आँ?! हे काय हो तुकोबा?

अहो हे काय हो तुकोबा?
मी तर तुम्हाला संत तुकाराम म्हणुन ओळखतो. तुमचे विठ्ठल भक्तीचे ( क्वचित राम- कृष्ण ह्यांचा उल्लेख असलेले) आणि बर्‍याच वेळेस सामाजिक अंधश्रद्धेवर कोरडे ओढणारे , रोखठोक अभंग मी ऐकत आलोय.

तुमच्या लिखाणात एकदम "अल्ला " हा शब्द दिसला आणि आश्चर्य वाटलं. त्याकाळातली हिंदी भाषा ही दिसली.
अहो खरचः- tukaram.com वर सापडलं हे मला:-

’’ अल्ला करे सो होय बाबा, करतार का सिरताज। गाऊ बछरे तिस चलावे यारी बाधो न सात ।।१।।
ख्याल मेरा साहेबका बाब हुवा करतार। व्हांटे आघे चढे पीठ आपे हुवा असवार।।२।।
जिकिर करो अल्लाकी बाबा, सबल्यां अंदर भेस। तुका जो नर बुझे सोहि भया दरवेस।।३।।’’
(-गाथा, मुसलमानी अभंग क्र. ३,९८३)

हे त्याच्या पुढचं एक बघा:-

’’तम भज्याय ते बुरा जिकीर तै करे। सीर काटे ऊर कुटे ताहां झडकरे।।१।।
ताहां एक तु ही ताहां एक तुही। ताहां एक तु ही रे बाबा हम तुम नही।।२।।
दिदार देखो भले नहीं किसे पछाने कोये। सचा नहीं पकड सके झुटा झुटे रोये।।३।।
किसे कहे मेरा किन्हे सात लिया भास। नही मेलो मिले जीवना झुटा किया नास।।४।।
सुनो भाई कैसा तो ही होय तैसा होय। बाट खाना अल्ला कहना एकबारां तो ही।।५।।
भला लिया भेक मुंढे अपना नफा देख। कहे तुका सो ही सखा हाक अल्ला एक।।६।।

शिवायः-

’’अल्ला देवे अल्ला दिलावे, अल्ला दारू अल्ला खिलावे।
अल्ला बिगर नही कोय, अल्ला करे सोही होय।।१।।
मर्द होये वो खडा फीर नामर्दकु नही धीर। आपने दिलकुं करना खुसी तीन दामकी क्या खुमासी।।२।।

"’’अबाल नाम अल्ला बडा लेते भुल न जाये। इलाम त्या कालजमुपरताही तुंब बजाये।।१।।
अल्ला एक तूं, नबी एक तूं। काटते सिर पावों हाते नहीं जीव डराये।।२।।
आगले देखो पिछे बुझो, आपे हजुर आये।।३।।"

इथं आम्ही तर समजत होतो की राम आणि अल्ला चा दृष्टांत एकाच वेळी देउन उपदेश करणारे केवळ कबीर, गुरु नानक होते म्हणुन. तुमच्या ह्या रचनांचा अजिबातच पत्ता नव्हता.

--आपलाच
(चकित) मनोबा.
संदर्भः- http://www.tukaram.com

Comments

स्वाभाविक

माहितीत भर पडली की चकित होणे सोडून द्यावे.
नामदेवांच्या रचना तर पंजाबीत आहेत. आणि गुरूग्रंथसाहिब मध्येही समाविष्ट आहेत.
त्या काळातला बाकी इतिहास तपासला तर हे स्वाभाविकच वाटेल.
आपल्याला पॉप्युलर अभंग तितके माहिती असतात. मूळ गाथा किती लोकांनी वाचलेली असते?

नामदेवांचं ठाउक होतं.

पण तुकारामांनी असं काही लिहिलय हे माहित नव्हतं. म्हणजे, नामदेवांनी पंजाबपर्यंत प्रवास केलाय् म्हटल्यावर पंजाबीत त्यांचं लिखाण असणं अतर्क्य वाटत नाही.
पण तुकारामांनी काही असला प्रवास् केल्याच स्मरत नाही.

मनोबा

हड

हड आस्ल काय तरी मागून चिटकावलेल आसनार. कांग्रेसवाल्याच काम आसनार ते. पाहा जर शोदून.

आपला
अण्णा

नाही हो.

तुकारामांची त्यातल्या त्यात ऑथेंटिक माहिती tukaram.org उपलब्ध आहे. तिथुनच घेतलय्.

--मनोबा

वा!

फारच नवी आणि अनपेक्षित माहीती! अनेक आभार!

उपक्रमपंत वाचनखुणांचं कधी मनावर घेतील कोणास ठाऊक! :(

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

 
^ वर