उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
स्वर्गरहस्य ......हे पुस्तक कुणाच्या पहाण्यात आहे काय ???
ईश आपटे
April 9, 2011 - 5:19 am
नाव-स्वर्गरहस्य
लेखक- खरे किंवा दुसर काही नाव ही असेल
प्रकाशक- व्हीनस प्रकाशन , पुणे
मी प्रकाशकांकडे चौकशी केली , पण त्यांनी ते आउट ओफ प्रींट असल्याचे सांगितले... माझ्या नेहमीच्या ग्रंथालयातुन जे १०० वर्षे जुने आहे..., ते पुस्तक कोणी नतद्र्ष्टाने पळवळले आहे...
कृपया कुणाला ह्या पुस्तकाबद्दल माहिती असल्यास कळवावी किंवा कुणाकडे असल्यास सांगावे..........
दुवे:
Comments
वरदा बुक्स
वरदा बुक्स चे ह अ भावे यांचेकडे चौकशी करा.
अधिक माहिती
प्रकाश घाटपांडे
चिंतातुर जंतू
ते तर आहेच. हे पुस्तक आधुनिकोत्तर दिसते आहे. त्यामुळे ह्याबाबत चिंतातुर जंतू ह्यांना विचारावे. ते हे ह्या विषयातले मर्मज्ञ आहेत.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
वा, मर्मज्ञ
मर्मज्ञ. हा शब्द खूप दिवसांनी वाचला. बरं वाटलं. या शब्दाविषयी आणि एकंदरीतच अशा दुर्मिळ शब्दांविषयी लिहिणं इथे अवांतर होईल कदाचित, पण क्षमस्व. सहजच म्हणून थोडासा अवांतर प्रतिसाद लिहित आहे. सध्या मुद्दा आठवला म्हणून आणि भविष्यात गरज पडल्यास वापरता यावा म्हणून. संपादकांना हे अवांतर वाटलं तर कृपया उडवावं. मीच जर संपादक असतो तर हे वाक्य लिहायला मला निश्चितच अधिक मोकळेपणा वाटला असता, पण मी संपादक नाही. असो.
मराठी भाषेत अनेक असे शब्द आहेत जे आपण बोली भाषेत वापरत नाही, पण तरीही ते भाषेला समृद्ध करतात. मर्मज्ञ हा असाच एक शब्द. बोलताना आपण फारतर जाणकार असं म्हणू. कदाचित मराठीविषयी फार आस नसेल तर नॉलेजेबल असाही शब्द वापरू. पण मर्मज्ञ मध्ये जो एक नेमकेपणा आहे तो जाणकार व तत्सम इतर शब्दात नाही. हा मर्मभेदी शब्द आहे. असा शब्द म्हणजे मायमराठीच्या मर्मबंधातली ठेवच. मर्मज्ञवर विचार करताना का कोण जाणे, मुमुक्षु हा शब्दही आठवला. मकाराचा द्विकार सोडला तर त्यांत काही साम्य नाही असं वाटेल. पण खरं तर आहे. दोन्ही शब्दात एकाच स्वराच्या त्रिकाराने त्या शब्दांना एक लय प्राप्त होते. दोन्ही शब्द बोली भाषेतही फारसे वापरले जात नाहीत.
असो. मर्मज्ञ शब्दाची आठवण करून दिल्याबद्दल धम्मकलाडूंचे आभार.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
मी सूध्दा या पूस्तकाच्या शोधात आहे.
कोणाकडे त्याची प्रत असल्यास कळवावे, अथवा कोठे ऊपलब्ध होइल याची माहीती झाल्यास इथे नमूद करावे ही वीनंती.
अवांतर. :- प्रथम हा धागा वाचताना पट्टदीशी आयर्वीन वॅलेस चे तरूणांना(व इतरांना) अत्यंत मार्गदर्शक असलेलं जगप्रसीध्द पूस्तक स्वर्गीय शैय्या (सेलेस्टियल बेड) ची वीचारणा होत आहे काय असे वाटले.
नै राव.
असे कोणते पुस्तक आपल्या पाहण्यात नै राव. पण पुस्तक नसले तरी 'स्वर्गरहस्याची' चर्चा टाकायला हरकत नाही.
मरणानंतर माणसाचे काय होत असेल बॉ ? अशा अद्भुत जगाविषयी-चर्चांविषयी मला लैच कुतूहल आहे.
-दिलीप बिरुटे
प्रयत्न
प्रयत्नांनी परमेश्वर. प्रयत्न करुन पहा, उत्तरेच काय अनुभव सुद्धा मिळातील, असे म्हणतात. ;-)
-Nile
एक दिन तो सब को....
भगवान श्रीकृष्ण म्हणतात-
जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च ।
तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि ।।२७।। (चोप्य-पस्ते)
जो जन्मला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि जो मृत झाला आहे त्याचा जन्म निश्चित आहे. म्हणून तुला कर्तव्यकर्माचे पालन टाळता येत नाही. अशा परिस्थितीत तू शोक करु नकोस. त्यामुळे एक ना एक दिवस आपल्या सर्वांना जुनी वस्त्रे टाकून नवी वस्त्रे धारण करावी लागणार आहेत. आणि आपल्या शरीरातील जीवात्मा अद्भुत अशा सृष्टीतील अनुभव घेण्यास विहार करणार आहे. पाताळ म्हणजे अमेरिका असा शोध लावणारे महर्षी वर्तकाच्या अभ्यासावरुन स्वर्ग नावाचा एखादा ग्रह किंवा सृष्टी असूही शकते असे वाटायला लागला आहे.
नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः!
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः
जीवात्म्याला शस्त्रांनी कापता येत नाही. अग्नी आत्म्याला जाळू शकत नाही.आत्म्याला पाण्याने भिजवता येत नाही. इ.इ. भगवान श्रीकृष्ण म्हणतात जीवात्मा नेहमी टीकणारा, सर्वव्यापी,न बदलणारा,शाश्वत असा आहे. असो, त्यामुळे माणसाचे मरणानंतर काय होते.स्वर्गात जाण्याचा मार्ग कोणता ? स्वर्गापेक्षा मर्त्य लोक बरा का ?वगैरेचे आपल्याला बॉ लैच कुतूहल आहे.
साला एका शेर आता आठवेना. ''हर सांस सांस पर लिखा है मरनेका...न जाने कोनसी सांस कहा रुक जाये'' वगैरे. सारांश असा की कधी तरी आपला श्वास थांबून जाणार आहे. त्यामुळे आपापले सर्व अहंकार टाकून दिले पाहिजे. कोणीतरी म्हटलं आहे- ''जन्मासोबत श्वास आला. श्वासासोबत शब्द. मरणानंतर श्वास जाईल कुठे जातील हो शब्द'' शब्द फार तर संपादित होतील म्हणा.;) पण हा श्वास पुढे कुठे जाईल याचीही लै उत्कंठा मला आहे. :)
-दिलीप बिरुटे
[ह.भ.प]
वा!
हभप दिलीपराव,काय जबरदस्त निरुपण केलंत हो. सेवानिवृत्तीनंतर तुम्हाला मरण नाही...आपलं..तुमच्या व्यवसायाला हो...राम शेवाळकरांसारखे रसाळ निरुपण करत आपला चरितार्थही चालवू शकाल.
मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही..अशी आपल्यामध्ये एक म्हण आहे...तेव्हा एकदा मरून पाहा...आणि तिथून थेट भ्रमणध्वनीवरून आम्हाला कळवा...तिथे नेमके काय काय चालतं. ;)
(कृहघेहेवेसांनलगे.)
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
:)
>>>>हभप दिलीपराव,काय जबरदस्त निरुपण केलंत हो.
नै नै. कसलं काय... आपलं सहज असं. :)
>>>>एकदा मरून पाहा...आणि तिथून थेट भ्रमणध्वनीवरून आम्हाला कळवा...तिथे नेमके काय काय चालतं. ;)
हम्म, दिला का विषय मला निरुपणाला. ;)
स्थूल देह आणि सूक्ष्म देह याबद्दल लोकांनी अध्यात्माच्या पातळीवर असलेला फरक समजून घेतला पाहिजे. स्थूल (जाड नव्हे) देह सोडून जेव्हा सूक्ष्म देह पंचमहाभूतांची भटकंती करायला निघतो तेव्हा सूक्ष्म देह स्थूल देहाकडे पाहात असतो. सूक्ष्म देहाची अडचण अशी असते की, त्याला बोलता येत नाही. स्पर्श करता येत नाही. स्पर्श केला तरी तो जाणवत नाही. मात्र रेडियो लहरीप्रमाणे काही संकेतांची देवान-घेवाण होत असावी असे वाटते. बाकी, सूक्ष्म देहांच्या जगतात काही तांत्रिक प्रगती अधिक असेल किंवा नसेल त्याबाबतीत मला काही माहिती नाही. त्यामुळे मरणानंतर मला आपल्याशी संपर्क करता येणार किंवा नाही त्याबाबत मी जरा साशंक आहे. दिलगीर आहे. ;)
-दिलीप बिरुटे
पुस्तक मिळाल्यास मलाही कळवावे...
मला रहस्यविषयक पुस्तके खूप खूप आवडतात.
बाबूराव अर्नाळकर, गुरुनाथ नाईक, भा. रा. भागवत, एनिड ब्लॉयटन, आयर्विंग वॉलेस यांची पुस्तके आवडीने वाचतो.
अलिकडेच चंद्रशेखर यांचे सोन्याच्या खजिन्यांचे रहस्य वाचून आपल्यालाही असा खजिना सापडल्याची स्वप्ने वारंवार पडतात.
स्वर्गरहस्य कोणी लिहिले आहे? अप्सरा, यक्षिणी याविषयी काही अभ्यासपूर्ण माहिती त्यात मिळेल का?
पुस्तक मिळाल्यास मला कळवावे.
अप्सरा, यक्षिणी ?
अप्सरा, यक्षिणी याविषयी (व त्यांच्या साधना वीशयी ) माहीती हवी असेल तर रावणसंहीता नावाचे पूस्तक वाचा (लेखक पं कीसनलाल शर्मा).
हेच का ते रावणसंहिता पुस्तक?
उत्तम व प्रभावी पुस्तक आहे हे ...रावणसंहिता
गेल्या १०० वर्षातील महाराष्टातील वैचारिक वाड्मयापेक्षा हे पुस्तक चांगले आहे. जाता जाता केतकरांचे (ज्ञानकोशकारांचे, इतर केतकर नव्हेत) मराठी साहित्या विषयी असेच काहीसे वाक्य आठवले.
आपटे गोंधळ
आपटे गोंधळ !
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
हाहाहा
आपटे सर तुम्ही प्रचंड विनोदी आहात बुवा! मजा आली. हाहाहाहाहाहाहाहा
चन्द्रशेखर
सर?
आपटे विनोदी आहेत याच्याशी +१ पण ते "सर"ही आहेत? ;-)
प्रा. डॉ. आपटे ?
सहमत.
आपटे प्रा. डॉ. ?
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
सर
सर ही उपाधी मी अतिशय आदरभावाने वापरली आहे.
चन्द्रशेखर
पूस्तकाचे थोडे नाव वेगळे वाटते आहे, व कव्हरचे चीत्र सूध्दा
म्हणून नीश्चीत सांगता येणार नाही कारण ते पूस्तक अत्यंत जाड आहे (अंदाजे ३ इंच जाड) व त्यावर मूळश्लोकांसहीत असेही काहीतरी लीहले आहे, हे पूस्तक दोन भागात वीभागले आहे पहीला भाग हा रावणाचे आत्मचरीत्र असलेला आहे, पूस्तकातील् एकूण पानांच्या संख्येच्या नीम्मी पाने केवळ या चरीत्रासाठी वापरली आहे, व दूसर्या भागात सर्व तंत्र मंत्र साधना, अप्सरा व यक्षींणी, ज्योतीष्, आयूर्वेद वगैरे वीषयांबाबत वीस्तृत वीवेचन आहे. कींमत कीमान ५५० असावी, माझ्या वाचनात काही वर्षांपूर्वी आले होते ते तेव्हां त्यावर छापील कींमत ५०० होती.(हे पूस्तक संस्कृत+हींदी मधे आहे,संस्कृत+मराठी न्हवे)
प्रक्षिप्त?
हा फोटो मोबाईलमधून प्रक्षिप्त केल्यामुळे कदाचित असा वेगळा असेल.
आहो हे ते पूस्तक नाहीये हो :)
केवळ फोटोवर जाऊ नका, पूस्तकाबाबत मी ज्या इतर गोश्टी वर्णन केल्या आहेत त्या पण लक्षात् घ्या. मलातरी सदरील पूस्तक मराठीमधे वाटत आहे, लहान आणी अपूर्ण दीसत आहे. त्यामधे फार वीवेचन नसणार अशी खात्री आहे.
अवांतर :- आपण माझी गंमत करत नाहीयेत ना ? बादवे तूम्ही कशाला अप्सरा, यक्षीणीं साधनांच्या माहीतीमागे धावत आहात ?