लादेनचा शेवट !

आत्ताच आजतक वरून ओसामा बिन लादेन मेल्याची बातमी मिळाली.

मागच्या ऑगस्ट पासून (ओबामाच्या अंडर) सुरू असलेल्या विशेष कारवाई ला यश आले. अभिनंदन अमेरिकेचे आणि
संपूर्ण जगाचे की भयावह अलकायदाचा लिडर संपुष्टात आला.

मागचे २ दशक ज्यानी दहशत गाजवली अशा ह्या क्रूर माणसाचा अंत झाला. वाह!

लेखनविषय: दुवे:

Comments

शिरोमणी

दहशतवाद्यांचा शिरोमणी गेला. आनंदाची बाब आहे. अजून चिल्लर खुर्दा बराच बाकी असावा. जितकं लवकर जग शांततेच्या मार्गावर लागेल तितकं बरं.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

शिरोमणी ?

अस्स. मला वाटत होते , या दहशतवाळ्यांनी मारलेल्या निरपराध माणसांपेक्षा शेकडो निरपराधी माणसे व्हीएटनाम, इराक, इत्यादी देशांत मारणारे अमेरिकेचे अध्यक्ष व स्वत:च्या देशातील नागरिकांना मारणारे रशिया-जर्मनी मधील हुकुमशहा यांच्या यादीत लादेन पार तळाला असेल. खैर !
शरद

पारंपारिक

इथे दहशतवादी हा शब्द मी पारंपारिक अर्थाने वापरला होता. काही हजार लोकांना विध्वंसक रीतीने मारण्याचं स्वप्न बाळगून ते पूर्णत्वाला नेणारा कुठच्याही मानदंडानुसार दहशतवादी आहे.

देशांमध्ये युद्धं होतात ही दुर्दैवाने सत्य परिस्थिती आहे. त्यांत शक्तीप्रदर्शन, आंतरराष्ट्रीय राजकारण, व इतर अनेक अन्याय्य कारणांसाठी सामान्यांचा जीव जातो हेही खरं आहे. त्या प्रकारच्या युद्धखोर प्रवृत्तीला व जुलमी राजवटीद्वारे जनतेच्या छळाला देखील दहशतवाद म्हणण्याचं सर्वानुमते मान्य झालं तर मी शिरोमणी हा शब्द काढून टाकीन. तूर्तास दहशतवाद या शब्दाची चिरफाड करण्यापेक्षा त्याविरुद्धच्या मानवजातीच्या लढ्यात मिळालेला विजय साजरा करू.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

मानवजातीचा लढा कसा काय?

मुळात ओसामाला मोठा कोणी केले हा महत्त्वाचा प्रश्न बाजूला ठेवला तरी ओसामाचे प्रमुख शत्रू अमेरिका, भारत, इस्रायल, इंग्लंड हे देश होते. त्याने अरब देशांवर हल्ले केल्याचे ऐकिवात नाही. चीन, जपान किंवा आफ्रिकेत दहशतवादी हल्ले केल्याचे वाचले नाही. ओसामाविरुद्ध मोठी सशस्त्र आघाडी नाटोमधील देशांनी उघडली होती त्यामुळे फारतर उल्लेख केलेल्या देशांचा शत्रू मेला असे म्हणता येईल. येथे मानवजातीचा लढा कोठून आला ते समजले नाही. अमेरिकेबाहेर मानवजात नाही की काय? अमेरिकेने अफगाणिस्तान, इराक वगैरे भागात चालवलेला दहशतवाद किंवा इस्रायलचा मध्यपूर्वेत चाललेला दहशतवाद हेही ओसामाच्या दहशतवादाइतकेच निषेधार्ह आहेत.

दहशतवाद

येथे मानवजातीचा लढा कोठून आला ते समजले नाही.

एकंदरीतच अन्याय, झुंडशाही, एकाधिकारशाही, दहशतवाद, युद्धं, खून, हत्या, वंशसंहार, वर्णभेद अशा व्यापक गोष्टींविरुद्ध संपूर्ण मानवजात कुठे ना कुठे लढा देत आहे. व्यापक पातळीवर या प्रकारांतून होणाऱ्या हानीला आळा घालण्यात यश मिळतं आहे. त्यातल्या दहशतवादाविरुद्ध सध्या बऱ्याच देशांत लढा चालू आहे. ओसामाला त्या विशिष्ट देशांचा विरोध असेल, पण दहशतवादाला अधिक व्यापक विरोध आहे. त्या अर्थाने मानवजातीचा लढा म्हटलं. अमेरिका दहशतवाद करते का हा वादाचा मुद्दा आहे, तुम्ही हवं तर एक नवीन चर्चा सुरू करावी. एका खुन्याने दुसऱ्या खुन्याला मारलं तरी जगातले खुनी कमी झाले म्हणून मर्यादित आनंद व्यक्त करायला हरकत नसावी.

असो. कधीकधी मी शब्द पुरेशा अचूकपणे वापरत नाही हे खरं आहे. गैरसमज होऊन अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. भावनांपेक्षा शब्द महत्त्वाचा मानणाऱ्या प्रवृत्तीच्या मनाला त्याने क्लेषदेखील होतील. अर्थ पुरेसा ताणला तर कदाचित त्यालाही दहशतवाद म्हणता येईल. आत्तापर्यंत या चर्चेत माझ्याकडून झाला तेवढा पुरे झाला.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

आक्षेप

माझा आक्षेप अमेरिकेने केले ते केवळ अखिल मानवजातीच्या तारणहाराच्या भूमिकेतून केले अशा स्वरूपाच्या दाव्याला होता. ओसामाला मारणे हा अमेरिकेच्या प्रतिष्ठेचा प्रश्न झाला होता. त्याला मारले. विषय संपला. एक तर दुसऱ्यासाठी खणलेल्या खड्ड्यात अमेरिकाच पडली होती हे आता नाकारता येत नाही. मात्र उगीच इंडिपेंडन्स डे टाईपच्या सिनेमाप्रमाणे या एकंदर प्रकरणात अमेरिकेने पौड ता. मुळशी मधील एखाद्या सोम्यागोम्याच्या तारणहाराचीही भूमिकाही बजावली असे सूचित होत असल्याने ते दाखवून दिले.

भावनांपेक्षा शब्द महत्त्वाचे असले तरी मी इथे तेवढ्यापुरते दुर्लक्षच केले आहे. अन्यथा पारंपारिक हा शब्द पारंपरिक असा लिहायला हवा असे मी म्हटले नसते का?

अतिशय आनंददायक बातमी

अतिशय आनंददायक बातमी. ओसामा ऍबटाबादमध्ये एका प्रासादात सुखाने गेली ४-५ वर्षे कसा राहात होता? पाकिस्तानचा अप्रामाणिकपणा म्हणायचा की अमेरिकेचा भोळेपणा की आणि की.. असो.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

ब्राऊनी पॉईंट्स

घसरलेली लोकप्रियता सावरण्याची संधी ओबामा यांना ओसामाच्या मृत्यूमुळे मिळेल.

बातमी खोटी आहे.

असं कुणीतरी म्हणणार् याची खात्री आहे, वाट पाहतोय.
पुढील कॉन्स्पिरसी थिअरीवर् शेकडो प्रबंध आणि लाखो पानं खर्च पडणार हे नक्की:-
१.लादेन मेलेलाच नाही.तो मुशर्रफ/झरदारी/मनमोहन/ओबामा ह्यापैकी कुणाच्या तरी घरात सुरक्षित् आहे!
२.लादेन म्हणुन कुणी नव्हतच. निव्वळ एक काल्पनिक व्यक्तिमत्व उभं करण्यात आलं होतं.
३. लादेन मरुन् खरं तर् दहा-बार वर्षे होउन गेली होती, फक्त त्याचा बागुलबुवा उभा करण्यात येत होता.
४.लादेन आणि हिंदुत्ववाद.

--मनोबा

:)

>>३. लादेन मरुन् खरं तर् दहा-बार वर्षे होउन गेली होती, फक्त त्याचा बागुलबुवा उभा करण्यात येत होता.

हा-हा-हा

---------------------
-धनंजय कुलकर्णी

मला वाटते...

लादेन मेलेलाच नाही.तो मुशर्रफ/झरदारी/मनमोहन/ओबामा ह्यापैकी कुणाच्या तरी घरात सुरक्षित् आहे!

मला वाटते आता ओबामाच्या जन्मस्थानाच्या दाखल्यावर आणि नंतर कॉलेजमधील गुणांसदर्भात अडून बसलेला राष्ट्रपतीपदासाठीचा इच्छूक डोनाल्ड ट्रंप हा ओबामास "ओसामाला स्वर्गीय सूख" देण्यास कारणीभूत आहे अशी टिका करणार आहे... :-)

ही अजून एक बातमी पाहा!

उपयोग काय?

नक्की चकमक केव्हा झाली?
मेरीकेची अर्थव्यवस्था सुधारण्यास ह्या बातमीचा काय उपयोग होणार आहे?
विकीलिक्सवर ह्याबद्दलच्या बातम्या येतील तेव्हा हे खरे मानु.

काही प्रश्न/विधाने

१. लादेन मेला की लादेनचे अमेरिकेने तयार केलेले "भूत" मेले? आता नवीन भूत कुठले असेल?
२. ओ'सा'मा मेला आणि ओ'बा'मा अजून आहेच की!
३. लादेन असल्याचे फक्त टेप वरून कळत होते, प्रत्यक्ष गुन्हे केलेला त्यापेक्षाही भयंकर(निदान भारतासाठी) असा दाउद अजून सुरक्षित आहे.
४. लादेनच्या कुटुंबाला नुकसान भरपाई मिळणार काय?
५. लादेन मेल्यामुळे ९-११ हे खरेच त्याने केले होते कि अम्येरीकेने केले होते हे सिद्ध होणे अजून अवघड झाले का?
६. लादेन मेल्या दिनी अमेरिका राष्ट्रीय सुटी जाहीर करेल काय? केली काय?
७. अल-कायदाचा नवीन मुख्यमंत्री कोण होणार?

(

१. लादेन मेला की लादेनचे अमेरिकेने तयार केलेले "भूत" मेले? आता नवीन भूत कुठले असेल?

कसेही का असेना. भूत मेले हे खरे. त्यातून नवीन भुते तयार होणार नाहीत किंवा झाली नसतील असे सांगता येत नाही.

२. ओ'सा'मा मेला आणि ओ'बा'मा अजून आहेच की!

ओबामा यांनी इराकमध्ये जाण्यास विरोधच केला होता. एकदा युद्ध चालू असले तर त्यातून निर्माण होणार्‍या प्रश्नांची सोडवणूक केल्याशिवाय बाहेर पडता येत नाही. ओबामा यांना मारावे असे मला काही दिसत नाही.

३. लादेन असल्याचे फक्त टेप वरून कळत होते, प्रत्यक्ष गुन्हे केलेला त्यापेक्षाही भयंकर(निदान भारतासाठी) असा दाउद अजून सुरक्षित आहे.

ते काम तशी गरज वाटल्यास भारताने करावे.

४. लादेनच्या कुटुंबाला नुकसान भरपाई मिळणार काय?

नुकसान भरपाई कदाचित अल कायदा देईल असे वाटते.

५. लादेन मेल्यामुळे ९-११ हे खरेच त्याने केले होते कि अम्येरीकेने केले होते हे सिद्ध होणे अजून अवघड झाले का?
असेलही. अमेरिकेने पुरावा नष्ट केला असे म्हणता येईल. एवरीथिंग इज फेअर इन लव अँड वॉर म्हणतात ;) किंवा लवमधूनच वॉर झाले असेल. फरक पडत नाही.

६. लादेन मेल्या दिनी अमेरिका राष्ट्रीय सुटी जाहीर करेल काय? केली काय?
नाही बॉ. आम्ही एवढेच पाहिले की केट आणि विल्यमच्या लग्नासाठी मात्र ब्रिटनने सुटी दिली. ब्लॉक पार्ट्या करून ती ब्रिटीश नागरिकांनी एन्जॉयही केली. :) हे काय या लग्नामुळे राष्ट्रीय उत्पन्नात घट आली असे कोणी म्हटलेले दिसले नाही. बहुदा त्यांचे आवाज दाबून टाकले असावे. ;)

७. अल-कायदाचा नवीन मुख्यमंत्री कोण होणार?
बिन लादेन मुख्यमंत्री होता काय? अल जवाहिरी?

हॅ हॅ हॅ

असेलही. अमेरिकेने पुरावा नष्ट केला असे म्हणता येईल. एवरीथिंग इज फेअर इन लव अँड वॉर म्हणतात ;) किंवा लवमधूनच वॉर झाले असेल. फरक पडत नाही.

हॅ हॅ हॅ...हे आवडले :)

नाही बॉ. आम्ही एवढेच पाहिले की केट आणि विल्यमच्या लग्नासाठी मात्र ब्रिटनने सुटी दिली. ब्लॉक पार्ट्या करून ती ब्रिटीश नागरिकांनी एन्जॉयही केली. :) हे काय या लग्नामुळे राष्ट्रीय उत्पन्नात घट आली असे कोणी म्हटलेले दिसले नाही. बहुदा त्यांचे आवाज दाबून टाकले असावे. ;)

सध्याचा इंग्रज नेहमीच राणीच्या नावे खडे फोडतो...असो..लग्न काय कधीतरीच करतात, करो बापडे....पण काही म्हणा...केट पेक्षा तिची सासू लय भारी व्हती...लग्नात बी मजा आली नाय...वरात नाय..घोडं नाय. छ्या.

बिन लादेन मुख्यमंत्री होता काय? अल जवाहिरी?

महाराष्ट्रातलं राजकारण बघता..एवढा मोठा गुंड फक्त मुख्यमंत्रीच असतो असे वाटते.. ;)

??

ओ'सा'मा मेला आणि ओ'बा'मा अजून आहेच की!

संबंध काय? या दोघांची तुलना करून तेही ओसामाच्या मृत्युच्या (म्हणजे धाग्याचा विषय, औचित्य नाही) धाग्यावर नक्की काय् म्हणायचे आहे? की उगाच ५-७ ओळी-जगापेक्षा वेगळ्या?- टंकायच्या म्हणून् काहीही टंकावे? स्वतःला हास्यास्पद ठरवण्यात इतका उत्साह का वाटावा याचे आश्चर्य वाटते.

लादेन असल्याचे फक्त टेप वरून कळत होते, प्रत्यक्ष गुन्हे केलेला त्यापेक्षाही भयंकर(निदान भारतासाठी) असा दाउद अजून सुरक्षित आहे.

पुन्हा तेच, त्याचा इथे काय् संबंध? अमेरीकेने दाउदला मारल्यावरच ओसामाला मारायला हवे होते का? की दाउदमेल्याशिवाय ओसामा मेल्याबद्दल् धागा काढायला मनाई आहे? उगाच काहीतरी असंबद्ध बडबड करण्यात काय् पॉईंट् आहे?

-Nile

:)

:) तुमचा राग समजू शकतो.

ज्याअर्थी माझा प्रतिसाद अजून उडाला नाही त्याअर्थी संपादक बीजी आहेत किंवा तुमच्या सारखे त्यांना आक्षेपार्ह काही वाटत नसावे. वाट बघूया, किंवा तुमची ओळख असेल तर सांगून बघा, उडेल प्रतिसाद कदाचित.

हास्यास्पद.

ज्याअर्थी माझा प्रतिसाद अजून उडाला नाही त्याअर्थी संपादक बीजी आहेत किंवा तुमच्या सारखे त्यांना आक्षेपार्ह काही वाटत नसावे. वाट बघूया, किंवा तुमची ओळख असेल तर सांगून बघा, उडेल प्रतिसाद कदाचित.

तुमची जबाबदारी संपादकांवर ढकलू नका. जबाबदार विधाने करणे हे बेजबाबदार विधाने उडण्याची वाट बघण्यापेक्षा सोपे आहे. त्याशिवाय् आपले विधान आक्षेपार्ह आहे की नाही हे सामान्यज्ञान असणे गरजेचे आहे, दरवेळेला संपादक येणार नाहीएत ते दाखवायला. आणि हो, संपादक एव्हाना तुमच्या बेजबाबदारपणाला कंटाळलेही असतील कोणास ठावूक. ओळख वगैरे फालतूपणा तुम्हालाच लखलाभ, तुमच्या बेजबादारपणाची खात्री पटल्याने या वाक्याचे आश्चर्य वाटले नाही. तुमच्याशी, ह्यामुद्द्यावर, फालतू वाद घालण्यात वेळ नाही आणि तुमचा बेजबाबदारपणा आत्ता इतका महत्वाचा नाही, तेव्हा इत्यलम.

-Nile

अभिनंदन

तुमच्याशी, ह्यामुद्द्यावर, फालतू वाद घालण्यात वेळ नाही आणि तुमचा बेजबाबदारपणा आत्ता इतका महत्वाचा नाही.

:) लवकर समजले!!

पाकिस्तानातील जीवनमान

पाकिस्तानातील जीवनमान सुरक्षित नसल्याच्या बातम्या तशा नेहमीच वाचनात येतात पण दहशतवादी बॉसचे जीवनही तेथे सुरक्षित नाही हे आज कळले. ;-)

भारतातील जीवनमान

भारतातील जीवनमान त्यामानाने बरेच सुरक्षित आहे असे वाटते. अगदी कसाब, अफजल गुरू ही मंडळीदेखील इथे अत्यंत सुरक्षित आहेत.

फारसे काहिच वाटले नाही

बातमी ऐकून फारसे काहिच वाटले नाही .. फारतर फार "हुश्श!" झाले :(
ज्या एकामुळे अफगाणिस्तानातील अनेक स्थानिकांचा व अनेक देशांच्या सैनिकांना मृत्यू आला तो एक आता मेलेला बघता इतक्या उशीरा याला पकडून अमेरिका का फुशारली आहे समजत नाही! असो. एक हिंसक आचारांचा व्यक्ती कमी झाला याचे समाधान आहेच

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

लक्षणीय बातमी

या वर्षातली लक्षात राहील अशी ही बातमी आहे.

बिन लादेन बहुधा अलकायदा संघटनेचा दैनंदिन कारभार चालवत असेल. (ते "कंपाउंड" बाहेरच्या जगाशी विद्युत्-प्रसारण साधनांनी जोडलेले नव्हते. फक्त काही थोड्या मनुष्य-दूतांकरवी संदेशांची ने-आण होत असे. त्या दूताचा पिच्छा करत जागा सापडली, असे वृत्तपत्रे सांगतात. अशा प्रकारे ढोबळ धोरणे सांगू शकत असेल, पण दैनंदिन कारभार चालवणे कठिणच.) पण तरी अलकायदाचे चिह्न कोसळले आहे.

प्रचंड साधनसामग्री असलेली गुप्तहेर संघटना आणि सुसज्ज कमांडो असलेली सैन्यव्यवस्था, हे मिळून अशा दहा-वीस वर्षांच्या काळात आजकाल अतिशय गुप्तपणे लपलेला व्यक्ती शोधू शकते असे दिसते. ("कानून के हाथ लंबे हैं ।")

मला वाटते, की अशा प्रकारचा प्रकल्प चालवायला देश श्रीमंत आणि बलशाली असायला पाहिजे. नैतिक अधिष्ठान नसले तरी चालते. मात्र उघड्यावर अमेरिकेबद्दल कटुता बाळगणारे जनसमुदाय जर वळवायचे असतील, तर नैतिक अधिष्ठान हवे. मतलबी धोरणांसह सुद्धा काही प्रमाणात नैतिक अधिष्ठान हवे.

ओबामा यांच्या वक्तव्यात जरी या घटनेचे यश नैतिक अधिष्ठानाला दिलेले आहे, तरी वरील बाब त्यांना ठाऊक असेलच. देशाचा आपमतलब आणि नीती यांचे सुयोग्य मिश्रण करण्यात त्यांचे प्रयत्न पुरेसे होवोत, अशी आशा करूया.

+१.

धनंजय यांची प्रतिक्रीया अगदी योग्य आहे. वरती काही हास्यास्पद प्रतिसाद पाहून अजिबात आश्चर्य वाटले नाही. ओबामाल विनाकारण मारणे म्हणजे अकलेची परमावधीच म्हणावी लागेल.

ओसाम (समजा) जरी सद्ध्या कार्यरत नसला तरी त्याला "हिरो" ठरवून इतरत्र दहशतवदी बनवले जात नसतील असे नाही. अशा चळवळींमध्ये अशा चेहर्‍यांचे महत्त्व फार असते हे कळणे इतके अवघड नाही.

-Nile

भारताच्या बाबतीत.

तो पाकिस्तानात मारला गेला या गोष्टीचा काही परिणाम होईल का? भारताच्या बाबतीत.

नक्की कोण मेलं? ओबामा की ओसामा?

५ न्यूज वाले काय म्हणताहेत ते ऐका.
काही दृश्य इथे पाहा आणि आपणच ठरवा!

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

लादेन

http://www.bbc.co.uk/news/world-south-asia-13259359
BBC News website readers in Pakistan and Afghanistan have been sharing their views on the death of al-Qaeda's founder and leader, Osama Bin Laden.

सहमत

खालिल वाक्याने सुरु होणार शेवटून दुसरा परिच्छेद पूर्णपणे बरोबर वाटतो, तेथील जबाबदार नेत्यांवर/अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नसल्याचे वाचून आश्चर्य वाटले.

Yet, no federal official has been held to account....

 
^ वर