लादेनचा शेवट !

आत्ताच आजतक वरून ओसामा बिन लादेन मेल्याची बातमी मिळाली.

मागच्या ऑगस्ट पासून (ओबामाच्या अंडर) सुरू असलेल्या विशेष कारवाई ला यश आले. अभिनंदन अमेरिकेचे आणि
संपूर्ण जगाचे की भयावह अलकायदाचा लिडर संपुष्टात आला.

मागचे २ दशक ज्यानी दहशत गाजवली अशा ह्या क्रूर माणसाचा अंत झाला. वाह!

लेखनविषय: दुवे:

Comments

ओसामाचा मुलगाही मेला ..

त्याचा मुलगाही मेल्याची बातमी आहे म्हणे !

---------------------
-धनंजय कुलकर्णी

त्याहीपेक्षा

भयानक एक शेवट पाहीला. ओबामाच्या भाषणाचा शेवटचा भाग अंगावर काटा आणणारा होता!!!

Let us remember that we can do these things not just because of wealth or power, but because of who we are: one nation, under God, indivisible, with liberty and justice for all.

Thank you. May God bless you. And may God bless the United States of America

संपूर्ण भाषण येथे उपलब्ध

विशेष प्रतिक्रिया -

असे शंभर ओसामा सुटले तरी बेहत्तर पण असा एकही ओबामा सोकावता कामा नये - सहज डॉकिन्स.
अश्या ओबामाचा तीव्र निषेध! - फॉक्स चॅनेलचे दर्शक

देव व उप*म - भयानक भयानक, देव व उप*म - भयानक भयानक,देव व उप*म - भयानक भयानक, देव व उप*म - भयानक भयानक, देव व उप*म - भयानक भयानक, देव व उप*म - भयानक भयानक,देव व उप*म - भयानक भयानक, देव व उप*म - भयानक भयानक,देव व उप*म - भयानक भयानक, देव व उप*म - भयानक भयानक,देव व उप*म - भयानक भयानक, देव व उप*म - भयानक भयानक, देव व उप*म - भयानक भयानक, देव व उप*म - भयानक भयानक,देव व उप*म - भयानक भयानक, देव व उप*म - भयानक भयानक, देव व उप*म - भयानक भयानक, देव व उप*म - भयानक भयानक,देव व उप*म - भयानक भयानक, देव व उप*म - भयानक भयानक,देव व उप*म - भयानक भयानक, देव व उप*म - भयानक भयानक,देव व उप*म - भयानक भयानक, देव व उप*म - भयानक भयानक

शोभत नाही.

मेरीकेसारख्या विद्न्याननिष्ठ राष्ट्राला असे देवावर विसंबुन राहणे शोभत नाही.

:) नवीन नाही.

:) देव त्यांच्या प्रतिज्ञेचा एक भाग आहे.

देव...

उपक्रमावरील संपादकांना 'देव' ह्या शब्दाची इतकी ऍलर्जी आहे की ते माझे साधे साधे प्रतिसादही लगेच उडवतात....आता बहुदा नाव बदलावं लागेल मलाही. ;)

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

हा हा +१

काय मारला आहे.. सहीच.

---------------------
-धनंजय कुलकर्णी

देव या शब्दाबाबत

मुळात देव हा शब्द दाऊद या शब्दाशी नाते सांगणारा आहे.

देव=dev=dave=david=dawood

त्यामुळे इतर भारतीयांप्रमाणेच दाऊदवर उपक्रमाचा आक्षेप असल्यास त्यात वावगे काय आहे?

व्युत्पत्ती..

शोधण्यात भलतेच हुशार दिसताय तुम्ही! ;)
लगे रहो सदस्यभाय!

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

हम्म्

त्याचं काय आहे सहजराव, प्रत्येक दहशतवादी आपली कृत्ये देवाला साक्षी ठेवून वा त्याच्या नावानेच करत असतो. ;)

मला आवडलेले

ओबामाच्या भाषणाचा शेवटचा भाग अंगावर काटा आणणारा होता!!!

मला वाटते सहजरावांनी वर म्हणलेले वाक्य गंमतीत म्हणले असावे. तरी देखीलः "one nation, under God, indivisible, with liberty and justice for all." हा उल्लेख कम्युनिझम फोफावला तेंव्हा पासून त्यांच्या प्रतिज्ञेत घातला गेला होता. आणि तसे देखील अमेरीकन डॉलर हे आवडो अथवा नावडो पण, जागतिक बाजारातील प्रमुख चलन आहे ज्याच्या बिलावर (नोटेवर) "इन गॉड वुई ट्रस्ट" असे लिहीलेले असते. त्यामुळे जो पर्यंत तुम्ही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष डॉलर वापरत आहात तो पर्यंत "चाहे तू माने चाहे ना माने" अशीच अवस्था आहे. ;)

बाकी, Let us remember that we can do these things not just because of wealth or power, , हे मला आवडलेले वाक्य (अथवा वाक्याचा भाग) आहे. केवळ अमेरीकाच नाही तर जिथे जिथे जिद्द आणि स्वत्व टिकवण्याची मानसिकता असते तेथेच ते शक्य असते. मग तो अफझलखानाला संपवणारा शिवाजी असोत, हिटलरकडून मिळणार्‍या प्रत्येक फटक्याला "यशस्वी माघार" म्हणत लढणारा चर्चील असोत अथवा आत्ता चुकीच्या युद्धांमधून लक्ष बाहेर काढून केवळ "एकच लक्ष" ठेवणारा ओबामा असोत. अर्थात या तीन वेगवेगळ्या गोष्टींमध्ये एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे ते केवळ शक्य झाले कारण जसे नेतृत्व होते/आहे तसेच त्याच्या मागे स्वत्व टिकवणारे सैनिक होते आणि सर्वसामान्य जनता देखील होती... असो.

+१ - ०

बाकी, Let us remember that we can do these things not just because of wealth or power, , हे मला आवडलेले वाक्य (अथवा वाक्याचा भाग) आहे. केवळ अमेरीकाच नाही तर जिथे जिथे जिद्द आणि स्वत्व टिकवण्याची मानसिकता असते तेथेच ते शक्य असते.

वाक्य म्हणून छान वाटते, पण अमेरिका म्हणून जे काही २००-३०० वर्ष पूर्वी ज्यांनी उभी केली त्यांना ते तत्व फिट्ट बसते, हल्लीचे लोकांना त्यार्थी अमेरिकन म्हणणे थोडे अवघड वाटते.

धैर्य

या संदर्भात थोडे अधिकः

इस्त्रायलचे अरब राष्ट्रांच्या विरोधात उभे रहाणे प्रसिद्ध आहेच. पण त्यांचे एक "ऑपरेशन" जे वरील मुद्यात (जिथे जिथे जिद्द आणि स्वत्व टिकवण्याची मानसिकता असते) चपखल बसते, ते म्हणजे "ऑपरेशन एन्टीबी". ज्या मधे विमान अपहरण झालेले असताना त्या विमानातील प्रवाशांना सोडवण्यासाठी रेडारच्या कक्षेत न येता शत्रूराष्ट्रात (इदीआमीनच्या युगांडात) सैनिक पाठवून सुटका केली हे आहे. त्यात ३ प्रवासी, एक कमांडो यांना मरण आले पण सर्वच्या सर्व अपहरणकर्त्यांना मारले गेले आणि काही युगांडांच्या सैनिकांना देखील मारले गेले. ते यशस्वी होण्याचे कारण जसे सैनिक आणि त्यांची शिस्तबद्ध चलाख योजना होती तसेच एकूण अशा आपत्कालीन अवस्थेत कसे वागायची याची शिस्त असलेले इस्त्रायली नागरीक पण होते...

मात्र त्यानंतर तीन एक वर्षात (१९७९ साली) केवळ आपण श्रेष्ठ आहोत, त्यामुळे आपण देखील सहज करू शकू असा काहीसा अहंकार असलेल्या अमेरिकेने तेच इराणमधे जाऊन करायचे ठरवले आणि मार खाल्ला.

आज हा निर्णय घेताना ओबामा आणि त्याच्या सहकार्‍यांनी जमिनीवर पाय ठेवून विचार केला, सर्व शक्यतांचा विचार केला. मार्चमधेच एक सुचवण्यात आले होते की सरळ स्टेल्थ विमानांचा वापर करून बाँब टाकायचे. पण तसे केल्याने सगळेच नष्ट झाले असते आणि डिएनए चा पुरावा मिळू शकला नसता त्यामुळे लादेन मेला हे खात्रीलायकरीत्या सांगता आले नसते. शिवाय २२ स्त्रीया/मुले हे देखील मृत्यूमुखी पडले असते. म्हणून ओबामाने, सेनापती म्हणून निर्णय घेतला की हल्ला करून निर्णायक यश मिळवायचे. त्या साठी गेल्या ऑगस्टपासून (ओसामाचे स्थान समजल्यापासून) चालू असलेला सराव अधिक करण्यात आला. खात्री करण्यात आली. हवामान बघण्यात आले. चंद्रप्रकाश कमी तसेच इतर गोष्टींचा विचार करण्यात आला. त्यामुळे शनीवारी ठरलेले हे "सर्जिकल ऑपरेशन" रविवार पर्यंत लांबवण्यात आले. नाहीतर याच अमेरीकेचे, मोठ्या बूशच्या राज्यात, साधारण १९९१-९२ साली, अफ्रिकेत (कुठे ते आत्ता लक्षात नाही, तेंव्हा टिव्हीवर पाहीले होते) हेलीकॉप्टर हे अक्षरश: लुंग्या आणि बनियन्स मधील लोकांनी बंदुकांनी पाडून त्यातील सैनिकास ओलीस धरले होते.

आज तो हल्ला यशस्वी झाला म्हणून सगळे कौतूक करत आहेत पण त्याच्या यशाची खात्री ही छाप-काट्यातील अंतराइतकीच होती असे वाटते. थोडक्यात या ऑपरेशनमधे पैसा-पॉवर असण्यापेक्षा जिद्द, (राष्ट्रीय आणि राजकीय) धोका पत्करण्याची तयारी आणि तो धोका पत्करून कामात यश मिळवण्यासाठी संयम, सराव आणि अभ्यास हे कामी आले. असो.

सोमालिया/ब्लॅक हॉक डाऊन

साधारण १९९१-९२ साली, अफ्रिकेत (कुठे ते आत्ता लक्षात नाही, तेंव्हा टिव्हीवर पाहीले होते) हेलीकॉप्टर हे अक्षरश: लुंग्या आणि बनियन्स मधील लोकांनी बंदुकांनी पाडून त्यातील सैनिकास ओलीस धरले होते.

सोमालिया/ब्लॅक हॉक डाऊन प्रकरण असावे.

या अबॉटाबाद मोहिमेत दोनपैकी एक हेलिकॉप्टर पडले. त्यातील वैमानिकांना वाचवून आपणच त्या हेलिकॉप्टरचा नाश केला, असे यू.एस सरकारचे प्रवक्ते सांगत होते. (छाप-काट्याबाबत सहमत. दोन्ही हेलिकॉप्टरे पडली असती, तर बहुधा क्षेपणात्राने कंपाउंड उडवण्याची सुद्धा तयारी असेल.)

बरोबर!

सोमालिया/ब्लॅक हॉक डाऊन प्रकरण असावे.

बरोबर! धन्यवाद! त्यातील मला वाटते पायलट हा आमच्या बाजूच्या न्यू हँम्पशायर राज्यातला होता. त्यामुळे तो सुटल्यावर त्याच्या "कौतूक" करणार्‍या नको इतक्या बातम्या आल्या. आम्हाला कळत नव्हते की शत्रूच्या हातात अडकण्यासाठी कौतूक कसे...

त्यातील वैमानिकांना वाचवून आपणच त्या हेलिकॉप्टरचा नाश केला, असे यू.एस सरकारचे प्रवक्ते सांगत होते.

यातील आपले, मी अधोरेखीत केलेले वाक्य बरेच काही सांगते. या ऑपरेशनमधील सर्वांना आता अधिकृतरीत्या "क्लासिफाईड" म्हणून जाहीर केले गेले आहे. त्यामुळे नक्की कोणी मारले गेले असले तरी कळणार नाही. तसेच बीन लादेनला कोणी मारले वगैरे पण समजणार नाही. थोडक्यात हा जय नावाचा इतिहास म्हणूनच रहाणार.

काव्यात्मक न्याय??

सध्याची ढासळती अमेरिकन अर्थव्यवस्था बघता, अशा एका चमत्काराची गरज त्यांना होतीच असे वाटते, तसेच इतकी वर्ष निष्णात तंत्राची मदत घेऊन, अब्जावधी पैसे खर्च करून, 'एका' माणसाला मारले हे भूषणास्पद वाटत नाही. पण अमेरिकेला लार्जर दॅन लाइफ छबी साधारणपणे नेहमीच आवडते. इराकमध्ये जैव-तंत्र(तत्सम) अस्त्रे आहेत असा कांगावा करून इराक मध्ये अराजक माजविले आणि सद्दामला मारले, आता लादेनला मारले, ह्या मुळे अमेरिकेच्या युद्ध नीतीत कोणता फरक येणार आहे? किंवा अफगाणिस्तानातील तालिबान ह्यांना लादेन च्या मरणाने कितीसा फरक पडणार आहे? म्युनिक मध्ये दाखविल्याप्रमाणे एका लादेनला मारल्यावर त्याची जागा घेणारा दुसरा अधिक कट्टर लादेन तयार होऊ शकतो, लादेनला मारून फार फरक कशात पडेल असे वाटत नाही, तसे पाहता कोणाला कशात फरक अपेक्षित आहे हे बघणे गरजेचे आहे.

त्यांच्या आनंदाचे उधाण हे केवळ एका काव्यात्मक न्यायासाठी आहे काय? असा आपला एक विचार येतो.

एक आदमी १००००० के बराबर :)

>>अब्जावधी पैसे खर्च करून, 'एका' माणसाला मारले हे भूषणास्पद वाटत नाही

"एका " अस म्हणता नाही येनार
---------------------
-धनंजय कुलकर्णी

असे कसे असे कसे

'लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे' मानसीकता असलेल्या उपखंडात हे बरोबरच नाही का?

काफीरांच्या दृष्टीकोनातून पोशींदा असलेला शत्रु उडवणे योग्यच ना!!

अहो राव बाकीचे सोडा, पाकीस्तानात पार आत घुसून टिपला आहे त्याला, पत्रकार परिषदा घेउन नेहमी चुरुचुरु बोलणार्‍या पाकीस्तानला अजुन काही समाधानकारक खुलासा देता आला नाही आहे त्याचा लुत्फ लुटा की!! :-)

खुलासा?

बाकी ठीक पण पाकिस्तानकडे खुलासा मागितला आहे का कोणी? (भारताने मागितलेल्या खुलाशांना पाकिस्तान कोठे मारते ते सर्वांना ठाऊक आहे.)

पाकिस्तान आणि अमेरिका "अळीमिळीगुपचिळी" आणि "तेरी भी चूप और मेरी भी चूप" असा खेळ खेळतात आणि बाकीचे शांतपणे बघत बसतात.

पाकीस्तानच्या

पाकीस्तानच्या अनेक वृत्तपत्रात सरकारी यंत्रणांनी खुलासा करावा, याचा अर्थ काय असा जाबवजा सूर आहे.

इस्लामाबादेच्या इतक्या जवळ, मिलिटरी ऍकेडमीच्या बाजूला रहात असताना का शोधू शकले नाहीत असा प्रश्न विचारला जात आहे.

थातुरमातुर

पाकीस्तानच्या अनेक वृत्तपत्रात सरकारी यंत्रणांनी खुलासा करावा, याचा अर्थ काय असा जाबवजा सूर आहे.

त्याला खुलासा म्हणत नाहीत, थातुरमातुर म्हणतात. ;-) सध्या तवा गरम आहे त्यावर फुंकर मारावी लागेलच पण पाकिस्तानला कोणी खडसावून जाब विचारत नाहीच. उलट, पाकिस्तान बघा काय बंडला मारते आहे आणि बाकीची राष्ट्रे नक्कीच डोळे झाकून विश्वास ठेवतील.

मुद्दा असा आहे

की कोणतीही मोठी घटना घडली की आम्हाला माहीत नाही, आमच्याकडे असे होत नाही. आम्ही कोणाला आसरा देत नाही, आम्ही तपास करत आहोत, असे तडक खुलासे पत्रकार परिषदा घेउन घेउन पाकीस्तान करत असते. तसे होताना काही दिसत नाही कारण पार त्यांच्या देशात घुसून ओसामाला पकडून मारले गेले आहे.

डॉन मधील एक वृत्त

फ्रान्संच्या परराष्ट्रमंत्र्याचे वक्तव्य

पाकीस्तान

ब्रिटीश पंतप्रधान डेव्हीड कॅमेरॉननी पाकीस्तानी पंतप्रधान गिलानीला फोन करून ऍक्नॉलेज केल्याचे (सभ्यपणे सुनावल्याचे) आत्ताच ऐकले. मात्र त्याच बरोबर अण्वस्त्रधारी पाकीस्तानला बरोबर घेऊन जाण्याशिवाय तुर्तास तरी (म्हणजे अण्वस्त्रे ताब्यात घेईपर्यंत) पर्याय नाही असे म्हणले... अर्थात ब्रिटनची अण्वस्त्रांप्रमाणे अजून एक समस्या आहे आणि ती म्हणजे पाकीस्तानी वंशाची ब्रिटनमधील ब्रिटीश तरूण पिढी...

बाकी ओबामा लगेच काही बोलेल असे वाटत नाही. २००७ साली निवडणूकीच्या धामधुमीत त्याने जाहीर केले होते, की जर ओसामा कुठे आहे यासंदर्भात ठाम माहिती मिळाली तर त्याचा वापर करून मी त्याला मारण्याचा आदेश देईन, त्यासाठी पाकीस्तानात पण सैन्य पाठवावे लागले तरी चालेल... तरी देखील, ऑगस्ट मधे ओसामा कुठे आहे कळले आणि त्याच्या मागेपुढे स्वतःवर अनेक (विशेष करून नेतॄत्वाचे गूण नाहीत ही) टिका होत असताना, अमेरिकन काँग्रेसमधे हार पत्करावी लागत असताना, त्याने शांतपणे/संयमाने निर्णायक चाल वेळ आली तेंव्हाच केली.

शक्यता..

बाकी ओबामा लगेच काही बोलेल असे वाटत नाही

काही दिवसांनी "पाकिस्तानच्या मदतीशिवाय हे कार्य पूर्ण होणे आवघड होते" असे मोघम "ओबामा" बोलणार.....असे वाटते...आणि मग अजून अब्ज डॉलर मदत देणार.

दुसऱ्या लेखात श्री. चंद्रशेखर ह्यांनी सांगितलेला चीनचा ग्रेट गेम तोडून काढण्यासाठी हि एक संधी (बनवलेली) अमेरिकेला असू शकते.

सोपे नसेल

मग अजून अब्ज डॉलर मदत देणार.

पाकीस्तानची (आणि इतर राष्ट्रांची देखील) मदत ही केवळ अमेरिकन राष्ट्राध्यक्ष देऊ शकत नाही, तर ती अमेरिकन काँग्रेसकडून संमत करून घ्यावी लागते. आत्ता रिपब्लीकन काँग्रेस आहे आणि त्यांना देखील आता ते कणखर आहेत हे दाखवणे गरजेचे आहे कारण २०१२ चे राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचे बिगूल या नोव्हेंबर-डिसेंबर मधेच वाजू लागेल. आणि आता अमेरीकन जनता आणि माध्यमे गप्प बसलेली नाहीत.

गरज्

हे सर्वच नीड्-बेस्ड् राजकारण वाटते.की सर्व(च) राजकारण नीड्-बेस्ड् च असते?

राष्ट्रीय अजेंडा

प्रश्न रिपब्लीकन किंवा डेमोक्रटिकचा नाही, तर अमेरिकेच्या आशिया उपखंडातील स्थानाचा आहे, पाकिस्तान हा हुकमी एक्का आहे, त्याला मदत करणे हे बहुदा त्यांच्या राष्ट्रीय अजेंड्याचा भाग असावा. अर्थात ती मदत आणि ती मलई फक्त एकाच पक्ष खाईल का हा मुद्दा आहेच. पण जनता/नैतिकता/सैनिकांबाबत उत्तरदायित्व वगैरे कल्पनांपासून ते दूर आहेत असे वाटते.

ते मारल्यासारखं करतील...

की कोणतीही मोठी घटना घडली की आम्हाला माहीत नाही, आमच्याकडे असे होत नाही. आम्ही कोणाला आसरा देत नाही, आम्ही तपास करत आहोत, असे तडक खुलासे पत्रकार परिषदा घेउन घेउन पाकीस्तान करत असते. तसे होताना काही दिसत नाही कारण पार त्यांच्या देशात घुसून ओसामाला पकडून मारले गेले आहे.

तुमचा मुद्दा बरोबर आहे पण तो मी जरा पुढे खेचला काय झाले ना की यावेळेस आम्ही तपास करतो वगैरे सांगण्यासारखे शब्द उरलेच नाहीत. तेव्हा "आमचा पाठिंबा होताच.", "आम्ही मिले सूर मेरा-तुम्हाराच म्हणत होतो" असे शब्द बदलले आहेत. आता कोणीतरी फोन केला, कोणीतरी प्रश्न विचारला वगैरे होणारच. ते मारल्यासारखे करणार हे ओरडल्यासारखे करणार पण पुढे काय?

ये रे माझ्या मागल्या.... ;-)

जाब

>>पाकीस्तानच्या अनेक वृत्तपत्रात सरकारी यंत्रणांनी खुलासा करावा, याचा अर्थ काय असा जाबवजा सूर आहे.

"अमेरिकेचे लोक इथे आत येऊन ओसामाला मारून गेले आणि आमचे "नेभळट सरकार" अमेरिकेपुढे शेपूट घालून बसले; याचा अर्थ काय?" असा जाब विचारत असावेत.

नितिन थत्ते

हॅहॅहॅ!

"अमेरिकेचे लोक इथे आत येऊन ओसामाला मारून गेले आणि आमचे "नेभळट सरकार" अमेरिकेपुढे शेपूट घालून बसले; याचा अर्थ काय?" असा जाब विचारत असावेत.

पाक सरकार वीआयपींची जबाबदारी घेण्यास नालायक आहे का? असा जाब "काही राष्ट्रे" नक्कीच विचारत असणार.

+१

आम्हाला कळत नव्हते की शत्रूच्या हातात अडकण्यासाठी कौतूक कसे...

भारतातही नचिकेत या वैमानिकाचेही कारगिल प्रकरणादरम्यान असेच आचरट कौतुक करण्यात आले. थोडे अवांतर उदाहरण म्हणजे खड्ड्यात पडलेल्या कार्ट्यावरही बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला.

हो का?

भारतातही नचिकेत या वैमानिकाचेही कारगिल प्रकरणादरम्यान असेच आचरट कौतुक करण्यात आले.

नचिकेतची बातमी वाचली होती पण त्याचे आचरट कौतुक केले का माहीत नाही कारण तेथे नव्हतो. मात्र या निमित्ताने अजून एक नवीन माहिती कळली की पाकीस्तानी सैन्य पण नुसते लुंगी आणि बनियनवर हेलीकॉप्टर उडवत होते आणि आपण उगाच (मूळ प्रतिसाद संदर्भः पैसा आणि पॉवरच्या माजाने) पाकीस्तानवर हल्ला करायला गेलो होतो ते...

खड्ड्यात पडलेल्या कार्ट्यावरही बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला.

? सॉरी संदर्भ समजला नाही. :(

बाकी, मला वाटते, तुमच्या लेखी शिवाजीचे पण आग्र्याहून "पळाला" तरी फुकाचे कौतूक होत असावे.

खुलासा

त्याचे आचरट कौतुक केले का माहीत नाही

कौतुक करणेच आचरटपणा होता.

? सॉरी संदर्भ समजला नाही. :(

संदर्भ

तुमच्या लेखी शिवाजीचे पण आग्र्याहून "पळाला" तरी फुकाचे कौतूक होत असावे.

नक्कीच!

:)

>>नक्कीच!
उम्म्म्म्म्..........

कौतुक


त्याचे आचरट कौतुक केले का माहीत नाही

कौतुक करणेच आचरटपणा होता.

"आचरट कौतुक" हा तुमचा शब्दप्रयोग होता तो मी वापरला होता..


? सॉरी संदर्भ समजला नाही. :(

संदर्भ

पुर्वीची "इंडीया" राहीली नाही! आम्हीपण अमेरिकनाइझ्ड झालो... :(

तरी देखील तुम्हाला अथवा ज्यांनी अमेरिकन लाड बघितले नाहीत त्यांना कदाचीत कळणार नाही. अमेरिकन सोल्जरने गोंधळ घातला, सोमालींच्या ताब्यात गेला, तरी आल्यावर नुसताच हिरो समजला (कसा माझा बाप्या, असे म्हणले) जात नाही तर तो देखील "कसा मी शहाणा..." ह्यावर लेक्चर देतो. माझ्या माहितीप्रमाणे नचिकेताने मी माझे काम केले, मी हिरो नाही एक सैनिक आहे असे म्हणले...

अवांतरः सिंगापूरच्या एका अमेरिकन दुतावासातील कर्मचार्‍याचे लाडावलेले कार्टे बाहेर गेले आणि रात्रीच्यावेळेस तिथल्या गाड्यांना रंग लावून ग्राफिती केली. त्याला पोलीसांनी पकडले. कोर्टाने तिथल्या कायद्याप्रमाणे त्याच्या उघड्या पार्श्वभागावर शिक्षा म्हणून मला वाटते २० फटके (दांडूक्याने) मारण्याची आज्ञा दिली. अमेरिकेत तमाम बोंबाबोंब झाली. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष क्लिंटन यांनी कोर्टाच्या मानवतावादीविरोधातील ह्या निर्णयाचा निषेध करत सिंगापूरच्या अध्यक्षास फोन करून विनंती केली... त्याने देखील विनंतीस मान देऊन २० च्या ऐवजी १०च फटके द्या म्हणत फटके मारायलाच लावले. :) झालं, त्यानंतर हे बाळ परत मायदेशी परतले आणि काय मग मुलाखती आणि काय ते डोळ्यात पाणी आणून सिंगापूर कसे शिंगावर घेते ते सांगणे! सगळा आनंदच! अशी अनेक उदाहरणे सांगता येतील... असो.

तुमच्या लेखी शिवाजीचे पण आग्र्याहून "पळाला" तरी फुकाचे कौतूक होत असावे.

नक्कीच!

प्रामाणिक उत्तराबाबत धन्यवाद! मात्र शिवाजीने शत्रूशी चाललेल्या संघर्षात काहीच केले नसते तर तो इतिहासात केवळ रिकामटेकडा* ठरला असता! :-) असो.

* आयडी नाही. ;)

तपशिलातल्या चुका

१.कार्टे अमेरिकन दुतावासातील कर्मचार्‍याचे नव्हते.
२. २० वरुन १० नाही तर ६ वरुन ४ फटक्यांची शिक्षा झाली.
३. बाळ मायदेशी परत आल्यावर निषेध झाला तो बार्बेरीक शिक्षेचा. (त्यात 'सगळा आनंदच आहे' म्हणण्यासारखे काय आहे कळले नाही)

बाकी चालू द्या..

धन्यवाद

१.कार्टे अमेरिकन दुतावासातील कर्मचार्‍याचे नव्हते.

धन्यवाद. आठवणीतून अवांतर सांगितले होते.

२. २० वरुन १० नाही तर ६ वरुन ४ फटक्यांची शिक्षा झाली.

म्हणूनच "मला वाटते" म्हणले होते.

३. बाळ मायदेशी परत आल्यावर निषेध झाला तो बार्बेरीक शिक्षेचा.

सार्वत्रिक निषेध आधीच झाला होता. ज्या काही मुलाखती बघितल्या ("मला वाटते" त्यातील एक २०/२० मध्ये बार्बरा वॉल्टर्सने घेतली होती), त्यात "कसा गं माझा बाब्या" चालले होते.

(त्यात 'सगळा आनंदच आहे' म्हणण्यासारखे काय आहे कळले नाही)

आपल्या भावना दुखावण्याचा उद्देश नव्हता. तेंव्हा गैरसमज नसावा. हलकेच घ्यवे. :-)

खुलासा

"आचरट कौतुक" हा तुमचा शब्दप्रयोग होता तो मी वापरला होता..

'आचरटपणे कौतुक' असा शब्दप्रयोग अपेक्षित होता.

शिवाजीने शत्रूशी चाललेल्या संघर्षात काहीच केले नसते तर तो इतिहासात केवळ रिकामटेकडा* ठरला असता!

संघर्ष करायला नको होता असे माझे प्रतिपादन नाहीच, पलायन करावे लागणे (मुळात, मिर्झासमोर पराभव पत्करावा लागणे) कौतुकास्पद नाही इतकेच मत व्यक्त केले आहे.

असहमत

संघर्ष करायला नको होता असे माझे प्रतिपादन नाहीच, पलायन करावे लागणे (मुळात, मिर्झासमोर पराभव पत्करावा लागणे) कौतुकास्पद नाही इतकेच मत व्यक्त केले आहे

.

मिर्झाराजांसमोर पराभव अलरेडी झालेला आहे. त्याचा आग्र्याच्या पलायनाशी डायरेक्ट संबंध नाही. युद्धात जय-पराजय होतात. त्या पराजयात कौतुकास्पद काही नसावे. मूळ प्रश्न तसा नाही. आग्र्याहून पलायन कौतुकास्पद आहे का एवढाच प्रश्न होता. त्याला तुमचे उत्तर नाही असे आहे. ते का नाही आहे हे जाणून घ्यायला मलाही आवडेल.

माझ्यामते, ते पलायन कौतुकास्पद होते कारण एक दिवस वेढा ढिला होता म्हणून महाराज निसटले नाहीत. तो एक वेल एक्जेक्यूटेड प्लॅन होता आणि १००% यशस्वी ठरला हे अतिशय कौतुकास्पद आहे.

+१००

तो एक वेल एक्जेक्यूटेड प्लॅन होता आणि १००% यशस्वी ठरला हे अतिशय कौतुकास्पद आहे.

येस, एक प्लान म्हणून तो जबऱ्या होता. आजही आग्रा ते शिवनेरी/रायगड हा प्रवास कसा केला असेल ह्यावर अनेक संशोधने घडत आहेत. बाकी पलायन करावे लागत आहे हि गोष्ट नक्कीच वाईट होती पण तो राजकारणाचा एक भाग होता, उगाच वेडात दौडून काही फायदा झाला नसताच. असो...बहुदा रिकामटेकडा हे अस्मितेतून बोलत असावेत कि पळून जाणे भ्याडाचे काम आहे. ;)

कोणाची अस्मिता?

बहुदा रिकामटेकडा हे अस्मितेतून बोलत असावेत कि पळून जाणे भ्याडाचे काम आहे. ;)

कोणाची कसली अस्मिता? महाराजांची, पैगंबराची, कृष्णाची की सावरकरांची? का मग हे सर्व भ्याड मानायचे? :-)

चर्चाच टाकूया यावर.

अस्मिता

आमच्या वर्गात अस्मिता गोखल्यांची आणि सोमाणांची होती ;)

बाकी तुमचा प्रश्न बहुदा ते काय म्हणतात ना rhetoric वगैरे आहे असे समजून उत्तर देत नाही. :)

चर्चा मात्र टाकाच.

फरक

भ्याड हे मी आपल्या वाक्यासाठी एक समानार्थी शब्द शोधात होतो. आता बघा ना! - पलायन करावे लागणे हे कौतुकास्पद नाही (म्हणजे भ्याडपणाच ना?)...मुद्दा हा आहे कि तुम्हाला ते कौतुकास्पद का वाटत नाही? :)

तुमचे हे विधानच मुळी भावनेतून येते, विचार असे सांगतात कि त्यावेळेस जे जास्त फायद्याचे(सर्वांगीण), ते करणे योग्य.

बाकी सर्व माणसे होती, त्यांना भ्याड* म्हणायला हरकत नाही. (*सारासार विचार करणाऱ्या माणसालादेखील भ्याड म्हणले जाते)

:) बाकी चर्चेचं म्हणाल तर हरकत नाही. (आता मी तुमच्या अभिव्यक्तीचं समर्थन करू इच्छितो.)

(बाकी आमच्या वर्गात अस्मिता गोखल्यांची आणि सोमाणांची होती ;))

'योग्य' आणि 'कौतुकास्पद' या दोन शब्दांचा एकमेकांशी ठाम संबंध नाही.

ब्रिटिशांनी १८५७ साली केलेल्या अत्याचारांची अशीही वर्णने सांगण्यात येतात की जीव वाचविण्यासाठी लोकांना स्वच्छतागृहे स्वच्छ करावी लागली*. ती कृती विवेकी, योग्य होती परंतु निश्चितच कौतुकास्पद नव्हती.

* हिंदीत धडा होता असे स्मरते, संदर्भ उपलब्ध नाही.

अनप्लँड असूनही 'केवळ' बोटांवर निभावलेल्या पलायनाबद्दल शाहिस्तेखानाला का हसावे? मुळात, दहा हजारी मनसबदारीची आशा बाळगण्यामुळेच फजिती झाली नाही काय?

थोडासा असहमत

:) तुमचे कौतुक नक्कीच करावे वाटते.असो..ते अवांतर.

'योग्य' आणि 'कौतुकास्पद' या दोन शब्दांचा एकमेकांशी ठाम संबंध नाही.

ब्रिटिशांनी १८५७ साली केलेल्या अत्याचारांची अशीही वर्णने सांगण्यात येतात की जीव वाचविण्यासाठी लोकांना स्वच्छतागृहे स्वच्छ करावी लागली*. ती कृती विवेकी, योग्य होती परंतु निश्चितच कौतुकास्पद नव्हती.

पूर्ण सहमत.

अनप्लँड असूनही 'केवळ' बोटांवर निभावलेल्या पलायनाबद्दल शाहिस्तेखानाला का हसावे? मुळात, दहा हजारी मनसबदारीची आशा बाळगण्यामुळेच फजिती झाली नाही काय?

थोडी गल्लत. अनप्लँड पलायनामुळेच मुळेच फजिती झाली, एवढा फौज-फाटा घेऊन आल्यावर देखील पळावे लागते हि नामुष्कीच, पण आग्र्याहून सुटका हे खुद्द औरंगजेबाला देखील खरे वाटले नसेल, त्यात सुखरूप येणे अगदी दुरापास्त...अशा प्रकारचा video game खेळताना पहिल्या दमात आलात तरी खूप कौतुकास्पद आहे.

मुद्दा हा असू शकतो हि परिस्थिती ओढवू शकते हे माहित असताना राजे तिकडे का गेले???(प्रियाली ह्यावर अधिक प्रकाश टाकतीलच)...पण तिकडे जाणे देखील राजकीय दृष्ट्या अपरिहार्य असावे.

नामुष्की होती

शिवाजी विषयी माझ्याकडे कोणतेही संदर्भ नाहीत त्यामुळे अचूक माहिती देणे अशक्य आहे. सर्वसाधारण/ प्रचलित इतिहासाला धरून माझ्या मते तिथे जाणे ही तहातील अट होती. ती पत्करल्यावाचून राजांना गत्यंतर नव्हते. तसेच मनसबदारी संभाजीराजांनी घेतली होती असे वाटते, शिवाजीने नाही. राजे मनसबदारीपासून नामानिराळे राहिले. चू. भू. द्या. घ्या.

मूळ मुद्दा

मूळ मुद्दा "पैसा आणि पॉवर" याने सर्व जमते असे नाही अशा अर्थी जे काही ओबामा बोलला त्या संदर्भात होता. त्या संदर्भात मी सोमाली सैनिकांनी पाडलेले ब्लॅकहॉक हेलीकॉप्टरबद्दल बोललो होतो..

तीच अवस्था औरंगजेबाची आणि शाहीस्तेखानाची झाली की पैसा-सत्ता-सामर्थ्य असून शिवाजीला पकडता आले नाही. म्हणून त्यांचे हसे झाले. शिवाजी स्वतःच्या प्रांताची आणि लोकांची काळजी घेत होता म्हणून त्याने ते करताना जे जे काही करावे लागले, जिथे जिंकता आले तिथे जिंकणे आणि हार पत्करावी लागली तेथे तेव्हढ्यापुरती हार (चर्चीलच्या "यशस्वी माघारी"सारखी) पत्करून दाखवले. म्हणून त्याचे कौतुक वाटते, अभिमान वाटतो. असो. चर्चा भरकटत असल्याने माझ्याकडून थांबवतो...

:)

शिवाजी स्वतःच्या प्रांताची आणि लोकांची काळजी घेत होता म्हणून त्याने ते करताना जे जे काही करावे लागले, जिथे जिंकता आले तिथे जिंकणे आणि हार पत्करावी लागली तेथे तेव्हढ्यापुरती हार (चर्चीलच्या "यशस्वी माघारी"सारखी) पत्करून दाखवले.

ओह, म्हणजे, शिवाजी 'आपला' वाटतो म्हणून कौतुक आहे तर! ठीक आहे. अन्यथा, विजयाचे कौतुक आणि पराभवाचे हसे व्हावे असा नियम असतो.

योग्य

ओह, म्हणजे, शिवाजी 'आपला' वाटतो म्हणून कौतुक आहे तर! ठीक आहे. अन्यथा, विजयाचे कौतुक आणि पराभवाचे हसे व्हावे असा नियम असतो.

आपला म्हणून तर नक्कीच पण त्याहूनही अधिक योग्य चाल म्हणून. आणि म्हणूनच चर्चिल आपला वाटत नसताना देखील त्याच्या "यशस्वी माघारीचे कौतुक" वाटते.

फरक

प्रत्येक योग्य निर्णय कौतुकास्पद नसतो, काही योग्य निर्णय लाजिरवाणेही असतात असे मी या प्रतिसादात म्हटलेच आहे.

शाहिस्तेखानाचे हसे

अनप्लँड असूनही 'केवळ' बोटांवर निभावलेल्या पलायनाबद्दल शाहिस्तेखानाला का हसावे?

शाहिस्तेखानाचे हसे झाले कारण तो शिवाजीला पकडायच्या/ मारायच्या उद्देशाने आला होता. त्यासाठी लालमहालात तळ ठोकून बसला होता. त्याच्या समवेत सैन्य होते. म्हणजेच तो तयारीनिशी होता. सबळ होता. शिवाजीच्या राज्यातून प्लॅन्ड किंवा अनप्लॅन्ड पलायन करणे हा त्याचा उद्देश नव्हता. तसा तो त्याने करून आपला जीव वाचवला हे बरे केले पण त्याची जी दाणादाण उडली त्यामुळे त्याचे हसे होते. जर राजांनी त्याला कैदेत टाकला असता किंवा जेरबंद केला असता आणि त्याने तुरी देऊन पळ काढला असता तर त्याचे कौतुकच होते.

दहा हजारी मनसबदारीची आशा बाळगण्यामुळेच फजिती झाली नाही काय?

ही आशा बाळगली होती याला संदर्भ द्यावा.

अवांतरः आपले चुकत असताना किंवा पराभव दिसत असताना माघार घेणे यात कधीकधी शहाणपणा असतो. कदाचित तेव्हा आंतरजाल असते तर शिवाजी पलायन न करता रिकामटेकडे वाद घालत बसला असता की काय असे वाटून गेले. ह. घ्यावे.

खड्यातलं कार्टं

खड्ड्यात पडलेल्या कार्ट्यावरही बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला.

? सॉरी संदर्भ समजला नाही.

हरियाणामध्ये एका उघड्या राहिलेल्या बोअरवेल् मध्ये एक लहान मुलगा चुकून पडला होता. त्याला बाहेर काढण्याच्या प्रयत्नांचे थेट प्रक्षेपण करण्यापर्यंत प्रसारमाध्यमांनी त्याला उदंड प्रसिद्धी दिली होती. सर्वच दर्शकांना त्या मुलाबद्दल कणव वाटत होती तसेच अशा परिस्थितीत इतका वेळ धैर्याने तग धरून राहिल्याबद्दल त्याचे कौतुकसुद्धा वाटले होते, पण त्याचा हा पराक्रम नव्हता आणि त्याला बक्षिसे देण्यासारखा तर नव्हताच.

 
^ वर