चैत्र पौर्णिमा

चैत्र पौर्णिमा

हिंदू कालगणनेनुसार येणारा वर्षातील श्रीखंडेरायाचा पाहिला मोठा उत्सव विविध जाती जमातींचा सहभाग असलेली यात्रा. धर्मपुत्र सप्तऋषींच्या तपसाधने मध्ये व्यत्यय निर्माण करणा-या मणी मल्ल दैत्यांविरुद्ध दाद मागण्यासाठी ऋषीगण देवेंद्राच्या अमरावती नगरी व विष्णूंच्या वैकुंठनगरी मार्गे कैलासावर पोहोचले. सप्तऋषींनी मणी व मल्लासुर दैत्यांचे दुष्कृत्य वर्णन केल्यानंतर श्रीभगवान शंकराने मार्तंड भैरव अवतार धारण केला त्याचा काळ सांगताना मार्तंड विजय ग्रंथामध्ये खालील वर्णन आलेले आहे,
चवदामाजी दुसरा मनु, स्वारोचिष असे अभिधानु l
त्याचे एकतिसावे द्वापार परिपूर्णु l होता अवतार जालासे ll
त्या द्वापाराची समाप्ती आली l अठ्ठ्यांशी सहस्त्र दिवस राहिली l
ते दिवशी चंद्रमौळी भयंकर रूप धरीतसे ll
वसंत ऋतू चैत्र मास l शुक्ल पक्ष दोन प्रहर दिवस l
चित्रा नक्षत्र तुळ रोहिणी विलास l तेव्हा रूप धरी उमापती ll

चौदा मनुमधील द्वितीय स्वारोचिष नामक मनूच्या एकतिसाव्या द्वापार युगाच्या समाप्तीला अठ्ठ्याऐंशी हजार दिवस बाकी असताना वसंत ऋतूतील चैत्र महिन्यामध्ये शुक्ल पक्षात तसेच नभांगणात तुळ राशीतील चित्रा नक्षत्रामध्ये चंद्र असताना उमापतीने मार्तंड अवतार धारण केला.

चैत्र पौर्णिमेला अवतार दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी मोठी यात्रा भरते हि यात्रा तीन ते चार दिवस चालते. मार्गशीर्ष महिन्यातील षडःरात्रोत्सावा प्रमाणेच चैत्र शुक्ल नवमी ते पौर्णिमा असे चैत्र षडःरात्रोत्सव साजरे केले जाते.
अधिक माहितीसाठी लॉग इन करा www.jejuri.in/yatra
आपला अभिप्राय व सूचना संकेतस्थळावर जरूर नोंदवा....

लेखनविषय: दुवे:

Comments

गूढप्रश्न

चौदा मनुमधील द्वितीय स्वारोचिष नामक मनूच्या एकतिसाव्या द्वापार युगाच्या समाप्तीला अठ्ठ्याऐंशी हजार दिवस बाकी असताना वसंत ऋतूतील चैत्र महिन्यामध्ये शुक्ल पक्षात तसेच नभांगणात तुळ राशीतील चित्रा नक्षत्रामध्ये चंद्र असताना

ही तारीख नेमकी कोणती ते जाणकार सांगू शकतील काय?
--
The Sanskrit Malhari Mahatmya suggests offerings of incense, lights, betel and animals to Khandoba. The Marathi version mentions offerings of meat and the worship by chedapatadi - "causing themselves to be cut", hook-swinging and self-mortification by viras. Marathi version calls this form of bhakti (devotion) as ugra (violent, demonic) bhakti. Martanda vijaya narrates about Rakshashi bhakti (demonic worship) by animal sacrifice and self — torture. Possession by Khandoba, in form of a wind, is lower demonic worship (pishachi worship). Sattvic worship, the purest form of worship, is believed to be feeding Khandoba in form of a Brahmin. असे विकिपीडियावर सापडले.
--
"आपला अभिप्राय व सूचना संकेतस्थळावर जरूर नोंदवा" असे म्हणणे, किंबहुना, मुळात, संकेतस्थळाचा दुवा लेखात देणे हीच जाहिरातबाजी आहे.
क्ष्

बहुतेक नाही

अधिक माहितीसाठी लॉग इन करा www.jejuri.in/yatra
आपला अभिप्राय व सूचना संकेतस्थळावर जरूर नोंदवा...

त्यानी पहिल्यांदा म्हणले आहे की "अधिक माहितीसाठी ...." आणी अधीक माहिती घेताना आलेले अभिप्राय तिथे नोंदवा असं म्हणायला काहीच हरकत नसावी.

श्री उपाध्ये चांगला उपक्रम राबवत आहेत. त्यांना शुभेच्छा!

---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी

चांगले काय?

ते जाहिरात करीत आहेत, त्यात इतरांसाठी चांगले काय ते त्यांनी सांगितलेले नाही.

तद्दन कल्पनाविलास

चौदा मनुमधील द्वितीय स्वारोचिष नामक मनूच्या एकतिसाव्या द्वापार युगाच्या समाप्तीला अठ्ठ्याऐंशी हजार दिवस बाकी असताना वसंत ऋतूतील चैत्र महिन्यामध्ये शुक्ल पक्षात तसेच नभांगणात तुळ राशीतील चित्रा नक्षत्रामध्ये चंद्र असताना

या वाक्यावर आपण जरा सखोल विचार करूया.
१. सध्याच्या प्रचलित हिंदू पंचांगपद्धतीप्रमाणे सूर्य, चित्रा (Spica) या तार्‍याच्या 180 अंश पुढे आला की त्याच्या पुढच्या शुद्ध प्रतिपदेला नववर्षदिन येतो. किंवा चैत्र महिना चालू होतो. वरील वाक्यात चंद्र चित्रेजवळ असण्याचा उल्लेख नववर्षाची ही व्याख्या मान्य करतो.
2. चैत्र महिन्याची ही व्याख्या बघितली की पृथ्वीच्या परांचन गतीमुळे चैत्र आणि वसंत ऋतू एकाच वेळी सतत येणे शक्य नाही हे लगेच लक्षात येते. त्यामुळे कवी वर्णन करत असलेली तारीख गेल्या हजार ते दोन हजार वर्षांपेक्षा फार जुनी असू शकत नाही.
3. द्वापार युग कृष्ण वैकुंठास गेला त्या वेळी संपले असे मानले जाते. म्हणजे ही युग समाप्ती जास्तीत जास्त दोन ते तीन हजार वर्षांपूर्वींची असली पाहिजे. त्याच्या मागे 241 वर्षे हा काही मोठा काल नव्हे. कसाही हिशोब केला तरी आपण इ.स.पूर्व 1500 च्या मागे जाऊ शकत नाही. म्हणजे भगवान शंकराने मार्तंड भैरव अवतार इ.स.पूर्व 1500 नंतर धारण केला असे या कवीचे म्हणणे आहे.

थोडक्यात म्हणजे हे काव्य हा कोणा एका कवीचा, ज्याला कालमापन म्हणजे काय याची सुतरामही कल्पना नाही, कल्पना विलास आहे एवढेच समजायचे.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

धन्यवाद

अजून एक शंका: चित्रा नक्षत्र कन्येत आहे की तुळेत?

चित्रा नक्षत्र आणि तूळ रास

भारतीय राशीचक्राप्रमाणे अंदाजे अर्ध्या चित्रा नक्षत्राचा,संपूर्ण स्वाती नक्षत्राचा व पाऊण विशाखा नक्षत्राचा तूळ राशी मधे समावेश केला जातो. मात्र चित्रेचा तेजस्वी तारा हा कन्या राशीत मोडतो.
आणखी एक महत्वाचा मुद्दा. रास ही संकल्पना आपण ग्रीकांकडून उचलली आहे व ती बरीच नवीन आहे. प्रस्तुत काव्यात असलेला राशीचा उल्लेख, कवी अर्वाचीन असल्याचे दाखवून देतो.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

टॉलेमी

राशींची संकल्पना दुसर्‍या शतकातील आहे असे ऐकल्याचे स्मरते.

भारतीय ज्योतिषशास्त्र

अधिक माहिती इथे
प्रकाश घाटपांडे

+१

रास ही संकल्पना आपण ग्रीकांकडून उचलली आहे व ती बरीच नवीन आहे. प्रस्तुत काव्यात असलेला राशीचा उल्लेख, कवी अर्वाचीन असल्याचे दाखवून देतो.

+१

ह्याला काही आधार असेल अशी अपेक्षा आहे

रास ही संकल्पना आपण ग्रीकांकडून उचलली आहे व ती बरीच नवीन आहे.
ह्याला काही आधार असेल अशी अपेक्षा आहे. असली बाबावाक्ये इतिहासात एकंदर किती आहेत ह्याची एक यादी करावी म्हणतो..........

Wit Beyond Measure is Man's Greatest Treasure !!

आधार

रास ही संकल्पना भारतीय नाही या विधानाला सर्वत महत्वाचा आधार सूर्य सिद्धांत हा ग्रंथ आहे. हा ग्रंथ मुळात सहाव्या शतकात लिहिला गेला व सध्या जी प्रत उपलब्ध आहे ही ती साधारणपणे अकराव्या शतकातली आहे. या ग्रंथात रास किंवा राशी हा शब्द सुद्धा वापरलेला नाही. प्राचीन भारतीय ज्योतिर्विद्याशास्त्रात फक्त नक्षत्रे (ती सुद्धा आयनिक वृत्ताजवळची) विचारात घेतली जात असत हे या ग्रंथावरून स्पष्टपणे समजते. राशी ही कल्पना अकराव्य शतकानंतरच भारतात आली आहे.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

हे राशिचे उल्लेख नाहीत तर काय आहेत ?

अहो ........ निदान आपण ज्याचा आधार घेतो त्याची तपासणी तर् कराल की नाही ?
१४.०१क ब्राह्मम् दिव्यम् तथा पित्र्यम् प्राजापत्यम् गुरोस् तथा /
१४.०१ख सौरम् च सावनम् चान्द्रम् आर्क्षम् मानानि वै नव //

१४.०२क चतुर्भिर् व्यवहारो +अत्र सौरचान्द्रार्क्षसावनैः /
१४.०२ख बार्हस्पत्येन षष्ट्यब्दम् ज्ञेयम् नान्यैस् तु नित्यशः //

१४.०३क सौरेण द्युनिशोर् मानम् षडशीतिमुखानि च /
१४.०३ख अयनम् विषुवच्चैव सम्क्रान्तेः पुण्यकालता //

१४.०४क तुलादि षडशीत्यह्नाम् षडशीतिमुखम् क्रमात् /
१४.०४ख तच्चतुष्टयम् एव स्याद् द्विस्वभावेषु राशिषु //

१४.०५क षड्विम्शे धनुषो भागे द्वाविम्शे निमिषस्य च /
१४.०५ख मिथुनाष्टादशे भागे कन्यायास् तु चतुर्दश //

१४.०६क ततः शेषाणि कन्याया यान्य् अहानि तु षोडश /
१४.०६ख क्रतुभिस् तानि तुल्यानि पितृऋणाम् दत्तम् अक्षयम् //

१४.०७क भचक्रनाभौ विषुवद्द्वितयम् समसूत्रगम् /
१४.०७ख अयनद्वितयम् चैव चतस्रः प्रथितास् तु ताः //

१४.०८क तदन्तरेषु सम्क्रान्तिद्वितयम् द्वितयम् पुनः /
१४.०८ख नैरन्तर्यात् तु सम्क्रान्तेर् ज्ञेयम् विष्णुपदीद्वयम् //

१४.०९क भानोर् मकरसङ्क्रान्तेः षण्मासा उत्तरायणम् /
१४.०९ख कर्क्यादेस् तु तथैव स्यात् षण्मासा दक्षिणायनम् //

१४.१०क द्विराशिनाथ ऋतवस् ततो +अपि शिशिरादयः /
१४.१०ख मेषादयो द्वादशैते मासास् तैर् एव वत्सरः //
सूर्यसिध्दान्त्- मानाध्याय

हे राशिचे उल्लेख नाहीत तर काय आहेत ?

Wit Beyond Measure is Man's Greatest Treasure !!

आहेत ना!

परंतु, तो ग्रंथ सहाव्या शतकातील आहे!

असत्य लिहिण्या अगोदर निदान थोडा विचार करावा

रास ही संकल्पना भारतीय नाही या विधानाला सर्वत महत्वाचा आधार सूर्य सिद्धांत हा ग्रंथ आहे. हा ग्रंथ मुळात सहाव्या शतकात लिहिला गेला व सध्या जी प्रत उपलब्ध आहे ही ती साधारणपणे अकराव्या शतकातली आहे. या ग्रंथात रास किंवा राशी हा शब्द सुद्धा वापरलेला नाही

हे ज्ञान कसे उत्पन्न झाले मग्............. :)

पुरावा

तुम्ही खरडलेल्या ओळींमध्येही रास किंवा राशी हे शब्द नाहीत. राशि हा शब्द आहे ते वेगळे ;)

सूर्य सिद्धांत अध्याय 14

सूर्य सिद्धांतातला हा शेवटचा अध्याय काल मापनाच्या निरनिराळ्या पद्धती काय आहेत याचा खुलासा करतो. ब्रम्हदेवापासून माणसापर्यंत कालमापनाच्या पद्धती आहेत पण यापैकी सूर्य (सोलर) चंद्र (ल्यूनर) , साइडरिअल व सिव्हिल अशा पद्धती मानव वापरतात. प्राचीन भारताची पद्धत ही चंद्राच्या भ्रमणावर अवलंबून आहे. सोलर पद्धतीचे वर्णन करताना सूर्य कुठे असतो हे सांगण्यासाठी वरील श्लोक दिलेले आहेत.
सूर्य सिद्धांत हा तसा नवीन ग्रंथ असल्याने दुसर्‍या कालमापन पद्धती काय आहेत हे त्यात सांगितलेले आहे. ग्रीक, रोमन ज्योतिर्विद्याशास्त्रांचा त्यात रोमक सिद्धांत म्हणून उल्लेख आहे.
या वरून हे लक्षात ये ईल की सोलर किंवा ग्रीक कालमापनाची पद्धत काय आहे हे सांगण्यासाठी वरील श्लोक दिलेले आहेत. भारतीय कालमापन चंद्रावर अवलंबून असल्याने त्यात फक्त नक्षत्रांचाच वापर केलेला आहे. व हा अध्याय सोडला तर ग्रीक साइन्स ओफ़ झोडियॅक यांचा इतरत्र कोठेही उल्लेख नाही. मी माझ्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे राशि ही संकल्पना सूर्य सिद्धांतात नाही.
काही टीकाकारांचे असेही म्हणणे आहे की हा अध्याय इतका निराळा आहे की तो नंतर घुसडलेला असावा. परंतु ती गोष्ट ग्राह्य असेलच असे म्हणता येणार नाही. चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

:) :) :) सोयीस्करपणावर कुठलेही तर्क व पुरावे चालत नसतात......

:) :) :) सोयीस्करपणावर कुठलेही तर्क व पुरावे चालत नसतात..............

सहमत

:) :) :) सोयीस्करपणावर कुठलेही तर्क व पुरावे चालत नसतात..............

सहमत
ईश आपटे यांनीही हे ध्यानात घ्यावे.

गंमत वाटते

सोयीस्करपणावर कुठलेही तर्क व पुरावे चालत नसतात..............

असे आपटे सांगतात तेव्हा गंमत वाटते.

लेखन काळ

सूर्य सिद्धान्त लेखनाचा काळ कुणी निश्चित केला आहे? हा काळ कसा निश्चित केला गेला? इ.स.पूर्व ६०० की इ.स. ६००?
जर हा ग्रंथ इ.स.६०० मध्ये लिहिला गेला असेल तर वराहमिहिराच्या लेखनात त्याचा उल्लेख आहे असे विकीवर वाचले.
वराह मिहीर ५०० शतकात झाला असेल, तर हे जुळत नाही. (पण २ वराहमिहीर आहेत याची कल्पना आहे!)
इ.स.६०० हा आकडा कसा या विषयी उत्सुकता आहे. नक्की कुणी हे सिद्ध केले या विषयी काही माहिती दिलीत तर आवडेल. काही टीकाकारांचे असेही म्हणणे आहे की हा अध्याय इतका निराळा आहे की तो नंतर घुसडलेला असावा. काही म्हणजे नक्की कोण असे म्हणाले आहे? कोणत्या ग्रंथात? अजून माहिती मिळेल का?
-निनाद

सूर्य सिद्धांत

सूर्य सिद्धांताचा लेखन काल, वराह मिहिराची त्या बद्दलची टीकाटिप्पणी व इतर बरीच माहिती रेव्ह. ई.बर्जेस यांनी केलेल्या सूर्य सिद्धांताच्या इंग्रजी भाषांतराबरोबर पी.सी. सेनगुप्ता यांनी जी ग्रंथओळख (इंट्रूडक्शन) करून दिलेली आहे त्यात आपल्याला मिळू शकेल.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

राशि भारतीयांनी ग्रीकांकडून घेतल्या हे असेच एक सिध्द न झालेले बा

निनाद
जे आपल्या सोयीस्कर आहे तो भाग खरा, बाकीचा नंतर घुसडलेला असे जर संशोधक म्हणणार असतील, तर कोण विश्वास ठेवेल. बर्गेस चा ग्रंथ निव्वळ भाषांतर करतो. नंतर अनेकांनी सूर्यसिध्दान्तावर काम केले आहे. दीक्षितांचे भारतीय ज्योतिषशास्त्र बघा , नवाथे आहेत, अगदी लेटेस्ट म्हणजे विनय झा आहेत.
सूर्यसिध्दान्त् हा पंच महासिध्दान्ता पैकी एक आहे, ज्याचा वराहमिहीराने उल्लेख केला आहे, वराहमिहीर कमीतकमी इ.स.पूर्व ५५२ वेळी होऊन गेला.
ता.क.-राशि भारतीयांनी ग्रीकांकडून घेतल्या हे असेच एक सिध्द न झालेले बाबावाक्य आहे........... जे संशोधक निव्वळ ठोकुन देतात.

Wit Beyond Measure is Man's Greatest Treasure !!

ईश आपटे इ.स.पूर्व २०११

वराहमिहिर इ.स.पूर्व ५५२ आणि ईश आपटे इ.स.पूर्व २०११ च्या सुमारास होते असे तर नाही? कोणाच्याही जीवनाला इ.स.पूर्व लावले की प्राचिनता दाखवता येते. बहुधा ऑथेन्सिटीही दाखवता येत असावी.

ईश आपट्यांनी खोटी माहिती देऊन लोकांची दिशाभूल करणे थांबवावे किंवा उपक्रम प्रशासनाने तरी त्यांच्याविरुद्ध कडक उपाययोजना करावी अशी विनंती.

आपण पाहिजे तर विकीपेडियाचे पेज बदलावे

प्रियाली
चन्द्रशेखर ह्यांची वरची थापेबाजी(सूर्यसिध्दान्तात राशिंचा उल्लेख नाही इ.) आपणास न दिसणे स्वाभाविकच नव्हे काय ??? आपण पाहिजे तर विकीपेडियाचे पेज बदलावे.........ते मी लिहीलेले नाही.......

Wit Beyond Measure is Man's Greatest Treasure !!

थयथयाट कशाला

चन्द्रशेखर ह्यांची वरची थापेबाजी(सूर्यसिध्दान्तात राशिंचा उल्लेख नाही इ.) आपणास न दिसणे स्वाभाविकच नव्हे काय ???

नव्हे. चंद्रशेखरांना स्पष्टीकरणाचा चान्स देण्यात आला आहे. ते इथले जुने सदस्य आहेत. त्यांचे लेखन संदर्भांसहित असते. योगबलाने सिद्धी प्राप्त असल्याचे दावे ते करत नाहीत. त्यांचा इतिहास सांगतो की ते खोट्या गोष्टी सहसा पसरवत नाहीत. जर गैरसमजाने त्यांनी लिहिले असेल तर ते मान्यही करतील.

आपण पाहिजे तर विकीपेडियाचे पेज बदलावे.........ते मी लिहीलेले नाही.......

मी विकीच्या सद्य पानाबद्दल बोलत नाही. तुमची थापेबाजी तेथे आली तर नक्की तक्रार करेन.

नवल नाही

सूर्य सिद्धान्त लेखनाचा काळ कुणी निश्चित केला आहे? हा काळ कसा निश्चित केला गेला? इ.स.पूर्व ६०० की इ.स. ६००?
जर हा ग्रंथ इ.स.६०० मध्ये लिहिला गेला असेल तर वराहमिहिराच्या लेखनात त्याचा उल्लेख आहे असे विकीवर वाचले.
वराह मिहीर ५०० शतकात झाला असेल, तर हे जुळत नाही. (पण २ वराहमिहीर आहेत याची कल्पना आहे!)
इ.स.६०० हा आकडा कसा या विषयी उत्सुकता आहे. नक्की कुणी हे सिद्ध केले या विषयी काही माहिती दिलीत तर आवडेल. काही टीकाकारांचे असेही म्हणणे आहे की हा अध्याय इतका निराळा आहे की तो नंतर घुसडलेला असावा. काही म्हणजे नक्की कोण असे म्हणाले आहे? कोणत्या ग्रंथात? अजून माहिती मिळेल का?
-निनाद

तुमच्या प्रतिसादातल्या निरागस शंकाकुशंका, प्रश्न वाचून आपटेंचा विलक्षण वाह्यातपणा विकिपीडियावर यायला आता काहीच अडचण, हरकत नाही असे कुणाला वाटायला लागल्यास नवल नाही.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

अडचण आहे

तुमच्या प्रतिसादातल्या निरागस शंकाकुशंका, प्रश्न वाचून आपटेंचा विलक्षण वाह्यातपणा विकिपीडियावर यायला आता काहीच अडचण, हरकत नाही असे कुणाला वाटायला लागल्यास नवल नाही.

विकीवर वाह्यातपणा करणार्‍याला निर्बंध लावता येतात, माहिती पडताळून पाहता येते. योग्य ठिकाणी संदर्भ विचारता येतात, मजकूर पटणारा नसेल तर तसा संदेश तेथे टाकता येतो. अर्थातच, हे काम संपादकांचे आणि ते तसे करत असावे आणि त्यांनी तसे करावे पण शेवटी तेही मनुष्य असल्याने त्यांच्या कामकाजावर आणि ज्ञानावर मर्यादा असाव्या.

निनाद विकीवरले संपादक नसले म्हणजे झाले. :-)

असे म्हणा ना......

प्रियाली
तुम्ही खरडलेल्या ओळींमध्येही रास किंवा राशी हे शब्द नाहीत. राशि हा शब्द आहे ते वेगळे ;)
असे म्हणा ना सरळ मग..............म्हणजे काही वादच होणार नाही

सॉरी!

वरील प्रतिसादाचा अर्थ आणि मला दिलेल्या प्रतिसादाशी संबंध लावण्याचे योगबल माझ्याकडे नाही.

क्षमस्व!

सूर्यसिद्धांत

सूर्यसिद्धांत नावाचे जास्त ग्रंथ वा संस्करणे होऊन गेली आहेत असे वाचल्याचे आठवते.
अगदी १९व्या शतकात ह्या ग्रंथांचे संस्करण झाल्याची माझी आठवण सांगते.
चंद्रशेखर यांच्या माहितीतील सूर्यसिद्धांत ग्रंथ आणि ईश आपटे यांनी दिलेल्या ओळींचा ग्रंथ एकच आहे का अशी शंका येते.
ज्योतिष शास्त्रातील ग्रंथांचे संस्करण होणे साहजिक आहे. कारण सततच्या निरिक्षणानंतरची माहिती त्यात मांडावी लागते.
राशीविषयक उल्लेख दिला आहे तो तसाच Ebenezer Burgess च्या पुस्तकात दिसला नाही.

या विषयावर अधिक जाणून घ्यायला उत्सुक आहे.

प्रमोद

मी २०११ ची एक सूर्यसिध्दान्ताची आवृत्ती काढावी म्हणतो

मी २०११ ची एक सूर्यसिध्दान्ताची आवृत्ती काढावी म्हणतो......नवीन भर घालून....व ती कृतयुगातील मयासुराच्या नावावर खपवावी म्हणतो..............;)

निरर्थक वाद

मी माझ्या प्रतिसादांच्यात काय लिहिलेले आहे ते न वाचताच माझ्यावर थापेबाजी, सोईस्करपणे विसरणे वगैरे आरोप केले गेले आहेत. वास्तविक याला उत्तर देण्याची गरज नाही. परंतु मी काय लिहिले आहे ते वाचकांच्या नजरेसमोर आणावे अशा हेतूने हा प्रतिसाद देत आहे.
1.काही टीकाकारांचे असेही म्हणणे आहे की हा अध्याय इतका निराळा आहे की तो नंतर घुसडलेला असावा. परंतु ती गोष्ट ग्राह्य असेलच असे म्हणता येणार नाही.
आपल्याला या चर्चेत चवदावा अध्याय नंतर घुसडलेला आहे हे ग्राह्य धरता येणार नाही असे मी स्पष्टपणे लिहिले आहे
2. हा ग्रंथ मुळात सहाव्या शतकात लिहिला गेला व सध्या जी प्रत उपलब्ध आहे ही ती साधारणपणे अकराव्या शतकातली आहे. या ग्रंथात रास किंवा राशी हा शब्द सुद्धा वापरलेला नाही.

येथे माझ्याकडून स्पष्टपणे खुलासा करण्यात मी कमी पडलो आहे हे मी मान्य करतो. मला असे म्हणायचे आहे की हिंदू ज्योतिर्विद्याशास्त्रामध्ये राशी ही संकल्पना नाही. सूर्य सिद्धांतच्या चवदाव्या अध्यायात सोलर कालमापन पद्धतीचे वर्णन करताना प्रत्येक सूर्य मासात सूर्य कोणत्या तारकासमुहाजवळ आहे हे सांगण्यासाठी प्रचलित ग्रीक-रोमन शास्त्राप्रमाणे साइ न्स ऑफ झॅडिआक ची नावे दिली आहेत. परंतु ती एक परदेशी कालमापनाची पद्धत कशी आहे हे सांगण्यासाठी दिली आहे. त्याचा सूर्य सिद्धांतामध्ये सांगितलेल्या हिंद चंद्र मास पद्धतीशी काहीही संबंध नाही. तांत्रिक दृष्ट्या माझे वरील वाक्य चुकीचे आहे यात शंकाच नाही. व त्या बाबतीत मी उपक्रमींची जरूर क्षमा मागतो.
3. ईश आपटे या आयडी बद्दल काहीही लिहिण्याची माझी पात्रता नाही. काही दिवसांपूर्वी या आयडीने मला सम्राट हर्ष इ.स.पूर्व 500 या कालातच कसा झाला असला पाहिजे याबाबत आपले अगाध ज्ञान प्रदर्शित केले होते. ही नोंद माझ्या खरडवहीत कोणीही वाचू शकतो. माझे विचार इतके प्रगल्भ नसल्याने मी पुढे काय लिहिणार?

4.मी भारतीय शास्त्रांना खोटे म्हणतो असे रावले यांना का वाटते ते मला समजू शकत नाही. त्यांनी मला नीट समजावून सांगितले तर मी माझी बाजू मांडण्याचा प्रयत्न करीन.
5. मुळात माझे जे वाक्य आहे त्याला मी पूर्णपणे धरून आहे की भारतीय ज्योतिर्विद्याशास्त्रात रास ही संकल्पना नाही व आपण ती ग्रीकांकडून उचललेली आहे. सूर्य सिद्धांताचा चवदावा सिद्धांत हे पूर्णपणे सिद्ध करतो असे मला वाटते. सूर्य सिद्धांताबद्दल ज्यांना जास्त रुची असेल ते माझे हे ब्लॉगपोस्ट वाचू शकतात.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

आता मात्र कहरच झाला............

आता मात्र कहरच झाला............
१.वराहमिहीर पंचसिध्दान्तिकेत सूर्यसिध्दान्ताचा स्पष्ट उल्लेख करतो. सर्वात महत्वाचे म्हणजे, सूर्यसिध्दान्त संपूर्ण भारत भर गेली हजारो वर्षे पंचांग बनवण्यासाठी प्रमाण होता, बर्‍याच प्रमाणात अजुन ही आहे. ग्रहलाघवकार गणेश दैवज्ञ, भास्कराचार्य,आर्यभट्ट हे सर्व महान् ज्योतिषी सूर्यसिध्दान्ताचा प्रमाण ग्रंथ म्हणून उल्लेख करतात.
२.ज्योतिषांमध्ये सूर्यसिध्दान्ताला वेदांचा दर्जा आहे. त्यामुळे त्यात घालघुसड झाली इत्यादी बर्ग्रेस आदिंचे आरोप निराधार आहेत. काही संशोधकांचा असा समज आहे की प्रत्येक संस्कृत ग्रंथात दर साल कोणी नवीन भर टाकत असे. अखंड देशभर ज्याला वेदतुल्य प्रामाण्य आहे त्या ग्रंथामध्ये घालघुसड होऊ शकत नाही.
३.आपण इतिहासाबद्दल कुठले ही बाबावाक्य प्रतिपादण्या अगोदर मेगास्थेनिस-चन्द्रगुप्त मौर्य , ही स्मिथ ने घालून दिलेली सांगड अगोदर सिध्द करावी (वेगळा धागा काढून, इथे विषयांतर नको). हर्ष विक्रमादित्य इ.स. पूर्व ४५७ ला होऊन गेला , त्याने त्याचा स्वतंत्र मालव शक सुरु केला असा स्पष्ट उल्लेक अल्बेरुनी ने अल्बेरुनीज् इंडिया मध्ये केला आहे. तो खोटा आहे असे आपण खुशाल म्हणू शकता. मग वादच संपुष्टात येईल.

ता.क.- राशि माहिती असल्याविना १२ घरांची पत्रिका मांडता येउ शकत नाही, रामायण,भारत,पुराणे आदि सर्व ग्रंथात राशिंचे उल्लेख आहेत. आता भारत दहाव्या शतकात लिहीले असे ही जर आपण म्हणणार असाल तर मग मजा आहे.
अवांतर- वरील मुद्दा क्रं ३ आपण गांभीर्याने घ्याल अशी अपेक्षा आहे.

Wit Beyond Measure is Man's Greatest Treasure !!

अल बिरुनी

अल बिरुनी कोणत्या शतकात झाला म्हणे? इ.स.पूर्व १००० का?

अखंड देशभर ज्याला वेदतुल्य प्रामाण्य आहे त्या ग्रंथामध्ये घालघुसड होऊ शकत नाही.

हाहाहाहा! आवरा यांना!

ईश आपट्यांवर या संकेतस्थळाने कार्यवाही करावी अशी संकेतस्थळ चालकांना पुन्हा विनंती.

साधारण काळ किती जुना हे सांगता येईल, पण आपण ते पचवू शकाल काय

चौदा मनुमधील द्वितीय स्वारोचिष नामक मनूच्या एकतिसाव्या द्वापार युगाच्या समाप्तीला अठ्ठ्याऐंशी हजार दिवस बाकी असताना वसंत ऋतूतील चैत्र महिन्यामध्ये शुक्ल पक्षात तसेच नभांगणात तुळ राशीतील चित्रा नक्षत्रामध्ये चंद्र असताना

ही तारीख नेमकी कोणती ते जाणकार सांगू शकतील काय?
--

साधारण काळ किती जुना हे सांगता येईल, पण आपण ते पचवू शकाल काय ?? :)

Wit Beyond Measure is Man's Greatest Treasure !!

पचेल

कथाच आहे, इतिहास नाही, डायनॉसॉरचा काळ सांगितलात (किंवा बिग बँग पूर्वीचाही) तरीही चालेल.

हे घ्या उत्तर...

एक मन्वंतर म्हणजे सुमारे ३०७ मिलियन - तीस कोटी सत्तर लाख- वर्षं. स्वारोचिष मनु हा दुसरा, सध्या सातवा चालू आहे. म्हणजे साधारण दीड अब्ज वर्षांचा हिशोब येतो... कदाचित पावणेदोन अब्जही असेल. फरक फारसा महत्त्वाचा नाही.

मला वाटतं कोणीतरी, कुठेतरी एवढ्या प्रचंड कालावधींचा काहीतरी हिशोब मांडून ठेवला. एक मन्वंतर म्हणजे ३०७ मिलियन ऐवजी त्याच्या हजारपट कमी लिहून ठेवलं असतं तर 'डार्विनने जे सांगितलं ते आधीच आमच्या ग्रंथांत सांगितलं आहे' वगैरे म्हणण्याची सोय झाली असती. दुर्दैवाने त्यांना सत्याशी झगडा देण्याची पाळी येते. मला त्यांच्याबद्दल थोडी सहानुभूती वाटल्यावाचून रहात नाही.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

वरचा फोटो

वरचा फोटो कुठला आहे? समोरचे देऊळ आणि मागल्या घुमटधारी वास्तु?

वरचा फोटो

जेजुरगड, श्रीक्षेत्र जेजुरी

जेजुरी

सॉरी! पुन्हा विचारते - तसे देऊळ जेजुरी आहे हे कळले होते पण मागल्या मनोरेवाल्या घुमटधारी वास्तुसुद्धा देवळाच्या आहेत की मशीद वगैरे आहे? वास्तु वेगळी वाटली म्हणून विचारते.

वरचा फोटो

आत्ता जे मंदिर दिसत आहे ते सोळाव्या शतकातील बांधकाम आहे. मंदिराच्या बांधकामातील शिलालेखावरून सदरेचे बांधकाम राघो मंबाजी खटावकर यांनी केले आहे. हे खटावकर आदिलशाही मध्ये सरदार होते, आणि त्यांचा शहाजी महाराजांना अटक करण्यामध्ये बाजी घोरपडे यांच्याबरोबर सहभाग होता. साहजिकच बांधकामावर मोगल शैलीचा प्रभाव दिसून येतो. येथे दोन शिखरे दिसतात त्यातील पुढील शिखर आहे मुख्य मंदिराचे, ते घुमटाकार असून त्याच्या बाजूला चार मिनार आहेत. पाठीमागच्या बाजूला जे शिखर दिसते ते पंचलिंग मंदिराचे आहे. येथे मशीद नसून फक्त मंदिरच आहे.

धन्यवाद!

चांगली माहिती सांगितलीत. मला नवीन होती.

आपल्याकडे आणखी माहिती असल्यास आख्यायिका, रिवाज, इतिहास वगैरे तर तीही द्यावी.

जेजुरी

आपणास हवी असलेली सर्व माहिती संकेतस्थळावर दिलेली आहे त्याव्यतिरिक्त आपणास आणखी माहिती हवी असल्यास जरूर कळवा......
धन्यवाद !

काही समज काही गैरसमज!

हा लेख व यातील प्रतिसाद वाचून मला येथे भाग घेता येत नव्हते. कारण या विशयाबाबत मला काहिच माहित नाही. पण श्री. चंद्रशेखर वरील प्रतिसादात भारतीय शास्त्र खोटे म्हणत आहेत. हे मला पटत नव्हते. तसेच योगायोगाने मी ब्राह्मी लिपी व त्याआधी च्या लिपी विशया संबंधित एका लेखाचा अभ्यास करताना माझी अभ्यासाची गाडी (रखडत-रखडत) चालताना एका माहिती ठिकाणी अडली. त्या वाक्यांचा अर्थ मला काहीच कळला नाही. ती वाक्ये ह्या लेखातील चर्चेशी योगा-योगाने संबंधित आहेत असे वाटते. हा लेख प्रो. बाकबिहारी चक्रवोर्ती यांचा आहे. त्यात मला (अनेक) नकळलेल्या वाक्यांपैकी काही वाक्ये जशीच्या तशी टंकत आहे. कुणाला त्याचा अर्थ कळला तर मला ही समजवावा हि विनंती! --
Implications of Comparative Study of Scripts:
The Bharatiya tradition is a contiuous one since coming of this indigenous society which follows the Puraanas and Vedas. As its time of coming into being is unascertainable, it is called to be of divine origin - a creation of Svayambhu Brahma. Satapatha Brahmana (2.1.2.13-17) states that yajna was once performed when vernal equinox was at Chitra, thus making the antiquity of Yajna as 12,500 B.C. and the society still earlier.
But script came after years, may be millenniums after coming of a language. According to Bharatiya tradition the origin of script goes back as 32nd century B.C.
ह्याच लेखात आर्य भारतात बाहेरून आले हा चूकीचा आधार मानल्यामुळे व भारतीयांचाच स्वतःच्या संस्कृतीचा, लिप्यांचा अभ्यास पद्धतशीरपणाचा नसल्यामुळे पाश्चात्य जे म्हणतात तेच योग्य वाटते.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

^ वर