुमचे प्रश्नही "उलटतपासणी" सदरात मोडतात.
उलटतपासणी
जर काही सदस्य सातत्याने तुम्हाला खोडसाळ प्रतिसाद देत असतील तर थोडे आत्मपरीक्षणही करा. तुम्ही वारंवार चर्चा टाकता. संदर्भ मागितले, अधिक माहिती विचारली की चर्चा भरकटवता. वरही शारिरीक मारहाणीबद्दल तुम्हीच लिहिलेत. त्यावर तुमचे मत विचारले असता आता तुम्ही ते टाळून चर्चा भलतीकडे नेणे सुरू केलेत. तुमच्या चर्चांना विश्वासार्हता नाही. बीफ चॉकलेटचे नाव कळवतो असे सांगून तुम्ही कळवलेले नाही. वारंवार तुमच्याकडून होणार्या अशा वर्तनाने सदस्यांना तुमच्याबाबत विश्वासार्हता वाटत नाही याचा आपण विचार केलात का?
तुमची उलटतपासणी करू नये असे कुठे उपक्रमाच्या धोरणांत नाही. उलट येथे आलेले प्रत्येक लेखन तपासून घ्यावे, संदर्भांसकट असावे असाच प्रयत्न असतो.
केले
--आत्मपरीक्षणही करा.--
केले. माझे काही चुकले आहे असे मला अजिबात वाटले नाही. इतर सद्स्यांनीही आत्मपरीक्षण करावे.
-- बीफ चॉकलेटचे नाव कळवतो असे सांगून तुम्ही कळवलेले नाही.--
आठवत नाही. पुन्हा ते चॉकलेट त्या दुकानात पाहिले नाही.
-- वरही शारिरीक मारहाणीबद्दल तुम्हीच लिहिलेत.
काय लिहिले आहे? त्याचा मतितार्थ काय आहे?
--उलट येथे आलेले प्रत्येक लेखन तपासून घ्यावे, संदर्भांसकट असावे असाच प्रयत्न असतो.
सगळ्यांना नियम सारखे असावेत
उपयोग
मग पुढे बोलण्याचा प्रश्नच कुठे येतो? यावर मग इतर सदस्य मला का बोलतात असा प्रश्न विचारू नये.
तुम्ही लिहिलेत मथितार्थ तुम्हीच सांगा. मुलांना शारिरीक मारहाण केल्याने प्रश्न सुटतात असे तुम्हाला का वाटते?
कुणाचे संदर्भ येथे तपासून घेतलेले नाहीत ते सांगा.
संदर्भ
-- कुणाचे संदर्भ येथे तपासून घेतलेले नाहीत ते सांगा.
हा प्रतिसाद वाचा व तुमचे विश्लेषण द्या.
हा ढवळ्या-पवळ्याचा प्रतिसाद वाचा
विश्लेषण कसले
तुमच्या गेल्या दोनच का, खाली इतर चर्चांची यादी दिली आहे त्यामुळे तुमच्यावर शंका घेण्यास वाव आहे असे मलाही वाटते. प्रत्येक चर्चेत तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून तुम्ही पळ काढता.
दुधातील भेसळ वगैरे चर्चा तर अफाट होत्या. ढवळ्या पवळ्या वगैरे शब्दांचा निषेध करून म्हणेन की लोकांना तुमच्याविषयी शंका घेण्यास जागा आहे.
ठरवुन टाकले
--करून म्हणेन की लोकांना तुमच्याविषयी शंका घेण्यास जागा आहे.
तुम्ही आता तसे ठरवुन टाकले असल्यामुळे कितीही पुरावे दिले तरी त्यात काहीच फरक पडणार नाही असा माझा समज झाला आहे.
--प्रत्येक चर्चेत तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून तुम्ही पळ काढता.
"प्रश्न कसे विचारावेत" ते त्या सम्बंधीत विचारवंतांना शिकण्यास सांगावे.
प्रश्न
येथे मीही तुम्हाला प्रश्न विचारला होता. तुम्ही प्रश्न सोडून विषय भरकटवलात.
नवे कारण! :-) तुमची विश्वासार्हता संपलेली आहे.
व्हू केअर्स
--तुमची विश्वासार्हता संपलेली आहे.
व्हू केअर्स. :-)
राहूनच गेले.
अरे हो, राहूनच गेले.
ह्या धाग्याला आलेल्या संतुलीत प्रतिक्रिया वाचाव्यात व त्या विचारवंतांनाही द्याव्यात. चर्चा जर अत्यंत टाकावु असेल तर इतरांनी दिलेले योग्य प्रतिसाद आले नसते.
पण कंपुबाजी करुन एखादी चर्चा हाणून पाडावी, त्यात सतत संदर्भहीन वाक्ये टाकली तरी ती खपवुन घेणे, त्या संदर्भहीन वाक्यांना मी दिलेली उत्तरेच तेव्हढी काढून टाकणे ह्यास मी कारस्थानच म्हणेन.
प्रतिक्रिया
या धाग्यावरच्या प्रतिक्रिया या तुमच्या क्रियांमुळे आलेल्या आहेत हे कृपया समजून घ्या.
इतरांनी तुमचे आधीचे चर्चाविषय न वाचल्याची शक्यता आहे. त्यांच्याही ध्यानात ही गोष्ट यावी म्हणून निदान माझातरी हा प्रयत्न आहे.
प्रतिमा मुद्दाम मलीन
--त्यांच्याही ध्यानात ही गोष्ट यावी म्हणून निदान माझातरी हा प्रयत्न आहे.
हे म्हणजे एखाद्याची प्रतिमा मुद्दाम मलीन करणे आहे. तुमच्या प्रयत्नांना यश मिळो- माझ्या बरोबरच तुमची ही माहिती त्यांना कळेलच.
शब्दांचा निषेध
--ढवळ्या पवळ्या वगैरे शब्दांचा निषेध करून म्हणेन
ज्यांना हे संबोधले आहे, त्यांनी मला जी विषेशणे दिली होती, व ज्या शिव्या दिल्या होत्या त्यांचाही निषेध केला असता तर स्कोर सेटल व्हायला मदत झाली असती.
शिव्या वगैरे
मला वाटते तुम्हाला कोणी शिव्या दिल्या असतील तर त्या माझ्या नजरेस तरी पडलेल्या नाहीत. संपादित झाल्या असतील तर कल्पना नाही पण जर कुणी शिव्या दिल्या असतील तर नक्कीच आक्षेपार्ह आहे. बीफ चॉकलेटला मात्र शिवी म्हणता येत नाही.
संपादीत झाल्या
त्या संपादीत झाल्या आहेत अर्थातच. पण त्या अत्यंत घाणेरड्या होत्या हे नक्की.
ढवळ्या-पवळ्या?
--बीफ चॉकलेटला मात्र शिवी म्हणता येत नाही.
मग ढवळ्या-पवळ्या ही सुधा शिवी नाही. त्याचा निषेध का?
मी कधी शिवी म्हटले
ढवळ्या-पवळ्या ही बैलांची जोडी असते ना ;-) रिटे आणि डामॅ मला इतर काही वाटत असले तरी बैल नक्कीच वाटत नाहीत. तो एकतर त्यांचा अपमान आहे आणि बैलांचाही. तेव्हा निषेध योग्य आहे.
गंभीर प्रकरण
+१
तुम्ही लिहित असलेल्या सर्व प्रतिसादांशी सहमत आहे.
गिरीश (आणि तत्पुर्वीच्या सदस्य नावाचे) चर्चा विषय वाचले. जवळपास प्रत्येक बाबतीत चर्चा विषय हा कपोलकल्पित कहाणी असल्याचा भास होऊ लागला आहे. अगदी समारंभ व्यवस्थापनासारख्या सामान्य विषयापासून. या चर्चे दरम्यान चर्चाप्रस्तावकाने कुठलीही ठोस माहिती द्यायची नाही. प्रतिसादकांकडून माहिती गोळा करायची वा त्यांना प्रतिसाद उपप्रतिसादात गुंतवायचे असे ठरलेले. दुधातील भेसळ, बीफ चॉकलेट, जागतिक दर्जाचे उत्पादन इत्यादी विषयात हे जाणवते.
चर्चा प्रस्तावकाकडे याबद्दलची माहिती खरी असेल, मात्र ती जोपर्यंत पुढे येत नाही तो पर्यंत त्या त्या चर्चा या निरर्थक-झुडुपाशेजारी मारण्यागत होतात. मी अशी आशा करतो की यापुढे याबाबतीत योग्य ती खबरदारी घेतली जाईल.
प्रमोद
धन्यवाद!
तिरपे तिरपे जात राहण्याचा शौक नाही पण त्यातून काहींना बोध व्हावा असाच प्रयत्न होता म्हणून प्रश्नोत्तरे होत राहिली.
गिरीश यांनी चर्चा टाकताना तिच्या विश्वासार्हतेकडे लक्ष पुरवल्यास लोक त्यांना चिडवणार नाहीत, त्यांचे हसे करणार नाहीत परंतु हे न करता केवळ लोकांना लढवायचे किंवा गुंतवून ठेवायचे इतकाच हेतू असेल तर त्यातून काहीच निष्पन्न होत नाही. याला वैतागून लोक चिडवू लागतात. उपहास करू लागतात तेव्हा दोष फक्त त्यांचाच नसतो, चर्चाप्रस्तावकाचाही असतो.
उपक्रमावर गंभीर स्वरूपाच्या चर्चा चालतात असे इतर सदस्यांना वाटून ते मनापासून प्रतिसाद देतात त्यांच्याशी या अशा चर्चा म्हणजे प्रतारणा केल्यागत वाटते इतकेच दाखवून द्यायचे होते. गिरीश यांनीही या मुद्द्याकडे लक्ष द्यावे.
अविर्भाव
बादवे, बीफ चॉकलेटचे नाव काढले की, त्या विचारवंत सदस्यांना खूप आनंद होतो. त्यांच्याकडे काहीच मुद्दे उरले नाही की, बीफ् चॉकलेटचे संदर्भ देऊन ते मला काउंटर शह देण्यचा अविर्भाव आणतात. :-)
वाद-विवाद करतांना बुद्धीचा वापर करुन झाला की, लोकं अशी काहीतरी खुसपट काढून चर्चा भरकवटतात. :-)
बीफ चॉकलेट
बीफ चॉकलेटचे नाव
शॉप ऍ़क्टचा संदर्भ
युलिप पॉलीस्या विकणारी कंपनी
अश्या अनेक उदाहरणामधे तुम्ही काढता पाय घेतला आहे. त्यामुळे तुम्ही इथे एक चेष्टेचा विषय झाला आहात. अर्थात म्हणून तुम्ही लिहूच नये असे नाही, माहितीप्रधान स्थळावर थोडी करमणूकही असावी असे वाटते.
+२
चॉकोलेट विकणार्या त्या दुकानाचे नाव
दुधातील भेसळ ओळखून काढून टाकणारे तंत्रज्ञान
अफाट
स्मरणशक्तिच्या प्रदर्शनाने थक्क व्हायला होते. अफाट आहे.
खबरी
--त्यामुळे तुम्ही इथे एक चेष्टेचा विषय झाला आहात.--
माहिती (खबर) आणून दिल्याबद्द्ल धन्यवाद. :-)
विद्यार्थी
शाळाकॉलेजांतले विद्यार्थी हे त्या त्या समाजाचे प्रतिबिंब असते. समाज बदला, विद्यार्थी बदलतील. विचार बदला, नशीब बदलेल!
सन्जोप राव
आह को चाहिये, इक उम्र असर होने तक
कौन जीता है, तिरे जुल्फ के सर होने तक
थोडी गंमत
शाळाकॉलेजांतले विद्यार्थी हे त्या त्या समाजाचे भविष्य असते. विद्यार्थी बदला, समाज बदलेल :)
शिक्षक बदला, समाज बदलेल
आणि प्रसाधनगृहे? शाळाकॉलेजांत शिक्षकही असतात. प्राध्यापक असतात. प्रा.डॉ. असतात. ही मंडळी समाजाचे प्रतिबिंबे असतात. शिक्षक बदला, समाज बदलेल!
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
अर्थात!
आणि प्रसाधनगृहे? शाळाकॉलेजांत शिक्षकही असतात. प्राध्यापक असतात. प्रा.डॉ. असतात. ही मंडळी समाजाचे प्रतिबिंबे असतात. शिक्षक बदला, समाज बदलेल!
अर्थात प्रसाधनगृहे! विशेषतः प्रसाधनगृहे!
दृष्टीकोन बदला, चर्चा बदलेल!
सन्जोप राव
आह को चाहिये, इक उम्र असर होने तक
कौन जीता है, तिरे जुल्फ के सर होने तक
काही प्रयत्न :
१. अशा मुलांना गुंतवून ठेवा, शाळेतील बरीच जबाबदारी ह्यांच्यावर लादा (फार जोखीमेची कामे देउ नका नाहीतर तिसरेच काहीतरी व्ह्यायचे)
२. वर्ग भरवने आणि प्रत्येक मुलाला स्टेजवर येउन "त्या" मुलाबद्दल आपल्याला काय वाटते हे सांगायला लावणे ("त्या" मुलासमोर + त्याच्या आई-बाबा असताना)
( बर्याचदा ही मुलं मी दुसर्यांना लै भारी वाटत असावो म्हणून करत असतात पण प्रत्यक्षात त्यांची मते आइक्ल्यास त्यांना "धक्का" बसेल)
पायरी -२ मधे हीच गोष्ट शाळा लेवल ला करावी (इज्जतीचा प्रश्न आला की सर्वजण बहूतेककरून आपली वाइट वर्तनूक थांबवतील)
३.बक्षीस वीतरण करा (काही मुल्याचे) आणि "तो" वगळता सर्वांना द्या (त्याच्या आइ+वडीलांना बोलवा त्यादिवशी)
आणि का दिले नाही ह्याचे कारण जाहीर करा.
--------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी
पारंपारीक पद्धत
प्रतिसादाबद्दल आभारी.
प्रश्न असा आहे, ह्या पिढीतील मुलांचे ह्या विषयाचे द्न्यान इतके वाढले आहे की, आश्चर्य वाटते. पुर्वी ते एक्-दोन मुलांना माहिती असेल तर आता अनेकांना माहिती आहे. बावळट कुणीही नाही.
त्यामुळेच शिक्शकांवर अतिरीक्त ताण ह्याचा पडतो. पारंपारीक पद्धतीने असे प्रश्न सोडवता येतील का ह्याची शंका येते. त्यांना एखाद्या बाह्य-व्यवस्थेची मदत लागेल, व्यवस्थापनाकडून मदत लागेल. ती काय असावी असा प्रश्न मनात येतो.
आठवीत
मला आठवते त्याप्रमाणे आठवीत आमच्या वर्गात "सर्वांना" ते ज्ञान होते. (पर्सनली मला ते सातवीत झाले होते).
नितिन थत्ते
कसा / किती फरक
ज्या शिक्षकांनी गेले १० + वर्षे शिकवले आहे- माध्यमिक शाळांमधे- ते सांगू शकतील मुलांमधे कसा / किती फरक पडलाय.
ज्ञान आणि नैतिकता
आता आठवी-नववीच्या शालेय पुस्तकातच मानवासह इतर सर्व सजीवांच्या पुनरुत्पादन प्रक्रियेसंबंधी आकृत्यांसह माहिती दिलेली असते.
ते कुणीतरी काहीतरी अर्धवट माहिती देण्यापेक्षा बरे.
आणि (लहान?) मुलांवर लैंगिक माहितीचा परिणाम काय होतो? असे विचाराल तर -
राजवाड्यांचे 'भाविसंइ' हे पुस्तक प्रसिद्ध आहेच. त्यात भारतीय इतिहासकालात कोणकोणत्या विवाह पद्धती होत्या त्याची तपशीलवार माहिती मिळते.
त्यामानाने आजच्या नैतिकतेच्या व्याख्या खूपच मर्यादित आणि कठीण आहेत असे म्हणावे लागते.
***
वरील लेखातील उदाहरण क्रमांक १ मध्ये जर तो मुलगा जर विकृत वर्तन करत असेल तर त्याला मानसोपचार तज्ञाकडे न्यावे.
बाकी दुसर्या प्रकारची उदाहरणे पदोपदी आढळतात.