पोस्टऑर्गस्मिक इलनेस सिंड्रोम
पुरुषांमधे आढळणारी ही व्याधी कोणत्याही वयात होऊ शकते. मात्र आजच्या प्रचलित वैद्यकशास्त्रांमधे ह्या व्याधीचा स्वीकारच केलेला नाही असे आढळते व हे मत ही व्याधी झालेल्या लोकांनीच नोंदवले आहे. ते का त्याबद्द्ल पुढे लिहीलेले आहे. ही व्याधी खुलेपणाने युरोपात चर्चीली गेली आहे व अनेकांनी मान्य केले आहे की, त्यांना असा त्रास होतो. ह्यावर वैद्यकीय उपचार पद्धत शोधण्यासाठी डॉ. वाल्डींगर हे संशोधन करत आहेत. खालील माहिती त्यांच्याच संशोधनातील माहितीवर आधारलेली आहे. येथे ही चर्चा समोर ठेवण्याचा हेतू असा की, भारतात अशी व्याधी नोंदवली गेली आहे का?, आयुर्वेदात काही उपचार आहेत का? हे माहितगारांकडून माहिती करुन घेणे.
वीर्यपतनानंतर साधारणपणे अर्ध्या तासात ही व्याधी झालेल्यांना पुढील लक्षणे दिसू लागतात व ती ७ दिवसांपर्यंतही जाणवल्याच्या नोंदी केल्या गेल्या आहेत- मेंदूची माहिती ग्रहण करण्याची क्षमता प्रचंडपणे मंदावते, डोळे फडफड करु लागतात, स्नायु दुखावतात, खूप थकवा जाणवतो - जशी रात्रभर झोप झालेली नाही, चिडचिड, काहीही लक्षात न राहणे, बोलतांना शब्द न सापडणे, एकाग्रता न होणे.
काहींच्या बाबतीत वरील लक्षणे एक-दोन दिवसात नाहीशी होतात तर कधी ७ दिवसही लागतात त्यामुळे अनेकांनी लैंगिकइच्छा शमवण्यासाठी येणा-या दिवसांत सुटी घेणे, काही कामाची कमिटमेंट न ठेवणे असे करावे लागते. पण ज्या व्यक्ति ठराविकपणे एक-दोन दिवसाआड वीर्यपतन होऊ देतात त्यांना मात्र कायमचाच वरील लक्षणांचा सामना करावा लागतो व अनेकदा त्यांना असे काही झाले आहे हे माहितीही नसते. त्यामुळे कॉग्निटीव्ह ऍक्टीव्हीटीवर खूपच परीणाम झाल्यामुळे अकार्यक्षमता निर्माण झालेले लोक त्यांच्या कामाच्या ठिकाणी लक्षपुर्वक काम करु शकत नाहीत. अनेकदा भ्रमिष्टासारखे हे लोक वागतात, वाहने चालवतांना काळजी घेऊ शकत नाहीत व त्याचे परीणाम स्वतः व इतरांना भोगायला लावतात.
शरीर तरुण असतांना ह्या व्याधीचा फारसा त्रास जाणवत नसावा पण ज्यांचे वय ४० च्या पुढे आहे त्यांना मात्र निश्चितच हा त्रास होतो. अशी मंडळी डॉक्टरांकडे गेल्यानंतर योग्य निदान होत नाही व थकवा आल्यामुळे, स्ट्रेस असावी असे सांगुन त्यावरील उपचार केले जातात व ते चुकतातच. म्हणूनच ह्या व्याधीबद्दल अधिक लोकांना माहिती व्हावी असा हेतू आहे.
डॉ. वाल्डींगर ह्यांना वाटते हे वीर्याच्याच ऍलर्जीमुळे होते. जोपर्यंत वीर्य त्याच्या ग्रंथीत आहे, तो पर्यंत काही फरक पडत नाही. म्हणून त्यांनी स्वखुशीने त्यांच्या संशोधन कार्यात सहभागी झालेल्या ४५ कॉकेशियन पुरुषांवर प्रयोग करुन बरीच प्रगती केली आहे. ह्या उपचार पद्धतीत लक्षणांवरील औषधांव्यतिरीक्त वीर्याच्या ऍलर्जीवर उपचार शोधले जात आहेत. असे कळते की, वीर्यच अगदी सुक्ष्म प्रमाणात रक्तात टोचले जाते व शरीराची वीर्याच्या ऍलर्जीवरील प्रतिकारशक्ती वाढवली जाते का हे पाहीले जात आहे.
अतिवीर्यनाश आरोग्याला अपायकारक असतो असे पुर्वी ठासुन सांगितले जायचे, तेच योग्य आहे असे वाटते. आजच्या अनेक इंग्रजी नियतकालिकातून ख-याखोट्या प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून लैंगिक समस्यावर उपाय अशा गोंडस नावाखाली सॉफ्टपोर्न चालवले जाते. त्यात मैथुन, व इतर सगळे प्रकार बदलती पिढी, वगैरे नावाखाली खपवले जातात व प्रोत्साहन दिले जाते. त्यापेक्षा योग्य त्याप्रमाणात लोकांचे ह्या व्याधीबद्द्ल ज्ञान वाढवणे आवश्यक आहे.
अधिक माहिती - http://en.wikipedia.org/wiki/Postorgasmic_illness_syndrome
Comments
ब्रह्मचर्य हेच जीवन, वीर्यनाश हाच मृत्यू
ह्या रोगावर वैद्यकीय क्षेत्रातले जाणकार काय म्हणतात ह्याची वाट पाहतो आहे.
"ब्रह्मचर्य हेच जीवन, वीर्यनाश हाच मृत्यू" हा संदेश आठवला. ह्या प्रश्नावर आचार्य अत्र्यांनी ब्रह्मचारी प्रबोधनपर नाटकही लिहिले होते. तरुण पिढीसाठी ह्या नाटकाचे अधिकाधिक प्रयोग करायला हवेत.
असो.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
व्याधी
अफझलखानाला ही व्याधी होती का?
नितिन थत्ते
रीडीक्युलस
रीडीक्युलस प्रतिसाद आहे.
रिडिक्युलस?
"असा मी असामी" यांना यात रिडिक्युलस काय वाटते?
अफझलखान शिवाजीचे पारिपत्य करायला विजापुराहून निघाला तेव्हा त्याच्या जनानखान्यातल्या सर्व बेगमांना भोगून निघाला असे वाचले होते.
त्यामुळेतर त्याचा पराभव झाला नसेल? अशी शंका वाटून प्रतिसाद दिला होता.
नितिन थत्ते
अर्धे डोक्यात अर्धे स्क्रीनवर, म्हणून तो प्रतिसाद विचित्र वाटतो
चंद्रशेखर यांनी याच संकेतस्थळावर एका बखरेचा दुवा दिला होता त्यात अफजलखानाने त्याच्या गुरूच्या सांगण्यानुसार शिवाजीचे पारिपत्य करायला विजापुराहून निघण्यापूर्वी त्याच्या जनानखान्यातल्या सर्व ६० बेगमांना ठार मारून निघाला होता.
'गिरीश' हेच 'असा मी असामी' आहेत कशावरून?
सहमत!
--"अर्धे डोक्यात अर्धे स्क्रीनवर, म्हणून तो प्रतिसाद विचित्र वाटतो"
सहमत!
इन्कॉग्रुअस
नुसताच रीड्युअक्युलस नाही तर इन्कॉग्रुअसही वाटला.
नेमाडे
'खुल्लमखुल्ला चढने दो सालोंको, दो साल में अपने आप ठंडे पड जायेंगे' असे नेमाडे म्हणतात, तेंव्हा त्यांना हेच अभिप्रेत आहे काय?
सन्जोप राव
आह को चाहिये, इक उम्र असर होने तक
कौन जीता है, तिरे जुल्फ के सर होने तक
काय वाटते??!!
नेमाड्यांना काय वाटते ते नेमाड्यांनाच विचारयला हवे.
खुल्लमखुल्ला डराव! डराव!
माणसाने स्वतःचे विचार स्वतःच्याच नावाने व्यक्त करायचे असतात. स्वतःच्या मनातील घाण दुसर्या कुणा व्यक्तीच्या नावाने, 'संदर्भ न विशद करता' व्यक्त करणे म्हणजे निव्वळ भ्याडपणा.
उपक्रमावर लिहिताना असभ्य भाषेचा वापर करू नये. अन्यथा, कडक कार्यवाही करण्यात येईल.
व्वा....!
स्वतःच्या मनातील घाण दुसर्या कुणा व्यक्तीच्या नावाने, 'संदर्भ न विशद करता' व्यक्त करणे म्हणजे निव्वळ भ्याडपणा.
सहमत आहे.
भ्याडवृत्तीचा निशेध!
निशेध.
-दिलीप बिरुटे
(सहमतीपूरता उरलेला)
हा हा हा
एका भ्याडाने दुसर्या भ्याडाच्या पाठीवर मारलेली थाप आवडली. व्यासंग वगैरे म्हणून सोडाच पण चरितार्थाची गरज म्हणूनही अशा पंडितांना 'कोसला', 'जरीला' वाचावेसे वाटले नाही, वाचले असले तर लक्षात नाही हे वाचून धन्य झालो.
सन्जोप राव
आह को चाहिये, इक उम्र असर होने तक
कौन जीता है, तिरे जुल्फ के सर होने तक
पाहा हा एक नमुना
'खुल्लमखुल्ला चढने दो सालोंको, दो साल में अपने आप ठंडे पड जायेंगे' हे वाक्य संजोपराव म्हणतात म्हणून एक वेळ वाक्यावर अविश्वास दाखवता येईल पण एक प्राध्यापक म्हणतो की, ते नेमाड्यांचे वाक्य आहे यावर आम्हाला विश्वास ठेवता येईल. फक्त नेमाड्यांना जे म्हणायचे आहे त्या वाक्यातील आशयाचे विश्लेषण न करता त्यांना असलेला किंवा नसलेला मथितार्थ आपल्याला समजला असा आव आणून आपल्या मनातली घाण दुसर्यांच्या नावाने, संदर्भाने व्यक्त करणे हा भ्याडपणाच नाही तर दुसरं काय..!
-दिलीप बिरुटे
विद्वान
फक्त नेमाड्यांना जे म्हणायचे आहे त्या वाक्यातील आशयाचे विश्लेषण न करता त्यांना असलेला किंवा नसलेला मथितार्थ आपल्याला समजला असा आव आणून आपल्या मनातली घाण दुसर्यांच्या नावाने, संदर्भाने व्यक्त करणे हा भ्याडपणाच नाही तर दुसरं काय..!
सदर वाक्याचा इतर कोणता अर्थ या प्रकांडपंडितांना ठाऊक असल्यास त्यांनी तो इथे सांगून आम्हां पामरांना उपकृत करावे. मूळ पुस्तकात हे वाक्य कोणत्या संदर्भात आले आहे हे तपासून पहावे. स्वतःला वाचता येत नसल्यास इतर कुणाकडून तरी वाचवून घ्यावे. इतना तो करना स्वामी...
घाण ही सापेक्ष असते. 'नथिंग इज अनक्लीन फॉर अ केमिस्ट' आणि 'माणसाची ती घाण असते, पण कावळ्याचा तो घास असतो' अशी दोन वाक्ये आहेत. पण याचे स्त्रोत देत नाही. हे असले काही आपण वाचले असल्याची शक्यता नाहीच. 'बरे बुवा, आम्ही माणसे तुम्ही कावळे..' हा आरोप होण्याआधीच ते मान्य करतो. आम्ही कावळेच. डोमकावळे. आमच्यापासून सावध राहा. आम्ही डोळे फोडतो.
सन्जोप राव
आह को चाहिये, इक उम्र असर होने तक
कौन जीता है, तिरे जुल्फ के सर होने तक
नवी बातमी!
गिरीश, तुम्ही आपले लिखाण 'लेख' विभागातून सादर केले आहे. चर्चा विभागातून सादर केलेले नाही.
ह्या आजाराची लक्शणे युरोपातील आहेत असे आपण म्हणता. अजून भारतात तरी अशी काही लक्शणे नोंदी होवून ती जनतेच्या समोर लेख, बातमीच्या स्वरूपात आलेली नाहीत. त्यामुळे आयुर्वेदात काही उपचार आहेत कां हे अजून तरी कोणी सांगू शकेल असे वाटत नाही. जेंव्हा ह्या विशयातील लेख अनेक वर्तमान पत्रात अनेक लेखांतून, बातमीतून समोर येतील, तेंव्हा लगेचच, 'आयुर्वेदात याचे उपचार उपलब्ध आहेत!' असे सांगणारेही पुढे येतील, तेदेखील 'कोणतेही यशस्वी प्रयोग-चाचणी न करताच!'
माणूस जशी व जेवढी सुखं: उपभोगतो, जशी व जेवढी दुखं: भोगतो त्यानुसारच त्याला आजार होत असावेत.
आयुर्वेदातील उपाय
लेखकांना विनंती की त्यांनी हा लेख पुण्यातील एक प्रथितयश दैनिकात आयुर्वेदावर लेखन करून आपण त्यातले सर्वज्ञ वैद्य आहोत असे दर्शवणार्या व शिक्षणाने मेकॅनिकल इंजिनीयर असलेल्या व्यक्तीकडे पाठवल्यास आयुर्वेदातील उपाय त्यांना नक्की सापडेल.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
शिक्षण!?
शिक्षण काहीही असले तरी एखाद्या व्यक्तिने दुस-या फिल्डवर प्रभुत्व प्राप्त करण्याचा अधिकार नसतो असे नाही. आयुर्वेद लिहिणा-यांनी कोणती डीग्री घेतली होती? युरोपातील कोणत्या शास्त्रद्न्याने कॉलेज मधे जाऊन शास्त्र शिकले होते?
सध्याच्या काळात नियम किंवा कायद्याच्या अनुशंगाने जर त्या व्यक्तिला आयुर्वेदाबद्दल विचार मांडण्याची परवानगी नसेल तर तुम्ही म्हणताय त्यात दम आहे. पण " ......उपाय त्यांना नक्की सापडेल" ह्यात उपरोध जास्त वाटतोय.
माहिती
विचार मांडणे ठीक आहे परंतु उपचार करणे, उपचार करण्याची जाहिरात करणे, इ. वर निर्बंध असतात.
उपरोधच योग्य आहे.
"प्रतिभा"
ईश आपटे यांच्या मते प्रतिभा ही विद्यापीठीय हुशारी पेक्षा मोठी गोष्ट आहे ह्याची कल्पना बर्याच जणास दुर्देवाने नसते.......... त्यामुळे कृपया ''आयुर्वेदाचार्या"वर शिंतोडे उडवू नये.
कुणाला तरी snake oil विकून धंदा करायचा असल्यास आपण आडकाठी का घालावी?
सुखदु:खे व आजार
माणूस जशी व जेवढी सुखं: उपभोगतो, जशी व जेवढी दुखं: भोगतो त्यानुसारच त्याला आजार होत असावेत.
काहीही. जेनेटिक कारणे असतात, इन्फेक्शन्स असतात. सुखदु:खांचा आजाराशी संबंध असलाच तर (इथे सुखदु:खे उपभोगणे याचा अर्थ जीवनशैली असा त्यातल्या त्यात रॅशनल घेतला तर) तो फार थोडा आहे. अर्थात 'असावेत' असा शब्द वापरुन लेखकाने पळवाट ठेवलेली आहेच म्हणा, पण असली 'स्वीपींग स्टेटमेंटस' करायची आणि नंतर 'मला असे वाटले होते..पण मी म्हणजे काही सर्वज्ञ नाही' असे म्हणायचे अशा जलमुटकामारुखळबळनिर्माण प्रवृत्तींचा निषेध.
सन्जोप राव
आह को चाहिये, इक उम्र असर होने तक
कौन जीता है, तिरे जुल्फ के सर होने तक
जलमुटकामारुखळबळनिर्माण
जर्मन भाषेला साजेसा हा शब्द! :-)
सहमत!
ज्यांना दुखणे नाही असे लोक
ज्यांना हे दुखणे नाही अशा काही लोकांशी माझी ओळख आहे.
हे दुखणे ज्या लोकांना असेल, त्यांच्याबद्दल सहानुभूती आहेच. मात्र लेखातील शेवटच्या परिच्छेदाचा आदल्या परिच्छेदांशीकाही संबंध असला, तर तो काय? हे मला कळलेले नाही.
(काही लोकांना गव्हाचे पदार्थ खाल्ले की आजार होतो. ज्यांना हा आजार आहे, त्यांच्याबद्दल मला सहानुभूती आहेच. पण त्यावरून कुठला सार्वत्रिक गहूविरोधी निष्कर्ष काढणे मला प्रशस्त वाटत नाही.)
लेखाची सुरुवात आवडली.
खरे का??
ऑरगॅझम् यायची सुरुवात सामान्यतः कोणत्या वयात होते?
प्रश्नच मिटला!
मनाचे खेळ आहेत फक्त. पब्लिकला उल्लू बनवण्यासाठी "विवाहापूर्वी अथवा विवाहानंतर भेटा" प्रकारच्या वैदूंनी शोधून काढलेला आजार दिसतो आहे.