शुकसारिका


ग्रंथ परिचय - शुक-सारिका

shuksarika

वरदा बुक्सचे प्रकाशक ह अ भावे यांच्या दरबारी आमची हजेरी अधुन मधुन असतेच. आजच बसलो होतो. त्यांना आंतरजालीय वाद व गमतीजमती याबाबत गप्पा मारत माहिती देत होतो. तेवढ्यात त्यांना पुस्तक मागणीचा फोन आला.ग्राहक अधिक माहिती विचारत होता. "शुक म्हणजे पोपट, सारिका म्हणजे मैना. ....." भावे नीरगाठउकलतंत्राने फोड करुन फोनवर सांगत होते
तोता मैना कि कहानी तो पुरानी हो गय़ी! आता मला सांगा जुन्या बाटलीत नवी दारु घ्यायला आवडेल कि नव्या बाटलीत जुनी दारु घ्यायला आवडेल. ओ काय लावयल! पहिली बाट्ली फोडा दारु महत्वाची. हॆहॆहॆ आता कसं बोल्लात! चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आल असेलच ही शुकसारिका म्हणजे काय?
हम बेवफा हरगीज ना थे ! पर हम वफा करना सके। पुरुष बेईमान कि स्त्री चारित्र्यवान हा वाद आंतरजालावरही जुना आहे व जालाबाहेर ही जुनाच आहे. हा विषय काही क्षणाची सोबत नसुन अनंत काळची सोबत आहे. जालकरी स्त्री पुरुषांना चघळायला तो आवड्तो. काहींना झाडावर बसुन पहायला आवडतो. संस्कृत साहित्यात या वादाविषयी अनेक पुस्तके प्रसिद्ध व लोकप्रिय आहेत. त्यापैकी शुकसारिका या संस्कृत ग्रंथाचा अनुवाद हिंदीत तोता- मैना नावाने फारच लोकप्रिय आहे मुख्यत: या प्रेमाच्या कथा आहेत व प्रेमात शृंगाराला महत्व आहेच. त्यामुळे काही शृंगारकथा या अश्लिलते कडे झुकलेल्या असतात हा आक्षेप असतोच. चटपटीत करताना हिंदी रुपांतरात देखील तसे घडलेले आहेच. मुळ संस्कृत साहित्यात श्लील अश्लिल असा भेदच नाही. सर्व काही स्पष्ट आणि उघड असते. परंतु मराठी अनुवादात हा संयम पाळला आहे. कुटुंबात वाचण्यायोग्य होईल याची काळजी घेतली आहे.
या तेवीस कथात एक कथा सारिका सांगते व त्याला उत्तर म्हणुन शुक चारित्र्यहीन स्त्रीची कथा सांगतो. अशी ही कथांची प्रश्नोत्तरे या तेवीस कथात चालू असतात. शेवटच्या कथेत शुक आणि सारिका यांचे एकमत होते व ते सुखाने संसार सुरु करतात.
मूळ पुस्तक हे संस्कुत असल्याने प्राचिन भारतातील समाजजीवनाचे प्रतिबिंब त्यात पहायला मिळते. शेकडो वर्षांपुर्वीचा भारतीय समाज कसा होता याचेही दर्शन या कथातुन होते. या कथांचा समाजाशास्त्रीय अभ्यास कुणी केला नसावा. या कथेत राजे राण्या प्रधान व प्रधानपुत्र श्रेष्ठी व व्यापारी, नर्तिका व नायिका, साधु व दरोडेखोर अशी नाना प्रकारची व्यक्तिचित्रे आढळतात.
प्रस्तावनेत ह.अ. भावे म्हणतात," संस्कृत साहित्यात शुकबहात्तरी व कोकोलाछत्तिशी असे अर्थ असलेली दोन पुस्तके उपलब्ध आहेत परंतु मला एक शुकसारिका असे नाव असलेले हस्त लिखित प्राच्यविद्या संस्थेत पहायला मिळाले."
" शुकसारिका हे संस्कृत पुस्तक ही मूल तीनचार संस्कृत ग्रंथांवर आधारित आहे. यातील मूळ कथा जनसमुहात प्रचलित असलेल्या लोककथाच आहेत.भारतीय संस्कृतीत फार पुर्वीपासून कथाकथन होते. त्या कथाकथकांची जमात विसाव्या शतकापर्यंत कथाकथन करुन उदरभरण करणारी आढळली आहे. या चित्रकथीजवळ एक पेटी असते व त्यातील चित्रे दाखवत ती कथा सांगतात असे चित्रकथील मी स्वत: लहानपणी पाहिले आहे"
या कथा चिरतरुणांची मन रिझवतात व चारित्र्य संपन्नतेचे ही महत्व पटवतात किमान तसा प्रयत्न करतात. आताच्या काळात चारित्र्य संपन्नता गोष्ट जरा अवघडच बनत चाललीय असो. कथेची नावे मोठी मजेशीर व सूचक असतात.
उदा. श्रेष्ठीपुत्र श्रीयाळ व भंगीकन्या; मदनपाल, कुत्रा व हिरामण पोपट; राजकन्या पद्मावती व साधु विद्यानंद सरस्वती; नीतिसेन विमला व प्रेमलता.
असो एवढा परिचय बास झाला.
पुस्तकाचे नांव- शुक-सारिका
संपादक - प्रकाशक:- ह. अ. भावे; वरदा प्रकाशन प्रा.लि ३९७/१ सेनापती बापट मार्ग पुणे 411016
फोन 25655654 ईमेल पत्ता- नाही
पृष्ठे- २१६ मूल्य- १५०/- (एकशे पन्नास फकत)

Comments

हम्म!

शुकसारिका असो किंवा अरेबियन नाईट्स (अरेबियन नाईट्सचा उगम तोता मैनाच तर नसावा) बर्‍याचशा कथा या स्त्रिया बेईमान आहेत हे दाखवणार्‍या आहेत.

शुकसारिकेत कथांची सुरुवात याच कारणास्तव होते की आपल्या मालकाची बायको, मालकाच्या गैरहजेरीत प्रियकराला भेटण्याचा बेत ठरवते तेव्हा तिला त्यापासून परावृत्त करण्यास शुक गोष्टी सांगत जातो.

अरेबियन नाईट्समध्ये शहरजादी शहरयारने आपला शिरच्छेद करू नये आणि त्याचा बायकांवर विश्वास बसावा म्हणून गोष्टी सांगत जाते. अरेबियन नाईटस् चे मूळच बायकांच्या बेईमानीवर आधारीत आहे. त्यातील कोळी व जीनची गोष्टही स्त्रियांची बेईमानी दाखवते.

दोन्ही कथांची मांडणी कथेत - कथा, त्यात आणखी एक कथा अशी केलेली आहे.

या तेवीस कथात एक कथा सारिका सांगते व त्याला उत्तर म्हणुन शुक चारित्र्यहीन स्त्रीची कथा सांगतो.

हे असे आहे का? माझ्यामते व्यापारानिमित्त बाहेर गेलेल्या व्यापार्‍याची बायको आपल्या प्रियकराला भेटायला इतकी उतावीळ असते की ती तिला रोखू पाहणार्‍या मैनेची मान मुरगळून टाकते. पोपट शहाणा असतो तो तिला सरळसोट परावृत्त करून आपला जीव धोक्यात टाकत नाही परंतु गोष्टीरुपाने तिला बोध देतो आणि सकाळपर्यंत रोखून धरतो.

असो. हे वरील पुस्तक मुलांसाठी आहे की मोठ्यांसाठी? असे साहित्य विस्मृतीत जाऊ नये म्हणून केलेले प्रयत्न वाखाणण्यासारखे आहेत. तरी, तत्कालीन समाजाचे दर्शन त्यात घडते किंवा कसे हे कळत नाही कारण या कथा मुखे-परमुखे शेकडो वर्षे चालल्याने त्यात काळानुसार बदल झाले असावेत. शुकसप्ततीचे अकबराच्या दरबारी तुतीनामा असे फारशी भाषांतर केले गेले होते. त्यात गोष्टी जशाच्या तशा राहिल्या की त्यांचे मुघलसंस्कृतीत ट्रान्सफॉर्मेशन झाले हे माहित नाही.

अरेबियन नाईट्स या त्यामानाने जुन्या गोष्टी. त्याही भारतीय लोककथांवरून प्रेरित असल्याचे सांगितले जाते. शुकसारिकाच तर त्यांचे मूळ नाही ना? :-) दोन्ही कथांमध्ये, घराबाहेर असणार्‍या नवर्‍यांना आपल्या अपरोक्ष पत्नी काय उद्योग करत असावी अशी चिंता पडत असावी. शेवटी काय आहे की माणूस स्वतःवरून इतरांना जोखतो. ;-)

तोता-मैना, राघू -मैना

शुक सारिका (प्रमाणीकरण) हे नाव वाचताच तोता मैना या पुस्तकाची आठवण झाली. शृंगार वर्णनांनी ओतप्रोत असलेले (उदा. राजकुमारीचे सौंदर्य पाहून तो तत्क्षणी घायाळ झाला व मृच्छा येऊन पडला) हे पुस्तक पूर्वी कोठेतरी वाचलेले आठवते. याबद्दल अजून कुणाला काही माहिती आहे का?

 
^ वर