जेथुन आपले सेक्स लाईफ संपतं, तेथुन ह्यांचं सुरु होतं...

"जेथुन आपले सेक्स लाईफ संपतं, तेथुन ह्यांचं सुरु होतं" हे हताश उद्गार आहेत एका शाळेतील मुख्याध्यापिकेचे. त्या हताशपणे असे म्हणाल्या त्याचे कारण म्हणजे त्यांच्या शाळेतील इयत्ता ८ वी तील मुला-मुलींचे प्रताप. ते प्रताप काय आहेत ह्याबद्दल ही चर्चा नाही; तसेच, 'आमच्या वेळी असे नव्हते' साठीही नाही. असे उद्गार काढण्यामागची असहाय्यता काय आहे व त्यावर काही उपाय सुचवता येतायत का ते जाणण्यासाठी ही चर्चा.

ह्यातील सगळी पात्रे १००% खरी आहेत, उद्गार खरे आहेत, शाळा पुण्यातील ईंग्लीश मिडीयमची आहे. ज्या उपक्रमींना ही नावे उघड करा मगच हे संदर्भ खरे मानु असे म्हणायचे आहे त्यांच्यासाठी ही चर्चा नाही.

एक ८ वीतील विद्यार्थी अत्यंत घाणेरडे वर्तन करतो. त्यात तुम्ही जे इमॅजिन करु शकता ते सगळे आहे. मुलींना अत्यंत खालच्या पातळीवरील चिठ्ठ्या लिहीणे हे तर काहीच नाही. त्याची मजल त्याही पुढे आहे. वर्गशिक्षीकांना त्रास देणे नेहमीचेच. मुंहमें राम बगल में छुरी असा संदर्भ दिला असतांना, ह्याने, "मॅडम, ये गलत है, छोरी होती है" असे बकले. ह्याच्या पॅरेंटस ला बोलावले तर फक्त वडील येतात, मुख्याध्यापींकेच्या पाया पडतात व शाळेतून काढू नका अशी विनवणी करतात. असे कित्येक दिवस चालू आहे.
मुलीपैकी काही अशा प्रकाराला चालना देतात हे ही तितकेच खरे.

दुसरा मुलगा ८ वीतलाच पण हा ह्या भागातील राजकीय कार्यकर्त्याचा मुलगा. बाहेर जाऊन मुलांना गुटका खायला देणे, वगैरे प्रकार सर्रास.

ह्यातील पात्र नं. २ हे कोणत्याही शाळेत सापडेल पण पात्र नं १ फार विचीत्र आहे. शाळेतील ऍडमिनिस्ट्रेशन अशा केसेसवर योग्य ते पाऊल उचलतील अशी अपेक्षा असते पण तसे होतांना दिसत नाही? का? अशा मुलांना शाळांनी कसे वागवले पाहिजे? काय ऍक्शन घेतली पाहिजे? काय फ्रेमवर्क शाळेकडे हवे ज्यामुळे असे प्रकार करायला मुले जरी धजावली तरी त्यांचे पालक होणा-या कार्यवाहीला फार खळखळ न करता स्वीकरतील.

लेखनविषय: दुवे:

Comments

लैगिंक शिक्षणही

--आता आठवी-नववीच्या शालेय पुस्तकातच मानवासह इतर सर्व सजीवांच्या पुनरुत्पादन प्रक्रियेसंबंधी आकृत्यांसह माहिती दिलेली असते.
नुसत्याच आकृत्या नव्हे तर अनेक शाळांतुन लैगिंक शिक्षणही दिले जाते. त्यामुळे त्यांना योग्य ते द्न्या असायला हवे ह्याबद्दल दुमत नाही. पण ते द्य्नान विकृतीकडे कलल्याचे आढळते. शिक्षीकांना उगीचच स्पर्श करणे... ई. एखाद-दुसरा मुलगा असा असणे आणि अनेक असे असणे (एकाच वर्गात) हे सध्याच्या शिक्षकांना त्रासदायक होते आहे.

जबाबदारी

--विकृत वर्तन करत असेल तर त्याला मानसोपचार तज्ञाकडे न्यावे.
पण मग ही जबाबदारी शाळाम्ची नसावी.

एकत्र येऊन बोला

शिक्षक, विद्यार्थी आणि पालक सगळ्यांनी एकत्र बसून, मोकळेपणाने व खुल्या विचारांनी बोलून (निलंबनाव्यतिरिक्त इतर) उपाय शोधायची गरज आहे. या चर्चेत विरद्यार्थ्याचा सहभाग व त्याची मते येणे गरजेचे आहे. नाहीतर त्याच्यासाठी हा निर्णय बाहेरून लादलेला होईल

एकाने दुसर्‍याला आदेश/सल्ला देऊन अशी प्रकरणे मिटतात असे वाटत नाही (फारतरफार लपु शकतात)

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

कॉमन फ्रेमवर्क

--एकाने दुसर्‍याला आदेश/सल्ला देऊन अशी प्रकरणे मिटतात असे वाटत नाही
अगदी खरे. मुलांच्या एकंदरीतच ह्याविषयातील प्रगती लक्षात घेता शाळांनी त्यांच्या पारंपारीक मार्गाशिवाय काय मार्ग असु शकतात ह्यावर चर्चा करुन एखादे कॉमन फ्रेमवर्क करणे आवश्यक आहे.

कठीण प्रश्न...

लहान मुलांशी लैंगिक विषयांबद्दल कसे बोलावे हा एक कठीण प्रश्न आहे. घरातील बागे मधे चिमण्यांनी घरटे बांधलेय त्यांचा विणीचा हंगाम सुरु होतोय, त्यांच्या क्रीडा पाहून माझ्या लहान मुलाचे प्रश्न सुरु झालेत. सध्या "पुढील वर्गात तू बायोलॉजी शिकशील तेव्हा तुला नीट / अधिक समजेल" हे उत्तर दिलेय. उपक्रम वरील जाणकार, अनुभवी लोकानी ही समस्या कशी हाताळली /हाताळावी याविषयी लिहावे ही विनंती आहे. कुणाचा वेगळा लेख आला तर फारच उत्तम.

जेथुन आपले सेक्स लाईफ संपतं, तेथुन ह्यांचं सुरु होतं.

ओह्! थोडक्यात ह्यांच सेक्स लाईफ सूरू होतच नाही असं सूचवायचं आहे तर ;).

उद्दिष्ट

शाळेचे उद्दिष्ट कार्यवाही कारण आहे की आशा प्रकारचे विचार मनात येऊ नये ह्यासाठी उपाय योजना करणे आहे?

योग्य वेळेस योग्य समज/शिक्षण न मिळाल्यामुळे, व बाहेरील जगात असंख्य प्रकार आणि नको त्या मार्गाने शिक्षण मिळाल्यामुळे निर्माण होणाऱ्या भावना आणि विचार ह्यांचा निचरा योग्य मार्गाने झाला नाही तर असे काहीसे वर्तन होते.

म्हणजे योग्य वेळेत योग्य शिक्षण/समुपदेशन हे दूरदर्शी विचार ठरू शकतील असे वाटते.

 
^ वर