लोक काय वाचतात?

जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने ’लोकसत्ता’ ने २४ एप्रिलच्या अंकात महाराष्ट्रातील वाचनसंस्कृतीची एक पहाणी प्रसिद्ध केली आहे. महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरांना ’लोकसत्ता’ने पाठवल्याले प्रश्नावलीचे निष्कर्ष या अंकात दिलेले आहेत. यातून मराठी लोकांचे काय वाचन चालले आहे, लोकांना कोणती पुस्तके आवडतात, लोकांचे आवडते लेखक कोण याविषयी काही रंजक माहिती मिळते. वेगवेगळ्या शहरांमधली वाचनसंस्कृती वेगवेगळी असते काय, असल्यास ती कशी घडते असेही प्रश्न या माहितीतून उभे राहू शकतात. या माहितीचा थोडक्यात सारांश असा:
१.गेल्या वर्षाभरात सर्वाधिक वाचली गेलेली पुस्तके
विलेपार्ले, मुंबई
१ कॉलनी सिद्धार्थ पारधे
२ अर्थात अच्युत गोडबोले
३ व्हाय नॉट आय वृंदा भार्गवे
४ युद्ध जिवांचे गिरीश कुबेर
५ प्रकाशवाटा प्रकाश आमटे
६ लवासा निळू दामले
७ इमॅजिनिंग इंडिया नंदन नीलेकणी
८ दी कन्फेशन जॉन ग्रिशम
९ दी सिक्रेट र्‍होंडा बायरन
१० हिंदू भालचंद्र नेमाडे
११ झुळुक अमेरिकन तोर्‍याची शरद वर्दे
१२ टू स्टेटस चेतन भगत
१३ आणि दोन हात वि.ना. श्रीखंडे
१४ टू दी लास्ट बुलेट विनिता कामटे
कोल्हापूर
१ हिंदू भालचंद्र नेमाडे
२ शांताराम अनु. अपर्णा वेलणकर
३ नटरंग आनंद यादव
४ प्रकाशवाटा प्रकाश आमटे
४ लवासा निळू दामले
५ इजिप्तायन मीना प्रभू
६ सुमन-सुगंध मंगला खाडीलकर
७ टू दी लास्ट बुलेट विनिता कामटे
८ फाईव्ह पॉइंट समवन चेतन भगत
९ थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ चेतन भगत
१० वन नाईट ऍट दे कॉल सेंटर चेतन भगत
ठाणे
१ संभाजी
२ आमचा बाप आणि आम्ही
३ सर आणि मी
४ नॉट गॉन विथ दी विंड
५ हू किल्ड करकरे
६ कालिंदी
७ एका मारवाड्याची गोष्ट
८ डॉलर बहू
९ इजिप्तायन
सोलापूर
१ थ्री मिस्टेक्स ऒफ माय लाईफ चेतन भगत
२ फाईव्ह पॉइंट समवन चेतन भगत
३ व्हाय नॉट आय वृंदा भार्गवे
४ टू दी लास्ट बुलेट विनिता कामटे
५ कॉलनी सिद्धार्थ पारधे
६ नर्मदे हर हर
७ मी वनवासी
८ मास्तरांची सावली
९ सर आणि मी
१० माती, पंख आणि आकाश
११ हॅरी पॉटर
१२ थेंबभर पाणी, अनंत आकाश

पुणे वाचनालय क्र.१
१ पानिपत
२ छावा
३ युगंधर
४ झाडाझडती
५ झुंज
६ महानायक
७ मंत्रावेगळा
८ मृत्युंजय
९ कोल्हाट्याचं पोर
१० अग्निपंख
पुणे वाचनालय क्र.२
१ ययाती
२ अमृतवेल
३ छावा
४ युगंधर
४ संभाजी
५ हिंदू
६ दी फर्म
७ सेकंड सेक्स
८ जिना
९ शिंडलर्स लिस्ट
१० शांताराम
११ गिरीश प्रभुणे यांची पुस्तके
१२ चेतन भगत यांची पुस्तके
पुणे वाचनालय क्र.३
१ नर्मदे हर हर
२ साधनामस्त
३ हिंदू
४ सोकूल
५ करीना-डायट ( हे बहुदा ’लूज युवर वेट, डोन्ट लूज युवर माइंड’ हे पुस्तक असावे)
६ किमयागार
७ कालिंदी
८ पुण्याची अपूर्वाई
९ पानिपत, मृत्युंजय इ.
पुणे वाचनालय क्र.४
१ ऋतुचक्र
२ व्यासपर्व
३ सर आणि मी
४ मीना प्रभू यांची प्रवासवर्णने
५ फॉर हिअर ऍन्ड टु गो
६ प्रवीण दवणे यांची पुस्तके
७ प्र.ना.संत यांची पुस्तके
८ मास्तरांची सावली
९ शांता शेळके यांची पुस्तके
याशिवाय या लेखात कायम ज्या पुस्तकांना मागणी असते अशा पुस्तकांची व त्यांच्या लेखकांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यात अपेक्षेप्रमाणेच मुंबईत पु.ल.देशपांडे, व.पु.काळे, गंगाधर गाडगीळ, प्र. के. अत्रे, विश्वास पाटील, शिवाजी सावंत, वि.दा. सावरकर, बाबा कदम, सुहास शिरवळकर, सुधा मूर्ती, नारायण धारप अशी नावे आहेत. मुंबईतला वाचक कविता महाजन, मेघना पेठे, डॆन ब्राउन, राजन खान यांचे लिखाणही वाचतो. ’कोल्लापुरात’ बाकी रणजीत देसाई, बाबासाहेब पुरंदरे, वि.स.खांडेकर, शिवाजी सावंत, ना.सं. इनामदार, विश्वास पाटील हेच ’ऑल टाईम हिटस’ असलेले दिसतात. बाकी सगळीकडे जे जे लोकप्रिय ते ते वाचण्याकडे लोकांचा कल दिसतो. ’हौ टु’ आणि ’चिकन सूप’ सारखी बोधप्रद पुस्तकेही लोकांच्या पसंतीला उतरलेली दिसतात. शिव खेरा, शिवराज गोर्ले वगैरे ’मोटिव्हेशनल गुरु’ तर आहेतच.
वरील याद्यांमधून काही निष्कर्ष काढता येतील काय? लोकांची वाचनाची अभिरुची एका कालखंडात साकळल्यासारखी झालेली आहे काय? शहरानुसार आणि त्या त्या शहराच्या संस्कृतीनुसार लोकांची वाचनाची आवड घडलेली आहे काय? की बरोबर याच्या उलटे झालेले आहे? ’उपक्रमीं’चे यावर काय मत आहे?
आणि या सगळ्या साहित्यप्रकारांत कवितासंग्रह या प्रकाराचा उल्लेखही कुठे होऊ नये यामागचे गुपित काय? एरवी कविता आणि कवींचे उदंड पीक आलेले असताना कुणाला कवितासंग्रह वाचावेसेही वाटत नाहीत (विकत घेणे दूरच), हा काय प्रकार आहे?

लेखनविषय: दुवे:

Comments

कविता, विनोद, नाटक

अनेकांच्या कविता उत्तम असल्या तरी एखाद्या कवितासंग्रहातील सार्‍याच्या सार्‍या कविता आवडल्या असे क्वचित झाले आहे.
आपल्याकडे (निदान माझे तरी) फक्त काहि कविता आवडल्या म्हणून अख्खा संग्रह विकत घेतला आहे असे झालेले नाही.

मात्र या यादीत (खरं तर गेल्या दशकात) एकही नाव घेण्यासारखे विनोदी लेखन / लेखक असु नये याचे दु:ख होते. याचे कारण काय असावे?
तिच गत नाटकांची. हल्ली नाटके पुस्तक रुपांनी प्रसिद्ध तरी होतात का?

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

नाटके प्रसिद्ध होतात्.

आमच्याकडे बरिचशी होती.

पण मुळातच फार पूर्वीपासुन प्रकाशन आवृत्त्या ह्या नाटकांच्या कमीच असतात.
पुण्यात् परेश एजन्सीज् , अ ब चौक ह्यांना संपर्क केल्यास मिळतील.

--मनोबा

विनोदी लेखन

आठवणीत राहावा असा एकही विनोदी लेखक (दुर्दैवाने) आजमितीला मराठी साहित्यात नाही. टांकसाळे, टोकेकर चुरचुरीत लिहितात, पण ते तेवढ्यापुरतेच. कणेकर आता संपल्यातच जमा आहेत. बाकी कोण?
सन्जोप राव
आह को चाहिये, इक उम्र असर होने तक
कौन जीता है, तिरे जुल्फ के सर होने तक

भर..

अशोक नायगावकर, मंगला गोडबोले.

अर्थात महाराष्ट्राने आधी जसा विनोद वाचला आहे त्यातुलनेत ही नावे अगदीच तोकडी आहेत याबद्दल सहमत आहे.

बास का?

विनोदी लेखन वाचायला मिळत नाही?
मुक्तपीठ, फ्यामिली डॉक्टर, मिसळपाव.... प्रत्येक लेख वाचूनच हसू येते.

उपक्रम!

सर्वाधिक

१.गेल्या वर्षाभरात सर्वाधिक वाचली गेलेली पुस्तके >>

बहुतेक इथे गोम असावी. इथे नवखे v/s नेहमीचे ह्यांचा परीणाम जास्त होतो.

नवखे लोक सहसा वाचनाची आवड लागावी म्हणून वरील हिट लिस्ट पासून सुरवात करतात. तसेच ह्या नवख्यांमधे
"पानीपत नक्की वाच बरका ह्या वेळच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत" असं कुणी म्हणलं म्हणून वाचनालयाचे पाय धरणारे असतात.
नवख्यांच प्रमाण हे रोजच्या वाचकांपेक्षा जास्त असावे (शहरानूसार हे बदलत राहते).

जर वरील लिस्ट ही वाचनालयाच्या अवरेज वाचकाने काय वाचले हे जर गृहीत धरून काढली असती तर बहुतेक
बराच फरक पडला असता.

आणि मला तुम्ही पर्सनली विचारत असाल तर नक्की सांगू इच्छीतो की २० लेखांवर १ कवीता (वाचणे) अस माझं प्रमाण असेल
(मी अती सामन्य वाचक आहे त्यामुळे हे गणित काही उपयोगाच नाही) .

---------------------
-धनंजय कुलकर्णी

आपापली आवड

नवखे लोक सहसा वाचनाची आवड लागावी म्हणून वरील हिट लिस्ट पासून सुरवात करतात.

सहमत आहे. ययाती,मृत्युंजय, छावा, अग्निपंख, अशा गाजलेल्या प्रसिद्ध पुस्तकांना वाचकांच्या कोणत्याही नव्या पिढीला आकर्षणच वाटते.

नवं काही सार्वजनिक वाचनालयात येत नाही. (आमच्या शासकीय ग्रंथालयाची गोष्ट) आलं तरी नव्या पुस्तकावर वाचून कोणी अभिप्राय दिल्याशिवाय नवं पुस्तक वाचण्याविषयी उत्सुकता नसते. बाकी, वरच्या यादीत 'श्रीमंत व्हा' 'श्रीमंत होण्याचे मार्ग' अशा पुस्तकांचाही एक वाचक आहे असे माझे मत आहे. एखाद्या नव्या पुस्तकाला वाचण्यापूर्वी त्यातील आशयावरुन सदरील पुस्तक दलित जाणिवा व्यक्त करणारं, ग्रामीण जाणिवा व्यक्त करणारं, की आदिवासी अनुभव व्यक्त करणारं पुस्तक अशी ओळख झाल्यावर वाचायचं की नाही ते ठरवल्या जाते असेही मला वाटते. अशा वाचकांच्याही नोंदी डकवल्या पाहिजे. आता हौशी वाचकांना कुठलंही पुस्तक चालतं त्यात काही वर्गवारी नसते. वाचलं तर वाचलं नाही तर सोडून दिलं.

>>>> साहित्यप्रकारांत कवितासंग्रह या प्रकाराचा उल्लेखही कुठे होऊ नये यामागचे गुपित काय ?
कवितेच्या बाबतीत एक गोष्ट मला जाणवते ती ही की, कोणत्यातरी कवीची एखादी कविता किंवा काही मोजक्या कविता प्रसिद्ध होतात आणि मोठ्या अपेक्षेने त्या कवीच्या कविता संग्रह घेतला की अपेक्षा भंग होतो. उदा. विठ्ठल वाघ या कवीची कविता. 'काया मातीत...ने त्यांचं एक मोठं नाव झालं आणि बाकी कविता त्यांच्या एक सुरी होतात. मग वाचायला मजा येत नाही. मग अशा काव्यसंग्रहातून कवितेत आलेले शब्द वगैरे प्रादेशिक खुणा शोधत बसायचे आणि त्या कवितेचे वेगळेपण कसे आहे हे सिद्ध करत बसावे लागते. हौशी वाचकाला अशा गोष्टींशी फारसं घेणं-देणं नसतं असं माझं मत आहे. अनुवादित कविता वैयक्तिक मला आवडतात. म्हणून अशा काव्यसंग्रहांच्या मागे मी असतो निरंज उजगरे यांच्या 'फाळणीच्या कविता' चंद्रकान्त पाटील यांचे 'कवितान्तरण' संग्रही आहेत. कोणीतरी सदरील पुस्तकावर चर्चा केली आणि ते विकत घ्यावे वाटले. कवितान्तरणाची किंमत आहे पाचशे रुपये. पाचशे रुपये खर्च करुन कविता वाचायला फारसं कोणी तयार होणार नाही. पण सदरील अनुवादित कवितेत आसामी, ओडिया, उर्दु,कन्नड,पंजाबी,तेलगु या भाषेतील उत्तमोत्तम असलेल्या कवींच्या कविता आहेत. आणि उत्तम मराठी अनुवाद जमला आहे, असे अनेकदा कोणी मनावर बिंबवल्यावर अशा कवितेच्या पुस्तकाकडे वाचक वळेल. ग्रामीण कविता संग्रह मला वैयक्तिक वाचायला आवडतात. पण त्यातही तेच तेच अनुभव तर नाही ना अशी एक भीती असते. त्यामुळे आवड असूनही पूर्व ग्रहामुळे कधी कधी कवितासंग्रहाकडे कानाडोळा होतो. अर्थात काळ आणि वयोमानाप्रमाणे आपापली आवड असाही एक भाग यात असल्यामुळे लोक काय वाचतील हे खात्रीने सांगता येणार नाही.

अवांतर : मराठी संस्थळावर कविता लिहिणारे एक कवी गंगाधर मुटे या कवीचा 'रानमेवा' हा उत्तम काव्यसंग्रह मला वाचायला मिळाला. एक गमतीदार आणि व्यवस्थेला चिमटे घेणारी कविता वाचतांना आणि अचानक लाडू-पेड्याच्या स्वाक्षरीची आठवण झाली होती. कवितेच्या काही ओळी डकवतो. कवितेचे शीर्षक आहे-

नाकानं कांदे सोलतोस किती ?

तुझा अभ्यास किती, तु बोलतोस किती
नाकानं कांदे सोलतोस किती ?

............
.............

तुझी मेहनत किती, तू राखतोस किती
नाकानं टेंभरं चाखतोस किती ?

असो, वरील कविता संग्रहाची ओळख मिपावर पुढे कधीतरी करुन देईनच. तूर्तास पूर्णविराम.

-दिलीप बिरुटे

रोचक व आश्चर्य

या पाहणीतील माहिती येथे दिल्याबद्दल धन्यवाद. नाशिक या शहराबाबत वेगळी माहिती असती तर आवडले असते.

अवचट यांचे नाव न दिसल्याने आश्चर्य वाटले.

संकलन छान

रोचक यादी आहे. कुठल्या गावांमधे कशाची चलती आहे हे पाहणे मनोरंजक आहे.
मुंबईच्या यादीत "झुळुक अमेरिकन तोर्‍याची- शरद वर्दे" हे टुकार पुस्तक बघुन मजा वाटली. अपघाताने हे पुस्तक माझ्या वाचनात आले आणि बहुदा शे दोनशे प्रतीपेक्षा खपले नसावे असा माझा अंदाज बनला पण इथल्या यादीत त्याचे नाव पाहुन नविन माहिती मिळाली.

अवांतरः

लोकांची वाचनाची अभिरुची एका कालखंडात साकळल्यासारखी झालेली आहे काय?

मला हाच प्रश्न हिंदी सिनेमांविषयी पडला आहे. आजकालच्या शिणेमांमधेही अक्षय कुमार, सलमान आमीर शाहरुख ही खानावळ, संजय दत्त ही १५-२०वर्षापुर्वीची फळी अजुनही प्रामुख्याने कशी काय दिसते. कालखंड साकळला आहे की काय?

नारायण धारप

नारायण धारप गेल्याने जी पोकळी निर्माण झाली आहे ती भरुन काढणारे ही कोणी दिसत नाहिये.

मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com

 
^ वर