युयुत्सु - गाधांरी पुत्र !

हा कोण होता ?
गाधारीपुत्र ... पण हा पाडंवांच्या बाजूने महाभारतामध्ये होता अशी माहीती मला आजच भेटली.

युयुत्सु ला व्यास ह्यानी सांगीतले होते की जेथे सत्य आहे तेथेच विजय आहे , भगवान कृष्ण आहे तेथेच विजय आहे व तो ह्या कारणानेच पाडवांच्या बाजूने महाभारतामध्ये लढला होता....

पण ह्याच्या अतिरिक्त ह्या युयुत्सु ची काही ही माहीती मला भेटली नाही, जर कोणाकडे असे तर यथे द्यावी.

राज जैन

लेखनविषय: दुवे:

Comments

आत्महत्या

आताच नवीन माहीती हाती आली ... आत्महत्या ह्याने आत्महत्या केली होती, कृष्ण मृत्य पुर्वीच !

राज जैन

काहीतरी करावे हा विचार मनात असणे म्हणजेच तुम्ही जिवंत आहात ह्याचे लक्षण आहे !!! काय म्हणता !

जिजीत्सू

जैन साहेब,

जिजीत्सू ही जपानी समजली जाणारी हाणामारीची संकल्पना युयुत्सू ने काढली असावी का?
की युयुत्सू हा देखिल जपानीच होता?
महाभारताची व्याप्ती ग्रीस पासून जपान पर्यंत पसरली असावी का?
वेद कालीन पुरावे जिजीत्सू विषयी कोणती माहीती देतात?

आपल्या ह्या एका प्रस्तावाने अश्या अनेक माहितीपूर्ण प्रश्नांनी डोक्यात थैमान घातले आहे!

-(आपली, दुसर्‍यांची ,सर्वांची पाळं मुळं मुळापासून खणून काढून त्याचं लोणच घालण्यासाठी माहितीच्या शोधात ज्ञान लालसेने झपाटलेला)
वरूण

मराठी संकेतस्थळांवरील संपादन/व्यवस्थापन पारदर्शक असावे ह्याचे मी समर्थन करतो.

वांग्याची भाजी आणि लोणचं

वरुण महाराज,
त्या पाळंमुळांच लोणचं कसं झाले ते संगा मात्र. आम्ही सध्या पुराणातल्या वांग्याची भाजी करुन खावी म्हणतोय ! कोणी भाकरी शोधून काढली तर मस्त मेजवानी होईल :)
-- (बकासूर) लिखाळ.
आमच्या नावातील ळ थेट वैदिक काळातील आहे; त्याचा उच्चार आजच्यासारखाच होता की नाही याचा निर्णय होत नाहिये :)

हा विनोद समजावा की

हा विनोद समजावा की टवाळकी ?
टवाळकी असेल तर वरूण साहेब तुमच्याकडुन ही अपेक्षा नाही जर ईतर चर्चेचे महत्वाचे विषय (?) चालतात तर वरील विषय काय वाईट आहे मी माहीतीच मागीतली आहे... ;)

जर विनोदाचा भाग आहे तर ...... :))))

तुमच्या उत्तरानंतर प्रतिसाद दिला जाईल.

राज जैन

काहीतरी करावे हा विचार मनात असणे म्हणजेच तुम्ही जिवंत आहात ह्याचे लक्षण आहे !!! काय म्हणता !

धर्मवीर भारती

धर्मवीर भारती हे हिंन्दी साहित्यातील नावाजलेले नसले तरी जनसामान्याना माहीत असलेले लेखक त्यांची कथा / नाटक " अंधायुग " आज माझ्या एका मित्राला महाजालावर भेटली व त्याने मला वरील माहीती दिली होती शक्यतो उद्या पर्यंत मी तो दुवा देखील देईन जेथे हे पुस्तक आहे.

धन्यवाद.

राज जैन

काहीतरी करावे हा विचार मनात असणे म्हणजेच तुम्ही जिवंत आहात ह्याचे लक्षण आहे !!! काय म्हणता !

याबद्दल

या युयुत्सु बद्दल अधिक माहिती ऐकण्यास उत्सुक आहे.
(गुगुल वर हे युयुत्सु टंकित केल्यावर कोणत्यातरी जपानी कार्टून मधील पात्रे दिसली)

--लिखाळ.

आमच्या नावातील ळ थेट वैदिक काळातील आहे; त्याचा उच्चार आजच्यासारखाच होता की नाही याचा निर्णय होत नाहिये :)

मी देखील

महाभारत मी मराठी मध्ये व हिंदीमध्ये वाचले आहे पण मला वरील व्यक्ती कोठेच भेटला नाही.. गुगलबाबाची मदत मी देखील घेतली होती पण काही हाती नाही लागले... पण मराठीमध्ये शोध घेतला व खाली प्रतिसादामध्ये नोंद केली आहे की काय भेटले ते :)

शोध घेत आहे पाहू काय मिळते ते :)

राज जैन

काहीतरी करावे हा विचार मनात असणे म्हणजेच तुम्ही जिवंत आहात ह्याचे लक्षण आहे !!! काय म्हणता !

हा

हा..मी मराठीमधून शोध घेतला नाही हे खरेच. मी ते विसरुनच गेलो होतो.

पाहू काही नवी माहिती मिळते का ते..मी अजून युयुत्सुंनी दिलेले दुवे पाहिले नाहीत. आता वाचावे म्हणतो.
--लिखाळ.

पाळामुळांच्या लोणच्याचे चाहते आणि पुराणातल्या वांग्याच्या भाजीचे वाढपी.

पंगत

पाळामुळांच्या लोणच्याचे चाहते आणि पुराणातल्या वांग्याच्या भाजीचे वाढपी.

लिखाळराव सगळे लिखाण सदस्यां सकट जात चालले आहे पंगतींकडे!
(सदैव भुकेला)
गुंडोपंत

~ उपक्रम वयाने वाढावे ह्याचे मी समर्थन करतो!
म्हणजे काय?
म्हणजे 'वय वर्षे १८ अधिक' अशा समूहा चे वावडे उपक्रमाला का असावे बरं? ~

महाराष्ट्र टाईमचा उल्लेख

अंधायुग बाबत
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3787083.cms
येथे आहे.

युयुत्सु बद्दल महाराष्ट्र टाईमचा उल्लेख उल्लेख

युयुत्सु या सर्वांपासून वेगळा वाटतो. पण हा एकशेएकावा कौरव पांडवांच्या बाजूने लढून , विजय प्राप्त करूनही व्यक्तिगत पातळीवर पराभूत ठरतो. पांडवांच्या राज्यात त्याला अपमानित केलं जातं तर स्वत:च्या जन्मदात्यांकडून तो दूर लोटला जातो. आत्महत्या हेच त्याचं भागधेय ठरतं. महाभारतातल्या प्रमुख नसलेल्या या व्यक्तिरेखांच्या आधारे धर्मवीर भारतींनी भविष्याचा वेध घेतला आहे

राज जैन

सुचना : गुगलबाबाचा वापर मराठी करता करताना मराठी मध्येच शोध ह्या योग्य जागी पोहचाल नाहीतर कार्टूनाजवळच पोहचाल :))))
ह्. घ्या.

राज जैन

काहीतरी करावे हा विचार मनात असणे म्हणजेच तुम्ही जिवंत आहात ह्याचे लक्षण आहे !!! काय म्हणता !

माझे एक मत !

मी पुराण व देव , वेद, रामायण, महाभारत सत्य आहे असेच मानत नाही पण
हे सत्य नाहीत ह्याचा देखील आपल्याकडे काहीही पुरावा नाही आहे.
तेव्हा आनंद लुटणे एक गोष्ट व निंदा-नालस्ती करणे एक गोष्ट .......... ईतिहास हा नेहमीच खरा लिहलेला नसतो... मागे मी मनोगतवर लिहले होते की ईतिहास म्हणजे विजेत्याने लिहलेली आपली स्वतःची कहाणी काही सत्य तर काही काल्पनीक ......पण ह्याचा अर्थ असा नाही की उठावे व वांग्याची भाजी करावी अथवा पाळेमुळे खोदावीत..... कारण तुम्ही किती ही खोल खोदलेत तर तुम्हाला काहीच मिळणार नाही.. कारण काळ! ह्या गोष्टीला खुप काळ निघून गेला आहे.... काहीच पुरावा कोणाकडे ही नाही.

माझे म्हणणे चुकीचे असू शकते.... पण वाचनाचा आनंद तर देत आहे ना ?

चक्र ह्याचा शोध कोणी लावला व का ह्याचे उत्तर कोणाकडेच नाही आहे ..... म्हणून आपण चक्र नाकारावे का ? पुराव द्या ...पुरावा द्या..... कुठे कुठे पर्यंत पुरावा मागणार आपण .. नासाच्या मागील काही संशोधनातून असे काही भेटले की ज्याला आपण दैव / देव / भविष्य मानायचो तो शनी, तो बुध तो मंगळ फक्त एक ग्रह आहे पण का त्यामुळे आपल्या भारतात / जगात भविष्य दुकाने बंद पडली नाही ....... जोमाने चालली का ? ह्याचा पुरावा हुडका ना ? (कालपरवा झालेला भारतातील अती-महत्वाचा विवाह अ.ब. ह्यांचा का थांबला होता... त्या मंगळामुळेच ना? मग )

तुम्ही आम्ही (जुने मनोगती) ज्यानी सर्वसाक्षी ह्याचे देशभक्तीपर लेख वाचले आहेत व भरभरुन प्रतिसाद दिला आहे पण शालेय पुस्तकामध्ये तो ईतिहास आम्हाला - तुम्हाला कधी शिकवलाच गेला नाही का ? तर जसे वर मी लिहले आहे ईतिहास हा नेहमी विजेताच लिहतो....

तेव्हा ईतिहास कालीन अथवा वेद कालीन चर्चेमध्ये असे वेडेवाकडे प्रतिसाद देण्यापेक्षा तुम्ही गुगल / याहू / अस्तालाविस्ता ( हाहा हा दुवा http://www.altavista.com/ ) ह्या संस्थेचा वापर करा.. काही महत्वपुर्ण भेटले तर येथे लिहा अथवा चर्चा पाहत व वाचत राहा... त्याला कोणाचीच हरकत नसेल, माझे ही काही असेच लेख एक ही प्रतिसाद न भेटता मरण पावले आहेत त्यामध्ये एकची अजून एक भर असे मी समजेन, पण एखादा नवीन लेखक प्रयत्न करुन काही लिहण्याचा प्रयत्न करत असेल व त्याला असे वाटले की नाही माझ्या लेखनाची टवाळकी केली जाते / विनोदाचा भाग बनवला जातो ... तो पुन्हा लिहीलच ह्याची देखील शंका येते. असे होऊ नये ह्यासाठी हा प्रतिसाद.

मला कोणाला ही प्रतिसाद कसा द्यावा / कसा देऊ नये अथवा काय लिहावे व काय लिहू नये हे शिकवायचे नाही आहे ना ती माझी पातळी पण माझा प्रतिसाद व्यक्तिगत स्वरुपामध्ये घेऊ नका ही विनंती.

* वरुण व लिखाळ साहेब , वरील लेखनामध्ये तुमच्या प्रतिसादातील काही गोष्टी उचलल्या आहेत पण त्याचा वापर वार करण्यासाठी नसून फक्त संदर्भ म्हणून वापरले आहेत. तेव्हा प्रतिसाद व्यक्तिगत घेऊ नका ही विनंती.

राज जैन.

काहीतरी करावे हा विचार मनात असणे म्हणजेच तुम्ही जिवंत आहात ह्याचे लक्षण आहे !!! काय म्हणता !

साहेब,

ते आम्हाला माहीत आहे हो त्याच साठी आम्ही " हाहा हा "
करत हसलो होतो तेथे :))))) हा हा हा !

क्ष-सदस्य

काहीतरी करावे हा विचार मनात असणे म्हणजेच तुम्ही जिवंत आहात ह्याचे लक्षण आहे !!! काय म्हणता ! ----------------- ह्यासाठीच आम्ही राजीनामा दिला आहे उपक्रमचा....उपक्रम आम्हाला काही करुच देत नाही आहे काय करावे.....राज जैन

तळ टिप : सध्या आम्ही काही मित्रांना प्रतिसाद देण्यासाठीच वावरत आहोत

निषेध !

ह्याच्या आधीही उपक्रमरावानी (अथवा सहसंपादकानी) माझे लेखन नष्ट केले आहे पण ह्याचा मी राग कधीच मानला नाही कारण संस्थळासाठी असलेले सर्व-सामान्य नियम आम्हाला माहीत होते व तेथे आम्ही चुकीचे होतो त्यासाठी लेखन नष्ट केले गेले होते पण
श्री वरुण ह्याना मी जो उपप्रतिसाद दिला होता तो माझ्या नजरे समोरच नष्ट केला गेला आहे व तो उपप्रतिसाद ह्या चर्चेच्या जागी महत्वपुर्ण होता पण त्याचे भान न ठेवता मनमानी कारभाराने उपक्रमने माझा प्रतिसाद नष्ट केला .... ह्याचा निषेध असो !

तुम्हाला नष्ट करण्यासाठी एकाद्या चित्रपटाचे रस ग्रहण दिसले नाही...आठवण दिसली नाही.... दिनविशेष दिसला नाही.... वाघाचा फोटो दिसला नाही..... ईतर व्यक्तीगत प्रतिसाद दिसले नाहीत (ज्यामध्ये माझेच काही प्रतिसाद आहेत) पण तुम्हाला हा प्रतिसाद लवकरच दिसला .... क्या बात है !!!!!!!!!!!!!
तुम्ही जे आहात त्याना मी ९९.००% ओळखले आहे तुमचे मी नाव देखील जाहीर केले असते पण मला माहीत आहे तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडत आहात पण तरी देखील

निषेध त्रिवार निषेध !!!!!!

धन्यवाद उपक्रम !
आम्ही जातो आमच्या गावी !

तुम्हाला देखील मनोगती हवा लागली आहे असेच आम्ही समजतो आहे ! व दुखःद अंतकरणाने आम्ही तुमच्या द्वारातून परत जात आहोत!

धन्यवाद.
राज जैन

व्यक्तिगत रोखाचे आणि विषयाशी संबधित नसणारे अनावश्यक प्रतिसाद आणि टिप्पणी काढून टाकणे उपक्रमाचे धोरण आहे. आपला उपप्रतिसाद आणि तत्पूर्वीचा प्रतिसाद हे उपक्रमाच्या धोरणात बसत नसल्याने नाईलाजाने काढून टाकावे लागले. असे प्रतिसाद देण्यासाठी कृपया, खरडवहीचा वापर करावा ही विनंती. आपली स्वाक्षरी (div) ने सुरु होत नाही याची कृपया दखल घ्यावी आणि त्यात योग्य बदल करावेत. येथे ते करून दिले आहेत. - उपसंपादक

काहीतरी करावे हा विचार मनात असणे म्हणजेच तुम्ही जिवंत आहात ह्याचे लक्षण आहे !!! काय म्हणता ! पण हे उपक्रम ला समजत नाही आहे काय् करावे !

धन्यवाद.

ही माहीती दिल्या बद्दल.

ह्याच्या विषयी महाभारतामध्ये उल्लेख का नाही आहे ?
व येथे तर स्वतः व्यासांच्या समजवल्यानंतर पांडवांना जाऊन मिळाला होता व व्यासांनीच महाभारत लिहले होते मग हा का गायब आहे महाभारतातून.

राज जैन

युयुत्सु म्हणजे विकर्ण

युयुत्सु म्हणजेच विकर्ण असावा. महाभारतात त्याचा उल्लेख येतो. तो गांधारीपुत्र नसून धृतराष्ट्रपुत्र आहे बाकीची माहिती वर आहेच.

चू. भू. द्या. घ्या.

असे आहे काय?

युयुत्सु आणि विकर्ण हे दोन वेगवेग़ळे लोक आहेत, हे लक्षात येईल.

नाही मला नीट माहित नव्हते, फक्त अंदाज बांधला. अधिक शोध/ वाचन करायला हवे. माहितीबद्दल धन्यवाद.

असो.

अवांतर १: आपण कृपया मला प्रियालीच म्हणा. -- मजकूर संपादित.

अवांतर २:

(विकीपीडियाचा किंवा विश्वजालावरच्या चुकीच्या माहितीचा नाही)

आजच कुप्रसिद्ध चाच्यांच्या (पायरेट्स् हो, काका नाहीत) यादीत कान्होजी आंग्र्यांचे नाव विकिवर सापडले. :(

येथे काही महत्वपुर्ण माहिती आहे.

खाली दिलेल्या संकेतस्थळावर हिंदूधर्माचे काही ग्रंथ इंग्रजीतून उपलब्ध आहेत.

http://www.sacred-texts.com/hin

हा दुवा मला एका मराठी अनुदिनीवर सापडला.

नीलकांत

 
^ वर