पाकड्यांना हरवण्याचा तो आनंद काय वर्णावा !!

पाकीस्तानला चारीमुंड्या चित करण्याचा आनंद काय वर्णावा. काल तमाम भारतीयांच्या जीवनात सोनेरी दिवसाची नोंद झाली, तमाम भारतीयांनी पाकीस्तानला नमवुन अक्षरश: दिवाळी साजरी केली, हजारो लाखो भारतीय सामना जिंकल्यावर रस्त्यावर आले आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत विजय साजरा केला.

सामना सुरु झाल्यापासुन सामना संपेपर्यंत सामन्याचा एक एक चेंडु डोळ्याची पापणी न लवु देता पाहणार्‍या भारतीय प्रेक्षकांचे डोळ्याचे पारणे फिटले. कोण खेळले कोण नाही याहीपेक्षा आपला पुर्ण संघ एकदिलाने खेळला आणि अटितटीच्या लढतीत पाकड्यांना हरवुन सामना जिंकुन तमाम भारतीयांनी पाहीलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरले.

सचिन दा परत एकदा तळपला, त्याचे शतक १५ धावांनी हुकले हीच काय ती हुरहुर कायम राहीली परंतु त्याच्या शतकापेक्षा भारताचा विजय महत्वाचा होता आणि आम्ही तो मिळवलाच. आम्ही भारतीयांच्या चेहर्‍यावरील ओसंडुन वाहणारा आनंद बघीतला, आफ्रीदी, वकार यांना रडताना पाहीले, हताश शोएब चा चेहरा बघीतला, हाच आमला फायनल होता आणि भारतीय संघाने तो वाजतगाजत जिंकला......

आम्हाला अवर्णनिय आनंद मिळवुन देणार्‍या भारतीय संघाचे शतश: आभार..........
शतकापासुन वंचीत राहीला तरी जिगरबाज खेळी करणार्‍या सचिनचे आभार.....
तमाम भारतीयांनी जयघोष केला............खबरदार पाकड्यांनो आमच्या नादाला लागाल तर !!!!

लेखनविषय: दुवे:

Comments

सेहवाग रैना हरभजन

सामना मुख्यतः धावसंख्येच्या गतीमुळे जिंकला असे माझे मत झाले. त्यात सेहवाग रैना हरभजन यांचा वाटा मोलाचा आहे. सचिनच्या खेळाचे मूल्य आहेच.

प्रमोद

समजा

तमाम भारतीयांनी जयघोष केला............खबरदार पाकड्यांनो आमच्या नादाला लागाल तर !!!!

समजा पाकिस्तान जिंकला असता तर भारतीयांनी काय जयघोष केला असता. खेळ हा खेळ आहे. कुणीतरी जिंकणार कुणीतरी हरणार!
प्रकाश घाटपांडे

नसता केला

>>>>समजा पाकिस्तान जिंकला असता तर भारतीयांनी काय जयघोष केला असता.
नसता केला ना घाटपांडे साहेब. इतरवेळी तो खेळ असतो परंतु भारत वि.पाकिस्तान यांच्यात जेव्हा सामना
खेळला जातो तेव्हा तो सामना नसतो तर दोन देशाच्या युद्धाप्रमाणे त्या खेळामागे लोकांच्या भावना चिकटलेल्या असतात. कालच्या विजयी झालेल्या सामन्यामुळे आपल्या भारतीय सैनिकांनी लाहोरपर्यंत धडक मारल्याचा फील कालच्या सामन्याने मला दिला. ;)

-दिलीप बिरुटे

हाच

इतरवेळी तो खेळ असतो परंतु भारत वि.पाकिस्तान यांच्यात जेव्हा सामना
खेळला जातो तेव्हा तो सामना नसतो तर दोन देशाचे युद्धाप्रमाणे त्या खेळामागे लोकांच्या भावना चिकटलेल्या असतात.

हाच मुद्दा मला अधोरेखित करायचा आहे. खेळाकडे खेळ म्हणुनच का पाहु नये? हा दृष्टिकोण विकसित केव्हा होणार? पाकिस्तान जिंकला असता तर
खबरदार भारतड्यांनो आमच्या नादाला लागाल तर याद राखा! असे पाकिस्तानातील लोकांनी म्हटल नसत काय?

प्रकाश घाटपांडे

लगेच बदलू

--खेळाकडे खेळ म्हणुनच का पाहु नये? हा दृष्टिकोण विकसित केव्हा होणार? ---
पाकड्यांनी त्यांचा दृष्टीकोन बदलला की आम्ही लगेच बदलू. सुरुवात आम्ही नाही करणार. इथे पाकडे जिंकले की, फटाके उदवणारे जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही पाकड्याच्या प्रत्येक पराभवानंतर दिवाळी करणार

चॉकलेट घ्या

पाकड्यांनी त्यांचा दृष्टीकोन बदलला की आम्ही लगेच बदलू. सुरुवात आम्ही नाही करणार. इथे पाकडे जिंकले की, फटाके उदवणारे जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही पाकड्याच्या प्रत्येक पराभवानंतर दिवाळी करणार

चॉकलेट घ्या. आणि कृपया जिकडे अशी भाषा चालते तिकडे जा. प्लीज.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

मुद्दाम खोडसाळपणा

--चॉकलेट घ्या. आणि कृपया जिकडे अशी भाषा चालते तिकडे जा. प्लीज.--

हे असले "चॉकलेट घ्या" सारखे प्रतिसाद जेथे मुद्दाम खोडसाळपणे केले तरी चालू शकतात तेथे वरील भाषा अगदी सौम्य आहे.

धम्मकलाडू ह्या टोपणनावाचा अर्थ

जस्ट विचार करत होतो की, धम्मकलाडू ह्या टोपणनावाचा अर्थ काय आणि जो मला माहिती आहे, तो येथे कसा स्वीकारला जातो.

जालोत्खनन

जालोत्खननात अर्थ अनर्थ व अन्वयार्थ यांची संगती लागते. त्यात बराच वेळ जाईल व इतिहासात डोके घातले कि तो त्यातच अडकुन पडतो. असो
प्रकाश घाटपांडे

सहमत

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.प्रकाश घाटपांडे यांनी मोजक्या शब्दांत मांडलेल्या विचाराशी सहमत आहे.कुठल्याही खेळात भारतीय खेळाडूंनी विजय मिळवला की आपल्याला आनंद होणे स्वाभाविक आहे.
पाकिस्तान विरुद्ध विजय मिळाल्यावर अधिक आनंद होणे,भारताचा जयघोष करणे ठीक आहे.पण;"खबरदार पाकड्यांनो आमच्या नादाला लागाल तर !!!! "
हे वाक्य योग्य वाटत नाही. त्यात अखिलाडूवृत्ती दिसते.

हं

क्रिकेटप्रेम हा राष्ट्रवादामागे लपलेला धर्म बनला आहे. 'भारताचा संघ', 'पाकिस्तानचा संघ', म्हणवावे असे त्या संघांत काही नाही. ते खासगी संघ आहेत आणि तुम्हाला नादी लावीत आहेत.

अगदी सहमत

अगदी सहमत!
प्रकाश घाटपांडे

+१ | काय संबंध?

असेच. आणि अशा ह्या दोन संघातला सामना बीसीसीयच्या संघाने जिंकल्यावर 'जय भवानी, जय शिवाजी'चे नारे देणारे आणि आणि 'भगवे झेंडे' घेऊन इकडेतिकडे फिरणारे धर्मवीर. काय संबंध?

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

सहमत

पूर्णपणे सहमत


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

१०१% असहत

अगदी विद्नानवादी दृष्टीकोन आहे.
१०१% असहत

काय नवे? जगावेगळे?

पाकीस्तानला हरवल्यावर केलेला जल्लोष जगाविपरीत नाही. अनेक खेळांत आणि अनेक देशांत अश्या 'रायव्हलरीचे' दर्शन घडतेच. फरक इतकाच भारत वि. पाकिस्तान ही कदाचित सर्व खेळांमधील सर्वात जास्त "लोकप्रिय्" रायव्हलरी असावी.
"Ali versus Frazier? Ohio State versus Michigan? Giants versus Eagles? Nah. None of these compare to India versus Pakistan, the fiercest rivalry in sports. - ESPN (USA)"
http://sports.espn.go.com/extra/cricket/columns/story?columnist=della_pe...

बाकी आम्हाला सुद्धा आसुरी आनंद झाला, मॅच पाहताना पाकिस्तानच्या खेळांडुना चांगले खेळताना कचकचुन शिव्याही आम्ही दिल्या. आमच्या खेळाडुंनाही आम्ही वाईट खेळताना कचकचुन शिव्या दिल्या हे. वे. सां. न. ल. (अर्थात असले असभ्य वर्तन करतो म्हणुन् आम्हाला बाहेर काढले गेले नाही हे आमचे दैव की असामान्य योगबले हे आपटेच जाणोत) ;-)
-Nile

उदाहरणे

अनेक खेळांत आणि अनेक देशांत अश्या 'रायव्हलरीचे' दर्शन घडतेच.

इंग्लंड-ऑस्ट्रेलिया ऍशेस सिरीज
ब्राझील-अर्जेंटिना - सॉकर

--
दृष्टीआडची सृष्टी
http://rbk137.blogspot.com/

सहमत

सर्वप्रथम, भारत जिंकल्याचा, ते देखील पाकीस्तानच्या विरोधात जिंकल्याचा, ते पण स्वतःचा रनरेट कमी असताना त्याही पेक्षा पाकीस्तानी संघास कमी रनरेट मधे ठेवत टिमस्पिरीटने सामना जिंकल्याचा विशेष आनंदच झाला. तरी देखील, "खबरदार पाकड्यांनो आमच्या नादाला लागाल तर !!!!" यावाक्याची गरज नाही असेच वाटते. मी अयोग्य समजून असे म्हणणार नाही. पण जर कोणाला तसे वाटले तर ज्याची-त्याची मते असे का बरे म्हणायचे नाही?

त्याच बरोबर नाईलने म्हणल्याप्रमाणे, "अनेक खेळांत आणि अनेक देशांत अश्या 'रायव्हलरीचे' दर्शन घडतेच." हे देखील सत्य आहे. देशच कशाला, बेसबॉल, अमेरिकन फुटबॉलच्या संदर्भात, न्यूयॉर्क-बॉस्टन चे वैर देखील बघण्यासारखे आहे. आणि त्यावेळेस कोणी अतीभावूक होऊन त्याला विरोध देखील करत नाहीत.

बाकी आम्हाला सुद्धा आसुरी आनंद झाला, मॅच पाहताना पाकिस्तानच्या खेळांडुना चांगले खेळताना कचकचुन शिव्याही आम्ही दिल्या. आमच्या खेळाडुंनाही आम्ही वाईट खेळताना कचकचुन शिव्या दिल्या

उत्तम! असेच अभिव्यक्तीस्वातंत्र्य वापरत चला. ;)

दुधाची तहान...

पाक वर लष्करी मार्गाने अथवा अन्य राजकीय मुत्सुद्दीने जरब बसवता येत नसल्याने असे समाधान मिळवले जाते . त्यामुळेच् ह्या सामन्याकडे फक्त् खेळ् म्हणून् पाहीले जात् नाही.

ऑस्ट्रेलिया वरचा विजय

मला वैयक्तिक रित्या ऑस्ट्रेलिया वरचा विजय जास्त भावला. ऑस्ट्रेलियन खेळाडू अत्यंत मुजोरपणे वागत असतात. त्यांच्यावरच्या विजयाने जे समाधान मिळाले ती मजा पाकिस्तान वरच्या विजयाला नाही आली.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

+१

मला वैयक्तिक रित्या ऑस्ट्रेलिया वरचा विजय जास्त भावला. ऑस्ट्रेलियन खेळाडू अत्यंत मुजोरपणे वागत असतात. त्यांच्यावरच्या विजयाने जे समाधान मिळाले ती मजा पाकिस्तान वरच्या विजयाला नाही आली.

मलाही. पाकिस्तानबरोबरच्या खेळात आता पूर्वीसारखी गंमत राहिलेली नाही.

तमाम भारतीयांनी जयघोष केला............खबरदार पाकड्यांनो आमच्या नादाला लागाल तर

क्रिकेटच्या (खेळाच्या) संदर्भात हे अतिशय आचरट आणि बालीश वाक्य आहे.

इतिहास

हा प्रतिसाद खालील वाक्याच्या अनुषंगाने असला तरी प्रियाली यांना उद्देशून नाही.

>>पाकिस्तानबरोबरच्या खेळात आता पूर्वीसारखी गंमत राहिलेली नाही.

ऐतिहासिक काळात म्हणजे भारतात भांडवली क्रांती होण्याच्या आधीच्या काळात भारत हा बंदिस्त देश होता. बहुतेक लोक भारतातच पोटापाण्याचा उद्योग करीत असत.

भांडवली + माहिती तंत्रज्ञान क्रांती झाल्यावर मोठ्या प्रमाणात सुशिक्षित मध्यमवर्गीय भारतीय देशाबाहेर पडले. तेथे गेल्यावर तेथे पाकिस्तानी नागरिकांशी प्रत्यक्ष संपर्क येऊ लागला. त्या संपर्कात बरेच पाकिस्तानी 'पाकडे' या विशेषणात बसत नाहीत हे दिसून आले.

त्याच दरम्यानच्या काळात मनात द्वेषभावना जागती ठेवणार्‍या वर्गाच्या लाडक्या पक्षाचे सरकारही सत्तेवर आले. त्यांच्या काळात भारत पाक मैत्रीचा नवा अध्याय सुरू झाला. त्याकाळात पाकिस्तानी लोक आणि पाकिस्तानी सरकार/प्रस्थापित वर्ग वेगवेगळे आहेत असे काहीतरी लोकमानसावर बिंबले गेले. म्हणजे पाकिस्तान सरकार व्हेरी बॅड व्हेरी बॅड, पाकिस्तानी लोक ओके ओके असे काहीतरी. काही खाजगी दूरदर्शन वाहिन्यांच्या कार्यक्रमात पाकिस्तानी लोक भाग घेऊ लागले.

या सगळ्या घडामोडीत मूळ कट्टर द्वेषभावना कमी झाली.

शेवटचे युद्ध होऊन ४० च्या आसपास वर्षे झाली आहेत हेही एक कारण असेल.

शिवाय मियांदाद/इम्रानखान/सलिम मलिक ज्या इर्षेने खेळत तसे खेळाडू फार दिसत नाहीत.

------
>>क्रिकेटमध्ये हरवल्यामुळे पाकिस्तान पादाक्रांत केल्याचे समाधान.......
एका सामन्यात/मालिकेत (८० च्या दशकात) भारताला सपाटून मार दिल्यावर कर्णधार इम्रान खानने भारताला असेच 'जंग के मैदान में' हरवण्याची इच्छा असल्याचे बोलून दाखवल्याचे स्मरते. त्या अर्थी ते समाधान दोन्ही बाजूस 'खरोखर' असावे असे वाटते.

नितिन थत्ते

गंमत

त्याच दरम्यानच्या काळात मनात द्वेषभावना जागती ठेवणार्‍या वर्गाच्या लाडक्या पक्षाचे सरकारही सत्तेवर आले. त्यांच्या काळात भारत पाक मैत्रीचा नवा अध्याय सुरू झाला. त्याकाळात पाकिस्तानी लोक आणि पाकिस्तानी सरकार/प्रस्थापित वर्ग वेगवेगळे आहेत असे काहीतरी लोकमानसावर बिंबले गेले. म्हणजे पाकिस्तान सरकार व्हेरी बॅड व्हेरी बॅड, पाकिस्तानी लोक ओके ओके असे काहीतरी. काही खाजगी दूरदर्शन वाहिन्यांच्या कार्यक्रमात पाकिस्तानी लोक भाग घेऊ लागले.

या सगळ्या घडामोडीत मूळ कट्टर द्वेषभावना कमी झाली.

हे वाचून गंमत वाटली. हा प्रतिसाद द्यायला खूप जड गेले असावे थत्तेसाहेबांना असे दिसते आहे.. :) चालू द्या.

या लेखाच्या बद्दल सहमत आहे की पाकडे असा उल्लेख करण्याची गरज कोणालाही भासू नये. खेळाच्या ठिकाणी खेळ व्हावा.

?

असे घडले नाही का?

किंवा आपण ठळक करून दाखवलेले उल्लेख त्यातल्या मतितार्थासह खरे नाहीत का?

नितिन थत्ते

:)

होय ना. म्हणूनच तुमच्या लिखाणाची गंमत वाटली.

खरे आहे

आफ्रिदी, अकमल, रझ्झाक हे फारच सौम्य खेळाडू वाटतात. इजाज अहमद किंवा मियांदाद यांचा खोडसाळपणा त्यांच्याकडे नाही. ऑस्ट्रेलियाला हरवण्याबरोबरच शॉन टेट सारख्यांची करिअर संपल्याचा आनंद मला जास्त झाला आहे.

इथे...

इथे सौदी मधेही या रायव्हलरीचा जरा जास्तच मजा आला. पण अजून एक निरिक्षण म्हणजे की इथल्या बंगाली मार्केट मधे बांगलादेशाने इंग्लंडवर विजय मिळवला तेव्हा मिठाई वाटली गेली व भारतीयांनी ही और दो भाई म्हणत मनसोक्त हाणली. तसेच पाक ने ऑस्ट्रेलिया वर विजय मिळवला त्या दिवशी भारतीयांनी पाकी सहकार्‍यां कडून पार्ट्या उकळल्या :) गोर्‍यांना हरवण्याचा ही आनंद असाच आहे ( मग त्यांना भारत हरवो वा पाक वा अगदी बांगलादेशने हरवले तर मग फारच आनंद !!) कदाचित सर्वच परदेशी राहणार्‍या भारतीयांचा हा अनुभव असावा.

समज

पाकीस्तानला चारीमुंड्या चित (चीत) करण्याचा आनंद काय वर्णावा.(!) काल तमाम भारतीयांच्या जीवनात सोनेरी दिवसाची नोंद झाली, तमाम भारतीयांनी पाकीस्तानला नमवुन( नमवून) अक्षरश: दिवाळी साजरी केली, हजारो लाखो भारतीय सामना जिंकल्यावर रस्त्यावर आले आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत (आतषबाजीत) विजय साजरा केला.

सामना सुरु झाल्यापासुन सामना संपेपर्यंत सामन्याचा एक एक चेंडु (चेंडू) डोळ्याची पापणी न लवु (लवू) देता पाहणार्‍या भारतीय प्रेक्षकांचे (प्रेक्षकांच्या) डोळ्याचे पारणे फिटले. कोण खेळले कोण नाही याहीपेक्षा आपला पुर्ण (पूर्ण) संघ एकदिलाने खेळला आणि अटितटीच्या ( अटीतटीच्या) लढतीत पाकड्यांना हरवुन (हरवून)सामना जिंकुन (जिंकून) तमाम भारतीयांनी पाहीलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरले.

सचिन दा परत एकदा तळपला, त्याचे शतक १५ धावांनी हुकले हीच काय ती हुरहुर कायम राहीली परंतु त्याच्या शतकापेक्षा भारताचा विजय महत्वाचा होता आणि आम्ही तो मिळवलाच. आम्ही भारतीयांच्या चेहर्‍यावरील ओसंडुन(ओसंडून) वाहणारा आनंद बघीतला, आफ्रीदी, वकार यांना रडताना पाहीले, हताश शोएब चा चेहरा बघीतला, हाच आमला (आम्हाला) फायनल होता आणि भारतीय संघाने तो वाजतगाजत जिंकला...... (या वाक्याचा अर्थ सांगा आणि हजार रुपये मिळवा)

आम्हाला अवर्णनिय ( अवर्णनीय) आनंद मिळवुन (मिळवून) देणार्‍या भारतीय संघाचे शतश: आभार..........
शतकापासुन वंचीत राहीला तरी जिगरबाज खेळी करणार्‍या सचिनचे आभार.....
तमाम भारतीयांनी जयघोष केला............खबरदार पाकड्यांनो आमच्या नादाला लागाल तर !!!!

शुद्धीकरण करुन घेतलेल्या लिखाणाचा अर्थ माझ्या मर्यादित समजानुसार असा आहे की खेळात जिंकण्यापेक्षा पाकिस्तानला हरवणे अधिक महत्त्वाचे आहे.पाकडे भारतियड्यांच्या नादाला कसे लागले हे समजले नाही. एका गटात काही सामने जिंकले आणि एक विवक्षित धावगती राखली की दोन संघ समोरासमोर येणारच. 'खबरदार न्यूझिलंड्यांनो आमच्या नादाला लागाल तर !!!!' असे श्रीलंकेने म्हटले की नाही याची कल्पना नाही. आता आपण 'खबरदार लंकाड्यांनो आमच्या नादाला लागाल तर !!!!' असे म्हणावे का हेही समजले नाही. एकंदरीत माझी समज कमी पडते आहे, असे दिसते.
एक सामना जिंकला की आपल्याला लाहोरपर्यंत धडक मारल्याचा फील येतो. पूर्वी होत असे तशी भारत पाकिस्तान अशी एक दिवसीय सामन्यांची मालिका झाली आणि समजा आपण ती ५-० अशी जिंकली तर आपल्याला पाकिस्तान पादाक्रांत केल्याचा फील येईल काय? आणि आपल्याला 'फील' येऊन काय फरक पडणार आहे?
अखंड हिंदुस्थानचे स्वप्न बघणारे आणि भारताच्या स्वातंत्र्यदिवसाला फाळणीदिन म्हणून शोकदिन मानणारे आणि असे वाईड आऊटसाईड दी ऑफस्टंप उड्या मारणारे यांच्यात फरक नाही. ह्या दोन संघातला सामना बीसीसीयच्या संघाने जिंकल्यावर 'जय भवानी, जय शिवाजी'चे नारे देणारे आणि आणि 'भगवे झेंडे' घेऊन इकडेतिकडे फिरणारे धर्मवीर हे त्यातलेच.
कालचा सामना मी पाहिला आणि तो अत्यंत रोमांचक आणि आनंददायक झाला यात वादच नाही. मात्र सामना संपल्यावर कर्कश्श हॉर्न वाजवत सुसाट वेगाने वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून अंमळ मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावरुन वाहने रेटणारी तरुणाई बघून मला तरी देशप्रेमाचे भरते आले नाही. एकंदरीत माझी समज कमी पडते आहे, असेच दिसते.

सन्जोप राव
आह को चाहिये, इक उम्र असर होने तक
कौन जीता है, तिरे जुल्फ के सर होने तक

सामना जिंकल्याचा आनंद आहेच

सामना जिंकल्याचा आनंद आहेच. पारंपरिक अटीतटीची लढत असली तर सामने बघतानासुद्धा अधिक समरसून जातो, हेसुद्धा खरेच.

मात्र अशा प्रकारचे रोमांचक प्रसंग वारंवार येवोत म्हणून असे सामने वारंवार खेळले जावोत. म्हणून भारतीय आणि पाकिस्तानी संघ एकमेकांशी सामने खेळायच्या नादाला लागलेले राहोत, अशी माझी आशा आहे. म्हणून शेवटच्या वाक्याशी असहमत आहे.

मनोरंजक प्रतिसाद , मनोरंजक लेखन

पाकिस्तान ला हारवल्या पेक्षा पाँटिंग, वॉट्सन, टेट , ब्रेट ली आणि मायकल क्लार्क सारख्यांना त्यांची जागा दाखवुन दिलेला क्वार्टर फायनल चा सामना जास्त आनंद देणारा होता . पाकिस्तान विरुद्ध मॅच बघायची मजा जास्तित जास्त २००३ च्या वर्ल्ड कप पर्यंत असावी. त्यानंतर भारताचा दौरा केलेल्या पाकिस्तानला उदयोन्मुख सुपरस्टार ढोणी च्या सुपरफॉर्म मुळे ४-१ ( की ५-० ? ) दिल्याचे स्मरते . हल्ली मॅच मधे सोहेल-प्रसाद किंवा जुणे गंभिर - अफ्रिदी ची खुण्णस बघायलाच मिळाली नाही.
पाकिस्तान्यांना पाकडे म्हणावे की नाही माहित नाही . कधी काळी भारताबाहेर असताना पाकिस्तानी नागरिकाशी संपर्क आला होता. त्यांच्या इथे ब्रेनवॉशिंग चालतं हे जरी खरं असलं तरी "अमन " त्यांना ही हवे आहे . मोजकी लोकं आणि सियासी लोकं देशांतला द्वेष वाढवत असावेत .
क्रिकेट बद्दल म्हणाल तर ऑस्ट्रेलिया ला भारताने हरवल्यास सर्वाधिक आनंद होतो , तसाच ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांग्ला किंवा पाकिस्तान जरी असेल तरी आम्ही बांग्ला-पाकिस्तान साठी चियर करतो .

बाकी खेळ हा राजकिय संबंध सुधारण्यासाठी , देश एक करण्यासाठी वापरला गेल्याचे इतिहासात मोठे मोठे दाखले असावेत . अफ्रिकेत बहुतेक नेल्सन मंडेला ने फुटबॉल द्वारे एक मोठा करिश्मा केल्याचे पुसटसे आठवते आहे .

आपली एनर्जी पॉझिटिव्ह कामासाठी वापरावी :) "सरसकट" पाकिस्तान ला शिव्या देण्या पेक्षा आपल्या कडे करण्यासारखं खुप काही आहे :) बाकी एखाद्या "अतिरेकी किंवा भारताला शिव्या देणार्‍या " पाकड्याला मनसोक्त चोपायची एक सुप्त इच्छा आहे :)

बाकी "टिम इंडिया " ही बीसीसीआय ची "खाजगी टिम" आहे हे वाचुन हसावे की रडावे हेच कळत नाही ...अशा विचारवंतांच्या बुद्धीचे खुप सारे कौतुक करतो.
कारण तसे असेल तर् स्कोरबोर्डाच्या पट्टीवर् 'इंडिया' न येता "बीसीसीआय " का येत नाही ?

- गद्दाफी

हसा-रडायचे किंवा क्रमाने दोन्ही करायचे स्वातंत्र्य

हसा-रडायचे, किंवा क्रमाने दोन्ही करायचे, किंवा कुठलेच न करायचे पूर्ण स्वातंत्र्य आहे.

टाटा कंपनीचा एका गाडीवर "टाटिका" लिहिण्या ऐवजी "इंडिका" का लिहितात कोणास ठाऊक.

बीसीसीआयवर मालकी असल्याचा भ्रम एखाद्या व्यक्तीला नसला, तर तो भ्रम असलेल्या व्यक्तीला हसायची किंवा रडायची इच्छा काय म्हणून व्हावी? त्या भ्रमिष्ट मालकीच्या समभागधारकांपैकी तितकेच वाटेकरी कमी झाल्याबद्दल सुस्कारा सोडावा वाटल्यास.

- - -
बाकी बराच सहमत : ऑस्ट्रेलिया*शी खेळण्यात विशेष चुरस आणि जिंकण्यातही विशेष मजा आहे.
- - -
*"ऑस्ट्रेलिया" संघही "क्रिकेट ऑस्ट्रेलिया" नावाच्या सरकार-वेगळ्या कंपनीच्या मालकीचा आहे.

:)

टाटा कंपनीचा एका गाडीवर "टाटिका" लिहिण्या ऐवजी "इंडिका" का लिहितात कोणास ठाऊक.

बहुतेक टाटा च्या 'अनेक' प्रॉडक्ट्स पैकी इंडिका एक प्रॉडक्ट आहे. म्हणुन असावं. ते एक विशेषनाम आहे. ते इंडिका काय लेंडिका/भेंडीका/ *डिका असतं तरी त्यात ऑब्जेक्षण नाही :) उद्या म्हणाल टाटा च्या एका ट्रक चं नाव १६१२ का आहे , ६१६२ का ठेवलं नाही कुणास ठाउक.

हसा-रडायचे, किंवा क्रमाने दोन्ही करायचे, किंवा कुठलेच न करायचे पूर्ण स्वातंत्र्य आहे.

बाकी स्वातंत्र्य असले तरी कनफ्युज झाले असल्याने नक्की काय करायचे हे सुचले नाही ते वर सुचवायचे होते .

* - अं ते द्न्यं

- गद्दाफी

आमच्या वेळेस बॉ असं नव्हतं.

>>>>हल्ली मॅच मधे सोहेल-प्रसाद किंवा जुणे गंभिर - अफ्रिदी ची खुण्णस बघायलाच मिळाली नाही.
आमच्या वेळेस बॉ असं नव्हतं म्हणण्याची फॅशन असते तशा प्रकारच्या प्रतिक्रिया वाचून चांगली करमणूक झाली. पूर्वीसारखी भारत-पाक सामन्यात मजा येत नाही. जावेद मियादाद काय खेळायचा. वसिमचा यार्कर काय जब्रा असायचा. कर्णधार म्हटलं की इम्रान खान. सुनिल गावस्कर काय खेळायचा. (पंचवीस षटकं खेळूनही वीस पंचवीस धावा नावावर असायच्या) कपीलदेवचा इनस्वींग क्या कहने, रॉजर बिन्नी कपीलपेक्षा भारी होता. मोहिंदर अमरनाथची मध्यमती गोलंदाजी तर केवळ सुप्पर. काळाबरोबर खेळाचा आनंद घ्यायचा सोडून लोकं असे भूतकाळात का रमत राहतात काही कळत नाही. च्यायला प्रत्येक काळात असे येडपट लोक असतात(च) असे वाटायला लगले आहे. असो....

>>>>>"सरसकट" पाकिस्तान ला शिव्या देण्या पेक्षा आपल्या कडे करण्यासारखं खुप काही आहे :)
च्यायला, कालच्या सामन्यात आमचा भारतीय क्रिकेट खेळाडू जेव्हा बाद होत असायचा तेव्हा पाकिस्तानात प्रत्येक वेळी हवेत गोळीबार तिकडचे क्रिडा रसिक करत होते म्हणे. त्यात एकाचा जीवही गेला म्हणे. [संदर्भ: मराठी दैनिके] तर अशावेळी आम्ही काय पाकिस्तानमधील बेकारी,दारिद्रय, आणि दहशतवाद्यांच्या छावण्या पोसण्यासाठी काही आर्थिक मदत केली पाहिजे असे तर काही सुचवायचे नाही ना ? ;)

>>>>>"टिम इंडिया " ही बीसीसीआय ची "खाजगी टिम" आहे हे वाचुन हसावे की रडावे हेच कळत नाही ...अशा विचारवंतांच्या बुद्धीचे खुप सारे कौतुक करतो.

बीसीसीआयची टीम असली तरी तो संघ भारत देशाचे प्रतिनिधित्व करत नाही इतकाच तो अर्थ. बाकी, बुद्धीवंताच्या कौतुकाशी सहमत आहे. :)

-दिलीप बिरुटे

वा हुजुर वा .... प्रा.डॉ. बोलिये

काळाबरोबर खेळाचा आनंद घ्यायचा सोडून लोकं असे भूतकाळात का रमत राहतात काही कळत नाही. च्यायला प्रत्येक काळात असे येडपट लोक असतात(च) असे वाटायला लगले आहे. असो....

भुतकाळात रमल्या गेले आहे असे सुचित करायचे नसुन खेळात जुणी हाडवैरी खुण्णस दिसली नाही एवढेच म्हणायचे आहे.बाकी खेळाचा आनंद तसुभरही कमी झाल्याचे माझ्या एकाही वाक्यातुन स्पष्ट होत नाही. ह्यातुन येडपटासारखे अर्थ काढल्या जाऊ णयेत. आपण एक आदरणिय प्रा.डॉ. आहात. असे भादरणिय वर्तन आपल्या इमेज ला धक्का देऊ शकते :)

च्यायला, कालच्या सामन्यात आमचा भारतीय क्रिकेट खेळाडू जेव्हा बाद होत असायचा तेव्हा पाकिस्तानात प्रत्येक वेळी हवेत गोळीबार तिकडचे क्रिडा रसिक करत होते म्हणे. त्यात एकाचा जीवही गेला म्हणे.

हो आहेत ना माथेफिरु आणि महामुर्ख पाकिस्तानात ( आणि भारतात ) कमी नाहीत :) असल्या लोकांना चोप दिल्या गेला पाहिजे च :) बाकी "आमचा भारतिय खेळाडु" ? ? =)) खाली काहीतरी वेगळंच म्हणताय ? जिथे टिम तुमची भारतिय नाही तिथे खेळाडु कसालाय तुमचा भारतीय झाला ?

र अशावेळी आम्ही काय पाकिस्तानमधील बेकारी,दारिद्रय, आणि दहशतवाद्यांच्या छावण्या पोसण्यासाठी काही आर्थिक मदत केली पाहिजे असे तर काही सुचवायचे नाही ना ? ;)

प्रगल्भ अशा प्रा.डॉ ना फक्त एकंच शक्यता कशी काय दिसली ? मग ह्याच न्यायाने प्रा.डॉ यांना पाकिस्तानी खेळाडु आउट झाल्यावर आपणही हवेत गोळीबार करावा असे सुचवायचे नाही ना ? :) आहो मग त्या मुर्ख आणि माथेफिरु पाकिस्तान्यांत आणि प्रा.डॉ. मधे फरक काय तो ? ;)

बीसीसीआयची टीम असली तरी तो संघ भारत देशाचे प्रतिनिधित्व करत नाही इतकाच तो अर्थ.

मग कोणाचे बिसीसीआय चे प्रतिनिधित्व करतो ? :) तांत्रिक बाबी माहिती नाहीत , पण जेंव्हा देशांचे वर्ल्डकप होतात तेंव्हा देशांना रिप्रेझेंट करणारे संघ त्यात सहभाग घेत असावेत. :)

बाकी तुमच्या माहितीसाठी एक व्हिडिओ :)

आम्हाला पाकिस्तानी पोरी भयंकर आवडतात. इतक्या सुंदर असतात की मराठी पोरी त्यांच्या १०० कोस दुर :) तोडच् नाही ... अजुण काही ?

- गद्दाफी

+१

गद्दाफी ह्यांच्याशी सहमत आहे! आपली टीम बीसीसीआयची टीम असल्याने ती इंडीयाची नाही म्हणणारे आम्हाला हिंदी राष्ट्रभाषा नाही कारण घटनेत तशी तरतुद नाही असे म्हणणार्‍यांसारखेच वाटतात. आम्ही दोघांनाही फाट्यावर मारतो. आमच्यासाठी हिंदी हीच राष्ट्रभाषा आणि बीसीसीआयची टीम हीच भारताची टीम.

कही पे निगाहे कही पे निशाना

सांगायचा मुद्दा असाच होता की, बीसीसीआयची टीम आहे भारतीय नाही असे म्हणाणा-यांचे कौतुक केलेच आहे. सहमती त्यासाठी तर व्यक्त केली ना भो. फरक नक्कीच आहे पण म्हणून बीसीसीआयचा संघ मला भारतीय वाटत नाही, असे मी म्हणणार नाही.

तुनळीच्या फितीत शाहीद आफ्रिदी जरी ''इतनी नफरत हम लेके क्यो बैठते है'' म्हणत असला तरी हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. सामना हरल्याबरोबर देशवासियांची त्यांनी माफी मागितली होती. प्रत्येक खेळाडू हा खेळतांना जिंकण्यासाठीच त्या त्या देशाचे प्रतिनिधित्त्व करत असतो. बाकी, भारत-पाक सामन्याच्या बाबतीत तो खेळ असला तरी पाक आपला शत्रूच का असतो त्याची खूप कारणे खेळ पाहतांना भारत-पाक क्रिकेट रसिकांच्या मनात असतात. आज श्रीलंकेबरोबर हरलो तरी फारसे वाईट वाटणार नाही. कारण आम्ही क्रिकेटचा विश्वकरंडक पाकिस्तान संघाला हरवून केव्हाच जिंकलो आहे. :)

असो, बाकी प्रतिसाद णेहमी प्रमाणे छाण छाण. :)

-दिलीप बिरुटे

माहिती साठी आणखी एक...

माहितीसाठी आणखी एक व्हीडीओ
http://www.youtube.com/watch?v=kfFfgky3unE

हमारा दिल उनका नही हो सकता एव्हढेच या व्हीडीओ मधे आलय. अजूनही बरेच काही मूर्खासारखे बडबडलाय हा प्राणी आत्ताच बातम्यांमधे बघीतले. माजी पाक कप्तान आमीर सोहिलने त्यावर टीकाही केली आहे.

सध्या जकार्तात शीघ्रकवित्व जोरात चालू आहे!

पाकड्यांना हरवून आपण आज लंकेला हरविले. त्यावरून सध्या जकार्तात शीघ्रकवित्व जोरात चालू आहे! आताच मला हा गमतीदार SMS आला: (कवी कोण आहे माहीत नाहीं!)
पेहेले हराया गोरोंको (ऑस्ट्रेलिया)
फिर हराया हरामखोरोंको (पाकिस्तान)
आज हराया सीतामैय्याके चोरोंको (श्री लंका)
जय श्रीराम,
जय हिंदुस्तान
___________
जकार्तावाले काळे

सहमत

ह्या एसएमएस मधील भावनेशी सहमत आहे.

हे राम!

परवा किराणामाल आणणारा मुलगा आता राम विरुद्ध रावण असे युद्ध आहे असे सांगत होता.
प्रकाश घाटपांडे

अपहरण आणि चोरी एकच?

आज हराया सीतामैय्याके चोरोंको (श्री लंका)
हहाह्हा. सीतेचे अपहरण झाले होते ना? जकार्तात अपहरण आणि चोरी ह्यांत फरक करत नाही असे दिसते. ;) बायकोला तिकडे चल संपत्ती गृहीत धरतात काय?

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

शंका

एसएमएस पाठविणारे सारे जकार्तावासी हे कागदोपत्री भारतीय नागरिक आहेत काय? असतील तर ठीक आहे, अन्यथा, इंडोनेशियन नागरिकांनी तसा आनंद व्यक्त करणे आणि भेंडीबाजारात पाकिस्तानसाठी फटाके फोडणे यांत फरक तो काय?

 
^ वर