सचिन तेंडुलकर आणि दारुच्या जाहिराती

मध्यंतरी सचिनने दारूच्या जाहिराती घेणार नाही असे घोषित करुन बरीच पब्लिसीटी मिळवली. अर्थात सचिनला पब्लिसीटीची गरज नाही पण आपले नैतिक अधिष्ठान किती उच्च आहे हे दाखवण्यासाठी हा पवित्रा घेतला असावा. ते काहीही असो. पण परवा आयपीएलची मॅच पाहाताना ह्याच सचिनच्या शिरस्त्राणावर 'रॉयल स्टॅग' असा मोठा छाप दिसला. ह्याला काय म्हणावे? बोले तैसा चाले..हे वागणुकीत आणण्यात बरेच कठीण असावे. विशेषतः आयपीएलचा पैसा बघता. पण दारुच्या जाहिराती न स्वीकारण्याचा निर्णय डोक्यावर घेतली प्रसार माध्यमे ह्यावर मात्र का गप्प आहेत कळत नाही.

सचिनपुजकांना ह्याविषयी काय वाटते? सत्यसाईबाबांच्या मृतदेहासमोर ढसा ढसा रडणारा सचिन हा समाजाचा हिरो मान्यण्याइतका आपला समाज रसातळाला गेला आहे का? आपल्या समाजात आदर्श व्यक्तिमत्वांची इतकी उणीव का आहे?

Comments

आदर्श

आपल्या समाजात आदर्श व्यक्तिमत्वांची इतकी उणीव का आहे?

बाकी चर्चा ठीक पण आपल्या समाजात आदर्श व्यक्तिमत्त्वे कोण आहेत त्यांची संदर्भादाखल काही उदाहरणे मिळतील काय? :-) याचे उत्तर चर्चेत भाग घेणार्‍या कोणीही द्यावे.

बायदवे, सचिन समाजाचा हिरो कधीपासून झाला? तो फक्त क्रिकेटमधला हिरो होता असे ऐकून आहे.

अवांतरः आदर्श वगैरे म्हटले की हल्ली फक्त आदर्श इमारत आठवते. असो.

केवढे हे अधःपतन

छे! केवढे हे अधःपतन. सचिनने एका हातचलाखी दाखविणाऱ्यासाठी अश्रू ढाळण्याऐवजी आमच्या आवडत्या मद्याची जाहिरात केलेली कधीही आवडले असते.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

बरोबर

दारुपेक्षा सत्यसाईबाबाची जाहिरात समाजासाठी कितीतरी घातक. पण सचिनपुजकांना (सचिनला भारतरत्न मागणी करणारे वगैरे) काय वाटते?

वर्किंग हायपोथेसिस काय?

दारुपेक्षा सत्यसाईबाबाची जाहिरात समाजासाठी कितीतरी घातक.

तुमचे वर्किंग हायपोथेसिस काय कळल्यास बरे होईल. म्हणजे तुमचे विधान खोडून काढण्यास कसा विदा देता येईल ह्याचा विचार करता येईल.

धम्मकलाडू पंचाक्षरी आयडीवाले

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

पूजक?

पण सचिनपुजकांना (सचिनला भारतरत्न मागणी करणारे वगैरे) काय वाटते?
त्याला भारतरत्न द्यावे असे फक्त त्याच्या पूजकांनाच वाटते हे नव्यानेच कळले.
काही विशिष्ट क्षेत्रांत अति उच्च कामगिरी करणार्‍यांना भारतरत्न देण्यात येते असे वाटते. क्रिकेट हे क्षेत्र त्या डोमेनमध्ये नसल्याने भारतरत्न देऊ नये असा कायदेबाज आक्षेप कदाचित ग्राह्य धरता येईल.
ज्यांना भारतरत्न मिळते ती माणसे सर्व मोहांपासून अलिप्त असली पाहिजेत असेही कुठे लिहिलेले आहे का याबाबत मार्गदर्शन करावे.
परवा एकजण म्हणत होता की लहान असताना जेवणात खेकडे असले की 'सचिन तेंडुलकर' पानामधे बाकीचे बरेचसे पदार्थ टाकून देत असे. तरी या कारणाकरता त्याला भारतरत्न देण्यात येऊ नये.

सच्चू

परवा एकजण म्हणत होता की लहान असताना जेवणात खेकडे असले की 'सचिन तेंडुलकर' पानामधे बाकीचे बरेचसे पदार्थ टाकून देत असे.

सच्चू आवडण्याचे आणखी एक कारण कळले. ;-) तसे जेवणात खेकडे असले की उर्वरित पदार्थ आम्ही पानात घेतच नाही.

(खेकडेप्रेमी- खेकडेपूजक) प्रियाली ;-)

हा हा हा

तसे जेवणात खेकडे असले की उर्वरित पदार्थ आम्ही पानात घेतच नाही.>>>>
परवा एकजण म्हणत होता की लहान असताना जेवणात खेकडे असले की 'सचिन तेंडुलकर' पानामधे बाकीचे बरेचसे पदार्थ टाकून देत असे. >>>>

हा धागा, प्रतिसाद वाचून मराठी माणसे, खेकडे, खेकडा मनोवृत्ती असे बरेच काय काय आठवले. एक विनोद ही आठवला.

मिष्टर खेकडा एकदा घरी येताना सरळ चालत घरी येतात ते बघून सौ. खेकडा म्हणतात , " तरी इतक्यांदा कानी कपाळी ओरडत असते, झेपत नाही तर इतकी प्यावी कशाला खेकड्याने म्हणते मी ss!! "
( खेकडा कसा चालतो हे ज्यांनी पहिले असेल त्यांना नक्की कळेल काय गडबड आहे ते ) :)

माणूस

माणूस आहे, माणसे बदलतात, माणसे चुकतात, माणसे दारू पितात, माणसाना भारतरत्न दिले जाते, माणसे चुका काढतात, माणसे बरोबर तेवढेच सांगतात, माणसे प्रतिसाद देतात.

मैदानात व मैदानाबाहेर

सचिन तेंडुलकर मैदानात काय करतो याच्याशीच केवळ देणंघेणं आहे. मैदानाबाहेर काहीही का करेना? काही लोकांना त्याचा आदर्श ठेवावासा वाटतो. काही लोकांना त्याच्यावर राळ उडवावीशी वाटते.

एखाद्यामधलं चांगलं घ्यावं किंवा वाईट शोधावं... ज्याचात्याचा दृष्टीकोन.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

तेंडुलकर मैदानात काय करतो..

सचिन तेंडुलकर मैदानातच रॉयल स्टॅगची जाहिरात करतो. मैदानातंच त्याच्या किट मध्ये सत्यसाईबाबांचा फोटू असतो. हे वर्तन मैदानातीलंच आहे.

मैदाना बाहेर तो कुठल्याही फ्रॉड बाबाचे केस विंचरत असेल पण मैदानात उतरला की तो रॅशनलिस्ट असतो असे म्हणायाचे आहे का?

तेंडुलकर मैदानात काय करतो..

सचिन तेंडुलकर मैदानातच रॉयल स्टॅगची जाहिरात करतो. मैदानातंच त्याच्या किट मध्ये सत्यसाईबाबांचा फोटू असतो. हे वर्तन मैदानातीलंच आहे.

मैदाना बाहेर तो कुठल्याही फ्रॉड बाबाचे केस विंचरत असेल पण मैदानात उतरला की तो रॅशनलिस्ट असतो असे म्हणायाचे आहे का?

तेच दोनदा सांगायचं असेल तर एकाच प्रतिसादात सुद्धा लिहिता येतं...

सचिन तेंडुलकर मैदानात क्रिकेटची बॅट हातात घेऊन बॉलबरोबर काय करतो हे महत्त्वाचं... असं वाक्य असायला हवं. जाऊद्याना राव, मला या चर्चेत फारसा रस नाही. तुमचं चालू द्यात.

सचिन तेंडुलकर मैदानात क्रिकेटची बॅट हातात घेऊन बॉलबरोबर काय करतो हे महत्त्वाचं... असं वाक्य असायला हवं. जाऊद्याना राव, मला या चर्चेत फारसा रस नाही. तुमचं चालू द्यात.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

कारण

सचिन तेंडुलकर मैदानात क्रिकेटची बॅट हातात घेऊन बॉलबरोबर काय करतो हे महत्त्वाचं आणि म्हणून त्याव्यतिरिक्त सचिनविषयी काही बोलूच नये! असे तुमचे मत असेल तर ह्या चर्चेत तुम्ही प्रतिसाद देण्याचे कारण समजले नाही.

कठीण आहे...

अरेरे, तुम्हाला माझ्या प्रत्येक प्रतिसादातला प्रत्येक शब्द समजावून सांगावा लागणार असेल तर कठीण आहे बुवा.

सचिन तेंडुलकर मैदानात काय करतो याच्याशीच केवळ देणंघेणं आहे.

याचा अर्थ,

सचिन तेंडुलकर मैदानात काय करतो याच्याशीच केवळ मला देणंघेणं आहे.

तुम्हाला जे हवं ते बोला. माझ्या प्रतिसाद देण्याच्या कारणाचा विचार करू नका.

वर दोनदा सांगितलंय, आता पुन्हा एकदा सांगतो, मला या चर्चेत रस नाही. खवत किंवा व्यनितदेखील माझ्याशी ही चर्चा पुढे करण्याचा प्रयत्न करू नये ही विनंती.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

कठीणच वाटते आहे

सचिन तेंडुलकर मैदानात काय करतो याच्याशीच केवळ मला देणंघेणं आहे.

म्हणुन तुम्हालाच विचारले, तुमचे मत असे असेल तर ह्या चर्चेत तुम्ही सहभाग घेण्याचे कारण काय?

क्रिकेटकरांचा हिरोच!

सचिन तेंडूलकर मैदानात क्रिकेट ज्या दर्जाचे खेळतो, तो दर्जा महत्वाचा आहे. जे क्रिकेटला सर्वस्व मानतात त्यांच्यासाठी सचिन हिरोच आहे व राहणार. पिरीयड

त्यावर याचे उत्तर ठरावे

सचिनपुजकांना ह्याविषयी काय वाटते?

मी सचिनपुजक नाही त्याच्या खेळाचा चाहता जरूर आहे. तेव्हा प्रश्न मला गैरलागू

सत्यसाईबाबांच्या मृतदेहासमोर ढसा ढसा रडणारा सचिन हा समाजाचा हिरो मान्यण्याइतका आपला समाज रसातळाला गेला आहे का?

नाही. समाज सचिनला सामाजिक (समाजाचा) हिरो मानताना मी फारसे बघितले नाही. भारतीयांचा तो बहुदा सर्वात 'लाडका' खेळाडू असावा. निदान माझा तरी आहे.

आपल्या समाजात आदर्श व्यक्तिमत्वांची इतकी उणीव का आहे?

तुमची आदर्श व्यक्तिमत्वांची व्याख्या काय? त्यावर याचे उत्तर ठरावे

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

शंका

खेळाडूंच्या कपड्यावर असलेले लोगो हे खेळाडूंच्या वैयक्तिक जाहिरात करारातले नसावेत किंवा वैयक्तिक खेरीज आयसीसी, बीसीसीआय वगैरेंच्या प्रायोजकांचे असतात. त्यामुळे रॉयल स्टॅगची जाहिरात "सचिन आपल्या कपड्यावर करीत आहे" की "प्रायोजक खेळाडूंच्या कपड्यावर करीत आहेत" हे कळले तर निषेध करायचा की नाही हे ठरवता येईल.

वैयक्तिक जाहिरात असेल तर निषेध.

नितिन थत्ते

१००% सहमत

+१

१००% सहमत!

प्रायोजक

रॉयल स्टॅग हे मुंबई इंडियन्स संघाचे प्रायोजक आहेत. त्या संघाचा खेळाडू असल्याने त्याला तो लोगो हेल्मेटवर वापरणे बंधनकारक आहे. त्याने जाहिरात फेटाळली होती ती त्याला वैयक्तिक ऑफर आलेली. यात दुतोंडी करण्याचा प्रश्नच कुठे येतो? अशा सांघिक जाहिराती जर त्याच्यासाठी ऑप्शनल असत्या तर त्याने नक्कीच फेटाळल्या असत्या. उद्या जर बीसीसीआयने हेरॉईन/गांजा/चरसची जाहिरात घेतली तर सचिनला ती करावीच लागेल (नाहीतर निवृत्त होऊन घरी बसावे लागेल.)
थोडक्यात, कोणला आक्षेप नोंदवायचा असेल तर मुंबई इंडियन्स/रिलायन्स/नीता अंबानी यांच्याविरुद्ध नोंदवावा.

||वाछितो विजयी होईबा||

थोडी माहिती घ्या

आयपीएल मधे सचिन हा मुंबई इंडियन्सशी करारबद्ध खेळाडू आहे. त्या काळात त्याला त्याच्या फ्रँचायजीने घेतलेल्या जाहिराती करणे कराराने बंधनकारक असते. एवढेच नव्हे तर त्याच्या वैयक्तिक प्रायोजकांच्या जाहिराती तो आयपीएल चालू असताना करू शकत नाही. अशीच बंधने खेळाडूंना आयसीसी वर्ल्डकपच्या दरम्यान होती. जाहिराती आयसीसीच्या प्रायोजकांच्या केल्या जात होत्या, त्यात खेळाडूंना जाहिरात नाकारण्याचे स्वातंत्र्य नव्हते. थोडी माहिती करून् घेत चला नि मग धागा टाका राव.
आणि हो कदाचित आता तुम्ही म्हणाल त्याने मुंबई इंडियन्सकडून खेळावे, भारतीय संघातून का खेळावे, आयसीसीच्या वर्ल्डकपमधे का खेळावे. मग काय क्रिकेट सोडून द्यावे की काय, आं? कदाचित यावरही 'हो, बास की आता, पुष्कळ कमावलं की' हे उत्तर येईल. कारण एकदा मीच काय तो शहाणा असा हेका धरायचा म्हटलं तर् काहीही बेताल तर्क देता येतात. सचिनने एरवी केलेल्या चॅरिटीबद्दल कधी तुम्ही वाचले आहे का, त्याबद्दल् कधी धागा काढणार (मग तुम्ही सांगा हे उत्तर नको, अज्ञानाचे सागर आटवायचा मक्ता आम्ही घेतलेला नाही)? फक्त एक तथाकथित प्रमाद घडला 'असं तुम्हाला वाटलं' तर लगेच् धागा काढायला धावलात यावरून तुमच्या मानसिकतेबद्दल काय बोलावे
इत्यलम्

"गिल्ट् बाय असोसिएशन "

सचिन तेंडुलकरने दारुच्या जाहिराती करण्याचे कंत्राट आपणहून घेतले का ?
नाही

मग तो दारुचा ब्रांड् असलेल्या जाहिरातीमधे कसा ? किंवा दारुचा ब्रँड असलेला लोगो कसा दाखवतो ?
कारण तो ज्या आयपीएल् नावाच्या प्रकारात करारबद्ध आहे त्यात स्वतःच्या टीमखेरीज इतर आयपीएल् च्या टीमच्या जाहिराती करण्यास बांधील आहे.

सचिनला करार करताना हे ठाऊक होते काय ?
होय

करार करताना किंगफिशरची टीम अस्तित्वात होती काय ?
होय.

मग सचिनला या अटीला नाकारून "करारावर सही करणार नाही , पर्यायाने आयपीएल् खेळणार नाही" असे म्हणता आले असते काय ?
होय

मग सचिनचा दोष एका अर्थाने , गुन्हा न करणारा परंतु गुन्ह्यात सामील होण्यासारखा आहे असे म्हणता येईल काय ?
होय. मात्र हे सामील होणेही "दूरान्वयाने" आहे असे म्हणावेसे वाटते.

पात्रता नाही..

>>अर्थात सचिनला पब्लिसीटीची गरज नाही

म्यॅटर एन्ड्स..!

>>पण परवा आयपीएलची मॅच पाहाताना ह्याच सचिनच्या शिरस्त्राणावर 'रॉयल स्टॅग' असा मोठा छाप दिसला. ह्याला काय म्हणावे?

खरंच ह्याला काय म्हणावे? सचिनच्या डोक्यावर रॉयल स्टॅग ही रुटीन दारू शोभत नाही. किमान संगल माल्टच हवी. अर्थात, एखादी झोकदार ब्लेन्डेड स्कॉचही चालेल..! :)

बाकी, माझे जितके वय नाही तितक्या त्याच्या सेन्च्युर्‍या आहेत, त्यामुळे त्याच्याविषयी काही बोलण्याची माझी तरी पात्रता नाही..

बाकी चालू द्या..!

(सचिनप्रेमी, रॉयलस्टॅग प्रेमी, ग्लेन मोरांजी प्रेमी) तात्या.

तात्या उपक्रमावर?

तात्या चक्क उपक्रमावर? कृपया, याचे खापर सचिनवर फोडू नये. ;-) माझ्या मताप्रमाणे ही सचिनची किमया नसून रॉयलस्टॅगची किमया आहे.

कोणजाणे पुढली चर्चा "सचिन तेंडूलकर आणि तात्या" अशी यायची. ;-)

+१

:))

---------------------
-धनंजय कुलकर्णी

कोण हा कोब्या

कोण हा कोब्या? त्याला एवढं महत्त्व द्यायची गरज नाही. सचिन आता सत्यसाईबाबाचे मंदिरही उभारणार आहे असे दिसते.

:)

कोब्या नसता तर दिले असते काय?

-धनंजय कुलकर्णी

काय?

काय दिले असते?

भारतरत्न देऊन टाका

सचिन आता सत्यसाईबाबाचे मंदिरही उभारणार आहे असे दिसते.

ही बातमी वाचल्यावर सचिनसाईला भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार लवकरात लवकर मिळायला हवा असे वाटते आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

भारतरत्नाचा मार्ग मोकळा होईल

सत्य साईंचा पुतळा उभारल्यावर सच्चूला सर्वपक्षीय पाठिंबा मिळेल असे वाटते. भारतरत्नाचा मार्ग कदाचित त्यामुळे मोकळा होईल.

गळचेपी.

-कोण हा कोब्या?
सदस्य
--त्याला एवढं महत्त्व द्यायची गरज नाही.

अभिव्यक्ति स्वातंत्र्याची गळचेपी.

हो का

कोब्याने लिहू नये असे मी म्हटलेले नाही. किंबहुना कोब्याकडे लक्ष देण्याइतका तो महत्त्वाचा नाही. तुमच्याकडेही आता इथून पुढे दुर्लक्ष करणे सोयीचे होईल.

 
^ वर